आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३० मार्च २०२१ पंचांग - मंगळवार : फाल्गुन कृष्ण २, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.३१ सूर्यास्त ६.४६, चंद्रोदय रात्री ८.३४, चंद्रास्त सकाळी ७.४२, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.४८, संत तुकाराम बीज, भारतीय सौर चैत्र ९ शके १९४३. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १६६५ : पुरंदर किल्ल्याला वेढा घालणाऱ्या मोगल सेनापती दिलेरखान व मिर्झाराजे जयसिंह यांच्या फौजेशी लढताना मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडले. १९९३ : रंगाचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे नामवंत चित्रकार एस. एम. पंडित यांचे निधन. २००० : भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के. कस्तुरीरंगन, प्रसिद्ध कादंबरीकार आर. के. नारायण, ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया आणि ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘पद्मविभूषण’ सन्मान प्रदान. दिनमान - मेष : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रियजनांसाठी खर्च कराल. मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. काहींची वैचारिक प्रगती होईल. कर्क : गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. कामे मार्गी लागतील. सिंह : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. जिद्द व चिकाटी वाढेल. कन्या : उधारी व उसनवारी वसूल होईल. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. तुळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. वृश्चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. धनु : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मकर : व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील. नवी दिशा व नवा मार्ग दिसेल. कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल. कामात सुयश लाभेल. मीन : कौटुंबिक जीवनात चिंता लागून राहील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3cAycP6 Read More Read more No comments:
सिंधुदुर्गातील आणखी पाच शाळांना प्रयोगशाळा ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजावा, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. यापूर्वी समग्र शिक्षा अभियानमधून जिल्ह्यात 44 जिल्हा परिषदेच्या शाळांना अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा पुरविण्यात आलेल्या आहेत. आता नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत आणखी पाच शाळांना विज्ञान प्रयोगशाळा मंजूर करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हा नियोजनमधून 80 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षणा बरोबर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक गोडवा रुजला पाहिजे. विज्ञान अभ्यासाबाबत आत्मीयता निर्माण झाली पाहिजे. तरच उद्या जिल्ह्यातून वैज्ञानिक तयार होणार आहेत; मात्र यासाठी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शाळेत सुसज्ज व अत्याधुनिक उपकरणे असलेली प्रयोगशाळा आवश्यक आहे. त्यामुळे याचा विचार करीत प्राथमिक शिक्षण विभागाने "विज्ञान प्रयोग शाळा' ही नाविन्यपूर्ण योजना तयार केली आहे. तसा प्रस्ताव तयार करीत जिल्हा नियोजनकडे मागणी केली होती. जिल्हा नियोजन मंडळाने त्याला मान्यता दिली. पालकमंत्री उदय सामंत यानी यासाठी 80 लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आणखी पाच शाळांमध्ये विज्ञान प्रयोग शाळा सुरु होणार असल्याचे निश्चित झाले आहे. 520 उपकरणे शक्य या विज्ञान प्रयोग शाळेत एकूण 520 विज्ञान उपकरणे असणार आहेत. त्यामध्ये भौतिक, रासायनिक व जीवशास्त्र सामग्रीचा समावेश आहे. ही अत्याधुनिक विज्ञान प्रयोग शाळा असून यासाठी सबंधित शिक्षाकाना प्रशिक्षित केले जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली. उपकरणे कशी हाताळावी. प्रयोग कसे करावे ? एखाद्या उपकरणाचा उपयोग काय ? ही प्रयोगशाळा दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाला जोडलेली असून सर्व इयत्ताचे अभ्यासक्रम येथे प्रयोगातून अभ्यासता येणार आहेत. या आहेत पाच शाळा *हेत क्रमांक 1 केंद्र शाळा (वैभववाडी) *इळये क्रमांक 1 (देवगड) *कासार्डे क्रमांक 1 (कणकवली) *पडवे क्रमांक 1 (कुडाळ) *मळेवाड क्रमांक 1 (सावंतवाडी) पाच शाळा विज्ञान प्रयोगशाळा उपक्रमाअंतर्गत निवडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक पटसंख्या हा एकमेव निकष लावला आहे. या शाळेला परिसरातील शाळा जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे नजिकच्या शाळांतील मुलांनाही या प्रयोगशाळेचा उपयोग होणार आहे. - एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3djqFU1 Read More Read more No comments:
सिंधुदुर्गात 48 तासांत 100 कोरोना रूग्ण ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात गेल्या 48 तासात नवीन 100 कोरोना रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूण कोरोना बाधित संख्या 7 हजार 3 एवढी झाली आहे. आणखी एका रुग्णाचे निधन झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याची कोरोना मृत्यु संख्या 182 झाली आहे. एकूण 372 रुग्ण उपचाराखाली राहिले आहेत. सिंधूदुर्ग जिल्ह्याची कोरोना बाधित संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. दिवसाला पंधराच्या आसपास रुग्ण जिल्ह्यात मिळत असताना गेल्या सात दिवसांत तब्बल 280 रुग्ण मिळाले आहेत. यामुळे जिल्ह्याचे चिंतेत अधिक भर पडताना दिसत आहे. जिल्ह्यात 28 मार्चला 73 तर 29 मार्चला 27 कोरोनाचे नवीन रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे दोन दिवसात नवीन बाधित आकडा 100 झाला आहे. 29 ला कुडाळ तालुक्यातील आवळेगांव येथील 82 वर्षीय पुरुषाचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. यामुळे जिल्ह्याची मृत्यु संख्या 182 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 7 हजार 3 कोरोना रुग्ण मिळाले आहेत. यातील 6 हजार 443 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. 182 रुग्णाचे निधन झाले आहे. परिणामी 372 रुग्ण सक्रीय राहिले आहेत. या रुग्णावर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल अथवा होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून देण्यात आली. 372 रुग्ण सक्रिय असून त्यापैकी 4 रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. हे चारही रुग्ण ऑक्सीजनवर उपचार घेत आहे. आर.टी.पी.सी.आर टेस्ट मध्ये 41 हजार 540 नमुने तपासण्यात आले. यातील 4 हजार 782 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 413 नमूने घेण्यात आले. ऍन्टिजन टेस्टमध्ये एकूण 30 हजार 38 नमुने तपासले. पैकी 2 हजार 350 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 191 नमूने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण 71 हजार 578 नमूने तपासण्यात आले. तालुकानिहाय रुग्ण (कंसात मृत्यू संख्या) देवगड 550 (12), दोडामार्ग 376 (5), कणकवली 2116 (48) , कुडाळ 1528 (35), मालवण 664 (19) , सावंतवाडी 935 (43), वैभववाडी 218 (9) , वेंगुर्ला 584 (10), जिल्ह्याबाहेरील रुग्ण 32 (1) तर तालुका निहाय सक्रीय रुग्ण देवगड - 65, दोडामार्ग - 10, कणकवली - 88, कुडाळ - 48, मालवण - 56, सावंतवाडी - 58, वैभववाडी - 23, वेंगुर्ला- 22 व जिल्ह्याबाहेरील 2 अशाप्रकारे रुग्ण आहेत. संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/31vpX0C Read More Read more No comments:
आंबवणे सड्यावर आढळली कातळशिल्पे ओरोस (सिंधुदुर्ग) - किर्लोसजवळ असलेल्या आंबवणे (ता. मालवण) सड्यावर प्राचीन कातळशिल्पे आढळली आहेत; मात्र या निर्जन सड्यावर असलेली ही कातळशिल्पे पोक्लेनसारख्या अवजड यंत्राच्या वावरामुळे धोक्यात आल्याचे पहिल्याच भेटीत आढळल्याची माहिती कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी दिली. लळीत म्हणाले, ""आंबवणेच्या सड्यावर कातळशिल्पे असल्याची माहिती मिळाल्यामुळे याठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली. यात डॉ. सई लळीत व शुभेन्दू लळीत सहभागी झाले. आंबवणे हे गाव जेमतेम साडेतीनशे वस्तीचे छोटेसे गाव गडनदीच्या काठावर वसलेले आहे. कसालहून ओवळीये, हिवाळेतून एक रस्ता शिरवंडे गावातून किर्लोसकडे जातो. किर्लोसमधील पावणाई देवी मंदिर व ग्रामपंचायत कचेरीजवळून एक रस्ता आंबवणेकडे जातो. आंबवणेतून एक कच्चा रस्ता सड्यावर जातो. सुमारे एक किलोमीटरचा चढ झाल्यावर रस्ता संपून पायवाट सूरू होते. पायवाटेने आणखी एक किलोमीटर चालल्यावर आपण सड्यावर पोचतो. कणकवलीहूनही आचरा रस्त्याने किर्लोसमधून आंबवण्याला येता येते. या सड्यावर येताच एका मोठ्या सावरीच्या झाडाजवळ ही कातळशिल्पे पहायला मिळतात. शोधमोहिमेत एकूण सात कातळशिल्पे आढळली. यात सहा बाय नऊ फुट आकाराचा एक शिल्पपट्ट (मांड) आहे. प्राण्यांच्या सहा आकृत्या खोदलेल्या आहेत. प्राण्यांमध्ये चार प्राणी डुक्करसदृश आहेत. एक प्राणी बैलसदृश आहे; मात्र त्याला शिंगे दाखविलेली नाहीत.'' ते म्हणाले, ""आश्चर्यकारकपणे येथे एका मगरीचे सहा बाय अडीच फुट आकाराचे कातळशिल्प आढळले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेले हे मगरीचे पहिलेच कातळशिल्प आहे. यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मगरीची कातळशिल्पे आढळली आहेत. परिसरात शोध घेतला असता, नदीतील दगड सापडले असून ते तोडून टोकदार केल्याचे दिसून येते. कदाचित याच दगडांचा वापर कातळशिल्पे खोदण्यासाठी झाला असावा; मात्र या निर्जन सड्यावर मानवाचा आणि अवजड यंत्रांचा वावर सुरू झाला आहे, असे यावेळी दिसून आले. पोक्लेन यंत्राच्या लोखंडी साखळीच्या अगदी ताज्या खुणा येथे आढळून आल्या. शिल्पपट्ट आणि मगरीच्या कातळशिल्पाचे नुकसानही यामुळे झाले आहे. ही बाब अतिशय चिंताजनक असून यामुळे भविष्यात या कातळशिल्पांना धोका पोचू शकतो.'' दृष्टीक्षेपात *एक शिल्पपट्टासह सात कातळशिल्पे * जिल्ह्यात प्रथमच मगरीचे शिल्प * मानवी हस्तक्षेपामुळे अस्तित्व धोक्यात * ग्रामपंचायतीने जतन करण्याचे आवाहन आंबवणे गाव किर्लोस ग्रामपंचायतीच्या कक्षेत येते. अश्मयुगातील आदीमानवाच्या या पाऊलखुणा जपण्यासाठी ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यावे. तूर्तास कातळशिल्पांच्या सभोवती तेथीलच दगड रचून ठेवले आहेत. - सतीश लळीत, कातळशिल्प अभ्यासक संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3m2fQd0 Read More Read more No comments:
डोंगरात जाऊन केलेला अभ्यास सार्थकी, पशुवैद्यकीय परीक्षेत स्वप्नालीचे यश कणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमुळे शिक्षणात खंड पडू नये यासाठी डोंगरमाथ्यावर जाऊन अभ्यास करणाऱ्या स्वप्नाली मेस्त्री हिने पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्ष परीक्षेत महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. भर पावसातही तिने डोंगरमाथ्यावर झोपडी बांधून अभ्यास सुरू ठेवला होता. तिच्या या मेहनतीची दखल घेत केंद्र सरकारने तिच्या घरी ब्रॉडबॅण्ड सेवा सुरू करून दिली होती. केंद्र सरकारच्या मिळालेल्या मदतीचे तिने चीज केल्याची चर्चा परिसरात आहे. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाउन झाले. यात मुंबईतून सणासाठी आलेली दारिस्ते येथील स्वप्नाली गावीच अडकली. ती मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षामध्ये शिकत होती. कोरोनामुळे या महाविद्यालयाने ऑनलाइन शिक्षण सुरू केले; मात्र दारिस्ते गावात कुठल्याही मोबाईल कंपनीची फोरजी रेंज नसल्याने तिला ऑनलाइन शिक्षण घेणे कठीण झाले होते. या समस्येवर मात करण्यासाठी तिने घरालगतचा जंगलमय भाग पिंजून काढला. यात घरापासून दोन किलोमीटर अंतरावरील डोंगरमाथ्यावर एका मोबाईल कंपनीची रेंज मिळाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे आपल्या नातेवाइकांना घेऊन तिने डोंगर माथ्यावरच ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवले. पावसाळ्यात तर तिने डोंगरावरच झोपडी बांधून अभ्यास सुरू ठेवला होता. दरम्यान, स्वप्नालीच्या या खडतर शिक्षणाची माहिती वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाहिन्यांमधून सर्वांपर्यंत पोचली. यात अनेक दानशूर व्यक्तींकडून मदतीचा ओघ सुरू झाला. तर केंद्र सरकारनेही दखल घेऊन स्वप्नालीच्या घरापर्यंत बीएसएनएलची ब्रॉडबॅण्ड इंटरनेट व्यवस्था करून दिली. ऐन गणेशोत्सव कालावधीत घरात इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्याने पायपीट करत डोंगर माथ्यावर जाण्याच्या त्रासापासून तिची सुटका झाली. यानंतर स्वप्नालीने अभ्यासामध्ये सातत्य ठेवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवून दाखवला. अजून शिक्षण बाकी स्वप्नालीचे पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाचे अजून दीड वर्षाचे शिक्षण बाकी आहे. कोरोना संसर्ग असल्याने अजूनही ऑनलाइन माध्यमातूनच तिचे शिक्षण सुरू आहे. तर सरावासाठी जानवली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन सराव करणार असल्याचे तिने स्पष्ट केले. याखेरीज आपल्या शिक्षणासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करेन, अशी ग्वाहीही स्वप्नालीने दिली. - संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3fCXAGf Read More Read more No comments:
आंबा वाहतूकदारांचा संप मागे वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - येथे आंबा वाहतुकदारांनी पुकारलेला संप अखेर आज मागे घेण्यात आला. दरम्यान, या हंगामामध्ये आंबा बागायतदारांसाठी तडजोडीच्या दरात काम करणार असल्याचे वाहतुकदारांनी घेतलेल्या संयुक्त बैठकीत ठरविले. आंबा पेटी वाहतूक करताना 150 रुपये प्रति पेटी मागे मिळावा यासाठी वाहतूकदार ट्रक मालक यांनी संप पुकारला होता; मात्र वेंगुर्ला येथे आज माल वाहतुकदार, ट्रान्सपोर्टदार व आंबा बागायतदार यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी वाहतुकदार संघटना पदाधिकारी शिवाजी घोगळे, मनोज वालावलकर, रामदास पडते, शरद वालावलकर, श्री रामेश्वर ट्रान्सपोर्टचे जैनू पडवळ, लता गुड्सचे जगन्नाथ सावंत, सिद्धिविनायक ट्रान्सपोर्टचे श्याम कौलगेकर, वेंगुर्ला ट्रान्सपोर्टचे श्री. गावडे, संदिप पेडणेकर, उदय चिचकर, अंकुश वेंगुर्लेकर यांच्यासह अन्य वाहतुकदार उपस्थित होते. या बैठकीत वेंगुर्ला ते वाशी-नवी मुंबई पर्यंतचे भाडे प्रति पेटीला 150 रुपये असावे, हमाली, कमिशन वजा जाता गाडी मालकास 110 रुपये मिळावेत यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत आंबा बागायतदारांच्या हितासाठी तडजोड केली. गाडीमध्ये आंबा पेटी एका जागेवर भरावी, गाडीला फिरती नसावी, दोरी बांधण्यासाठी गाडीमालक स्वखूशीने पैसे देतील ते हमालांनी घ्यावेत, गाड्या नंबरप्रमाणे भराव्यात, एक्सप्रेससाठी जाणारी गाडी सायंकाळी 6 वाजेर्यंत सोडण्यात यावी, लोकल वाहतुक वेळेच्या पुढे गेलीतरी त्यांना पूर्ण भाडे मिळावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले आणि आपला संप मागे घेतल्याचे वाहतूकदारांनी जाहीर केले. संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3m6NY7Q Read More Read more No comments:
पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात १७५ बालगुन्हेगारांची भर पिंपरी - पालक-मुलांमध्ये कमी झालेला संवाद, पराकोटीची विषमता यामुळे मुलांच्या हाती पाटी-पेन्सिल असण्याऐवजी ब्लेड-चाकू आला आहे. परिणामी बालकांच्या हातून घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्यावर्षी तब्बल १७५ बालगुन्हेगारीचे गुन्हे नोंदवले गेले. या गुन्ह्यांत २५६ विधिसंघर्षित मुला-मुलींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीतून पुढे आलेल्या गंभीर बाबी पालकवर्गाला विचार करायला लावणाऱ्या आहेत. प्राप्त आकडेवारीनुसार या गुन्ह्यात चार मुलींचाही समावेश आहे. २५६ पैकी २५२ गुन्हे मुलांकडून घडलेले असून, निगडी पोलिस ठाण्यातंर्गत सर्वाधिक आहेत. या बालकांच्या हातून हत्या, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, वाहन चोरी, विनयभंग, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे घडले आहेत. अशा विधिसंघर्षग्रस्त मुलांमुलीसाठी पोलिस आयुक्तालय आणि विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पुनर्वसनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. आजअखेर ३१४ बालकांवर मानसोपचार केले आहेत. या कामातून प्रचंड समाधान मिळत असल्याचे गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार कपिलेश इगवे यांनी सांगितले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा विधिसंघर्षग्रस्त म्हणजे... बालगुन्हेगारी कालही होतीच, पण आज ‘थ्रिल’ हा घटक महत्त्वाचा ठरतो आहे. आर्थिक आबाळ, पालकांचे दुर्लक्ष, व्यसने आणि थ्रिल अनुभवायची मानसिकता यामुळे अनेक मुले गुन्हेगारीच्या परत न येणाऱ्या वाटेवरच प्रवास सुरू करताहेत. बालगुन्हेगार कायद्यानुसार अशा गुन्हेगारांना ‘विधिसंघर्षग्रस्त’ म्हणतात. वयाच्या १८ वर्षाखालील आरोपींना विधिसंघर्षग्रस्त बालके म्हटले जाते. या आरोपींवर भारतीय दंडविधान म्हणजे आयपीसीअंतर्गत गुन्हे दाखल होतात. बालकांवरील खटले न्याय अधिनियम १९८६ अंतर्गत चालवले जातात. त्यांच्यासाठी बाल न्यायमंडळ काम करते. त्यांना पालकांच्या देखरेखीखाली किंवा सुधारगृहात पाठवले जाते. अशा प्रकरणात आरोपींना जागेवरच जामीन देण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. 'आषाढी वारीला परवानगी द्या, अन्यथा रस्त्त्यावर उतरू'; वारकऱ्यांचा इशारा सुनावणीसाठी त्यांना बाल न्यायमंडळात आणले जाते. सामाजिक दृष्टीने त्यांचा विचार करावा लागतो. अल्पवयीन मुले गुन्हेगारी प्रवृत्तीची नसतात. त्यामुळे त्यांनी कोणता गुन्हा केला, यापेक्षा तो का केला, हे समजून घ्यावे लागते. त्यांच्यात उपजत ती वृत्ती नसते तर पालकांच्या वागण्यामुळे ते तसे बनतात. विधिसंघर्षग्रस्त बालकांसमोर पोलिस किंवा वकिलांनी युनिफॉर्म घालून येऊ नये, त्यामुळे त्यांच्यावर दडपण येऊ शकते, असा नियम आहे. तसेच या बालकांना बेड्या घालण्यासही बंदी आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आज १४७२ नवीन रुग्ण पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतून विशेष बाल पथक गुन्हे शाखेच्यावतीने शहरातील विधिसंघर्षग्रस्त बालक, दिशा भरकटलेले अल्पवयीन बालकांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रोजगार मेळावे, कर्ज मेळावे घेऊन अशा बालकांची शक्ती योग्य दिशेवर आणण्यासाठी काम करण्यात येत आहे. - डॉ. सागर कवडे, सहायक पोलिस आयुक्त गेल्या तीन महिन्यांपासून या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गुन्हेगारीचा शिक्का पुसून टाकण्यासाठी ज्यात त्यांना आवड आहे, त्याचे शिक्षण दिले जाते. खेळ, समुपदेशन, व्यक्तिमत्त्व विकास करण्यावर मेहनत घेतली जात आहे. गरजेनुसार कामाचीदेखील व्यवस्था करून दिली जात आहे. - संदेश बोर्डे, अध्यक्ष, संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशन Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3fCXyy7 Read More Read more No comments:
पुण्यातील ‘जम्बो’मध्ये रुग्णांची संख्या वाढली पुणे - जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये जेमतेम आठवडाभरात तीनशेहून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. सरकारी रुग्णालये पूर्ण क्षमतेने भरली आहेत, तर खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनासाठी बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे आता जम्बो रुग्णालय हे उपचाराचे प्रमुख केंद्र होत आहे. शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. जानेवारीपासून रुग्णसंख्या कमी झाल्याने हे सेंटर बंद केले होते. मात्र, फेब्रुवारीपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहेत. एकेका दिवसामध्ये चार हजारांपर्यंत नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यातून रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे, असे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्यातील तज्ज्ञांनी नोंदविले. ससून रुग्णालय आणि महापालिकेचे डॉ. नायडू रुग्णालय कोरोनाबाधीतांनी भरले आहे. तेथे उपचारासाठी दाखल होणाऱ्या नवीन रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, ही रुग्णालय प्रशासनासमोरील मोठी डोकेदुखी ठरत आहे. खासगी रुग्णालयांमध्येही बेड नाहीत. तसेच, तेथील उपचाराचा खर्च सामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेरचा असल्याने आता जम्बो सेंटरमध्ये उपचारांसाठी रुग्ण दाखल होत आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा याबद्दल जम्बो कोविड केअर सेंटरचे अधिष्ठाता डॉ. श्रेयांस कपाले म्हणाले, ‘‘जम्बोमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जेमतेम आठ दिवसांमध्ये रुग्णांनी तीनशेचा आकडा ओलांडला. पहिल्या टप्प्यात पाचशेपर्यंत रुग्ण दाखल करण्याची क्षमता आहे.’’ रुग्णांचे प्रमाण वाढेल त्यानुसार डॉक्टर आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची संख्या वाढविण्यात येईल. या रुग्णालयाची क्षमता ८०० खाटांची आहे. हे रुग्णालय पूर्ण क्षमतेचे कार्यान्वित करण्याची क्षमता असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 'कोरोना प्रतिबंधासाठी सुक्ष्म नियोजन करा'; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे झेडपीला आदेश खासगी रुग्णालयांमधील महागडे उपचार परवडत नाहीत, म्हणून जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णाला दाखल केले. तीन दिवसांपासून रुग्णाची प्रकृती सुधारत आहे. - लक्ष्मण जाधव, रुग्णाचे नातेवाईक सात खासगी रुग्णालयांत गेलो. पण, जागा नसल्याने एकाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करता आले नाही. अखेर, जम्बो कोविड केअर सेंटरचा रस्ता धरला. तातडीने ऑक्सिजन बेडवर दाखल करून उपचार सुरू केले. - सारंग घोडके, रुग्णाचे नातेवाईक बेडसाठी धावपळ कायम कोरोनाबाधित अत्यवस्थ रुग्णाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. वेगवेगळ्या रुग्णालयांची दारे ठोठावूनही ‘बेड नाही’ हे एकच उत्तर नातेवाइकांना मिळत आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे. शहरात गेल्या महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णाला उपचारांसाठी दाखल कराव्या लागणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. सरकारी आणि महापालिका यापेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यास प्राधान्य देणाऱ्या रुग्णांना बेड मिळता मिळत नाहीत, अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे. शहरातील बहुतांश रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. गुगल पे, पेटीएम केल्यास एस्ट्रा पैसे द्यावे लागणार; पूर्व हवेलीतील दुकानदारांचा ग्राहकांना झटका खासगी रुग्णालयांमधील काही बेड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र, खासगी रुग्णालयामध्ये कोरोनाबाधीत रुग्णांना बेड मिळत नाही, अशी माहिती रुग्णांच्या नातेवाइकांनी दिली. शहरातील काही मोजक्या रुग्णालयांवरच कोरोनाबाधीतांच्या उपचारांचा ताण पडत असल्याचा सूर काही खासगी रुग्णालयांनी काढला आहे. या रुग्णालयांमधील बेडही आता भरले आहेत. त्यामुळे रुग्णाचे वय, त्याच्या आजाराची तीव्रता, त्याला अत्यावश्यक उपचार या सर्वांचा विचार करून रुग्णाला दाखल केले जात आहे. इतर रुग्णांना घरातच उपचार घेण्याचा सल्ला दिला जात आहे. केवळ कोरोना झाला म्हणून उपचारासाठी दाखल केले जात नाही, असेही रुग्णालयांतर्फे सांगण्यात आले. बचत गटाच्या मिटींगसाठी कुरकुंभ येथे नेऊन विवाहितेवर बलात्कार; तिघांना अटक रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण विभागात रुग्णाची तपासणी केली जाते. चालताना, बोलताना दम लागलेल्या, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या, न्यूमोनिया झाल्याचे निष्पन्न झालेल्या रुग्णांना उपचारांसाठी दाखल करावे लागते. मात्र, ऑक्सिजन बेडदेखील आता पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल करून उपचाराची गरज असलेल्या रुग्णांनाही महापालिकेच्या किंवा ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, असे वेगवेगळ्या डॉक्टरांनी सांगितले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3u4NjX5 Read More Read more No comments:
रेडी-रेकनरच्या दराकडे लागले सर्वांचे लक्ष पुणे - नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने २०२१-२२ या आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या (वार्षिक बाजारमूल्य दर) दरात सरसकट ३ टक्के वाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. राज्य सरकारकडून त्यावर काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान मुद्रांक शुल्कातील दोन टक्क्यांची सवलत ३१ मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी २ एप्रिल रोजी रेडी रेकनरचे दर नव्याने लागू करण्यात येतात. त्यानुसार मुद्रांक शुल्क विभागाने पुढील आर्थिक वर्षाच्या रेडी रेकनरच्या दरात अत्यल्प वाढ करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मध्यंतरी मुद्रांक शुल्कात सवलत दिली होती. ही सवलत येत्या ३१ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ घेण्यासाठी दस्त रजिस्टर कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. गुगल पे, पेटीएम केल्यास एस्ट्रा पैसे द्यावे लागणार; पूर्व हवेलीतील दुकानदारांचा ग्राहकांना झटका मुद्रांक शुल्क विभागाकडून पुढील आर्थिक वर्षासाठीचे रेडी रेकनरचे दर तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी मागील वर्षभरात झालेल्या व्यवहारांच्या सरासरीचा आढावा घेऊन नवे दर प्रस्तावित केले आहे. त्यानुसार शहरी व ग्रामीण भागात सरासरी ३ टक्के इतकी वाढ प्रस्तावित केली आहे, अशी माहिती मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. 'कोरोना प्रतिबंधासाठी सुक्ष्म नियोजन करा'; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे झेडपीला आदेश ग्रामीण भागात येत्या काही वर्षांत मोठे प्रकल्प येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने विमानतळ, रिंगरोड, मेट्रो, रेल्वे मार्ग, एमआयडीसी, महामार्गांचे रुंदीकरण, टाउनशिप स्कीम योजनांचा त्यामध्ये समावेश आहे. बचत गटाच्या मिटींगसाठी कुरकुंभ येथे नेऊन विवाहितेवर बलात्कार; तिघांना अटक सवलतीचा फायदा मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत दोन दिवसांनी संपुष्टात येणार आहे. परंतु या सवलतीचा फायदा चार महिन्यांपर्यंत घेता येणार आहे. ३१ मार्चपूर्वी मुद्रांक शुल्क भरून दस्तावर स्वाक्षरी केल्यास त्या तारखेपासून चार महिन्यांपर्यंत दस्त नोंदणी करता येणार आहे. तसेच सवलतीचा फायदा मिळणार आहे. ३१ डिसेंबरपूर्वी ज्यांनी मुद्रांक शुल्क भरून दस्तावर स्वाक्षरी केली आहे. त्यांना ३० एप्रिलपर्यंत दस्त नोंदणी करता येणार आहे. त्यांनादेखील सवलतीचा फायदा मिळणार आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3czi28Y Read More Read more No comments:
पुणे महापालिका संकेतस्थळाच्या व्हिजिट्सच्या संख्येत झाली एवढी वाढ पुणे - महापालिकेने आपल्या कायपद्धतीमध्ये पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याच्या दृष्टीने आमूलाग्र बदल करताना डिजिटल माध्यमांच्या वापरावर भर दिला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत सहा लाखांहून अधिक नागरिकांनी यामाध्यमांतून महापालिकेशी संवाद साधल्याचे आकडेवारी वरून समोर आले आहे. २०१६ मध्ये केवळ सहा लाख ३१ हजार व्हिजिट्स असलेल्या पुणे महापालिकेच्या संकेतस्थळाने २०१७ नंतर लोकाभिमुख पावले उचलल्याने व्हिजिट्सच्या संख्येत तब्बल नऊपटींनी वाढ झाल्याचे महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेली आकडेवारी दर्शविते. महापालिकेच्या pmc.gov.in या संकेतस्थळाने २०२० मध्ये सुमारे ५६ लाख ४८ हजार व्हिजिट्सचा टप्पा ओलांडला. नागरिकांचे दैनंदिन जीवनमान अधिकाधिक सुसह्य करण्यासाठी विविध विभागांतील त्रुटी किंवा समस्या वेळीच समोर येणे महत्त्वाचे असते. त्यानुसार योग्य ती कार्यवाही करून समस्या सोडविता येऊ शकतात, हे सूत्र ठेवत महापालिकेने डिजिटल प्रणालींद्वारे विविध विषयांवर नागरिकांच्या सूचना स्वीकारणे आणि त्यावर शक्य तितक्या लवकर कार्यवाही करणे, ही पद्धत अवलंबली आहे. नागरिकांशी संवाद साधणे आणि त्यांना तक्रारींसाठी व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे या धोरणातील सर्वांत महत्त्वाचे पाऊल होते. त्यानुसार पुणे महापालिकेने कॉल सेंटरचे आधुनिकीकरण केले. उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांत कॉल सेंटरच्या माध्यमातून सुमारे चार लाख ७० हजार नागरिकांनी संवाद साधला. व्हॉट्सॲप, ट्विटरसारख्या लोकप्रिय सोशल मीडियावरही पुणे महापालिकेने अधिकृत खाते तयार करून वापरकर्त्यांसाठी संवाद अधिक सोपा केला. याखेरीज पीएमसी केअर, स्वच्छता या ॲप्सच्या माध्यमांतूनही महापालिका नागरिकांशी जोडली गेलेली आहे. गेल्या तीन वर्षांत सोशल मीडिया व ॲप्सच्या माध्यमातून सुमारे दोन लाख ६२ हजार तक्रारी, सूचना व अभिप्रायवजा संदेश महापालिकेस प्राप्त झाले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापालिकेच्या संकेतस्थळा वरूनच नागरिकांची अधिकाधिक कामे व्हावीत, या उद्देशाने संकेतस्थळात योग्य ते बदल करण्यात आले. २०१७ पासून महापालिकेच्या संकेतस्थळाला दरमहा सरासरी अडीच ते तीन लाख व्हिजिट्सची नोंद होते आहे. गेली सलग तीन वर्षे व्हिजिट्सची वार्षिक सरासरी ३२ लाखांहून अधिक राहिली असून, गेल्यावर्षी लॉकडाउनच्या कालावधीत कोरोना विषयीची खात्रीशीर माहिती, आकडेवारी आणि विविध सेवांसाठी महापालिकेच्या संकेतस्थळाला ५६ लाख ४८ हजार एवढ्या विक्रमी व्हिजिट्स झाल्या. पुणे जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनकच; पुन्हा 4 हजारांवर कोरोना रुग्ण डिजिटल प्रणालींचा योग्य वापर करीत कर भरण्यासाठी सर्वमान्य व प्रचलित असलेल्या सर्व ऑनलाइन पेमेंट सुविधाही महापालिकेने उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षातील मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुमारे १,५१५ कोटी रुपयांचा विक्रमी मिळकतकर जमा झाला. विशेष म्हणजे, मिळकतकर भरणाऱ्या ११ लाख मिळकतधारकांपैकी तब्बल ५० टक्के नागरिकांनी मिळकतकर ऑनलाइन जमा केला आहे. पुणेकरांनो, आता बेशिस्तपणा नको! विनाकारण रात्री हिंडणाऱ्यांवर होणार कडक कारवाई पीएमपीचे ॲप लवकरच नव्या रूपात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वेगवान होण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पीएमपीएमएलनेही मोबाईल ॲप अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी पावले उचलली आहेत. येत्या काही दिवसांमध्ये पीएमपीएमएलचे मोबाईल ॲप संपूर्णत: नव्या रूपात प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. यात बसचा रिअल टाइम प्रवास कळू शकणार असून, प्रवाशांना हव्या असलेल्या मार्गावर कधी आणि कोणती बस उपलब्ध आहे, हेदेखील समजू शकणार आहे. पुढील टप्प्यात मोबाईल ॲपवरूनच तिकीट काढण्याची सुविधाही पीएमपीएमएल देणार आहे. जनतेने महापालिकेकडे येण्यापेक्षा महापालिकेने जनतेपर्यंत पोहोचणे अधिक योग्य आहे, या विचाराने जाणीवपूर्वक धोरणे आखली व अंमलबजावणीवरही भर दिला. महापालिकेने घेतलेली डिजिटल भरारी हे त्याचेच फलित आहे. - गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3dild3V Read More Read more No comments:
आम्ही तर हुकमाचे ताबेदार हेल्मेट, मास्क, गमबूट व युनिफॉर्म या पेहरावात व सोबत कपड्यांचा एक जादा जोड घेऊन, महावितरणचे तीन कर्मचारी एका सोसायटीत शिरले. कामाला सुरुवात करण्यापूर्वी कानात कापसाचे बोळे घातल्याची खात्री त्यांनी केली. थकीत वीजबिलांची यादी असलेल्या सहकाऱ्याने ग्राहकाचे नाव व ग्राहक नंबर आदी माहिती दुसऱ्याला पुरवली. तो वीज तोडणार तेवढ्यात दोघे-तिघे धावत पळत आले. ‘‘ए लाइट तोडू नकोस. नाहीतर लई वाईट परिणाम होतील. माझे हात लांबपर्यंत पोचलेत.’’ एकाने दमदाटी केली. बराचवेळ तो दमदाटी करत होता. ‘‘ए काय बहिरा-बिहिरा झालास काय? मी एवढे जीव तोडून बोलतोय आणि तू बघायलाही तयार नाहीस.’’ असे म्हणून तो पुन्हा डाफरला. ‘‘अहो काका, त्यांनी कानात कापसाचे बोळे घातलेत. तुमचं बोलणं त्यांच्यापर्यंत पोचत नाही.’’ असे एकाने म्हटल्यावर काकाने पुढे होत कर्मचाऱ्यांच्या कानातील बोळे काढले. त्यावर ‘सरकारी कामकाजात अडथळा आणणे, दमदाटी करणे, मारहाण करणे याप्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. दोन ते दहा वर्षे तुम्हाला शिक्षा होऊ शकते. तेव्हा सावधान!’ एका कर्मचाऱ्याने पाठ केलेली वाक्ये धडाधडा म्हणून दाखवली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘‘ए भीती कोणाला दाखवतोस? मला आता वेळ नाही. नायतर तुम्हाला चांगला इंगा दाखवला असता. मला तुम्ही ओळखलेलं दिसत नाही. पाणीपुरवठा खात्याच्या साहेबांचा मी ड्रायव्हर आहे. तुम्ही आज माझी लाइट तोडली ना. साहेबांना सांगून उद्या तुमचं पाणीच तोडतो का नाय बघा. मग डोळ्यात ‘पाणी’ आणून पाणी जोडून द्या, असं म्हणू नका. माझ्या नादाला लागू नका. साहेबांना सांगून भल्या भल्यांना मी पाणी पाजलंय.’’ मात्र, कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा कानात कापसाचे बोळे घालून, त्यांची लाइट तोडली. ते बघून ड्रायव्हरकाका हतबल झाले व ‘‘बघून घेईल, बघून घेईल,’’ असे म्हणत तिथून निघून गेले. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दहा मिनिटांनी कर्मचारी डी विंगजवळ लाइट तोडायला आले. त्यावेळी नेवसेकाकांनी त्यांना अडवले व म्हटले, ‘‘तुम्ही माझी लाइट तोडू शकत नाही.’’ त्यावर एक कर्मचारी म्हणाला, ‘‘आता तुम्ही कोणाचे ड्रायव्हर आहात,’’ असे म्हणून जोरात हसला. ‘‘हे बघा, अशी चेष्टा करणे तुम्हाला शोभा देत नाही. तुम्ही माझी लाइट तोडू शकत नाही कारण आताच मी बिल भरले आहे,’’ असे म्हणून त्यांनी बिल भरल्याची पावती दाखवली. त्यावर एक कर्मचारी पुढे आला. ‘‘हे बघा, तुम्ही आता बिल भरलंय. पण तुमची लाइट तोडायची परवानगी आम्हाला आज सकाळी नऊला मिळालीय. त्यावर आमच्या साहेबांची सही बघा. लाइट तोडण्याची परवानगी देईपर्यंत तुम्ही बिल भरले होते का? नाही ना ! मग नियमानुसार आम्ही वीज तोडणार म्हणजे तोडणारच. आम्ही शेवटी हुकमाचे ताबेदार आहोत,’’ असे म्हणून नेवसे यांची लाइट त्यांनी तोडली. ‘‘आता तीनशे रुपये जोडणीशुल्क भरून पावती ऑफिसमध्ये दाखवा. फक्त एका आठवड्याच्या आत तुमची लाइट जोडून देतो. आणि हो! पाणीपुरवठा खात्यातील साहेबांच्या ड्रायव्हरलाही हा निरोप आवर्जून द्या बरं का.’’ असं एका कर्मचाऱ्याने म्हटल्यावर नेवसेकाका पहातच राहिले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3ddryh0 Read More Read more No comments:
कोरोनाच्या सावटाखाली रंगांचा सण धूलिवंदन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा पुणे - रंगांचा सण म्हणजेच धूलिवंदन. पहाटेपासूनच हातात लाल, गुलाबी, निळा, पिवळा असे विविध रंग, रंगांनी भरलेली पिचकारी व फुगे, एकमेकांना रंगविणे, घराघरांत गोडधोड पदार्थ, घरातील सदस्यांबरोबरच शेजारी व मित्रपरिवाराची जमणारी गर्दी, असे चित्र डोळ्यांसमोर येते. दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणारा हा सण मात्र यंदा कोरोनाच्या सावटाखाली अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा होळी म्हटलं की घरातील बच्चे कंपनीची धाव असते ती थेट दुकानात. विविध रंग, वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या घेण्यासाठी सरसावलेल्या चिमुकल्यांसाठी हा सण आकर्षणाचा केंद्र ठरतो. सध्या शहरातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे होळीच्या सणावर अनेक मर्यादा लावण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणे, हाउसिंग सोसायटी अशा वेगवेगळ्या भागांमध्ये गर्दीला टाळण्यासाठी होळी खेळण्यास मनाई केली आहे. याच अनुषंगाने शहरात धूलिवंदन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आले. घरोघरी लहान मुलांनी व मोठ्यांनी अंगणातच आपापल्या परिवारासोबत आणि काही मित्रांना रंग लावत धूलिवंदनाचा आनंद लुटला. 'कोरोना प्रतिबंधासाठी सुक्ष्म नियोजन करा'; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे झेडपीला आदेश प्रत्येक वर्षी बहुतांश सोसायटीमध्ये धूलिवंदनाच्या दिवशी डीजे लावून मोठ्या संख्येने नागरिक हा सण साजरा करताना दिसतात. तर हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे सारख्या ठिकाणी होणाऱ्या ‘होली इव्हेंटमध्ये अभिनेते, कलाकारांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणाई उपस्थित असते. ठिकठिकाणी ‘रंग बरसे भिगे चुनर वाली... होली खेले रघुविरा’... सारख्या गाण्यांचा आवज घुमत असतो. यंदा असे चित्र पाहायला मिळाले नाही. यावर्षी नागरिकांनी एकमेकांच्या घरी जात रंग लावून शुभेच्छा देऊन हा सण साजरा केला. गुगल पे, पेटीएम केल्यास एस्ट्रा पैसे द्यावे लागणार; पूर्व हवेलीतील दुकानदारांचा ग्राहकांना झटका पारंपरिक पद्धतीने होळीची पूजा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण घालण्यासाठी प्रशासनाने सण सोहळ्यांवर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे यावर्षी होळी पूजादेखील साध्या पद्धतीने व मर्यादित लोकांच्या उपस्थितीत करण्यात आली. लोकांनी पारंपरिक पद्धतीने रांगोळी काढून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ म्हणत होलिका दहन केले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/31vlKKm Read More Read more No comments:
सांडपाणी, घनकचरा प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यातील ५० गावांची निवड पुणे - घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील ५० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांकडून या प्रकल्पाबाबतची अंदाजपत्रके (इस्टिमेटस) आणि तांत्रिक मान्यतेबाबतचे प्रस्ताव जिल्हा परिषदेने मागवले आहेत. यानुसार आतापर्यंत ३० गावांचे अंदाजपत्रके तांत्रिक मान्यतेसह प्राप्त झाले आहेत. मात्र, उर्वरित २० गावांचे प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेले नसल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात आले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानातील टप्पा दोन अंतर्गत चालू आर्थिक वर्षात ही गावे निवडण्यात आली आहेत. या प्रकल्पासाठी पूर्वनियोजनानुसार सर्व जिल्हा परिषद गटातून प्रत्येकी एक आणि पंचायत समिती गणातून प्रत्येकी एक, याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील एकूण २२५ गावांची निवड करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु कोरोना संसर्गामुळे आर्थिक गणिते बदलल्यामुळे यंदाच्या वर्षात कमाल ५० गावांचीच निवड करण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे. त्यानुसार या गावांची निवड करताना, नदीकाठची, मोठी आणि घनकचऱ्याची समस्या असलेल्या गावांना प्राधान्य देण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनकच; पुन्हा 4 हजारांवर कोरोना रुग्ण या प्रकल्पांच्या उभारणीसाठी पाच हजार लोकसंख्येच्या आतील गावांना घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रति व्यक्ती ६० रुपयांप्रमाणे तर, पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांना प्रति व्यक्ती ४५ रुपये तर, सांडपाणी व्यवस्थापनासाठी पाच हजारांच्या आतील गावांना प्रति व्यक्ती २८० रुपये व पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांना प्रति व्यक्ती ६६० रुपयांप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पुणेकरांनो, आता बेशिस्तपणा नको! विनाकारण रात्री हिंडणाऱ्यांवर होणार कडक कारवाई निवडलेली तालुकानिहाय गावे - आंबेगाव - शेवाळवाडी, निरगुडसर, घोडेगाव. - भोर - उत्रौली. - बारामती - निंबूत, करंजेपूल, सांगवी, पणदरे. - दौंड - देशमुखमळा, लिंगाळी, खामगाव, वरवंड, यवत, पाटस. - हवेली - माळीनगर, अष्टापूर, नऱ्हे, लोणीकाळभोर, उरुळीकांचन, मांजरी बुद्रूक. - इंदापूर - रूई, मदनवाडी, शेलगाव, लासुर्णे, बावडा. - जुन्नर - चाळकवाडी, बारव, निमगाव सावा, धालेवाडी तर्फे हवेली, डिंगोरे, बेल्हे, आळे, ओतूर, नारायणगाव. - खेड - बहूळ, चऱ्होली खुर्द, काळूस. - मावळ - मंगळूर, वराळे, इंदोरी. - मुळशी - कासारअंबोली, लवळे. - पुरंदर - वाल्हा. - शिरूर - पाबळ, कारेगाव, टाकळीहाजी, वडगाव रासाई, रांजणगाव गणपती, शिक्रापूर. - वेल्हे - विंझर. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/39oy0k6 Read More Read more No comments: