कोरोना रुग्णांच्या दारातच महापालिका पाठवणार आता रुग्णवाहिका पुणे - कोरोनाची लागण होऊनही डॉक्टरांचा ‘सल्ला’ न घेतलेल्या आणि महापालिकेला कल्पना न दिलेल्या रुग्णांवर आता महापालिकेची नजर राहणार आहे. अशा रुग्णांच्या दारात रुग्णवाहिका पाठवून त्यांना थेट कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाणार आहे. हा नियम प्रत्येकासाठी लागू असेल. त्यामुळे घरीच विलग राहणाऱ्या रुग्णांपासून त्यांच्या नातेवाइकांना खूप काळजी घ्यावी लागेल. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोना झालेले, सौम्य किंवा लक्षणेच नसलेले रुग्ण घरीच विलगीकरणात राहाणे पसंत करीत आहेत. अशा रुग्णांची संख्या सध्या २९ हजारांच्या घरात असून, ती पुढील काही दिवसांत वाढण्याची चिन्हे आहेत. त्यातच या आजाराचा संसर्ग पसरणार नाही, याची काळजी रुग्ण घेत नसल्याचे दिसून आले आहे. परिणामी, रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोनाची साथ रोखण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून घरी असलेल्या रुग्णांशी मोबाईलद्वारे संपर्कात राहून उपचाराची चौकशी करण्याची व्यवस्था महापालिकेने केली आहे. तरीही घरीच राहणाऱ्या रुग्णांवर आता बारकाईने लक्ष ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यातून प्रत्येक रुग्णाच्या संपर्कात राहून त्यांना डॉक्टरांचा सल्ला घेण्यापासून त्यानंतरचे उपचारही घेण्याचे बंधनकारक केले आहे. त्याकडे काणाडोळा करणाऱ्यांना जबरदस्तीने कोविड केअर सेंटरमध्ये नेणार आहे. ज्यामुळे या रुग्णांना संसर्ग होणार नाही, असे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून स्पष्ट करण्यात आले. कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा रुग्णांच्या दारावर स्टिकर्स रुग्ण असलेल्या घरांच्या दारावर आता रुग्णांची माहिती असलेले स्टिकर्स लावण्यात येत आहेत. मात्र, तेही काढले जात असल्याचे दिसून आले आहे. अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत लावलेल्या स्टिकर्सची पाहणी केली जाणार आहे. अशी घ्या काळजी... रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत संसर्ग पसरणार नाही, यासाठी काळजी घ्यावी सोशल डिस्टन्सिंग पाळावे पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर त्यांच्या सल्ल्यानुसार रुग्णांनी घरी राहणे किंवा रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घ्यावा. जे रुग्ण घरीच विलगीकरणात राहतील, मात्र पुरेशी काळजी घेत नाहीत, त्यांना आता कोविड केअर सेंटरमध्ये ठेवून उपचार केले जातील. - डॉ. संजीव वावरे, प्रमुख, साथरोग नियंत्रण विभाग, महापालिका Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 30, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/39tV5C2 Read More Read more No comments:
न्यूट्रिनो - अक्षय ऊर्जेचा स्रोत! पृथ्वीवर अहोरात्र उपलब्ध ‘न्यूट्रिनो’ या मूलभूत कणाला वस्तुमान असल्याचे सिद्ध झाले आणि साऱ्या जगाचे लक्ष त्याकडे वेधले गेले. या न्यूट्रिनोपासून विद्युत ऊर्जा मिळविण्यासाठी जर्मनीचा न्यूट्रिनो एनर्जी ग्रुप कार्यरत आहे. नुकतेच या ग्रुपने भारतातील सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट)सोबत सहकार्य करार केला आहे. न्यूट्रिनो एनर्जी प्रत्यक्षात येणे शक्य आहे का? त्याची व्यावहारिकता किती? अशा अनेक प्रश्नांसंबंधी या ग्रुपचे सदस्य आणि ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्याशी साधलेला संवाद... प्रश्न - प्रकाशीय विद्युत परिणामाच्या (फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट) शोधानंतर प्रत्यक्ष सौर विद्युत घट अस्तित्वात यायला मोठा कालावधी लागला. न्यूट्रिनोला वस्तुमान असल्याचे नुकतेच सिद्ध झाले आहे. याचा न्यूट्रिनो विद्युत घटापर्यंतचा प्रवास कितपत व्यवहारिक आहे? डॉ. विजय भटकर - आपण जेव्हा ब्रह्मांड कोणत्यातरी ऊर्जेवर चालते असे म्हणतो. तेव्हा आपल्यासाठी ती सूर्याची ऊर्जा असते. तिच्यापासूनच तयार झालेल्या जीवसृष्टीतील विविध घटकांपासून आपण ऊर्जेची गरज भागवतो. अगदी लाकडांच्या जाळण्यापासून ते खनिज तेल आणि सौर विद्युत ऊर्जेपर्यंत! पारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर कार्बनचे उत्सर्जन होते. पर्यायाने जागतिक हवामान बदलाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. न्यूट्रिनोच्या निमित्ताने एक नवीन, अमर्याद आणि सर्वत्र उपलब्ध कण ऊर्जेच्या निर्मितीसाठी उपलब्ध झाला आहे. न्यूट्रिनो वस्तुमान असल्याचे जपानी शास्त्रज्ञ ताकाकी काजिता आणि कॅनडाचे आर्थर मॅकडॉनल्ड या शास्त्रज्ञांनी सिद्ध केले. एकदा की न्यूट्रिनोपासून पदार्थामध्ये विभवांतर (पोटेंशियल डिफरन्स) तयार करता आले तर, आपल्याला अहोरात्र ऊर्जेचा स्रोत मिळेल. जर्मनीत या संशोधनासाठी प्रा. होलगर यांच्या नेतृत्वात न्यूट्रिनो एनर्जी ग्रुप स्थापन झाला असून, त्या ग्रुपला शांतीप्रिय देशांसोबत हे संशोधन पुढे न्यायचे आहे. म्हणून त्यांनी मागील वर्षीच भारतीय शास्त्रज्ञांशी संवाद साधला. सी-मेटवर इलेक्ट्रॉनिक्स पदार्थांवर काम करत असल्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यातूनच एक सहकार्य करार (एमओसी) करण्यात आला. त्यातूनच एक कल्पना समोर आली. इलॉन मस्कने जसे ‘टेस्ला’ ही मोटार तयार केली. त्याचप्रमाणे न्यूट्रिनो एनर्जीपासून ‘पाय कार’ करण्याची कल्पना समोर आली. गणितातील ‘पाय’ची किंमत ३.१४..... पुढे वाढतच जाते. म्हणजे ‘अक्षय’ असते. म्हणून आम्ही या कारला ‘पाय कार’ असे नाव दिले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारताची न्यूट्रिनो एनर्जी संशोधनात भूमिका नक्की काय राहील? सरकार आणि उद्योगांचा सहभाग आवश्यक आहे का? इलेक्ट्रॉनिक पदार्थांसंबंधीच्या संशोधनासाठी सी-मेटची महत्त्वपूर्ण भूमिका असेल. पदार्थांचा शोध घेणे, त्यांची चाचणी करणे, ते प्रत्यक्षात वापरात येण्यासाठी कार्य करण्यात येईल. सौर विद्युत घटाच्या माध्यमातून ऊर्जाक्षेत्रात जी क्रांती झाली. त्यामध्ये चीन आघाडीवर होता. कारण तिथे उपलब्ध असलेले पदार्थांचे मुबलक साठे, सरकारने संशोधन आणि विकासात घातलेले लक्ष, खासगी उद्योगांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला. आपल्याकडे तसे होऊ शकले नाही. पर्यायाने चीन जगाच्या बाजारपेठेत खूप पुढे निघून गेला. न्यूट्रिनो एनर्जीसंदर्भात संशोधनामध्ये आपण अगदी सुरवातीपासून लक्ष घालायला हवे. कारण त्यातून स्वामित्व हक्क मिळतील. भविष्यातील या ऊर्जेचा उद्गाता म्हणून आपण पुढाकार घ्यायला हवा. उद्योगांकडे दूरदृष्टी असायला हवी. कारण त्यांना प्रत्यक्ष काही दाखविल्याशिवाय ते संशोधनात सहभागी होणार नाही. त्यांना प्रत्यक्ष प्रोटोटाइप तयार करून दाखवावा लागेल. तसे झाल्यावरच आम्ही उद्योगांचे लक्ष वेधू शकू. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पदार्थ शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन करावे लागणार? यासाठी निधी कसा उपलब्ध करणार? प्रोटोटाइप विकसित करण्यापर्यंतचा प्रवासही खूप मोठा आहे. त्यासाठीही मोठ्या प्रमाणावर निधी लागेल. न्यूट्रिनो एनर्जी ग्रुपला २.५ अब्ज डॉलरची आवश्यकता आहे. त्यासाठी जर्मनीतील ग्रुप प्रयत्न करत आहे. देशात तरी सी-मेट संशोधनाशी निगडित कार्य करणार आहे. आवश्यकतेनुसार इतर संशोधन संस्थांची मदत घेतली जाईल. नव्या ऊर्जास्रोतांच्या शोधाने मानवाचा इतिहास बदलला. न्यूट्रिनो एनर्जी आपण यशस्वीपणे प्रत्यक्षात उतरवू शकलो तर भारताचे भवितव्य बदलेल का? न्यूट्रिनो एनर्जीत खरंच ‘पोटेंशियल’ आहे. आपण खरंच जर यांच्यापासून विद्युत ऊर्जा मिळवू शकलो. तर हा अक्षय ऊर्जेचा स्रोत ठरेल. ज्या देशाकडे ही ऊर्जा असेल तो देश अधिराज्य गाजवेल. त्यामुळे हा शोध केवळ भारतासाठीच नाही तर, जगासाठी मोठा बदल ठरेल. न्यूट्रिनो एनर्जीसाठी आम्ही प्रथम घरगुती वापराचे उपकरणे, मोबाईलवर काम करणार आहोत. एक प्रकारे वस्तूंचे आवरणच या पदार्थांपासून बनविले जाईल आणि अहोरात्र ऊर्जा मिळेल. स्वातंत्र्यानंतर आपण सरकारच्या नियंत्रणात सर्व काही करत गेलो. त्यामुळे आपण बंद वातावरणात काम करत गेलो. देशात आयटी क्षेत्र आल्यामुळे लालफितीचा कारभार जरा दूर झाला आहे. परकीय चलनही देशात आले. पर्यायाने उद्योगांचा संशोधनात सहभाग वाढेल अशी स्थिती आहे. रोजगार निर्मिती आता ही नव्याने निर्माण होणाऱ्या क्षेत्रातूनच होईल. आपल्याकडे आयटी, बायोइन्फॉर्मेटिक, एआय आदी नवीन क्षेत्र आले पर्यायाने रोजगार निर्मिती झाली. त्यामुळे सुरवातीपासूनच आपण न्यूट्रिनो एनर्जीच्या संशोधनात असायला हवे. आपण अजूनही संशोधनावर सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या एका टक्क्यापेक्षा कमी खर्च करतो? अशा स्थितीत असे मोठे संशोधन अपेक्षित आहे का? सी-मेटमध्येही शास्त्रज्ञांची संख्या वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आधीपेक्षा आता स्थिती सुधारली असून, सरकारनेही आता जास्त लक्ष द्यायला हवे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून संशोधनात विद्यापीठांची आणि उद्योगांची भूमिका अभिप्रेत झाली आहे. जगातील सर्वाधिक ९९३ विद्यापीठे भारतात आहेत. अर्थात त्यांच्या गुणवत्तेसंबंधी प्रश्न असेल. पण जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. आपण पुढे पाहत सकारात्मक दृष्टीने विचार करायला हवा. खासगी क्षेत्रानेही यात पुढे यायला हवे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 30, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3u8a3FD Read More Read more No comments:
‘सातबारा’मधील घोळ सुरूच; हवेली तालुक्यात सर्वाधिक त्रुटी पुणे - सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र आणि प्रत्यक्षातील क्षेत्रात असलेली तफावत, नावातील चुका, चुकीच्या नोंदी अशा विविध ४६ प्रकारच्या त्रुटी असलेले राज्यात सुमारे ३ लाख ५९ हजार सातबारा उतारे आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात सर्वाधिक चार हजार उतारे असल्याचे दिसून आले आहे. विसंगती असलेल्या सातबारा उताऱ्यावरील जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबविण्यात आले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा राज्यातील सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास ९८.५० टक्के उताऱ्यांतील त्रुटी दूर करून त्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. अद्यापही ३ लाख ५९ हजार उताऱ्यांमध्ये विसंगती आणि त्रुटी असून, त्यापैकी ६७ हजार उताऱ्यांमध्ये क्षेत्राची नोंद चुकीची असल्याचे समोर आले आहे. मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून त्यामध्ये दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. राज्यात सहा विभाग असून, प्रत्येक विभागात सातबारा उताऱ्यामध्ये नोंदी घेण्याची पद्धत चुकीची आहे. त्यातून सातबारा उताऱ्यामध्ये विसंगती निर्माण झाल्या आहेत. अशा सुमारे ४६ प्रकाराच्या विसंगती असल्याचे दिसून आले आहे. त्या निश्चित करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा राज्यातील स्थिती २ कोटी ५४ लाख एकूण सातबारा उतारे ३ लाख ५९ हजार त्रुटी असलेले उतारे पुणे जिल्ह्यातील स्थिती १४ लाख ९२ हजार ४४५ एकूण उतारे २८ हजार ९०० त्रुटी असलेले उतारे १६ हजार ४५५ क्षेत्रामध्ये तफावत अचूक सातबारा उताऱ्यासाठी महसूल विभागाचे सर्व तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी कष्ट घेतले आहे. विसंगती असलेले उतारे अचूक करण्याचे काम सुरू आहे. - रामदास जगताप, समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 30, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3rwwi6w Read More Read more No comments:
सातारा मार्गावरील टोलवसुली थांबवा; नितीन गडकरींकडे मागणी पुणे - देहूरोड-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण वेळेत पूर्ण न करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. गेल्या दहा वर्षांपासून हे काम रखडले असल्यामुळे एक एप्रिलपासून या रस्त्यावरील टोल वसुली स्थगित करावी, असेही मंचने म्हटले आहे. पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी होता, त्याच्या सहापदरीकरणाचे काम १ ऑक्टोबर २०१० रोजी सुरू झाले. मूळ कंत्राटाप्रमाणे हे काम ३१ मार्च २०१३ पर्यंत संपणे अपेक्षित होते, मात्र काम अद्याप सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामाला सातत्याने मुदतवाढ देण्याशिवाय काहीही केलेले नाही. या अपूर्ण कामामुळे गेल्या ११ वर्षात या रस्त्यावर शेकडो अपघात झाले आणि अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले. मात्र महामार्ग प्राधिकरण दरवर्षी कंत्राटदाराला टोलचे दर मात्र वाढवून देत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा प्राधिकरणाने आजवर कंत्राटदाराला अनेक नोटिसा दिल्या आहेत, पण पुढे कारवाई काहीच केलेली नाही, असे मंचचे विवेक वेलणकर यांनी गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा या गोष्टींकडे लक्ष द्या रस्त्यावर अनेक कामे प्रलंबित आहेत अनेक ठिकाणी सेवा रस्ताच अस्तित्वात नाही जिथे आहे तिथे त्याची अवस्था अनेक ठिकाणी दयनीय आहे संपूर्ण रस्त्याची देखभाल व दुरुस्ती कंत्राटदाराने करणे अपेक्षित आहे त्यावर प्राधिकरणाने लक्ष ठेवणे आवश्यक आहे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची आपण या पूर्वी दोन वेळा घोषणा केली होती अद्याप ते काम पूर्ण झालेले नाही Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 30, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/2PmtRGv Read More Read more No comments:
नदीतील जलपर्णीला सांडपाण्याचे 'खत-पाणी' पिंपरी - डासांच्या उच्छादामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याला कारणीभूत आहे ती जलपर्णी. ती फोफावली आहे सांडपाणी, रासायनिक द्रव्ये व विनाप्रक्रिया पाणी तसेच, नाल्यांमधून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे. मात्र, वर्षानुवर्षे पवना, इंद्रायणी, मुळा-मुठा नद्यांना वेढलेल्या या हिरव्या पसाऱ्याला अधिकाऱ्यांचे उदासीन धोरण, टक्केवारी आणि राजकीय गटबाजी तितकीच कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. शहरात उघड्या नाल्यांची व गटारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. संसर्गजन्य आजाराला आणि जलपर्णी फोफावण्याला सांडपाणी कारणीभूत ठरत आहे. मोठ्या चतुराईने सांडपाणी नदीत सोडले गेले आहे. त्यामुळे डास व कीटकांचा प्रादूर्भाव वाढला आहे. नायट्रोजन व फॉस्फेट हे पोषक घटक जलपर्णीला मिळाल्याने ती वाढत आहे. बऱ्याच सांडपाण्याच्या ठिकाणी बाजूला भराव टाकलेला आहे. त्यामुळे सांडपाण्याचा मार्ग बुजविण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी केला आहे, तर काही ठिकाणी थेट पाणी नदीत सोडले गेले आहे. जलपर्णीला सांडपाणी पोषक असून, यासाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनाही लाभदायी आहे. यांत्रिक व मानवी पद्धतीने जलपर्णीची साफसफाई होत आहे. तरीही पूर्णतः सांडपाणी रोखल्यास जलपर्णी वाढीला शंभर टक्के आळा बसेल. सांडपाण्यामुळे जलपर्णी जोमाने येत आहे. दोन महिन्यांत नदीचे पात्र जलपर्णीने पूर्ण भरते इतका मोठा वेग या वाढीचा आहे. त्यामुळे डास जलपर्णीच्या तळाशी जाऊन अंडी घालतात. या डासांची पैदास पाण्यात वाढल्याने डासोत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. नदीतील प्रदूषण कमी झाल्याशिवाय या जलपर्णीला आळा बसणार नसल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या हव्यात उपाययोजना - सांडपाण्याला प्रतिबंध करण्यासाठी आंदोलनाची गरज ड्रेनेज, पर्यावरण, आरोग्य विभागांकडील जबाबदाऱ्यांची निश्चिती संपूर्ण एमआयडीसी परिसरासाठी भुयारी गटारे एमआयडीसीला स्वतंत्र मैला शुद्धीकरण प्रकल्प जबाबदार अधिकारी व पारदर्शी धोरण ड्रेनेज विभागाचे अधिकारी म्हणतात... ज्या भागात तक्रारी येतात, त्या भागातील सांडपाण्याची विल्हेवाट लावली जाते. वाल्हेकरवाडी राजयोग व किवळे देहूरोड जवळील सिम्बायोसिस भागातील दुरुस्ती नुकतीच केली आहे. नदी स्वच्छता पर्यावरणाकडे, तर जलपर्णी आरोग्य विभागाकडे आहे. आधी सांडपाण्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्यामुळे किचकट कामे आरोग्य विभागाच्या गळ्यात टाकून पर्यावरण विभाग निश्चित राहतो. या दोन विभागात ताळमेळ नाही. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जलपर्णीची निविदा प्रक्रिया २०२० मध्ये झाली आहे. मागील वर्षी अर्धे काम करून ते पुन्हा सुरू केले आहे. सध्या दापोडी, सांगवी, किवळे, बोपखेल, केजुबाई बंधाऱ्यामध्ये जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ५५० टन जलपर्णी उचलली आहे. सुमारे २० टक्के सांडपाण्याचे नदीतील प्रमाण कमी होणे गरजेचे आहे. दररोजचे आम्ही व्हिडिओ घेतो. काही ठिकाणी जलपर्णी काढण्यासाठी पोचणे अवघड आहे. जानेवारीपासून जलपर्णीत मोठी वाढ झाली आहे. दोन कोटी ३० लाखांचे काम आहे. - डॉ. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग पाहणीत काय? ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने काही ठिकाणी भेटी दिल्या. त्या वेळी सांडपाणी सोडण्यासाठी केलेल्या विविध युक्त्या निदर्शनास आल्या. थेरगाव येथील छत्रपती शिवाजी नाल्याजवळ असलेले मोठे उभे चेंबर काही ठिकाणी फुटले आहे. त्यातून २४ तास सांडपाणी गळती सुरू आहे. तसेच, नदीच्या पाण्यापर्यंत चर काढून सांडपाण्याला मोकळी वाट करून दिली आहे. त्यामुळे सांडपाणी थेट नदीत मिसळले जाते. जुनी सांगवीतील चंद्रमणीनगरमध्ये एखाद्या झऱ्याप्रमाणे नाल्याचे पाणी खळखळ वाहत नदीत जाते. या ठिकाणी आजूबाजूला पाइप पडलेले आहेत. पिंपळे गुरवमधील जय भवानीनगर या ठिकाणी हीच परिस्थिती आहे. पिंपरी कॅम्पमधील मिलिंदनगर व थेरगावातील छत्रपती शिवाजी चौकातही सांडपाण्याचा परिसर झुडपांनी वेढला आहे. आजूबाजूला मोठे दगड आहेत. त्यामुळे या भागात पोहचणेदेखील अवघड आहे. सांडपाण्यावर हिरवेगार शेवाळ साचलेले आहेत. त्यामुळे सांडपाणीदेखील काही ठिकाणी तुंबले आहेत. डबकी तयार झाली आहेत. सर्रास सांडपाण्याच्या ठिकाणी चर खोदून पाणी नदीत सोडण्याची शक्कल लढविली आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/3cDVcNv Latest news updates March 30, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/31wR6jA Read More Read more No comments:
स्पर्धा परीक्षांची तयारी करताय?; मग, चालू घडामोडींच्या अभ्यासासाठी 'ही' आहेत सर्वोत्कृष्ट YouTube चॅनेलस् सातारा : चालू घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी आपण बर्याचदा युट्यूबचा वापर करत असतो. चालू घडामोडींच्या व्हिडिओंमधून आपण खरोखर बरेच काही शिकू शकता. चालू घडामोडींबद्दल बोलायचं झाल्यास यूट्यूबवरती याविषयी बरेच व्हिडिओ उपलब्ध आहेत. परंतु, त्यापैकी काही मोजकेच अचूक, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह माहिती देतात. म्हणूनच, चालू घडामोडींशी संबंधित कोणता व्हिडिओ YouTube वरून डाउनलोड केला जावा, हे देखील पाहणे आवश्यक आहे. चालू घडामोडींची सर्व माहिती YouTube चॅनेलद्वारे एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. काही YouTube चॅनेलस् त्यांच्या क्रमवारीत सर्वोत्कृष्ट आहेत, ज्या आपल्याला बातम्या डाउनलोड करण्यासाठी प्रवृत्त करताहेत. आज YouTube वर बरेच विनामूल्य चॅनेल आहेत, जे चालू घडामोडी तयार करण्यात खूप मदत करू शकतात. परंतु, असेही अनेक चॅनेल आहेत जे केवळ वेळेचा अपव्यय सिद्ध करतात. यूट्यूब एक चॅनेल आहे, ज्यावर आपण थोड्या काळामध्ये चालू घडामोडींसाठी अचूक तयारी करू शकता. चालू घडामोडींच्या बातम्यांव्यतिरिक्त, त्यास संबंधित प्रश्न देखील त्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत, की नाही हे देखील पहा. स्पर्धात्मक परीक्षेत केवळ चालू घडामोडींच्या बातमीच नव्हे, तर त्यासंदर्भात विविध प्रकारचे प्रश्नही विचारले जातात. म्हणूनच, एक चांगली सूचना आहे, की जर आपल्याला युट्यूब वाहिन्यांद्वारे चालू घडामोडी आणि त्यासंबंधित प्रश्नांची बातमी एकाच ठिकाणी मिळाली तर आपल्यासाठी ते अधिक चांगले होईल. UPSC Important Books : NCERT हे पुस्तकं वाचा आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हा प्रासंगिकता, सामग्रीची गुणवत्ता, सादरीकरणाची पद्धत आणि प्रभावीपणाच्या आधारावर आम्ही या चॅनेलचे मूल्यांकन केल्यानंतर त्यांना निवडले आहे. मग, चला तर जाणून घेऊयात सर्वोत्कृष्ट YouTube चॅनेलसबद्दल.. जागरण जोश : चालू घडामोडींच्या विषयावर विविध यूट्यूब चॅनेल्स अस्तित्वात असले, तरी जागरण जोश यूट्यूब चॅनेलने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये यूट्यूब वाहिन्यांमधील चालू घडामोडींविषयी माहिती देते. त्यामध्ये दिलेल्या सर्व ताज्या बातम्या आपल्याला अद्ययावत ठेवतात. या व्यतिरिक्त यूट्यूब चॅनेलमधील जागरण जोशबद्दल एक मुख्य गोष्ट म्हणजे, ती परीक्षेनुसार चालू घडामोडींविषयी माहिती प्रदान करते. पदवीधारकांसाठी बँकेत नोकरीची संधी! मिळेल 48 हजार महिना पगार, असा करा अर्ज राज्यसभा टीव्ही : हे राज्यसभेचे अधिकृत चॅनेल आहे. या चॅनेलद्वारे उमेदवारास घरात बसून चालू घडामोडींविषयी आणि विविध प्रकारच्या सरकारी योजनांबद्दल तपशीलवार माहिती मिळू शकते. या चॅनेलचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, तज्ञांच्या अचूक टिप्पण्या आणि विचारविनिमय देखील उपलब्ध आहे, जे चालू घडामोडींशी संबंधित विविध प्रकारच्या मुद्द्यांविषयी माहिती देते. येथे मंत्री आणि सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांच्या मुलाखती देखील पहायला मिळतात. लोकसभा टीव्ही : हे लोकसभेचे अधिकृत चॅनेल आहे. या चॅनेलद्वारे आपल्याला चालू घडामोडींशी संबंधित विविध प्रकारच्या मुद्द्यांची माहिती मिळू शकते. या चॅनेलवर लोकसभेच्या कार्यवाहीच्या थेट कव्हरेज व्यतिरिक्त हे सामाजिक, आर्थिक आणि घटनात्मक विषयांवर देखील प्रसारित करते. त्याच्या प्रसारणामध्ये, सांस्कृतिकदृष्ट्या थीम असलेले कार्यक्रम तसेच भारतीय भाषांमधील पुरस्कारप्राप्त चित्रपटांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. तरुणांनो, देशसेवेची मोठी संधी; भारतीय सैन्यदलात मोठ्या प्रमाणात भरती; परीक्षाही नाही पीआयबी इंडियाः भारत सरकारबद्दल माहिती प्रसारित करण्यासाठी हे चॅनेल प्रेस इन्फॉर्मेशन ऑफिसद्वारे चालविली जाते. पीआयबी इंडिया हे सरकारचे मुखपत्र आहे, जे सरकारच्या दैनंदिन कामकाजाचा मागोवा ठेवते. चालू घडामोडींच्या तयारीसाठी हे चॅनेल खूप महत्वाचे आहे. याशिवाय आपण दूरदर्शन, ऑल इंडिया रेडिओ सारख्या सरकारी विभागांचे यूट्यूब चॅनेल डाऊनलोड करू शकता. वर नमूद केलेल्या वाहिन्यांचा उत्तम वापर करून परीक्षक चालू घडामोडी व त्यासंबंधित विषयांची माहिती ठेवू शकतो. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3sAzFe2 Read More Read more No comments:
BSNLचा 108 रुययांचा रीचार्ज प्लॅन, फ्री कॉलिंगसह 1 जीबी डेटा तेही 60 दिवसांसाठी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या बहुतेक रिचार्ज प्लॅन त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्या जिओ, एअरटेल आणि Vi पेक्षा स्वस्त आणि दीर्घ वैधता असणारे आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी बीएसएनएलचा असाच एक रिचार्ज प्लॅनविषयी जाणून घेणार आहोत. हा प्लॅन 60 दिवसांपर्यंतच्या वैधतेसह येतो, ज्यामध्ये आपल्याला दररोज डेटा आणि कॉलिंगसारखे फायदे मिळतात. त्याचबरोबर इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत या प्लॅनची किंमत खूपच किफायतशीर आहे. जिओ, एअरटेल आणि व्ही (व्होडाफोन आयडिया) डेली डेटा असणार यासारख्या कोणतीही प्लॅन देत नाहीत. बीएसएनएलची 108 रुपयांची प्रीपेड प्लॅन अंतर्गत ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळते, ज्यात दिल्ली आणि मुंबई एमटीएनएल नेटवर्कचा समावेश आहे. अमर्यादित कॉलिंग व्यतिरिक्त ही योजना अमर्यादित डेटा बेनिफीट देखील देतो. तसोच 1 जीबी डेटा संपल्यानंतरत तुमच्या इंटरनेटची गती 80 केबीपीएस पर्यंत कमी होते. याचा अर्थ असा की आपण 108 रुपयांच्या योजनेमध्ये दररोज केवळ 1 जीबी हाय-स्पीड डेटा वापरू शकता. तसेच या योजनेत तुम्हाला एकूण 500 एसएमएस देखील फ्री मिळतात. याआधी हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येत असे, परंतु दूरसंचार क्षेत्रात वाढती स्पर्धा लक्षात घेता कंपनीने आपल्या प्रीपेड योजनेची वैधता 28 दिवसांवरून 60 दिवसांपर्यंत वाढविली आहे. जर आपण बीएसएनएलच्या या प्लॅनची तुलना इतर टेलिकॉम कंपन्यांच्या प्लॅनशी केली तर जिओ प्रीपेड या किंमतीच्या 125 रुपये किंमतीच्या प्लॅनमध्ये आपल्याला केवळ 28 दिवसांची वैधता मिळेल. 28 दिवसांच्या वैधतेसह, आपल्याला दररोज 0.5 GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग आणि एकूण 300 एसएमएस फ्री मिळतात. त्याचबरोबर, एअरटेल 129 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 24 दिवसांच्या वैधतेसह 1 जीबी डेटा देण्यात येतो, ज्यामध्ये अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस फ्री आहे. व्ही 129 रुपयांची प्लॅनमध्ये 24 दिवसांच्या वैधतेसह 2 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस फ्री आहेत. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3rwDb7P Read More Read more No comments:
तुमच्या मुलाला वारंवार तहान लागत तर नाही ना? उत्तर हो असेल तर व्हा सावधान, असू शकतो हा आजार नागपूर : शरीरातील पाणी कमी झाल्यास आपल्याला आपोआप तहान लागते. तहान लागण्याची क्रिया ऋतू अनुसार बदलू शकते. म्हणजे थंडीत जास्त तहान लागत नाही. पावसाळयातही कमीच तहान लागते. मात्र, उन्हाळ्यात कितीही पाणी प्या तहान काही भागात नाही. मात्र, खूप तहान लागते. कितीही पाणी प्यायला तरी तहान काही भागात नाही. सतत घसा कोरडा पडतो. असे तुमच्या मुलांच्या बाबतीत घडत असेल तर सावधान! तुमच्या मुलाला वारंवार तहान लागत असेल तर सावधगिरी बाळगायला हवी. वारंवार लागणारी तहान मुलाला धोकादायक आजाराकडे घेऊन जाऊ शकते. वारंवार तहान लागणे, भूक वाढणे आणि वारंवार लघवी होणे हे मुलांमध्ये मधुमेहाचे लक्षण असू शकते. यामुळे मुलांचे डोळेही जाऊ शकते. मुलांमध्ये साखरेच्या विलक्षण पातळीमुळे त्यांना जास्त तहान लागते. अधिक वाचा - घनदाट जंगलात अजूनही उभा आहे अष्टकोनी वाडा, २०० एकर जमीनदारी असलेला परिवार एका रात्रीत झाला होता गरीब तुमचे मुलं वारंवार रस, कोल्ड्रिंक आणि पाणी यासारख्या गोष्टींची मागणी करत असेल तर आजच सावधान होऊन जा. तुमच्या मुलांना जास्त तहान येत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. जेणेकरून मधुमेहावर वेळेवर उपचार करता येतील. मधुमेहाची इतर लक्षणे देखील मुलांमध्ये दिसू शकतात. असे घडत असल्यास ते धोकादायक आहे. जाणून घेऊया यावरील उपाय... जास्त भूक लागण मधुमेहाने ग्रस्त असलेले मुले नेहमी भूक लागल्याची तक्रार करीत असतात. त्यांना कितीही आहार दिला तरी शरीरात ऊर्जेचा अभाव असतो. ऊर्जा कमतरतेवर मात करण्यासाठी त्यांना सतत काहीतरी खावसं वाटते. मात्र, मधुमेहामुळे मुलाने किती खाल्ले तरी त्याचे वजन वाढत नाही. मधुमेह ग्रस्त मुलांमध्ये इन्सुलिनचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे त्यांच्या शरीरात सतत ऊर्जेची कमतरता असते. इतर मुलांच्या तुलनेत ते सुस्त राहतात. तुमच्या मुलांमध्ये अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. वारंवार लघुशंका लागणे भूक आणि तहान जाणवण्याबरोबरच वारंवार बाथरूममध्ये जाणे देखील मुलांमध्ये मधुमेहाचे एक प्रमुख लक्षण असू शकते. मोठ्या रुग्णांमध्येही अशी लक्षणे दिसली आहेत. आपल्या मुलामध्ये हे लक्षण दिसत असल्यास सावधगिरी बाळगा. त्यांना मधुमेह असू शकतो. म्हणून, वेळीच त्यांच्यावर उपचार करा. मधुमेहाचे प्रकार मधुमेहाचे प्रमुख दोन प्रकार आहेत. टाइप एक डायबिटीजला इन्सिपिडस म्हणूनही पुष्कळजण ओळखतात. टाइप एक मधुमेहामुळे शरीरात अँटी-डायरेटिक हार्मोनजी (एडीएच) कमतरता उद्भवते. यामुळे आपले शरीर इन्सुलिनचे उत्पादन थांबवते. टाइप दोन मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये इन्सुलिन आवश्यकतेपेक्षा कमी असतो. अशा परिस्थितीत आपले शरीर इन्सुलिनची ओळख पटवू शकत नाही. यामुळे शरीरात याचा वापर थांबतो. म्हणूनच टाइप दोन मधुमेहास इन्सुलिन प्रतिरोधकता देखील म्हटले जाते. अधिक माहितीसाठी - ...अन् नववधू पतीचा मृतदेह घेऊनच पोहोचली सासरी, हिरव्या मंडपातूनच निघाली अंत्ययात्रा मुलांना मधुमेहापासून कसे वाचवाल नियमित व्यायाम करा जंक फूडपासून दूर रहा तणावापासून दूर रहा मोबाईलवर जास्त खेळू नका मैदानी खेळ खेळायला सांगा साखरेचे सेवन कमी करा पांढरी ब्रेड, मिठाई, पेस्ट्री, सोडा आणि इतर रिफायनरी वस्तूंचा वापर कमी करा संकलन व संपादन - नीलेश डाखोरे (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी ‘सकाळ ऑनलाइन’चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3u5jdD0 Read More Read more No comments:
उन्हाळ्यात ऑफिसला जाताना बॅगमध्ये ठेवा या गोष्टी! त्वचेचे होईल संरक्षण उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये आवश्यक असणाऱ्या संबंधित गोष्टींशिवाय तुम्हाला या कोरोनाच्या काळात या गोष्टी तुम्ही तुमच्या त्वचेचे संरक्षण कराल. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगत आहोत, त्याशिवाय तुमची ऑफिस बॅग पूर्ण होणार नाही. जरी आता ऑफिस खुली झाली असली तरी कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे संपला नाही. अशा परिस्थितीत, दुर्लक्ष करणे आपल्यासाठी आणि इतर लोकांसाठी धोकादायक ठरू शकते. म्हणून आपण आपल्या उन्हाळ्याच्या वर्क बॅगमध्ये ठेवा या गोष्टी हॅंडसॅनिटायझर ऑफिस खुली झाली असली तरी कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे संपला नाही. अशा परिस्थितीत, दुर्लक्ष करणे आपल्यासाठी आणि इतर लोकांसाठी धोकादायक ठरू शकते. म्हणून आपण आपल्या उन्हाळ्याच्या वर्क बॅगमध्ये हॅंड सॅनिटायझर ठेवणे फार महत्वाचे आहे. याद्वारे आपण आपल्या हातांना संक्रमणापासून अगदी सहजतेने वाचवू शकता. हँडक्रिम वर्क बॅगमध्ये हँडक्रिमची गरज आहे? वास्तविक, आपण ऑफिसमध्ये बराच वेळ घालवला आणि त्यादरम्यान आपल्याला बर्याच वेळा हात धुण्याची किंवा हाताने स्वच्छ करणारे औषध वापरावे लागेल. परंतु वारंवार हात धुण्यामुळे हातात कोरडेपणा येतो. म्हणूनच, आपल्या हातांचा ओलावा कायम ठेवण्यासाठी आपण हँडक्रीम लावावी. परफ्युम उन्हाळ्याच्या दिवसात आपण बॅगमध्ये परफ्युम किंवा रोल-ऑन डीओ लावावा. वास्तविक, ऑफिसला जाताना प्रवास करताना शरीरावर घाम येणे आणि वास येणे सुरू होते. जे ऑफिसमधील आपल्या इंप्रेशनवर परिणाम करते. अशा परिस्थितीत घामावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि घामाचा वास कमी करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे आपल्या ऑफिस बॅगमध्ये परफ्यूम किंवा रोल-ऑन डीओओ ठेवणे. एसपीएफ युक्त लिप बाम आता मास्क घालणे अनिवार्य असल्याने ओठांवर लिपस्टिक लावणे आवश्यक नाही. आपल्या ऑफिस लूकमध्ये आपण टिन्टेड लिप बाम देखील ठेवू शकता. आपण आपल्या वर्क बॅगमध्ये वस्तू टाकताना त्यामध्ये एसपीएफसह लिप बाम ठेवा. मास्कमुळे तुमचे कोरोना संक्रमणापासून संरक्षण झाले पाहिजे, परंतु ते सूर्याच्या हानिकारक किरणांपासून पूर्णपणे संरक्षण करणार नाही. अशा परिस्थितीत आपण एसपीएफ असलेल्या लिप बामच्या मदतीने आपल्या ओठांची काळजी घेऊ शकता. आपण ऑफिसमध्ये दर 2-3 तासांनी पुन्हा लावू शकता. सनस्क्रीन उन्हाळ्यात किरणांपासून त्वचेचे संरक्षण करणे फार महत्वाचे आहे. या प्रकरणात, सनस्क्रीन आपला साथीदार बनू शकेल. जरी आपण सनस्क्रीनसह घराबाहेर गेलात तरीही त्याचा प्रभाव दोन-तीन तासांत संपेल आणि इनडोअरही सनस्क्रीन आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या वर्क बॅगमध्ये सनस्क्रीन ठेवणे महत्वाचे आहे. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/31vtFHA Read More Read more No comments:
मुलांचा ताप कमी करण्यासाठी करा हिंगाचा वापर; होतात आश्चर्यकारक फायदे नागपूर : लहान मुलांमधील ताप काळजी करायला लावणारा असतो. मुलाला ताप असेल तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी ताप किती वाजता व किती आला होता, कोणते औषध दिले, ताप किती वेळात उतरला या सर्व गोष्टींची नोंद एका कागदावर करून ठेवावी. जेणेकरून डॉक्टरांनाही उपचार करणे सोपे होते. बऱ्याचदा तापामध्ये विश्रांती पुरेशी असते. जर बाळ तापात पण हसत-खेळत असेल, व्यवस्थित खात-पीत असेल, ताप उतरल्यावर उत्तमपणे खेळत असेल तर हा गंभीर आजार नाही. तापात बाळ उलटी करत असेल, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी असेल तर ताप गंभीर आजारामुळे असू शकतो. जेव्हा लहान मुलांना ताप येतो, तेव्हा काय करावे समजत नाही. त्यांचं ताप कमी करण्यासाठी आपली धावपळ सुरू असते. लहान मूल बोलू शकत नाही. त्यांना ताप आला तर खूप वेदना होतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे औषध देऊ शकत नाही किंवा आपण त्यांना काहीही देऊ शकत नाही. जेणेकरून त्यांचा ताप बरा होईल. ‘बच्चा काबील बनो कामयाबी झक मारके पिछे भागेगी’; तरुणाने ‘बीएमडब्ल्यू’ सोडून करिअर केले डिझाइन परंतु, आम्ही तुम्हाला एक पर्याय सांगणार आहोत. हा पर्याय म्हणजे घरगुती उपाय. याचा अवलंब केल्यास लहान मुलांना थोडा आराम मिळेल. आता तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की अशी कोणती कृती आहे जी लहान मुलाचा ताप बरा करू शकते. ते म्हणजे हिंग. हिंग ही प्रत्येकाच्या घरात असतेच. हिंगामध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये बाळाचा ताप बरं करण्याची क्षमता असते. चला तर जाणून घेऊ हिंगाद्वारे बाळाचा ताप कसा कमी करता येऊ शकतो... असा करा हिंगाचा वापर रात्री अपरात्री मुलाला ताप आला तर डॉक्टराकडे नेणे अवघड होते. अशा परिस्थितीत मुलांचा ताप कमी करण्यासाठी हिंगाची पट्टी द्यावी. आता तुम्ही म्हणाल यासाठी जास्त हिंग लागेल. पण असे काहीही नाही. हिंग पट्टी लावण्यासाठी तुम्हाला फक्त चिमूटभर हिंगाचा गरज आहे. असा करा वापर हिंग पट्टी लावण्यासाठी हिंगाबरोबर कागदाचा छोटा तुकडा आणि चम्मचभर पाण्याची गरज पडते. एक छोट्या चमच्यात चिमूटभर हिंग टाका. तसेच काही थेंब पाणी टाका. हिंग व्यवस्थित मिसळली की कागदाचा तुकडा सिक्याच्या आकारात कापून घ्या. आता त्याला हिंगाच्या पाण्यात भिजवून मुलाच्या डोक्याच्या बाजूला लावा. आपण हे पट्टी डोक्याच्या दोन्ही बाजूंनी लावावी. यानंतर उरलेले पाणी गळ्याजवळ लावावे. थोड्या वेळाने आपण पहाल की मुलाचे शरीराचे तापमान कमी झालेले दिसेल. जर ताप बरा होत नसेल तर मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जा. जेणेकरून तापाचे कारण ज्ञात होईल आणि योग्य वेळीच त्यावर उपचार होईल. जाणून घ्या - भीषण अपघात : होळीच्या दिवशीच चार मजुरांवर काळाचा घाला; ८ गंभीर जखमी कोणत्या वयापर्यंत लावू शकता पट्टी साधारणपणे एक महिन्यापासून पाच वर्षांच्या मुलांना हिंगपट्टी लावता येते. याने त्याचा ताप बऱ्याच प्रमाणात कमी होतो. पट्टी लावल्याने आराम मिळाल्यास मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. हा उपाय केल्यानंतरही ताप जात नसेल तर त्वरित मुलाला घेऊन डॉक्टरकडे जा. मुलांना हिंग देण्याचे इतर फायदे पोटाचा त्रास बरा होतो तोंडात अळी, हिरड्यांमधून रक्तस्त्राव यासारख्या समस्या दूर होऊ शकतात पचन ठीक राहते भूक वाढविण्यात मदत करते रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते संकलन व संपादन - नीलेश डाखोरे (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3cAthxM Read More Read more No comments:
आपल्या कपड्यांसह अशी करा 'केप्स' स्टाईल! जाणून घ्या भन्नाट टिप्स नाशिक : विवाहसोहळ्यासाठी आउटफिट्स निवडताना, बहुतेक स्त्रिया लेहेंगा, साडी, अनारकली सूट, संध्याकाळी गाउन आणि शरारा कुर्ता पसंत करतात. परंतु आपण स्टायलिश आणि मोहक लुक देण्यासाठी डिझाइनर कॅप्स देखील जोडी करू शकता. स्टाईलिश आणि मोहक दिसण्यासाठी महिलांकडे बरेच पर्याय आहेत. विशेषत: जेव्हा आउटफिट्सचा विचार केला जातो तेव्हा हे पर्याय आणखीनच वाढतात. डिझाइनर कॅप्सच्या या भन्नाट टिप्स एकदा वाचाच... टाय आणि डाय केप्स आपल्याला लेहेंगासह स्कार्फ घालायचा नसल्यास स्कार्फऐवजी आपण टाय आणि डाय 'कॅप्स घेऊ शकता. लेहेंगासह तुम्हा स्कार्फ किंवा कॅरीसह स्टाईलिश केप परिधान करू शकता. आपल्याला लेहेंगासह एक मॅचिंग केप घालायचा नसल्यास आपण मिक्स घालू शकता आणि निव्वळ, शिफॉन, ऑर्गनझा किंवा रेशीम फॅब्रिक केपसह जुळवू शकता. स्टाईलिश गाउनसह केप बाजारामध्ये आपल्याला बर्याच इंडो वेस्टर्न स्टाईलचे डिझायनर गाऊन मिळतील. जर आपल्याला ठळक आणि मोहक लुक हवा असेल तर आपण कॉर्सेट शैली, ट्यूब स्टाईल किंवा स्ट्रॅप स्लीव्हवर शिफॉन किंवा नेट केप ठेवू शकता. शॉर्ट केप शैली जर तुम्हाला घेरदार आणि ओढणीसारखा केप नको हवा असेल. तर अशा प्रकारचे शॉर्ट केप देखील कॅरी करू शकता आणि यामुळे ओढणीची कमतरता भासत नाही. एवढेच नव्हे तर या प्रकारच्या ड्रेसमध्ये तुम्हाला परिपूर्ण इंडो-वेस्टर्न लुकही मिळतो एम्ब्रोडायरी केप साडी स्टाईलिश करण्यासाठी एम्ब्रोडायरी केपचाही वापर करू शकता. यामुळे तुमच्या साडीचा लूक आणखी ग्रेसफुल आणि मोहक दिसून येईल. आपल्यालाही असे लूक हवे असेल तर आपल्या साडीशी जुळणारी केप डिझाइन करण्यासाठी तसेच या प्रकारची केप जॅकेट ब्लाउज लुक देण्यासाठी एक चांगला बुटीक डिझायनर मिळू शकेल. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3waXdIE Read More Read more No comments:
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३० मार्च २०२१ पंचांग - मंगळवार : फाल्गुन कृष्ण २, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.३१ सूर्यास्त ६.४६, चंद्रोदय रात्री ८.३४, चंद्रास्त सकाळी ७.४२, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.४८, संत तुकाराम बीज, भारतीय सौर चैत्र ९ शके १९४३. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १६६५ : पुरंदर किल्ल्याला वेढा घालणाऱ्या मोगल सेनापती दिलेरखान व मिर्झाराजे जयसिंह यांच्या फौजेशी लढताना मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडले. १९९३ : रंगाचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे नामवंत चित्रकार एस. एम. पंडित यांचे निधन. २००० : भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के. कस्तुरीरंगन, प्रसिद्ध कादंबरीकार आर. के. नारायण, ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया आणि ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘पद्मविभूषण’ सन्मान प्रदान. दिनमान - मेष : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रियजनांसाठी खर्च कराल. मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. काहींची वैचारिक प्रगती होईल. कर्क : गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. कामे मार्गी लागतील. सिंह : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. जिद्द व चिकाटी वाढेल. कन्या : उधारी व उसनवारी वसूल होईल. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. तुळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. वृश्चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. धनु : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मकर : व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील. नवी दिशा व नवा मार्ग दिसेल. कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल. कामात सुयश लाभेल. मीन : कौटुंबिक जीवनात चिंता लागून राहील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3cAycP6 Read More Read more No comments:
सिंधुदुर्गातील आणखी पाच शाळांना प्रयोगशाळा ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजावा, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. यापूर्वी समग्र शिक्षा अभियानमधून जिल्ह्यात 44 जिल्हा परिषदेच्या शाळांना अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा पुरविण्यात आलेल्या आहेत. आता नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत आणखी पाच शाळांना विज्ञान प्रयोगशाळा मंजूर करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हा नियोजनमधून 80 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षणा बरोबर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक गोडवा रुजला पाहिजे. विज्ञान अभ्यासाबाबत आत्मीयता निर्माण झाली पाहिजे. तरच उद्या जिल्ह्यातून वैज्ञानिक तयार होणार आहेत; मात्र यासाठी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शाळेत सुसज्ज व अत्याधुनिक उपकरणे असलेली प्रयोगशाळा आवश्यक आहे. त्यामुळे याचा विचार करीत प्राथमिक शिक्षण विभागाने "विज्ञान प्रयोग शाळा' ही नाविन्यपूर्ण योजना तयार केली आहे. तसा प्रस्ताव तयार करीत जिल्हा नियोजनकडे मागणी केली होती. जिल्हा नियोजन मंडळाने त्याला मान्यता दिली. पालकमंत्री उदय सामंत यानी यासाठी 80 लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आणखी पाच शाळांमध्ये विज्ञान प्रयोग शाळा सुरु होणार असल्याचे निश्चित झाले आहे. 520 उपकरणे शक्य या विज्ञान प्रयोग शाळेत एकूण 520 विज्ञान उपकरणे असणार आहेत. त्यामध्ये भौतिक, रासायनिक व जीवशास्त्र सामग्रीचा समावेश आहे. ही अत्याधुनिक विज्ञान प्रयोग शाळा असून यासाठी सबंधित शिक्षाकाना प्रशिक्षित केले जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली. उपकरणे कशी हाताळावी. प्रयोग कसे करावे ? एखाद्या उपकरणाचा उपयोग काय ? ही प्रयोगशाळा दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाला जोडलेली असून सर्व इयत्ताचे अभ्यासक्रम येथे प्रयोगातून अभ्यासता येणार आहेत. या आहेत पाच शाळा *हेत क्रमांक 1 केंद्र शाळा (वैभववाडी) *इळये क्रमांक 1 (देवगड) *कासार्डे क्रमांक 1 (कणकवली) *पडवे क्रमांक 1 (कुडाळ) *मळेवाड क्रमांक 1 (सावंतवाडी) पाच शाळा विज्ञान प्रयोगशाळा उपक्रमाअंतर्गत निवडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक पटसंख्या हा एकमेव निकष लावला आहे. या शाळेला परिसरातील शाळा जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे नजिकच्या शाळांतील मुलांनाही या प्रयोगशाळेचा उपयोग होणार आहे. - एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 29, 2021 0 Comments via Tajya news Feeds https://ift.tt/3djqFU1 Read More Read more No comments: