पुण्यात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद ‘जीएसटी’तील जाचक तरतुदींबाबत केंद्र सरकारवर नाराजी पुणे - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायद्यातील जाचक तरतुदींच्या निषेधार्थ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) आयोजित केलेल्या देशव्यापी व्यापार बंदला शुक्रवारी पुण्यात (ता. २६) चांगला प्रतिसाद मिळाला. उपनगरांतही अनेक ठिकाणे दुकाने बंद होती. शहरातील लक्ष्मी रस्ता, नेहरू रस्ता, रविवार पेठ, वडारवाडी, पाषाण, सूस, कोथरूड, वारजे, सिंहगड रोड, धायरी, वडगाव बिबवेवाडी, खराडी, चंदननगर, धानोरी, कळस, विश्रांतवाडी, लोहगाव, पौड रोड, बीटी कवडे रोड, मुंढवा, शिवाजीनगर, कर्वेनगर, शास्त्रीनगर, नांदेड फाटा तसेच जिल्ह्यातील बंदला मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती ‘कॅट’चे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा रिटेल व्यापारी अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शहर आणि परिसरातील घाऊक आणि किरकोळ व्यवसायाची दुकाने बंद होती. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही भागांतील अत्यावश्यक सेवेशी संबंधित दुकाने सायंकाळी सहानंतर खुली झाली. काही व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा देत काळ्या फिती लावून दुकाने उघडी ठेवली. परंतु, त्यांची संख्या अत्यल्प होती. बंदमध्ये पुणे मर्च॔टस चेंबरसह पुणे व्यापारी महासंघातील सदस्य तसेच पिंपरी चिंचवड मधील ३८ व्यापारी संघटना सहभागी झाल्या. कायद्यात नेमक्या काय सुधारणा व्यापाऱ्यांना अपेक्षित आहेत, या बाबत कर सल्लागार असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री, व्यापारमंत्री, सेक्रेटरी यांना भेटून निवेदन दिले आहे. त्याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आले आहे, असे कुंभोजकर यांनी सांगितले. PIFF 2021: सिनेरसिकांनो, पिफच्या तारखांमध्ये बदल; महोत्सव पुढे ढकलला भुसार बाजारात कडकडीत बंद मार्केट यार्ड : मार्केटयार्डात दि पूना मर्चंट चेंबरने केलेल्या आवाहनाला घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. ‘कॅट’ महाराष्ट्रचे कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र बाठिया म्हणाले, ‘‘ जीएसटी करप्रणालीत चार वर्षात सुमारे एक हजार नोटिफिकेशन व सुधारणांमुळे ही कर प्रणाली अतिशय किचकट आणि गुंतागुंतीची ठरत आहे.’’ अजित बोरा म्हणाले, ‘‘ नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार आपली बाजू मांडण्याची संधी न देता कारवाई करणे, हे करदात्यावर अन्याय करणारे आहे.’’ मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल निवेदन सादर दि पूना मर्चंट चेंबर तर्फे जीएसटी कायद्यातील जाचक कायदे रद्द करण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी दि पूना मर्चंट चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा तसेच प्रवीण चोरबेले उपस्थित होते. प्रमुख मागण्या जीवनाश्यक खाद्यन्न वस्तूंवर जीएसटी नसावा एकदा भरलेले रिटर्न जर चुकीचे असेल तर ती दुरुस्त करण्याची तरतूद असावी. विविध प्रकारचे लेजर ठेवण्यापेक्षा जीएसटीचे एकच लेजर असावे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 26, 2021
0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3bGpZaJ
Read More