सगळ्याच सीमा बंद, बाप्पांच्या मूर्ती आणायच्या कशा? सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - यंदा लॉकडाउनमुळे गोवा राज्याच्या सीमा बंद असल्याने याचा फटका मूर्तिकारांना बसण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील मूर्ती गोव्यात नेण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली तर गोवा सरकार परवानगी देणार का ? गोवा राज्यात मूर्ती नेण्यास कोणते नियम असतील, असा प्रश्‍न नागरिक व मूर्तिकारांना पडला आहे.  कोरोनाचा फटका सर्वसामान्यांसह एकूणच सर्वांना बसला आहे. आता तोंडावर चतुर्थीचा सण आला आहे. त्यामुळे नागरिकांनी नियोजनास सुरुवात केली, तर मूर्तिकारांचीही लगबग वाढली आहे; मात्र अशा परिस्थितीत लॉकडाउन सद्यस्थितीत कायम असताना चतुर्थीपूर्वी परिस्थिती कशी असेल, कोणत्या नियमांमध्ये शिथिलता येईल, आल्यास कोणती, असे विविध प्रश्‍न उभे राहतील. गोवा सीमेवरील भागात गोवा राज्यात येणाऱ्या पेडणे ते म्हापसा येथील अनेक गावेही खरेदी व्यवहारासाठी महाराष्ट्रातील बांदा तसेच सावंतवाडी या शहराकडे येतात. हे प्रमाण कमी असले तरी अनेक गावांतील नागरिक हे आजही बांदा या सीमेवरील असलेल्या मुख्य बाजारपेठेवर अवलंबून आहेत. परिसर व मूर्ती शाळा जवळ असल्याने अनेक ग्राहक गणेश चतुर्थीची मूर्ती बनवण्यासाठी बांदा परिसरातील असलेल्या मूर्तीशाळांमध्ये गणेशमूर्तीस पसंती देतात.  यामध्ये पत्रादेवी, पेडणे परिसर, म्हापसा परिसर, उगवे, वारखंड, तामोसे, तोरसे आदी गावांतील नागरिक बांदा येथे ये-जा करत असतात. त्यासह वारखंड, कलंगूट परिसर, पेडणे, पारसे, गये या गावांतील काही नागरिक गणेशमूर्ती बनवण्यासाठी महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाट देतात.  पेडणे, वारखंड या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. या ठिकाणी काही परिसरही सील करण्यात आला आहे. त्यानुसार बांदा परिसरातील निगुडे येथेही कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे परिसर सील करण्यात आला आहे. चतुर्थीपूर्वीच्या कालावधीत असे रुग्ण सापडत राहिल्यास सील करण्यात आलेल्या भागातून नागरिकांनी चतुर्थीच्या सणाच्या खरेदी-विक्रीच्या आर्थिक व्यवहारासाठी बाहेर कसे पडावे तसेच गणेशमूर्तींची वाहतूक कशी करावी असे प्रश्‍न पडले आहेत.  वाहतूक करावी कशी?  आंतरराज्यात मूर्तींची वाहतूक कशी करावी, असा मोठा प्रश्‍न आहे. गोव्यातील अनेक जणांनी तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मूर्तीशाळेत दरवर्षी ठरल्याप्रमाणे गणेशमूर्ती बनविण्यासाठी दिल्या आहेत. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात फारसे प्रमाण नसले तरी गोवा राज्यात मात्र दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे तेथील प्रशासनाने अनेक कडक निर्बंध अद्यापही कायम ठेवले आहेत.  गोव्याच्या प्रशासनाचे काय?  चतुर्थीचा सण महिन्याभरात येऊन ठेपला आहे. अशा स्थितीत परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर गणेशमूर्ती कशा आयात व निर्यात करायच्या हा प्रश्‍न अजूनही कायम आहे. गोवा व सिंधुदुर्गमधील वाहतूक व्यवस्थाही सद्यस्थितीत बंद आहे. दुसरीकडे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी जिल्ह्यातील मूर्ती गोव्यात नेण्याची परवानगी असेल, असे सूचित केले होते. जिल्हा प्रशासन त्यास तयार असले तरी गोव्यातील प्रशासन तयार होणार का, हाही प्रश्‍न आहे.    काही पर्याय  गोवा तपासणी नाक्‍यावर सॅनिटायझर मशिनरी बसवाव्यात. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात नेणाऱ्या मूर्तींच्या गाड्यांवर फवारणी करावी तसेच गोवा सीमेवरच दोन्ही राज्यांतील वाहनचालक आणि मूर्तीची वाहतूक करणाऱ्यांनी एकाच ठिकाणी येऊन मूर्ती एका वाहनातून दुसऱ्या वाहनात शिफ्ट कराव्यात, असे पर्याय सुचविले आहेत. दोन्हींकडील प्रशासनाने मूर्तिकारांना सवलत देऊन पासची सोय करावी. हा पर्याय खूप सोयीस्कर ठरू शकतो, असेही काही मूर्तिकारांकडून सांगण्यात आले.  गोव्याने आपल्या जिल्ह्यातील मूर्तिकारांना परवानगी दिली आहे, अशा बाबतची माहिती आपल्याला सोशल मीडियावर मिळाली होती; मात्र अद्यापही याबाबत नेमका तपशील प्राप्त झालेला नाही. त्यामुळे संभ्रमावस्था कायम आहे.  - नारायण सावंत, जिल्हाध्यक्ष, गणेश मूर्तिकार संघटना.  संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 17, 2020

सगळ्याच सीमा बंद, बाप्पांच्या मूर्ती आणायच्या कशा? सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - यंदा लॉकडाउनमुळे गोवा राज्याच्या सीमा बंद असल्याने याचा फटका मूर्तिकारांना बसण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील मूर्ती गोव्यात नेण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली तर गोवा सरकार परवानगी देणार का ? गोवा राज्यात मूर्ती नेण्यास कोणते नियम असतील, असा प्रश्‍न नागरिक व मूर्तिकारांना पडला आहे.  कोरोनाचा फटका सर्वसामान्यांसह एकूणच सर्वांना बसला आहे. आता तोंडावर चतुर्थीचा सण आला आहे. त्यामुळे नागरिकांनी नियोजनास सुरुवात केली, तर मूर्तिकारांचीही लगबग वाढली आहे; मात्र अशा परिस्थितीत लॉकडाउन सद्यस्थितीत कायम असताना चतुर्थीपूर्वी परिस्थिती कशी असेल, कोणत्या नियमांमध्ये शिथिलता येईल, आल्यास कोणती, असे विविध प्रश्‍न उभे राहतील. गोवा सीमेवरील भागात गोवा राज्यात येणाऱ्या पेडणे ते म्हापसा येथील अनेक गावेही खरेदी व्यवहारासाठी महाराष्ट्रातील बांदा तसेच सावंतवाडी या शहराकडे येतात. हे प्रमाण कमी असले तरी अनेक गावांतील नागरिक हे आजही बांदा या सीमेवरील असलेल्या मुख्य बाजारपेठेवर अवलंबून आहेत. परिसर व मूर्ती शाळा जवळ असल्याने अनेक ग्राहक गणेश चतुर्थीची मूर्ती बनवण्यासाठी बांदा परिसरातील असलेल्या मूर्तीशाळांमध्ये गणेशमूर्तीस पसंती देतात.  यामध्ये पत्रादेवी, पेडणे परिसर, म्हापसा परिसर, उगवे, वारखंड, तामोसे, तोरसे आदी गावांतील नागरिक बांदा येथे ये-जा करत असतात. त्यासह वारखंड, कलंगूट परिसर, पेडणे, पारसे, गये या गावांतील काही नागरिक गणेशमूर्ती बनवण्यासाठी महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाट देतात.  पेडणे, वारखंड या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. या ठिकाणी काही परिसरही सील करण्यात आला आहे. त्यानुसार बांदा परिसरातील निगुडे येथेही कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे परिसर सील करण्यात आला आहे. चतुर्थीपूर्वीच्या कालावधीत असे रुग्ण सापडत राहिल्यास सील करण्यात आलेल्या भागातून नागरिकांनी चतुर्थीच्या सणाच्या खरेदी-विक्रीच्या आर्थिक व्यवहारासाठी बाहेर कसे पडावे तसेच गणेशमूर्तींची वाहतूक कशी करावी असे प्रश्‍न पडले आहेत.  वाहतूक करावी कशी?  आंतरराज्यात मूर्तींची वाहतूक कशी करावी, असा मोठा प्रश्‍न आहे. गोव्यातील अनेक जणांनी तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मूर्तीशाळेत दरवर्षी ठरल्याप्रमाणे गणेशमूर्ती बनविण्यासाठी दिल्या आहेत. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात फारसे प्रमाण नसले तरी गोवा राज्यात मात्र दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे तेथील प्रशासनाने अनेक कडक निर्बंध अद्यापही कायम ठेवले आहेत.  गोव्याच्या प्रशासनाचे काय?  चतुर्थीचा सण महिन्याभरात येऊन ठेपला आहे. अशा स्थितीत परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर गणेशमूर्ती कशा आयात व निर्यात करायच्या हा प्रश्‍न अजूनही कायम आहे. गोवा व सिंधुदुर्गमधील वाहतूक व्यवस्थाही सद्यस्थितीत बंद आहे. दुसरीकडे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी जिल्ह्यातील मूर्ती गोव्यात नेण्याची परवानगी असेल, असे सूचित केले होते. जिल्हा प्रशासन त्यास तयार असले तरी गोव्यातील प्रशासन तयार होणार का, हाही प्रश्‍न आहे.    काही पर्याय  गोवा तपासणी नाक्‍यावर सॅनिटायझर मशिनरी बसवाव्यात. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात नेणाऱ्या मूर्तींच्या गाड्यांवर फवारणी करावी तसेच गोवा सीमेवरच दोन्ही राज्यांतील वाहनचालक आणि मूर्तीची वाहतूक करणाऱ्यांनी एकाच ठिकाणी येऊन मूर्ती एका वाहनातून दुसऱ्या वाहनात शिफ्ट कराव्यात, असे पर्याय सुचविले आहेत. दोन्हींकडील प्रशासनाने मूर्तिकारांना सवलत देऊन पासची सोय करावी. हा पर्याय खूप सोयीस्कर ठरू शकतो, असेही काही मूर्तिकारांकडून सांगण्यात आले.  गोव्याने आपल्या जिल्ह्यातील मूर्तिकारांना परवानगी दिली आहे, अशा बाबतची माहिती आपल्याला सोशल मीडियावर मिळाली होती; मात्र अद्यापही याबाबत नेमका तपशील प्राप्त झालेला नाही. त्यामुळे संभ्रमावस्था कायम आहे.  - नारायण सावंत, जिल्हाध्यक्ष, गणेश मूर्तिकार संघटना.  संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3fRot6c

No comments:

Post a Comment