Saturday, February 29, 2020
New
जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य : 1 ते 7 मार्च गंभीर तूं श्रीरामा! माणसाच्या जीवनाचा जिव्हाळा जसा अलौकिक आहे तसंच माणसाच्या जीवनाचं गांभीर्यही मोठं खोल आणि अतिगंभीर आहे. माणसाच्या जीवनाचं गांभीर्य अनुभवणारं तसंच ते वाढवणारं ज्योतिषशास्त्र हे निश्चितच एक गूढशास्त्र आहे! महाविष्णूंचं अनंततत्त्व आकाशाला पोटात घालून एक दीर्घ श्वास घेत असतं किंवा दीर्घ श्वास सोडत असतं. श्रीकृष्णानं अर्जुनाला दाखवलेलं विश्र्वरूपदर्शन हा एक प्रकारचा दीर्घ श्वासच होय! मुंगीचा किंवा माणसाचा चिमुकला श्वास या महाविष्णूंच्या दीर्घ श्वासात हुंकारत असतो म्हणतात! शिवाय, असं हे मुंगीचं म्हणा किंवा माणसाचं म्हणा, श्वासावरील स्वामित्व अखेरचा श्वास सोडत असतं आणि मग या अखेरच्या श्वासानंतर कुणीतरी त्या माणसासाठी तीळ तीळ तुटत तिलांजली देत असतं म्हणे! असा हा तथाकथित जाणता माणूस आपलं जाणतेपणाचं गांभीर्य उगाचच वाढवत असतो असंच म्हणावं लागेल. माणसाच्या जाणतेपणाचा श्वास आणि व्हेंटिलेटर लावून घेतलेला श्वास हे आकाशातील वायूचं स्पंदनच असतं. श्रीमद्भगवद्गीतेत भगवंत म्हणतात : ‘वायूचं श्वसन मीच आहे!’ याचा खोल अर्थ जाणून घेतल्यास माणसानं आपल्या जीवनाचं अकारण वाढवलेलं गांभीर्य तत्काळ नाहीसं होऊन त्याचा श्र्वास अनन्यातून अनंत होतो! सध्या भारतीय माणसानं आपल्या जीवनाचं गांभीर्य पराकोटीचं वाढवलं आहे, त्यामुळेच तो धापा टाकत श्वास घेतोय! प्रपंचाचं गांभीर्य आणि परमार्थातील गांभीर्य यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. गंभीर तूं श्रीरामा। नानाभूतैकसमा। सकळगुणी अप्रतिमा। अद्वितीया।। - संत ज्ञानेश्वरमहाराज वरील ओवीत विश्वरूपदर्शनाचा तत्त्वबोध दडला आहे. असा हा तत्त्वबोध जाणून घेऊन माणसाच्या जगण्यातील पारमार्थिक गांभीर्य अनुभवलं पाहिजे! फलज्योतिषातील प्लूटो हा ग्रह अशा या गांभीर्याचा कारक ग्रह आहे! मित्र हो, ता. सात मार्चच्या शनिवारी सूर्योदयीच्या शनीच्या होऱ्यात प्लूटो भारताच्या मकर राशीत प्रवेश करत आहे. भगवद्गीतेतील वरील पारमार्थिक गांभीर्य ओळखूनच आगामी काळात भारतीय माणसानं भगवंतांच्या स्मरणातच श्वास घेतला पाहिजे! =========== विवाहप्रस्तावांकडे लक्ष द्या मेष : राशीतील शुक्रभ्रमण फाल्गुनोत्सव साजरा करणारं. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींचे ‘होले होले’ होईल! विवाहप्रस्तावांकडे लक्ष द्या. ता. चार व पाच मार्च हे दिवस अत्यंत प्रवाही. जनसंपर्कातून मोठी कामं होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवारची संध्याकाळ शुभदायक. मात्र, शनिवारी तिन्हीसांजेला काळजी घ्या. =========== नोकरीत वरिष्ठांचा मान ठेवा! वृषभ : अष्टमस्थ मंगळभ्रमण रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी दखलपात्र. मित्रांची मनं जपा. नोकरीत वरिष्ठांचा मान ठेवा. बाकी, ता. तीन ते पाच हे दिवस सरकारी कामांचे. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार शुभदायक. शनिवारी सूर्योदयी बेरंग होण्याची शक्यता. वस्तूंची नासधूस. स्त्रीवर्गाशी वाद शक्य. =========== बेकायदेशीर व्यवहार नकोत मिथुन : सप्ताह संमिश्र स्वरूपाचा. शनी आणि मंगळ यांची फील्डिंग राहील. अजिबात अरेरावी नको. बेकायदेशीर व्यवहार टाळा. बाकी, पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणाची गुप्त मदत होईल. सीर्फ आम खाने से मतलब रखो! आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाच व सहा हे दिवस अनेक प्रकरणांतून बेरंगाचे. शब्द जपून वापरा. =========== संमोहनापासून दूर राहा कर्क : हा सप्ताह ग्रहांच्या गुगली गोलंदाजीतून यष्टिबाद करू शकतो. कोणत्याही संमोहनाला बळी पडू नका. राजकीय डावपेचाचे बळी होऊ शकता. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्रीच्या विरोधाला सामोरं जावं लागण्याची शक्यता. बाकी, पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती शुक्रभ्रमणाद्वारे मोठे व्यावसायिक लाभ उठवतील. उत्सव-प्रदर्शनांतून लाभ. शनिवार ठेचकाळण्याचा. =========== जीवनातील सुरावट साधाल! सिंह : हा सप्ताह बुद्धिजीवींना अप्रतिमच राहील. आजचा रविवार भाग्यबीजं पेरणारा. व्यवसायातल्या प्रयत्नांना यश येईल. कलाकारांसाठी मोठा सुंदर सप्ताह! मघा नक्षत्राच्या व्यक्ती जीवनातील सुरावट साधतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार विलक्षण सुवार्तांचा. शनिवार सूर्योदयी बेरंग करणारा. =========== शेजाऱ्यांशी हुज्जत नको कन्या : मंगळाची कडक फील्डिंग राहील! रस्त्यावर वावरताना काळजी घ्या. शेजाऱ्यांशी हुज्जत नको. गर्दीच्या ठिकाणी व्हायरसपासून जपा. बाकी, हा सप्ताह व्यावसायिक वसुलीचा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार नोकरीत सुवार्तेचा. पगारवाढ. शनिवारी घरातील वृद्धांशी वाद शक्य. संयम बाळगा. =========== तरुणांचं प्रेमप्रकरण फुलेल तूळ : या सप्ताहाला शुक्रभ्रमणाची एक किनार राहील. तरुणांचं प्रेमप्रकरण फुलेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती कात टाकतील. ता. चार व पाच हे दिवस अतिशय भन्नाट राहतील. मारा विजयी चौकार-षटकार! विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाची संधी. मात्र, शनिवार संसर्गजन्य व्हायरसचा. लहान मुलांची काळजी घ्या. =========== नोकरीत अनपेक्षित भाग्योदय वृश्र्चिक : या सप्ताहाची सुरुवात वैयक्तिक सुवार्तांचीच. सोमवारची संध्याकाळ मोठ्या मौजमजेची. वैवाहिक जीवनात शुभ घटना घडतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचा नोकरीत अनपेक्षित भाग्योदय. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. चार व पाच या दिवशी मौल्यवान वस्तू जपाव्यात. चोरी-नुकसानीची शक्यता. शनिवार मनाविरुद्ध प्रवासाचा. =========== सरकारी प्रकरण जपून हाताळा धनू : शुभ ग्रहांची गुप्त रसद या सप्ताहात पुरवली जाईलच. मूळ नक्षत्राच्या व्यक्ती सुवार्तांद्वारे चर्चेत राहतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींवर शनी-मंगळाच्या फील्डिंगद्वारे सप्ताहाच्या शेवटी दबाव निर्माण होण्याची शक्यता. एखादं सरकारी प्रकरण सतावू शकतं. जपून हाताळणी करा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना भ्रातृविरोधाला सामोरं जावं लागण्याची शक्यता. =========== व्यावसायिक भाग्योदयाचा काळ मकर : हा सप्ताह मंगळभ्रमणातून धुरळा उडवू शकतो. वाद वाढवू नका. बाकी, आजचा रविवार शुभशकुन घेऊन येईल. श्रवण नक्षत्राच्या कलाकारांना मोठे लाभ होतील. उद्याचा सोमवार व्यावसायिक भाग्यबीजं पेरणारा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट साडेसातीची जाणीव करून देणारा. वैवाहिक जीवनातील आचारसंहिता पाळावी. =========== समजून-उमजून वागा! कुंभ : या सप्ताहात राशीचा नेपच्यून क्रियाशील होऊ लागेल. शनीचा तत्त्वविचार समजून घेऊन वागल्यास जीवनाचा अमृतकुंभ होत असतो हे लक्षात ठेवा! बाकी, पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणातून काही लाभ होतील. ता. चार व पाच हे दिवस अतिशय प्रवाही. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार विचित्र गुप्त चिंतेचा. =========== नोकरीत आचारसंहिता पाळा मीन : हा सप्ताह दशमस्थ मंगळाच्या दबावातून जाणारा. नोकरीतील आचारसंहिता पाळावी. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. चार व पाच हे दिवस एखाद्या वादात ओढणारे. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार सूर्योदयी सुवार्तेचा. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार मानसन्मानाचा. मोठी सरकारी कामं होतील. ०००===========००० News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 29, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32Cb9gx
Read More
New
Video : महापालिकेला चुना, आयुक्तांनी केला पंचनामा औरंगाबाद - घरोघरी जाऊन कचरा संकलन व वाहतूक करण्याचे कंत्राट दिलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीने कचऱ्याच्या ट्रकमध्ये दगड, माती, विटा भरून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार शनिवारी (ता. २९) समोर आला. नगरसेवकांनी कंपनीचे तीन ट्रक पकडून ते थेट महापालिका मुख्यालयात आणले व आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी त्यातील कचरा, माती, दगड वेगळे करून वजन केले. एका ट्रकमध्ये तर धोकादायक असलेले मेडिकल वेस्ट (जैविक कचरा) आढळून आले. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना आयुक्तांनी पाचारण करून जाब विचारला. सकाळी दहा वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत या ‘कचरा फेकी’चा पर्दाफाश सुरू होता. नगरसेवकांनीच घेतला पुढाकार महापालिकेने शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे व त्याची कचरा डेपोपर्यंत वाहतूक करण्याचे काम पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. सध्या कंपनीतर्फे नऊपैकी आठ प्रभागांत काम सुरू असून, एक टन कचऱ्यासाठी महापालिका १,८६५ रुपये एवढी दर देते. हा कचरा ओला व सुका असा वेगवेगळा करून उचलणे कंपनीला बंधनकारक आहे; मात्र कंपनी कचऱ्यासोबत दगड, माती, विटा भरून ट्रकचे वजन वाढवीत असल्याच्या तक्रारी काही महिन्यांपासून सुरू आहेत. प्रशासनाने मात्र कंपनीच्या ट्रकची पाहणी न करता मोकळे सोडले होते. शनिवारी नगरसेवकांनीच पुढाकार घेत कंपनीचा पर्दाफाश केला. शिवसेनेचे नगरसेवक रावसाहेब आमले, सुभाष शेजवळ, आशा निकाळजे यांना कंपनीच्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर माती भरून त्या पडेगाव येथील कचरा डेपोवर आणल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सकाळी १० वाजता कचरा डेपोवर धाव घेऊन पाहणी केली असता, तीन ट्रकपैकी एकामध्ये मेडिकल वेस्ट तर दोन ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात दगड, माती, विटा असल्याचे आढळून आले. त्यामुळे या तीनही ट्रक त्यांनी रोखून धरल्या. यासंदर्भात महापालिका आयुक्त, महापौर व घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली; मात्र नगरसेवकांनी वारंवार फोन करूनही घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी तीनही ट्रक महापालिकेत नेण्याचा निर्णय घेतला. महापालिकेत ट्रक आणल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी ट्रकवर चढून पाहणी केली. त्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर आयुक्तांना फोन करून चौकशीची सूचना केली. आयुक्त नाशिकवरून पोचले अडीच तासांत महापालिका आयुक्त स्मार्ट सिटीच्या कार्यशाळेनिमित्त दोन दिवस नाशिकमध्ये होते. नगरसेवकांनी कचऱ्याच्या गाड्या महापालिका मुख्यालयात आणल्याची माहिती मिळताच ते अवघ्या अडीच तासांत महापालिकेत पोचले. त्यांनीदेखील ट्रकवर चढून नगरसेवकांचे म्हणणे खरेच आहे का? याची पडताळणी केली. त्यानंतर चालकाला ट्रकमधील कचरा जमिनीवर टाकण्याचे आदेश दिले. वॉर्ड अधिकारी सी. एम. अभंग, संजय जक्कल, श्री. आठवले यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, विधी सल्लागार अपर्णा थेटे, मुख्यलेखाधिकारी संजय पवार यांना पाचारण करण्यात आले. ट्रकमधील कचरा जमिनीवर टाकल्यानंतर कचरा व दगड, माती, विटा वेगवेगळ्या करण्यात आल्या. एका ट्रकमध्ये कचऱ्यापेक्षा दगड, मातीच जास्त असल्याचे समोर आल्यानंतर सायंकाळी आयुक्तांनी महापालिका मुख्यालय सोडले. अर्धा कचरा तर अर्धी माती, दगड नगरसेवकांनी आणलेल्या तीन ट्रकपैकी ( एमएच-२०, ईल-००९३, ९४ व ७७) दोन ट्रकमधील वजनाच्या पावत्याच चालकाकडे होत्या. त्यावर वजन सरासरी १४ ते १५ टन एवढे होते. त्यातून ट्रकचे साडेसात, आठ टन वजन वजा केले; तर ट्रकमध्ये सुमारे सात टन कचरा असल्याचे दाखविण्यात आले होते. एका ट्रकमध्ये सात टन कचरा बसूच शकत नाही. तीन ते साडेतीन टन कचरा या ट्रकमध्ये बसू शकतो. त्यामुळे रेड्डी कंपनीच्या ट्रकमध्ये अर्धा कचरा, अर्धी माती व दगड असल्याचा आरोप रावसाहेब आमले यांनी केला. कंपनीतर्फे आतापर्यंत पडेगाव कचरा डेपोवर टाकण्यात आलेल्या कचऱ्यातून माती, दगड व बांधकामातील जुन्या विटा वेगळ्या करूनच पैसे देण्यात यावेत, अशी मागणी आमले यांनी आयुक्त, महापौरांकडे केली. एमआयएम पक्षाचे गटनेते गंगाधर ढगे यांनी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 29, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32EPGDJ
Read More
New
'द्राक्ष गिळून सुरु आहे ट्रेनिंग', काही हजारांसाठी लाख मोलाचा जिव पोटात मुंबई : अमली पदार्थाच्या तस्करीतून गब्बर झालेले नायजेरीयन आता स्वत:चा जिव धोक्यात घालत नसून लॅटिन अमेरीकेतील गरीबांना हेरुन त्यांचा वापर करत आहे. या दक्षिण अमेरिकेतील गरीबीमुळे अवघ्या काही हजारांसाठी हजारो किलोमिटरचा प्रवास हे स्वत:चा जिव धोक्यात घालून तस्कर करत आहेत. त्याच बरोबरच पुर्वीचा लॅण्डिंग पाईंट गोवा बदलून मुंबई झालाय. नायजेरियातील तस्करांनी आता आशियात होणाऱ्या तस्करीतून अमाप संपत्ती कमावली आहे. नायजेरियन चेहरे पट्टीच्या आणि दक्षिण अफ्रिकेतील गरीब देशातून आलेल्या नागरीकांच्या हालचालीवर भारतीय विमानतळांवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. त्यामुळे तस्करी दरम्यान ते पकडले जाण्याची शक्यता असल्याने स्वत: तस्करी न करता आशियायी लोकांच्या चेहरेपट्टीशी साधर्म्य असलेल्या लॅटीन अमेरीकेतील गरजू लोकांचा वापर करण्यास सुरवात केली आहे. गेल्या 15 दिवसात लॅटीन अमेरीकेतील तीन नागरीकांना तस्करी करताना मुंबई विमानतळावर पकडण्यात आले आहे. मोठी बातमी - हं... हनीमूनला जाताय, मग 'या' गोष्टी सोबत असू द्या ! लॅटिन अमेरीकेतील अनेक देशामध्ये प्रचंड गरीबी आहे. त्यामुळे 36 हजार पासून 1 लाखा पर्यंत पैशांसाठी हे नागरीक तस्करीसाठी तयार होतात. यात प्रामुख्याने अमली पदार्थ भरलेले कॅप्सूल पोटातून आणायचे असतात. एक जरी कॅप्सुल फुटल्यास त्यांचाही जिवही जाऊ शकतो. पण, तरीही अवघ्या काही हजारांसाठी हे नागरीक आपला जिव धोक्यात घालतात त्यावरुन या देशातील गरीबीचा अंदाज येऊ शकतो. 36 हजारांसाठी 56 कॅप्सुलसह प्रवास ब्राझिलचा नागरीक असलेल्या अलेक्झॅन्डर डिसोझा (43) याने पोटातून कोकन भरलेल्या 56 कॅप्सुल वाहून आणल्या होत्या. मुंबई विमानतळावर त्याला अटक करण्यात आली. तेव्हा या 56 कॅप्सुल मध्ये तब्बल 600 ग्रॅम म्हणजे 1 कोटी 83 लाखाचे कोकेन पकडण्यात आले. तर,ब्राझील मधूनच आलेल्या लुईस फर्नांडो डिसिल्वा या 23 वर्षाच्या तरुणाने पोटातून तब्बल 80 कॅप्सुल वाहून आणल्या होत्या. यात 790 ग्रॅम म्हणजे 2 कोटी 38 लाखाचे कोकेन होते. यासाठी त्याला 1 हजार अमेरिकन डॉलर सुमारे 70 हजार रुपये मिळणार होते. तर, करोल लिसेट बोलीवर बेजारानो या 30 वर्षिय लॅटिन अमेरीकन महिलेलाही तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.तीच्या पोटातील 72 कॅप्सुल मध्ये 715 ग्रॅमचे कोकेन होते. या कोकनेची किंमत बाजारा भावानुसार दोन कोटी 14 लाख रुपये होती. मोठी बातमी - दाढीमुळे तुम्हाला आहे 'कोरोना' व्हायरसचा धोका ? साओ पावलो आणि अदिस अबाब डिसोझा आणि डिसिल्वा या दोन तस्करांना ब्राजील मधील साओ पावलो या शहरातील एका व्यक्तीने हे कोकेन दिले होते. हे दोघेही टूरिस्ट व्हिसावर भारतात आले होते. तसेच, हे तीन्ही तस्कर दक्षिण अफ्रिकेतील इथोपिया येथील अदिस अबाबा या शहरातील विमानतळावरुन मुंबईत आले होते. द्राक्ष गिळण्याचा आणि पाण्यावर राहाण्याचा सराव या तस्करांना द्राक्ष गिळण्याचा सराव करावा लागतो. जेणेकरुन पाणी न पिता ते अख्खी कॅप्सुल गिळू शकतात. त्याचबरोबर ही कॅप्सुल गिळल्यानंतर संपुर्ण प्रवासात त्यांना काही खाता येत नाही. तसेच, पाणी ही हळू हळू प्यावे लागते. त्यामुळे फक्त पाण्यावर राहाण्याचा सरावही त्यांना करावा लागतो. इथोपिया ते मुंबई पर्यंतचा प्रवास किमान आठ तासांचा आहे. विमानळावर जाऊन बाहेर येई पर्यंत 10 ते 11 तास किमान लागतात त्यामुळे या काळात ते फक्त घोट घोट पाणी पितात. मोठी बातमी - समोरच्याला समजू न देता असे वाचा #WhatsApp वरचे मेसेज... अशी होते कोकेनची तस्करी कोकेनची निर्मिती मुख्य करून लॅटीन अमेरिकन देशात होते. तेथून ते ब्राझीलमधे आणले जाते. ब्राझीलमधून ते आफ्रिकेतील लोगोस अथवा लोमो येथे आणले जाते. तेथे हे ड्रग्स छोट्या कॅप्सूलमध्ये भरून ते भारतात आणले जाते. पूर्वी नायजेरीन तस्कर स्वतः जीवावर उदार होऊन हे ड्रग्स पोटात लपवून आणायचे. पण सुरक्षा यंत्रणा त्यांची अधिक तपासणी करू लागल्यामुळे आता हे तस्कर स्वतः धोका न पत्करता दक्षिण अमेरिकेतील छोट्या देशातील नागरीकांनमार्फत कोकेन भारतात पाठवतात. अदीस अबाबा या विमानतळावरून मोठ्याप्रमाणात तस्करी होत आहे. त्यानंतर राज्यासह गोव्यामध्ये त्याचे वितरण केले जाते. मोठी बातमी - तिला दुकानातून सामान घेण्यासाठी बोलावले आणि दाराची कडी लावली... मुंबईतील नायजेरियन तस्करांची वाढती मक्तेदारी मुंब्रा, दिवा, मिरारोड, वसई, तर नवी मुंबईतील काही भागात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या नायजेरीयन नागरिकांच्या गुन्हेगारी विषयक हालचाली रोखण्याचं नवं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. या नायजेरीयन नागरिकांनी एमडी, एफेड्रीन, अशा अनेक नव्या अमलीपदार्थांची तस्करी भारतात सुरु केल्याने या नव्या अमली पदार्थाची पडताळणी करण्यासाठी पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत. बेकायदेशीर रित्या भारतात आलेले 95 टक्के नायजेरियन हे ऑनलाईन फसवणुकीचे आणि अमली पदार्थ तस्करीचे काम करतात. special story how handlers are using Latin Americans for dirty business of drugs News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 29, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VAiuvA
Read More
New
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी हवालदिल
Latest news updates
February 29, 2020
0 Comments
गारपीट झाल्याने गहू, हरभरासह रब्बी पिकांचं नुकसान from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2I43GgN https://ift.tt/eA8V8J
Read More
New
CAA : जन्माचा दाखला मी सुद्धा देऊ शकत नाही- छगन भुजबळ, #5मोठ्याबातम्या
Latest news updates
February 29, 2020
0 Comments
via BBC News मराठी - बातम्या https://ift.tt/2wmh4dh
Read More
New
'तुमच्या केसांना इथं सोन्याचा भाव आहे'
Latest news updates
February 29, 2020
0 Comments
via BBC News मराठी - बातम्या https://ift.tt/2TaXGZX
Read More
New
यवतमाळ पालिकेचे 36 कोटींचे शिल्लकी अंदाजपत्रक यवतमाळ : नगरपालिकेचे 2019-20 चे सुधारित व 2020-21चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये अनुमानित शिल्लकेसह जमा 25 कोटी 91 लाख रुपये दर्शविण्यात आले. खर्चासाठी 213 कोटी 83 लाखांची तरतूद करण्यात आली. खर्च वजा जाता 37 कोटी आठ लाखांचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. या शिल्लक रकमेत नगरपरिषदेचा निधी एक कोटी आठ लाख व शासकीय निधी शिल्लक 36 कोटी पाच लाख रुपये आहे. कामे होत नसल्याचा आरोप यवतमाळ नगरपालिकेची सभा शुक्रवारी (ता. 28) नगरभवनात पार पडली. नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी अंदाजपत्रक सभेपुढे ठेवले. यावेळी नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत आमची कामे होत नसल्याचा आरोप सभागृहात केला. दरवर्षी बजेट सादर केले जाते. त्यात आकडे फुगवले जातात. विकासकामांसाठी निधी दाखविला जातो. प्रत्यक्षात काम होत नसल्याची खंत नगरसेवक चंदू चौधरी यांनी व्यक्त केली. शहराच्या विकासासाठी काय नियोजन करण्यात आले, असा प्रश्न नगरसेवकांनी विचारला. गरिबांची काम होत नाहीत. मुख्याधिकारी एकही काम करीत नाही. गरिबांची काम होत नाहीत. मग त्यांनी जायचे कुठे, प्रकरणे निकाली न निघाल्यास शिवसेना स्टाईलने घेरण्याचा इशारा पिंटू बांगर यांनी दिला आहे. त्यावर सीओ शशीमोहन नंदा यांनी प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी करवाढ करणे ही जनतेची लूट आहे. शहरात खुले मैदान, तलाव आहे. त्यातून उत्पन्नांचे स्त्रोत वाढविता येतील, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी दर आकरण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. नगरपालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या जागा बळकावण्यात आल्या आहेत. त्या जागेवर पोट भाडेकरू ठेवून लाखोंचा मलिदा लाटल्या जात आहे. या जागा परत घेण्याची मागणी करण्यात आली आहे. नगरसेवक प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती, विजय खडसे, चंदू चौधरी, दिनेश चिंडाले, कीर्ती राऊत, वैशाली सवाई आदींनी चर्चेत सहभाग घेतला. हे वाचा— हैदराबाद पॅटर्न : या जिल्ह्यात घेण्यात आला व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे गुन्ह्याचा आढावा सूचनांची अंमलबजावणी नाही नगरसेवक सभेत सूचना मांडतात. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. स्थायी समितीपुढे 'बजेट' मांडायला पाहिजे होते, तसेही झाले नाही. मालमत्ताधारकांना डिमांड पाठविली नाही. ही पालिकेची चूक आहे. उत्पन्न वाढीसाठी प्रशासन उदासीन आहे, असा आरोप माजी बांधकाम सभापती प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती यांनी केला. Video : शेतकरी मरेपर्यंत घेतील उद्धव ठाकरेंचे नाव, बच्चू कडूंनी दिला हा सल्ला महसूली उत्पन्न मालमत्ता कर -950 लाख वृक्षकर -15 लाख शो टॅक्स -18 लाख दुकानभाडे -80 लाख बाजार वसुली -110 लाख विकास शुल्क -200 लाख News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 29, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2vjEkZD
Read More
New
#SundayPositive : सौर ऊर्जेवरील ई-सायकल लई भारी, भावी अभियंत्यांचा प्रयोग (व्हिडिओ) पुसद, (जि. यवतमाळ) : गरज ही शोधांची जननी म्हटल्या जाते. पेट्रोलसारख्या इंधनाची बचत करण्यासाठी पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवरील ई-सायकलची निर्मिती करून ऊर्जा बचतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरात दुचाकी वाहनांची संख्या वाढल्याने इंधनावर मोठा खर्च होतो. शिवाय प्रदूषण वेगळेच. वाहतूक कोंडीत ही वाहने अडसर ठरणारच. यावर नाईक अभियांत्रिकीच्या यांत्रिकी विभागातील भावी अभियंत्यांनी संशोधन केले. ई-सायकलची निर्मिती हा प्रकल्प त्यांनी हाती घेतला. यासाठी सायकल, इलेक्ट्रिक मोटर, लीड, ऍसिड बॅटरी, चार्जर, सायक्लोमीटर या साधनांचा उपयोग करण्यात आला. पुढे बॅटरीच्या चार्जिंगसाठी त्यांनी सोलर पॅनलचा वापर केला. या सायकलची ट्रायल यशस्वीरीत्या घेतल्यानंतर त्यांना ही ई-सायकल शहरातील रस्त्यांवर चालविण्यास उपयुक्त असल्याचे लक्षात आले. या सायकलला ऍक्सीलरेटर बसविण्यात आले असून बॅटरी पूर्ण चार्ज असल्यास ताशी 22 ते 25 किलोमीटर वेगात धावते. एका चार्जिंगमध्ये 25 किलोमीटरचा पर्यंतचा प्रवास पूर्ण करते. केवळ 12 हजार रुपये एवढ्या खर्चात ही ई-सायकल रस्त्यावर धावू शकत असल्याने बाजारातील इतर सायकलींपेक्षा सामान्यांच्या खिशाला सहज परवडते. सौर ऊर्जेवरील ही ई-सायकल वाढत्या इंधन दराच्या काळात मोठा दिलासा देणारी ठरली आहे. या सायकलमुळे प्रदूषणाला आळा बसतो. शिवाय चढावर आवश्यक असल्यास पायडलचा उपयोग करता येतो. - या जहाल नक्षलवाद्याकडे सापडली एके-४७, पोलिसांच्या वाढत्या दबावापुढे केले... पेट्रोल दुचाकीला हा योग्य पर्याय असल्याचे मत प्रकल्पात सहभागी झालेले यांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी चैतन्य काण्णव, संदीप जोशी, अंकुश भोपळे, अनुज चव्हाण, शुभम राठोड, अर्जुन कुबडे, इंतेसार खान यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा.डॉ. संजय भागवत यांचे मार्गदर्शन मिळाले.बाबासाहेब नाईक अभियांत्रिकीच्या वार्षिक स्नेहसंमेलन 'गेटी-2020' मध्ये उद्घाटक पुसद वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे व प्राचार्य डॉ. अविनाश वानखडे यांनी या ई-सायकलवर कॅम्पसमध्ये फेरी मारून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. संस्थेचे अध्यक्ष जय नाईक, प्राचार्य, व विभाग प्रमुख प्रा. जयदीप इंगळे यांनी विद्यार्थी संशोधकांचे कौतुक केले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 29, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2vjEksB
Read More
New
औरंगाबाद : दोन बहिणींचा त्याने केला विनयभंग, आता झाले असे... औरंगाबाद : आयटीआय येथे शिक्षण घेणाऱ्या दोघा बहिणींना आपण एकाच जातीचे असल्याची बतावणी करून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न तसेच त्यांचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या आयटीआयचा शिल्प निदेशकाला दोन वर्षे सक्तमजुरी व विविध कलमांखाली २२ हजार ५०० रुपयांचा दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश डॉ. एम. एस. देशपांडे यांनी ठोठाविली. विशेष म्हणजे ठोठाविण्यात आलेल्या दंडाची रक्कम दोघा पीडितांना विभागणी करून देण्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. भगवान गोविंद पवार (४०)असे त्या आरोपीचे नाव आहे. हेही वाचा- Video : भाजपला संधी द्या, औरंगाबादचे चित्रच बदलू : चंद्रकांत पाटील १७ वर्षीय पीडितेने आयटीआयच्या एका कोर्ससाठी प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता. प्रवेशाच्या १५ दिवसांनी दुपारी पीडिता व तिची बहीण आयटीआय परिसरात गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी आरोपी पवार त्यांच्या जवळ आला व त्याने त्यांना जात विचारली, आपण एकाच जातीचे असल्याचे सांगत त्याने आपण नातेवाईक असल्याची बतावणी केली. त्यानंतर भामट्याने दोघींचे मोबाइल क्रमांक घेतले व काही अडचण असल्यास मला भेटा असे सांगितले. त्यानंतर भामट्याने दोघींना पत्नी घरी नसून आपण हॉटेलमध्ये जेवण करायला जाऊ, माझे न ऐकल्यास परीक्षेत नुकसान करील अशी धमकी दिली. या घटनेनंतर आरोपी हा पीडिता व तिच्या बहिणीचा वारंवार पाठलाग व त्यांना फोन करून त्रास देत होता. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हेही वाचा- भाजपमधील आरोपींपासूनच महिलांना सर्वाधिक धोका आठ साक्षीदारांचे नोंदविले जबाब गुन्ह्यात तपास अधिकारी उपनिरीक्षक ए. व्ही. खंडागळे व डी. बी. कोपनार यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी, सहाय्यक लोकाभियोक्ता अनिल हिवराळे यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात पीडितेसह तिच्या बहिणीची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने भगवान पवार याला एक वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, इतर कलमान्वये सहा महिने सक्तमजुरी व अडीच हजार रुपये दंड, पोक्सोच्या कलमानुसार दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठाविली. खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून यू. एच. तायडे यांनी काम पाहिले. हे वाचलंत का? - औरंगाबाद मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी हर्षवर्धन जाधव, दाशरथे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 29, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32BLrsi
Read More
New
दिल्ली हिंसाचार: 'आमची चूक एकच होती, आम्ही जन्मानं मुस्लीम आहोत'
Latest news updates
February 29, 2020
0 Comments
via BBC News मराठी - बातम्या https://ift.tt/2uMr8fu
Read More
New
#MokaleVha : सासऱ्यांच्या आजारपणामुळे तणाव सासऱ्यांच्या आजारपणामुळे तणाव मी ३५ वर्षांची विवाहिता असून नवरा, ९ वर्षांचा मुलगा व सासू-सासरे यांच्यासमवेत राहते. सासरे ८० वर्षांचे असून, मागील तीन वर्षे सातत्याने त्यांचे आजारपण चालू आहे. माझ्या नवऱ्यावर सासूचा खूप दबाव आहे. सासूला घरात इतर कोणतेही काम करण्याची सवय नाही. फक्त सासऱ्यांना चहा-जेवण, औषधपाणी देणे एवढेच दिवसभर पाहतात. तेही नवरा कामावरून आल्यानंतर त्याच्याकडूनच करून घेतात. माझ्यासाठी व मुलासाठी त्यांच्याकडे वेळच नाही. आईसमोर असताना माझ्याशी छोट्याछोट्या गोष्टींवरून भांडतात. मुलावर आरडाओरडा करतात. त्यामुळे मला त्या घरात राहण्याची अजिबात इच्छा नाही. सासऱ्यांना जेवायला दिले, तरी १-२ तासांत ते विसरतात व तुम्ही मला जेवायला दिले नाही म्हणून चिडतात. त्यांच्यावर दिवसभर लक्ष ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे सासूदेखील माझ्यावर राग काढतात. ज्या घरात आपल्याला काहीही किंमत नाही अशा घरात का राहावे, असा प्रश्न मला पडतो. कधीकधी तर आत्महत्या करावी, असेही विचार मनात येतात. वृद्धावस्थेत २४ तास लक्ष ठेवून व्यक्तीची सेवा करावी लागत असेल, तर कुटुंबातील इतर सर्वांवर त्याचा अतिरिक्त ताण येतो. सासऱ्यांचे आजारपण, त्यांच्या स्मरणशक्तीची समस्या हे ‘डोमेनशिया’ या आजाराचे लक्षण असण्याची शक्यता आहे. सासूला घरातील इतर कामे नसली, तर आजारी व्यक्तीसोबत सातत्याने वावरणाऱ्या व्यक्तींच्या मानसिकतेवरही परिणाम होतोच. त्यामुळे नवरा व सासूमध्ये चिडचिडेपणा वाढला असावा. या सर्वांना सांभाळून घेण्याची कसरत यातून अत्यंत टोकाचा आत्महत्येचा विचार तुम्ही केलात. मानसिक तणावातून येणारे हे विचार आहेत. जवळच्या विश्वासातील नातेवाईक, मैत्रिणीशी याबाबत चर्चा करूनही सहकार्य मिळू शकते. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मानसिक ताकद वाढविण्यासाठी व आजारी व्यक्तीची देखभाल करताना स्वतःचे स्वास्थ्यही महत्त्वाचे आहे, याची जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे. पुण्यात ‘तपस’ ही संस्था ‘डोमेनशिया’ या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे काम करते. कुटुंबातील व्यक्तींचा ताण कमी करण्यासाठी दिवसभर रुग्णांना सांभाळणे अथवा १/२ महिने संस्थेतच राहून उपचारात्मक कामही करते. २४ तास लक्ष ठेवण्याची गरज असलेल्या कुटुंबातील रुग्णांची तेथील कार्यकर्ते देखभाल करतात, त्यातून कुटुंबावरील अतिरिक्त ताण कमी होतो. योग्य मार्गदर्शनाने इतरांचे स्वास्थ्य टिकून राहते व रुग्णालाही योग्य उपचार मिळतात. तपस ही संस्था ‘कृष्णानगर’, सोमेश्वरवाडी, पुणे-८ येथे कार्यरत आहे. बायकोचा दुसऱ्या अपत्यासाठी हट्ट माझे वय ४२ असून, मी व माझी पत्नी दोघेही सरकारी नोकरीत आहोत. मला १० वर्षांचा मुलगा आहे. तो शाळेत हुशार मुलगा म्हणून नावाजला जावा, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी विशेष प्रयत्न करतो. कामावरून आल्यानंतर त्याच्यासोबत चर्चा करणे, मैदानावर खेळायला नेणे, त्याच्या प्रगतीबाबत चौकशी करणे. त्याने कोणाशी मैत्री करावी, याबाबतही मी दक्षता घेतो. परंतु, माझ्या पत्नीच्या मते एकच मुलगा असल्यामुळे मी खूप जास्त काळजी करतो. यातून मुलगा वैतागून जाईल, असे तिचे मत आहे. याला पर्याय म्हणून ती अजून एक मूल होऊ द्यावे, यासाठी माझ्याकडे वाद घालते. मला हे मान्य नाही. आजकालच्या स्पर्धेच्या युगात अजून एका मुलाला घडविण्यासाठी पैसा व वेळ खर्च करणे परवडण्यासारखे नाही. यावरून आमच्यात टोकाचे मतभेद आहेत. नोकरी करणारी स्त्री असून, तिला दुसऱ्या मुलाची अपेक्षा का आहे? यावरून तिला मानोसोपचारतज्ज्ञाकडे न्यावे का, असा प्रश्न पडतो. कोणत्याही समस्येबाबत सल्लामसलत करण्यासाठी प्रत्येक वेळेस मानसशास्त्राचे ज्ञान असावेच, अशी अट नाही. अनुभवी, व्यवहारी शहाणपण असलेली व्यक्ती अनुभव व हुशारी या जोरावर सल्ला देऊ शकते. परंतु, मानसोपचार हे सल्लामसलतीपेक्षा अधिक सखोल असतात. मूल होऊ द्यावे की नाही? आजच्या काळात २ मुलांची जबाबदारी घेण्यास पालक म्हणून तुम्ही दोघेही सक्षम आहात का? ही व्यावहारिक समस्या सोडविणे, यासाठी मानसोपचारतज्ज्ञाची गरज नाही. परंतु, तुमच्या प्रश्नाभोवती निर्माण झालेले भावनिक ताणतणाव दूर करणे समस्येकडे तटस्थपणे पाहून शांतचित्ताने अधिक चांगल्या पर्यायांचा विचार करणे, हे मानोपचारतज्ज्ञ तुम्हा दोघांना समजावून सांगू शकतो. मुलांना शिस्त लावणे, त्यांना अभ्यासासाठी प्रेरित करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. परंतु, हे करीत असताना काळजीचे रूपांतर अवास्तव भीती, चिंता यातून मुलांवर ताण येईल इतकी बंधने लादली जात नाहीत ना? हे तपासून पाहणे आवश्यक असते. तुम्हा पती-पत्नींमधील टोकाचे मतभेद मुलाच्या विकासामध्ये त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करून कौटुंबिक अडचणी सोडविण्यास काहीच हरकत नाही. ‘आई, तू पुन्हा लग्न करून चूक केली’ मी पुनर्विवाह केलेली महिला असून, पहिल्या लग्नापासून एक मुलगी आहे. घटस्फोट घेताना मुलगी लहान असल्याकारणाने माझ्याकडे जबाबदारी घेतली. पहिला नवरा व्यसनी तसेच कोणताही कामधंदा करीत नसे. दुसरे लग्न केले तेव्हा नवऱ्याने मुलीचीही जबाबदारी घेतो, असे कबूल केले होते. आता मुलगी १५ वर्षांची असून, या लग्नातून मुलगा झाला तो ७ वर्षांचा आहे. मुलगा झाल्यानंतर नवऱ्याचे वागणे बदलले. तो मुलीचा सतत रागराग करतो. तिच्या शिक्षणाचा खर्च मी करणार नाही, यावरून आमच्यात भांड णे झालेली मुलीने प्रत्यक्ष पाहिली आहेत. त्यामुळे तीही या नवऱ्याला वडील मानत नाही. त्या दोघांच्या वादात मी कोणाचीच बाजू घेऊ शकत नाही. परंतु, यावरूनही माझी मुलगी माझ्यावर चिडते. सध्या तिचे वागणे खूप बिघडलेले आहे. अभ्यास करीत नाही. मैत्रिणींच्या घरी न सांगता राहते. मी दुसरे लग्न करून चूक केली आहे, असे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे तुझेही काही ऐकणार नाही, असे म्हणते. मुलीच्या भविष्याबाबत खूप काळजी वाटते. आर्थिकदृष्ट्या मी नवऱ्यावर अवलंबून असल्याकारणाने त्याला बोलू शकत नाही. मी काय करावे? १५/१६ वर्षांतील मुला-मुलींमध्ये ‘बंडखोरपणे वागणे’ हे वयाचे वैशिष्ट्यच आहे. वाढत्या वयातील शारीरिक व मानसिक बदलाचे हे परिणाम आहेत. तुमची मुलगी याच वयोगटातील असल्याकारणाने तिला वडील आपला रागराग करतात, हे स्पष्टपणे कळले आहे. तिला आपण मोठे झालो आहोत, आपले निर्णय आपणच घ्यावे, असेही वाटत असेल. परंतु, अनुभवाच्या अभावातून विचारात तीव्रता असली, तरी ते परिपक्व व समंजस विचार नसतात. तुमच्याबाबतीत ती जे बोलते हे तुम्ही मनावर न घेता तिच्याशी वारंवार संवाद साधून तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होणार नाही, याचा प्रयत्न सातत्याने करा. तिच्या बोलण्याकडे काही वेळा दुर्लक्ष करून वाद टाळा. परंतु, तिच्या मैत्रिणी कोण आहेत? कोठे राहतात? याविषयी माहिती घ्या. त्या मैत्रिणींशीही संवाद ठेवा, यातून मुलीची सुरक्षिततेची काळजी घेऊ शकाल. मुलीची आर्थिक जबाबदारी तिचा शैक्षणिक खर्च याकरिता तुम्हाला स्वतः आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे साधन शोधता येऊ शकते का? छोटीशी नोकरी करणे किंवा उत्पन्न मिळू शकेल असा व्यवसाय करणे जे तुम्हाला जमू शकेल, याबाबत प्रयत्न करा. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या प्रयत्नात या समस्येची तीव्रता कमी होण्याची शक्यता अधिक आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 29, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38cDQBR
Read More
New
'बिग बॉस 13' नंतर पारस-माहिरा बनले नवरा नवरी..सोशल मिडीयावर झळकले फोटो बिग बॉस 13 चे स्पर्धक पारस छाब्रा आणि माहिरा शर्मा पुन्हा एकत्र आलेत..हे दोघंही एकत्र एक व्हिडीओ शूट करतायेत..यात माहिरा आणि पारस यांनी क्रिश्चन नवरा- नवरीचा वेश परिधान केलाय. या म्युझिक व्हिडीओच्या शूटींग दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत..या फोटोंमध्ये माहिरा सफेद रंगाच्या गाऊनमध्ये तर पारस काळ्या रंगाच्या कोटमध्ये दिसून येतोय..या दोघांनी शूटींग दरम्यानचा एक व्हिडीओही पोस्ट केलाय ज्यात दोघंही एकत्र येऊन खूप खूष आहेत.. माहिरा शर्माने हा व्हिडीओ तिच्या इन्टाग्राम अकाऊंटववर पोस्ट करत म्हटलंय, 'आता काहीतरी मोठं घडणारे..तुम्ही सगळे यासाठी उत्सुक आहात ना? तर दुसरीकडे पारसनेही शूटींगचे काही खास फोटो शेअर करत 'वन वुमेन आर्मी' आणि 'काहीतरी नवीन पाहिरा' असं म्हटलंय... कॉम्प्युटर शिकवायच्या नावाने यायचा आणि मुलींशी करायचा असं काही... बिग बॉस 13' या शो मधील पारस-माहिराची मैत्री चर्चेचा विषय बनली होती..मात्र ही मैत्री नंतर प्रेमात बदलताना दिसून आली..या दोघांनी अनेकदा एकमेकांवरचं प्रेम व्यक्त केलं असलं तरी कुठलीच गोष्ट जाहीरपणे ठाम सांगितली नाही..माहिराने नुकतीच पारस आणि त्याची गर्लफ्रेंड आकांक्षा यांच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया दिली. ही खूपंच चूकीची गोष्ट आहे की पारस आणि आकांक्षाच्या ब्रेकअपसाठी मला जबाबदार धरलं जातंय..मी एक गोष्ट स्पष्ट सांगते की, जर या दोघांच्या ब्रेकअपसाठी मी जबाबदार असते तर आज मी पारसची गर्लफ्रेंड असते..मात्र आम्ही आजही एकमेकांचे चांगले मित्र आहोत.. जेव्हा मैत्री आणि रिलेशन बाबत बोलायची वेळ येते तेव्हा याबाबत मी नेहमीच स्पष्ट बोलणारी व्यक्ती असल्याचं माहिरा सांगते... after bigg boss 13 finale mahira sharma and paras chhabra music video pictures viral News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 29, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2I6a4nB
Read More
New
मराठा आरक्षणावरील सुनावणीच्या पूर्वतयारीची घेतली माहिती मुंबई - मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने आज सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुंबईला झालेल्या या बैठकीत समितीचे सदस्य नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी जोंधळे, राज्याचे महाधिवक्ता ॲड. आशुतोष कुंभकोणी, इतर वकील, अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी प्रामुख्याने येत्या १७ मार्चला होणाऱ्या सुनावणीमध्ये राज्य शासनाची बाजू भक्कमपणे मांडण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. Coronavirus:भारतातही कोरोनाचा धोका; मलेशियाहून परतलेल्या रुग्णाचा मृत्यू या बैठकीनंतर चव्हाण म्हणाले, की मराठा आरक्षण कायदा टिकला पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागला पाहिजे, यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ नेमले आहेत. या विधिज्ञांबरोबर चर्चा करून या प्रकरणाच्या सुनावणीबाबत विविध पैलूंनी चर्चा करण्यात आली. आझाद मैदानावरील मराठा उमेदवारांच्या आंदोलनाबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात चव्हाण म्हणाले, की मराठा आरक्षण लागू झाले पाहिजे, हाच राज्य शासनाचा प्रयत्न आहे. या आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 29, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VFqTO2
Read More
New
धक्कादायक : नववीतील मुलाने केला बापाचा खून, पुरले घरातच कन्नड (जि. औरंगाबाद) - जामडी घाट (ता. कन्नड) येथे नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वडिलांचा खून करून त्यांचा मृतदेह घरातच पुरून ठेवल्याची घटना शनिवारी (ता. २९) उघडकीस आली. सव्वादोन महिन्यांपूर्वी म्हणजे ता. २२ डिसेंबरला घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जामडी घाट येथील नामदेव चव्हाण (वय ४७) ही व्यक्ती साधारण सव्वादोन महिन्यांपासून बेपत्ता होती. दरम्यान, ता. २८ जानेवारीला नामदेव पोमा चव्हाण हे बेपत्ता असल्याची तक्रार पत्नी लताबाई नामदेव चव्हाण हिने कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. सव्वादोन महिन्यांपासून भाऊ बेपत्ता असल्याने किसन चव्हाण हेही बेचैन होते. म्हणून किसन चव्हाण यांनी मृताची पत्नी लताबाईसह नववीत शिकणाऱ्या मुलास विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी मुलाने सांगितले, की ता. २२ डिसेंबरला रात्रीच्या वेळी वडील नामदेव चव्हाण दारू पिऊन घरी आले होते. त्यावेळी आमच्यात भांडण होऊन वडिलांनी माझ्यावर कुऱ्हाडीने घाव घालण्याचा प्रयत्न केला. हे वाचलंत का? - औरंगाबाद मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी हर्षवर्धन जाधव, दाशरथे मात्र, मी वार चुकविला व स्वसंरक्षणासाठी काठी घेऊन ती वडिलांच्या मानेवर मारली. यामुळे वडील खाली कोसळले व ते बेशुद्ध पडले. मी घाबरून त्यांना दोरी घेऊन फाशी दिली व घरातच खड्डा खोदून त्यात त्यांचा मृतदेह पुरून विल्हेवाट लावली. त्या जागेवर सारवून घेतले. त्यावेळी आई घरी नव्हती, असे मुलाने सांगितले. मृत नामदेव चव्हाण यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, चार भाऊ असा परिवार आहे. चुलत्याने मायलेकास आणले पोलिस ठाण्यात मुलगा वडनेर (ता. कन्नड) येथील किसनराव थोरात विद्यालयात नववीत शिकत आहे. शनिवारी (ता.२९) किसन चव्हाण यांनी मायलेकास ग्रामीण पोलिस ठाण्यात आणून पोलिस निरीक्षक सुनील नेवसे यांच्या कानावर सर्व हकीकत घातली. पोलिसांनी मुलासह ताब्यात घेऊन नायब तहसीलदार शेख हारुण यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी जामडी घाट येथे दाखल झाले. घरातून खड्डा खोदून मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया शनिवारी रात्री सुरू होती. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हेही वाचा- भाजपमधील आरोपींपासूनच महिलांना सर्वाधिक धोका News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 29, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TmiigE
Read More
New
दहशतवादाच्या सावटाखाली ‘चौथा स्तंभ’ पत्रकारितेचे काम जोखमीचे असते, हे वारंवार सिद्ध झाले आहे. विशेषतः पाकिस्तान तर पत्रकारांसाठी सर्वांत धोकादायक देश म्हणून ओळखला जातो. दहशतवादाच्या सावटाखाली राहणाऱ्या पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याविरुद्ध बातमी छापणे म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ असे करण्यासारखेच आहे. जो बातमी देईल, तो जिवानिशी जातो. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आत्तापर्यंत असेच घडत आले आहे. काही दिवसांपूर्वीच खैबर पख्तुनवा प्रांतातील पत्रकार जावेदुल्लाह खान (वय ३६) यांना अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले. विशेष म्हणजे त्यांना पोलिस संरक्षण असतानाही हल्लेखोरांनी खान यांना टिपले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारली नसली, तरी तेहरिक ए तालिबान संघटनेचा हात असल्याचे सांगितले जात आहे. जावेदुल्लाह हे ‘औसाफ’ या दैनिकासाठी काम करत होते. त्यांच्या कुटुंबातील आत्तापर्यंत १५ जणांची हत्या तालिबानपुरस्कृत संघटनेने केली आहे. हे हत्याकांड २००८ पासून चालत आले असून तालिबानविरोधी गटाचे सदस्य असल्या कारणाने दहशतवादी गटांनी खान कुटुंबीयांना लक्ष्य केले आहे. यात जावेदुल्लाहचे काका, पुतणे यांचा समावेश आहे. ते पीएमएलएन पक्षाचे स्थानिक नेते म्हणून काम करत असताना दहशतवाद विरोधी गटाचे सक्रिय कार्यकर्ते होते. मागील महिन्यात सिंध प्रांतात पत्रकार अजिज मेमन यांचा मृतदेह आढळून आला होता. पाकिस्तानमध्ये पत्रकारांवर हल्ले होण्याची नवीन घटना नाही. २०१३ ते २०१९ या काळात पाकिस्तानमध्ये सुमारे ३३ पत्रकारांची हत्या झाली आहे. परंतु पोलिसांनी केवळ २० प्रकरणांचीच नोंद केली आहे. यानुसार न्यायालयाने २० खटले चालू शकतात, असा निर्णय दिला होता. यापैकी सहा खटल्याचे कामकाज पूर्ण होऊ शकले आणि त्याचे प्रमाण १८ टक्केच आहे. सहापैकी एकाला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गावाच्या सुरक्षेसाठी शांतता समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी दक्षता दलांना प्रोत्साहन देण्यात आले होते. दहशतवाद्यांपासून आदिवासी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे रक्षण करणे हे प्रमुख काम होते. परंतु पाकिस्तानात कायद्याच्या सुधारणेनंतर या समित्या भंग करण्यात आल्या. समित्यांमुळे दहशतवाद्यांचे जाळे बऱ्यापैकी नष्ट झाले, तरीही सरकारी धोरणाचे समर्थक असणाऱ्या गावातील आदिवासी समाजातील ज्येष्ठांना लक्ष्य करण्यात आले. काही भागात समितीच्या सदस्यांनाही लक्ष्य केले गेले. जावेदुल्लाह यांची हत्या या प्रकारातूनच घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. पाकिस्तानमध्ये पत्रकारांना सुरक्षा प्रदान करणारा ‘प्रोटेक्शन ऑफ जर्नालिस्ट ॲड मीडिया प्रोफेशनल्स ॲक्ट २०१९ विधेयक आणले आहे. यानुसार दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत नियमांचा वापर पत्रकारांविरुद्ध करता येणार नाही. याशिवाय विधेयकातील मसुद्यानुसार पत्रकारांसाठी आयोग नेमण्यात येणार असून त्याचे प्रमुख सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असतील. हा आयोग पत्रकारांचे अपहरण आणि आर्थिक अडचण सोडवण्याबाबत मदत करणार आहे. याशिवाय पत्रकारांना बातमीचा स्रोत सांगण्यासाठी दबाव आणता येणार नाही आणि कर्तव्य बजावत असताना कोणीही अडथळा आणू शकणार नाही. दुसरीकडे खोट्या बातम्या पसरवण्यास पत्रकारांना मनाई केली आहे. अर्थात पत्रकारांच्या हिताचे संरक्षण करणारे अनेक कायदे अगोदरपासून पाकिस्तानात अस्तित्वात आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. अशा स्थितीत नवीन विधेयक कितपत उपयुक्त ठरेल, असा संशय व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानात लोकशाही नसली तरी पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते. हा स्तंभ उभा करण्यासाठी पाकिस्तानमध्ये अनेक पत्रकारांचे जीव गेले आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 29, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3akOOX9
Read More
New
बिहारीबाबूंचा जातींच्या मतांवर डोळा बिहार विधानसभेत २०२१ मध्ये होणारी जनगणना जातिनिहाय करण्याच्या मागणीचा प्रस्ताव नुकताच बहुमताने मंजूर करण्यात आला. यावरून राज्यात कोणत्या जातीची लोकसंख्या किती आहे, हे समजणार आहे. इतर मागासवर्गीयांची संख्या सर्वांत जास्त असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या जातींच्या मतांवर डोळा ठेवूनच मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी हा जातिनिहाय जनगणनेचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लालूप्रसाद यादव आग्रही नवी जनगणना २०२१ मध्ये सुरू होणार आहे. नितीशकुमार यांनी जातिनिहाय जनगणनेचा प्रस्ताव विधानसभेत बहुमताने मंजूर केला. हा प्रस्ताव आता संबंधित केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठविणार असल्याचे विधानसभेचे अध्यक्ष विजयकुमार चौधरी यांनी सभागृहातील सदस्यांना सांगितले. राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे जातिनिहाय जनगणनेसाठी आग्रही आहेत. या मागणीसाठी त्यांच्या पक्षाने ‘बिहार बंद’ आंदोलनही केले आहे. याच मुद्यावर नितीशकुमार आणि ‘राजद’चे नेते व लालू यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची बंदखोलीत चर्चा झाली होती. यामुळे भाजपच्या गोटात चलबिचल सुरू झाली होती. ही चर्चा म्हणजे नितीशकुमार राजकारणात नवे समीकरण तयार करीत असल्याचे भाकीत वर्तविले जाऊ लागले होते. मात्र नितीशकुमार यांच्याशी युतीच्या सर्व शक्यता बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी फेटाळून लावल्या. केंद्राकडे लवकरच मागणी बिहारच्या विधानसभेत १८ फेब्रुवारी २०१९ रोजी जातिनिहाय जनगणनेचे विधेयक मंजूर केले होते. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा सर्वांनी मंजुरी देऊन केंद्र सरकारपुढे बाजू मांडणे आवश्यक असल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले. ज्याप्रमाणे १८ फेब्रुवारी २०१९ रोजी दोन्ही सभागृहांत मंजूर झालेल्या प्रस्तावाची कल्पना केंद्र सरकारला देण्यात आली होती, त्याचप्रमाणे हे विधेयक पुन्हा एकदा मंजूर करायला हवे, असेही ते म्हणाले. पुढील वर्षी सुरू होणाऱ्या जनगणनेला फार कालावधी उरला नसल्याचे सांगत नितीशकुमार यांनी केंद्रात व्ही. पी. सिंह सरकारच्या वेळी राज्यमंत्री या नात्याने जातिनिहाय जनगणनेसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती सभागृहात दिली. मात्र त्या वेळी उशीर झाल्याचे कारण पंतप्रधानांनी दिले होते. देशात १९३१ रोजी जातिनिहाय जनगणना झाली होती, अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली आणि आता पुन्हाती करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 29, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PBUvZ1
Read More
Friday, February 28, 2020
New
मुस्लीम आरक्षण शिवसेनेची सत्ता स्थापनेपूर्वीची सेटिंग आहे काय? - देवेंद्र फडणवीस, #5मोठ्याबातम्या
Latest news updates
February 28, 2020
0 Comments
via BBC News मराठी - बातम्या https://ift.tt/2I4Ekz9
Read More
New
गृहनिर्माण संस्थांसाठी नियमावली की मुदतवाढ? पुणे - अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांसाठी नियमावली जाहीर करण्याबाबत दिलेली 29 फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ शनिवारी संपत आहे. मात्र, सहकार खात्यातील व्यस्त अधिकाऱ्यांकडून तारखांवर तारखा देऊनही नियमावली तयार झालेली नाही. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सहकार खात्याने अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका संबंधित संस्थांनीच घ्याव्यात, असा निर्णय घेतला. परंतु, या निवडणुका घेण्यासाठी नियमावली तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे निवडणुका कोणत्या नियमानुसार घ्यायच्या, असा प्रश्न गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांसमोर आहे. राज्यातील गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळास यापूर्वी 31 डिसेंबर आणि त्यानंतर 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पोर्टलवर माहिती अपलोड करणे, बॅंकांना शेतकऱ्यांची यादी उपलब्ध करून देणे, कर्ज खातेदारांचे आधार प्रमाणीकरण आणि जिल्हास्तरीय समितीकडून तक्रारनिवारण, अशी कार्यवाही करावी लागणार आहे. या कामकाजात सहकार विभागातील क्षेत्रीय अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील बहुतांश अधिकारी व्यस्त आहेत. त्यामुळे राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या 22 हजार 680 सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. परंतु, सध्या मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे एप्रिल 2020 अखेरपर्यंत त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्याबाबतचा आदेश 31 जानेवारी रोजी काढण्यात आला होता. दरम्यान, अडीचशेपर्यंत सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, नियमावली जाहीर न झाल्यामुळे निवडणूक प्रक्रिया ठप्प राहणार आहे. तसेच, पुढील निर्णय होईपर्यंत जुन्याच पदाधिकाऱ्यांना गृहनिर्माण संस्थांचा गाडा हाकावा लागण्याची शक्यता आहे. राज्यातील गृहनिर्माण संस्था : सुमारे एक लाख अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या संस्था : 80 हजार पुणे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्था : 18 हजार अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या संस्था : 15 हजार News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 28, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aiboA2
Read More
New
ब्रेकींग : 'या'मुळे आज कऱ्हाड शहर राहणार बंद ? कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेच्या माध्यमातून गेले तीन दिवस अतिक्रमण कारवाई सुरु आहे. या माेहिमेस विराेध करण्यासाठी शुक्रवारी रात्री उशिरा सुमारे तीनशे व्यापाऱ्यांचा जथ्था पोलिस ठाण्यात दाखल झाला. या अतिक्रमण माेहिमेत कर्मचारी वर्गाने कायदेशीर बोर्ड काढून त्याचे नुकसान केल्याची तक्रार व्यापारी करीत हाेते. यावेळी बहुतांश व्यापारी संतप्त झाले हाेते. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळांची पोलिसांशी चर्चा झाली. ही माेहिम आम्हांला न सांगताच केल्याचा व्यापाऱ्यांचा आक्षेप हाेता. दरम्यान न्याय मिळावा यासाठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढण्याचा दिला इशारा आहे.प्रसंगी बाजारपेठ बंद ठेवू असेही व्यापारी वर्गाने नमूद केले आहे. माजी नगरसेवक आनंदराव लादे भिमशक्ती जिल्हाध्यक्ष, सातारा भिमशक्ती संघटनेचा वतीने कराङ शहरात पलिका प्रशासन व पोलिस प्रशासनच्या वतीने चुकीच्या पध्दतीने अतिक्रमण मोहिम राबवली जाता आहे. त्याबदल आज शनिवार ता.29 फेब्रुवारीस सकाळी अकरा तहसीलदार यांना व महिती प्रत मुख्याधिकारी. पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण मोहीम बाबतीत अंदोलन ऊभा करून सोमवार (ता.२) पासून तसिलदार कार्यालय येथे अमर उपोषण बसणार आहे असे सांगण्यात आले. दरम्यान हातगाडा धारकांचेही हाॅकर्स झोनच्या मागणीसाठी पालिकेसमोर सोमवारपासून उपोषण करेल असे त्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे. कऱ्हाडमध्ये तिसऱ्या दिवशीही अतिक्रमणावर हातोडा कऱ्हाडमधील तब्बल १९ वर्षानंतर पालिकेमार्फत सुरु करण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहिम शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही सुरु राहिली. शहरातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कृष्णा नाका ते कन्याशाळा मार्गे चावडी चौक, भाजी मंडई परिसरात ही धडक मोहिम राबवण्यात आली. अनेक अनाधिकृत बांधकामावर जेसीबी चालवुन पालिकेने आज अतिक्रमणे जमीनदोस्त केली. कऱ्हाडमधील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तीन दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्याअंतर्गत बसस्थानक परिसर, दत्त चौक, विजय दिवस चौक, स्टेशन रोड, कृष्णा नाका, कृष्णा पुल, मंगळवार पेठ, कन्याशाळेसमोरील परिसर, मंडई परिसर, बाजारपेठील मेन रोड परिसरातील सुमारे 600 हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगरअभियंता ए. आर. पवार यांनी आखलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमागे पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी स्वतः उभे राहुन ही मोहिम राबवल्याने बऱ्यापैकी अतिक्रमणे हटण्यास मदत झाली. शहरात तब्बल 19 वर्षानंतर ही मोहिम राबवण्यात आल्याने नागरीकांत समाधानाचे वातावरण आहे. किरकोळ अपवाद वगळता मोहिम सध्यातरी शांततेत सुरु राहिली. कऱ्हाड पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा पर्यंत व्यापारी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते. अतिक्रमण कारवाईत कायदेशीर फलक काढल्याचा आरोप व्यापाऱ्यांचा होता. #SakalNews #MarathiNews #ViralVideos #Karad pic.twitter.com/V4jENDzM70 — Siddharth Latkar (@siddharthSakal) February 29, 2020 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 28, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Vtg9Cx
Read More
New
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 29 फेब्रुवारी दिनमान 29 फेब्रुवारी 2020 मेष : आरोग्य उत्तम राहील. सकारात्मक विचार राहतील. आनंदी व आशावाद राहाल. वृषभ : अनावश्यक खर्च संभवतात. कामे नकोशी होतील. मनाविरुद्ध घटना संभवते. मिथुन : व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कर्क : नवी दिशा सापडेल. सार्वजनिक क्षेत्रात तुम्हाला सन्मान लाभेल. अधिकार प्राप्त होईल. सिंह : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. उचित मार्गदर्शन लाभेल. मनोबल उत्तम राहणार आहे. कन्या : प्रकृतीच्या तक्रारी राहतील. दैनंदिन कामे विलंबाने होतील. अतिउत्साहीपणा टाळावा. तूळ : आरोग्य उत्तम राहाणार आहे. प्रवासास दिवस अनुकूल आहे. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत अनुकूल आहे. वृश्चिक : मनोबल कमी असणार आहे. खर्च वाढणार आहेत. प्रकृतीच्या तक्रारी राहतील. धनू : प्रवास सुखकर होतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. मकर : तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहील. आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. कुंभ : प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. नवी दिशा सापडेल. मीन : कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. कुटुंबामध्ये आनंद वातावरण राहील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. पंचांग 29 फेब्रुवारी 2020 शनिवार : फाल्गुन शुद्ध 5, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.57, सूर्यास्त 6.40, चंद्रोदय सकाळी 10.21, चंद्रास्त रात्री 11.23, भारतीय सौर फाल्गुन 10, शके 1941. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 28, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39aL4HM
Read More
New
'ट्वेन्टी-20 वर्ल्डकप खेळायचा असेल तर...'; कपिल देव यांचा धोनीला गुरुमंत्र नोएडा : आयपीएलमधील महेंद्रसिंह धोनीच्या पुनरागमनाबाबत भारतीय क्रिकेट वर्तुळात उत्सुकता असली तरी, कपिलदेव मात्र फार उत्साही नाहीत. आयपीएल ही नवोदितांसाठी प्रभाव पाडण्याकरिता आहे. धोनीला जर आगामी ट्वेन्टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळायचे असेल, तर त्याने त्या अगोदरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळायला हवे, असे कपिलदेव यांनी म्हटले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आयपीएलचे वारे देशात वाहू लागले असून, धोनी 2 मार्चपासून सराव सुरू करणार आहे. भारताला दोन विश्वकरंडक जिंकून देणारा 38 वर्षीय धोनी इंग्लंडमधील विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्य सामन्यात संपुष्टात आल्यानंतर मैदानावर दिसलेला नाही. श्रेणीनुसार मानधन करारातूनही त्याला वगळण्यात आलेले आहे. - खेळपट्टी शोधून दाखवा; बीसीसीआयचं फोटो दाखलत चॅलेंज.. प्रत्येकाला समान न्याय हवा आयपीएल फक्त धोनीच खेळणार आहे असे नाही. पुढील 10 वर्षांत भारतीय क्रिकेटची सेवा करणारे खेळाडू या आयपीएलमधून कसे सापडतील, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. धोनीने अगोदरच देशासाठी खूप काही केले आहे, असे सांगून कपिल म्हणाले, धोनीचा चाहता म्हणून त्याला ट्वेन्टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत खेळताना पाहायला मला आवडेल; पण क्रिकेटपटू म्हणून मी सर्वच बाबींचा विचार करेन. जवळपास वर्षभर तो खेळलेला नाही. त्यामुळे संघात पुन्हा येण्यासाठी त्याने अगोदर इतर आंतरराष्ट्रीय सामन्यांत खेळायला हवे, वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे परिमाण लावणे योग्य नाही. Eh tho sahi baat hai!#TeamIndia #INDvNZ #NZvIND #MSD #MSdhoni #KapilDev pic.twitter.com/FKlRp7M9Nk — SportsCafe (@IndiaSportscafe) February 28, 2020 बुमराबाबत चिंता नको न्यूझीलंड दौऱ्यात अपयशी ठरत असलेल्या जसप्रीत बुमराबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे कपिलदेव म्हणतात. एक चांगला स्पेल त्याला पुन्हा फॉर्मात आणू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुखापतीनंतर पूर्ण तंदुरुस्त होण्यास काही काळ लागतो. जसे फलंदाजाला फॉर्मात येण्यास एखादी खेळी पुरेशी ठरते, तसे गोलंदाजाला एखादा भन्नाट स्पेल पुरेसा आहे. - दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी कर्णधार कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यात मतभेद? ताण येत असेल तर आयपीएलमधून ब्रेक घ्या सातत्याने खेळत असल्यामुळे ताण येत असेल तर आयपीएलमधून ब्रेक घ्या, असा थेट सल्ला कपिलदेव यांनी टीम इंडियाला दिला आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी थेट स्टेडियम ते स्टेडियम असा प्रवास करावा लागला, तसेच वर्षातील सामने, प्रवास असा वर्षातील 300 दिवस व्यस्त कार्यक्रम असल्याचे मत विराट कोहलीने व्यक्त केले होते. - ... तर आयपीएल खेळू नका; कपिल देव यांचा टीम इंडियाला कानमंत्र! या संदर्भात बोलताना कपिलदेव यांनी आयपीएलमधून ब्रेक घ्या, असे सांगितले आहे. इतकेच नव्हे तर जे खेळाडू टीम इंडियातून सर्व प्रकारांत खेळतात, त्यांनी आयपीएलमधून विश्रांती द्यावी, असा 'प्रस्ताव' दिला आहे. If You Are Feeling Burned Out, Don’t Play IPL #Sportskeeda #IPL #KapilDev pic.twitter.com/PefEGyT4J1 — Sportskeeda India (@Sportskeeda) February 28, 2020 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 28, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PzMIe8
Read More
New
मराठी शाळांचं आणि या शाळेत शिकणाऱ्या मुलांचं भवितव्य कसं असेल?
Latest news updates
February 28, 2020
0 Comments
via BBC News मराठी - बातम्या https://ift.tt/3acgldq
Read More
New
लीप वर्ष म्हणजे काय? 29 फेब्रुवारी तारीख चार वर्षांनी का येते?
Latest news updates
February 28, 2020
0 Comments
via BBC News मराठी - बातम्या https://ift.tt/38biF2Q
Read More
New
'अरे बळीराजा नको करू आत्महत्या' शाळेत मुलाची कविता; शेतकरी बापाची घरी आत्महत्या
Latest news updates
February 28, 2020
0 Comments
काळीज पिळवटून टाकणारी घटना from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2I7Fn1g https://ift.tt/eA8V8J
Read More
New
'या' विषाणूमुळे भारताला सर्वांत जास्त धोका वॉशिंग्टन (अमेरिका) - अमेरिकेची गुप्तचर संस्था कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून आहे. तसेच चीनसह जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार होत असताना या विषाणूमुळे भारताला सर्वांत जास्त धोका असण्याची शक्यता अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी वर्तवली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतातील प्रचंड लोकसंख्येमुळे कोरोनाचा प्रसार भारतात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता या संस्थेने वर्तवली असून, जर हा रोग भारतात पसरला, तर येथील आरोग्य अधिकारी या रोगाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी सक्षम आहेत का, हा सवालदेखील या गुप्तचर संस्थेने विचारला आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थेकडून जरी चिंता व्यक्त केली जात असली, तरी चीनसारखीच प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये आजवर कोरोनाची लागण झालेली तीनच प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि ही सर्व प्रकरणे केरळ राज्यात आहेत. सरकारच्या निवेदनानुसार, आणखी २३ हजार ५३१ जण सध्या वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.असे असले तरी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी भारताच्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवण्याचे थांबवले नाही. जगभरात फैलाव चीनमध्ये दोन हजार ७८८ जणांचा मृत्यू इराणमध्ये १९ जणांचा मृत्यू; १४० जणांना लागण इराणच्या उपराष्ट्रपती मासूमेह इब्तिकार यांच्यावर उपचार सुरू दक्षिण कोरियात दोन हजार जणांना लागण News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 28, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3acoPRQ
Read More
New
या जिल्ह्याला घातलाय क्षयरोगाने विळखा बेळगाव : जिल्ह्यातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून दर सहा महिन्यातून एकदा क्षयरोग सर्वेक्षण करण्यात येत आहे. 2018 मध्ये जिल्हाभरात 2,990 क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले होते. तर 2019 मध्ये हे प्रमाण वाढले असून तब्बल 5,017 जणांना क्षयरोगाची लागण झाल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात क्षयरोगाचा विळखा घट्ट होत चालला आहे. हे पण वाचा - या अधिकाऱ्याकडून होतो आमदार निधी मंजूर क्षयरोगाला टीबी (ट्युबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार "मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. प्रामुख्याने यात रुग्णांच्या फुफ्फुसांना बाधा होत असते. तर काही रुग्णांमध्ये फुफ्फुसासह इतर अवयवांनाही बाधा होते. क्षयरोगमुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यामुळे 2017 पासून दरवर्षी सहा महिन्यांतून एकदा जिल्ह्यात संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. रुग्णाचा कफ संग्रहित करुन तो चाचणीसाठी पाठविण्यात येतो. दरवर्षी जुलै आणि डिसेंबर महिन्यात याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यंदाच्या सर्वेक्षणात 5,017 जणांना क्षयरोगाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा महिने मोफत उपचार करण्यात येत आहेत. पौष्टिक आहार सेवन करण्यासाठी सहा महिन्यापर्यंत प्रतिमहा पाचशे रुपये आर्थिक साहाय्यधन दिले जाते. तर सहा महिने औषधोपचार व योग्य काळजी घेतल्यानंतर हा आजार पूर्णपणे बरा होतो, असे आरोग्य खात्याचा दावा आहे. हे पण वाचा - ब्रेकिंग - कोल्हापुरात पोलिस निरीक्षकावर हल्ला क्षयरोगाची लक्षणे क्षयरोग असलेली व्यक्ती बोलली, थुंकली किंवा शिंकली, तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात. हवेद्वारे ते जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे, अशी लक्षणे असल्यास क्षयरोगाची शक्यता असते. क्षयरोगाचे प्रकार फुफ्फुसासह इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. त्यामध्ये हाडे-सांध्याचा क्षयरोग, लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग, आतड्यांचा क्षयरोग आदींचा समावेश आहे. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी सहा महिने किंवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असते. जर उपचार मध्येच बंद केले, तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते. क्षयरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य खात्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षापासून घरोघरी जाऊन संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांवर उपचार करण्यात येतात. -डॉ. अनिल कोरबू, जिल्हा क्षयरोग नियंत्रणाधिकारी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 28, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ad6d4c
Read More
New
डोळ्यांवर झोप असतानाही हाकतात ट्रक नवी दिल्ली - वाहनांच्या अपघातांमागील कारणे पाहिली असता वाहनचालकाला डुलकी लागून नियंत्रण सुटल्याचे कारण अनेकदा सांगितले जाते. हे खरे असल्याचे ट्रकचालकांनीही मान्य केले आहे. डोळ्यांवर झोप असताना किंवा थकवा जाणवत असला तरी गाडी चालवणे भाग असते, असे ५० टक्के चालकांनी सांगितले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सेव्ह लाइफ फाउंडेशन या संस्थेने ‘भारतातील ट्रकचालकांचा स्थिती’ या विषयावर सर्व्हे करून अहवाल तयार केला आहे. या प्रकारचा हा पहिलाच तपशीलवार अहवाल आहे. यासाठी देशातील दहा शहरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यातून ट्रकचालकांचे हे वास्तव समोर आले आहे. शिवाय पाहणीत प्रवासात काही प्रमाणात अमली पदार्थांचे सेवन केले जाते, असे पाचपैकी एका ट्रकचालकाने मान्य केले. ट्रक चालविताना प्रवासात विविध विभागांना लाच दिली जात असल्याचे सत्यही यातून उघड झाले आहे. सध्या ट्रकचालक आणि ट्रकमालकांना वर्षाला ४७ हजार ८५२ कोटी रुपयांचा मलिदा सरकारी विभागांना मिळतो. विशेष म्हणजे यातील मोठा वाटा पोलिसांकडे जातो. ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’च्या अंदाजानुसार २००६-०७ मध्ये ट्रक वाहतुकीतून २२ हजार ०४८ कोटी रुपयांची लाच दिली गेली. दहा शहरांमध्ये पाहणी दिल्ली-राष्ट्रीय राजधानी विभाग, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, कोलकता, बंगळूर, चेन्नई, कानपूर, विजयवाडा आणि गुवाहाटी या दहा शहरांमध्ये करण्यात आली. तेथील सुमारे एक हजार २१७ ट्रकचालक आणि ट्रकमालक यांची मुलाखत घेऊन यातील निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. वाहन परवाना मिळविण्यापूर्वी वाहन चालविण्याचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतले नव्हते, असे दहापैकी नऊ ट्रकचालकांनी (९० टक्के) कबूल केले. कामाच्या ताणामुळे वेगात वाढ कामाचा ताण असल्याने माल वेळेत पोचण्यासाठी भरधाव गाडी चालवावी लागते, असा दावा दोन तृतीयांशापेक्षा अधिक (६७.१ टक्का) चालकांनी केला आहे. दिल्लीतील ५८ टक्के चालकांनी गेल्या दहा वर्षांत आयुष्याची गुणवत्तेत बिघाड झाला असल्याचे सांगितले. ट्रकचालकांच्या दैनावस्थेवर प्रकाश ट्रक चालकांच्या दैनावस्थेवरही या अहवालातून प्रकाश टाकण्यात आला आहे. यात ५३ टक्के चालक त्यांच्या व्यवसायाबद्दल असमाधानी असल्याचे दिसून आले. कुटुंबातील अन्य सदस्यांनी किंवा नातेवाइकांनी या व्यवसायात उतरावे, असे अजिबात वाटत नसल्याचे ८४ टक्के चालकांनी सांगितले. रस्त्यावर सुरक्षेचा अभाव असल्याने या ट्रक व्यवसायाबद्दल आकर्षण वाटत नसल्याचे दोन तृतीयांश चालकांनी सांगितले. वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार १५,००० - ट्रक अपघातांतील बळी ५७,००० - ट्रकमुळे होणारे अपघात News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 28, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39b7Sar
Read More
New
ब्रेकफास्ट @ बॅरोमीटर फूडहंट पुण्यातील प्रमुख निवासी परिसर अशी ख्याती असलेल्या ‘कोथरूड’चे फूड पॅराडाइसमध्ये रूपांतर झालेले अनेकांनी अनुभवले असेलच. छोट्या फूड चेन्सपासून ते मोठमोठे रेस्टॉरंट्स इथे आहेत. पण, सिटीप्राइडजवळ कोथरूडमधील पहिल्यावहिल्या फाइन-डाइन रेस्टॉरंटचा मान ‘बॅरोमीटर’ला द्यायला हवा. ‘ऑल डे डायनिंग’ असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये दर्जेदार ग्लोबल फूड अनुभवायला मिळते. खवय्ये कोथरूडकरांना फाइन डाइन एक्सपीरियन्ससाठी आता कोरेगाव पार्क आणि बाणेरच्या हॉटेल्सकडे धाव घ्यावी लागत नाही. यामुळेच अल्पावधीत बॅरोमीटरला नियमित व नवीन ग्राहकवर्ग मिळाला आहे. ब्रेकफास्ट आणि लंच-डिनर असे दोन वेगवेगळे मेन्यू येथे उपलब्ध आहेत. ग्राहकांना परिपूर्ण आणि वैविध्यपूर्ण ब्रेकफास्ट अनुभवता यावा यासाठी येथे खास मेन्यू डिझाइन केला आहे. इंडियन, कॉंटिनेंटल, मेक्सिकन, इंग्लिश आणि इतर ब्रेकफास्टचे अनेक पर्याय इथे चाखायला मिळतात. इथली सर्वांत लक्षवेधी ऑफेरिग म्हणजे ‘फ्री कॉफी’! ब्रेकफास्टला, म्हणजेच सकाळी ७.३० ते ११ या वेळेत सर्वांना फिल्टर कॉफी विनामूल्य आहे आणि तीही अमर्यादित. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ब्रेकफास्ट म्हटले की, डोळ्यांसमोर प्रथम येते अंडे. अंड्याच्या इंडियन आणि विदेशी प्रकारात विविध डिशेस मेन्यूमध्ये बघायला मिळतात. यापैकी उल्लेखनीय डिश म्हणजे गोट चीज आणि ट्रफल ऑइल युक्त ‘वाइल्ड मशरूम अँड रोस्टेड गार्लिक स्क्रॅम्बल’ आणि गोअन रॉस ऑम्लेट. ट्रफल ऑइल, गोट चीज आणि गार्लिकमुळे या एग स्क्रॅम्बलची एक वेगळीच लाजवाब चव येते. गोव्यामध्ये सर्रास मिळणाऱ्या रॉस किंवा रस्सा ऑम्लेटचे मॉडिफाइड रूप येथे मिळते. ऑम्लेट, त्यावर रिच टेस्टी चिकन कोकोनट ग्रेव्ही आणि सोबत ब्रेड अगदी पोटभरीचे ठरते. क्रोक सेन्यॉर ही एक मेक्सिकन एग डिश असून, त्यात फ्राईड एग्स, फहिताच्या मसाल्यामधले सौसेज, बेक्ड बीन्स, सार क्रीम, बेशामेल याचा समावेश आहे. गालायेत बंडोरा ही एक जॉर्डेनिअन एग आणि चिकन डिश आहे. ती नुकतीच ब्रेकफास्ट मेन्यूमध्ये ॲड झाली आहे. ‘द बॅरोमीटर ब्रेकफास्ट’ ही डिश घेतल्यास आपण रात्रीपर्यंत काहीच खाऊ शकणार नाही, हे नक्की... फूडहंट : येती अँड द माँक आगळेवेगळे एशियन फूड आंतरराष्ट्रीय डिशेसबरोबर येथील भारतीय पदार्थही तितकेच स्वादिष्ट आहेत. कमी तेलातले हेल्दी पोहे आणि चक्क प्रॉन्स पोहे देखील येथे मिळतात. सोबत थालीपीठ, पराठे, खिमा पावही! येथील छोले कुलछेची चव अफलातून आहे. नुकतीच ‘राधावल्लभी’ ही बंगाली डिश सर्व्ह करायला सुरुवात झाली आहे. राधावल्लभी म्हणजे मटारचे सारण असलेल्या ३ पुऱ्या व त्यासोबत चना दाल आणि दम आलू. फिटनेस प्रेमींमध्ये बॅरोमीटर लोकप्रिय आहे. ग्लुटन फ्री, किटो-डाएट फ्रेंडली डिशेसचे पर्याय बघायला मिळतात. आपापल्या डाएटनुसार त्या-त्या मापात डिश बनवून मिळते. किनुआ उपमा, बॉडी बिल्डर्स ब्रेकफास्ट, बुलेट-प्रूफ कॉफी (हाय कॅलरी कॉफी) असे पर्याय फिटनेस प्रेमींच्या पसंतीस उतरतात. बॅरोमीटरमध्ये डिशेस आणि प्रेझेंटेशनबरोबर उत्तम सर्व्हिस, इंटिरिअर आणि अँबियन्सवर देखील कष्ट घेतले आहेत. टेबलचे नंबरिंग, स्क्रीनवर चालणारे चार्ली चॅप्लिनचे सिनेमे, म्युझिक या सगळ्यांवर बारकाईने काम केल्याचे लक्षात येते. सकाळच्या वेळेस, खिडक्या उघड्या ठेवल्या जातात. त्यामुळे गप्पा मारत ब्रेकफास्ट करताना मंद हवेचा गारवा एक वेगळाच आनंद देऊन जातो. हे हॉटेल अत्यंत कमी वेळात लोकप्रिय झाले असले, तरी बॅरोमीटरच्या टीमने माणुसकी जपल्याचे दिसून येते. पार्सल घ्यायला आलेल्या प्रत्येक झोमॅटो व स्वीगी बॉयला कोल्डड्रिंक किंवा कॉफी दिली जाते. येथे वेटिंग अधिक असते, बाहेर थांबलेल्या ग्राहकांना मिनरल वॉटर आणि पिझ्झा स्लाइसेस दिले जातात. माणुसकी सोबतच सामाजिक बांधीलकीही जोपासलेली दिसते. बॅरोमीटरच्या पहिल्या वर्धापनदिन टीमने वंचित मुलांबरोबर साजरा केला, तर दुसरा वर्धापनदिन तृतीयपंथीयांसोबत साजरा केला. अन्य ग्राहकही यात आनंदाने सामील झाले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 28, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Ts3DjR
Read More
New
नगरसेवकांना "जोर'का झटका ; कर्मचाऱ्यांना मात्र सुखद धक्का... सोलापूर : भांडवली निधीतून सुचविण्यात आलेली पण अद्याप वर्कऑर्डर न झालेली सुमारे 15 कोटींची कामे स्थगित करत महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी नगरसेवकांना वर्षपूर्तीची भेट दिली. त्यांच्या निर्णयामुळे सन 2017-18 या कालावधीत सुचविण्यात आलेली व अभिप्राय दिलेली कामे आता थांबविण्यात येणार आहेत. कामे थांबविण्यात आल्याच्या वृत्तास त्यांनी "सकाळ'शी बोलताना दुजोरा दिला. त्याचवेळी 19 शिपायांसह तब्बल 55 जणांना पदोन्नती देत त्यांना सुखद धक्काही दिला. हे आधी वाचा - लेट लतिफांची उडणार झोप.... शासनाने मुदतवाढ दिली, पण.... महापालिका आयुक्तपदाची सूत्रे घेऊन श्री. तावरे यांना शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. याच दिवशी कामे थांबविण्याचा आदेश काढून श्री. तावरे यांनी नगरसेवकांना जोरदार धक्का दिला आहे. नगरविकास विभागाकडून विविध विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी वेळेत खर्च करण्याचे बंधन असते. पण राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधी वेळेत खर्च केला नाही. परिणामी तब्बल तीन आर्थिक वर्षांतील निधी खर्च करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. हेही वाचा - महापालिका अंदाजपत्रकावर "या' तारखेला चर्चा या तारखेपर्यंत मिळाली मुदतवाढ शासनाने 2015-16, 2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षातील विकासनिधी खर्च करण्यासाठी मुदतवाढ 31 मे 2020 पर्यंत दिली आहे. हा निर्णय फक्त कार्यादेश देऊन सुुरु झालेल्या पण पूर्ण न झालेल्या कामांसाठीच असणार आहे. त्यामुळे 2017-18 या आर्थिक वर्षात अभिप्राय दिलेले पण 27 फेब्रुवारी 2020 पर्यंत वर्कऑर्डर न दिलेल्या कामांना स्थगिती देण्यात आल्याचे श्री. तावरे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. सर्व खातेप्रमुख व विभागीय अधिकाऱ्यांनी या आदेशाचे तंतोतंत पालन करावे, असेही आदेशात म्हटले आहे. या कर्मचाऱ्यांना मिळाली पदोन्नती कार्यालय अधीक्षक - सुहास उंडाळे. वरिष्ठ मुख्य लेखनिक - खलीक काझी, सतीश पाटील, लव बुगडे, सिद्राम मलशेट्टी. वरिष्ठ श्रेणी लिपिक - राजेंद्रसा कोल्हापुरे, करीम बागवान, विजय तिऱ्हेकर, विजयकुमार अंजिखाने, श्यामल खराडे, भुजंग घोंगडे, फारुख शेख, दिलीप देशमुख, वंदना लोंढे, श्रीकांत गिडवीर, मल्लेशम नराल, गुरुनाथ येनगंदूल, रामचंद्र बडगू, व्यंकटेश गुर्रम, अभिमन्यू झांबरे, श्रीनिवास लिंगराज, मनोज धेंडे, मल्लिनाथ उटगी, कय्यूम बागवान, गोपाळ पिडगूलकर, उमेशकुमार मोरे, निर्मलकुमार शितोळे, अनुराधा कव्हेकर, युवराज क्षीरसागर, विशाल माने, जवाहर जाजू, रमेश उळागड्डे, मुर्तुज शहापूरे, राजेंद्र साळुंके, माधवराव पाटील. कनिष्ठ श्रेणी लिपीक - रऊफ पटेल, कृष्णमूर्ती धारा, विजयकुमार करली, रमेश मोहिते, अनिल खरटमल, वसंत ढाले, मीरा पोरे, महादेव ढेकणे, प्रशांत केरूरकर, पोपट खरात, अश्विनी खडतरे, अल्लाबक्ष शेख, सविता मकवाना, संतोष कलकामकर, राजशेखर कोळी, सुचित्रा सुलतानपुरे, नागेश कुर्ले, सिद्राम यमनूर, महादेव येळे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 28, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2I47Xkn
Read More
New
दोनशे खेड्यांना भूस्खलनाचा धोका मुंबई - राज्यातील दोनशे खेड्यांना भूस्खलनाचा धोका असल्याचा दावा भूगर्भ सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) प्रसिद्ध केलेल्या अहवालात केला आहे. ग्रेटर मुंबई महापालिकेने विनंती केल्यानंतर भूगर्भ विभागाने २२५ खेड्यांचा अभ्यास केला होता. संशोधकांनी यासाठी या सर्व खेड्यांचे धोक्याच्या चार श्रेणींमध्ये विभाजन केले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यातील चार जिल्ह्यांतील ४७ गावांना भूस्खलनाचा सर्वाधिक धोका असल्याचे आढळले. हा अहवाल त्या त्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. शोध प्रकल्पांची व्याप्ती भूस्खलनाच्या या धोक्याचा अभ्यास करण्यासाठी ‘जीएसआय’कडून दोन शोध प्रकल्प हाती घेण्यात आले होते. या प्रकल्पांचा कालखंड हा २०१५ ते १८ असा होता. या प्रकल्पाच्या माध्यमातूनच रायगड, रत्नागिरी, पुणे आणि ठाणे जिल्ह्यांतील लोकवस्तीला लागून असलेल्या धोकादायक उतारांची माहिती संकलित करण्यात आली तसेच मुंबईच्या नागरी भागांतील लोकवस्तीला लागून असलेल्या टेकड्यांचे धोकादायक उतारही निश्चित करण्यात आले होते. पश्चिम घाट रडारवर पश्चिम घाटातील १९८० पासूनच्या भूस्खलनाचा जीएसआयकडून सविस्तर अभ्यास केला जात असून याचे आपत्तीपूर्वी आणि आपत्तीनंतर असे दोन भागांत त्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय भूस्खलन शक्यता मापन कार्यक्रमान्वये तब्बल २८ हजार किलोमीटरच्या परिसराचा वेध घेणारा भूस्खलन संभाव्यतः नकाशा तयार केला जात असून, यामध्ये महाराष्ट्रातील डोंगराळ भागांचा समावेश आहे. हा नकाशा २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 28, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2T9jjd2
Read More
New
भारत करणार जगाचे नेतृत्व; शास्त्रज्ञ प्रा. तरुण सौरदीप यांची माहिती पुणे - आज अस्तित्वात असलेल्या ब्रह्मांडाबद्दल आपल्याकडे पुरेशी माहिती आहे. पण, महाविस्फोटानंतर (बिग बॅंग) निर्माण झालेले प्रारंभीचे ब्रह्मांड कसे होते, त्यातून आकाशगंगा, डार्क मॅटर आदींची निर्मिती कशी झाली, याबद्दल आपण आजही अनभिज्ञ आहोत. प्रारंभीच्या ब्रह्मांडाचा कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राउंडने अभ्यास करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी "सीएमबी-भारत' ही मोहीम आखली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारत जगाचे नेतृत्व करेल, असे प्रतिपादन भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ प्रा. तरुण सौरदीप यांनी केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी संस्थेत (आयुका) विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या "ब्रह्मांडाच्या स्वरूपाचा उलगडा' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. ब्रह्मांडाचे आजचे स्वरूप, वैश्विक स्थिरांक, कोल्ड डार्क मॅटर आदी विषयांचा आढावा त्यांनी घेतला. प्रा. सौरदीप म्हणाले, ""विश्वातील 95 टक्के पदार्थ, सतत विस्तारत जाणारे ब्रह्मांड, प्राचीन गुरुत्वीय लहरी याबद्दल आपण आजही अनभिज्ञ आहोत. यासंबंधीची माहिती सुरुवातीच्या ब्रह्मांडीय घटनांतून, त्यांच्या स्वरूपातून मिळेल. त्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी ही मोहीम आखली आहे.'' आयुकाचे संचालक प्रा. शोमक राय चौधरी, प्रा. सुहृद मोरे आदी उपस्थित होते. अशी आहे मोहीम - ब्रह्मांडीय "मायक्रोव्हेव'चा अभ्यास करण्यासाठी जगातील पहिली मोहीम - पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटरवर असलेल्या "एल-2' बिंदूवर उपग्रह स्थिरावणार - "सीएमबी-भारत'मधील पेलोडचे वजन दोन टन - "जीएसएलव्ही मार्क : 3' अग्निबाणाचे प्रक्षेपण शक्य मोहिमेचे फायदे - क्वांटम ग्राव्हिटीद्वारे सुरुवातीच्या ब्रह्मांडाची निरीक्षणे होणार - डार्क मॅटर, दृश्य ब्रह्मांडातील बेरिऑन्स, न्यूट्रिनो फिजिक्सच्या निरीक्षणासाठी मदत - प्राचीन आणि सुरुवातीच्या ब्रह्मांडातील माहिती मिळणार देशाला मूलभूत विज्ञानात योगदान देण्याची सुवर्णसंधी "सीएमबी-भारत' मोहिमेद्वारे निर्माण झाली आहे. जगभरातील वैज्ञानिकांच्याही मोहिमेकडून अपेक्षा उंचाविल्या आहेत. - प्रा. तरुण सौरदीप News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 28, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Pvpupy
Read More
New
‘भारतरत्न’चे राजकारण मध्यरात्र उलटल्यावर शहरातील चौकात एका चौथऱ्यावर भेटलेल्या पाच पुतळ्यांची कविता त्या महामानवांची वेदना तीव्रतेने आपल्यापर्यंत पोचविते. संवेदनशील, देशप्रेमी नागरिकाच्या अंगावर काटा आणणारी ही कविता आहे. सध्या महापुरुषांच्या नावांचा वापर ज्या पद्धतीने राजकीय फायद्यांसाठी केला जात आहे, ती बाब धक्कादायक आहे. जातीपातीचे राजकारण असते मुळात विभाजक. त्यात धर्माचे, पंथाचे पाठभेद शिरले की ते ठरते विदारक अन् एकाच विचाराच्या दोन पक्षांनी त्याचे राजकारण सुरू केले की ते ठरते विद्वेषक. गेल्या वेळी वेगळे लढून दोन पक्ष नंतर एकत्र आले. या वेळी उलटे झाले. लढले एकत्र अन् नंतर झाले वेगळे. सत्तालालसा परस्परसंबंध ठरवतेय सध्या. पण एकेकाळी सत्ता अप्राप्य असल्याने हिंदुत्ववादी राजकारण हा दोघांनाही जोडणारा धागा होता. आज वेगळे झाल्यावरही या मतपेढीवर भाजप आणि शिवसेना हे दोघेही हक्क सांगत आहेत. त्यासाठी वैचारिक प्रतीके आपापल्या दिशेने ओढली जात आहेत. किमान समान कार्यक्रमानंतरही शिवसेनेचे ‘चलो अयोध्या’ आहेच अन् भाजप त्यांना अडचणीत आणायला कधीही न मांडलेल्या ‘सावरकर गौरव ठरावा’चा आग्रह धरते आहे. या हिंदुत्वाच्या साठमारीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा जो वापर केला जात आहे, तो निंद्यच आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापुरुषांचे जीवन तसेही सरळ, एकरेषीय नसतेच. सावरकरांसारखे व्यक्तिमत्त्व तर वादळी होते. त्यांच्याविषयीच्या काही प्रवादांवर चर्चा होऊही शकते; पण त्यापेक्षाही महत्त्वाचे ठरते ते त्यांना ‘भारतरत्न’ मिळावे काय, याबद्दल सुरू असलेले राजकारण. समाजजीवनात, राष्ट्राच्या वाटचालीत योगदान देणारा कुणीही सच्चा माणूस देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा यासाठी मोर्चेबांधणी करत नसतो. त्यासाठी पुढे येतात ते अनुयायी. स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास हा नेहरू-गांधींना केंद्रस्थानी ठेवून लिहिला गेला ही उजव्या विचारसरणीची ठसठस. नेहरू-गांधी परिवाराच्या वरचष्म्याला विरोध करण्यासाठी सावरकर, सुभाषचंद्र बोस यांची चरित्रे मग प्रतीक पर्याय म्हणून प्रखरपणे समोर आणली गेली. वाजपेयी सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्यानंतर संसदेत सावरकरांचे तैलचित्र लावले गेले ते विचारसरणीला लोकमान्यता मिळाल्याने. खरे तर मतभेदांना तिलांजली देत देशाने भविष्याकडे वाटचाल करायची असते; पण ज्या संस्कृतीत मंदिरप्रवेशाचे मुद्दे आजही वादविषय ठरतात, तेथे महापुरुषही ‘तुमचे ते’ अन् ‘आमचे हे’ अशा विभाजनात वाटले जातात. काँग्रेसचे सध्याचे नेतृत्व बेरजेच्या राजकारणाचे भान नसलेले. ‘मी राहुल- सावरकर नाही’ असे गांधी घराण्याचे वारस अकारण म्हणतात अन् वादाच्या आगीत विधानांच्या मोळ्या पडतात. खरे तर सावरकरांचे योगदान आणि मराठी माणसातले त्यांचे स्थान लक्षात घेत महाराष्ट्राच्या विधिमंडळातही त्यांचे तैलचित्र लावण्यात आले. दादरमध्ये सावरकर स्मारकासाठी ज्येष्ठ नेते जयंतराव टिळक यांनी स्थानिकांना मदत करत पाठविलेला प्रस्ताव वसंतदादा पाटील, शरद पवार अशा तत्कालिन राज्यप्रमुखांनी प्रत्यक्षात आणला. सर्वसमावेशकतेची, सामोपचाराची ही काँग्रेस संस्कृती आज पक्षनेतृत्वाच्या भीतीने दूर ठेवली जाते. ‘सावरकरांचे योगदान मोठे आहे,’ असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू स्पष्ट केली. काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांनी मात्र कुणी चुगली केली, तर राहुलजींची मर्जी फिरायची या भीतीने कणाहीन वागणे पत्करले. आश्वासनाचे विस्मरण? हिंदुत्ववादी पक्षांचे वर्तनही तपासण्यासारखे. सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याचा विषय भाजपने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात नमूद केला. देशाचा कारभार आपल्या मर्जीनुसार चालवायची या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची वृत्ती. अमित शहा तर सावरकरभक्त, पहिला ब्लॉग सावरकरांना समर्पित करणारे. ‘भारतरत्न’साठी पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या कार्यालयाला शिफारस करणे एवढाच काय तो नियम अन् निकष. तरीही पक्षाला या आश्वासनाचा विसर पडतो आहे, की राजकारण करीत हा विषय तापवत ठेवायचा आहे? सावरकरांबरोबर फडवणीस सरकाने महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावांचीही शिफारस ‘भारतरत्न’साठी पाठविलेली आहे. त्याचे पुढे काय झाले? मतांकडे डोळे ठेवून दक्षिणेतील एम. जी. रामचंद्रन यांना या सन्मानाने गौरविले गेले, त्याच दिवशी या सर्वोच्च सन्मानाचे राजकारण सुरू झाले. ते दु:खद आहे. स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यांचा या सन्मानासाठी विचार करावा काय, याचा विचार जरूर व्हावा, पण स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा जोतिराव फुले किंवा क्रांतिकारक भगतसिंग या महापुरुषांची नावे वापरत ‘भारतरत्न’चे राजकारण होऊ नये. दिवंगत राष्ट्रपुरुषांना मरणयातना कितीदा द्यायच्या? News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 28, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TpcAur
Read More
New
मुस्लिम आरक्षणावरून आघाडीत मतभिन्नता मुंबई - मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यावरून राज्य सरकारमध्येच मतभेद असल्याचे आज स्पष्ट झाले. येत्या शैक्षणिक वर्षापासून आरक्षणाची घोषणा राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत केली; तर तसा कोणताही निर्णय झाला नसल्याचे शिवसेनेचे नेते नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, नवीन २०२०-२१ चे शैक्षणिक प्रवेश सुरू होण्याआधीच मुस्लिम समाजाला शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यासाठी कायदा करण्यात येईल. आघाडी सरकारने २०१४ मध्ये मुस्लिम समाजासाठी नोकरी आणि शैक्षणिकदृष्ट्या आरक्षणासाठी अध्यादेश काढला होता. मात्र, त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर न झाल्याने अध्यादेश रद्द झाला होता. मात्र, उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर मुस्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण दिले गेले पाहिजे, असे उच्च न्यायालयाने सांगितले होते. परंतु, धर्माधिष्ठित आरक्षण देण्यासाठी भाजपने नकार दिला होता. काँग्रेसच्या आ. हुस्नबानो खलिफे यांनी येत्या शैक्षणिक वर्षाचे प्रवेश सुरू होण्यापूर्वीच हा कायदा लागू केला जावा, अशी मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मलिक यांनी येत्या शैक्षणिक वर्षात हा कायदा केला जाईल, अशी हमी दिली. दरम्यान, भाजपचे आमदार भाई गिरकर यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. त्यामुळे अल्पसंख्याकांना देण्यात येणारे आरक्षण न्यायालयात टिकेल का? आंध्र प्रदेश सरकारने मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नसल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, १९५० ला घटनादुरुस्ती करून नवबौद्ध आणि शीख धर्मातील अनुसूचित जातीच्या लोकांना आरक्षण दिले गेले आहे. त्यामुळे अशाप्रकारे आरक्षण देता येते, हे सिद्ध झालेले आहे. आम्ही संविधानाच्या आधारावरच आरक्षण देऊ, याचा पुनरुच्चार केला. तसेच, सच्चर समितीचा अहवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनीदेखील आरक्षण देता येईल, असे मत नोंदविले असल्याने मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण देता येण्यास अडचण येत नसल्याचा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेने त्यांच्या जाहीरनाम्यात अल्पसंख्याक समाज, दलित, आदिवासींच्या सामाजिक हक्कांचे संरक्षण करणार असल्याचे नमूद केलेले होते. त्यामुळे मुस्लिम आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहेच. सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. -नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री राज्यघटनेनुसार धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही. इतकेच नाही, तर धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण दिल्याने मराठा आणि ओबीसी आरक्षणही अडचणीत येईल. मंत्री ज्या वेळी उत्तर देतात तेव्हा सरकारच बोलत असते. शिवसेनेने आपली सगळी तत्त्वे बाजूला ठेवून कशाकशात सेटिंग केली आहे, हे एकदा जाहीर करावे. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 28, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/387BxQn
Read More
Thursday, February 27, 2020
New
पैशे सांभाळा... कारण या बॅंकेला १५ जणांनी लावलाय चुना औरंगाबाद : एचडीएफसी बँकेच्या कोकणवाडीच्या शाखेची आतापर्यंत १५ व्यक्तींनी फसवणूक केल्याचे आणि साखळी पद्धतीने हा गुन्हा करण्यात आल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष फ्रान्सिस आयवन क्रियाडो (पुणे) यांनी दुकान परवाना, आयकर विवरण पत्र, बँक खाते उतारे आदी बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यावसायिक कर्ज घेऊन बॅंकेची फसवणूक केल्याची तक्रार वेदांतनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. हेही वाचा- देवदर्शनासाठी जाताना त्यांच्या मनीध्यानीही नव्हते. पण घरी येऊन पाहतात तर.... या प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन संशयित आरोपी प्रभाकर गावंडे याला पोलिसांनी अटक केली तर, न्यायालयाने गावंडेला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपी गावंडेला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीवेळी, १५ आरोपींनी बनावट कागदपत्रे व शिक्क्यांचा वापर करुन बँकेची फसवणूक केल्याचा केली सून गावंडेने १४ लाख रुपये बँकेतून उचलले आहेत व सर्व आरोपींनी साखळी पद्धतीने गुन्हा केल्याचे दिसून येत आहे असा युक्तीवाद करण्यात आला. सुनावणीदरम्यान आरोपी गावंडेच्या पोलिस कोठडीमध्ये रविवारपर्यंत (ता.२३) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी दिले. क्लिक करा- बीड जिल्हा पुन्हा गुंडगिरीकडे, पण खपवून घेणार नाही- पंकजा मुंडे आहेत संशयित मंगेश पंढरीनाथ सिरसाठ (रा. खडकेश्वर), महेश पंढरीनाथ सिरसाठ (रा. शिवनेरी हौसिंग सोसायटी), सचिन बंडुलाल राठोड (रा. गारखेडा), सय्यद जाविद (निकलक, ता. बदनापूर, जि. जालना), मुस्तकीम निसार खान (पीरबाजार रोड), मीना सुभाष औताडे (रा. बजाजनगर), सविता गुलाब हिवर्डे (रा. शरणापूर, पडेगाव), संतोषकुमार बबनराव पाटील (देवळाई परिसर), वाजिद अली खान (रा. सिल्कमिल कॉलनी), मालती राजेंद्र हार्डे (रा. हिवरखेडा रोड, कन्नड, जि. औरंगाबाद), प्रभाकर मधुकर गावंडे (४९, रा. चिकलठाणा), दिनेश बेचारा वाविया (रा. सातारा परिसर), शेख निहाल अहेमद हाजी (रा. किराडपुरा), हसन अमर हैदरा (रा. रोशनगेट) व फकरोद्दीन मोहम्मद (रा. बिस्मिल्ला कॉलनी) यांनी बँकेच्या कोकणवाडी शाखेची एक कोटी ४७ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादी म्हटले आहे. मास्टर माईंड मोकाटच मागच्या वर्षीही ७ व्यक्तींनी बँकेची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे या प्रकरणात आरोपींची मोठी साखळी असू शकते. आरोपी गावंडेने बनावट शिक्के-कागदपत्रे कुठून मिळवले, कुणी दिले, गुन्ह्याचा मास्टर माईंड कोण आदी बाबींचा तपास करणे बाकी असून, बनावट शिक्के-कागदपत्रे जप्त करणे बाकी असल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले. हे वाचलंत का- उपवासाच्या भगरीतून एकाच गावातील सतरा जणांना विषबाधा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 27, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32B26w1
Read More
New
सायदाला मिळाली तीस वर्षांनंतर मायेची ऊब येरवडा - सायदा एक वर्षाची असताना तिची आई हरवली होती. शोध घेऊनही सापडली नसल्याने कुटुंबीयांनी त्या परतण्याची आशा सोडली. पण येरवड्यातील मनोरुग्णालयाच्या प्रयत्नामुळे तीस वर्षांनंतर सायदाला आईच्या मायेची ऊब मिळाली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आसाम येथील हमिदा बेगम तीस वर्षांपूर्वी हरविल्या होत्या. रुग्णालयातील औषधोपचार, येथील समाजसेवक व आसाम पोलिसांच्या प्रयत्नातून हमिदा यांना त्यांची मुलगी सायदा सुलतान मिळाली. आईला घेण्यासाठी सायदा आपला मामेभाऊ अलिमुद्दीन यांच्यासह आल्या होत्या. मायलेकीच्या भेटीमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनासुद्धा अश्रू अनावर झाले. मुलगी सायदा एक वर्षाची असताना हमिदा बेगम उदाली (जि. लंका, रा. आसाम) येथून हरविल्या होत्या. त्या मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर सापडल्या. पोलिसांनी त्यांना १९८९ मध्ये ठाण्यातील मनोरुग्णालयात दाखल केले. जून २०१९ मध्ये त्यांना येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजित फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जयसिंह इंगळे, समाजसेवक मारुती दुनगे तेथील रुग्णांशी चर्चा करून नाव, पत्ता शोधत होते. वैद्यकीय उपचार व समुपदेशनामुळे हमिदा यांची मानसिकता सुधारत होती. समुपदेशनामध्ये त्या आसाममधील असल्याची जुजबी माहिती दिली. त्यावरून दुनगे यांनी तेथील पोलिसांशी संपर्क साधून नातेवाइकांना याची माहिती दिली. त्यानंतर दुनगे यांनी हमिदा यांचे भाऊ अल्लीमउद्दीन यांच्याशी व्हिडिओ कॉन्फन्सवर संवाद साधला. अल्लीमउद्दीन यांनी तीस वर्षांपूर्वी हरविलेल्या बहिणीला ओळखले. त्यांनी तत्काळ भाची सायदा यांच्यासह पुणे गाठले. हमिदा यांना पाहताच मुलीचा मायेचा बांध फुटला. सर्वत्र चौकशी केल्यानंतरही हमिदा यांचा शोध लागत नव्हता. रुग्णालयातून बाहेर पडताना नातेवाइकांनी अधीक्षक डॉ. फडणीस व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. केवळ मनोरुग्णालयामुळे आपली आई तब्बल तीस वर्षांनी सुस्थितीत मिळाल्याचा आनंद त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर होता. या क्षणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनासुद्धा अश्रू आवरता आले नाहीत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 27, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TfFNru
Read More
New
आईच माझा कंफर्ट झोन मेमॉयर्स : माझ्या आयुष्यात ज्या व्यक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, ती म्हणजे माझी आई - डॉ. स्वाती दैठणकर. मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते; कारण मला माझ्या आईमध्येच माझा गुरू मिळाला. जन्मल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिची साथ आणि मार्गदर्शन मला मोलाचे ठरले. मी तिचा रियाज बघतच लहानाची मोठी झाले आणि नृत्याची गोडी कधी आणि कशी निर्माण झाली हे कळलेच नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आईने कधीच माझ्यावर कोणतीच बंधने लादली नाहीत. तिचे प्रोत्साहन आणि खंबीर साथ कायम होतीच. त्यामुळे तिने कोणताही उपदेश न करता स्वतःच्या वागणुकीतून तिचा आदर्श माझ्यापुढे घालून दिला. घर आणि मुलांचे संगोपन उत्तमरीत्या सांभाळून स्वतःचे उदाहरण माझ्यासमोर ठेवले. माझे वडील संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर, तर आई नृत्यांगना. अशा वलयांकित आई-वडिलांची मुले असणे जितके भाग्याचे तितकेच जबाबदारीचे आहे, याची मला कल्पना आहे. त्यांच्या प्रभावातून वेगळे होऊन स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणे अवघड असते, पण आईने दिलेले विचार आणि निर्णय स्वातंत्र्यामुळेच मी वेगवेगळी क्षेत्रे अजमावून पाहत आहे. आईच नृत्यगुरू असल्याने तिचा २४ तास सहवास मला मिळाला. फक्त नृत्य शिक्षणापुरता सहवास सीमित न राहता तिची दिनचर्या, देश-विदेशातील कार्यक्रम, प्रवास यांची जवळून ओळख झाली. नृत्यकलाकार कसा असावा, त्याचबरोबर एक माणूस कसा असावा याची ओळख झाली. तिचा माझ्यावर अफाट विश्वास आहे, त्यानेही मला बळ मिळते व नवनवीन गोष्टी करण्यास मी प्रवृत्त होते. आपण आईशी मनमोकळेपणाने काही गोष्टी शेअर करतो, तर कधी भांडतोसुद्धा. माझ्या बाबतीत काही वेगळे नाही. आई हा माझा कंफर्ट झोन आहे. कधीकधी काही न बोलताही तिला माझ्या मनातल्या गोष्टी कळतात. माझ्या मालिका सुरू असताना स्वतःचे दौरे सांभाळून माझ्या झोपेची, खाण्यापिण्याची काळजी करताना ती आई असायची, तर अभिनयाचे बारकावे समजावून सांगताना गुरू असायची. असा ‘स्वीच ऑन- स्वीच ऑफ’ पण तिला मस्त जमतो. अनेकदा भारताबाहेरही तिच्याबरोबर नृत्य करायची संधी मिळाली. त्यातील जपानच्या टूरमध्ये आम्ही एन्जॉय केलेला ‘we time’ विशेष लक्षात राहिला. माझ्या हातून तिला प्रेरणा पुरस्कार देताना विशेष आनंद झाला. माझ्या बाबतीत आईचे पारडे कायमच जड राहील आणि आज मी जे काही आहे ते केवळ आईच्या शिकवणीमुळे. असे कधी विचार करून तिच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या जात नाहीत; पण आज मी हे औचित्य साधून तिला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. (शब्दांकन - अरुण सुर्वे) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 27, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/397avKl
Read More
New
भीषण ! ३२ वार करत पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीचा खेळ केला खल्लास... नवी मुंबई - उरणच्या चिरनेर हद्दीतील टाकिगाव बस स्थानक रानसई मार्गावर मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खुनाचा तपास उरण पोलिसांनी अवघ्या अठरा तासात पूर्ण केला आहे. या खून प्रकरणी दोन महिलांना अटक केली असून एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रानसई मार्गावर सोमवारी (ता.24) एका उकिरड्यावर महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेचा धारधार शस्त्राने खून केल्याचे निदर्शनात आल्याने उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनखली उरण पोलिसांनी तपास सुरु केला. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेच्या शरीरावर एक दोन नव्हे तब्बल ३२ वार करण्यात आले होते. मोठी बातमी - तुम्ही योग्य पार्टनरसोबत आहात की 'ही' आहे धोक्याची घंटा, असं ओळखा; आधी वाचा नंतर धन्यवाद द्या! या महिलेच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल झाले होते. यानंतर व्हायरल फोटोवरून तिच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात जाऊन मृतदेहाची ओळख पटवली होती. त्यानंतर अवघ्या 18 तासात हा तपास पूर्ण करून पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, मृत महिला जया तुकाराम घाणेकर हिचे पती मयत झाल्यानंतर मुक्तार हुसेन अली संग्राम यांच्या सोबत प्रेम विवाहातून लग्न झाले होते; मात्र त्याची पहिल्या पत्नीला ते अमान्य होतं. त्यामुळे आरोपी महिला आणि मयत महिला या दोघींचे नेहमीच वाद होत असे. अखेर आरोपीने तिची मुलगी व मित्रासोबत संगनमताने जया हिचा खून केला. तसेच मानसरोवर येथील घरातून चिरनेर रसत्यावर मृतदेह फेकून दिला; मात्र उरण पोलिसांनी दोन महिला आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपीचा मित्राचा शोध सुरु आहे. मोठी बातमी - फक्त 'हे' कानातले घाला मग मुलींनो तुमची छेड काढण्यास कुणीही धजावणार नाही... या गुन्हाचा तपासामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश कुलकर्णी आणि पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी काठे, कावळे, वृषाली पवार, पोलिस उप निरीक्षक अनिल चव्हाण, गोपनीय विभागातील सचिन केकरे, संतोष मोहिते, संजय कुथे, सुनील मोहिते, पुषोत्तम मराडे, उमेश कराले, घनश्याम पाटील, पोलिस हवलदार नीता डाउर यांनी अधिक मेहनत घेतली. ex wife took revenge from current wife attacked with sharp tool News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 27, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cdEwtO
Read More
New
#BUDGET2020 : सोलापूर महापालिका अंदाजपत्रकावर `या` दिवशी चर्चा सोलापूर : महापालिका अंदाजपत्रक आढावा बैठक 6 ते 11 मार्च या कालावधीत होणार आहे. पहिल्या दिवशी कर आकारणी व कर संकलन विभाग, हद्दवाढ, गलिच्छ वस्ती सुधारणा आणि स्थानिक संस्था कर विभागाचा आढावा होणार आहे. हेही वाचा - साम टीव्ही नंबर वन... बैठकांचे वेळापत्रक ः भूमी व मालमत्ता अधिकारी, उद्यान अधीक्षक, मंडई (सात मार्च), नगर अभियंता, सहायक संचालक नगर रचना, सार्वजनिक आरोग्य अभियंता, पाणीपुरवठा व ड्रेनेज (आठ मार्च), आरोग्याधिकारी, घनकचरा विभाग, नागरी समुदाय विकास प्रकल्प, क्रीडाधिकारी, महिला व बालकल्याण विभाग (नऊ मार्च), विभागीय कार्यालय क्रमांक एक ते आठ (10 मार्च) आणि नगरसचिव, मुख्य लेखापरीक्षक, परिवहन उपक्रम व शिक्षण मंडळ (11 मार्च). या सर्व बैठकांना मुख्य लेखापालांनी उपस्थित राहावे, अशी सूचना करण्यात आली आहे. कोणत्याही करात वाढ नाही पाणीपट्टीसह कोणत्याही करामध्ये वाढीची शिफारस नसलेले 2020-21 साठीचे 704 कोटी 21 लाख 97 हजार 410 रुपयांचे प्रशासकीय अंदाजपत्रक शनिवारी नगरसचिव कार्यालयास सादर करण्यात आले. स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने अधिनियमातील कलम 35 (अ) नुसार हे अंदाजपत्रक नगरसचिवांमार्फत सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आले आहे. सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकामध्ये महसूली विभागातून 516 कोटी 32 लाख 21 हजार 401 रुपये, तर भांडवली विभागातून 187 कोटी 89 लाख 76 हजार रुपये असे एकूण 704 कोटी 21 कोटी 97 लाख 401 रुपये अपेक्षित धरण्यात आले आहे. महसूली विभागातून 438 कोटी 73 लाख रुपये, पाणीपुरवठा विभागाकडून 77 लाख 55 हजार रुपये उत्पन्न अपेक्षित धरले आहे. महसूली विभागाच्या खर्चामध्ये 412 कोटी 53 लाख रुपये आणि पाणीपुरवठा विभागावरील खर्च 77 कोटी 55 लाख रुपये अपेक्षित धरण्यात आला आहे. भांडवली विभागातून 47 कोटी 45 लाख रुपयांची भांडवली कामे करण्यात येणार आहेत. तर अनुदानातून 140 कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. असे मिळेल उत्पन्न ः महापालिका कर (97 कोटी 28 लाख), निश्चित महसुली उत्पन्न (9 कोटी 10 लाख), महापालिका मालमत्तेपासून उत्पन्न (12 कोटी 70 लाख), शुल्क आणि वापरकर्ता शुल्क (99 कोटी 79 लाख), विक्री आणि भाडे (1 कोटी 2 लाख), महसुली अनुदान (218 कोटी 62 लाख), गुंतवणुकीतून उत्पन्न (10 लाख), दिलेल्या कर्जावरील व्याज (पाच लाख), इतर उत्पन्न (7 लाख), पाणीपुरवठा उत्पन्न (77 कोटी 55 लाख) असे एकूण (516 कोटी 29 लाख, 64 हजार रुपये) असा होईल खर्च ः पगार व भत्ते (207 कोटी 19 लाख), निवृत्तीवेतन व कुटुंब वेतन (75 कोटी 86 लाख), प्रशासकीय खर्च (12 कोटी 49 लाख), देखभाल व दुरुस्ती (50 कोटी 10 लाख), घेतलेल्या व घ्यावयाच्या कर्जावरील व्याज (5 कोटी 80 लाख), कार्यक्रम व योजनांवरील खर्च (29 कोटी 24 लाख), महसुली अनुदाने, देणग्या, योगदाने (9 कोटी 45 लाख), घसारा निधी (15 लाख), महसूली निधीतून वर्ग (44 कोटी 20 लाख), स्थिर मालमत्ता (3 कोटी 98 लाख), कर्जे (25 लाख), पाणीपुरवठा (77 कोटी 55 लाख) असे एकूण (516 कोटी 29 लाख, 64 हजार रुपये). News Story Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 27, 2020
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/389rVoa
Read More
New
मुंबईत दंगल रोखणाऱ्या मोहल्ला कमिटीचं काम कसं चालतं?
Latest news updates
February 27, 2020
0 Comments
via BBC News मराठी - बातम्या https://ift.tt/2VF7jlp
Read More