पुणे महापालिका संकेतस्थळाच्या व्हिजिट्सच्या संख्येत झाली एवढी वाढ पुणे - महापालिकेने आपल्या कायपद्धतीमध्ये पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याच्या दृष्टीने आमूलाग्र बदल करताना डिजिटल माध्यमांच्या वापरावर भर दिला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत सहा लाखांहून अधिक नागरिकांनी यामाध्यमांतून महापालिकेशी संवाद साधल्याचे आकडेवारी वरून समोर आले आहे. २०१६ मध्ये केवळ सहा लाख ३१ हजार व्हिजिट्स असलेल्या पुणे महापालिकेच्या संकेतस्थळाने २०१७ नंतर लोकाभिमुख पावले उचलल्याने व्हिजिट्सच्या संख्येत तब्बल नऊपटींनी वाढ झाल्याचे महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेली आकडेवारी दर्शविते. महापालिकेच्या pmc.gov.in या संकेतस्थळाने २०२० मध्ये सुमारे ५६ लाख ४८ हजार व्हिजिट्सचा टप्पा ओलांडला. नागरिकांचे दैनंदिन जीवनमान अधिकाधिक सुसह्य करण्यासाठी विविध विभागांतील त्रुटी किंवा समस्या वेळीच समोर येणे महत्त्वाचे असते. त्यानुसार योग्य ती कार्यवाही करून समस्या सोडविता येऊ शकतात, हे सूत्र ठेवत महापालिकेने डिजिटल प्रणालींद्वारे विविध विषयांवर नागरिकांच्या सूचना स्वीकारणे आणि त्यावर शक्य तितक्या लवकर कार्यवाही करणे, ही पद्धत अवलंबली आहे. नागरिकांशी संवाद साधणे आणि त्यांना तक्रारींसाठी व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे या धोरणातील सर्वांत महत्त्वाचे पाऊल होते. त्यानुसार पुणे महापालिकेने कॉल सेंटरचे आधुनिकीकरण केले. उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांत कॉल सेंटरच्या माध्यमातून सुमारे चार लाख ७० हजार नागरिकांनी संवाद साधला. व्हॉट्सॲप, ट्विटरसारख्या लोकप्रिय सोशल मीडियावरही पुणे महापालिकेने अधिकृत खाते तयार करून वापरकर्त्यांसाठी संवाद अधिक सोपा केला. याखेरीज पीएमसी केअर, स्वच्छता या ॲप्सच्या माध्यमांतूनही महापालिका नागरिकांशी जोडली गेलेली आहे. गेल्या तीन वर्षांत सोशल मीडिया व ॲप्सच्या माध्यमातून सुमारे दोन लाख ६२ हजार तक्रारी, सूचना व अभिप्रायवजा संदेश महापालिकेस प्राप्त झाले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापालिकेच्या संकेतस्थळा वरूनच नागरिकांची अधिकाधिक कामे व्हावीत, या उद्देशाने संकेतस्थळात योग्य ते बदल करण्यात आले. २०१७ पासून महापालिकेच्या संकेतस्थळाला दरमहा सरासरी अडीच ते तीन लाख व्हिजिट्सची नोंद होते आहे. गेली सलग तीन वर्षे व्हिजिट्सची वार्षिक सरासरी ३२ लाखांहून अधिक राहिली असून, गेल्यावर्षी लॉकडाउनच्या कालावधीत कोरोना विषयीची खात्रीशीर माहिती, आकडेवारी आणि विविध सेवांसाठी महापालिकेच्या संकेतस्थळाला ५६ लाख ४८ हजार एवढ्या विक्रमी व्हिजिट्स झाल्या. पुणे जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनकच; पुन्हा 4 हजारांवर कोरोना रुग्ण डिजिटल प्रणालींचा योग्य वापर करीत कर भरण्यासाठी सर्वमान्य व प्रचलित असलेल्या सर्व ऑनलाइन पेमेंट सुविधाही महापालिकेने उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षातील मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुमारे १,५१५ कोटी रुपयांचा विक्रमी मिळकतकर जमा झाला. विशेष म्हणजे, मिळकतकर भरणाऱ्या ११ लाख मिळकतधारकांपैकी तब्बल ५० टक्के नागरिकांनी मिळकतकर ऑनलाइन जमा केला आहे. पुणेकरांनो, आता बेशिस्तपणा नको! विनाकारण रात्री हिंडणाऱ्यांवर होणार कडक कारवाई  पीएमपीचे ॲप लवकरच नव्या रूपात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वेगवान होण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पीएमपीएमएलनेही मोबाईल ॲप अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी पावले उचलली आहेत. येत्या काही दिवसांमध्ये पीएमपीएमएलचे मोबाईल ॲप संपूर्णत: नव्या रूपात प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. यात बसचा रिअल टाइम प्रवास कळू शकणार असून, प्रवाशांना हव्या असलेल्या मार्गावर कधी आणि कोणती बस उपलब्ध आहे, हेदेखील समजू शकणार आहे. पुढील टप्प्यात मोबाईल ॲपवरूनच तिकीट काढण्याची सुविधाही पीएमपीएमएल देणार आहे. जनतेने महापालिकेकडे येण्यापेक्षा महापालिकेने जनतेपर्यंत पोहोचणे अधिक योग्य आहे, या विचाराने जाणीवपूर्वक धोरणे आखली व अंमलबजावणीवरही भर दिला. महापालिकेने घेतलेली डिजिटल भरारी हे त्याचेच फलित आहे. - गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 29, 2021

पुणे महापालिका संकेतस्थळाच्या व्हिजिट्सच्या संख्येत झाली एवढी वाढ पुणे - महापालिकेने आपल्या कायपद्धतीमध्ये पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याच्या दृष्टीने आमूलाग्र बदल करताना डिजिटल माध्यमांच्या वापरावर भर दिला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत सहा लाखांहून अधिक नागरिकांनी यामाध्यमांतून महापालिकेशी संवाद साधल्याचे आकडेवारी वरून समोर आले आहे. २०१६ मध्ये केवळ सहा लाख ३१ हजार व्हिजिट्स असलेल्या पुणे महापालिकेच्या संकेतस्थळाने २०१७ नंतर लोकाभिमुख पावले उचलल्याने व्हिजिट्सच्या संख्येत तब्बल नऊपटींनी वाढ झाल्याचे महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेली आकडेवारी दर्शविते. महापालिकेच्या pmc.gov.in या संकेतस्थळाने २०२० मध्ये सुमारे ५६ लाख ४८ हजार व्हिजिट्सचा टप्पा ओलांडला. नागरिकांचे दैनंदिन जीवनमान अधिकाधिक सुसह्य करण्यासाठी विविध विभागांतील त्रुटी किंवा समस्या वेळीच समोर येणे महत्त्वाचे असते. त्यानुसार योग्य ती कार्यवाही करून समस्या सोडविता येऊ शकतात, हे सूत्र ठेवत महापालिकेने डिजिटल प्रणालींद्वारे विविध विषयांवर नागरिकांच्या सूचना स्वीकारणे आणि त्यावर शक्य तितक्या लवकर कार्यवाही करणे, ही पद्धत अवलंबली आहे. नागरिकांशी संवाद साधणे आणि त्यांना तक्रारींसाठी व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे या धोरणातील सर्वांत महत्त्वाचे पाऊल होते. त्यानुसार पुणे महापालिकेने कॉल सेंटरचे आधुनिकीकरण केले. उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांत कॉल सेंटरच्या माध्यमातून सुमारे चार लाख ७० हजार नागरिकांनी संवाद साधला. व्हॉट्सॲप, ट्विटरसारख्या लोकप्रिय सोशल मीडियावरही पुणे महापालिकेने अधिकृत खाते तयार करून वापरकर्त्यांसाठी संवाद अधिक सोपा केला. याखेरीज पीएमसी केअर, स्वच्छता या ॲप्सच्या माध्यमांतूनही महापालिका नागरिकांशी जोडली गेलेली आहे. गेल्या तीन वर्षांत सोशल मीडिया व ॲप्सच्या माध्यमातून सुमारे दोन लाख ६२ हजार तक्रारी, सूचना व अभिप्रायवजा संदेश महापालिकेस प्राप्त झाले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापालिकेच्या संकेतस्थळा वरूनच नागरिकांची अधिकाधिक कामे व्हावीत, या उद्देशाने संकेतस्थळात योग्य ते बदल करण्यात आले. २०१७ पासून महापालिकेच्या संकेतस्थळाला दरमहा सरासरी अडीच ते तीन लाख व्हिजिट्सची नोंद होते आहे. गेली सलग तीन वर्षे व्हिजिट्सची वार्षिक सरासरी ३२ लाखांहून अधिक राहिली असून, गेल्यावर्षी लॉकडाउनच्या कालावधीत कोरोना विषयीची खात्रीशीर माहिती, आकडेवारी आणि विविध सेवांसाठी महापालिकेच्या संकेतस्थळाला ५६ लाख ४८ हजार एवढ्या विक्रमी व्हिजिट्स झाल्या. पुणे जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनकच; पुन्हा 4 हजारांवर कोरोना रुग्ण डिजिटल प्रणालींचा योग्य वापर करीत कर भरण्यासाठी सर्वमान्य व प्रचलित असलेल्या सर्व ऑनलाइन पेमेंट सुविधाही महापालिकेने उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षातील मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुमारे १,५१५ कोटी रुपयांचा विक्रमी मिळकतकर जमा झाला. विशेष म्हणजे, मिळकतकर भरणाऱ्या ११ लाख मिळकतधारकांपैकी तब्बल ५० टक्के नागरिकांनी मिळकतकर ऑनलाइन जमा केला आहे. पुणेकरांनो, आता बेशिस्तपणा नको! विनाकारण रात्री हिंडणाऱ्यांवर होणार कडक कारवाई  पीएमपीचे ॲप लवकरच नव्या रूपात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वेगवान होण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पीएमपीएमएलनेही मोबाईल ॲप अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी पावले उचलली आहेत. येत्या काही दिवसांमध्ये पीएमपीएमएलचे मोबाईल ॲप संपूर्णत: नव्या रूपात प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. यात बसचा रिअल टाइम प्रवास कळू शकणार असून, प्रवाशांना हव्या असलेल्या मार्गावर कधी आणि कोणती बस उपलब्ध आहे, हेदेखील समजू शकणार आहे. पुढील टप्प्यात मोबाईल ॲपवरूनच तिकीट काढण्याची सुविधाही पीएमपीएमएल देणार आहे. जनतेने महापालिकेकडे येण्यापेक्षा महापालिकेने जनतेपर्यंत पोहोचणे अधिक योग्य आहे, या विचाराने जाणीवपूर्वक धोरणे आखली व अंमलबजावणीवरही भर दिला. महापालिकेने घेतलेली डिजिटल भरारी हे त्याचेच फलित आहे. - गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3dild3V

No comments:

Post a Comment