नदीतील जलपर्णीला सांडपाण्याचे 'खत-पाणी' पिंपरी - डासांच्या उच्छादामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याला कारणीभूत आहे ती जलपर्णी. ती फोफावली आहे सांडपाणी, रासायनिक द्रव्ये व विनाप्रक्रिया पाणी तसेच, नाल्यांमधून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे. मात्र, वर्षानुवर्षे पवना, इंद्रायणी, मुळा-मुठा नद्यांना वेढलेल्या या हिरव्या पसाऱ्याला अधिकाऱ्यांचे उदासीन धोरण, टक्केवारी आणि राजकीय गटबाजी तितकीच कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. शहरात उघड्या नाल्यांची व गटारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. संसर्गजन्य आजाराला आणि जलपर्णी फोफावण्याला सांडपाणी कारणीभूत ठरत आहे. मोठ्या चतुराईने सांडपाणी नदीत सोडले गेले आहे. त्यामुळे डास व कीटकांचा प्रादूर्भाव वाढला आहे. नायट्रोजन व फॉस्फेट हे पोषक घटक जलपर्णीला मिळाल्याने ती वाढत आहे. बऱ्याच सांडपाण्याच्या ठिकाणी बाजूला भराव टाकलेला आहे. त्यामुळे सांडपाण्याचा मार्ग बुजविण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी केला आहे, तर काही ठिकाणी थेट पाणी नदीत सोडले गेले आहे. जलपर्णीला सांडपाणी पोषक असून, यासाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनाही लाभदायी आहे. यांत्रिक व मानवी पद्धतीने जलपर्णीची साफसफाई होत आहे. तरीही पूर्णतः सांडपाणी रोखल्यास जलपर्णी वाढीला शंभर टक्के आळा बसेल. सांडपाण्यामुळे जलपर्णी जोमाने येत आहे. दोन महिन्यांत नदीचे पात्र जलपर्णीने पूर्ण भरते इतका मोठा वेग या वाढीचा आहे. त्यामुळे डास जलपर्णीच्या तळाशी जाऊन अंडी घालतात. या डासांची पैदास पाण्यात वाढल्याने डासोत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. नदीतील प्रदूषण कमी झाल्याशिवाय या जलपर्णीला आळा बसणार नसल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या हव्यात उपाययोजना - सांडपाण्याला प्रतिबंध करण्यासाठी आंदोलनाची गरज ड्रेनेज, पर्यावरण, आरोग्य विभागांकडील जबाबदाऱ्यांची निश्‍चिती संपूर्ण एमआयडीसी परिसरासाठी भुयारी गटारे   एमआयडीसीला स्वतंत्र मैला शुद्धीकरण प्रकल्प  जबाबदार अधिकारी व पारदर्शी धोरण ड्रेनेज विभागाचे अधिकारी म्हणतात... ज्या भागात तक्रारी येतात, त्या भागातील सांडपाण्याची विल्हेवाट लावली जाते. वाल्हेकरवाडी राजयोग व किवळे देहूरोड जवळील सिम्बायोसिस भागातील दुरुस्ती नुकतीच केली आहे. नदी स्वच्छता पर्यावरणाकडे, तर जलपर्णी आरोग्य विभागाकडे आहे. आधी सांडपाण्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्यामुळे किचकट कामे आरोग्य विभागाच्या गळ्यात टाकून पर्यावरण विभाग निश्चित राहतो. या दोन विभागात ताळमेळ नाही. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जलपर्णीची निविदा प्रक्रिया २०२० मध्ये झाली आहे. मागील वर्षी अर्धे काम करून ते पुन्हा सुरू केले आहे. सध्या दापोडी, सांगवी, किवळे, बोपखेल, केजुबाई बंधाऱ्यामध्ये जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ५५० टन जलपर्णी उचलली आहे. सुमारे २० टक्के सांडपाण्याचे नदीतील प्रमाण कमी होणे गरजेचे आहे. दररोजचे आम्ही व्हिडिओ घेतो. काही ठिकाणी जलपर्णी काढण्यासाठी पोचणे अवघड आहे. जानेवारीपासून जलपर्णीत मोठी वाढ झाली आहे. दोन कोटी ३० लाखांचे काम आहे. - डॉ. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग पाहणीत काय? ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने काही ठिकाणी भेटी दिल्या. त्या वेळी सांडपाणी सोडण्यासाठी केलेल्या विविध युक्त्या निदर्शनास आल्या. थेरगाव येथील छत्रपती शिवाजी नाल्याजवळ असलेले मोठे उभे चेंबर काही ठिकाणी फुटले आहे. त्यातून २४ तास सांडपाणी गळती सुरू आहे. तसेच, नदीच्या पाण्यापर्यंत चर काढून सांडपाण्याला मोकळी वाट करून दिली आहे. त्यामुळे सांडपाणी थेट नदीत मिसळले जाते. जुनी सांगवीतील चंद्रमणीनगरमध्ये एखाद्या झऱ्याप्रमाणे नाल्याचे पाणी खळखळ वाहत नदीत जाते. या ठिकाणी आजूबाजूला पाइप पडलेले आहेत. पिंपळे गुरवमधील जय भवानीनगर या ठिकाणी हीच परिस्थिती आहे. पिंपरी कॅम्पमधील मिलिंदनगर व थेरगावातील छत्रपती शिवाजी चौकातही सांडपाण्याचा परिसर झुडपांनी वेढला आहे. आजूबाजूला मोठे दगड आहेत. त्यामुळे या भागात पोहचणेदेखील अवघड आहे. सांडपाण्यावर हिरवेगार शेवाळ साचलेले आहेत. त्यामुळे सांडपाणीदेखील काही ठिकाणी तुंबले आहेत. डबकी तयार झाली आहेत. सर्रास सांडपाण्याच्या ठिकाणी चर खोदून पाणी नदीत सोडण्याची शक्कल लढविली आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/3cDVcNv - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 30, 2021

नदीतील जलपर्णीला सांडपाण्याचे 'खत-पाणी' पिंपरी - डासांच्या उच्छादामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याला कारणीभूत आहे ती जलपर्णी. ती फोफावली आहे सांडपाणी, रासायनिक द्रव्ये व विनाप्रक्रिया पाणी तसेच, नाल्यांमधून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे. मात्र, वर्षानुवर्षे पवना, इंद्रायणी, मुळा-मुठा नद्यांना वेढलेल्या या हिरव्या पसाऱ्याला अधिकाऱ्यांचे उदासीन धोरण, टक्केवारी आणि राजकीय गटबाजी तितकीच कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. शहरात उघड्या नाल्यांची व गटारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. संसर्गजन्य आजाराला आणि जलपर्णी फोफावण्याला सांडपाणी कारणीभूत ठरत आहे. मोठ्या चतुराईने सांडपाणी नदीत सोडले गेले आहे. त्यामुळे डास व कीटकांचा प्रादूर्भाव वाढला आहे. नायट्रोजन व फॉस्फेट हे पोषक घटक जलपर्णीला मिळाल्याने ती वाढत आहे. बऱ्याच सांडपाण्याच्या ठिकाणी बाजूला भराव टाकलेला आहे. त्यामुळे सांडपाण्याचा मार्ग बुजविण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी केला आहे, तर काही ठिकाणी थेट पाणी नदीत सोडले गेले आहे. जलपर्णीला सांडपाणी पोषक असून, यासाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनाही लाभदायी आहे. यांत्रिक व मानवी पद्धतीने जलपर्णीची साफसफाई होत आहे. तरीही पूर्णतः सांडपाणी रोखल्यास जलपर्णी वाढीला शंभर टक्के आळा बसेल. सांडपाण्यामुळे जलपर्णी जोमाने येत आहे. दोन महिन्यांत नदीचे पात्र जलपर्णीने पूर्ण भरते इतका मोठा वेग या वाढीचा आहे. त्यामुळे डास जलपर्णीच्या तळाशी जाऊन अंडी घालतात. या डासांची पैदास पाण्यात वाढल्याने डासोत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. नदीतील प्रदूषण कमी झाल्याशिवाय या जलपर्णीला आळा बसणार नसल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या हव्यात उपाययोजना - सांडपाण्याला प्रतिबंध करण्यासाठी आंदोलनाची गरज ड्रेनेज, पर्यावरण, आरोग्य विभागांकडील जबाबदाऱ्यांची निश्‍चिती संपूर्ण एमआयडीसी परिसरासाठी भुयारी गटारे   एमआयडीसीला स्वतंत्र मैला शुद्धीकरण प्रकल्प  जबाबदार अधिकारी व पारदर्शी धोरण ड्रेनेज विभागाचे अधिकारी म्हणतात... ज्या भागात तक्रारी येतात, त्या भागातील सांडपाण्याची विल्हेवाट लावली जाते. वाल्हेकरवाडी राजयोग व किवळे देहूरोड जवळील सिम्बायोसिस भागातील दुरुस्ती नुकतीच केली आहे. नदी स्वच्छता पर्यावरणाकडे, तर जलपर्णी आरोग्य विभागाकडे आहे. आधी सांडपाण्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्यामुळे किचकट कामे आरोग्य विभागाच्या गळ्यात टाकून पर्यावरण विभाग निश्चित राहतो. या दोन विभागात ताळमेळ नाही. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जलपर्णीची निविदा प्रक्रिया २०२० मध्ये झाली आहे. मागील वर्षी अर्धे काम करून ते पुन्हा सुरू केले आहे. सध्या दापोडी, सांगवी, किवळे, बोपखेल, केजुबाई बंधाऱ्यामध्ये जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ५५० टन जलपर्णी उचलली आहे. सुमारे २० टक्के सांडपाण्याचे नदीतील प्रमाण कमी होणे गरजेचे आहे. दररोजचे आम्ही व्हिडिओ घेतो. काही ठिकाणी जलपर्णी काढण्यासाठी पोचणे अवघड आहे. जानेवारीपासून जलपर्णीत मोठी वाढ झाली आहे. दोन कोटी ३० लाखांचे काम आहे. - डॉ. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग पाहणीत काय? ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने काही ठिकाणी भेटी दिल्या. त्या वेळी सांडपाणी सोडण्यासाठी केलेल्या विविध युक्त्या निदर्शनास आल्या. थेरगाव येथील छत्रपती शिवाजी नाल्याजवळ असलेले मोठे उभे चेंबर काही ठिकाणी फुटले आहे. त्यातून २४ तास सांडपाणी गळती सुरू आहे. तसेच, नदीच्या पाण्यापर्यंत चर काढून सांडपाण्याला मोकळी वाट करून दिली आहे. त्यामुळे सांडपाणी थेट नदीत मिसळले जाते. जुनी सांगवीतील चंद्रमणीनगरमध्ये एखाद्या झऱ्याप्रमाणे नाल्याचे पाणी खळखळ वाहत नदीत जाते. या ठिकाणी आजूबाजूला पाइप पडलेले आहेत. पिंपळे गुरवमधील जय भवानीनगर या ठिकाणी हीच परिस्थिती आहे. पिंपरी कॅम्पमधील मिलिंदनगर व थेरगावातील छत्रपती शिवाजी चौकातही सांडपाण्याचा परिसर झुडपांनी वेढला आहे. आजूबाजूला मोठे दगड आहेत. त्यामुळे या भागात पोहचणेदेखील अवघड आहे. सांडपाण्यावर हिरवेगार शेवाळ साचलेले आहेत. त्यामुळे सांडपाणीदेखील काही ठिकाणी तुंबले आहेत. डबकी तयार झाली आहेत. सर्रास सांडपाण्याच्या ठिकाणी चर खोदून पाणी नदीत सोडण्याची शक्कल लढविली आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/3cDVcNv


via Tajya news Feeds https://ift.tt/31wR6jA

No comments:

Post a Comment