सिंधुदुर्गातील आणखी पाच शाळांना प्रयोगशाळा  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजावा, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. यापूर्वी समग्र शिक्षा अभियानमधून जिल्ह्यात 44 जिल्हा परिषदेच्या शाळांना अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा पुरविण्यात आलेल्या आहेत. आता नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत आणखी पाच शाळांना विज्ञान प्रयोगशाळा मंजूर करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हा नियोजनमधून 80 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.  प्राथमिक शिक्षणा बरोबर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक गोडवा रुजला पाहिजे. विज्ञान अभ्यासाबाबत आत्मीयता निर्माण झाली पाहिजे. तरच उद्या जिल्ह्यातून वैज्ञानिक तयार होणार आहेत; मात्र यासाठी आवश्‍यक साधन सामग्री उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांना शाळेत सुसज्ज व अत्याधुनिक उपकरणे असलेली प्रयोगशाळा आवश्‍यक आहे. त्यामुळे याचा विचार करीत प्राथमिक शिक्षण विभागाने "विज्ञान प्रयोग शाळा' ही नाविन्यपूर्ण योजना तयार केली आहे. तसा प्रस्ताव तयार करीत जिल्हा नियोजनकडे मागणी केली होती. जिल्हा नियोजन मंडळाने त्याला मान्यता दिली. पालकमंत्री उदय सामंत यानी यासाठी 80 लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आणखी पाच शाळांमध्ये विज्ञान प्रयोग शाळा सुरु होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.  520 उपकरणे शक्‍य  या विज्ञान प्रयोग शाळेत एकूण 520 विज्ञान उपकरणे असणार आहेत. त्यामध्ये भौतिक, रासायनिक व जीवशास्त्र सामग्रीचा समावेश आहे. ही अत्याधुनिक विज्ञान प्रयोग शाळा असून यासाठी सबंधित शिक्षाकाना प्रशिक्षित केले जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली. उपकरणे कशी हाताळावी. प्रयोग कसे करावे ? एखाद्या उपकरणाचा उपयोग काय ? ही प्रयोगशाळा दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाला जोडलेली असून सर्व इयत्ताचे अभ्यासक्रम येथे प्रयोगातून अभ्यासता येणार आहेत.  या आहेत पाच शाळा  *हेत क्रमांक 1 केंद्र शाळा (वैभववाडी)  *इळये क्रमांक 1 (देवगड)  *कासार्डे क्रमांक 1 (कणकवली)  *पडवे क्रमांक 1 (कुडाळ)  *मळेवाड क्रमांक 1 (सावंतवाडी)  पाच शाळा विज्ञान प्रयोगशाळा उपक्रमाअंतर्गत निवडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक पटसंख्या हा एकमेव निकष लावला आहे. या शाळेला परिसरातील शाळा जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे नजिकच्या शाळांतील मुलांनाही या प्रयोगशाळेचा उपयोग होणार आहे.  - एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 29, 2021

सिंधुदुर्गातील आणखी पाच शाळांना प्रयोगशाळा  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजावा, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. यापूर्वी समग्र शिक्षा अभियानमधून जिल्ह्यात 44 जिल्हा परिषदेच्या शाळांना अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा पुरविण्यात आलेल्या आहेत. आता नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत आणखी पाच शाळांना विज्ञान प्रयोगशाळा मंजूर करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हा नियोजनमधून 80 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.  प्राथमिक शिक्षणा बरोबर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक गोडवा रुजला पाहिजे. विज्ञान अभ्यासाबाबत आत्मीयता निर्माण झाली पाहिजे. तरच उद्या जिल्ह्यातून वैज्ञानिक तयार होणार आहेत; मात्र यासाठी आवश्‍यक साधन सामग्री उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांना शाळेत सुसज्ज व अत्याधुनिक उपकरणे असलेली प्रयोगशाळा आवश्‍यक आहे. त्यामुळे याचा विचार करीत प्राथमिक शिक्षण विभागाने "विज्ञान प्रयोग शाळा' ही नाविन्यपूर्ण योजना तयार केली आहे. तसा प्रस्ताव तयार करीत जिल्हा नियोजनकडे मागणी केली होती. जिल्हा नियोजन मंडळाने त्याला मान्यता दिली. पालकमंत्री उदय सामंत यानी यासाठी 80 लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आणखी पाच शाळांमध्ये विज्ञान प्रयोग शाळा सुरु होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.  520 उपकरणे शक्‍य  या विज्ञान प्रयोग शाळेत एकूण 520 विज्ञान उपकरणे असणार आहेत. त्यामध्ये भौतिक, रासायनिक व जीवशास्त्र सामग्रीचा समावेश आहे. ही अत्याधुनिक विज्ञान प्रयोग शाळा असून यासाठी सबंधित शिक्षाकाना प्रशिक्षित केले जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली. उपकरणे कशी हाताळावी. प्रयोग कसे करावे ? एखाद्या उपकरणाचा उपयोग काय ? ही प्रयोगशाळा दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाला जोडलेली असून सर्व इयत्ताचे अभ्यासक्रम येथे प्रयोगातून अभ्यासता येणार आहेत.  या आहेत पाच शाळा  *हेत क्रमांक 1 केंद्र शाळा (वैभववाडी)  *इळये क्रमांक 1 (देवगड)  *कासार्डे क्रमांक 1 (कणकवली)  *पडवे क्रमांक 1 (कुडाळ)  *मळेवाड क्रमांक 1 (सावंतवाडी)  पाच शाळा विज्ञान प्रयोगशाळा उपक्रमाअंतर्गत निवडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक पटसंख्या हा एकमेव निकष लावला आहे. या शाळेला परिसरातील शाळा जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे नजिकच्या शाळांतील मुलांनाही या प्रयोगशाळेचा उपयोग होणार आहे.  - एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3djqFU1

No comments:

Post a Comment