जगभरातील अनेक बड्या लोकांची ट्विटर अकाउंट हॅक होऊन त्यातून बिटकॉइन गैरव्यवहार नवी दिल्ली - सायबर हल्लेखोरांनी ट्विटर कंपनीच्याच काही निवडक कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत त्यांच्या गोपनीय माहितीचा वापर केला, असा दावा या कंपनीने केला. जगभरातील अनेक बड्या लोकांची ट्विटर अकाउंट हॅक होऊन त्यातून बिटकॉइन गैरव्यवहार झाल्याने खळबळ माजली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सायबर हल्लेखोरांनी बराक ओबामा, बिल गेट्स, एलॉन मस्क, जेफ बेझोस अशा दिग्गज लोकांचे ट्विटर अकाउंट हॅक करून त्यावरून खोट्या पोस्ट केल्या होत्या. त्यात बिटकॉईनची गुंतवणूक करून तिप्पट परतावा देण्याचे आश्वासन होते. या बड्या नावांवर विश्वास ठेवून अनेकांनी बिटकॉईन गुंतवले आणि ते फसले. यानंतर ट्विटर कंपनीने हल्ल्याचे विश्लेषण करत एक निवेदन आज प्रसिद्ध केले आहे. काही कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून हा हल्ला झाल्याचे कंपनीने सांगितले असले तरी अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने माहिती जाहीर केलेली नाही. असा केला हल्ला सोशल इंजिनिअरिंगच्या एका योजनेद्वारे काही कर्मचाऱ्यांवर जाळे त्यांच्याकडील गोपनीय माहितीचा वापर त्याद्वारे १३० प्रभावशाली व्यक्तींचे ट्विटर अकाउंट हॅक केले काही अकाउंटचे पासवर्ड बदलून त्याद्वारेही बनावट पोस्ट Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 18, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2ZHG9M6 Read More Read more No comments:
Video : कुटुंबाप्रमाणे जपलेली मांजरे कोरोनामुळे बेघर पिंपरी - घरी मांजरी पाळण्याचा छंद गेल्या ३४ वर्षांपासून चिंचवड येथील एका ७० वर्षीय आजींनी जोपासला. मांजरांना हक्काचं घर आणि प्रेम मिळवून देणाऱ्या आजी, अशी त्यांची परिसरात ओळख आहे. मांजरांवर त्या दरमहा तीन हजार रुपये खर्च करत. मात्र, कोरोनाविषयी चुकीचा समज आणि कोरोना झाल्यास समाज काय म्हणेल, या भीतीने त्यांनी 12 मांजरे दूर सोडून दिली. आता त्यांच्यात अपराधी भावना निर्माण होऊन मांजराच्या काळजीने त्या रडून आकांत करीत आहेत. माणसांना भावना तरी व्यक्त करता येतात. पण मुक्या प्राण्यांचं काय, अशाच एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या एका प्रसंगातून गेलेल्या संवेदनशील आजी म्हणजे गीता शशिकांत तोरो. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चिंचवडगाव-लक्ष्मीनगरमध्ये तोरो आजी त्यांच्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. मुळातच आजींना लहानपणापासून मांजरी पाळण्याचा छंद होता. त्यांना पती शशिकांत यांची साथ मिळाल्याने गेल्या 34 वर्षांपासून त्यांनी स्वच्छंदीपणे छंद जोपासला. त्यांच्या कुटुंबात मनूताई, काळू, स्विटू, काळ्या-बाळ्या, सोनू, मोनू, मण्या अशी त्यापैकी काहींची नावे असलेली मांजरे आनंदाने नांदत. त्या पुण्यातून दरमहा तीन हजार रुपये खर्चून ‘कॅटफूड’ आणत. आठवड्यातून एकदा सर्व मांजरींना स्वच्छ अंघोळ, केस-नख कापत. त्यांचे प्रजनन व आरोग्य, आहार, स्वच्छता करायच्या. या सर्व मांजरांची निवासी खोलीची दिवसातून दोनदा स्वच्छ केली जायची. दिवसातून तीनवेळा त्यांची भांडी घासत. दरवाजा बंद राहिल्यावर बाहेर गेल्यावर मांजरांचे हाल होऊ नये, म्हणून त्यांनी खास मुख्य दरवाजा आणि सेफ्टी डोअरला छोटासा दरवाजा काढला. मांजरे तिथूनच ये-जा करत. ती त्यांच्या कुंटुबातील सदस्यच होती, अशाप्रकारे त्यांची काळजी घ्यायच्या. आजींनी त्यांच्या प्रत्येक हालचाली कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. ‘फोटो अल्बम’ आणि ‘वॉलफ्रेम’मधून त्यांनी जपल्या आहेत. सुरुवातीला त्यांच्याकडे दोन-तीन मांजरी होत्या. नंतर त्या पिल्लांच्याच आजी बनल्या. महिन्यातून एकदा त्यांना लस द्यायच्या. एवढी काळजी माणसंदेखील माणसांची घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारे अवघे आयुष्य त्यांनी 40 ते 45 मांजरासोबत जीवन जगल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये आज 580 जणांना डिस्चार्ज, तर एवढ्या जणांचा मृत्यू मात्र, आता कोरोनामुळे माणसं माणसांना विसरली आहेत. कुत्र्या-मांजरामुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याचा समज-गैरसमज. शेजारच्यांनी सांगितले, की या मांजरीमुळे तुम्हाला झाल्यास काय करणार, तुम्ही या वयात कुठे जाणार, असे म्हटल्यावर त्यांच्या मनात भीतीचे काहूर माजले. काळजावर दगड ठेवून त्यांनी नऊ पिलांसह त्यांची आई आणि दोन मोठ्या मांजरींना दूर सोडून दिल्यावर घर खायला उठले. कुठेतरी त्यांच्याशी निर्दयपणे वागल्याची अपराधीपणाची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. आजही त्या काळजीपोटी रडून आकांत करत आहेत. मावळातील ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट; तळेगावातील संख्या चिंताजनक Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 18, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/32vbnba Read More Read more No comments:
कौटुंबिक हिंसाचारास केवळ महिलाच नाही तर पुरुषांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे; म्हणून... पुणे - कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसह पुरुषांवरील अन्याय दूर करत, त्यांना वैद्यकीय सेवा आणि विधी विषयक माहिती पुरवत गेल्या सहा महिन्यात महिला सहायक कक्षामार्फत (भरोसा सेल) ३३४ तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. पती किंवा सासरच्या व्यक्ती सासूरवास करतात, पती नांदवत नाही, तसेच पत्नी किंवा तिच्या घरच्यांकडून त्रास होत असल्याच्या ७९२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कौटुंबिक हिंसाचार झाल्यानंतर त्यातून तात्काळ दिलासा मिळावा, यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेच्या अंतर्गत कक्षाचे कामकाज चालते. कक्षांतर्गत पोलिस मदत, महिला हेल्पलाईन, समुपदेशन, वैद्यकीय सेवा, विधीविषयक सेवा, मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, पिडीत महिलांचे पुनर्वसन, कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण सेवा तक्रारदारांना पुरवण्यात येतात. लोणीकरांनो आतातरी काळजी घ्या, आपल्या बेपर्वाईमुळे कोरोना पुन्हा वाढतोय... ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांना त्यांच्या तक्रारीबाबत समुपदेशकांच्या माध्यमातून मदत केली. महिला सहायता कक्षाच्या माध्यमातून पती-पत्नीचे तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाते. त्यांच्यातील किरकोळ वाद मिटावे, हा यामागील प्रमुख हेतू असतो. जानेवारी ते जून अखेरीस कक्षात ७९२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील ३३४ प्रकरणे मार्गी लावण्यात आली आहेत. - बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा डॉक्टर, मला श्वसनाचा खुप त्रास होतोय, बेड मिळेल का? हवेलीमधील परिस्थिती पुरूषांच्या १६० तक्रारी कौटुंबिक हिंसाचारास केवळ महिला बळी पडत नसून, पुरुषांनादेखील पत्नी किंवा तिच्या कुटुंबियांचा त्रास सहन करावा लागत आहे. जून अखेरीस अशा १६० तक्रारी दाखल झाल्या आहेत. क्षुल्लक कारणांवरून बोलणे, अवास्तव अपेक्षा बाळगणे, पतीच्या घरच्यावरून वाद करणे असे या तक्रारींचे स्वरूप आहे. येथे मागता येते मदत अन्याय झालेली व्यक्ती पोलिस आयुक्त कार्यालयात अर्ज करू शकते. तसेच पुढील हेल्पलाइनवर त्यांना योग्य ती मदत केली जाते. महिला हेल्पलाईन नंबर - १०९१ कक्षाचा नंबर - ०२० - २६१२५२५२ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/3hcmdH2 Latest news updates July 17, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3jpTkcy Read More Read more No comments:
नागपुरातील नाले कुणी केले गायब ? वाचा नागपूर : पावसाळ्यातच नव्हे तर वर्षभर सांडपाणी वाहून नेणारे शहरातील 43 टक्के नाले गायब झाल्याचे निरीक्षण आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नोंदविले. अनेक अतिक्रमणधारकांनी नाल्यावर घरे बांधली तर काहींनी नाल्यांमध्येच बांधकाम केले. बिल्डरांनीही नाल्याची जागा कवेत घेतली. त्यामुळे शहरातील 97 नाले दिसेनासे झाले आहेत. मुसळधार पावसामुळे नाल्यांलगतच्या वस्त्यांमध्ये नेहमीच घरांत पाणी शिरते. नाला आणि गडरलाइनवर असलेले अतिक्रमण हे सर्वांत मोठे कारण असून लवकरच अशा अतिक्रमणांवर मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले. नाले तसेच सिवेज लाइनवरील अतिक्रमणाच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. यावरून आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या नेतृत्वात जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी आणि अन्य अधिकाऱ्यांची एक समिती बनवून याचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते. या समितीने मांडले वास्तव धक्कादायक असून शहरातील 227 नाल्यांपैकी केवळ 130 नाले शिल्लक आहेत. अतिक्रमण तसेच पक्के बांधकामामुळे सिवेज लाइन दुरुस्तीची कामे करण्यात अडथळे निर्माण होत आहे. शहरात सिवेज लाइनवर सुमारे 275 पेक्षा अधिक ठिकाणी पक्के घर बांधणे, वऱ्हांडा बांधकाम नागरिकांनी केले आहे. यामुळे तुंबलेल्या सिवेज लाइनची दुरुस्ती होत नसून घाण पाणी बाहेर रस्त्यावर व घरांत शिरत आहे. 'हनी ट्रॅप' प्रकरणासंबंधी गृहमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, वाचा काय आहे प्रकरण... नाल्यात 70 पेक्षा अधिक भागांमध्ये कॉंक्रीटचे स्तंभ उभारणे, स्लॅब टाकणे, नाल्याकाठी सोसायटी उभारणाऱ्या बिल्डरने नाल्याची भिंत उंच करणे, नाल्याची जागा बळकावून आत बांधकाम करणे आणि नाल्याचा प्रवाह वळविणे, असे गंभीर प्रकार केले आहेत. आयुक्तांचा कारवाईचा इशारा नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडल्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरत आहे. त्यामुळे सिवेज लाइन, नाल्यांवर अतिक्रमण संबंधितांनी तातडीने काढावे, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अतिक्रमण करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 17, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3eDzJBV Read More Read more No comments:
सगळ्याच सीमा बंद, बाप्पांच्या मूर्ती आणायच्या कशा? सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - यंदा लॉकडाउनमुळे गोवा राज्याच्या सीमा बंद असल्याने याचा फटका मूर्तिकारांना बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील मूर्ती गोव्यात नेण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली तर गोवा सरकार परवानगी देणार का ? गोवा राज्यात मूर्ती नेण्यास कोणते नियम असतील, असा प्रश्न नागरिक व मूर्तिकारांना पडला आहे. कोरोनाचा फटका सर्वसामान्यांसह एकूणच सर्वांना बसला आहे. आता तोंडावर चतुर्थीचा सण आला आहे. त्यामुळे नागरिकांनी नियोजनास सुरुवात केली, तर मूर्तिकारांचीही लगबग वाढली आहे; मात्र अशा परिस्थितीत लॉकडाउन सद्यस्थितीत कायम असताना चतुर्थीपूर्वी परिस्थिती कशी असेल, कोणत्या नियमांमध्ये शिथिलता येईल, आल्यास कोणती, असे विविध प्रश्न उभे राहतील. गोवा सीमेवरील भागात गोवा राज्यात येणाऱ्या पेडणे ते म्हापसा येथील अनेक गावेही खरेदी व्यवहारासाठी महाराष्ट्रातील बांदा तसेच सावंतवाडी या शहराकडे येतात. हे प्रमाण कमी असले तरी अनेक गावांतील नागरिक हे आजही बांदा या सीमेवरील असलेल्या मुख्य बाजारपेठेवर अवलंबून आहेत. परिसर व मूर्ती शाळा जवळ असल्याने अनेक ग्राहक गणेश चतुर्थीची मूर्ती बनवण्यासाठी बांदा परिसरातील असलेल्या मूर्तीशाळांमध्ये गणेशमूर्तीस पसंती देतात. यामध्ये पत्रादेवी, पेडणे परिसर, म्हापसा परिसर, उगवे, वारखंड, तामोसे, तोरसे आदी गावांतील नागरिक बांदा येथे ये-जा करत असतात. त्यासह वारखंड, कलंगूट परिसर, पेडणे, पारसे, गये या गावांतील काही नागरिक गणेशमूर्ती बनवण्यासाठी महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाट देतात. पेडणे, वारखंड या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. या ठिकाणी काही परिसरही सील करण्यात आला आहे. त्यानुसार बांदा परिसरातील निगुडे येथेही कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे परिसर सील करण्यात आला आहे. चतुर्थीपूर्वीच्या कालावधीत असे रुग्ण सापडत राहिल्यास सील करण्यात आलेल्या भागातून नागरिकांनी चतुर्थीच्या सणाच्या खरेदी-विक्रीच्या आर्थिक व्यवहारासाठी बाहेर कसे पडावे तसेच गणेशमूर्तींची वाहतूक कशी करावी असे प्रश्न पडले आहेत. वाहतूक करावी कशी? आंतरराज्यात मूर्तींची वाहतूक कशी करावी, असा मोठा प्रश्न आहे. गोव्यातील अनेक जणांनी तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मूर्तीशाळेत दरवर्षी ठरल्याप्रमाणे गणेशमूर्ती बनविण्यासाठी दिल्या आहेत. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात फारसे प्रमाण नसले तरी गोवा राज्यात मात्र दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे तेथील प्रशासनाने अनेक कडक निर्बंध अद्यापही कायम ठेवले आहेत. गोव्याच्या प्रशासनाचे काय? चतुर्थीचा सण महिन्याभरात येऊन ठेपला आहे. अशा स्थितीत परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर गणेशमूर्ती कशा आयात व निर्यात करायच्या हा प्रश्न अजूनही कायम आहे. गोवा व सिंधुदुर्गमधील वाहतूक व्यवस्थाही सद्यस्थितीत बंद आहे. दुसरीकडे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी जिल्ह्यातील मूर्ती गोव्यात नेण्याची परवानगी असेल, असे सूचित केले होते. जिल्हा प्रशासन त्यास तयार असले तरी गोव्यातील प्रशासन तयार होणार का, हाही प्रश्न आहे. काही पर्याय गोवा तपासणी नाक्यावर सॅनिटायझर मशिनरी बसवाव्यात. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात नेणाऱ्या मूर्तींच्या गाड्यांवर फवारणी करावी तसेच गोवा सीमेवरच दोन्ही राज्यांतील वाहनचालक आणि मूर्तीची वाहतूक करणाऱ्यांनी एकाच ठिकाणी येऊन मूर्ती एका वाहनातून दुसऱ्या वाहनात शिफ्ट कराव्यात, असे पर्याय सुचविले आहेत. दोन्हींकडील प्रशासनाने मूर्तिकारांना सवलत देऊन पासची सोय करावी. हा पर्याय खूप सोयीस्कर ठरू शकतो, असेही काही मूर्तिकारांकडून सांगण्यात आले. गोव्याने आपल्या जिल्ह्यातील मूर्तिकारांना परवानगी दिली आहे, अशा बाबतची माहिती आपल्याला सोशल मीडियावर मिळाली होती; मात्र अद्यापही याबाबत नेमका तपशील प्राप्त झालेला नाही. त्यामुळे संभ्रमावस्था कायम आहे. - नारायण सावंत, जिल्हाध्यक्ष, गणेश मूर्तिकार संघटना. संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 17, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3fRot6c Read More Read more No comments:
आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १८ जुलै पंचांग - शनिवार - आषाढ कृ. १३, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय रा. ३.३७, चंद्रास्त सायं. ५.१९, भारतीय सौर २७, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९०९ - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि प्रख्यात बंगाली कवी विष्णू डे यांचा जन्म. बंगालीखेरीज त्यांनी इंग्रजीतही आठ-दहा ग्रंथ लिहिले. १९६९ - विख्यात कादंबरीकार शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे निधन. त्यांच्या ‘फकिरा’ व ‘वारणेचा वाघ’ वगैरे कादंबऱ्या खूप गाजल्या. १९८० - भारताने ‘एसएलव्ही-३’ या अवकाशयानाद्वारे रोहिणी (आरएस-१) हा उपग्रह अंतराळात सोडला. या यशामुळे भारत हा उपग्रह सोडण्याची क्षमता असलेला जगातील सहावा देश ठरला. १९८९ - ख्यातनाम संस्कृतज्ञ आणि पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे माजी संचालक डॉ. गोविंद केशव भट यांचे निधन. संस्कृत, इंग्रजी आणि मराठी या तीन भाषांमधील त्यांनी लिहिलेले सुमारे पाऊणशे ग्रंथ प्रकाशित आहेत. १९९४ - ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ आणि ‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’चे अध्यक्ष मुनीस रझा यांचे अमेरिकेत निधन. दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरुपदही त्यांनी सांभाळले होते. १९९४ - ‘शूमेकर लेव्ही-९’ या धूमकेतूचा सर्वांत मोठा ‘जी’ हा तुकडा विशाल गुरू ग्रहावर आदळला. या स्फोटाने जगातील सर्व अण्वस्त्रांपेक्षा जास्त ऊर्जा मुक्त झाली व पृथ्वीच्या आकाराचे काळे डाग गुरू ग्रहावर निर्माण झाले. १९९५ - जनता दलाचे नेते व मालेगाव येथील आमदार निहाल अहमद यांना १९९४ चे ‘नॅशनल प्रेस ॲवॉर्ड’ जाहीर. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना नॅशनल प्रेस ऑफ इंडियातर्फे हा पुरस्कार दिला जातो. १९९६ - उद्योगपती गोदरेज यांना जपान सरकारतर्फे ‘दि ऑर्डर ऑफ राईझिंग सन, गोल्ड रेज अँड नेक रिबन पुरस्कार’ प्रदान. २००१ - सांगलीच्या राजमाता पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन यांचे निधन. दिनमान - मेष : अपेक्षित पत्र व्यवहार होईल. मानसिक उत्साह वाढेल.उसनवारी वसूल होईल. वृषभ : उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. मिथुन : तुमचे अनुभवाचे क्षेत्र वाढेल. बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. कर्क : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. कन्या : व्यवसायात वाढ होईल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. वृश्चिक : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. एखादी गुप्त बातमी समजणार आहे. धनु : व्यवसाय वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.एखादी भाग्यकारक घटना घडेल. मकर : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. जबाबदारी वाढेल. कुंभ : अपेक्षित पत्र व्यवहार व फोन होतील. तुमचे अंदाज अचूक ठरतील. मीन : व्यवसायात वाढ होईल. तुमच्यावर विशेष जबाबदारी सोपवली जाईल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 17, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3jhkUII Read More Read more No comments:
सांगलीतून कुडाळला आला पोलिस कर्मचारी आणि... कुडाळ (सिंधुदुर्ग) - शहरातील श्रीरामवाडी येथे कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला आहे. या रूग्णाच्या संपर्कात किती जण आलीत हे अद्याप उघड झालेले नाही. हा रूग्ण काही दिवसांपूर्वी सांगली येथून आला होता. या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तो पोलिस कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्याचा संपर्क पोलिस ठाण्याशी आला होता का? याबाबतही चौकशी सुरू आहे. शहरवासीयांनी घाबरू नये, असे आवाहन नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी केले. कुडाळात अद्याप एकही कोरोनाग्रस्त आढळला नव्हता; मात्र आज पहिला रूग्ण आढळला. हा रुग्ण पोलिस कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. येथील पोलिस ठाण्यात सेवा बजावणाऱ्या या पोलिस कर्मचाऱ्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे ते आपल्या मूळ गावी म्हणजे सांगली येथे काही दिवसांपूर्वी गेले होते. वडिलांचे सर्व विधी अटोपून ते पुन्हा कुडाळ येथील श्रीरामवाडी येथे राहत असलेल्या चाळीत दाखल झाले. ते होम क्वारंटाईन होते. त्यांना ताप येत असल्यामुळे त्यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या कुटुंबीयांना ओरोस रुग्णालयात दाखल केले. लक्ष्मीमंदिर ते श्रीरामवाडी मध्ये प्रवेश करणारा महामार्गावरील रस्ता सील करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. हा रुग्ण आढळल्यानंतर येथील नगराध्यक्ष ओंकार तेली, मुख्याधिकारी नितीन गाढवे, नगरसेवक राकेश कांदे, उषा आठल्ये, सचिन काळप यांनी नागरिकांना सतर्क करून हा कंटेन्मेंट झोन होईल असे सांगितले आहे. संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 17, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2COxBKd Read More Read more No comments:
आयुक्त मुंढेच्या नावाने बघा काय सुरू आहे नागपुरात ? नागपूर : आयुक्त तुकाराम मुंढे उपराजधानीत आले तेव्हापासून नागपूरकरांच्या मनावर ते गारूड करीत आहे. सत्ताधाऱ्यांनी त्यांना जेव्हा अडचणीत पकडले, त्या-त्या वेळी त्यांच्या समर्थनात सोशल मीडियावर अनेकजण पुढे आले. त्यांच्या समर्थकांची वाढती संख्या बघता शहरातील काही अडगळीत पडलेल्या नेत्यांनीही त्यांचे समर्थन करीत स्वतःच्या राजकीय पुनर्वसनासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र आहे. आयुक्त मुंढे यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यातून राज्यातील लोकांना भुरळ पाड़ली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीने अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले आहे. नागपूरही त्याला अपवाद नाही. गेल्या काही महिन्यापासून शहरात आयुक्तविरुद्ध पदाधिकारी सामना रंगला आहे. एकमेकांवर कुरघोडीची संधी सत्ताधारी आणि आयुक्त, दोघेही सोडत नसल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत दिसून आले. कार्यशैलीमुळे आयुक्तांच्या समर्थकांनी सत्ताधाऱ्यांवर सोशल मीडियातून तोंडसुखही घेतले. परंतु आता शहरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांनीही आयुक्तांचे समर्थन करण्याचे प्रयत्न सुरू केले. अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेल्या शहरातील काही राजकीय नेत्यांना मुंढे यांच्या नावाने 'बूस्ट'च मिळाल्याचे चित्र आहे. मुंढे यांना समर्थन करून त्यांच्या समर्थकांचेही मन जिंकण्याचा प्रयत्न सोशल मीडियातूनही सुरू झाला आहे. 'हनी ट्रॅप' प्रकरणासंबंधी गृहमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, वाचा काय आहे प्रकरण... एकूणच आयुक्तांचे समर्थन करण्याची स्पर्धा लागली आहे. कधी नगरसेवक तर कधी अडगळीत पडलेले नेते आयुक्तांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, यातील काहींचा आयुक्तांचे समर्थनाचा हेतू केवळ सत्ताधाऱ्यांचा विरोध करण्यासाठीच होत असल्याचेही चित्र आहे. आयुक्तांच्या आड सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करीत गेलेली राजकीय पत पुन्हा प्राप्त करण्याचे धंदे काहींनी चालविले आहे. शिळ्या कढीला उत गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपची महापालिकेत सत्ता आहे. या पंधरा वर्षांच्या काळात सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप झाले. तेच जुने मुद्दे घेऊन काही जण आयुक्तांच्या दरबारी खेटे घालत आहेत. नुकताच झालेल्या पावसाने अनेक ड्रेनेज लाईन स्वच्छ न झाल्याने रस्त्यावर पाणी आले, वस्त्यांमध्ये पाणी शिरले. मात्र, लोकांच्या या समस्यांऐवजी जुने आरोपाचे मुद्देच आयुक्तांपुढे मांडले जात असल्याने अशा नेत्यांचा हेतूवर शंका व्यक्त केली जात आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 17, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3hewiDg Read More Read more No comments:
सुखद! हिर्लोक पंचक्रोशीवासीयांचा अंधार होणार कायमचाच दूर कुडाळ (सिंधुदुर्ग) - वेताळबांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील हिर्लोक पंचक्रोशीतील पावसाळ्यात अंधारात असणारी गावे आता कायमची उजळणार आहेत. आमदार वैभव नाईक व जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांच्या पाठपुराव्यानंतर कायमस्वरूपी उपाय म्हणून माणगाव येथून आलेली 11 केव्हीची विद्युत वाहिनी घावनळे ते हिर्लोकला जोडण्यासाठी मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या हिर्लोक पंचक्रोशीत रांगणा तुळसुली, किनळोस हिर्लोक, नारूर, गिरगाव, कुसगाव या गावांत वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्या कडावल येथून डिगसच्या जंगल भागातून येत असल्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत होते. पावसाळ्यात तर या गावांत कायमच चार चार दिवस वीज गायब होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह जनमानसावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी वीजेबाबतची समस्या कायमच श्री. परब यांच्याकडे व्यक्त केली होती. मागच्या जूनमध्ये मुसळधार पावसामुळे या भागात आठ दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. सर्व गावे अंधारात होती. संतप्त ग्रामस्थांनी आमदार नाईक व श्री. परब याच्या नेतृत्वाखाली राज्य विद्युत महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री. पाटील यांची सर्व कार्यकर्त्यांसमावेत भेट घेतली होती. यावेळी श्री. परब यांनी हिर्लोक पंचक्रोशीची ही विजेची समस्या आक्रमकपणे मांडल्यानंतर श्री. पाटील यांनी ती तातडीने सोडविण्याचे मान्य केले. याकडे श्री. परब यांनी विद्युत वितरण कंपनीकडे सततचा पाठपुरावा केल्यानंतर त्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून माणगावातून आलेली 11 केव्हीची विद्युत वाहिनी घावनळे ते हिर्लोकला जोडण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. या विद्युत वाहिनीमुळे रांगणातुळसुली, हिर्लोक, किनळोस, नारूर, गिरगाव व कुसगाव ही सर्व गावे कायमची उजळणार आहेत. विजेचा प्रश्न सुटणार मंगळवारी (ता.14) विद्युत वाहिनी मार्गाची श्री. परब यांनी विद्युत महावितरणचे श्री. सावंत व अन्य कर्मचारी, ठेकेदार कंपनीचे हर्षित यांच्या समवेत पाहणी करून सर्व्हे केला. यावेळी रांगणा तुळसुली सरपंच नागेश आईर, हिर्लोक उपसरपंच नरेंद्र राणे, कुडाळ तालुका आत्मा कमिटी सदस्य बाजीराव झेंडे उपस्थित होते. त्यांनीही याबाबत सूचना मांडल्या व आवश्यक माहिती दिली. श्री. सावंत यांनी 15 दिवसांत हे काम पूर्ण करून लोकांच्या सेवेत रुजू करू, असा शब्द उपस्थितांना दिला. संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 17, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2CdPItr Read More Read more No comments:
ट्रकचालकामुळे एकच खळबळ, वेंगुर्लेचे प्रकरण आहे तरी काय? वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - शहरातील भटवाडी येथील शासकीय गोदामातील ट्रकचालकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबतच्या माहितीला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर यांनी दुजोरा दिला. ही व्यक्ती मूळ कोल्हापूर येथील रहिवाशी असून सध्या भटवाडी येथील काजू व्यावसायिक यांच्या इमारतीमागील भागात राहत होती. दोन दिवसांपूर्वी ताप आल्याने ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ले येथे तपासणीसाठी गेलेली होती. तेथून त्याला जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे पुढील तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाने त्या परिसराचा सर्व्हे करून याठिकाणी राहणाऱ्या दोन कुटुंबातील सर्वांचे स्वॅब नमुने घेतले आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या सर्व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. हा संपूर्ण परिसर पालिकेमार्फत निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तहसीलदार प्रवीण लोकरे, पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर, डॉ. वजराटकर, पालिका नोडल अधिकारी सचिन काकड यांनी जागेची पाहणी केली. ती व्यक्ती राहत असलेला संपूर्ण परिसर दगडी कंपाऊंडने बंदिस्त असल्याने परिसर कटेंनमेंट झोन म्हणून घोषित केला असून या परिसराव्यतिरिक्त शहरातील इतर ठिकाणचे सर्व व्यवहार नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सुरू राहतील. सध्या हा रुग्ण जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे उपचार घेत असून लोकांनी घाबरु नये; परंतु नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष गिरप यांनी केले आहे. मत्स्यविक्रेत्यांना आवाहन कोरोना पोझिटिव्ह रूग्णाचा विचार करता कोरोनाचा प्रसार इतरत्र होवू नये, म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने दाभोली नाका येथे तात्पुरत्या स्वरुपात बसविलेले मत्स्यविक्रेत्यांना उद्यापासून (ता.18) गणेश चतुर्थीचा कालावधी संपेपर्यंत मांडवी रोड येथे बसविण्याचे नियोजन केले आहे. दाभोली नाका येथे सध्या ग्राहक व मच्छी विक्रेत्यांची गर्दी लक्षात घेता सोशल डिस्टसिंगचे पालन योग्यरितीने पाळले जात नाही, असे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात येत आहे. उद्यापासून सर्व मच्छी विक्रेत्यांनी मांडवी रोड येथे बसून मच्छी विक्री करावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले. संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 17, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/30q0u7V Read More Read more No comments:
पर्यटनक्षेत्राला बूस्ट, प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र करणार या उपाययोजना... नागपूर ः झपाट्याने विकसित होणारा उद्योग म्हणून पाहिले जात असलेल्या पर्यटन क्षेत्राला कोरोना विषाणूचा विखळा बसल्याने हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. या विषाणूच्या प्रसारावर प्रतिबंधात्मक उपाय आणि धोरण ठरविण्यासाठी केंद्र सरकार पुढे सरसावले आहे. पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाकडून देशभरातील हॉटेल्स, रिसोर्ट, बेड ऍण्ड ब्रेकफास्ट, होम स्टे, अपार्टमेंट हॉटेल, टाईम शेअरिंग युनिट आणि गेस्ट हाऊसची माहिती संकलित करण्यास प्रारंभ केला आहे. त्याचा उपयोग पर्यटन विकासाचे धोरण व योजना तयार करण्यात येणार आहे. पर्यटन निवास पर्यटन उद्योगातील महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाकडूनच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभरातील हॉटेल, रिसोर्ट आदी युनिटची माहिती प्रणाली तयार करण्यात येणार आहे. याच आधारे नवीन धोरण निश्चित करण्याचा विचार सरकार करीत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्योग डबघाईस आलेला असताना या साथ रोगाचा प्रसार होणार नाही. तसेच प्रतिबंधात्मत उपाय ठरविण्यासाठी या माहिती प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. पदाधिकारी, सदस्यांनी फिरवली बैठकीकडे पाठ, हे आहे कारण... या सर्वच युनिटची नोंदणी करण्यासाठी www.hotelcloud.nic.in या संकेतस्थळावर हॉटेल, रिसोर्टचे नाव, संपूर्ण पत्ता, खोल्या संख्या, ईमेल आयडी, प्राधिकृत कर्मचाऱ्यांचे नाव आणि त्यांचा मोबाईल क्रमांक आदी माहिती भरायची आहे. ही माहिती शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्याने निश्चितच हॉटेल व रिसोर्टचा व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील हॉटेल, रिसोर्ट, बेड ऍण्ड ब्रेकफास्ट, होम स्टे आणि गेस्ट हाऊसधारकांनी या संकेतस्थळावर new click here... या ठिकाणी क्लिक करून माहितीची नोंदणी करायची आहे. नोंदणी करणे गरजेचे पर्यटन व्यवसाय वाढविण्यासाठी पर्यटन संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. शासनाच्या सूचनेनुसार हॉटेल, रिसोर्ट, बेड ऍण्ड ब्रेकफास्ट, होम स्टे, अपार्टमेंट हॉटेल, टाईम शेअरिंग युनिट आणि गेस्ट हाऊसधारकांनी नोंदणी करणे गरजेचे आहे. हनुमंत हेडे, उपसंचालक (पर्यटन), प्रादेशिक कार्यालय अमरावती News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 17, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2OCMaTS Read More Read more No comments:
कोरोना संकटातही ज्ञानदान, ज्ञानार्जनासाठी `अशी` धडपड बांदा (सिंधुदुर्ग) - कोरोनाचे जैविक संकट दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने शैक्षणिक वर्ष अद्यापही सुरू होण्याची शक्यता कमी आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक खासगी शाळांनी ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात नेटवर्कचा अभाव असल्याने पालक आपल्या पाल्यांना शहरात येऊन मोबाईलवर ऑनलाईन शिक्षणाचे धडे देत आहेत. कोरोनाचे संकट सुरू झाल्यावर मार्चच्या अखेरीस शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला. उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर दरवर्षी 15 जूनला नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते; मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतीच आहे. ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केल्याने शाळा सुरू होण्याबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद शाळा बंद असल्याने शिक्षकांनी वर्गवार व्हॉट्सऍपच्या समूहाची निर्मिती केली. त्या माध्यमातून मुलांना दररोजचा अभ्यास पाठविण्यात येतो. पालकांच्या मदतीने अभ्यास करून पुन्हा मुले हा अभ्यास ग्रुपवर पाठवीत आहेत. यावेळी ग्रुपवर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन देखील शिक्षकांकडून करण्यात येते. ऑनलाईन शिक्षण देण्यात खासगी शाळांनी आघाडी घेतली आहे. इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा या पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या मासिक शुल्कावर अवलंबून असतात. शाळा बंद ठेवल्याने शासनाने विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल करू नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे खासगी शाळा चालविणाऱ्या संस्था व शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कित्येक खासगी शाळेतील शिक्षक हे विनावेतन काम करत आहेत. शैक्षणिक प्रवाहात मुले मागे राहू नयेत यासाठी पालकांच्या आग्रहास्तव अनेक खासगी शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. या माध्यमातून विज्ञान, गणित, इंग्रजी या महत्त्वाच्या विषयांचे वेळापत्रक तयार करून पालकांना दिले आहे. यासाठी झूम, गुगल मिटसारख्या ऍपचा वापर होत आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना मोबाईलचा त्रास होऊ नये, यासाठी दर 20 मिनिटांनी विद्यार्थ्यांना 10 मिनिटांची सुटी देण्यात येते. ग्रामिण भागातील विद्यार्थी शहरात ग्रामीण भागात मोबाईल रेंज मिळत नसल्याने पालक मुलांना घेऊन शहराच्या ठिकाणी येत आहेत. ऑनलाईन शिक्षण घेताना मुलांना सवय नसल्याने बऱ्याच ठिकाणी मुले व पालक हे गोंधळलेल्या स्थितीत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा कधी सुरू होईल हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे हे शैक्षणिक वर्ष मुलांना ऑनलाईन शिक्षण घेऊनच पूर्ण करावे लागणार आहे. खासगी शाळातील शिक्षकांना गेले 3 महिने वेतन नसल्याने ऑनलाईन शिक्षण देताना या शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 17, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2BfxJSU Read More Read more No comments:
एक नंबर! शेतकऱ्याच्या मुलाला आली अमेरिकेतील विद्यापीठाची ऑफर! लखनऊ : अमेरिकेच्या आईवी लीगमध्ये (Ivy League University) आठ विद्यापीठांचा समावेश आहे. आणि त्यामुळेच तिला जगप्रसिद्धी मिळाली आहे. यामध्ये समाविष्ट असणाऱ्या विद्यापीठांपैकी एक आहे कॉर्नेल युनिव्हर्सिटी. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं का सांगताय. तर ऐका. - भारतात गरीबी कमी झाली; संयुक्त राष्ट्राचा अहवाल कॉर्नेल युनिव्हर्सिटी चर्चेत यायचं कारण म्हणजे या युनिव्हर्सिटीने भारतातील एका शेतकऱ्याच्या मुलाला त्यांच्या युनिव्हर्सिटीत शिकण्यासाठी आमंत्रित केलं आहे. एवढंच नव्हे, तर कॉर्नेल युनिव्हर्सिटीनं त्याला स्कॉलरशिप दिली असून त्याचं शिक्षण पूर्णपणे मोफत होणार आहे. उत्तर प्रदेशच्या लखिमपूर खीरी या गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा असणाऱ्या अनुराग तिवारी याच्याकडे ही सुवर्णसंधी चालून आलीय. नुकताच सीबीएसईचा १२ वीचा निकाल लागला. आणि यामध्ये अनुरागला तब्बल ९८.२ टक्के इतके गुण मिळाले आहेत. - ...अन् ९० वर्षीय आजींच्या डोळ्यात पाणी आलं; पुण्यात कोरोना तपासणी केंद्राचा माणुसकीशून्य कारभार! अनुरागला इकॉनॉमिक्स आणि इतिहास या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले असून, राज्यशास्त्रमध्ये ९९, इंग्रजीत ९७, तर गणितात ९५ मार्क मिळाले आहेत. येत्या १ सप्टेंबरपासून अनुरागचे कॉर्नेल युनिव्हर्सिटीतर्फे ऑनलाइन क्लास सुरू होणार आहेत. अमेरिकेत कोरोनाने हाहाकार उडविला असल्याने जवळपास सर्वच विद्यापीठांनी ऑनलाइन क्लास सुरू केले आहेत. त्यामुळे अनुराग कॉर्नेलमध्ये इकॉनॉमिक्स आणि गणित या विषयांचे ऑनलाइन शिक्षण घेणार आहे. अनुरागचे वडील कमलापती तिवारी हे शेतकरी आहेत, तर आई संगीता गृहिणी आहे. लखिमपूर शहरापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या सरसन या गावात अनुरागने प्राथमिक शिक्षण घेतले. सहावीमध्ये असताना त्याने विद्याज्ञान प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होत आपल्या विजयी मोहिमेला प्रारंभ केला. (विद्याज्ञान ही सीतापूर येथील एक ग्रामीण अॅकॅडमी असून उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या वंचित अशा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम करते.) - ट्विटर वापरताय? तर जरा दमानं घ्या; सायबर पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा! अकरावीमध्ये असतानाच अनुरागने सॅट परीक्षेची तयारी सुरू केली होती. त्यामुळे त्याला १६०० पैकी १३७० इतके गुण मिळाले होते. त्यानंतर अर्ली डिसिजन अॅप्लिकंटमधून त्याने कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय केले. आणि त्याला डिसेंबरमध्ये कॉर्नेल युनिव्हर्सिटीमधून शिक्षणासाठी बोलावणं आलं. या यशाचं श्रेय त्याने त्याच्या शाळेतील शिक्षकांना दिलं आहे. अनुराग हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा मोठा फॅन आहे. आणि त्याच्यापासून प्रेरणा घेत त्यानं हे यश मिळवलं आहे. १२ वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तो त्याच्या गावात पोहोचला, तेव्हा सर्व गावकरी त्याच्याकडे आदराने बघत होते. जे त्याला ओळखतही नव्हते, तेदेखील घरी येऊन त्याच्याशी बोलत होते. यातून त्याला खूप आनंद मिळाला, असंही त्यानं 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितलं. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 17, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/30r1gkU Read More Read more No comments: