मराठी जगण्याची भाषा बनली पाहिजे - विलास पाटणे  रत्नागिरी - मराठी भाषेला केंद्र शासनाकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर स्वागत आहे. परंतु भाषा संवर्धनाचे प्रश्‍न त्यातून सुटणार नाहीत. गल्लोगल्ली मराठीचा वापर वाढणार नाही, दर्जेदार साहित्य निर्मिती होणार नाही, मराठी शाळांना चांगले दिवस येणार नाहीत. अभिजात भाषेचा मुद्दा भाषिक, वाड्‌.मयीन आणि सांस्कृतिक राहिलेला नसून तो केवळ "राजकीय' बनला आहे, असे प्रतिपादन लेखक ऍड. विलास पाटणे यांनी मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला केले.  "सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, राज्य मराठी विकास संस्थेला संचालक नाही, विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ अनुदानाविना रखडली आहे. मराठी भाषेच्या उत्कर्षाच्या दिशेने प्रयत्न होत नाहीत. तामिळ, कन्नड, तेलगू आणि मल्याळम भाषांना अभिजात दर्जा मिळाला म्हणून त्यांच्या दर्जात काहीच फरक पडला नाही. अभिजात भाषेचा दर्जा पुरातन, वाड्‌.मयीन रूपाशी संबंधित आहे.  भविष्यात ही योजना केंद्रशासन निधीअभावी बंद करतील किंवा आठव्या परिशिष्टातील सर्वच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव येईल. अभिजात दर्जाचा संबंध वारसा जतन करणेकरिता, संशोधनपूरक संख्या निर्मितीकरिता आहे, असेही ऍड. पाटणे यांनी स्पष्ट केले.  इंग्रजी भाषा अभिजात नाही, परंतु ती वर्तमानाची आणि भविष्याची भाषा आहे. ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीने फ्रेंच व जर्मनीला केव्हाच मागे टाकले आहे. अभिजाततेचा प्रश्‍न केवळ नकारात्मक मानसिकतेतून निर्माण झाला आहे. भाषा प्रवाही राहून अधिकाधिक वापरली तर अधिक समृद्ध होते. साहित्य विकास आणि भाषा विकास याची गफलत करता कामा नये. स्वतंत्र भाषा विद्यापीठ या एकाच छत्राखाली मराठी भाषेच्या संवंर्धनाचे प्रश्‍न आणले तरच मराठी प्रतिष्ठा वाढेल आणि जगण्याची भाषा बनेल.  - ऍड. विलास पाटणे       Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 26, 2021

मराठी जगण्याची भाषा बनली पाहिजे - विलास पाटणे  रत्नागिरी - मराठी भाषेला केंद्र शासनाकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर स्वागत आहे. परंतु भाषा संवर्धनाचे प्रश्‍न त्यातून सुटणार नाहीत. गल्लोगल्ली मराठीचा वापर वाढणार नाही, दर्जेदार साहित्य निर्मिती होणार नाही, मराठी शाळांना चांगले दिवस येणार नाहीत. अभिजात भाषेचा मुद्दा भाषिक, वाड्‌.मयीन आणि सांस्कृतिक राहिलेला नसून तो केवळ "राजकीय' बनला आहे, असे प्रतिपादन लेखक ऍड. विलास पाटणे यांनी मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला केले.  "सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, राज्य मराठी विकास संस्थेला संचालक नाही, विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ अनुदानाविना रखडली आहे. मराठी भाषेच्या उत्कर्षाच्या दिशेने प्रयत्न होत नाहीत. तामिळ, कन्नड, तेलगू आणि मल्याळम भाषांना अभिजात दर्जा मिळाला म्हणून त्यांच्या दर्जात काहीच फरक पडला नाही. अभिजात भाषेचा दर्जा पुरातन, वाड्‌.मयीन रूपाशी संबंधित आहे.  भविष्यात ही योजना केंद्रशासन निधीअभावी बंद करतील किंवा आठव्या परिशिष्टातील सर्वच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव येईल. अभिजात दर्जाचा संबंध वारसा जतन करणेकरिता, संशोधनपूरक संख्या निर्मितीकरिता आहे, असेही ऍड. पाटणे यांनी स्पष्ट केले.  इंग्रजी भाषा अभिजात नाही, परंतु ती वर्तमानाची आणि भविष्याची भाषा आहे. ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीने फ्रेंच व जर्मनीला केव्हाच मागे टाकले आहे. अभिजाततेचा प्रश्‍न केवळ नकारात्मक मानसिकतेतून निर्माण झाला आहे. भाषा प्रवाही राहून अधिकाधिक वापरली तर अधिक समृद्ध होते. साहित्य विकास आणि भाषा विकास याची गफलत करता कामा नये. स्वतंत्र भाषा विद्यापीठ या एकाच छत्राखाली मराठी भाषेच्या संवंर्धनाचे प्रश्‍न आणले तरच मराठी प्रतिष्ठा वाढेल आणि जगण्याची भाषा बनेल.  - ऍड. विलास पाटणे       Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3aWaVq4

No comments:

Post a Comment