सावंतवाडीत चार वर्षांत 46 अपघाती मृत्यू सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गेल्या चार वर्षांत भरधाव वेगाने दुचाकी व मोटार तसेच चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघातात येथील तालुक्‍यात आतापर्यंत तब्बल 46 जणांना जीव गमवावा लागला आहे तर तब्बल 87 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. गेल्या काही वर्षांतील ही आकडेवारी असून चुकीच्या पद्धतीने नियम मोडून भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे असे प्रकार घडले आहेत. खड्डेमय रस्ते, पालकांचे दुर्लक्ष व जनजागृतीचा अभाव ही कारणे यामागे ठळक दिसून येत आहेत.  वाहतूक पोलिसांकडून रस्ता सुरक्षा मोहीम आखण्यात येते. यावेळी पोलिसांकडून वेळोवेळी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, भरधाव वेगाने गाडी हाकू नये, कुटुंबाच्या सुरक्षा सुरक्षिततेसाठी वाहन चालविताना घाई करू नये, विनाकारण ओव्हरटेक करू नये, अशा प्रकारच्या सूचना केल्या जातात. रस्त्यावर निरनिराळ्या ठिकाणी अपघात होऊ नये, यासाठी काही बोधवाक्‍यही दिली जातात; मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. जनजागृती केली तरीही वाहतुकीच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. वाहन हाकताना मोबाईलचा वापर होतो; मात्र जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे प्रकार वाढतच राहतात.  "अति घाई संकटात नेई' या उक्तीनुसार गेल्या काही वर्षांत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. 2017 आणि 2018 मध्ये येथील तालुक्‍यात तब्बल 30 जणांना दोन वर्षांत जीव गमवावा लागला आहे. यातील बरेच अपघात वाहन चालविताना केलेल्या दुर्लक्षामुळे व चुकीमुळे झाले आहेत. यासोबत भरधाव वेगाने गाडी हाकल्यामुळे झालेले आहेत. वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी वाहन चालविताना घ्यावयाची काळजी याबाबत सूचना दिल्या जातात. गेल्या काही कालावधीत अल्पवयीन मुलांमध्ये वाहने चालविण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांकडून कोणत्या प्रकारची सूचना दिली जात नाही. आपला मुलगा वाहतुकीचे नियम मोडताना, वाहनही चुकीच्या पद्धतीने चालवतो की नाही, याबाबतची खातरजमा पालकांकडून होत नाही. त्यामुळे अल्पवयीन मुले अपघातात बळी पडतात. अनेकजण भरधाव वेगाने गाडी चालवतात परिणामी अपघातांना बळी पडावे लागते. 2019 मध्ये तालुक्‍यात मात्र अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या कमी होती. यावर्षी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची संख्या मात्र तब्बल 21 एवढी होती. 2018 हे वर्ष तालुक्‍याला खूपच वाईट दिवसाचे होते. या वर्षात तब्बल 19 जणांना आपला अपघातात बळी द्यावा लागला. याच वर्षी 23 जण अपघातातून गंभीर दुखापती सामोरे गेले.  तालुक्‍यातील अपघात असे  वर्ष*मृत्यू*गंभीर*किरकोळ  2017*11*21*13  2018*19*23*07  2019*7*23*21  2020*9*20*4  रस्त्यांची सुरक्षा गरजेची  तालुक्‍यातील रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे. त्यातच अतिवेगाने गाडी हाकणाराची संख्या कमी नाही. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसून अपघाताला सामोरे जावे लागते. काहीवेळा या खड्ड्यांमुळे अनेकांना जीवही गमवावा लागतो. तालुक्‍याला आतापर्यंत ग्रामीण भागात खड्ड्यांमुळे जीव जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रस्त्यांची सुरक्षा हे तेवढेच गरजेचे आहे.  पालकांचे मार्गदर्शन गरजेचे  अल्पवयीन वाहन करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरी भागात वाहतूक परवाना तपासला जात असल्याने अशा अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाई केली जाते. आता ग्रामीण भागात वाहतूक परवाना तपासण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याने अल्पवयीन मुले सुसाट वेगाने वाहतुकीचे नियम तोडून गाडी हाकतात. अशावेळी ते स्वतःच्या दुखापतीसह दुसऱ्यांच्या दुखापतीला ही कारणीभूत ठरतात. त्यामुळे ग्रामीण भागातील अल्पवयीन वाहनधारकांवर आळा बसण्यासाठी पालकांकडून समज देणे आवश्‍यक आहे.  चुकीच्या पद्धतीने वाहने हाकून नयेत. वाहने हाकताना हेल्मेटचा आवर्जून वापर करावा. अनेक तरुण वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज अपघात होत आहेत. त्यामुळे पालकांनीही पाल्याकडे लक्ष द्यावे. अल्पवयीन मुलांजवळ वाहने देऊ नयेत.  - शशिकांत खोत, पोलिस निरीक्षक, सावंतवाडी  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 1, 2021

सावंतवाडीत चार वर्षांत 46 अपघाती मृत्यू सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गेल्या चार वर्षांत भरधाव वेगाने दुचाकी व मोटार तसेच चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघातात येथील तालुक्‍यात आतापर्यंत तब्बल 46 जणांना जीव गमवावा लागला आहे तर तब्बल 87 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. गेल्या काही वर्षांतील ही आकडेवारी असून चुकीच्या पद्धतीने नियम मोडून भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे असे प्रकार घडले आहेत. खड्डेमय रस्ते, पालकांचे दुर्लक्ष व जनजागृतीचा अभाव ही कारणे यामागे ठळक दिसून येत आहेत.  वाहतूक पोलिसांकडून रस्ता सुरक्षा मोहीम आखण्यात येते. यावेळी पोलिसांकडून वेळोवेळी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, भरधाव वेगाने गाडी हाकू नये, कुटुंबाच्या सुरक्षा सुरक्षिततेसाठी वाहन चालविताना घाई करू नये, विनाकारण ओव्हरटेक करू नये, अशा प्रकारच्या सूचना केल्या जातात. रस्त्यावर निरनिराळ्या ठिकाणी अपघात होऊ नये, यासाठी काही बोधवाक्‍यही दिली जातात; मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. जनजागृती केली तरीही वाहतुकीच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. वाहन हाकताना मोबाईलचा वापर होतो; मात्र जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे प्रकार वाढतच राहतात.  "अति घाई संकटात नेई' या उक्तीनुसार गेल्या काही वर्षांत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. 2017 आणि 2018 मध्ये येथील तालुक्‍यात तब्बल 30 जणांना दोन वर्षांत जीव गमवावा लागला आहे. यातील बरेच अपघात वाहन चालविताना केलेल्या दुर्लक्षामुळे व चुकीमुळे झाले आहेत. यासोबत भरधाव वेगाने गाडी हाकल्यामुळे झालेले आहेत. वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी वाहन चालविताना घ्यावयाची काळजी याबाबत सूचना दिल्या जातात. गेल्या काही कालावधीत अल्पवयीन मुलांमध्ये वाहने चालविण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांकडून कोणत्या प्रकारची सूचना दिली जात नाही. आपला मुलगा वाहतुकीचे नियम मोडताना, वाहनही चुकीच्या पद्धतीने चालवतो की नाही, याबाबतची खातरजमा पालकांकडून होत नाही. त्यामुळे अल्पवयीन मुले अपघातात बळी पडतात. अनेकजण भरधाव वेगाने गाडी चालवतात परिणामी अपघातांना बळी पडावे लागते. 2019 मध्ये तालुक्‍यात मात्र अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या कमी होती. यावर्षी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची संख्या मात्र तब्बल 21 एवढी होती. 2018 हे वर्ष तालुक्‍याला खूपच वाईट दिवसाचे होते. या वर्षात तब्बल 19 जणांना आपला अपघातात बळी द्यावा लागला. याच वर्षी 23 जण अपघातातून गंभीर दुखापती सामोरे गेले.  तालुक्‍यातील अपघात असे  वर्ष*मृत्यू*गंभीर*किरकोळ  2017*11*21*13  2018*19*23*07  2019*7*23*21  2020*9*20*4  रस्त्यांची सुरक्षा गरजेची  तालुक्‍यातील रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे. त्यातच अतिवेगाने गाडी हाकणाराची संख्या कमी नाही. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसून अपघाताला सामोरे जावे लागते. काहीवेळा या खड्ड्यांमुळे अनेकांना जीवही गमवावा लागतो. तालुक्‍याला आतापर्यंत ग्रामीण भागात खड्ड्यांमुळे जीव जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रस्त्यांची सुरक्षा हे तेवढेच गरजेचे आहे.  पालकांचे मार्गदर्शन गरजेचे  अल्पवयीन वाहन करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरी भागात वाहतूक परवाना तपासला जात असल्याने अशा अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाई केली जाते. आता ग्रामीण भागात वाहतूक परवाना तपासण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याने अल्पवयीन मुले सुसाट वेगाने वाहतुकीचे नियम तोडून गाडी हाकतात. अशावेळी ते स्वतःच्या दुखापतीसह दुसऱ्यांच्या दुखापतीला ही कारणीभूत ठरतात. त्यामुळे ग्रामीण भागातील अल्पवयीन वाहनधारकांवर आळा बसण्यासाठी पालकांकडून समज देणे आवश्‍यक आहे.  चुकीच्या पद्धतीने वाहने हाकून नयेत. वाहने हाकताना हेल्मेटचा आवर्जून वापर करावा. अनेक तरुण वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज अपघात होत आहेत. त्यामुळे पालकांनीही पाल्याकडे लक्ष द्यावे. अल्पवयीन मुलांजवळ वाहने देऊ नयेत.  - शशिकांत खोत, पोलिस निरीक्षक, सावंतवाडी  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/350OCMJ

No comments:

Post a Comment