आम्ही तर हुकमाचे ताबेदार हेल्मेट, मास्क, गमबूट व युनिफॉर्म या पेहरावात व सोबत कपड्यांचा एक  जादा जोड घेऊन, महावितरणचे तीन कर्मचारी एका सोसायटीत शिरले. कामाला सुरुवात करण्यापूर्वी कानात कापसाचे बोळे घातल्याची खात्री त्यांनी केली. थकीत वीजबिलांची यादी असलेल्या सहकाऱ्याने ग्राहकाचे नाव व ग्राहक नंबर आदी माहिती दुसऱ्याला पुरवली. तो वीज तोडणार तेवढ्यात दोघे-तिघे धावत पळत आले. ‘‘ए लाइट तोडू नकोस. नाहीतर लई वाईट परिणाम होतील. माझे हात लांबपर्यंत पोचलेत.’’ एकाने दमदाटी केली. बराचवेळ तो दमदाटी करत होता. ‘‘ए काय बहिरा-बिहिरा झालास काय? मी एवढे जीव तोडून बोलतोय आणि तू बघायलाही तयार नाहीस.’’ असे म्हणून तो पुन्हा डाफरला. ‘‘अहो काका, त्यांनी कानात कापसाचे बोळे घातलेत. तुमचं बोलणं त्यांच्यापर्यंत पोचत नाही.’’ असे एकाने म्हटल्यावर काकाने पुढे होत कर्मचाऱ्यांच्या कानातील बोळे काढले. त्यावर ‘सरकारी कामकाजात अडथळा आणणे, दमदाटी करणे, मारहाण करणे याप्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. दोन ते दहा वर्षे तुम्हाला शिक्षा होऊ शकते. तेव्हा सावधान!’ एका कर्मचाऱ्याने पाठ केलेली वाक्ये धडाधडा म्हणून दाखवली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘‘ए भीती कोणाला दाखवतोस? मला आता वेळ नाही. नायतर तुम्हाला चांगला इंगा दाखवला असता. मला तुम्ही ओळखलेलं दिसत नाही. पाणीपुरवठा खात्याच्या साहेबांचा मी ड्रायव्हर आहे. तुम्ही आज माझी लाइट तोडली ना. साहेबांना सांगून उद्या तुमचं पाणीच तोडतो का नाय बघा. मग डोळ्यात ‘पाणी’ आणून पाणी जोडून द्या, असं म्हणू नका. माझ्या नादाला लागू नका. साहेबांना सांगून भल्या भल्यांना मी पाणी पाजलंय.’’ मात्र, कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा कानात कापसाचे बोळे घालून, त्यांची लाइट तोडली. ते बघून ड्रायव्हरकाका  हतबल झाले व ‘‘बघून घेईल, बघून घेईल,’’ असे म्हणत तिथून निघून गेले. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दहा मिनिटांनी कर्मचारी डी विंगजवळ लाइट तोडायला आले. त्यावेळी नेवसेकाकांनी त्यांना अडवले व म्हटले, ‘‘तुम्ही माझी लाइट तोडू शकत नाही.’’ त्यावर एक कर्मचारी म्हणाला, ‘‘आता तुम्ही कोणाचे ड्रायव्हर आहात,’’ असे म्हणून जोरात हसला. ‘‘हे बघा, अशी चेष्टा करणे तुम्हाला शोभा देत नाही. तुम्ही माझी लाइट तोडू शकत नाही कारण आताच मी बिल भरले आहे,’’ असे म्हणून त्यांनी बिल भरल्याची पावती दाखवली. त्यावर एक कर्मचारी पुढे आला. ‘‘हे बघा, तुम्ही आता बिल भरलंय. पण तुमची लाइट तोडायची परवानगी आम्हाला आज सकाळी नऊला मिळालीय. त्यावर आमच्या साहेबांची सही बघा. लाइट तोडण्याची परवानगी देईपर्यंत तुम्ही बिल भरले होते का? नाही ना ! मग नियमानुसार आम्ही वीज तोडणार म्हणजे तोडणारच. आम्ही शेवटी हुकमाचे ताबेदार आहोत,’’ असे म्हणून नेवसे यांची लाइट त्यांनी तोडली. ‘‘आता तीनशे रुपये जोडणीशुल्क भरून पावती ऑफिसमध्ये दाखवा. फक्त एका आठवड्याच्या आत तुमची लाइट जोडून देतो. आणि हो! पाणीपुरवठा खात्यातील साहेबांच्या ड्रायव्हरलाही हा निरोप आवर्जून द्या बरं का.’’ असं एका कर्मचाऱ्याने म्हटल्यावर नेवसेकाका पहातच राहिले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 29, 2021

आम्ही तर हुकमाचे ताबेदार हेल्मेट, मास्क, गमबूट व युनिफॉर्म या पेहरावात व सोबत कपड्यांचा एक  जादा जोड घेऊन, महावितरणचे तीन कर्मचारी एका सोसायटीत शिरले. कामाला सुरुवात करण्यापूर्वी कानात कापसाचे बोळे घातल्याची खात्री त्यांनी केली. थकीत वीजबिलांची यादी असलेल्या सहकाऱ्याने ग्राहकाचे नाव व ग्राहक नंबर आदी माहिती दुसऱ्याला पुरवली. तो वीज तोडणार तेवढ्यात दोघे-तिघे धावत पळत आले. ‘‘ए लाइट तोडू नकोस. नाहीतर लई वाईट परिणाम होतील. माझे हात लांबपर्यंत पोचलेत.’’ एकाने दमदाटी केली. बराचवेळ तो दमदाटी करत होता. ‘‘ए काय बहिरा-बिहिरा झालास काय? मी एवढे जीव तोडून बोलतोय आणि तू बघायलाही तयार नाहीस.’’ असे म्हणून तो पुन्हा डाफरला. ‘‘अहो काका, त्यांनी कानात कापसाचे बोळे घातलेत. तुमचं बोलणं त्यांच्यापर्यंत पोचत नाही.’’ असे एकाने म्हटल्यावर काकाने पुढे होत कर्मचाऱ्यांच्या कानातील बोळे काढले. त्यावर ‘सरकारी कामकाजात अडथळा आणणे, दमदाटी करणे, मारहाण करणे याप्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. दोन ते दहा वर्षे तुम्हाला शिक्षा होऊ शकते. तेव्हा सावधान!’ एका कर्मचाऱ्याने पाठ केलेली वाक्ये धडाधडा म्हणून दाखवली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘‘ए भीती कोणाला दाखवतोस? मला आता वेळ नाही. नायतर तुम्हाला चांगला इंगा दाखवला असता. मला तुम्ही ओळखलेलं दिसत नाही. पाणीपुरवठा खात्याच्या साहेबांचा मी ड्रायव्हर आहे. तुम्ही आज माझी लाइट तोडली ना. साहेबांना सांगून उद्या तुमचं पाणीच तोडतो का नाय बघा. मग डोळ्यात ‘पाणी’ आणून पाणी जोडून द्या, असं म्हणू नका. माझ्या नादाला लागू नका. साहेबांना सांगून भल्या भल्यांना मी पाणी पाजलंय.’’ मात्र, कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा कानात कापसाचे बोळे घालून, त्यांची लाइट तोडली. ते बघून ड्रायव्हरकाका  हतबल झाले व ‘‘बघून घेईल, बघून घेईल,’’ असे म्हणत तिथून निघून गेले. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दहा मिनिटांनी कर्मचारी डी विंगजवळ लाइट तोडायला आले. त्यावेळी नेवसेकाकांनी त्यांना अडवले व म्हटले, ‘‘तुम्ही माझी लाइट तोडू शकत नाही.’’ त्यावर एक कर्मचारी म्हणाला, ‘‘आता तुम्ही कोणाचे ड्रायव्हर आहात,’’ असे म्हणून जोरात हसला. ‘‘हे बघा, अशी चेष्टा करणे तुम्हाला शोभा देत नाही. तुम्ही माझी लाइट तोडू शकत नाही कारण आताच मी बिल भरले आहे,’’ असे म्हणून त्यांनी बिल भरल्याची पावती दाखवली. त्यावर एक कर्मचारी पुढे आला. ‘‘हे बघा, तुम्ही आता बिल भरलंय. पण तुमची लाइट तोडायची परवानगी आम्हाला आज सकाळी नऊला मिळालीय. त्यावर आमच्या साहेबांची सही बघा. लाइट तोडण्याची परवानगी देईपर्यंत तुम्ही बिल भरले होते का? नाही ना ! मग नियमानुसार आम्ही वीज तोडणार म्हणजे तोडणारच. आम्ही शेवटी हुकमाचे ताबेदार आहोत,’’ असे म्हणून नेवसे यांची लाइट त्यांनी तोडली. ‘‘आता तीनशे रुपये जोडणीशुल्क भरून पावती ऑफिसमध्ये दाखवा. फक्त एका आठवड्याच्या आत तुमची लाइट जोडून देतो. आणि हो! पाणीपुरवठा खात्यातील साहेबांच्या ड्रायव्हरलाही हा निरोप आवर्जून द्या बरं का.’’ असं एका कर्मचाऱ्याने म्हटल्यावर नेवसेकाका पहातच राहिले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3ddryh0

No comments:

Post a Comment