Video : महापालिकेला चुना, आयुक्तांनी केला पंचनामा औरंगाबाद - घरोघरी जाऊन कचरा संकलन व वाहतूक करण्याचे कंत्राट दिलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीने कचऱ्याच्या ट्रकमध्ये दगड, माती, विटा भरून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार शनिवारी (ता. २९) समोर आला. नगरसेवकांनी कंपनीचे तीन ट्रक पकडून ते थेट महापालिका मुख्यालयात आणले व आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी त्यातील कचरा, माती, दगड वेगळे करून वजन केले. एका ट्रकमध्ये तर धोकादायक असलेले मेडिकल वेस्ट (जैविक कचरा) आढळून आले. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना आयुक्तांनी पाचारण करून जाब विचारला. सकाळी दहा वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत या ‘कचरा फेकी’चा पर्दाफाश सुरू होता.  नगरसेवकांनीच घेतला पुढाकार महापालिकेने शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे व त्याची कचरा डेपोपर्यंत वाहतूक करण्याचे काम पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. सध्या कंपनीतर्फे नऊपैकी आठ प्रभागांत काम सुरू असून, एक टन कचऱ्यासाठी महापालिका १,८६५ रुपये एवढी दर देते. हा कचरा ओला व सुका असा वेगवेगळा करून उचलणे कंपनीला बंधनकारक आहे; मात्र कंपनी कचऱ्यासोबत दगड, माती, विटा भरून ट्रकचे वजन वाढवीत असल्याच्या तक्रारी काही महिन्यांपासून सुरू आहेत. प्रशासनाने मात्र कंपनीच्या ट्रकची पाहणी न करता मोकळे सोडले होते. शनिवारी नगरसेवकांनीच पुढाकार घेत कंपनीचा पर्दाफाश केला. शिवसेनेचे नगरसेवक रावसाहेब आमले, सुभाष शेजवळ, आशा निकाळजे यांना कंपनीच्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर माती भरून त्या पडेगाव येथील कचरा डेपोवर आणल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सकाळी १० वाजता कचरा डेपोवर धाव घेऊन पाहणी केली असता, तीन ट्रकपैकी एकामध्ये मेडिकल वेस्ट तर दोन ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात दगड, माती, विटा असल्याचे आढळून आले. त्यामुळे या तीनही ट्रक त्यांनी रोखून धरल्या. यासंदर्भात महापालिका आयुक्त, महापौर व घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली; मात्र नगरसेवकांनी वारंवार फोन करूनही घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी तीनही ट्रक महापालिकेत नेण्याचा निर्णय घेतला. महापालिकेत ट्रक आणल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी ट्रकवर चढून पाहणी केली. त्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर आयुक्तांना फोन करून चौकशीची सूचना केली.    आयुक्त नाशिकवरून पोचले अडीच तासांत  महापालिका आयुक्त स्मार्ट सिटीच्या कार्यशाळेनिमित्त दोन दिवस नाशिकमध्ये होते. नगरसेवकांनी कचऱ्याच्या गाड्या महापालिका मुख्यालयात आणल्याची माहिती मिळताच ते अवघ्या अडीच तासांत महापालिकेत पोचले. त्यांनीदेखील ट्रकवर चढून नगरसेवकांचे म्हणणे खरेच आहे का? याची पडताळणी केली. त्यानंतर चालकाला ट्रकमधील कचरा जमिनीवर टाकण्याचे आदेश दिले. वॉर्ड अधिकारी सी. एम. अभंग, संजय जक्कल, श्री. आठवले यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, विधी सल्लागार अपर्णा थेटे, मुख्यलेखाधिकारी संजय पवार यांना पाचारण करण्यात आले. ट्रकमधील कचरा जमिनीवर टाकल्यानंतर कचरा व दगड, माती, विटा वेगवेगळ्या करण्यात आल्या. एका ट्रकमध्ये कचऱ्यापेक्षा दगड, मातीच जास्त असल्याचे समोर आल्यानंतर सायंकाळी आयुक्तांनी महापालिका मुख्यालय सोडले.    अर्धा कचरा तर अर्धी माती, दगड  नगरसेवकांनी आणलेल्या तीन ट्रकपैकी ( एमएच-२०, ईल-००९३, ९४ व ७७) दोन ट्रकमधील वजनाच्या पावत्याच चालकाकडे होत्या. त्यावर वजन सरासरी १४ ते १५ टन एवढे होते. त्यातून ट्रकचे साडेसात, आठ टन वजन वजा केले; तर ट्रकमध्ये सुमारे सात टन कचरा असल्याचे दाखविण्यात आले होते. एका ट्रकमध्ये सात टन कचरा बसूच शकत नाही. तीन ते साडेतीन टन कचरा या ट्रकमध्ये बसू शकतो. त्यामुळे रेड्डी कंपनीच्या ट्रकमध्ये अर्धा कचरा, अर्धी माती व दगड असल्याचा आरोप रावसाहेब आमले यांनी केला. कंपनीतर्फे आतापर्यंत पडेगाव कचरा डेपोवर टाकण्यात आलेल्या कचऱ्यातून माती, दगड व बांधकामातील जुन्या विटा वेगळ्या करूनच पैसे देण्यात यावेत, अशी मागणी आमले यांनी आयुक्त, महापौरांकडे केली. एमआयएम पक्षाचे गटनेते गंगाधर ढगे यांनी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 29, 2020

Video : महापालिकेला चुना, आयुक्तांनी केला पंचनामा औरंगाबाद - घरोघरी जाऊन कचरा संकलन व वाहतूक करण्याचे कंत्राट दिलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीने कचऱ्याच्या ट्रकमध्ये दगड, माती, विटा भरून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार शनिवारी (ता. २९) समोर आला. नगरसेवकांनी कंपनीचे तीन ट्रक पकडून ते थेट महापालिका मुख्यालयात आणले व आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी त्यातील कचरा, माती, दगड वेगळे करून वजन केले. एका ट्रकमध्ये तर धोकादायक असलेले मेडिकल वेस्ट (जैविक कचरा) आढळून आले. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना आयुक्तांनी पाचारण करून जाब विचारला. सकाळी दहा वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत या ‘कचरा फेकी’चा पर्दाफाश सुरू होता.  नगरसेवकांनीच घेतला पुढाकार महापालिकेने शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे व त्याची कचरा डेपोपर्यंत वाहतूक करण्याचे काम पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. सध्या कंपनीतर्फे नऊपैकी आठ प्रभागांत काम सुरू असून, एक टन कचऱ्यासाठी महापालिका १,८६५ रुपये एवढी दर देते. हा कचरा ओला व सुका असा वेगवेगळा करून उचलणे कंपनीला बंधनकारक आहे; मात्र कंपनी कचऱ्यासोबत दगड, माती, विटा भरून ट्रकचे वजन वाढवीत असल्याच्या तक्रारी काही महिन्यांपासून सुरू आहेत. प्रशासनाने मात्र कंपनीच्या ट्रकची पाहणी न करता मोकळे सोडले होते. शनिवारी नगरसेवकांनीच पुढाकार घेत कंपनीचा पर्दाफाश केला. शिवसेनेचे नगरसेवक रावसाहेब आमले, सुभाष शेजवळ, आशा निकाळजे यांना कंपनीच्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर माती भरून त्या पडेगाव येथील कचरा डेपोवर आणल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सकाळी १० वाजता कचरा डेपोवर धाव घेऊन पाहणी केली असता, तीन ट्रकपैकी एकामध्ये मेडिकल वेस्ट तर दोन ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात दगड, माती, विटा असल्याचे आढळून आले. त्यामुळे या तीनही ट्रक त्यांनी रोखून धरल्या. यासंदर्भात महापालिका आयुक्त, महापौर व घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली; मात्र नगरसेवकांनी वारंवार फोन करूनही घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी तीनही ट्रक महापालिकेत नेण्याचा निर्णय घेतला. महापालिकेत ट्रक आणल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी ट्रकवर चढून पाहणी केली. त्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर आयुक्तांना फोन करून चौकशीची सूचना केली.    आयुक्त नाशिकवरून पोचले अडीच तासांत  महापालिका आयुक्त स्मार्ट सिटीच्या कार्यशाळेनिमित्त दोन दिवस नाशिकमध्ये होते. नगरसेवकांनी कचऱ्याच्या गाड्या महापालिका मुख्यालयात आणल्याची माहिती मिळताच ते अवघ्या अडीच तासांत महापालिकेत पोचले. त्यांनीदेखील ट्रकवर चढून नगरसेवकांचे म्हणणे खरेच आहे का? याची पडताळणी केली. त्यानंतर चालकाला ट्रकमधील कचरा जमिनीवर टाकण्याचे आदेश दिले. वॉर्ड अधिकारी सी. एम. अभंग, संजय जक्कल, श्री. आठवले यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, विधी सल्लागार अपर्णा थेटे, मुख्यलेखाधिकारी संजय पवार यांना पाचारण करण्यात आले. ट्रकमधील कचरा जमिनीवर टाकल्यानंतर कचरा व दगड, माती, विटा वेगवेगळ्या करण्यात आल्या. एका ट्रकमध्ये कचऱ्यापेक्षा दगड, मातीच जास्त असल्याचे समोर आल्यानंतर सायंकाळी आयुक्तांनी महापालिका मुख्यालय सोडले.    अर्धा कचरा तर अर्धी माती, दगड  नगरसेवकांनी आणलेल्या तीन ट्रकपैकी ( एमएच-२०, ईल-००९३, ९४ व ७७) दोन ट्रकमधील वजनाच्या पावत्याच चालकाकडे होत्या. त्यावर वजन सरासरी १४ ते १५ टन एवढे होते. त्यातून ट्रकचे साडेसात, आठ टन वजन वजा केले; तर ट्रकमध्ये सुमारे सात टन कचरा असल्याचे दाखविण्यात आले होते. एका ट्रकमध्ये सात टन कचरा बसूच शकत नाही. तीन ते साडेतीन टन कचरा या ट्रकमध्ये बसू शकतो. त्यामुळे रेड्डी कंपनीच्या ट्रकमध्ये अर्धा कचरा, अर्धी माती व दगड असल्याचा आरोप रावसाहेब आमले यांनी केला. कंपनीतर्फे आतापर्यंत पडेगाव कचरा डेपोवर टाकण्यात आलेल्या कचऱ्यातून माती, दगड व बांधकामातील जुन्या विटा वेगळ्या करूनच पैसे देण्यात यावेत, अशी मागणी आमले यांनी आयुक्त, महापौरांकडे केली. एमआयएम पक्षाचे गटनेते गंगाधर ढगे यांनी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32EPGDJ

No comments:

Post a Comment