ट्रकचालकामुळे एकच खळबळ, वेंगुर्लेचे प्रकरण आहे तरी काय? वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - शहरातील भटवाडी येथील शासकीय गोदामातील ट्रकचालकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबतच्या माहितीला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्‍विनी माईणकर यांनी दुजोरा दिला.  ही व्यक्‍ती मूळ कोल्हापूर येथील रहिवाशी असून सध्या भटवाडी येथील काजू व्यावसायिक यांच्या इमारतीमागील भागात राहत होती. दोन दिवसांपूर्वी ताप आल्याने ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ले येथे तपासणीसाठी गेलेली होती. तेथून त्याला जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे पुढील तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाने त्या परिसराचा सर्व्हे करून याठिकाणी राहणाऱ्या दोन कुटुंबातील सर्वांचे स्वॅब नमुने घेतले आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या सर्व व्यक्‍तींची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. हा संपूर्ण परिसर पालिकेमार्फत निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे.  यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तहसीलदार प्रवीण लोकरे, पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर, डॉ. वजराटकर, पालिका नोडल अधिकारी सचिन काकड यांनी जागेची पाहणी केली. ती व्यक्ती राहत असलेला संपूर्ण परिसर दगडी कंपाऊंडने बंदिस्त असल्याने परिसर कटेंनमेंट झोन म्हणून घोषित केला असून या परिसराव्यतिरिक्‍त शहरातील इतर ठिकाणचे सर्व व्यवहार नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सुरू राहतील. सध्या हा रुग्ण जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे उपचार घेत असून लोकांनी घाबरु नये; परंतु नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष गिरप यांनी केले आहे.  मत्स्यविक्रेत्यांना आवाहन  कोरोना पोझिटिव्ह रूग्णाचा विचार करता कोरोनाचा प्रसार इतरत्र होवू नये, म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने दाभोली नाका येथे तात्पुरत्या स्वरुपात बसविलेले मत्स्यविक्रेत्यांना उद्यापासून (ता.18) गणेश चतुर्थीचा कालावधी संपेपर्यंत मांडवी रोड येथे बसविण्याचे नियोजन केले आहे. दाभोली नाका येथे सध्या ग्राहक व मच्छी विक्रेत्यांची गर्दी लक्षात घेता सोशल डिस्टसिंगचे पालन योग्यरितीने पाळले जात नाही, असे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात येत आहे. उद्यापासून सर्व मच्छी विक्रेत्यांनी मांडवी रोड येथे बसून मच्छी विक्री करावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले.  संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 17, 2020

ट्रकचालकामुळे एकच खळबळ, वेंगुर्लेचे प्रकरण आहे तरी काय? वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - शहरातील भटवाडी येथील शासकीय गोदामातील ट्रकचालकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबतच्या माहितीला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्‍विनी माईणकर यांनी दुजोरा दिला.  ही व्यक्‍ती मूळ कोल्हापूर येथील रहिवाशी असून सध्या भटवाडी येथील काजू व्यावसायिक यांच्या इमारतीमागील भागात राहत होती. दोन दिवसांपूर्वी ताप आल्याने ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ले येथे तपासणीसाठी गेलेली होती. तेथून त्याला जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे पुढील तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाने त्या परिसराचा सर्व्हे करून याठिकाणी राहणाऱ्या दोन कुटुंबातील सर्वांचे स्वॅब नमुने घेतले आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या सर्व व्यक्‍तींची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. हा संपूर्ण परिसर पालिकेमार्फत निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे.  यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तहसीलदार प्रवीण लोकरे, पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर, डॉ. वजराटकर, पालिका नोडल अधिकारी सचिन काकड यांनी जागेची पाहणी केली. ती व्यक्ती राहत असलेला संपूर्ण परिसर दगडी कंपाऊंडने बंदिस्त असल्याने परिसर कटेंनमेंट झोन म्हणून घोषित केला असून या परिसराव्यतिरिक्‍त शहरातील इतर ठिकाणचे सर्व व्यवहार नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सुरू राहतील. सध्या हा रुग्ण जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे उपचार घेत असून लोकांनी घाबरु नये; परंतु नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष गिरप यांनी केले आहे.  मत्स्यविक्रेत्यांना आवाहन  कोरोना पोझिटिव्ह रूग्णाचा विचार करता कोरोनाचा प्रसार इतरत्र होवू नये, म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने दाभोली नाका येथे तात्पुरत्या स्वरुपात बसविलेले मत्स्यविक्रेत्यांना उद्यापासून (ता.18) गणेश चतुर्थीचा कालावधी संपेपर्यंत मांडवी रोड येथे बसविण्याचे नियोजन केले आहे. दाभोली नाका येथे सध्या ग्राहक व मच्छी विक्रेत्यांची गर्दी लक्षात घेता सोशल डिस्टसिंगचे पालन योग्यरितीने पाळले जात नाही, असे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात येत आहे. उद्यापासून सर्व मच्छी विक्रेत्यांनी मांडवी रोड येथे बसून मच्छी विक्री करावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले.  संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/30q0u7V

No comments:

Post a Comment