Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 2, 2021

Corona Update : औरंगाबादेत ७६ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४४०७० कोरोनामुक्त

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी (ता.दोन) ७६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ७६२ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार २०६ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी ५७ जणांना सुटी झाली. आजपर्यंत ४४ हजार ७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

 

 

महाराष्ट्रात फडणवीसांचे, दिल्लीत मोदींचे सरकार असताना संभाजीनगरचेच नामांतर का शिल्लक ठेवलेत? सामनातून भाजपला सवाल

 

शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या) : धूत हॉस्पीटल परिसर (२), जटवाडा रोड (२), एन सात (१), अरिहंत नगर (१), एन चार (१), अविष्कार कॉलनी (१), सावंगीकर हॉस्पीटल जवळ (१), एन नऊ (१), स्नेह नगर (२), मुकुंदवाडी (१), उत्तरानगरी (१), एसबीआय मुख्यालय परिसर (२), शाह नगर (१), भावसिंगपुरा (१), बीड बायपास (२), समर्थ नगर (२), इटखेडा (१), केंद्रीय विद्यालय, नगर नाका परिसर (१), कांचनवाडी (१), एन अकरा, गजानन नगर (१), पडेगाव (१), सेंट्रल नाका (१), अन्य (४१)

 

 

घाटीत‘एमबीबीएस’च्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्याची आत्महत्या, विषारी रसायनाचे केले होते सेवन

 

ग्रामीण भागातील बाधित : लासूर सावंगी (१), पैठण (१), कन्नड (१), अन्य (४)

एकाचा मृत्यू
घाटीत पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याण नगरातील ७५ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कोरोना मीटर
---
बरे झालेले रुग्ण : ४४०७०
उपचार घेणारे रुग्ण : ४८६
एकूण मृत्यू : १२०६
----
आतापर्यंतचे बाधित : ४५७६२
----

 

संपादन - गणेश पिटेकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Corona Update : औरंगाबादेत ७६ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४४०७० कोरोनामुक्त औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी (ता.दोन) ७६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ७६२ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार २०६ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी ५७ जणांना सुटी झाली. आजपर्यंत ४४ हजार ७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.     महाराष्ट्रात फडणवीसांचे, दिल्लीत मोदींचे सरकार असताना संभाजीनगरचेच नामांतर का शिल्लक ठेवलेत? सामनातून भाजपला सवाल   शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या) : धूत हॉस्पीटल परिसर (२), जटवाडा रोड (२), एन सात (१), अरिहंत नगर (१), एन चार (१), अविष्कार कॉलनी (१), सावंगीकर हॉस्पीटल जवळ (१), एन नऊ (१), स्नेह नगर (२), मुकुंदवाडी (१), उत्तरानगरी (१), एसबीआय मुख्यालय परिसर (२), शाह नगर (१), भावसिंगपुरा (१), बीड बायपास (२), समर्थ नगर (२), इटखेडा (१), केंद्रीय विद्यालय, नगर नाका परिसर (१), कांचनवाडी (१), एन अकरा, गजानन नगर (१), पडेगाव (१), सेंट्रल नाका (१), अन्य (४१)     घाटीत‘एमबीबीएस’च्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्याची आत्महत्या, विषारी रसायनाचे केले होते सेवन   ग्रामीण भागातील बाधित : लासूर सावंगी (१), पैठण (१), कन्नड (१), अन्य (४) एकाचा मृत्यू घाटीत पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याण नगरातील ७५ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना मीटर --- बरे झालेले रुग्ण : ४४०७० उपचार घेणारे रुग्ण : ४८६ एकूण मृत्यू : १२०६ ---- आतापर्यंतचे बाधित : ४५७६२ ----   संपादन - गणेश पिटेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 02, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MndN5v
Read More
पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 123 नवीन रुग्णांची भर

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 1203 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 96 हजार 851 झाली आहे. आज 84 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 93 हजार 559 झाली आहे. सध्या एक हजार 583 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील दोन व शहराबाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 759 झाली आहे. तर, शहराबाहेरील 732 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष बालाजीनगर (वय 58) , आकुर्डी (वय 65) येथील रहिवासी आहेत. शहराबाहेरील पुरुष खेड (वय 58), जुन्नर (वय 65) येथील रहिवासी आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंग्लंडहून आलेले व मुंबई विमानतळावर उतरलेल्या शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 188 प्रवाशांची तपासणी केली असून 181 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. एकूण सात जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. 50 प्रवाशी बाहेरगावी गेले आहेत. आठ जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे. 16 प्रवाशांचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 

धारदार शस्त्राने वार करून लोणावळ्यात तरुणाचा खून

सध्या महापालिका रुग्णालयांत 647 रुग्ण उपचार घेत आहेत. 886 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 701 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात दोन हजार 170 जणांची तपासणी करण्यात आली. आज 761 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 88 हजार 586 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 

चिंचवडमध्ये दोन गटात हाणामारी; कोयते, तलवारीने प्राणघातक हल्ला

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 123 नवीन रुग्णांची भर पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 1203 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 96 हजार 851 झाली आहे. आज 84 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 93 हजार 559 झाली आहे. सध्या एक हजार 583 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील दोन व शहराबाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 759 झाली आहे. तर, शहराबाहेरील 732 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष बालाजीनगर (वय 58) , आकुर्डी (वय 65) येथील रहिवासी आहेत. शहराबाहेरील पुरुष खेड (वय 58), जुन्नर (वय 65) येथील रहिवासी आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा इंग्लंडहून आलेले व मुंबई विमानतळावर उतरलेल्या शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 188 प्रवाशांची तपासणी केली असून 181 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. एकूण सात जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. 50 प्रवाशी बाहेरगावी गेले आहेत. आठ जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे. 16 प्रवाशांचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे.  धारदार शस्त्राने वार करून लोणावळ्यात तरुणाचा खून सध्या महापालिका रुग्णालयांत 647 रुग्ण उपचार घेत आहेत. 886 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 701 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात दोन हजार 170 जणांची तपासणी करण्यात आली. आज 761 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 88 हजार 586 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.  चिंचवडमध्ये दोन गटात हाणामारी; कोयते, तलवारीने प्राणघातक हल्ला Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 02, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38QiXP8
Read More

Friday, January 1, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 2 जानेवारी २०२१

पंचांग -
शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण ३, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ७.०८ सूर्यास्त ६.०८, चंद्रोदय रात्री ९.१४, चंद्रास्त सकाळी ९.४२, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर पौष १२ शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९४३ : हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे निधन.
१९४४ : समाजसुधारक, अस्पृश्‍यता निवारणाचे पुरस्कर्ते, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन.
१९९८ : ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. प्रदान. 
१९९९ : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला कार्यकर्त्या विमला फारुकी यांचे निधन.
२००० : संत ज्ञानेश्वरांच्या स्मरणार्थ त्यांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.
२००२ : ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आणि सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटचे संस्थापक अनिल आगरवाल यांचे निधन. सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केले होते.

दिनमान -
मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. 
वृषभ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
मिथुन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.
कर्क : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. गुंतवणुकीला सप्ताह चांगला आहे.
सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : संततिसौख्य लाभेल.  एखादी भाग्यकारक घटना घडेल. हितशत्रूंवर मात कराल.
तुळ : प्रवासाचे योग येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
वृश्‍चिक : सुसंधी लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
धनु : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत.
मकर : आरोग्य उत्तम राहील. काहींना नोकरीत बढतीची  शक्‍यता आहे.
कुंभ : वेळ विनाकारण वाया जाण्याची शक्‍यता. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
मीन : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नवीन परिचय होतील.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 2 जानेवारी २०२१ पंचांग - शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण ३, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ७.०८ सूर्यास्त ६.०८, चंद्रोदय रात्री ९.१४, चंद्रास्त सकाळी ९.४२, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर पौष १२ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९४३ : हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे निधन. १९४४ : समाजसुधारक, अस्पृश्‍यता निवारणाचे पुरस्कर्ते, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन. १९९८ : ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. प्रदान.  १९९९ : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला कार्यकर्त्या विमला फारुकी यांचे निधन. २००० : संत ज्ञानेश्वरांच्या स्मरणार्थ त्यांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन. २००२ : ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आणि सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटचे संस्थापक अनिल आगरवाल यांचे निधन. सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केले होते. दिनमान - मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.  वृषभ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. मिथुन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल. कर्क : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. गुंतवणुकीला सप्ताह चांगला आहे. सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल. कन्या : संततिसौख्य लाभेल.  एखादी भाग्यकारक घटना घडेल. हितशत्रूंवर मात कराल. तुळ : प्रवासाचे योग येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. वृश्‍चिक : सुसंधी लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. धनु : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. मकर : आरोग्य उत्तम राहील. काहींना नोकरीत बढतीची  शक्‍यता आहे. कुंभ : वेळ विनाकारण वाया जाण्याची शक्‍यता. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मीन : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नवीन परिचय होतील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3pJSitY
Read More
कुठे शेकोटीचा तर कुठे आडोशाचा आधार घेत राजकीय गप्पा; वातावरण झाले गरम

कामठी (जि. नागपूर) : ग्रामीण भागातील विकासाचा कणा समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. त्यामुळे बोचऱ्या थंडीच्या मंद हवेत कुठे शेकोटीची तर कुठे आडोशाचा आधार घेत राजकीय गप्पा गोष्टींना उधाण येत आहे. या निवडणुकीत तरी आपलाच उमेदवार निवडून आला पाहिजे याच गोष्टींचा निष्कर्ष जागोजागी निघत आहे.

तालुक्यात भामेवाडा, टेमसना, पावनगाव, कोराडी, घोरपड, लोणखैरी, केसोरी, खेडी, महालगाव या नऊ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या नऊ ग्रामपंचायतींच्या ३१ प्रभागातील ८७ सदस्यांसाठी २१ हजार १२५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात १० हजार ७७५ पुरुष व १० हजार ३५० महिला मतदार ३६ मतदान केंद्रावरून मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

अधिक वाचा - ‘फिट इंडिया’त वर्धा जिल्हा राज्यात दुसरा; मुंबई पहिल्या क्रमांकावर, राज्यातील शाळा नोंदणी ४६.२५ टक्‍के

नऊही ग्रामपंचायतींमध्ये आमदार, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांसह विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते निवडणुकींच्या तयारीला लागले आहेत. निर्वाचन आयोगाने १५ जानेवारीला मतदान करण्याची तारीख निश्चित केली आहे. या निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेशी ज्या उमेदवाराची जास्तीत जास्त संपर्क जास्त आहे, त्याची नाळ जुळलेली असणे गरजेचे आहे.

केवळ निवडणुकीच्या काळातच जनसंपर्कांचे हत्यार उपसून मते मागणाऱ्यांना जनतेने पराभूत केले आहे. हे सुध्दा विसरता कामा नये. त्यामुळे सामाजिक कार्य, लग्न, मरण किंवा एखाद्या समाजाचे मोठे काम करून देण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांकडून केला जात आहे.

त्याचप्रमाणे मागील निवडणुकीत आपल्या पॅनलचा उमेदवार का पराभूत झाला, याची कारणे पक्षश्रेष्ठींना समजावून सांगण्यासाठी इच्छुकांच्या वाऱ्या नेत्यांच्या दरबारी सुरू झालेल्या आहेत. निवडणुकीत मला आपल्या पॅनलमधून संधी दिल्यास माझा विजय सहज होऊ शकतो, याचे उदाहरणासह महत्व पटवून दिले जात आहे.

सविस्तर वाचा - सहा वर्षांचा मुलगा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा संशयित; सात जण मेडिकलमध्ये दाखल

बसस्टॅंड, चौकातील पानटपरी, हॉटेल, शेतात आदी ठिकाणी बसल्या बसल्या निवडणुकीच्या गोष्टी चर्चेस येत आहेत. दुसरीकडे नव्याने राजकारणात उतरलेल्या इच्छुक युवक व शिक्षित उमेदवारांनी जनसंपर्कात दमदार आघाडी घेतल्याने अनेकांच्या छातीत धडकी भरली आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तरुणांनी राजकारणाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे यांच्या चळवळीला विसरता कामा नये. परिणामी ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणांनी राजकारणात नव्यानेच पदार्पण करणाऱ्यांना स्थान देते की, जुनेच राजकारण कायम ठेवते, हे सुध्दा महत्वपूर्ण ठरणार आहे.

शेकोटीचा आधार घेऊन जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न

कामठी तालुक्यात दिवसा इच्छुक उमेदवार तथा त्यांचे कार्यकर्ते नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. खरी मजा ग्रामीण भागात येत आहे. ग्रामीण भागातील गावातीलच उमेदवार व तिथलाच मतदार असल्याने मागील निवडणुकीचे किस्से सांगितले जात आहेत. त्याचप्रमाणे कधीही कुठल्याही शेकोटीवर उभे न राहणारे मुद्याम शेकोटीचा आधार घेऊन जनसंपर्क वाढवीत आहेत.

नागपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

मतदारांना पटवून देण्याचे काम

काही गावात तर आम्ही तुमच्या उमेदवाराला मतदान करतो, तुम्ही आम्हाला मदत करा, असे आश्वासन देखील दिले जात आहेत. तर काही प्रभागामध्ये आतापर्यंत आम्ही केवळ मतदान करण्याचेच काम केलेले आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्हाला संधी द्या, अशी तोंडी आश्‍वासने घेतली जात आहेत. मागील वर्षी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अमक्याने आपल्या पक्षाच्या उमेदवाराचे काम न करता विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे काम केल्याचे गावातील मतदारांना पटवून दिले जात आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कुठे शेकोटीचा तर कुठे आडोशाचा आधार घेत राजकीय गप्पा; वातावरण झाले गरम कामठी (जि. नागपूर) : ग्रामीण भागातील विकासाचा कणा समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. त्यामुळे बोचऱ्या थंडीच्या मंद हवेत कुठे शेकोटीची तर कुठे आडोशाचा आधार घेत राजकीय गप्पा गोष्टींना उधाण येत आहे. या निवडणुकीत तरी आपलाच उमेदवार निवडून आला पाहिजे याच गोष्टींचा निष्कर्ष जागोजागी निघत आहे. तालुक्यात भामेवाडा, टेमसना, पावनगाव, कोराडी, घोरपड, लोणखैरी, केसोरी, खेडी, महालगाव या नऊ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या नऊ ग्रामपंचायतींच्या ३१ प्रभागातील ८७ सदस्यांसाठी २१ हजार १२५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात १० हजार ७७५ पुरुष व १० हजार ३५० महिला मतदार ३६ मतदान केंद्रावरून मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अधिक वाचा - ‘फिट इंडिया’त वर्धा जिल्हा राज्यात दुसरा; मुंबई पहिल्या क्रमांकावर, राज्यातील शाळा नोंदणी ४६.२५ टक्‍के नऊही ग्रामपंचायतींमध्ये आमदार, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांसह विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते निवडणुकींच्या तयारीला लागले आहेत. निर्वाचन आयोगाने १५ जानेवारीला मतदान करण्याची तारीख निश्चित केली आहे. या निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेशी ज्या उमेदवाराची जास्तीत जास्त संपर्क जास्त आहे, त्याची नाळ जुळलेली असणे गरजेचे आहे. केवळ निवडणुकीच्या काळातच जनसंपर्कांचे हत्यार उपसून मते मागणाऱ्यांना जनतेने पराभूत केले आहे. हे सुध्दा विसरता कामा नये. त्यामुळे सामाजिक कार्य, लग्न, मरण किंवा एखाद्या समाजाचे मोठे काम करून देण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. त्याचप्रमाणे मागील निवडणुकीत आपल्या पॅनलचा उमेदवार का पराभूत झाला, याची कारणे पक्षश्रेष्ठींना समजावून सांगण्यासाठी इच्छुकांच्या वाऱ्या नेत्यांच्या दरबारी सुरू झालेल्या आहेत. निवडणुकीत मला आपल्या पॅनलमधून संधी दिल्यास माझा विजय सहज होऊ शकतो, याचे उदाहरणासह महत्व पटवून दिले जात आहे. सविस्तर वाचा - सहा वर्षांचा मुलगा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा संशयित; सात जण मेडिकलमध्ये दाखल बसस्टॅंड, चौकातील पानटपरी, हॉटेल, शेतात आदी ठिकाणी बसल्या बसल्या निवडणुकीच्या गोष्टी चर्चेस येत आहेत. दुसरीकडे नव्याने राजकारणात उतरलेल्या इच्छुक युवक व शिक्षित उमेदवारांनी जनसंपर्कात दमदार आघाडी घेतल्याने अनेकांच्या छातीत धडकी भरली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तरुणांनी राजकारणाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे यांच्या चळवळीला विसरता कामा नये. परिणामी ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणांनी राजकारणात नव्यानेच पदार्पण करणाऱ्यांना स्थान देते की, जुनेच राजकारण कायम ठेवते, हे सुध्दा महत्वपूर्ण ठरणार आहे. शेकोटीचा आधार घेऊन जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न कामठी तालुक्यात दिवसा इच्छुक उमेदवार तथा त्यांचे कार्यकर्ते नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. खरी मजा ग्रामीण भागात येत आहे. ग्रामीण भागातील गावातीलच उमेदवार व तिथलाच मतदार असल्याने मागील निवडणुकीचे किस्से सांगितले जात आहेत. त्याचप्रमाणे कधीही कुठल्याही शेकोटीवर उभे न राहणारे मुद्याम शेकोटीचा आधार घेऊन जनसंपर्क वाढवीत आहेत. नागपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा मतदारांना पटवून देण्याचे काम काही गावात तर आम्ही तुमच्या उमेदवाराला मतदान करतो, तुम्ही आम्हाला मदत करा, असे आश्वासन देखील दिले जात आहेत. तर काही प्रभागामध्ये आतापर्यंत आम्ही केवळ मतदान करण्याचेच काम केलेले आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्हाला संधी द्या, अशी तोंडी आश्‍वासने घेतली जात आहेत. मागील वर्षी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अमक्याने आपल्या पक्षाच्या उमेदवाराचे काम न करता विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे काम केल्याचे गावातील मतदारांना पटवून दिले जात आहे. संपादन - नीलेश डाखोरे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hyqA0s
Read More
सिंधुदुर्गात आणखी 75 घरकुलांना मंजूरी 

ओरोस (सिंधुदुर्ग) - महा आवास अभियान अंतर्गत जिल्ह्यातील आणखी 75 घरकुलांना मंजूरी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत 569 घरकुलाना मंजूरी मिळाली आहे. अजुन 150 प्रस्ताव मंजूरीसाठी लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक दीपाली पाटील यांनी दिली. 

राज्य शासनाने सर्वांसाठी घरे 2022 हे धोरण स्वीकारले असून राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधत 20 नोव्हेंबरला "महा आवास अभियान-ग्रामीण' या नवीन अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केला. या अभियानात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना व राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, पारधी, आदिम, अटल कामगार बांधकाम आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमानता व गुणवत्ता 2020-21 या आर्थिक वर्षात आणण्यात येणार आहे.

संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयेमधील क्रमांक 11 नुसार किफायतशीर गृहनिर्माण क्षेत्राचा विकास झाल्यास एकूण मानवी विकासातील 17 पैकी 14 निर्देशावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. यासाठी घरकुलांच्या कामांची प्रगती फक्त संख्यात्मक न राहता गुणात्मक रहावी. नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणून लाभार्थ्यांना सर्व सुविधायुक्त असे घरकुल उपलब्ध करून द्यावे. नैसर्गिक आपत्तीस सक्षमपणे सामोरे जाणारे घरकुल बांधण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे ध्येय "महा आवास अभियान-ग्रामीण' सुरु करण्यामागे शासनाचे आहे. 

या महा आवास अभियान अंतर्गत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यानी 15 डिसेंबर हा दिवस जिल्ह्यात "घरकुल मंजूरी दिन' म्हणून साजरा करण्यात आला होता. जिल्ह्याला एकूण 1 हजार 924 घरकुलांचे उद्दिष्ट आहे. यातील यापूर्वी जिल्ह्यात 336 प्रस्तावांना पहिली मंजूरी देण्यात आली होती. त्यानंतर 22 डिसेबर रोजी 158 घरकुलांची मंजूरी वाढली. त्यामुळे मंजूरी मिळालेल्या घरकुलांची एकूण संख्या 494 झाली होती. आता 75 नवीन मंजूरी मिळाल्याने ही संख्या 569 झाली आहे. 

काही प्रस्ताव प्रलंबित 
अजुन 1 हजार 335 प्रस्तावांना मंजूरी शिल्लक आहे. त्यातील 150 प्रस्ताव तालुकास्तरावरुन प्राप्त झाले आहेत. ते लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मंजूरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. उर्वरित एक हजार 355 घरकुलांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती दिपाली पाटील यांनी दिली. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गात आणखी 75 घरकुलांना मंजूरी  ओरोस (सिंधुदुर्ग) - महा आवास अभियान अंतर्गत जिल्ह्यातील आणखी 75 घरकुलांना मंजूरी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत 569 घरकुलाना मंजूरी मिळाली आहे. अजुन 150 प्रस्ताव मंजूरीसाठी लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक दीपाली पाटील यांनी दिली.  राज्य शासनाने सर्वांसाठी घरे 2022 हे धोरण स्वीकारले असून राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधत 20 नोव्हेंबरला "महा आवास अभियान-ग्रामीण' या नवीन अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केला. या अभियानात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना व राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, पारधी, आदिम, अटल कामगार बांधकाम आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमानता व गुणवत्ता 2020-21 या आर्थिक वर्षात आणण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयेमधील क्रमांक 11 नुसार किफायतशीर गृहनिर्माण क्षेत्राचा विकास झाल्यास एकूण मानवी विकासातील 17 पैकी 14 निर्देशावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. यासाठी घरकुलांच्या कामांची प्रगती फक्त संख्यात्मक न राहता गुणात्मक रहावी. नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणून लाभार्थ्यांना सर्व सुविधायुक्त असे घरकुल उपलब्ध करून द्यावे. नैसर्गिक आपत्तीस सक्षमपणे सामोरे जाणारे घरकुल बांधण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे ध्येय "महा आवास अभियान-ग्रामीण' सुरु करण्यामागे शासनाचे आहे.  या महा आवास अभियान अंतर्गत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यानी 15 डिसेंबर हा दिवस जिल्ह्यात "घरकुल मंजूरी दिन' म्हणून साजरा करण्यात आला होता. जिल्ह्याला एकूण 1 हजार 924 घरकुलांचे उद्दिष्ट आहे. यातील यापूर्वी जिल्ह्यात 336 प्रस्तावांना पहिली मंजूरी देण्यात आली होती. त्यानंतर 22 डिसेबर रोजी 158 घरकुलांची मंजूरी वाढली. त्यामुळे मंजूरी मिळालेल्या घरकुलांची एकूण संख्या 494 झाली होती. आता 75 नवीन मंजूरी मिळाल्याने ही संख्या 569 झाली आहे.  काही प्रस्ताव प्रलंबित  अजुन 1 हजार 335 प्रस्तावांना मंजूरी शिल्लक आहे. त्यातील 150 प्रस्ताव तालुकास्तरावरुन प्राप्त झाले आहेत. ते लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मंजूरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. उर्वरित एक हजार 355 घरकुलांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती दिपाली पाटील यांनी दिली.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3b0AUNK
Read More
अखेर 11 वर्षांनी घर झाले प्रकाशमय

कुडाळ (सिंधुदुर्ग) - गेली अकरा वर्षे वीजेपासून वंचित असलेल्या वालावल येथील चौधरी कुटुंबाचा प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पाठपुराव्यामुळे सुटला. या कुटुंबाला वीजजोडणी मिळाली आहे. वालावल येथील श्रीधर चौधरी कुटुंबीय गेली अकरा वर्षे घरातील विजेपासुन वंचित होती.

अनेक वर्षांपासून ते हा प्रश्‍न घेऊन तालुक्‍यातील अनेक व्यक्तींच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करत होते; मात्र काही कारणास्तव गेली अकरा वर्षे चौधरी कुटुंब मंद रॉकेलच्या दिव्यावर दिवसरात्र काढत असत. त्यात त्या कुटुंबाची दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलीने कसेबसे आपले शैक्षणिक अद्यापन पूर्ण केले; मात्र तिचे कुटुंबीय सतत मानसिक तणावपूर्ण वातावरणात गेली अकरा वर्षे अंधकारमय जीवन जगत होती.

दोन दिवसांपूर्वी ही हकीकत वालावल येथील स्थानिक कार्यकर्ते दाजी कावले, सचिन पाटकर, प्रशांत पाताडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून चौधरी कुटुंबातील मुख्य समस्यांची वस्तुस्थिती मांडली. श्री. सामंत यांनी या कुटुंबांचा विजेचा प्रश्‍न तातडीने सोडवण्याचा निर्धार केला आणि 29 डिसेंबरला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करताना त्या घरात सौर ऊर्जेवर चालणारा पूर्ण लाईट सेट पुरवून चौधरी कुटुंबाचा अकरा वर्षे सुरू असलेला अंधकारमय प्रवास समाप्त केला. प्रत्यक्ष हा क्षण बघून त्या कुटुंबाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. 

सहकार्याची आठवण 
श्री. सामंत यांनी केलेल्या या सहकार्याचे आमचे कुटुंब सदैव आठवण ठेवेलच; पण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा सर्व सामान्यांपर्यंत जाऊन गोरगरीब जनतेच्या प्रश्‍नांची दखल घेऊन जिल्ह्यात काम करत आहे, हे यावरून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. चौधरी कुटुंबियांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, जिल्हाध्यक्ष सामंत व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी सचिन पाटकर, प्रशांत पाताडे, भिकाजी वालावलकर, दाजी कावले आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अखेर 11 वर्षांनी घर झाले प्रकाशमय कुडाळ (सिंधुदुर्ग) - गेली अकरा वर्षे वीजेपासून वंचित असलेल्या वालावल येथील चौधरी कुटुंबाचा प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पाठपुराव्यामुळे सुटला. या कुटुंबाला वीजजोडणी मिळाली आहे. वालावल येथील श्रीधर चौधरी कुटुंबीय गेली अकरा वर्षे घरातील विजेपासुन वंचित होती. अनेक वर्षांपासून ते हा प्रश्‍न घेऊन तालुक्‍यातील अनेक व्यक्तींच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करत होते; मात्र काही कारणास्तव गेली अकरा वर्षे चौधरी कुटुंब मंद रॉकेलच्या दिव्यावर दिवसरात्र काढत असत. त्यात त्या कुटुंबाची दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलीने कसेबसे आपले शैक्षणिक अद्यापन पूर्ण केले; मात्र तिचे कुटुंबीय सतत मानसिक तणावपूर्ण वातावरणात गेली अकरा वर्षे अंधकारमय जीवन जगत होती. दोन दिवसांपूर्वी ही हकीकत वालावल येथील स्थानिक कार्यकर्ते दाजी कावले, सचिन पाटकर, प्रशांत पाताडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून चौधरी कुटुंबातील मुख्य समस्यांची वस्तुस्थिती मांडली. श्री. सामंत यांनी या कुटुंबांचा विजेचा प्रश्‍न तातडीने सोडवण्याचा निर्धार केला आणि 29 डिसेंबरला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करताना त्या घरात सौर ऊर्जेवर चालणारा पूर्ण लाईट सेट पुरवून चौधरी कुटुंबाचा अकरा वर्षे सुरू असलेला अंधकारमय प्रवास समाप्त केला. प्रत्यक्ष हा क्षण बघून त्या कुटुंबाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.  सहकार्याची आठवण  श्री. सामंत यांनी केलेल्या या सहकार्याचे आमचे कुटुंब सदैव आठवण ठेवेलच; पण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा सर्व सामान्यांपर्यंत जाऊन गोरगरीब जनतेच्या प्रश्‍नांची दखल घेऊन जिल्ह्यात काम करत आहे, हे यावरून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. चौधरी कुटुंबियांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, जिल्हाध्यक्ष सामंत व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी सचिन पाटकर, प्रशांत पाताडे, भिकाजी वालावलकर, दाजी कावले आदी पदाधिकारी उपस्थित होते.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Mimdes
Read More
मरणासन्न बागेला `चांदा- बांदा`मुळे नवसंजीवनी

कळणे (सिंधुदुर्ग) - चांदा ते बांदा योजनेचा राजकीय वाद काहीही रंगू दे; पण आडाळी कोसमवाडीतील मरणासन्न असलेल्या नारळी-सुपारीच्या बागेला या योजनेमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतील योजनेतून येथील शेतपाटाला निधी मिळाला. लॉकडाउन काळात नोकरी गमावलेल्या तरुणांना शेतपाटाच्या बांधकामातून रोजगारही मिळाला. 

चांदा ते बांदा योजना गेली काही वर्षे अनेक कारणांनी चर्चेत आहे. या योजनेसाठी "मायक्रो प्लॅनिंग' हा शब्द प्रशासनात खुपच परवलीचा झाला होता. या सूक्ष्म नियोजनातूनच उपलब्ध नैसर्गिक साधनांचे उन्नयन करणे व रोजगार संधी वाढवणे हा योजनेचा उद्देश. आता जिल्ह्यात तो किती साध्य झाला ते सोडा; पण आडाळी ग्रामपंचायत सदस्य पराग गावकर यांनी मात्र लघु सिंचनाच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करून मरणासन्न नारळ-सुपारीच्या बागेला नवसंजीवनी दिली आहे. आडाळी दडसखल बंधाऱ्याच्या पाण्यावर गेली 70 हून अधिक वर्षे आडाळी कोसमवाडी आणि फोंडिये येथील शेती-बागायती बहरत आली; पण गेली काही वर्षे अनेक कारणांमुळे शेती थांबली आणि बंधाऱ्याच्या पाण्याचा प्रवाहही थांबला.

शेतपाट नसल्याने तर गेल्या काही वर्षात बागायतीही उन्हाळ्यातील पाण्यापासून दुरावली. अखेर या प्रश्‍नावर उत्तर सापडले ते माजी पालकमंत्री केसरकर यांच्या संकल्पनेतील चांदा ते बांदा योजनेत. या योजनेतून या शेतपाटासाठी निधी मंजूर झाला. ग्रामपंचायत सदस्य गावकर यांनी या कामाच्या मंजुरीसाठी मेहनत घेतली. सरपंच ऊल्का गावकर आणि ग्रामसेवक नम्रता राणे यांची त्यांना साथ मिळाली. लघु पाटबंधाराचे अभियंता वसंत मोहिते, उपअभियंता आदन्नवर यांनीही सकारत्मक भूमिका पार पाडली. त्यामुळे पक्का शेतपटाचे काम मार्गी लागले. 

स्थानिकांना रोजगार 
शासकीय योजनेतून जी विकास कामे केली जातात, त्याचा एक हेतू रोजगार निर्मिती असा असतो. त्यातून विकासकामांचा थेट फायदा स्थानिकांना मिळणे अपेक्षित असते; परंतु ही विकासकामे करणारे परप्रांतीय मजूर असतात असे चित्र आसपास दिसते; मात्र लॉकडाऊन काळात हे मजुर उपलब्ध नव्हते. स्थानिक स्तरावरही अनेकांचा रोजगार गेला. त्यावेळी गोव्यातील रोजगार गमावलेले उच्चशिक्षित तरुण व स्थानिक मजूर एकत्र येत शेतपाटाची कामं केली. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला. 

शेतकऱ्यांची श्रमदानातून कामे 
पक्का शेतपाट झाल्याने लाभार्थी शेतकऱ्यांनी श्रमदानातून बांधबंधिस्ती केली आणि पाटातून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. त्यामुळे गेली काही वर्षे उन्हाळ्यात पाण्याविना कोमेजून जाणाऱ्या बागायतीला आता नवसंजीवनी मिळाली आहे. कुशल नेतृत्वाने एखाद्या योजनेची अंमलबजावणी केल्यास रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन शास्वत विकासाची वाटही दृष्टीक्षेपात येते. याचे उत्तम उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मरणासन्न बागेला `चांदा- बांदा`मुळे नवसंजीवनी कळणे (सिंधुदुर्ग) - चांदा ते बांदा योजनेचा राजकीय वाद काहीही रंगू दे; पण आडाळी कोसमवाडीतील मरणासन्न असलेल्या नारळी-सुपारीच्या बागेला या योजनेमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतील योजनेतून येथील शेतपाटाला निधी मिळाला. लॉकडाउन काळात नोकरी गमावलेल्या तरुणांना शेतपाटाच्या बांधकामातून रोजगारही मिळाला.  चांदा ते बांदा योजना गेली काही वर्षे अनेक कारणांनी चर्चेत आहे. या योजनेसाठी "मायक्रो प्लॅनिंग' हा शब्द प्रशासनात खुपच परवलीचा झाला होता. या सूक्ष्म नियोजनातूनच उपलब्ध नैसर्गिक साधनांचे उन्नयन करणे व रोजगार संधी वाढवणे हा योजनेचा उद्देश. आता जिल्ह्यात तो किती साध्य झाला ते सोडा; पण आडाळी ग्रामपंचायत सदस्य पराग गावकर यांनी मात्र लघु सिंचनाच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करून मरणासन्न नारळ-सुपारीच्या बागेला नवसंजीवनी दिली आहे. आडाळी दडसखल बंधाऱ्याच्या पाण्यावर गेली 70 हून अधिक वर्षे आडाळी कोसमवाडी आणि फोंडिये येथील शेती-बागायती बहरत आली; पण गेली काही वर्षे अनेक कारणांमुळे शेती थांबली आणि बंधाऱ्याच्या पाण्याचा प्रवाहही थांबला. शेतपाट नसल्याने तर गेल्या काही वर्षात बागायतीही उन्हाळ्यातील पाण्यापासून दुरावली. अखेर या प्रश्‍नावर उत्तर सापडले ते माजी पालकमंत्री केसरकर यांच्या संकल्पनेतील चांदा ते बांदा योजनेत. या योजनेतून या शेतपाटासाठी निधी मंजूर झाला. ग्रामपंचायत सदस्य गावकर यांनी या कामाच्या मंजुरीसाठी मेहनत घेतली. सरपंच ऊल्का गावकर आणि ग्रामसेवक नम्रता राणे यांची त्यांना साथ मिळाली. लघु पाटबंधाराचे अभियंता वसंत मोहिते, उपअभियंता आदन्नवर यांनीही सकारत्मक भूमिका पार पाडली. त्यामुळे पक्का शेतपटाचे काम मार्गी लागले.  स्थानिकांना रोजगार  शासकीय योजनेतून जी विकास कामे केली जातात, त्याचा एक हेतू रोजगार निर्मिती असा असतो. त्यातून विकासकामांचा थेट फायदा स्थानिकांना मिळणे अपेक्षित असते; परंतु ही विकासकामे करणारे परप्रांतीय मजूर असतात असे चित्र आसपास दिसते; मात्र लॉकडाऊन काळात हे मजुर उपलब्ध नव्हते. स्थानिक स्तरावरही अनेकांचा रोजगार गेला. त्यावेळी गोव्यातील रोजगार गमावलेले उच्चशिक्षित तरुण व स्थानिक मजूर एकत्र येत शेतपाटाची कामं केली. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला.  शेतकऱ्यांची श्रमदानातून कामे  पक्का शेतपाट झाल्याने लाभार्थी शेतकऱ्यांनी श्रमदानातून बांधबंधिस्ती केली आणि पाटातून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. त्यामुळे गेली काही वर्षे उन्हाळ्यात पाण्याविना कोमेजून जाणाऱ्या बागायतीला आता नवसंजीवनी मिळाली आहे. कुशल नेतृत्वाने एखाद्या योजनेची अंमलबजावणी केल्यास रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन शास्वत विकासाची वाटही दृष्टीक्षेपात येते. याचे उत्तम उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3o8rm6T
Read More
Govt Jobs : भारतीय तटरक्षक दलात ३५८ पदांची भरती; दहावी पास उमेदवारांनो करा अर्ज

भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) नाविकांच्या 358 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती नाविक (जनरल ड्युटी), नाविक (डोमेस्टिक) आणि यांत्रिक या पदांसाठी केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार 19 जानेवारी 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. या तारखेनंतर आलेले फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पदांची संख्या - 358

नाविक (जनरल ड्युटी) - 260
नाविक (डोमेस्टिक) - 50
यांत्रिक - 48

- Maha Metro Jobs: महा मेट्रोमध्ये विविध पदांची भरती; पगार १.२५ लाखापर्यंत!​

पात्रता -

कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थांकडून 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण असलेला कोणताही उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना तपासू शकता.

वयोमर्यादा -

या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार 01 एप्रिल 2021 पर्यंत 18 ते 22 वर्षे वयोगटातील असावेत. म्हणजेच, उमेदवारांचा जन्म 01 एप्रिल 1999 ते 31 मार्च 2003 दरम्यान झालेला असावा. अनुसूचित जाती, जमातीमधील उमेदवारांना जास्तीत जास्त वयोमर्यादा पाच वर्षे आणि ओबीसीमधील उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे.

- Govt Jobs: गुप्तचर विभागात मोठी भरती; गृह मंत्रालयाने मागविले अर्ज​

वेतन - 

निवड झालेल्या उमेदवाराला 7 व्या सीपीसीच्या लेव्हल-3 नुसार दरमहा 21,700 रुपये वेतन देण्यात येईल.

अर्जाची फी - 

जनरल - 250 रुपये
राखीव प्रवर्ग - शुल्क नाही

अर्ज कसा करावा -

भारतीय तटरक्षक दलाच्या http://www.joinindiancoastguard.gov.in/ या संकेतस्थळाद्वारे 05 जानेवारी ते 19 जानेवारी 2020 या कालावधीत उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावेत.

- VSSC Recruitment 2021: ISROच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ८० जागांसाठी भरती​

निवड प्रक्रिया -

या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि शारीरिक तंदुरुस्ती चाचणीच्या आधारे केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Govt Jobs : भारतीय तटरक्षक दलात ३५८ पदांची भरती; दहावी पास उमेदवारांनो करा अर्ज भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) नाविकांच्या 358 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती नाविक (जनरल ड्युटी), नाविक (डोमेस्टिक) आणि यांत्रिक या पदांसाठी केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार 19 जानेवारी 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. या तारखेनंतर आलेले फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. पदांची संख्या - 358 नाविक (जनरल ड्युटी) - 260 नाविक (डोमेस्टिक) - 50 यांत्रिक - 48 - Maha Metro Jobs: महा मेट्रोमध्ये विविध पदांची भरती; पगार १.२५ लाखापर्यंत!​ पात्रता - कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थांकडून 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण असलेला कोणताही उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना तपासू शकता. वयोमर्यादा - या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार 01 एप्रिल 2021 पर्यंत 18 ते 22 वर्षे वयोगटातील असावेत. म्हणजेच, उमेदवारांचा जन्म 01 एप्रिल 1999 ते 31 मार्च 2003 दरम्यान झालेला असावा. अनुसूचित जाती, जमातीमधील उमेदवारांना जास्तीत जास्त वयोमर्यादा पाच वर्षे आणि ओबीसीमधील उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे. - Govt Jobs: गुप्तचर विभागात मोठी भरती; गृह मंत्रालयाने मागविले अर्ज​ वेतन -  निवड झालेल्या उमेदवाराला 7 व्या सीपीसीच्या लेव्हल-3 नुसार दरमहा 21,700 रुपये वेतन देण्यात येईल. अर्जाची फी -  जनरल - 250 रुपये राखीव प्रवर्ग - शुल्क नाही अर्ज कसा करावा - भारतीय तटरक्षक दलाच्या http://www.joinindiancoastguard.gov.in/ या संकेतस्थळाद्वारे 05 जानेवारी ते 19 जानेवारी 2020 या कालावधीत उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावेत. - VSSC Recruitment 2021: ISROच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ८० जागांसाठी भरती​ निवड प्रक्रिया - या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि शारीरिक तंदुरुस्ती चाचणीच्या आधारे केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2L8nnZw
Read More
सावंतवाडीत चार वर्षांत 46 अपघाती मृत्यू

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गेल्या चार वर्षांत भरधाव वेगाने दुचाकी व मोटार तसेच चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघातात येथील तालुक्‍यात आतापर्यंत तब्बल 46 जणांना जीव गमवावा लागला आहे तर तब्बल 87 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. गेल्या काही वर्षांतील ही आकडेवारी असून चुकीच्या पद्धतीने नियम मोडून भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे असे प्रकार घडले आहेत. खड्डेमय रस्ते, पालकांचे दुर्लक्ष व जनजागृतीचा अभाव ही कारणे यामागे ठळक दिसून येत आहेत. 

वाहतूक पोलिसांकडून रस्ता सुरक्षा मोहीम आखण्यात येते. यावेळी पोलिसांकडून वेळोवेळी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, भरधाव वेगाने गाडी हाकू नये, कुटुंबाच्या सुरक्षा सुरक्षिततेसाठी वाहन चालविताना घाई करू नये, विनाकारण ओव्हरटेक करू नये, अशा प्रकारच्या सूचना केल्या जातात. रस्त्यावर निरनिराळ्या ठिकाणी अपघात होऊ नये, यासाठी काही बोधवाक्‍यही दिली जातात; मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. जनजागृती केली तरीही वाहतुकीच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. वाहन हाकताना मोबाईलचा वापर होतो; मात्र जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे प्रकार वाढतच राहतात. 

"अति घाई संकटात नेई' या उक्तीनुसार गेल्या काही वर्षांत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. 2017 आणि 2018 मध्ये येथील तालुक्‍यात तब्बल 30 जणांना दोन वर्षांत जीव गमवावा लागला आहे. यातील बरेच अपघात वाहन चालविताना केलेल्या दुर्लक्षामुळे व चुकीमुळे झाले आहेत. यासोबत भरधाव वेगाने गाडी हाकल्यामुळे झालेले आहेत. वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी वाहन चालविताना घ्यावयाची काळजी याबाबत सूचना दिल्या जातात. गेल्या काही कालावधीत अल्पवयीन मुलांमध्ये वाहने चालविण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे.

अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांकडून कोणत्या प्रकारची सूचना दिली जात नाही. आपला मुलगा वाहतुकीचे नियम मोडताना, वाहनही चुकीच्या पद्धतीने चालवतो की नाही, याबाबतची खातरजमा पालकांकडून होत नाही. त्यामुळे अल्पवयीन मुले अपघातात बळी पडतात. अनेकजण भरधाव वेगाने गाडी चालवतात परिणामी अपघातांना बळी पडावे लागते. 2019 मध्ये तालुक्‍यात मात्र अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या कमी होती. यावर्षी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची संख्या मात्र तब्बल 21 एवढी होती. 2018 हे वर्ष तालुक्‍याला खूपच वाईट दिवसाचे होते. या वर्षात तब्बल 19 जणांना आपला अपघातात बळी द्यावा लागला. याच वर्षी 23 जण अपघातातून गंभीर दुखापती सामोरे गेले. 

तालुक्‍यातील अपघात असे 
वर्ष*मृत्यू*गंभीर*किरकोळ 
2017*11*21*13 
2018*19*23*07 
2019*7*23*21 
2020*9*20*4 

रस्त्यांची सुरक्षा गरजेची 
तालुक्‍यातील रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे. त्यातच अतिवेगाने गाडी हाकणाराची संख्या कमी नाही. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसून अपघाताला सामोरे जावे लागते. काहीवेळा या खड्ड्यांमुळे अनेकांना जीवही गमवावा लागतो. तालुक्‍याला आतापर्यंत ग्रामीण भागात खड्ड्यांमुळे जीव जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रस्त्यांची सुरक्षा हे तेवढेच गरजेचे आहे. 

पालकांचे मार्गदर्शन गरजेचे 
अल्पवयीन वाहन करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरी भागात वाहतूक परवाना तपासला जात असल्याने अशा अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाई केली जाते. आता ग्रामीण भागात वाहतूक परवाना तपासण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याने अल्पवयीन मुले सुसाट वेगाने वाहतुकीचे नियम तोडून गाडी हाकतात. अशावेळी ते स्वतःच्या दुखापतीसह दुसऱ्यांच्या दुखापतीला ही कारणीभूत ठरतात. त्यामुळे ग्रामीण भागातील अल्पवयीन वाहनधारकांवर आळा बसण्यासाठी पालकांकडून समज देणे आवश्‍यक आहे. 

चुकीच्या पद्धतीने वाहने हाकून नयेत. वाहने हाकताना हेल्मेटचा आवर्जून वापर करावा. अनेक तरुण वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज अपघात होत आहेत. त्यामुळे पालकांनीही पाल्याकडे लक्ष द्यावे. अल्पवयीन मुलांजवळ वाहने देऊ नयेत. 
- शशिकांत खोत, पोलिस निरीक्षक, सावंतवाडी 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सावंतवाडीत चार वर्षांत 46 अपघाती मृत्यू सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गेल्या चार वर्षांत भरधाव वेगाने दुचाकी व मोटार तसेच चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघातात येथील तालुक्‍यात आतापर्यंत तब्बल 46 जणांना जीव गमवावा लागला आहे तर तब्बल 87 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. गेल्या काही वर्षांतील ही आकडेवारी असून चुकीच्या पद्धतीने नियम मोडून भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे असे प्रकार घडले आहेत. खड्डेमय रस्ते, पालकांचे दुर्लक्ष व जनजागृतीचा अभाव ही कारणे यामागे ठळक दिसून येत आहेत.  वाहतूक पोलिसांकडून रस्ता सुरक्षा मोहीम आखण्यात येते. यावेळी पोलिसांकडून वेळोवेळी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, भरधाव वेगाने गाडी हाकू नये, कुटुंबाच्या सुरक्षा सुरक्षिततेसाठी वाहन चालविताना घाई करू नये, विनाकारण ओव्हरटेक करू नये, अशा प्रकारच्या सूचना केल्या जातात. रस्त्यावर निरनिराळ्या ठिकाणी अपघात होऊ नये, यासाठी काही बोधवाक्‍यही दिली जातात; मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. जनजागृती केली तरीही वाहतुकीच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. वाहन हाकताना मोबाईलचा वापर होतो; मात्र जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे प्रकार वाढतच राहतात.  "अति घाई संकटात नेई' या उक्तीनुसार गेल्या काही वर्षांत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. 2017 आणि 2018 मध्ये येथील तालुक्‍यात तब्बल 30 जणांना दोन वर्षांत जीव गमवावा लागला आहे. यातील बरेच अपघात वाहन चालविताना केलेल्या दुर्लक्षामुळे व चुकीमुळे झाले आहेत. यासोबत भरधाव वेगाने गाडी हाकल्यामुळे झालेले आहेत. वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी वाहन चालविताना घ्यावयाची काळजी याबाबत सूचना दिल्या जातात. गेल्या काही कालावधीत अल्पवयीन मुलांमध्ये वाहने चालविण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांकडून कोणत्या प्रकारची सूचना दिली जात नाही. आपला मुलगा वाहतुकीचे नियम मोडताना, वाहनही चुकीच्या पद्धतीने चालवतो की नाही, याबाबतची खातरजमा पालकांकडून होत नाही. त्यामुळे अल्पवयीन मुले अपघातात बळी पडतात. अनेकजण भरधाव वेगाने गाडी चालवतात परिणामी अपघातांना बळी पडावे लागते. 2019 मध्ये तालुक्‍यात मात्र अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या कमी होती. यावर्षी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची संख्या मात्र तब्बल 21 एवढी होती. 2018 हे वर्ष तालुक्‍याला खूपच वाईट दिवसाचे होते. या वर्षात तब्बल 19 जणांना आपला अपघातात बळी द्यावा लागला. याच वर्षी 23 जण अपघातातून गंभीर दुखापती सामोरे गेले.  तालुक्‍यातील अपघात असे  वर्ष*मृत्यू*गंभीर*किरकोळ  2017*11*21*13  2018*19*23*07  2019*7*23*21  2020*9*20*4  रस्त्यांची सुरक्षा गरजेची  तालुक्‍यातील रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे. त्यातच अतिवेगाने गाडी हाकणाराची संख्या कमी नाही. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसून अपघाताला सामोरे जावे लागते. काहीवेळा या खड्ड्यांमुळे अनेकांना जीवही गमवावा लागतो. तालुक्‍याला आतापर्यंत ग्रामीण भागात खड्ड्यांमुळे जीव जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रस्त्यांची सुरक्षा हे तेवढेच गरजेचे आहे.  पालकांचे मार्गदर्शन गरजेचे  अल्पवयीन वाहन करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरी भागात वाहतूक परवाना तपासला जात असल्याने अशा अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाई केली जाते. आता ग्रामीण भागात वाहतूक परवाना तपासण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याने अल्पवयीन मुले सुसाट वेगाने वाहतुकीचे नियम तोडून गाडी हाकतात. अशावेळी ते स्वतःच्या दुखापतीसह दुसऱ्यांच्या दुखापतीला ही कारणीभूत ठरतात. त्यामुळे ग्रामीण भागातील अल्पवयीन वाहनधारकांवर आळा बसण्यासाठी पालकांकडून समज देणे आवश्‍यक आहे.  चुकीच्या पद्धतीने वाहने हाकून नयेत. वाहने हाकताना हेल्मेटचा आवर्जून वापर करावा. अनेक तरुण वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज अपघात होत आहेत. त्यामुळे पालकांनीही पाल्याकडे लक्ष द्यावे. अल्पवयीन मुलांजवळ वाहने देऊ नयेत.  - शशिकांत खोत, पोलिस निरीक्षक, सावंतवाडी  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/350OCMJ
Read More
पर्यावरणपुरक छंद..! बांबूपासून आकर्षक कलाकृती

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - बांबूपासून पर्यावरणपुरक आणि आकर्षक वस्तू बनविण्याचा छंद नाधवडे सरदारवाडी येथील नंदकुमार सावंत यांनी जपला आहे. वस्तू बनविण्याचे कोणतेही प्रशिक्षण त्यांनी घेतलेले नाही. तरीही निव्वळ अनुभवातून एखाद्या कुशल कारागिराप्रमाणे ते बांबूच्या एकापेक्षा एक कलाकृती साकारत आहेत. 

प्रत्येक माणसाला कोणता ना कोणता छंद असतो. कुणाला एखाद्या खेळाचा तर कुणाला शेतीचा. कुणाला समाजकारणाचा तर कुणाला राजकारणासह विविध छंद असतात; परंतु नाधवडे सरदारवाडी येथील श्री. सावंत यांनी बांबुपासून वेगवेगळ्या वस्तुरूपी आकर्षक कलाकृती साकारण्याचा छंद गेल्या काही वर्षांपासून जपला आहे. श्री. सावंत यांची अनेक वर्ष मुंबईत गेली. काही वर्षापूर्वी ते गावी नाधवडे येथे आले.

गावातील शेतीसोबत समाजकारण करण्याची त्यांना आवड आहे. बांबुपासून पांरपरिक टोपल्या, सुप, भात ठेवण्यासाठी तटे, कणगुल, डाळी अशा वस्तू अनेक लोक बनवितात; परंतु त्याच बांबुपासून आपण इतर वस्तू देखील बनवू शकतो, अशी कल्पना त्यांना पाच सहा वर्षापुर्वी सुचली. कल्पना सुचल्यानंतर ते थांबले नाहीत. त्यांनी ती कल्पना कृतीत उतरविण्यास सुरूवात केली.

या विषयात पूर्णतः नवखे असलेल्या श्री. सावंत यांनी सुरूवातीला एक साधीशी वस्तू बनविण्याचा प्रयत्न केला; परंतु तो बांबुपासून काढलेले साहित्य जोडताना त्यांना अडचण येवू लागली. त्यामुळे त्यांनी बांबू तोडून त्याचे उपयोगात येतील असे तुकडे तुकडे करून काही दिवस पाण्यात टाकुन ठेवले. त्यानंतर पुन्हा वस्तू बनविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले. बांबू टिकण्यासाठी ही प्रकिया उपयोगी पडते हे देखील त्यांच्या लक्षात आले. दिवाळीला प्रत्येक जण आकाशकंदील लावत असतो; परंतु त्यांनी बांबुपासून इको फ्रेंन्डली आकाशकंदील तयार करून लावण्याचा प्रयत्न सुरू केला.

पहिल्याच प्रयत्नात त्यांनी अतिशय उत्तम दर्जाचा आणि सुबक कलाकृतीचा नमुना ठरेल, असा आकाशकंदील तयार केला. त्यामध्ये लाईट लावल्यानंतर त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसू लागले. या यशस्वी प्रयोगानंतर त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. त्यानंतर त्यांनी बांबुपासून घराची प्रतिकृती, बैलगाडी, डोली, विविध आकाराचे ट्रे, गणपतीचे मकर, पेन स्टॅन्ड, पिंजरा आणि त्यामध्ये बांबुपासून बनविलेला पक्षी, होडी, लॅम्प अशा विविध वस्तू बनविण्यास सुरूवात केली. या सर्व वस्तू इको फ्रेंन्डली असल्यामुळे लोकांकडून त्यांच्याकडे मागणी येऊ लागली. कधीही व्यावसायिक विचार न करता माफक दरात ते लग्नातील रूकवाताला लागणारे साहित्य लोकांना तयार करून देऊ लागले.

याशिवाय गणेश चतुर्थीला बांबुपासून तयार केलेले मकर ते मागणीनुसार पुरवितात. त्यांनी बनविलेल्या पर्यावरणपुरक मकर मनमोहक ठरलेली आहे. त्यांनी बनविलेल्या काही वस्तू कृषी विभागाच्या कृषी प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. बांबुपासून घरगुती वापरांसह अनेक शोभिवंत वस्तू सहज आणि साध्या पध्दतीने बनविता येऊ शकतात. सध्या संपूर्ण जग प्लास्टीक मुक्तीच्या प्रयत्नात आहे. अशा कालखंडात श्री. सावंत यांचा पर्यावरण पुरक वस्तू बनविण्याचा छंद खारीचा वाटा नक्कीच उचलु शकेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. 

कोकणात बांबू सहज उपलब्ध 
कोकणात बांबू सहजपणे उपलब्ध होतो. पूर्वी घरातील बहुतांशी वस्तू बांबुपासुन बनविलेल्या असत; परंतु कालानुरूप त्या वस्तूची जागा प्लास्टीक, फायबरच्या वस्तूंनी घेतली आहे; परंतु त्याचे दुष्पपरिणाम आता दिसू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बांबूच्या वस्तूचे महत्व अधोरेखीत होऊ लागले आहे. बांबुपासून बनविलेल्या वस्तू पर्यावरणपुरक तर आहेतच; पण त्यापेक्षा त्या सहज उपलब्ध होणाऱ्या आहेत. याशिवाय बांबूपासूनच्या वस्तू विक्रीत वाढ आणि बांबु व्यवसाय वाढल्यास त्याचा शेतकऱ्यांनाच फायदा होईल. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पर्यावरणपुरक छंद..! बांबूपासून आकर्षक कलाकृती वैभववाडी (सिंधुदुर्ग) - बांबूपासून पर्यावरणपुरक आणि आकर्षक वस्तू बनविण्याचा छंद नाधवडे सरदारवाडी येथील नंदकुमार सावंत यांनी जपला आहे. वस्तू बनविण्याचे कोणतेही प्रशिक्षण त्यांनी घेतलेले नाही. तरीही निव्वळ अनुभवातून एखाद्या कुशल कारागिराप्रमाणे ते बांबूच्या एकापेक्षा एक कलाकृती साकारत आहेत.  प्रत्येक माणसाला कोणता ना कोणता छंद असतो. कुणाला एखाद्या खेळाचा तर कुणाला शेतीचा. कुणाला समाजकारणाचा तर कुणाला राजकारणासह विविध छंद असतात; परंतु नाधवडे सरदारवाडी येथील श्री. सावंत यांनी बांबुपासून वेगवेगळ्या वस्तुरूपी आकर्षक कलाकृती साकारण्याचा छंद गेल्या काही वर्षांपासून जपला आहे. श्री. सावंत यांची अनेक वर्ष मुंबईत गेली. काही वर्षापूर्वी ते गावी नाधवडे येथे आले. गावातील शेतीसोबत समाजकारण करण्याची त्यांना आवड आहे. बांबुपासून पांरपरिक टोपल्या, सुप, भात ठेवण्यासाठी तटे, कणगुल, डाळी अशा वस्तू अनेक लोक बनवितात; परंतु त्याच बांबुपासून आपण इतर वस्तू देखील बनवू शकतो, अशी कल्पना त्यांना पाच सहा वर्षापुर्वी सुचली. कल्पना सुचल्यानंतर ते थांबले नाहीत. त्यांनी ती कल्पना कृतीत उतरविण्यास सुरूवात केली. या विषयात पूर्णतः नवखे असलेल्या श्री. सावंत यांनी सुरूवातीला एक साधीशी वस्तू बनविण्याचा प्रयत्न केला; परंतु तो बांबुपासून काढलेले साहित्य जोडताना त्यांना अडचण येवू लागली. त्यामुळे त्यांनी बांबू तोडून त्याचे उपयोगात येतील असे तुकडे तुकडे करून काही दिवस पाण्यात टाकुन ठेवले. त्यानंतर पुन्हा वस्तू बनविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले. बांबू टिकण्यासाठी ही प्रकिया उपयोगी पडते हे देखील त्यांच्या लक्षात आले. दिवाळीला प्रत्येक जण आकाशकंदील लावत असतो; परंतु त्यांनी बांबुपासून इको फ्रेंन्डली आकाशकंदील तयार करून लावण्याचा प्रयत्न सुरू केला. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी अतिशय उत्तम दर्जाचा आणि सुबक कलाकृतीचा नमुना ठरेल, असा आकाशकंदील तयार केला. त्यामध्ये लाईट लावल्यानंतर त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसू लागले. या यशस्वी प्रयोगानंतर त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. त्यानंतर त्यांनी बांबुपासून घराची प्रतिकृती, बैलगाडी, डोली, विविध आकाराचे ट्रे, गणपतीचे मकर, पेन स्टॅन्ड, पिंजरा आणि त्यामध्ये बांबुपासून बनविलेला पक्षी, होडी, लॅम्प अशा विविध वस्तू बनविण्यास सुरूवात केली. या सर्व वस्तू इको फ्रेंन्डली असल्यामुळे लोकांकडून त्यांच्याकडे मागणी येऊ लागली. कधीही व्यावसायिक विचार न करता माफक दरात ते लग्नातील रूकवाताला लागणारे साहित्य लोकांना तयार करून देऊ लागले. याशिवाय गणेश चतुर्थीला बांबुपासून तयार केलेले मकर ते मागणीनुसार पुरवितात. त्यांनी बनविलेल्या पर्यावरणपुरक मकर मनमोहक ठरलेली आहे. त्यांनी बनविलेल्या काही वस्तू कृषी विभागाच्या कृषी प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. बांबुपासून घरगुती वापरांसह अनेक शोभिवंत वस्तू सहज आणि साध्या पध्दतीने बनविता येऊ शकतात. सध्या संपूर्ण जग प्लास्टीक मुक्तीच्या प्रयत्नात आहे. अशा कालखंडात श्री. सावंत यांचा पर्यावरण पुरक वस्तू बनविण्याचा छंद खारीचा वाटा नक्कीच उचलु शकेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.  कोकणात बांबू सहज उपलब्ध  कोकणात बांबू सहजपणे उपलब्ध होतो. पूर्वी घरातील बहुतांशी वस्तू बांबुपासुन बनविलेल्या असत; परंतु कालानुरूप त्या वस्तूची जागा प्लास्टीक, फायबरच्या वस्तूंनी घेतली आहे; परंतु त्याचे दुष्पपरिणाम आता दिसू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बांबूच्या वस्तूचे महत्व अधोरेखीत होऊ लागले आहे. बांबुपासून बनविलेल्या वस्तू पर्यावरणपुरक तर आहेतच; पण त्यापेक्षा त्या सहज उपलब्ध होणाऱ्या आहेत. याशिवाय बांबूपासूनच्या वस्तू विक्रीत वाढ आणि बांबु व्यवसाय वाढल्यास त्याचा शेतकऱ्यांनाच फायदा होईल.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38PpxFK
Read More
सिंधुदुर्गात ग्रामपंचायतींसाठीचे 15 अर्ज अवैध 

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जाची छाननी पुर्ण झाली असून 15 अर्ज अवैध ठरले. 1 हजार 535 अर्ज वैध ठरले आहेत. एकूण 226 प्रभागांमध्ये 600 सदस्य जागांसाठी ही निवडणूक होत आहे. 

जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहेत. यात देवगडमधील 23, वैभववाडी 11, मालवण 6, कुडाळ 9, कणकवली 3, वेंगुर्ले 2, दोडामार्ग 3 अशाप्रकारे ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. 30 डिसेंबरला मुदत संपली.

या शेवटच्या दिवशी सर्वाधिक 834 अर्ज दाखल झाले होते. एकूण 1 हजार 550 अर्ज दाखल झाले होते. यात देवगड 405, सावंतवाडी 383, वैभववाडी 236, मालवण 138, कुडाळ 216, कणकवली 50, वेंगुर्ले 55 तर दोडामार्ग 67 अशाप्रकारे अर्ज दाखल झाले होते. 

31 ला झालेल्या छानणीत 15 अर्ज बाद झाले आहेत. कुडाळ तालुक्‍यात 8, वैभववाडी तालुक्‍यात 2 तर देवगड, सावंतवाडी, मालवण, कणकवली आणि दोडामार्ग तालुक्‍यात प्रत्येकी एक अर्ज बाद झाला आहे. वेंगुर्ले तालुक्‍यात एकही अर्ज बाद झालेला नाही. परिणामी देवगड 189 सदस्य 404 अर्ज, सावंतवाडी 119 सदस्य 382 अर्ज, वैभववाडी 103 सदस्य 234 अर्ज, मालवण 54 सदस्य 137 अर्ज, कुडाळ 71 सदस्य 208 अर्ज, कणकवली 21 सदस्य 49 अर्ज, वेंगुर्ले 18 सदस्य 55 अर्ज, दोडामार्ग 25 सदस्य 66 अर्ज रिंगणात राहिले आहेत. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गात ग्रामपंचायतींसाठीचे 15 अर्ज अवैध  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जाची छाननी पुर्ण झाली असून 15 अर्ज अवैध ठरले. 1 हजार 535 अर्ज वैध ठरले आहेत. एकूण 226 प्रभागांमध्ये 600 सदस्य जागांसाठी ही निवडणूक होत आहे.  जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहेत. यात देवगडमधील 23, वैभववाडी 11, मालवण 6, कुडाळ 9, कणकवली 3, वेंगुर्ले 2, दोडामार्ग 3 अशाप्रकारे ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. 30 डिसेंबरला मुदत संपली. या शेवटच्या दिवशी सर्वाधिक 834 अर्ज दाखल झाले होते. एकूण 1 हजार 550 अर्ज दाखल झाले होते. यात देवगड 405, सावंतवाडी 383, वैभववाडी 236, मालवण 138, कुडाळ 216, कणकवली 50, वेंगुर्ले 55 तर दोडामार्ग 67 अशाप्रकारे अर्ज दाखल झाले होते.  31 ला झालेल्या छानणीत 15 अर्ज बाद झाले आहेत. कुडाळ तालुक्‍यात 8, वैभववाडी तालुक्‍यात 2 तर देवगड, सावंतवाडी, मालवण, कणकवली आणि दोडामार्ग तालुक्‍यात प्रत्येकी एक अर्ज बाद झाला आहे. वेंगुर्ले तालुक्‍यात एकही अर्ज बाद झालेला नाही. परिणामी देवगड 189 सदस्य 404 अर्ज, सावंतवाडी 119 सदस्य 382 अर्ज, वैभववाडी 103 सदस्य 234 अर्ज, मालवण 54 सदस्य 137 अर्ज, कुडाळ 71 सदस्य 208 अर्ज, कणकवली 21 सदस्य 49 अर्ज, वेंगुर्ले 18 सदस्य 55 अर्ज, दोडामार्ग 25 सदस्य 66 अर्ज रिंगणात राहिले आहेत.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34ZCsDC
Read More
सातासमुद्रापार वाजतो 'तिच्या' कलेचा डंका; मूकबधिर असूनही जगभरातील प्रेक्षकांना घालते भुरळ  

नागपूर : साधारणपणे जादूगार क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी पाहायला मिळते. क्वचितच प्रसंगी महिला जादूगार बनल्याचे कानावर पडते. शीतल किंमतकर त्यापैकीच एक. मूकबधिर असलेल्या शीतलने देशविदेशांत जादूचे प्रयोग करीत अनेकांची वाहवा मिळविली आहे. उल्लेखनीय म्हणजे ती भारतातील व जगातील पहिली महिला मूकबधिर जादूगार आहे.

दिव्यांगांसाठी प्रेरणादायी ठरलेली शीतल मूकबधिर फूटबॉलपटू आहे. बोखारा (गोधनी) येथील प्रा. विजय बारसे यांच्या क्रीडा विकास संस्थेत ती फुटबॉल खेळते आणि मुलांना शिकवितेही. नियतीने बोलण्याची व ऐकण्याची ताकद हिरावून घेतल्यानंतर शीतलने हार न मानता आयुष्यात ‘कुछ हटके’ करण्याचा निर्णय घेतला. लहानपणी छोट्यामोठ्या ‘ट्रिक्स’ शिकल्यानंतर हळूहळू जादूच्या खेळात तरबेज झाली. 

नक्की वाचा -'त्यांच्या' गाडीचा हॉर्न ऐकताच महामार्गावर जमतात असंख्य कावळे; याला दातृत्व म्हणावं की मैत्री

मूकबधिर असल्यामुळे ती सांकेतिक भाषेतच लोकांशी संवाद साधत जादूचे प्रयोग करते. सुरुवातीला नागपुरात विविध कार्यक्रमांमध्ये प्रयोग सादर केल्यानंतर देशभर प्रयोग होऊ लागले. विदेशातही तिने अनेक प्रयोग केले आहेत. आत्तापर्यंत इंग्लंड (दोनवेळा) व अमेरिकेसह पाच देशांमध्ये प्रयोग केल्याचे तिने सांगितले. तिच्या कलेचे अनेकांनी भरभरून कौतुकही केले.

इंग्लंडमधील एका प्रयोगादरम्यानचा अनुभव सांगताना शीतल म्हणाली, जादूचे प्रयोग सादर करण्यासाठी स्टेजवर गेल्यानंतर अनेकांना नवल वाटले. ही पंचविशीतील मुलगी काय जादू दाखविणार, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. मात्र शीतलचे सफाईदारपणे जादूचे प्रयोग व ‘ट्रिक्स’ पाहून उपस्थित प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर याच ठिकाणी झालेल्या जादूगारांच्या स्पर्धेतही शीतलने आठ भारतीयांमध्ये पहिले स्थान पटकावले. त्यावेळी भारतातील पहिली मूकबधिर जादूगार म्हणून चषक देऊन तिचा सन्मान करण्यात आला. 

अमेरिकेतही तिला पुरस्कार मिळाला. ते अविस्मरणीय क्षण आयुष्यात कदापि विसरू शकत नसल्याचे तिने सांगितले. बारावीपर्यंत शिकलेली शीतल विवाहित आहे. पतीही अंशतः बधिर असून, मुलगा मात्र, सर्वसामान्य मुलासारखा आहे. भाऊसुद्धा मूकबधिर आहे. कुटुंबाचा तिला पूर्ण पाठिंबा आहे. भविष्यात जादूगारीसोबतच फुटबॉल कोचिंगही सुरूच ठेवणार असल्याचे शीतलने सांगितले.

जाणून घ्या - रामदेव बाबा गेले, अंबानी अडचणीत; मिहान, एमआयडीसीत उद्योजकांचा थंड प्रतिसाद

मी मूकबधिर असली तरी मला आयुष्यात वेगळे काहीतरी करायचे होते. त्यामुळेच मी जादूगार होण्याचा निर्णय घेतला. माझ्या कलेची देशविदेशांत स्तुती होत आहे, याचा मला आनंद व अभिमान आहे.
-शीतल किंमतकर, 
मूकबधिर जादूगार

संपादन - अथर्व महांकाळ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सातासमुद्रापार वाजतो 'तिच्या' कलेचा डंका; मूकबधिर असूनही जगभरातील प्रेक्षकांना घालते भुरळ   नागपूर : साधारणपणे जादूगार क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी पाहायला मिळते. क्वचितच प्रसंगी महिला जादूगार बनल्याचे कानावर पडते. शीतल किंमतकर त्यापैकीच एक. मूकबधिर असलेल्या शीतलने देशविदेशांत जादूचे प्रयोग करीत अनेकांची वाहवा मिळविली आहे. उल्लेखनीय म्हणजे ती भारतातील व जगातील पहिली महिला मूकबधिर जादूगार आहे. दिव्यांगांसाठी प्रेरणादायी ठरलेली शीतल मूकबधिर फूटबॉलपटू आहे. बोखारा (गोधनी) येथील प्रा. विजय बारसे यांच्या क्रीडा विकास संस्थेत ती फुटबॉल खेळते आणि मुलांना शिकवितेही. नियतीने बोलण्याची व ऐकण्याची ताकद हिरावून घेतल्यानंतर शीतलने हार न मानता आयुष्यात ‘कुछ हटके’ करण्याचा निर्णय घेतला. लहानपणी छोट्यामोठ्या ‘ट्रिक्स’ शिकल्यानंतर हळूहळू जादूच्या खेळात तरबेज झाली.  नक्की वाचा -'त्यांच्या' गाडीचा हॉर्न ऐकताच महामार्गावर जमतात असंख्य कावळे; याला दातृत्व म्हणावं की मैत्री मूकबधिर असल्यामुळे ती सांकेतिक भाषेतच लोकांशी संवाद साधत जादूचे प्रयोग करते. सुरुवातीला नागपुरात विविध कार्यक्रमांमध्ये प्रयोग सादर केल्यानंतर देशभर प्रयोग होऊ लागले. विदेशातही तिने अनेक प्रयोग केले आहेत. आत्तापर्यंत इंग्लंड (दोनवेळा) व अमेरिकेसह पाच देशांमध्ये प्रयोग केल्याचे तिने सांगितले. तिच्या कलेचे अनेकांनी भरभरून कौतुकही केले. इंग्लंडमधील एका प्रयोगादरम्यानचा अनुभव सांगताना शीतल म्हणाली, जादूचे प्रयोग सादर करण्यासाठी स्टेजवर गेल्यानंतर अनेकांना नवल वाटले. ही पंचविशीतील मुलगी काय जादू दाखविणार, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. मात्र शीतलचे सफाईदारपणे जादूचे प्रयोग व ‘ट्रिक्स’ पाहून उपस्थित प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर याच ठिकाणी झालेल्या जादूगारांच्या स्पर्धेतही शीतलने आठ भारतीयांमध्ये पहिले स्थान पटकावले. त्यावेळी भारतातील पहिली मूकबधिर जादूगार म्हणून चषक देऊन तिचा सन्मान करण्यात आला.  अमेरिकेतही तिला पुरस्कार मिळाला. ते अविस्मरणीय क्षण आयुष्यात कदापि विसरू शकत नसल्याचे तिने सांगितले. बारावीपर्यंत शिकलेली शीतल विवाहित आहे. पतीही अंशतः बधिर असून, मुलगा मात्र, सर्वसामान्य मुलासारखा आहे. भाऊसुद्धा मूकबधिर आहे. कुटुंबाचा तिला पूर्ण पाठिंबा आहे. भविष्यात जादूगारीसोबतच फुटबॉल कोचिंगही सुरूच ठेवणार असल्याचे शीतलने सांगितले. जाणून घ्या - रामदेव बाबा गेले, अंबानी अडचणीत; मिहान, एमआयडीसीत उद्योजकांचा थंड प्रतिसाद मी मूकबधिर असली तरी मला आयुष्यात वेगळे काहीतरी करायचे होते. त्यामुळेच मी जादूगार होण्याचा निर्णय घेतला. माझ्या कलेची देशविदेशांत स्तुती होत आहे, याचा मला आनंद व अभिमान आहे. -शीतल किंमतकर,  मूकबधिर जादूगार संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3o9ciG9
Read More
‘ओएलएक्‍स’ ॲपवर बोगस जाहिराती करून फसवणूक करणाऱ्यांना सायबर पोलिसांनी घातला लगाम

पुणे - जुन्या-नव्या वस्तूंची ऑनलाइन खरेदी-विक्री करणाऱ्या ‘ओएलएक्‍स’ ॲपवर बोगस जाहिराती करून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी लगाम घातला आहे. सायबर पोलिसांनी याबाबत ‘ओएलएक्‍स’ कंपनीला सूचना केल्या. त्यानुसार कंपनीने बोगस जाहिराती करणाऱ्यांना चाप लावला. त्यामुळे अशा फसवणुकीच्या प्रकारांवर नियंत्रण आले आहे. 

‘ओएलएक्‍स’ ॲपवरील त्रुटींचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या घटना काही वर्षांपासून सातत्याने घडत आहेत. त्यावर सायबर पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई केली जात होती. प्रत्यक्षात मात्र ठोस उपाययोजना केली जात नव्हती. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशा घटनांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ‘ओएलएक्‍स’वरून होणाऱ्या फसवणुकीच्या ठिकाणांचा नकाशा तयार केला. त्यांनी हा नकाशा कंपनीच्या दिल्ली येथील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजावून सांगितला आणि काही सूचना केल्या. त्यांनीही तातडीने दखल घेऊन पोलिसांच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे फसवणुकीच्या अर्जांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत १०० ते २०० ने कमी झाल्याचे समाधानकारक चित्र आहे.

चुकीला माफी नाही; 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत 132 जणांवर पुण्यात कारवाई

अशी आहे गुन्ह्याची पद्धत 
सायबर गुन्हेगार ‘ओएलएक्‍स’वर दुचाकी, कार, मोबाईलची जाहिरात टाकून संपर्कासाठी मोबाईल क्रमांक देतात. वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी त्यांना फोन केल्यानंतर ते त्यांना दुसरा मोबाईल क्रमांक पाठवून त्यावर बॅंक खाते किंवा ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगतात. पैसे पाठविल्यानंतर नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते.

पुणेकरांनो, पाणीपुरवठ्यात कपात होण्याची चिन्हे; अजित पवारांनी दिले संकेत

गुन्हेगारांचे आश्रयस्थान
ऑनलाइन फसवणुकीसाठी झारखंडमधील जामतारा जिल्हा सायबर गुन्हेगारांचे आश्रयस्थान समजला जातो. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे व त्यांच्या पथकाने काही महिने अभ्यास करून ‘ओएलएक्‍स’द्वारे होणाऱ्या फसवणुकीची ठिकाणे शोधली. त्यामध्ये त्यांना राजस्थानमधील अल्वर, उत्तर प्रदेशमधील हरमतपूर व हरियानामधील नुहमेवाद ही ठिकाणे आढळली.

महाराष्ट्राच्या पोरींनी इतिहास घडवला; राजपथावर परेडसाठी तिघींची निवड

फसवणूक टाळण्यासाठी काय केले?

मोबाईल क्रमांक कायमस्वरूपी ब्लॉक 

आयडी क्रमांक कायमस्वरूपी ब्लॉक 

जाहिरात टाकण्याच्या ठिकाणचे जीपीएस लोकेशन अपलोड करणे 

जाहिरात टाकण्यासाठी आयडी तयार करताना सेल्फीचे बंधन

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिलेल्या आदेशानुसार, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी काम सुरू आहे. त्याअंतर्गतच काही महिन्यांपासून ‘ओएलएक्‍स फ्रॉड’चा अभ्यास  केला. आमच्या सूचनेप्रमाणे कंपनीने उपाययोजना केल्याने गुन्ह्यांवर काही प्रमाणात नियंत्रण आले आहे.
- राजकुमार वाघचौरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

मला जुनी दुचाकी घ्यायची होती, त्यामुळे मी ‘ओएलएक्‍स’वरील जाहिरातीवरील मोबाईलवर संपर्क केला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने मला दुचाकी देण्याचा बहाणा करून माझी ४० हजार रुपयांची फसवणूक केली. माझ्या तक्रारीची नोंद करतानाच माझ्याबाबत घडलेली घटना इतरांबाबत घडू नये, यासाठी सायबर पोलिसांना विनंती केली होती.
- विजय कांबळे, नोकरदार

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘ओएलएक्‍स’ ॲपवर बोगस जाहिराती करून फसवणूक करणाऱ्यांना सायबर पोलिसांनी घातला लगाम पुणे - जुन्या-नव्या वस्तूंची ऑनलाइन खरेदी-विक्री करणाऱ्या ‘ओएलएक्‍स’ ॲपवर बोगस जाहिराती करून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी लगाम घातला आहे. सायबर पोलिसांनी याबाबत ‘ओएलएक्‍स’ कंपनीला सूचना केल्या. त्यानुसार कंपनीने बोगस जाहिराती करणाऱ्यांना चाप लावला. त्यामुळे अशा फसवणुकीच्या प्रकारांवर नियंत्रण आले आहे.  ‘ओएलएक्‍स’ ॲपवरील त्रुटींचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या घटना काही वर्षांपासून सातत्याने घडत आहेत. त्यावर सायबर पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई केली जात होती. प्रत्यक्षात मात्र ठोस उपाययोजना केली जात नव्हती.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अशा घटनांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ‘ओएलएक्‍स’वरून होणाऱ्या फसवणुकीच्या ठिकाणांचा नकाशा तयार केला. त्यांनी हा नकाशा कंपनीच्या दिल्ली येथील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजावून सांगितला आणि काही सूचना केल्या. त्यांनीही तातडीने दखल घेऊन पोलिसांच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे फसवणुकीच्या अर्जांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत १०० ते २०० ने कमी झाल्याचे समाधानकारक चित्र आहे. चुकीला माफी नाही; 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत 132 जणांवर पुण्यात कारवाई अशी आहे गुन्ह्याची पद्धत  सायबर गुन्हेगार ‘ओएलएक्‍स’वर दुचाकी, कार, मोबाईलची जाहिरात टाकून संपर्कासाठी मोबाईल क्रमांक देतात. वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी त्यांना फोन केल्यानंतर ते त्यांना दुसरा मोबाईल क्रमांक पाठवून त्यावर बॅंक खाते किंवा ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगतात. पैसे पाठविल्यानंतर नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. पुणेकरांनो, पाणीपुरवठ्यात कपात होण्याची चिन्हे; अजित पवारांनी दिले संकेत गुन्हेगारांचे आश्रयस्थान ऑनलाइन फसवणुकीसाठी झारखंडमधील जामतारा जिल्हा सायबर गुन्हेगारांचे आश्रयस्थान समजला जातो. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे व त्यांच्या पथकाने काही महिने अभ्यास करून ‘ओएलएक्‍स’द्वारे होणाऱ्या फसवणुकीची ठिकाणे शोधली. त्यामध्ये त्यांना राजस्थानमधील अल्वर, उत्तर प्रदेशमधील हरमतपूर व हरियानामधील नुहमेवाद ही ठिकाणे आढळली. महाराष्ट्राच्या पोरींनी इतिहास घडवला; राजपथावर परेडसाठी तिघींची निवड फसवणूक टाळण्यासाठी काय केले? मोबाईल क्रमांक कायमस्वरूपी ब्लॉक  आयडी क्रमांक कायमस्वरूपी ब्लॉक  जाहिरात टाकण्याच्या ठिकाणचे जीपीएस लोकेशन अपलोड करणे  जाहिरात टाकण्यासाठी आयडी तयार करताना सेल्फीचे बंधन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिलेल्या आदेशानुसार, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी काम सुरू आहे. त्याअंतर्गतच काही महिन्यांपासून ‘ओएलएक्‍स फ्रॉड’चा अभ्यास  केला. आमच्या सूचनेप्रमाणे कंपनीने उपाययोजना केल्याने गुन्ह्यांवर काही प्रमाणात नियंत्रण आले आहे. - राजकुमार वाघचौरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे मला जुनी दुचाकी घ्यायची होती, त्यामुळे मी ‘ओएलएक्‍स’वरील जाहिरातीवरील मोबाईलवर संपर्क केला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने मला दुचाकी देण्याचा बहाणा करून माझी ४० हजार रुपयांची फसवणूक केली. माझ्या तक्रारीची नोंद करतानाच माझ्याबाबत घडलेली घटना इतरांबाबत घडू नये, यासाठी सायबर पोलिसांना विनंती केली होती. - विजय कांबळे, नोकरदार Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

January 01, 2021 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2KJxmop
Read More