‘ओएलएक्‍स’ ॲपवर बोगस जाहिराती करून फसवणूक करणाऱ्यांना सायबर पोलिसांनी घातला लगाम पुणे - जुन्या-नव्या वस्तूंची ऑनलाइन खरेदी-विक्री करणाऱ्या ‘ओएलएक्‍स’ ॲपवर बोगस जाहिराती करून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी लगाम घातला आहे. सायबर पोलिसांनी याबाबत ‘ओएलएक्‍स’ कंपनीला सूचना केल्या. त्यानुसार कंपनीने बोगस जाहिराती करणाऱ्यांना चाप लावला. त्यामुळे अशा फसवणुकीच्या प्रकारांवर नियंत्रण आले आहे.  ‘ओएलएक्‍स’ ॲपवरील त्रुटींचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या घटना काही वर्षांपासून सातत्याने घडत आहेत. त्यावर सायबर पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई केली जात होती. प्रत्यक्षात मात्र ठोस उपाययोजना केली जात नव्हती.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अशा घटनांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ‘ओएलएक्‍स’वरून होणाऱ्या फसवणुकीच्या ठिकाणांचा नकाशा तयार केला. त्यांनी हा नकाशा कंपनीच्या दिल्ली येथील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजावून सांगितला आणि काही सूचना केल्या. त्यांनीही तातडीने दखल घेऊन पोलिसांच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे फसवणुकीच्या अर्जांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत १०० ते २०० ने कमी झाल्याचे समाधानकारक चित्र आहे. चुकीला माफी नाही; 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत 132 जणांवर पुण्यात कारवाई अशी आहे गुन्ह्याची पद्धत  सायबर गुन्हेगार ‘ओएलएक्‍स’वर दुचाकी, कार, मोबाईलची जाहिरात टाकून संपर्कासाठी मोबाईल क्रमांक देतात. वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी त्यांना फोन केल्यानंतर ते त्यांना दुसरा मोबाईल क्रमांक पाठवून त्यावर बॅंक खाते किंवा ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगतात. पैसे पाठविल्यानंतर नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. पुणेकरांनो, पाणीपुरवठ्यात कपात होण्याची चिन्हे; अजित पवारांनी दिले संकेत गुन्हेगारांचे आश्रयस्थान ऑनलाइन फसवणुकीसाठी झारखंडमधील जामतारा जिल्हा सायबर गुन्हेगारांचे आश्रयस्थान समजला जातो. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे व त्यांच्या पथकाने काही महिने अभ्यास करून ‘ओएलएक्‍स’द्वारे होणाऱ्या फसवणुकीची ठिकाणे शोधली. त्यामध्ये त्यांना राजस्थानमधील अल्वर, उत्तर प्रदेशमधील हरमतपूर व हरियानामधील नुहमेवाद ही ठिकाणे आढळली. महाराष्ट्राच्या पोरींनी इतिहास घडवला; राजपथावर परेडसाठी तिघींची निवड फसवणूक टाळण्यासाठी काय केले? मोबाईल क्रमांक कायमस्वरूपी ब्लॉक  आयडी क्रमांक कायमस्वरूपी ब्लॉक  जाहिरात टाकण्याच्या ठिकाणचे जीपीएस लोकेशन अपलोड करणे  जाहिरात टाकण्यासाठी आयडी तयार करताना सेल्फीचे बंधन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिलेल्या आदेशानुसार, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी काम सुरू आहे. त्याअंतर्गतच काही महिन्यांपासून ‘ओएलएक्‍स फ्रॉड’चा अभ्यास  केला. आमच्या सूचनेप्रमाणे कंपनीने उपाययोजना केल्याने गुन्ह्यांवर काही प्रमाणात नियंत्रण आले आहे. - राजकुमार वाघचौरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे मला जुनी दुचाकी घ्यायची होती, त्यामुळे मी ‘ओएलएक्‍स’वरील जाहिरातीवरील मोबाईलवर संपर्क केला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने मला दुचाकी देण्याचा बहाणा करून माझी ४० हजार रुपयांची फसवणूक केली. माझ्या तक्रारीची नोंद करतानाच माझ्याबाबत घडलेली घटना इतरांबाबत घडू नये, यासाठी सायबर पोलिसांना विनंती केली होती. - विजय कांबळे, नोकरदार Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 1, 2021

‘ओएलएक्‍स’ ॲपवर बोगस जाहिराती करून फसवणूक करणाऱ्यांना सायबर पोलिसांनी घातला लगाम पुणे - जुन्या-नव्या वस्तूंची ऑनलाइन खरेदी-विक्री करणाऱ्या ‘ओएलएक्‍स’ ॲपवर बोगस जाहिराती करून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी लगाम घातला आहे. सायबर पोलिसांनी याबाबत ‘ओएलएक्‍स’ कंपनीला सूचना केल्या. त्यानुसार कंपनीने बोगस जाहिराती करणाऱ्यांना चाप लावला. त्यामुळे अशा फसवणुकीच्या प्रकारांवर नियंत्रण आले आहे.  ‘ओएलएक्‍स’ ॲपवरील त्रुटींचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या घटना काही वर्षांपासून सातत्याने घडत आहेत. त्यावर सायबर पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई केली जात होती. प्रत्यक्षात मात्र ठोस उपाययोजना केली जात नव्हती.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अशा घटनांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ‘ओएलएक्‍स’वरून होणाऱ्या फसवणुकीच्या ठिकाणांचा नकाशा तयार केला. त्यांनी हा नकाशा कंपनीच्या दिल्ली येथील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजावून सांगितला आणि काही सूचना केल्या. त्यांनीही तातडीने दखल घेऊन पोलिसांच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे फसवणुकीच्या अर्जांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत १०० ते २०० ने कमी झाल्याचे समाधानकारक चित्र आहे. चुकीला माफी नाही; 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत 132 जणांवर पुण्यात कारवाई अशी आहे गुन्ह्याची पद्धत  सायबर गुन्हेगार ‘ओएलएक्‍स’वर दुचाकी, कार, मोबाईलची जाहिरात टाकून संपर्कासाठी मोबाईल क्रमांक देतात. वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी त्यांना फोन केल्यानंतर ते त्यांना दुसरा मोबाईल क्रमांक पाठवून त्यावर बॅंक खाते किंवा ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगतात. पैसे पाठविल्यानंतर नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. पुणेकरांनो, पाणीपुरवठ्यात कपात होण्याची चिन्हे; अजित पवारांनी दिले संकेत गुन्हेगारांचे आश्रयस्थान ऑनलाइन फसवणुकीसाठी झारखंडमधील जामतारा जिल्हा सायबर गुन्हेगारांचे आश्रयस्थान समजला जातो. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे व त्यांच्या पथकाने काही महिने अभ्यास करून ‘ओएलएक्‍स’द्वारे होणाऱ्या फसवणुकीची ठिकाणे शोधली. त्यामध्ये त्यांना राजस्थानमधील अल्वर, उत्तर प्रदेशमधील हरमतपूर व हरियानामधील नुहमेवाद ही ठिकाणे आढळली. महाराष्ट्राच्या पोरींनी इतिहास घडवला; राजपथावर परेडसाठी तिघींची निवड फसवणूक टाळण्यासाठी काय केले? मोबाईल क्रमांक कायमस्वरूपी ब्लॉक  आयडी क्रमांक कायमस्वरूपी ब्लॉक  जाहिरात टाकण्याच्या ठिकाणचे जीपीएस लोकेशन अपलोड करणे  जाहिरात टाकण्यासाठी आयडी तयार करताना सेल्फीचे बंधन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिलेल्या आदेशानुसार, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी काम सुरू आहे. त्याअंतर्गतच काही महिन्यांपासून ‘ओएलएक्‍स फ्रॉड’चा अभ्यास  केला. आमच्या सूचनेप्रमाणे कंपनीने उपाययोजना केल्याने गुन्ह्यांवर काही प्रमाणात नियंत्रण आले आहे. - राजकुमार वाघचौरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे मला जुनी दुचाकी घ्यायची होती, त्यामुळे मी ‘ओएलएक्‍स’वरील जाहिरातीवरील मोबाईलवर संपर्क केला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने मला दुचाकी देण्याचा बहाणा करून माझी ४० हजार रुपयांची फसवणूक केली. माझ्या तक्रारीची नोंद करतानाच माझ्याबाबत घडलेली घटना इतरांबाबत घडू नये, यासाठी सायबर पोलिसांना विनंती केली होती. - विजय कांबळे, नोकरदार Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2KJxmop

No comments:

Post a Comment