पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात चार हजार ८८३ सदनिका उपलब्ध होणार  १६ एप्रिलला सकाळी ११ वाजता सोडत, ऑनलाइन नोंदणी ३० मार्चपर्यंत मुदत, साडेसात लाखांपासून ३२ लाखांपर्यंत सदनिका  पुणे - पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत पेठ क्रमांक १२ येथे चार हजार ८८३ सदनिकांच्या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. या प्रकल्पात आर्थिकदृष्टया दुर्बल गटासाठी तीन हजार ३१७ सदनिका तर, अल्प उत्पन्न गटासाठी एक हजार ५६६ सदनिका उपलब्ध होणार आहेत. आर्थिकदृष्टया दुर्बल गटासाठीची सदनिका सात लाख ४० हजार इतक्या किमतीत आणि अल्प उत्पन्न गटासाठी ३२ लाख रुपये इतक्या किमतीत सदनिका उपलब्ध होणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली. या सदनिकांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रियेचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी बारामती हॉस्टेल येथे करण्यात आला. विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी या वेळी उपस्थित होते.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या गृहप्रकल्पाची रेरा अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. रेराकडील नोंदणी प्रमाणपत्र २४ सप्टेंबर २०२० रोजी प्राप्त झाले आहे. या सदनिका विक्रीसाठी म्हाडाकडील ऑनलाइन लॉटरी सॉफ्टवेअर वापरण्यात येणार आहे. आर्थिकदृष्टया दुर्बल गटासाठी २९.५५ चौरस मीटर चटई क्षेत्राच्या तर, अल्प उत्पन्न गटासाठी ५९.२७ चौरस मीटर चटई क्षेत्राच्या सदनिका उपलब्ध होणार आहेत. गृहसंकुलातील नागरिकांच्या सोयीसाठी १४० दुकानांची योजना प्रस्तावित आहे. हा प्रकल्प टाटा मोटर्स व स्पाईन रस्त्याजवळ, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राजवळ असून, ११ मजल्याच्या एकूण ४५ इमारती होणार आहेत. PIFF 2021: सिनेरसिकांनो, पिफच्या तारखांमध्ये बदल; महोत्सव पुढे ढकलला  ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी ३० मार्चपर्यंत मुदत  ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी आणि चलन स्वीकृतीची मुदत ३० मार्च २०२१ पर्यंत रात्री ११.५९ वाजेपर्यंत राहील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिध्दी पाच एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर, सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिध्दी ९ एप्रिलला सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील. १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, आकुर्डी कार्यालयात सोडत होईल. अर्जासाठी शुल्क अनामत रक्कम इंटरनेट बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, क्रेडीट, डेबीट कार्ड अथवा रोख स्वरूपात भरता येईल. मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल अर्ज भरण्यापूर्वी माहितीसाठी संकेतस्थळ  www.pcntda.org.in अथवा http://lottery.pcntda.org.in  ई मेल spcntda@gmail.com  हेल्पलाइन क्रमांक १८००२०९१८० किंवा एचडीएफसी हेल्पलाइन क्रमांक ०२०-२७६५५५१३  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 26, 2021

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात चार हजार ८८३ सदनिका उपलब्ध होणार  १६ एप्रिलला सकाळी ११ वाजता सोडत, ऑनलाइन नोंदणी ३० मार्चपर्यंत मुदत, साडेसात लाखांपासून ३२ लाखांपर्यंत सदनिका  पुणे - पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत पेठ क्रमांक १२ येथे चार हजार ८८३ सदनिकांच्या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. या प्रकल्पात आर्थिकदृष्टया दुर्बल गटासाठी तीन हजार ३१७ सदनिका तर, अल्प उत्पन्न गटासाठी एक हजार ५६६ सदनिका उपलब्ध होणार आहेत. आर्थिकदृष्टया दुर्बल गटासाठीची सदनिका सात लाख ४० हजार इतक्या किमतीत आणि अल्प उत्पन्न गटासाठी ३२ लाख रुपये इतक्या किमतीत सदनिका उपलब्ध होणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली. या सदनिकांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रियेचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी बारामती हॉस्टेल येथे करण्यात आला. विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी या वेळी उपस्थित होते.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या गृहप्रकल्पाची रेरा अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. रेराकडील नोंदणी प्रमाणपत्र २४ सप्टेंबर २०२० रोजी प्राप्त झाले आहे. या सदनिका विक्रीसाठी म्हाडाकडील ऑनलाइन लॉटरी सॉफ्टवेअर वापरण्यात येणार आहे. आर्थिकदृष्टया दुर्बल गटासाठी २९.५५ चौरस मीटर चटई क्षेत्राच्या तर, अल्प उत्पन्न गटासाठी ५९.२७ चौरस मीटर चटई क्षेत्राच्या सदनिका उपलब्ध होणार आहेत. गृहसंकुलातील नागरिकांच्या सोयीसाठी १४० दुकानांची योजना प्रस्तावित आहे. हा प्रकल्प टाटा मोटर्स व स्पाईन रस्त्याजवळ, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राजवळ असून, ११ मजल्याच्या एकूण ४५ इमारती होणार आहेत. PIFF 2021: सिनेरसिकांनो, पिफच्या तारखांमध्ये बदल; महोत्सव पुढे ढकलला  ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी ३० मार्चपर्यंत मुदत  ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी आणि चलन स्वीकृतीची मुदत ३० मार्च २०२१ पर्यंत रात्री ११.५९ वाजेपर्यंत राहील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिध्दी पाच एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर, सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिध्दी ९ एप्रिलला सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील. १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, आकुर्डी कार्यालयात सोडत होईल. अर्जासाठी शुल्क अनामत रक्कम इंटरनेट बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, क्रेडीट, डेबीट कार्ड अथवा रोख स्वरूपात भरता येईल. मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल अर्ज भरण्यापूर्वी माहितीसाठी संकेतस्थळ  www.pcntda.org.in अथवा http://lottery.pcntda.org.in  ई मेल spcntda@gmail.com  हेल्पलाइन क्रमांक १८००२०९१८० किंवा एचडीएफसी हेल्पलाइन क्रमांक ०२०-२७६५५५१३  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3dWPPKp

No comments:

Post a Comment