सांडपाणी, घनकचरा प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यातील ५० गावांची निवड पुणे - घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील ५० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांकडून या प्रकल्पाबाबतची अंदाजपत्रके (इस्टिमेटस) आणि तांत्रिक मान्यतेबाबतचे प्रस्ताव जिल्हा परिषदेने मागवले आहेत. यानुसार आतापर्यंत ३० गावांचे अंदाजपत्रके तांत्रिक मान्यतेसह प्राप्त झाले आहेत. मात्र, उर्वरित २० गावांचे प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेले नसल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात आले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानातील टप्पा दोन अंतर्गत चालू आर्थिक वर्षात ही गावे निवडण्यात आली आहेत. या प्रकल्पासाठी पूर्वनियोजनानुसार सर्व जिल्हा परिषद गटातून प्रत्येकी एक आणि पंचायत समिती गणातून प्रत्येकी एक, याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील एकूण २२५ गावांची निवड करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. परंतु कोरोना संसर्गामुळे आर्थिक गणिते बदलल्यामुळे यंदाच्या वर्षात कमाल ५० गावांचीच निवड करण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे. त्यानुसार या गावांची निवड करताना, नदीकाठची, मोठी आणि घनकचऱ्याची समस्या असलेल्या गावांना प्राधान्य देण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनकच; पुन्हा 4 हजारांवर कोरोना रुग्ण या प्रकल्पांच्या उभारणीसाठी पाच हजार लोकसंख्येच्या आतील गावांना घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रति व्यक्ती ६० रुपयांप्रमाणे तर, पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांना प्रति व्यक्ती ४५ रुपये तर, सांडपाणी व्यवस्थापनासाठी पाच हजारांच्या आतील गावांना प्रति व्यक्ती २८० रुपये व पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांना प्रति व्यक्ती ६६० रुपयांप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पुणेकरांनो, आता बेशिस्तपणा नको! विनाकारण रात्री हिंडणाऱ्यांवर होणार कडक कारवाई निवडलेली तालुकानिहाय गावे - आंबेगाव - शेवाळवाडी, निरगुडसर, घोडेगाव. - भोर - उत्रौली. - बारामती - निंबूत, करंजेपूल, सांगवी, पणदरे. - दौंड - देशमुखमळा, लिंगाळी, खामगाव, वरवंड, यवत, पाटस. - हवेली - माळीनगर, अष्टापूर, नऱ्हे, लोणीकाळभोर, उरुळीकांचन, मांजरी बुद्रूक. - इंदापूर - रूई, मदनवाडी, शेलगाव, लासुर्णे, बावडा. - जुन्नर - चाळकवाडी, बारव, निमगाव सावा, धालेवाडी तर्फे हवेली, डिंगोरे, बेल्हे, आळे, ओतूर, नारायणगाव. - खेड - बहूळ, चऱ्होली खुर्द, काळूस. - मावळ - मंगळूर, वराळे, इंदोरी. - मुळशी - कासारअंबोली, लवळे. - पुरंदर - वाल्हा. - शिरूर - पाबळ, कारेगाव, टाकळीहाजी, वडगाव रासाई, रांजणगाव गणपती, शिक्रापूर. - वेल्हे - विंझर. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 29, 2021

सांडपाणी, घनकचरा प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यातील ५० गावांची निवड पुणे - घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील ५० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांकडून या प्रकल्पाबाबतची अंदाजपत्रके (इस्टिमेटस) आणि तांत्रिक मान्यतेबाबतचे प्रस्ताव जिल्हा परिषदेने मागवले आहेत. यानुसार आतापर्यंत ३० गावांचे अंदाजपत्रके तांत्रिक मान्यतेसह प्राप्त झाले आहेत. मात्र, उर्वरित २० गावांचे प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेले नसल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात आले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानातील टप्पा दोन अंतर्गत चालू आर्थिक वर्षात ही गावे निवडण्यात आली आहेत. या प्रकल्पासाठी पूर्वनियोजनानुसार सर्व जिल्हा परिषद गटातून प्रत्येकी एक आणि पंचायत समिती गणातून प्रत्येकी एक, याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील एकूण २२५ गावांची निवड करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. परंतु कोरोना संसर्गामुळे आर्थिक गणिते बदलल्यामुळे यंदाच्या वर्षात कमाल ५० गावांचीच निवड करण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे. त्यानुसार या गावांची निवड करताना, नदीकाठची, मोठी आणि घनकचऱ्याची समस्या असलेल्या गावांना प्राधान्य देण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनकच; पुन्हा 4 हजारांवर कोरोना रुग्ण या प्रकल्पांच्या उभारणीसाठी पाच हजार लोकसंख्येच्या आतील गावांना घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रति व्यक्ती ६० रुपयांप्रमाणे तर, पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांना प्रति व्यक्ती ४५ रुपये तर, सांडपाणी व्यवस्थापनासाठी पाच हजारांच्या आतील गावांना प्रति व्यक्ती २८० रुपये व पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांना प्रति व्यक्ती ६६० रुपयांप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पुणेकरांनो, आता बेशिस्तपणा नको! विनाकारण रात्री हिंडणाऱ्यांवर होणार कडक कारवाई निवडलेली तालुकानिहाय गावे - आंबेगाव - शेवाळवाडी, निरगुडसर, घोडेगाव. - भोर - उत्रौली. - बारामती - निंबूत, करंजेपूल, सांगवी, पणदरे. - दौंड - देशमुखमळा, लिंगाळी, खामगाव, वरवंड, यवत, पाटस. - हवेली - माळीनगर, अष्टापूर, नऱ्हे, लोणीकाळभोर, उरुळीकांचन, मांजरी बुद्रूक. - इंदापूर - रूई, मदनवाडी, शेलगाव, लासुर्णे, बावडा. - जुन्नर - चाळकवाडी, बारव, निमगाव सावा, धालेवाडी तर्फे हवेली, डिंगोरे, बेल्हे, आळे, ओतूर, नारायणगाव. - खेड - बहूळ, चऱ्होली खुर्द, काळूस. - मावळ - मंगळूर, वराळे, इंदोरी. - मुळशी - कासारअंबोली, लवळे. - पुरंदर - वाल्हा. - शिरूर - पाबळ, कारेगाव, टाकळीहाजी, वडगाव रासाई, रांजणगाव गणपती, शिक्रापूर. - वेल्हे - विंझर. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/39oy0k6

No comments:

Post a Comment