आंबवणे सड्यावर आढळली कातळशिल्पे  ओरोस (सिंधुदुर्ग) - किर्लोसजवळ असलेल्या आंबवणे (ता. मालवण) सड्यावर प्राचीन कातळशिल्पे आढळली आहेत; मात्र या निर्जन सड्यावर असलेली ही कातळशिल्पे पोक्‍लेनसारख्या अवजड यंत्राच्या वावरामुळे धोक्‍यात आल्याचे पहिल्याच भेटीत आढळल्याची माहिती कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी दिली.  लळीत म्हणाले, ""आंबवणेच्या सड्यावर कातळशिल्पे असल्याची माहिती मिळाल्यामुळे याठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली. यात डॉ. सई लळीत व शुभेन्दू लळीत सहभागी झाले. आंबवणे हे गाव जेमतेम साडेतीनशे वस्तीचे छोटेसे गाव गडनदीच्या काठावर वसलेले आहे. कसालहून ओवळीये, हिवाळेतून एक रस्ता शिरवंडे गावातून किर्लोसकडे जातो. किर्लोसमधील पावणाई देवी मंदिर व ग्रामपंचायत कचेरीजवळून एक रस्ता आंबवणेकडे जातो. आंबवणेतून एक कच्चा रस्ता सड्यावर जातो. सुमारे एक किलोमीटरचा चढ झाल्यावर रस्ता संपून पायवाट सूरू होते. पायवाटेने आणखी एक किलोमीटर चालल्यावर आपण सड्यावर पोचतो. कणकवलीहूनही आचरा रस्त्याने किर्लोसमधून आंबवण्याला येता येते. या सड्यावर येताच एका मोठ्या सावरीच्या झाडाजवळ ही कातळशिल्पे पहायला मिळतात. शोधमोहिमेत एकूण सात कातळशिल्पे आढळली. यात सहा बाय नऊ फुट आकाराचा एक शिल्पपट्ट (मांड) आहे. प्राण्यांच्या सहा आकृत्या खोदलेल्या आहेत. प्राण्यांमध्ये चार प्राणी डुक्करसदृश आहेत. एक प्राणी बैलसदृश आहे; मात्र त्याला शिंगे दाखविलेली नाहीत.''  ते म्हणाले, ""आश्‍चर्यकारकपणे येथे एका मगरीचे सहा बाय अडीच फुट आकाराचे कातळशिल्प आढळले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेले हे मगरीचे पहिलेच कातळशिल्प आहे. यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मगरीची कातळशिल्पे आढळली आहेत.  परिसरात शोध घेतला असता, नदीतील दगड सापडले असून ते तोडून टोकदार केल्याचे दिसून येते. कदाचित याच दगडांचा वापर कातळशिल्पे खोदण्यासाठी झाला असावा; मात्र या निर्जन सड्यावर मानवाचा आणि अवजड यंत्रांचा वावर सुरू झाला आहे, असे यावेळी दिसून आले. पोक्‍लेन यंत्राच्या लोखंडी साखळीच्या अगदी ताज्या खुणा येथे आढळून आल्या. शिल्पपट्ट आणि मगरीच्या कातळशिल्पाचे नुकसानही यामुळे झाले आहे. ही बाब अतिशय चिंताजनक असून यामुळे भविष्यात या कातळशिल्पांना धोका पोचू शकतो.''  दृष्टीक्षेपात  *एक शिल्पपट्टासह सात कातळशिल्पे  * जिल्ह्यात प्रथमच मगरीचे शिल्प  * मानवी हस्तक्षेपामुळे अस्तित्व धोक्‍यात  * ग्रामपंचायतीने जतन करण्याचे आवाहन  आंबवणे गाव किर्लोस ग्रामपंचायतीच्या कक्षेत येते. अश्‍मयुगातील आदीमानवाच्या या पाऊलखुणा जपण्यासाठी ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यावे. तूर्तास कातळशिल्पांच्या सभोवती तेथीलच दगड रचून ठेवले आहेत.  - सतीश लळीत, कातळशिल्प अभ्यासक    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 29, 2021

आंबवणे सड्यावर आढळली कातळशिल्पे  ओरोस (सिंधुदुर्ग) - किर्लोसजवळ असलेल्या आंबवणे (ता. मालवण) सड्यावर प्राचीन कातळशिल्पे आढळली आहेत; मात्र या निर्जन सड्यावर असलेली ही कातळशिल्पे पोक्‍लेनसारख्या अवजड यंत्राच्या वावरामुळे धोक्‍यात आल्याचे पहिल्याच भेटीत आढळल्याची माहिती कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी दिली.  लळीत म्हणाले, ""आंबवणेच्या सड्यावर कातळशिल्पे असल्याची माहिती मिळाल्यामुळे याठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली. यात डॉ. सई लळीत व शुभेन्दू लळीत सहभागी झाले. आंबवणे हे गाव जेमतेम साडेतीनशे वस्तीचे छोटेसे गाव गडनदीच्या काठावर वसलेले आहे. कसालहून ओवळीये, हिवाळेतून एक रस्ता शिरवंडे गावातून किर्लोसकडे जातो. किर्लोसमधील पावणाई देवी मंदिर व ग्रामपंचायत कचेरीजवळून एक रस्ता आंबवणेकडे जातो. आंबवणेतून एक कच्चा रस्ता सड्यावर जातो. सुमारे एक किलोमीटरचा चढ झाल्यावर रस्ता संपून पायवाट सूरू होते. पायवाटेने आणखी एक किलोमीटर चालल्यावर आपण सड्यावर पोचतो. कणकवलीहूनही आचरा रस्त्याने किर्लोसमधून आंबवण्याला येता येते. या सड्यावर येताच एका मोठ्या सावरीच्या झाडाजवळ ही कातळशिल्पे पहायला मिळतात. शोधमोहिमेत एकूण सात कातळशिल्पे आढळली. यात सहा बाय नऊ फुट आकाराचा एक शिल्पपट्ट (मांड) आहे. प्राण्यांच्या सहा आकृत्या खोदलेल्या आहेत. प्राण्यांमध्ये चार प्राणी डुक्करसदृश आहेत. एक प्राणी बैलसदृश आहे; मात्र त्याला शिंगे दाखविलेली नाहीत.''  ते म्हणाले, ""आश्‍चर्यकारकपणे येथे एका मगरीचे सहा बाय अडीच फुट आकाराचे कातळशिल्प आढळले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेले हे मगरीचे पहिलेच कातळशिल्प आहे. यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मगरीची कातळशिल्पे आढळली आहेत.  परिसरात शोध घेतला असता, नदीतील दगड सापडले असून ते तोडून टोकदार केल्याचे दिसून येते. कदाचित याच दगडांचा वापर कातळशिल्पे खोदण्यासाठी झाला असावा; मात्र या निर्जन सड्यावर मानवाचा आणि अवजड यंत्रांचा वावर सुरू झाला आहे, असे यावेळी दिसून आले. पोक्‍लेन यंत्राच्या लोखंडी साखळीच्या अगदी ताज्या खुणा येथे आढळून आल्या. शिल्पपट्ट आणि मगरीच्या कातळशिल्पाचे नुकसानही यामुळे झाले आहे. ही बाब अतिशय चिंताजनक असून यामुळे भविष्यात या कातळशिल्पांना धोका पोचू शकतो.''  दृष्टीक्षेपात  *एक शिल्पपट्टासह सात कातळशिल्पे  * जिल्ह्यात प्रथमच मगरीचे शिल्प  * मानवी हस्तक्षेपामुळे अस्तित्व धोक्‍यात  * ग्रामपंचायतीने जतन करण्याचे आवाहन  आंबवणे गाव किर्लोस ग्रामपंचायतीच्या कक्षेत येते. अश्‍मयुगातील आदीमानवाच्या या पाऊलखुणा जपण्यासाठी ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यावे. तूर्तास कातळशिल्पांच्या सभोवती तेथीलच दगड रचून ठेवले आहेत.  - सतीश लळीत, कातळशिल्प अभ्यासक    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3m2fQd0

No comments:

Post a Comment