अखेर 11 वर्षांनी घर झाले प्रकाशमय कुडाळ (सिंधुदुर्ग) - गेली अकरा वर्षे वीजेपासून वंचित असलेल्या वालावल येथील चौधरी कुटुंबाचा प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पाठपुराव्यामुळे सुटला. या कुटुंबाला वीजजोडणी मिळाली आहे. वालावल येथील श्रीधर चौधरी कुटुंबीय गेली अकरा वर्षे घरातील विजेपासुन वंचित होती. अनेक वर्षांपासून ते हा प्रश्‍न घेऊन तालुक्‍यातील अनेक व्यक्तींच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करत होते; मात्र काही कारणास्तव गेली अकरा वर्षे चौधरी कुटुंब मंद रॉकेलच्या दिव्यावर दिवसरात्र काढत असत. त्यात त्या कुटुंबाची दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलीने कसेबसे आपले शैक्षणिक अद्यापन पूर्ण केले; मात्र तिचे कुटुंबीय सतत मानसिक तणावपूर्ण वातावरणात गेली अकरा वर्षे अंधकारमय जीवन जगत होती. दोन दिवसांपूर्वी ही हकीकत वालावल येथील स्थानिक कार्यकर्ते दाजी कावले, सचिन पाटकर, प्रशांत पाताडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून चौधरी कुटुंबातील मुख्य समस्यांची वस्तुस्थिती मांडली. श्री. सामंत यांनी या कुटुंबांचा विजेचा प्रश्‍न तातडीने सोडवण्याचा निर्धार केला आणि 29 डिसेंबरला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करताना त्या घरात सौर ऊर्जेवर चालणारा पूर्ण लाईट सेट पुरवून चौधरी कुटुंबाचा अकरा वर्षे सुरू असलेला अंधकारमय प्रवास समाप्त केला. प्रत्यक्ष हा क्षण बघून त्या कुटुंबाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.  सहकार्याची आठवण  श्री. सामंत यांनी केलेल्या या सहकार्याचे आमचे कुटुंब सदैव आठवण ठेवेलच; पण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा सर्व सामान्यांपर्यंत जाऊन गोरगरीब जनतेच्या प्रश्‍नांची दखल घेऊन जिल्ह्यात काम करत आहे, हे यावरून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. चौधरी कुटुंबियांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, जिल्हाध्यक्ष सामंत व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी सचिन पाटकर, प्रशांत पाताडे, भिकाजी वालावलकर, दाजी कावले आदी पदाधिकारी उपस्थित होते.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 1, 2021

अखेर 11 वर्षांनी घर झाले प्रकाशमय कुडाळ (सिंधुदुर्ग) - गेली अकरा वर्षे वीजेपासून वंचित असलेल्या वालावल येथील चौधरी कुटुंबाचा प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पाठपुराव्यामुळे सुटला. या कुटुंबाला वीजजोडणी मिळाली आहे. वालावल येथील श्रीधर चौधरी कुटुंबीय गेली अकरा वर्षे घरातील विजेपासुन वंचित होती. अनेक वर्षांपासून ते हा प्रश्‍न घेऊन तालुक्‍यातील अनेक व्यक्तींच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करत होते; मात्र काही कारणास्तव गेली अकरा वर्षे चौधरी कुटुंब मंद रॉकेलच्या दिव्यावर दिवसरात्र काढत असत. त्यात त्या कुटुंबाची दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलीने कसेबसे आपले शैक्षणिक अद्यापन पूर्ण केले; मात्र तिचे कुटुंबीय सतत मानसिक तणावपूर्ण वातावरणात गेली अकरा वर्षे अंधकारमय जीवन जगत होती. दोन दिवसांपूर्वी ही हकीकत वालावल येथील स्थानिक कार्यकर्ते दाजी कावले, सचिन पाटकर, प्रशांत पाताडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून चौधरी कुटुंबातील मुख्य समस्यांची वस्तुस्थिती मांडली. श्री. सामंत यांनी या कुटुंबांचा विजेचा प्रश्‍न तातडीने सोडवण्याचा निर्धार केला आणि 29 डिसेंबरला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करताना त्या घरात सौर ऊर्जेवर चालणारा पूर्ण लाईट सेट पुरवून चौधरी कुटुंबाचा अकरा वर्षे सुरू असलेला अंधकारमय प्रवास समाप्त केला. प्रत्यक्ष हा क्षण बघून त्या कुटुंबाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.  सहकार्याची आठवण  श्री. सामंत यांनी केलेल्या या सहकार्याचे आमचे कुटुंब सदैव आठवण ठेवेलच; पण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा सर्व सामान्यांपर्यंत जाऊन गोरगरीब जनतेच्या प्रश्‍नांची दखल घेऊन जिल्ह्यात काम करत आहे, हे यावरून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. चौधरी कुटुंबियांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, जिल्हाध्यक्ष सामंत व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी सचिन पाटकर, प्रशांत पाताडे, भिकाजी वालावलकर, दाजी कावले आदी पदाधिकारी उपस्थित होते.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Mimdes

No comments:

Post a Comment