पुण्यातील ‘जम्बो’मध्ये रुग्णांची संख्या वाढली पुणे - जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये जेमतेम आठवडाभरात तीनशेहून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. सरकारी रुग्णालये पूर्ण क्षमतेने भरली आहेत, तर खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनासाठी बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे आता जम्बो रुग्णालय हे उपचाराचे प्रमुख केंद्र होत आहे.  शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. जानेवारीपासून रुग्णसंख्या कमी झाल्याने हे सेंटर बंद केले होते. मात्र, फेब्रुवारीपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहेत. एकेका दिवसामध्ये चार हजारांपर्यंत नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यातून रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे, असे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्यातील तज्ज्ञांनी नोंदविले. ससून रुग्णालय आणि महापालिकेचे डॉ. नायडू रुग्णालय कोरोनाबाधीतांनी भरले आहे. तेथे उपचारासाठी दाखल होणाऱ्या नवीन रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, ही रुग्णालय प्रशासनासमोरील मोठी डोकेदुखी ठरत आहे. खासगी रुग्णालयांमध्येही बेड नाहीत. तसेच, तेथील उपचाराचा खर्च सामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेरचा असल्याने आता जम्बो सेंटरमध्ये उपचारांसाठी रुग्ण दाखल होत आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा याबद्दल जम्बो कोविड केअर सेंटरचे अधिष्ठाता डॉ. श्रेयांस कपाले म्हणाले, ‘‘जम्बोमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जेमतेम आठ दिवसांमध्ये रुग्णांनी तीनशेचा आकडा ओलांडला. पहिल्या टप्प्यात पाचशेपर्यंत रुग्ण दाखल करण्याची क्षमता आहे.’’ रुग्णांचे प्रमाण वाढेल त्यानुसार डॉक्टर आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची संख्या वाढविण्यात येईल. या रुग्णालयाची क्षमता ८०० खाटांची आहे. हे रुग्णालय पूर्ण क्षमतेचे कार्यान्वित करण्याची क्षमता असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 'कोरोना प्रतिबंधासाठी सुक्ष्म नियोजन करा'; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे झेडपीला आदेश खासगी रुग्णालयांमधील महागडे उपचार परवडत नाहीत, म्हणून जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णाला दाखल केले. तीन दिवसांपासून रुग्णाची प्रकृती सुधारत आहे. - लक्ष्मण जाधव, रुग्णाचे नातेवाईक सात खासगी रुग्णालयांत गेलो. पण, जागा नसल्याने एकाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करता आले नाही. अखेर, जम्बो कोविड केअर सेंटरचा रस्ता धरला. तातडीने ऑक्सिजन बेडवर दाखल करून उपचार सुरू केले. - सारंग घोडके, रुग्णाचे नातेवाईक बेडसाठी धावपळ कायम कोरोनाबाधित अत्यवस्थ रुग्णाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. वेगवेगळ्या रुग्णालयांची दारे ठोठावूनही ‘बेड नाही’ हे एकच उत्तर नातेवाइकांना मिळत आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे.  शहरात गेल्या महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णाला उपचारांसाठी दाखल कराव्या लागणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. सरकारी आणि महापालिका यापेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यास प्राधान्य देणाऱ्या रुग्णांना बेड मिळता मिळत नाहीत, अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे. शहरातील बहुतांश रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही.  गुगल पे, पेटीएम केल्यास एस्ट्रा पैसे द्यावे लागणार; पूर्व हवेलीतील दुकानदारांचा ग्राहकांना झटका खासगी रुग्णालयांमधील काही बेड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र, खासगी रुग्णालयामध्ये कोरोनाबाधीत रुग्णांना बेड मिळत नाही, अशी माहिती रुग्णांच्या नातेवाइकांनी दिली.  शहरातील काही मोजक्या रुग्णालयांवरच कोरोनाबाधीतांच्या उपचारांचा ताण पडत असल्याचा सूर काही खासगी रुग्णालयांनी काढला आहे. या रुग्णालयांमधील बेडही आता भरले आहेत. त्यामुळे रुग्णाचे वय, त्याच्या आजाराची तीव्रता, त्याला अत्यावश्यक उपचार या सर्वांचा विचार करून रुग्णाला दाखल केले जात आहे. इतर रुग्णांना घरातच उपचार घेण्याचा सल्ला दिला जात आहे. केवळ कोरोना झाला म्हणून उपचारासाठी दाखल केले जात नाही, असेही रुग्णालयांतर्फे सांगण्यात आले. बचत गटाच्या मिटींगसाठी कुरकुंभ येथे नेऊन विवाहितेवर बलात्कार; तिघांना अटक  रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण विभागात रुग्णाची तपासणी केली जाते. चालताना, बोलताना दम लागलेल्या, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या, न्यूमोनिया झाल्याचे निष्पन्न झालेल्या रुग्णांना उपचारांसाठी दाखल करावे लागते. मात्र, ऑक्सिजन बेडदेखील आता पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल करून उपचाराची गरज असलेल्या रुग्णांनाही महापालिकेच्या किंवा ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, असे वेगवेगळ्या डॉक्टरांनी सांगितले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 29, 2021

पुण्यातील ‘जम्बो’मध्ये रुग्णांची संख्या वाढली पुणे - जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये जेमतेम आठवडाभरात तीनशेहून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. सरकारी रुग्णालये पूर्ण क्षमतेने भरली आहेत, तर खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनासाठी बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे आता जम्बो रुग्णालय हे उपचाराचे प्रमुख केंद्र होत आहे.  शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. जानेवारीपासून रुग्णसंख्या कमी झाल्याने हे सेंटर बंद केले होते. मात्र, फेब्रुवारीपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहेत. एकेका दिवसामध्ये चार हजारांपर्यंत नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यातून रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे, असे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्यातील तज्ज्ञांनी नोंदविले. ससून रुग्णालय आणि महापालिकेचे डॉ. नायडू रुग्णालय कोरोनाबाधीतांनी भरले आहे. तेथे उपचारासाठी दाखल होणाऱ्या नवीन रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, ही रुग्णालय प्रशासनासमोरील मोठी डोकेदुखी ठरत आहे. खासगी रुग्णालयांमध्येही बेड नाहीत. तसेच, तेथील उपचाराचा खर्च सामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेरचा असल्याने आता जम्बो सेंटरमध्ये उपचारांसाठी रुग्ण दाखल होत आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा याबद्दल जम्बो कोविड केअर सेंटरचे अधिष्ठाता डॉ. श्रेयांस कपाले म्हणाले, ‘‘जम्बोमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जेमतेम आठ दिवसांमध्ये रुग्णांनी तीनशेचा आकडा ओलांडला. पहिल्या टप्प्यात पाचशेपर्यंत रुग्ण दाखल करण्याची क्षमता आहे.’’ रुग्णांचे प्रमाण वाढेल त्यानुसार डॉक्टर आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची संख्या वाढविण्यात येईल. या रुग्णालयाची क्षमता ८०० खाटांची आहे. हे रुग्णालय पूर्ण क्षमतेचे कार्यान्वित करण्याची क्षमता असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 'कोरोना प्रतिबंधासाठी सुक्ष्म नियोजन करा'; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे झेडपीला आदेश खासगी रुग्णालयांमधील महागडे उपचार परवडत नाहीत, म्हणून जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णाला दाखल केले. तीन दिवसांपासून रुग्णाची प्रकृती सुधारत आहे. - लक्ष्मण जाधव, रुग्णाचे नातेवाईक सात खासगी रुग्णालयांत गेलो. पण, जागा नसल्याने एकाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करता आले नाही. अखेर, जम्बो कोविड केअर सेंटरचा रस्ता धरला. तातडीने ऑक्सिजन बेडवर दाखल करून उपचार सुरू केले. - सारंग घोडके, रुग्णाचे नातेवाईक बेडसाठी धावपळ कायम कोरोनाबाधित अत्यवस्थ रुग्णाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. वेगवेगळ्या रुग्णालयांची दारे ठोठावूनही ‘बेड नाही’ हे एकच उत्तर नातेवाइकांना मिळत आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे.  शहरात गेल्या महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णाला उपचारांसाठी दाखल कराव्या लागणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. सरकारी आणि महापालिका यापेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यास प्राधान्य देणाऱ्या रुग्णांना बेड मिळता मिळत नाहीत, अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे. शहरातील बहुतांश रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही.  गुगल पे, पेटीएम केल्यास एस्ट्रा पैसे द्यावे लागणार; पूर्व हवेलीतील दुकानदारांचा ग्राहकांना झटका खासगी रुग्णालयांमधील काही बेड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र, खासगी रुग्णालयामध्ये कोरोनाबाधीत रुग्णांना बेड मिळत नाही, अशी माहिती रुग्णांच्या नातेवाइकांनी दिली.  शहरातील काही मोजक्या रुग्णालयांवरच कोरोनाबाधीतांच्या उपचारांचा ताण पडत असल्याचा सूर काही खासगी रुग्णालयांनी काढला आहे. या रुग्णालयांमधील बेडही आता भरले आहेत. त्यामुळे रुग्णाचे वय, त्याच्या आजाराची तीव्रता, त्याला अत्यावश्यक उपचार या सर्वांचा विचार करून रुग्णाला दाखल केले जात आहे. इतर रुग्णांना घरातच उपचार घेण्याचा सल्ला दिला जात आहे. केवळ कोरोना झाला म्हणून उपचारासाठी दाखल केले जात नाही, असेही रुग्णालयांतर्फे सांगण्यात आले. बचत गटाच्या मिटींगसाठी कुरकुंभ येथे नेऊन विवाहितेवर बलात्कार; तिघांना अटक  रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण विभागात रुग्णाची तपासणी केली जाते. चालताना, बोलताना दम लागलेल्या, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या, न्यूमोनिया झाल्याचे निष्पन्न झालेल्या रुग्णांना उपचारांसाठी दाखल करावे लागते. मात्र, ऑक्सिजन बेडदेखील आता पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल करून उपचाराची गरज असलेल्या रुग्णांनाही महापालिकेच्या किंवा ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, असे वेगवेगळ्या डॉक्टरांनी सांगितले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3u4NjX5

No comments:

Post a Comment