डोळ्यांवर झोप असतानाही हाकतात ट्रक नवी दिल्ली -  वाहनांच्या अपघातांमागील कारणे पाहिली असता वाहनचालकाला डुलकी लागून नियंत्रण सुटल्याचे कारण अनेकदा सांगितले जाते. हे खरे असल्याचे ट्रकचालकांनीही मान्य केले आहे. डोळ्यांवर झोप असताना किंवा थकवा जाणवत असला तरी गाडी चालवणे भाग असते, असे ५० टक्के चालकांनी सांगितले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सेव्ह लाइफ फाउंडेशन या संस्थेने ‘भारतातील ट्रकचालकांचा स्थिती’ या विषयावर सर्व्हे करून अहवाल तयार केला आहे. या प्रकारचा हा पहिलाच तपशीलवार अहवाल आहे. यासाठी देशातील दहा शहरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यातून ट्रकचालकांचे हे वास्तव समोर आले आहे. शिवाय पाहणीत प्रवासात काही प्रमाणात अमली पदार्थांचे सेवन केले जाते, असे पाचपैकी एका ट्रकचालकाने मान्य केले.  ट्रक चालविताना प्रवासात विविध विभागांना लाच दिली जात असल्याचे सत्यही यातून उघड झाले आहे. सध्या ट्रकचालक आणि ट्रकमालकांना वर्षाला ४७ हजार ८५२ कोटी रुपयांचा मलिदा सरकारी विभागांना मिळतो. विशेष म्हणजे यातील मोठा वाटा पोलिसांकडे जातो. ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’च्या अंदाजानुसार २००६-०७ मध्ये ट्रक वाहतुकीतून २२ हजार ०४८ कोटी रुपयांची लाच दिली गेली.  दहा शहरांमध्ये पाहणी  दिल्ली-राष्ट्रीय राजधानी विभाग, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, कोलकता, बंगळूर, चेन्नई, कानपूर, विजयवाडा आणि गुवाहाटी या दहा शहरांमध्ये करण्यात आली. तेथील सुमारे एक हजार २१७ ट्रकचालक आणि ट्रकमालक यांची मुलाखत घेऊन यातील निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. वाहन परवाना मिळविण्यापूर्वी वाहन चालविण्याचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतले नव्हते, असे दहापैकी नऊ ट्रकचालकांनी (९० टक्के) कबूल केले. कामाच्या ताणामुळे वेगात वाढ कामाचा ताण असल्याने माल वेळेत पोचण्यासाठी भरधाव गाडी चालवावी लागते, असा दावा दोन तृतीयांशापेक्षा अधिक (६७.१ टक्का) चालकांनी केला आहे.  दिल्लीतील ५८ टक्के चालकांनी गेल्या दहा वर्षांत आयुष्याची गुणवत्तेत बिघाड झाला असल्याचे सांगितले.  ट्रकचालकांच्या दैनावस्थेवर प्रकाश ट्रक चालकांच्या दैनावस्थेवरही या अहवालातून प्रकाश टाकण्यात आला आहे. यात ५३ टक्के चालक त्यांच्या व्यवसायाबद्दल असमाधानी असल्याचे दिसून आले. कुटुंबातील अन्य सदस्यांनी किंवा नातेवाइकांनी या व्यवसायात उतरावे, असे अजिबात वाटत नसल्याचे ८४ टक्के चालकांनी सांगितले. रस्त्यावर सुरक्षेचा अभाव असल्याने या ट्रक व्यवसायाबद्दल आकर्षण वाटत नसल्याचे दोन तृतीयांश चालकांनी सांगितले. वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार १५,००० - ट्रक अपघातांतील बळी ५७,००० - ट्रकमुळे होणारे अपघात News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 28, 2020

डोळ्यांवर झोप असतानाही हाकतात ट्रक नवी दिल्ली -  वाहनांच्या अपघातांमागील कारणे पाहिली असता वाहनचालकाला डुलकी लागून नियंत्रण सुटल्याचे कारण अनेकदा सांगितले जाते. हे खरे असल्याचे ट्रकचालकांनीही मान्य केले आहे. डोळ्यांवर झोप असताना किंवा थकवा जाणवत असला तरी गाडी चालवणे भाग असते, असे ५० टक्के चालकांनी सांगितले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सेव्ह लाइफ फाउंडेशन या संस्थेने ‘भारतातील ट्रकचालकांचा स्थिती’ या विषयावर सर्व्हे करून अहवाल तयार केला आहे. या प्रकारचा हा पहिलाच तपशीलवार अहवाल आहे. यासाठी देशातील दहा शहरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यातून ट्रकचालकांचे हे वास्तव समोर आले आहे. शिवाय पाहणीत प्रवासात काही प्रमाणात अमली पदार्थांचे सेवन केले जाते, असे पाचपैकी एका ट्रकचालकाने मान्य केले.  ट्रक चालविताना प्रवासात विविध विभागांना लाच दिली जात असल्याचे सत्यही यातून उघड झाले आहे. सध्या ट्रकचालक आणि ट्रकमालकांना वर्षाला ४७ हजार ८५२ कोटी रुपयांचा मलिदा सरकारी विभागांना मिळतो. विशेष म्हणजे यातील मोठा वाटा पोलिसांकडे जातो. ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’च्या अंदाजानुसार २००६-०७ मध्ये ट्रक वाहतुकीतून २२ हजार ०४८ कोटी रुपयांची लाच दिली गेली.  दहा शहरांमध्ये पाहणी  दिल्ली-राष्ट्रीय राजधानी विभाग, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, कोलकता, बंगळूर, चेन्नई, कानपूर, विजयवाडा आणि गुवाहाटी या दहा शहरांमध्ये करण्यात आली. तेथील सुमारे एक हजार २१७ ट्रकचालक आणि ट्रकमालक यांची मुलाखत घेऊन यातील निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. वाहन परवाना मिळविण्यापूर्वी वाहन चालविण्याचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतले नव्हते, असे दहापैकी नऊ ट्रकचालकांनी (९० टक्के) कबूल केले. कामाच्या ताणामुळे वेगात वाढ कामाचा ताण असल्याने माल वेळेत पोचण्यासाठी भरधाव गाडी चालवावी लागते, असा दावा दोन तृतीयांशापेक्षा अधिक (६७.१ टक्का) चालकांनी केला आहे.  दिल्लीतील ५८ टक्के चालकांनी गेल्या दहा वर्षांत आयुष्याची गुणवत्तेत बिघाड झाला असल्याचे सांगितले.  ट्रकचालकांच्या दैनावस्थेवर प्रकाश ट्रक चालकांच्या दैनावस्थेवरही या अहवालातून प्रकाश टाकण्यात आला आहे. यात ५३ टक्के चालक त्यांच्या व्यवसायाबद्दल असमाधानी असल्याचे दिसून आले. कुटुंबातील अन्य सदस्यांनी किंवा नातेवाइकांनी या व्यवसायात उतरावे, असे अजिबात वाटत नसल्याचे ८४ टक्के चालकांनी सांगितले. रस्त्यावर सुरक्षेचा अभाव असल्याने या ट्रक व्यवसायाबद्दल आकर्षण वाटत नसल्याचे दोन तृतीयांश चालकांनी सांगितले. वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार १५,००० - ट्रक अपघातांतील बळी ५७,००० - ट्रकमुळे होणारे अपघात News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/39b7Sar

No comments:

Post a Comment