Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, September 3, 2020

पुण्यात कोरोनाने मुत्यमुखी पडलेल्यांवर अत्यंसंस्कारासाठी सात स्मशानभूमी

पुणे - कोरोनाने मृत्युमुखी पडत असलेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आणखी सात स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली आहे. यापूर्वी कैलास आणि येरवडा येथीलच स्मशानभूमीत ही व्यवस्था होती. मात्र त्यावर येणारा ताण आणि अंत्यसंस्कारासाठी लागणारा वेळ लक्षात घेता अन्य सात ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेचे विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी याविषयी माहिती दिली. कैलास आणि येरवडा या दोन स्मशानभूमींमध्ये प्रत्येकी दोन दाहिनी असून, तेथे 24 तास अंत्यसंस्काराची सोय करण्यात आली आहे. मात्र अन्य सात स्मशानभूमींवर सकाळी 8 ते रात्री 12 या कालावधीत मृतदेह दहनाची सोय करण्यात आली आहे.

दारुच्या नशेत तो पोलिसांना म्हणाला, 'मला गाडी पकडून द्या घरी जायचंय'!

औंध, पाषाण, कात्रज, धनकवडी, मुंढवा, कोरेगावपार्क आणि बिबवेवाडी स्मशानभूमी याठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी अन्य मृतकांवरही अंत्यसंस्कार होणार असून, ते पूर्वीप्रमाणे 24 तास सुरू राहणार आहेत. मात्र करोना मृतकांवर सकाळी 8 ते रात्री 12 या कालावधीतच अंत्यसंस्कार होतील. 

इंडो-चायना संबंधावर शरद पवारांनी तज्ज्ञांशी केली चर्चा; राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी लावली हजेरी

कैलास प्रमाणे प्रत्येक दाहिनीसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या मागणीनुसार वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे. हॉस्पिटलकडून वाहनांची मागणी करताना मृत व्यक्तीचे नाव, संबंधित डॉक्‍टरचे नाव आणि संपर्क क्रमांक देणे आवश्‍यक राहिल. 
प्रत्येक दाहिनीमध्ये दोन शीतपेटींची व्यवस्था करण्यात आली आहे. 

- Video : अखेर पुणेकरांची इच्छा झाली पूर्ण; तब्बल पाच महिन्यांनी केला 'पीएमपी'तून प्रवास!​

कोरोना मृतकांच्या अंत्यविधीसाठी विद्युत विभागाने कार्यपद्धती निश्‍चित केली असून ती पुढील प्रमाणे 
- कोविड क्रिमेशन नावाने महापालिकेने व्हॉटसऍप ग्रुप तयार केला असून त्यामध्ये सर्व हॉस्पिटलमधील डॉक्‍टर जोडले आहेत. 
- कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींचे नाव, वय, पत्ता आणि त्यांच्या नातेवाईंकाचे नाव, संपर्क क्रमांक याची माहिती यावर ग्रुपवर देण्यात येणार. 
- मृत व्यक्तीचे आधार कार्ड, नातेवाईंकाचे आधार कार्ड या कागदपत्रांची पूर्तता करणे, अंत्यविधी पास तयार करण्यात येणार 
- रूग्णालयांना ऍम्युलंन्स व वाहनाची व्यवस्था करणे यासाठी संपर्क क्रमांक- 9689939628, 020-24503211/12 
- या शिवाय वाहनचालकांनी करायचे कामे, वाहन नियंत्रण कक्षाने करायची कामे, दाहिनीतील कर्मचाऱ्यांनी करायची कामे, नातेवाईकांनी करायची कामे आणि वॉर्ड मेडिकल ऑफिसर यांनी करायच्या कामांचीही कार्यपद्धती निश्‍चित करण्यात आली आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यात कोरोनाने मुत्यमुखी पडलेल्यांवर अत्यंसंस्कारासाठी सात स्मशानभूमी पुणे - कोरोनाने मृत्युमुखी पडत असलेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आणखी सात स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली आहे. यापूर्वी कैलास आणि येरवडा येथीलच स्मशानभूमीत ही व्यवस्था होती. मात्र त्यावर येणारा ताण आणि अंत्यसंस्कारासाठी लागणारा वेळ लक्षात घेता अन्य सात ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापालिकेचे विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी याविषयी माहिती दिली. कैलास आणि येरवडा या दोन स्मशानभूमींमध्ये प्रत्येकी दोन दाहिनी असून, तेथे 24 तास अंत्यसंस्काराची सोय करण्यात आली आहे. मात्र अन्य सात स्मशानभूमींवर सकाळी 8 ते रात्री 12 या कालावधीत मृतदेह दहनाची सोय करण्यात आली आहे. दारुच्या नशेत तो पोलिसांना म्हणाला, 'मला गाडी पकडून द्या घरी जायचंय'! औंध, पाषाण, कात्रज, धनकवडी, मुंढवा, कोरेगावपार्क आणि बिबवेवाडी स्मशानभूमी याठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी अन्य मृतकांवरही अंत्यसंस्कार होणार असून, ते पूर्वीप्रमाणे 24 तास सुरू राहणार आहेत. मात्र करोना मृतकांवर सकाळी 8 ते रात्री 12 या कालावधीतच अंत्यसंस्कार होतील.  इंडो-चायना संबंधावर शरद पवारांनी तज्ज्ञांशी केली चर्चा; राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी लावली हजेरी कैलास प्रमाणे प्रत्येक दाहिनीसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या मागणीनुसार वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे. हॉस्पिटलकडून वाहनांची मागणी करताना मृत व्यक्तीचे नाव, संबंधित डॉक्‍टरचे नाव आणि संपर्क क्रमांक देणे आवश्‍यक राहिल.  प्रत्येक दाहिनीमध्ये दोन शीतपेटींची व्यवस्था करण्यात आली आहे.  - Video : अखेर पुणेकरांची इच्छा झाली पूर्ण; तब्बल पाच महिन्यांनी केला 'पीएमपी'तून प्रवास!​ कोरोना मृतकांच्या अंत्यविधीसाठी विद्युत विभागाने कार्यपद्धती निश्‍चित केली असून ती पुढील प्रमाणे  - कोविड क्रिमेशन नावाने महापालिकेने व्हॉटसऍप ग्रुप तयार केला असून त्यामध्ये सर्व हॉस्पिटलमधील डॉक्‍टर जोडले आहेत.  - कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींचे नाव, वय, पत्ता आणि त्यांच्या नातेवाईंकाचे नाव, संपर्क क्रमांक याची माहिती यावर ग्रुपवर देण्यात येणार.  - मृत व्यक्तीचे आधार कार्ड, नातेवाईंकाचे आधार कार्ड या कागदपत्रांची पूर्तता करणे, अंत्यविधी पास तयार करण्यात येणार  - रूग्णालयांना ऍम्युलंन्स व वाहनाची व्यवस्था करणे यासाठी संपर्क क्रमांक- 9689939628, 020-24503211/12  - या शिवाय वाहनचालकांनी करायचे कामे, वाहन नियंत्रण कक्षाने करायची कामे, दाहिनीतील कर्मचाऱ्यांनी करायची कामे, नातेवाईकांनी करायची कामे आणि वॉर्ड मेडिकल ऑफिसर यांनी करायच्या कामांचीही कार्यपद्धती निश्‍चित करण्यात आली आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hXfDF7
Read More
8 सप्टेंबरपासून नेस्को कोविड वॉर्डमधील रुग्णांवर होणार आवाजाची चाचणी

मुंबई: आवाजावरून 30 सेकंदांत कोरोनाचे निदान करणाऱ्या प्रायोगिक चाचणीला गोरेगावच्या नेस्को कोरोना सेंटरमध्ये येत्या 8 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. आतापर्यंत या चाचणीवर ट्रायल सुरु असून याबाबतचे प्रशिक्षण इथल्या डॉक्टरांना देण्यात आल्याची माहिती नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली आहे. 

नेस्को कोविड सेंटरच्या कंट्रोल रूममध्ये सध्या यावर काम सुरु असून या अॅपमध्ये कसे काम करायचे याबाबतचे ट्रेनिंग पुर्ण झाले आहे. सध्या 6 जणांची टिम या मोबाईल ऍपवर काम करतेय. यातील दोन डॉक्टर वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांची सर्व माहिती घेतील आणि बाकीचे सर्व डॉक्टर्स कंट्रोल रुममधून त्यांना मॉनिटर करतील. 

सध्या त्यासाठी मोबाईल ऍपच्या स्वरूपातील दोन उपकरणांचा वापर केला जाणार आहे. या पद्धतीने कोरोनाची 80 टक्के अचूक चाचणी करता येते, असा दावा हे उपकरण बनवणाऱ्या 'व्होकोलिस हेल्थ' या इस्रायली कंपनीने केला आहे. 500 कोरोना रुग्णांवर होणारा देशातील हा अशा प्रकारचा पहिला प्रयोग आहे.

हेही वाचाः प्लाझ्मा दानासाठी महिलाही घेताहेत पुढाकार; अनेक महिलांनी व्यक्त केली प्लाझ्मादानाची इच्छा

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका अहोरात्र मेहनत घेत आहे. कोरोनाच्या 'आरटी-पीसीआर' चाचणीसह अर्ध्या तासात निदान होणाऱ्या अँटिजेन चाचण्यांची संख्याही वाढवली गेली आहे. मात्र, आता अँटिजेनपेक्षाही अधिक वेगाने कोरोनाचे निदान करण्यासाठी 'व्हाईस बायो मार्कर आर्टिफिशियल इंटिलीजन्स' म्हणजे आवाजावरून कोरोनाचे निदान करण्याची पद्धत इस्रायलने विकसित केली असून त्यामुळे 30 सेकंदांत कोरोनाचे निदान होणार आहे.

अधिक वाचाः  संजय राऊत मला उघडपणे धमकी देतायत, कंगना राणावतचं नवं ट्विट

ही पद्धत खात्रीशीर असल्याचे प्रयोगात सिद्ध झाले तर त्याचा वापर मुंबईत कोरोना चाचणीसाठी केला जाणार आहे. मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषेत आवाजाचे नमुने गोळा केले जाणार आहेत, अशी माहिती नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली.

(संपादनः पूजा विचारे)

Voice testing will be conducted on patients in the Nesco Covid ward from September 8

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

8 सप्टेंबरपासून नेस्को कोविड वॉर्डमधील रुग्णांवर होणार आवाजाची चाचणी मुंबई: आवाजावरून 30 सेकंदांत कोरोनाचे निदान करणाऱ्या प्रायोगिक चाचणीला गोरेगावच्या नेस्को कोरोना सेंटरमध्ये येत्या 8 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. आतापर्यंत या चाचणीवर ट्रायल सुरु असून याबाबतचे प्रशिक्षण इथल्या डॉक्टरांना देण्यात आल्याची माहिती नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली आहे.  नेस्को कोविड सेंटरच्या कंट्रोल रूममध्ये सध्या यावर काम सुरु असून या अॅपमध्ये कसे काम करायचे याबाबतचे ट्रेनिंग पुर्ण झाले आहे. सध्या 6 जणांची टिम या मोबाईल ऍपवर काम करतेय. यातील दोन डॉक्टर वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांची सर्व माहिती घेतील आणि बाकीचे सर्व डॉक्टर्स कंट्रोल रुममधून त्यांना मॉनिटर करतील.  सध्या त्यासाठी मोबाईल ऍपच्या स्वरूपातील दोन उपकरणांचा वापर केला जाणार आहे. या पद्धतीने कोरोनाची 80 टक्के अचूक चाचणी करता येते, असा दावा हे उपकरण बनवणाऱ्या 'व्होकोलिस हेल्थ' या इस्रायली कंपनीने केला आहे. 500 कोरोना रुग्णांवर होणारा देशातील हा अशा प्रकारचा पहिला प्रयोग आहे. हेही वाचाः प्लाझ्मा दानासाठी महिलाही घेताहेत पुढाकार; अनेक महिलांनी व्यक्त केली प्लाझ्मादानाची इच्छा कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका अहोरात्र मेहनत घेत आहे. कोरोनाच्या 'आरटी-पीसीआर' चाचणीसह अर्ध्या तासात निदान होणाऱ्या अँटिजेन चाचण्यांची संख्याही वाढवली गेली आहे. मात्र, आता अँटिजेनपेक्षाही अधिक वेगाने कोरोनाचे निदान करण्यासाठी 'व्हाईस बायो मार्कर आर्टिफिशियल इंटिलीजन्स' म्हणजे आवाजावरून कोरोनाचे निदान करण्याची पद्धत इस्रायलने विकसित केली असून त्यामुळे 30 सेकंदांत कोरोनाचे निदान होणार आहे. अधिक वाचाः  संजय राऊत मला उघडपणे धमकी देतायत, कंगना राणावतचं नवं ट्विट ही पद्धत खात्रीशीर असल्याचे प्रयोगात सिद्ध झाले तर त्याचा वापर मुंबईत कोरोना चाचणीसाठी केला जाणार आहे. मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषेत आवाजाचे नमुने गोळा केले जाणार आहेत, अशी माहिती नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली. (संपादनः पूजा विचारे) Voice testing will be conducted on patients in the Nesco Covid ward from September 8 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31WuXfV
Read More
'तो' तब्बल 15 व्या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह निघाला, डिस्चार्ज मिळण्याची वाट पाहण्याऱ्या मकसूद खानची कहाणी

मुंबईः वरळीतील नेस्कोच्या कोविड केंद्रात आतापर्यंत 250 कर्करुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली. मात्र 35 वर्षाच्या मकसूद खान मात्र अजूनही डिस्चार्च मिळण्याची वाट पाहतोय. मात्र जोपर्यंत मकसूदची चाचणी निगेटीव्ह येणार नाही. तोपर्यंत रुग्णालय प्रशासन त्याला सोडणार नाही. आणि मकसूदची आतापर्यंत 15 वी कोविड चाचणीही पॉझिटीव्ह आली आहे.

उत्तरप्रदेशमध्ये राहणाऱ्या मकसूदला ब्लड कँसर झाला आहे. डिसेंबर महिन्यात उपचारासाठी तो मुंबईला आला होता. टाटा मेमोरियल रुग्णालयात मकसूदचे 9 केमो थेरेपी सेशन झाले. 26 मेला मकसूदला बरे वाटत नव्हते. डॉक्टरांनी चाचणी केली. तेव्हा त्याला कोविड असल्याच निष्पण्ण झाले. मकसूदला तातडीने वरळीच्या कोविड केंद्रात हलवण्यात आले. या ठिकाणी कँसरसाठी राखीव असलेल्या वार्डमध्ये मकसूदवर उपचार सुरु झाले.

मकसूदची ऑक्सिजन लेवल बरोबर आली, तापही कमी झाला. मात्र स्वॅबचे नमुने पाठवले तेव्हा तो पॉझिटीव्ह आढळला. आतापर्यंत 13 स्वॅब नमुणे केंद्राने प्रयोगशांळांना निदान करण्याकरीता पाठवले. मात्र, सर्वच्या सर्व पॉझिटीव्ह आढळले. निदान करतांना तांत्रिक चुका झाल्या का हेदेखील तपासले गेले. मात्र तिथेही तो पॉझिटीव्ह असल्याचे सिध्द झाले. महापालिकेच्या कोविड नियमानूसार जोपर्यंत रुग्णाची चाचणी निगेटीव्ह येत नाही. तोपर्यंत त्याला सोडता येत नाही. त्यामुळे मकसूद या केंद्रात अडकून पडला आहे.

हेही वाचाः  विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमीः विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देता येणार
 

कोविड केंद्रात राहून निराश

कोविड केंद्रात राहून मकसूदला निराशा आली आहे. एकदा त्याने केंद्रातून पळण्याचा प्रयत्नही केला. तो सारखा डॉक्टरांना प्रश्न विचारतो. मी शारीरीक फीट आहे, ऑक्सिजनचे प्रमाण योग्य आहे, श्वास घ्यायला त्रास होत नाही. मग मला इथून का सोडत नाही. तूम्ही मला इथे केव्हापर्यंत ठेवणार आहात? असा त्याचा प्रश्न असतो. मकसूद विटामीन सीच्या गोळ्या खातो. गरम पाणी पितो. योगा करतो. मात्र दिवस संपला की त्याची निराशा वाढत चालली आहे. मकसूदला त्याच्या बायकोची, चार मुलाची आठवण येते. कर्करोगाशी सामना करण्यासाठी तो मुंबईत आला, मात्र इथे त्याला आता फसल्यासारखे वाटतंय.

इथल्या डॉक्टरांनी मकसूदच्या रुपात पहिल्यांदाच असा रुग्ण बघितला आहे. यापुर्वी दोन कर्करुग्ण चार चाचणीत कोविड पॉझिटीव्ह निघाले, मात्र पाचव्या चाचणीत ते निगेटीव्ह निघाले. मकसूद पहिला रुग्ण आहे, ज्याची 15 वी चाचणीही पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे कदाचित मकसूदला अधिक काळ केद्रात राहावे लागेल. शुक्रवारी मकसूदची 16 वी चाचणी होणार आहे. डॉक्टरांना आशा आहे की ही चाचणी निगेटीव्ह निघेल.

अधिक वाचाः  सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनामी, मुंबई उच्च न्यायालयानं दिल्या 'या' सूचना

कदाचित मकसूदला कर्करोगावर दिलेल्या औषधीमुळे हे होत असावे अस एका डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यामुळे मकसूदचे प्रकरण वैद्यकीय अभ्यासक्रमात संशोधन करण्याजोगे प्रकरण आहे. असे या डॉक्टरचे म्हणणे आहे. 

मकसूदसाठी कोविडचे नियम मोडू शकत नाही. त्यामुळे त्याला घरी पाठवले तर कोरोना संसर्गाचा वाहक ठरु शकतो अशी भिती टाटा मेमोरियलचे डॉ पंकज चतुर्वेदी यांनी व्यक्त केली. मकसूदला कदाचित त्याच्या उत्तरप्रदेशमधील त्याच्या गावी पाठवण्यावर आम्ही विचार करतोय अस वरळी कोविड केंद्रासोबत सम्नवय ठेवणाऱ्या टाटा मेमेरियलच्या डॉक्टर याग्निक वझा यांनी सांगितले. आता वाट आहे 16 व्या चाचणीची. 

हा जो रुग्ण खुप महिन्यांपासुन कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्याच्यावर सुरु असणार्या कर्करोगावरील उपचारांमुळे कदाचित त्याची चाचणी निगेटिव्ह येत नाही. त्याचे इथे कोणीच नातेवाईक नाहीत. पालिकेच्या नियमांप्रमाणे त्याची चाचणी जोपर्यंत निगेटीव्ह येत नाही तोपर्यंत त्याला घरी सोडता येणार नाही. जशी याची चाचणी निगेटिव्ह आली की तसेच त्यांना आम्ही त्यांच्या घरी विमान किंवा ट्रेनने पाठवू. त्यांचे आम्ही समुपदेशन करत आहोत. त्यासाठी 6 जणांची टीम आहे. 

डॉ. याग्निक वाझा, काॅर्डिनेटर, कर्करोग, एनएससीआय केंद्र

(संपादनः पूजा विचारे)

Maqsood Khan tested positive in 15th corona waiting be discharged

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'तो' तब्बल 15 व्या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह निघाला, डिस्चार्ज मिळण्याची वाट पाहण्याऱ्या मकसूद खानची कहाणी मुंबईः वरळीतील नेस्कोच्या कोविड केंद्रात आतापर्यंत 250 कर्करुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली. मात्र 35 वर्षाच्या मकसूद खान मात्र अजूनही डिस्चार्च मिळण्याची वाट पाहतोय. मात्र जोपर्यंत मकसूदची चाचणी निगेटीव्ह येणार नाही. तोपर्यंत रुग्णालय प्रशासन त्याला सोडणार नाही. आणि मकसूदची आतापर्यंत 15 वी कोविड चाचणीही पॉझिटीव्ह आली आहे. उत्तरप्रदेशमध्ये राहणाऱ्या मकसूदला ब्लड कँसर झाला आहे. डिसेंबर महिन्यात उपचारासाठी तो मुंबईला आला होता. टाटा मेमोरियल रुग्णालयात मकसूदचे 9 केमो थेरेपी सेशन झाले. 26 मेला मकसूदला बरे वाटत नव्हते. डॉक्टरांनी चाचणी केली. तेव्हा त्याला कोविड असल्याच निष्पण्ण झाले. मकसूदला तातडीने वरळीच्या कोविड केंद्रात हलवण्यात आले. या ठिकाणी कँसरसाठी राखीव असलेल्या वार्डमध्ये मकसूदवर उपचार सुरु झाले. मकसूदची ऑक्सिजन लेवल बरोबर आली, तापही कमी झाला. मात्र स्वॅबचे नमुने पाठवले तेव्हा तो पॉझिटीव्ह आढळला. आतापर्यंत 13 स्वॅब नमुणे केंद्राने प्रयोगशांळांना निदान करण्याकरीता पाठवले. मात्र, सर्वच्या सर्व पॉझिटीव्ह आढळले. निदान करतांना तांत्रिक चुका झाल्या का हेदेखील तपासले गेले. मात्र तिथेही तो पॉझिटीव्ह असल्याचे सिध्द झाले. महापालिकेच्या कोविड नियमानूसार जोपर्यंत रुग्णाची चाचणी निगेटीव्ह येत नाही. तोपर्यंत त्याला सोडता येत नाही. त्यामुळे मकसूद या केंद्रात अडकून पडला आहे. हेही वाचाः  विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमीः विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देता येणार   कोविड केंद्रात राहून निराश कोविड केंद्रात राहून मकसूदला निराशा आली आहे. एकदा त्याने केंद्रातून पळण्याचा प्रयत्नही केला. तो सारखा डॉक्टरांना प्रश्न विचारतो. मी शारीरीक फीट आहे, ऑक्सिजनचे प्रमाण योग्य आहे, श्वास घ्यायला त्रास होत नाही. मग मला इथून का सोडत नाही. तूम्ही मला इथे केव्हापर्यंत ठेवणार आहात? असा त्याचा प्रश्न असतो. मकसूद विटामीन सीच्या गोळ्या खातो. गरम पाणी पितो. योगा करतो. मात्र दिवस संपला की त्याची निराशा वाढत चालली आहे. मकसूदला त्याच्या बायकोची, चार मुलाची आठवण येते. कर्करोगाशी सामना करण्यासाठी तो मुंबईत आला, मात्र इथे त्याला आता फसल्यासारखे वाटतंय. इथल्या डॉक्टरांनी मकसूदच्या रुपात पहिल्यांदाच असा रुग्ण बघितला आहे. यापुर्वी दोन कर्करुग्ण चार चाचणीत कोविड पॉझिटीव्ह निघाले, मात्र पाचव्या चाचणीत ते निगेटीव्ह निघाले. मकसूद पहिला रुग्ण आहे, ज्याची 15 वी चाचणीही पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे कदाचित मकसूदला अधिक काळ केद्रात राहावे लागेल. शुक्रवारी मकसूदची 16 वी चाचणी होणार आहे. डॉक्टरांना आशा आहे की ही चाचणी निगेटीव्ह निघेल. अधिक वाचाः  सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनामी, मुंबई उच्च न्यायालयानं दिल्या 'या' सूचना कदाचित मकसूदला कर्करोगावर दिलेल्या औषधीमुळे हे होत असावे अस एका डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यामुळे मकसूदचे प्रकरण वैद्यकीय अभ्यासक्रमात संशोधन करण्याजोगे प्रकरण आहे. असे या डॉक्टरचे म्हणणे आहे.  मकसूदसाठी कोविडचे नियम मोडू शकत नाही. त्यामुळे त्याला घरी पाठवले तर कोरोना संसर्गाचा वाहक ठरु शकतो अशी भिती टाटा मेमोरियलचे डॉ पंकज चतुर्वेदी यांनी व्यक्त केली. मकसूदला कदाचित त्याच्या उत्तरप्रदेशमधील त्याच्या गावी पाठवण्यावर आम्ही विचार करतोय अस वरळी कोविड केंद्रासोबत सम्नवय ठेवणाऱ्या टाटा मेमेरियलच्या डॉक्टर याग्निक वझा यांनी सांगितले. आता वाट आहे 16 व्या चाचणीची.  हा जो रुग्ण खुप महिन्यांपासुन कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्याच्यावर सुरु असणार्या कर्करोगावरील उपचारांमुळे कदाचित त्याची चाचणी निगेटिव्ह येत नाही. त्याचे इथे कोणीच नातेवाईक नाहीत. पालिकेच्या नियमांप्रमाणे त्याची चाचणी जोपर्यंत निगेटीव्ह येत नाही तोपर्यंत त्याला घरी सोडता येणार नाही. जशी याची चाचणी निगेटिव्ह आली की तसेच त्यांना आम्ही त्यांच्या घरी विमान किंवा ट्रेनने पाठवू. त्यांचे आम्ही समुपदेशन करत आहोत. त्यासाठी 6 जणांची टीम आहे.  डॉ. याग्निक वाझा, काॅर्डिनेटर, कर्करोग, एनएससीआय केंद्र (संपादनः पूजा विचारे) Maqsood Khan tested positive in 15th corona waiting be discharged News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/353mOYT
Read More
अखेर राज्य सरकारकडून पुन्हा अतिरिक्त दूध खरेदी सुरु; आता लिटरला मिळणार एवढे पैसे

पुणे - अखेर राज्य सरकारने एक महिन्याच्या गॅपनंतर (खंड) पुन्हा एकदा अतिरिक्त दूध खरेदी सुरु केली आहे. आता हे अतिरिक्त दूध येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिलिटरमागे होणारा ५ रुपयांचा तोटा कमी होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिलिटरला २५ रूपयांचा दर मिळणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याशिवाय पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांचा (कात्रज डेअरी) प्रतिदिन तीन लाखांचा होत असलेला तोटा आता पुर्णपणे कमी होणार आहे. 

राज्य सरकारने "अतिरिक्त दूध खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांचा लॉस" या शिर्षकाखाली सकाळने २८ आॅगष्टला वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर राज्य सरकारने १ महिन्याच्या खंडानंतर पुन्हा अतिरिक्त खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रत्यक्षात ही खरेदी सुरू करण्यात आली आहे.

इंडो-चायना संबंधावर शरद पवारांनी तज्ज्ञांशी केली चर्चा; राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी लावली हजेरी

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लाॅकडाऊनमुळे आधीच कंबरडं मोडलं होतं.  त्यातच हाॅटेलं बंद झाल्याने दुधाची मागणी घटली होती. याचाच फायदा उठवतं, खासगी दूध संघांनीही नेहमीच्या तुलनेत कमी आणि   तेही एकदम कमी भावानं शेतकऱ्यांकडून दूध खरेदी सुरु केली होती. यामुळे शेतकऱ्यांनाआधार देण्यासाठी राज्य सरकारने १ एप्रिलपासून अतिरिक्त दूध खरेदी करण्यास सुरुवात केली होती. परंतू १ आॅगष्टपासून ही खरेदी थांबविण्यात आली होती. 

यामुळे पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दररोज सरासरी  सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान होऊ लागले होते. कारण सरकारी नियमानुसार गाईच्या दुधाचा प्रतिलिटर किमान २५ रुपये दर आहे. सध्या प्रत्यक्षात सरासरी २० रुपये लिटरप्रमाणे दर मिळत होता. 

दारुच्या नशेत तो पोलिसांना म्हणाला, 'मला गाडी पकडून द्या घरी जायचंय'!

पुणे जिल्ह्यात  दररोज  सुमारे २० लाख लिटर दूध विविध दूध संघ खरेदी करत असतात. यापैकी सहकारी दूध संघ २५ रुपये तर, खासगी दूध संघ २० रुपये लिटरनेच दूध खरेदी करत आहेत. एकूण दुधापैकी ५ लाख लिटर सहकारी आणि सुमारे १५ लाख लिटर खासगी दूध संघ खरेदी करत असतात. यामुळे सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळून रोज ७५ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागत होते. 

- Video : अखेर पुणेकरांची इच्छा झाली पूर्ण; तब्बल पाच महिन्यांनी केला 'पीएमपी'तून प्रवास!​

राज्य सरकारने १ एप्रिल ते ३१ जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत राज्यातील अतिरिक्त दूध खरेदी केले होते. पण मध्येच आॅगष्टमध्ये महिनाभर ही दूध खरेदी बंद पडली होती. आता पुन्हा दोन महिने ही खरेदी सुरू करण्यात आली आहे.
- रणजित देशमुख, अध्यक्ष, महानंद दूध.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अखेर राज्य सरकारकडून पुन्हा अतिरिक्त दूध खरेदी सुरु; आता लिटरला मिळणार एवढे पैसे पुणे - अखेर राज्य सरकारने एक महिन्याच्या गॅपनंतर (खंड) पुन्हा एकदा अतिरिक्त दूध खरेदी सुरु केली आहे. आता हे अतिरिक्त दूध येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिलिटरमागे होणारा ५ रुपयांचा तोटा कमी होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिलिटरला २५ रूपयांचा दर मिळणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा याशिवाय पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांचा (कात्रज डेअरी) प्रतिदिन तीन लाखांचा होत असलेला तोटा आता पुर्णपणे कमी होणार आहे.  राज्य सरकारने "अतिरिक्त दूध खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांचा लॉस" या शिर्षकाखाली सकाळने २८ आॅगष्टला वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर राज्य सरकारने १ महिन्याच्या खंडानंतर पुन्हा अतिरिक्त खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रत्यक्षात ही खरेदी सुरू करण्यात आली आहे. इंडो-चायना संबंधावर शरद पवारांनी तज्ज्ञांशी केली चर्चा; राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी लावली हजेरी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लाॅकडाऊनमुळे आधीच कंबरडं मोडलं होतं.  त्यातच हाॅटेलं बंद झाल्याने दुधाची मागणी घटली होती. याचाच फायदा उठवतं, खासगी दूध संघांनीही नेहमीच्या तुलनेत कमी आणि   तेही एकदम कमी भावानं शेतकऱ्यांकडून दूध खरेदी सुरु केली होती. यामुळे शेतकऱ्यांनाआधार देण्यासाठी राज्य सरकारने १ एप्रिलपासून अतिरिक्त दूध खरेदी करण्यास सुरुवात केली होती. परंतू १ आॅगष्टपासून ही खरेदी थांबविण्यात आली होती.  यामुळे पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दररोज सरासरी  सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान होऊ लागले होते. कारण सरकारी नियमानुसार गाईच्या दुधाचा प्रतिलिटर किमान २५ रुपये दर आहे. सध्या प्रत्यक्षात सरासरी २० रुपये लिटरप्रमाणे दर मिळत होता.  दारुच्या नशेत तो पोलिसांना म्हणाला, 'मला गाडी पकडून द्या घरी जायचंय'! पुणे जिल्ह्यात  दररोज  सुमारे २० लाख लिटर दूध विविध दूध संघ खरेदी करत असतात. यापैकी सहकारी दूध संघ २५ रुपये तर, खासगी दूध संघ २० रुपये लिटरनेच दूध खरेदी करत आहेत. एकूण दुधापैकी ५ लाख लिटर सहकारी आणि सुमारे १५ लाख लिटर खासगी दूध संघ खरेदी करत असतात. यामुळे सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळून रोज ७५ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागत होते.  - Video : अखेर पुणेकरांची इच्छा झाली पूर्ण; तब्बल पाच महिन्यांनी केला 'पीएमपी'तून प्रवास!​ राज्य सरकारने १ एप्रिल ते ३१ जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत राज्यातील अतिरिक्त दूध खरेदी केले होते. पण मध्येच आॅगष्टमध्ये महिनाभर ही दूध खरेदी बंद पडली होती. आता पुन्हा दोन महिने ही खरेदी सुरू करण्यात आली आहे. - रणजित देशमुख, अध्यक्ष, महानंद दूध. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jDFSRs
Read More
मुंबईत मास्क न घालणाऱ्यांवर जोरदार कारवाई, आतापर्यंत गोळा केला 'इतक्या' रुपयांचा दंड

मुंबई: मास्क न वापरणाऱ्या 2 हजार 798 लोकांकडून महानगर पालिकेनं तब्बल 27 लाख 48 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला आहे. मास्क न वापरणाऱ्यांकडून महानगर पालिका 1 हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल करत आहे. सुमारे दहा हजार नागरिकांना तंबी देऊन सोडण्यात आले आहे. पश्‍चिम उपनगरातून सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला असून अंधेरी, जोगेश्‍वरी पश्‍चिम के पश्‍चिम प्रभागातून सर्वाधिक 5 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मरीन लाईन्स, गिरगाव परिसरातून 4 लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारनं 9 एप्रिल पासून सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र,आजही अनेक जण मास्क न वापरता फिरत असतात. अशाकडून 1 हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल केला जात आहे. पालिकेनं 9 एप्रिल ते 31 ऑगस्टपर्यंत 27 लाख 47 हजारांचा दंड वसूल केला आहे.  कांदिवली आर दक्षिण प्रभागातून 4 लाख 21 हजार आणि मरिन लाईन्स, गिरगाव सी प्रभागातून 4 लाख 8 हजार दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचाः  मुंबईतील कोरोना रूग्णांच्या मृत्यूमागे `ही` बाब ठरतेय कारणीभूत; नागरिकांकडून अद्यापही होतंय दुर्लक्ष

सर्वाधिक दंड हा मे महिन्यात वसूल करण्यात आला. या महिन्यात तब्बल 9 लाख 45 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 953 लोकांकडून हा दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर जुन महिन्यात 589 लोकांकडून 5 लाख 88 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात 523 लोकांकडून 4 लाख 82 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. याच काळात मुंबईत कोविडचा संसर्गाचा वेग वाढू लागला होता. वारंवार होणाऱ्या कारवाईमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती होऊन मास्क वापरण्याचे प्रमाण वाढले.तसेच,नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरावे असे आवाहन महापालिकेनं केलं आहे. 

Strict action against not wear masks in Mumbai

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंबईत मास्क न घालणाऱ्यांवर जोरदार कारवाई, आतापर्यंत गोळा केला 'इतक्या' रुपयांचा दंड मुंबई: मास्क न वापरणाऱ्या 2 हजार 798 लोकांकडून महानगर पालिकेनं तब्बल 27 लाख 48 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला आहे. मास्क न वापरणाऱ्यांकडून महानगर पालिका 1 हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल करत आहे. सुमारे दहा हजार नागरिकांना तंबी देऊन सोडण्यात आले आहे. पश्‍चिम उपनगरातून सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला असून अंधेरी, जोगेश्‍वरी पश्‍चिम के पश्‍चिम प्रभागातून सर्वाधिक 5 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मरीन लाईन्स, गिरगाव परिसरातून 4 लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारनं 9 एप्रिल पासून सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र,आजही अनेक जण मास्क न वापरता फिरत असतात. अशाकडून 1 हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल केला जात आहे. पालिकेनं 9 एप्रिल ते 31 ऑगस्टपर्यंत 27 लाख 47 हजारांचा दंड वसूल केला आहे.  कांदिवली आर दक्षिण प्रभागातून 4 लाख 21 हजार आणि मरिन लाईन्स, गिरगाव सी प्रभागातून 4 लाख 8 हजार दंड वसूल करण्यात आला आहे. हेही वाचाः  मुंबईतील कोरोना रूग्णांच्या मृत्यूमागे `ही` बाब ठरतेय कारणीभूत; नागरिकांकडून अद्यापही होतंय दुर्लक्ष सर्वाधिक दंड हा मे महिन्यात वसूल करण्यात आला. या महिन्यात तब्बल 9 लाख 45 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 953 लोकांकडून हा दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर जुन महिन्यात 589 लोकांकडून 5 लाख 88 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात 523 लोकांकडून 4 लाख 82 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. याच काळात मुंबईत कोविडचा संसर्गाचा वेग वाढू लागला होता. वारंवार होणाऱ्या कारवाईमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती होऊन मास्क वापरण्याचे प्रमाण वाढले.तसेच,नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरावे असे आवाहन महापालिकेनं केलं आहे.  Strict action against not wear masks in Mumbai News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZlSXr9
Read More

Wednesday, September 2, 2020

ऑनलाइन न्यायालयांत अडथळ्यांची शर्यत; पायाभूत सुविधांचा अभाव

मुंबई - राज्यभरातील जिल्हा आणि अन्य संलग्न न्यायालयांचे कामकाज मागील चार महिन्यांपासून ऑनलाइन सुरू झाले असले तरी पायाभूत सुविधांचा अभाव, इंटरनेट यामुळे वकील आणि पक्षकारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येत्या काळात न्यायदानाचे काम अधिक सुलभ करण्यासाठी पायाभूत सुविधा देण्याचे आव्हान न्याय प्रशासन आणि सरकारवर आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एप्रिलपासून उच्च न्यायालयासह जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालयांचे काम नियमित ऑनलाइन सुरू आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशा शहरांचा समावेश आहे; मात्र जिल्ह्यातील अनेक न्यायालयांमध्ये पुरेशा आवश्‍यक पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. अनेक न्यायालयांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध नाही. तुरुंगात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची अद्ययावत सुविधा नाही. इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीचा अभावही काही ठिकाणी येत आहे. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ऑनलाइन न्यायालयांत अडथळ्यांची शर्यत; पायाभूत सुविधांचा अभाव मुंबई - राज्यभरातील जिल्हा आणि अन्य संलग्न न्यायालयांचे कामकाज मागील चार महिन्यांपासून ऑनलाइन सुरू झाले असले तरी पायाभूत सुविधांचा अभाव, इंटरनेट यामुळे वकील आणि पक्षकारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येत्या काळात न्यायदानाचे काम अधिक सुलभ करण्यासाठी पायाभूत सुविधा देण्याचे आव्हान न्याय प्रशासन आणि सरकारवर आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा एप्रिलपासून उच्च न्यायालयासह जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालयांचे काम नियमित ऑनलाइन सुरू आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशा शहरांचा समावेश आहे; मात्र जिल्ह्यातील अनेक न्यायालयांमध्ये पुरेशा आवश्‍यक पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. अनेक न्यायालयांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध नाही. तुरुंगात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची अद्ययावत सुविधा नाही. इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीचा अभावही काही ठिकाणी येत आहे.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3516wzI
Read More
एसटी कर्मचारी झाले हतबल; पुन्हा दोन महिन्याचे वेतन रखडले   

औरंगाबाद : लॉकडाऊमुळे उपासमार एसटी कर्मचाऱ्यांची पाठ सोडण्यास तयार नाही. कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न गेल्या तीन महिन्यापासून कसाबसा मार्गी लागला. मात्र आता पुन्हा जुलै आणि आँगस्ट महिन्याचे वेतन थकल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत. 

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव  

कोरोनामुळे २३ मार्च २०२० पासून एस.टी. बस सेवा बंद होती. तब्बल पाच महिन्यानंतर ही सेवा २० आँगस्ट पासून सुरु झाली. बंदच्या काळात महामंडळाचे दररोज २२ कोटी रुपयाचे उत्पन्न बुडाले. बंदच्या एकूण काळात २३०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. एसटीच्या अनेक चुकीच्या धोरणांमुळे संचित तोटा ६१५५ कोटी रूपये इतका झाला आहे. महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी प्रत्येक महिन्याला २४९ कोटी रूपये लागतात. एसटीकडे असलेल्या विविध योजनांच्या परिपूर्तीपोटीची शासनाकडे असलेल्या थकबाकीपोटी शासनाने मार्च महिन्यात १५० कोटी रुपये दिले. त्यानंतर एप्रिल मध्ये २५० कोटी, मे मध्ये २७० कोटी दिले. जुलै अखेर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५५० कोटी रूपयांचा निधी सवलत मूल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी अग्रिम म्हणून देण्यात आला. त्यामुळे या रकमेतून एसटी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे उर्वरीत २५ टक्के, मे महिन्याचे ५० टक्के, व जून महिन्याचे संपूर्ण वेतन देण्यात आले. असे असले तरीही पुन्हा जुलै आणि आँगस्ट या दोन महिन्याचे वेतन थकलेले आहे. 

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन  

असे होईल शक्य
सध्या शासनाकडे एसटी महामंडळाचे पोलिस, न्यायालयांच्या वॉरंट तिकीटांचे १४७ कोटी थकलेले आहेत. त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात एसटीने परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार महामंडळाने हजारो कामगारांना विविध राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन सोडले आहे. ही मदत व पुर्नरवसन विभागाकडे असलेली थकबाकी ९४ कोटी ९६ लाख इतकी आहे. दोन्ही मिळून शासनाकडे २४२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही रक्कम शासनाने दिली तर जुलै महिन्याच्या वेतनाचा प्रश्न सुटू शकतो. त्याचप्रमाणे गेल्या महिन्यात दिलेल्या ५५० कोटीतील शंभर कोटी महामंडळाकडे शिल्लक आहेत. त्यातच आता एसटी सुरु झाल्याने महामंडळाकडेही साधारण शंभर कोटी रुपये उत्पन्न आलेले आहे. या रकमेतून आँगस्ट महिन्याचेही वेतन होऊ शकते अशी कर्मचाऱ्यांची धारणा आहे. 

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन  

 

एसटी महामंडळाने शासनाकडे तीन हजार कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पात तरतुद करुन ही रक्कम शासनाने दिली पाहिजे. 
मुकेश तिगोटे सरचिटणीस महाराष्ट्र वर्कर्स कॉंग्रेस (इंटक)

(संपादन-प्रताप अवचार)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

एसटी कर्मचारी झाले हतबल; पुन्हा दोन महिन्याचे वेतन रखडले    औरंगाबाद : लॉकडाऊमुळे उपासमार एसटी कर्मचाऱ्यांची पाठ सोडण्यास तयार नाही. कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न गेल्या तीन महिन्यापासून कसाबसा मार्गी लागला. मात्र आता पुन्हा जुलै आणि आँगस्ट महिन्याचे वेतन थकल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत.  आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव   कोरोनामुळे २३ मार्च २०२० पासून एस.टी. बस सेवा बंद होती. तब्बल पाच महिन्यानंतर ही सेवा २० आँगस्ट पासून सुरु झाली. बंदच्या काळात महामंडळाचे दररोज २२ कोटी रुपयाचे उत्पन्न बुडाले. बंदच्या एकूण काळात २३०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. एसटीच्या अनेक चुकीच्या धोरणांमुळे संचित तोटा ६१५५ कोटी रूपये इतका झाला आहे. महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी प्रत्येक महिन्याला २४९ कोटी रूपये लागतात. एसटीकडे असलेल्या विविध योजनांच्या परिपूर्तीपोटीची शासनाकडे असलेल्या थकबाकीपोटी शासनाने मार्च महिन्यात १५० कोटी रुपये दिले. त्यानंतर एप्रिल मध्ये २५० कोटी, मे मध्ये २७० कोटी दिले. जुलै अखेर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५५० कोटी रूपयांचा निधी सवलत मूल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी अग्रिम म्हणून देण्यात आला. त्यामुळे या रकमेतून एसटी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे उर्वरीत २५ टक्के, मे महिन्याचे ५० टक्के, व जून महिन्याचे संपूर्ण वेतन देण्यात आले. असे असले तरीही पुन्हा जुलै आणि आँगस्ट या दोन महिन्याचे वेतन थकलेले आहे.  बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन   असे होईल शक्य सध्या शासनाकडे एसटी महामंडळाचे पोलिस, न्यायालयांच्या वॉरंट तिकीटांचे १४७ कोटी थकलेले आहेत. त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात एसटीने परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार महामंडळाने हजारो कामगारांना विविध राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन सोडले आहे. ही मदत व पुर्नरवसन विभागाकडे असलेली थकबाकी ९४ कोटी ९६ लाख इतकी आहे. दोन्ही मिळून शासनाकडे २४२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही रक्कम शासनाने दिली तर जुलै महिन्याच्या वेतनाचा प्रश्न सुटू शकतो. त्याचप्रमाणे गेल्या महिन्यात दिलेल्या ५५० कोटीतील शंभर कोटी महामंडळाकडे शिल्लक आहेत. त्यातच आता एसटी सुरु झाल्याने महामंडळाकडेही साधारण शंभर कोटी रुपये उत्पन्न आलेले आहे. या रकमेतून आँगस्ट महिन्याचेही वेतन होऊ शकते अशी कर्मचाऱ्यांची धारणा आहे.  शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन     एसटी महामंडळाने शासनाकडे तीन हजार कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पात तरतुद करुन ही रक्कम शासनाने दिली पाहिजे.  मुकेश तिगोटे सरचिटणीस महाराष्ट्र वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bmSCZP
Read More
आभार मुंबई... उत्सवाप्रमाणे विसर्जनही साध्या पद्धतीने; महापौर, आयुक्तांनी मानले मुंबईकरांचे आभार

मुंबई : जगभरासाठी आकर्षण असलेला मुंबईतील गणेशोत्सव यंदा साध्या पध्दतीने साजरा केल्याबद्दल महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईकरांचे आभार मानले आहेत. कोव्हिड पार्श्वभूमीवर यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 1 लाखाहून कमी गणपतीची प्रतिष्ठापना मुंबईत  झाली होती.

बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश; मुंबईतून एकाला अटक 

गणेशोत्सवाचे दिवस त्यानंतर अनंत चतुर्थीच्या विसर्जन मिरवणुका, यासाठी मुंबईतील गणेशोत्सव जगभरात प्रसिध्द आहे. मात्र, यंदा गणेशोत्सव तसेच, विसर्जन सोहळाही साध्या पध्दतीने पार पडला. प्रसिध्द सार्वजनिक गणपतीचे विसर्जन मंडपातच करण्यावर भर देण्यात आला. दरवर्षी 26-27 तास विसर्जन मिरवणुका सुरु असतात. यंदा रात्रीच विसर्जन सोहळा आटोपला होता.  

अनंत चतुर्थी पर्यंत यंदा 1 लाख 35 हजार सार्वजनिक घरगुती गणपतींसह गौरींचे विसर्जन झाले. तर, गेल्या वर्षी 2 लाख 30 गौरी गणपतींचे विसर्जन झाले होते. यंदा 70 हजारहून अधिक विसर्जन कृत्रिम तलावात झाले तर गेल्या वर्षी 33 हजार गणपती विसर्जन कृत्रिम तलावात झाले होते. यंदाच्या अनंत चतुर्थीला 28  हजार 293 मुर्तीचे विसर्जन झाले तर, गेल्या वर्षी 38 हजार 361 मुर्तींचे विसर्जन झाले होते.

मिरा-भाईंदरकरांना कर माफी नाहीच ; आयुक्तांची भुमिका ठरली महत्त्वाची - 

कमी मुर्तींची प्रतिष्ठापना
कोव्हिडच्या पार्श्वभुमीवर मुंबईतून मोठ्या प्रमाणात स्थालांतर झाले आहे. त्याच बरोबर या काळात रोजी रोटीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे कमी मुर्तींची प्रतिष्ठापना झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आभार मुंबई... उत्सवाप्रमाणे विसर्जनही साध्या पद्धतीने; महापौर, आयुक्तांनी मानले मुंबईकरांचे आभार मुंबई : जगभरासाठी आकर्षण असलेला मुंबईतील गणेशोत्सव यंदा साध्या पध्दतीने साजरा केल्याबद्दल महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईकरांचे आभार मानले आहेत. कोव्हिड पार्श्वभूमीवर यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 1 लाखाहून कमी गणपतीची प्रतिष्ठापना मुंबईत  झाली होती. बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश; मुंबईतून एकाला अटक  गणेशोत्सवाचे दिवस त्यानंतर अनंत चतुर्थीच्या विसर्जन मिरवणुका, यासाठी मुंबईतील गणेशोत्सव जगभरात प्रसिध्द आहे. मात्र, यंदा गणेशोत्सव तसेच, विसर्जन सोहळाही साध्या पध्दतीने पार पडला. प्रसिध्द सार्वजनिक गणपतीचे विसर्जन मंडपातच करण्यावर भर देण्यात आला. दरवर्षी 26-27 तास विसर्जन मिरवणुका सुरु असतात. यंदा रात्रीच विसर्जन सोहळा आटोपला होता.   अनंत चतुर्थी पर्यंत यंदा 1 लाख 35 हजार सार्वजनिक घरगुती गणपतींसह गौरींचे विसर्जन झाले. तर, गेल्या वर्षी 2 लाख 30 गौरी गणपतींचे विसर्जन झाले होते. यंदा 70 हजारहून अधिक विसर्जन कृत्रिम तलावात झाले तर गेल्या वर्षी 33 हजार गणपती विसर्जन कृत्रिम तलावात झाले होते. यंदाच्या अनंत चतुर्थीला 28  हजार 293 मुर्तीचे विसर्जन झाले तर, गेल्या वर्षी 38 हजार 361 मुर्तींचे विसर्जन झाले होते. मिरा-भाईंदरकरांना कर माफी नाहीच ; आयुक्तांची भुमिका ठरली महत्त्वाची -  कमी मुर्तींची प्रतिष्ठापना कोव्हिडच्या पार्श्वभुमीवर मुंबईतून मोठ्या प्रमाणात स्थालांतर झाले आहे. त्याच बरोबर या काळात रोजी रोटीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे कमी मुर्तींची प्रतिष्ठापना झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34ZuHi4
Read More
देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्या टीकेला राष्ट्रवादी- शिवसेनेचे प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्या टीकेला राष्ट्रवादी- शिवसेनेचे प्रत्युत्तर

September 02, 2020 0 Comments
विरोधी पक्ष भाजपकडून राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे. या सत्ताधारी पक्षातूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.   from Zee24 Taas...
Read More
महाराष्ट्रात सीईटीला अखेर मुहूर्त सापडला, 'या' दिवसांत होणार परीक्षा
(Video) ऐकावे ते नवल... ‘या’ गावाच्या भूगर्भात दफन आहेत 24 मंदिरे!, वाचा सविस्तर

धाबा (जि. चंद्रपूर) : कधीकाळी वैभवाच्या शिखरावर असलेलं गाव आज भकास अन् मागासलेलं आहे. गावाच्या वैभवाच्या खुणाही भूगर्भात दफन झाल्या आहेत. एक नव्हे दोन नव्हे तब्बल चोवीस मंदिरांवर काळाने माती टाकली. ही मंदिरे भूगर्भात निपचित पडली आहेत. अनेक राजवटींनी या गावावर सत्ता गाजविली. मात्र, हे गाव कुणी बसविलं याचे ठोस पुरावे अद्यापही गवसलेले नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या कुडे नांदगावच्या उदरात अनेक रहस्य दडली आहेत.

इतिहासाच्या अनेक रंजक कथा भूगर्भात दफन आहेत. भूगर्भात दडलेल्या काही कथा उत्खननातून बाहेर येतात तर काही योगायोगाने गवसतात. अशीच एक कथा कुडे नांदगाव या लहानशा गावाची आहे. आज मागासलेलं आणि समस्यांचे माहेरघर वाटणारे हे गाव कधी काळी भरभराटीस आलेलं मोठं शहर अन् बाजारपेठ होतं. त्याच्या खाणाखुणा गावभर विखुरल्या आहेत. या गावाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गावाच्या भूगर्भात तब्बल 24 मंदिरे दफन आहेत.

गावाला लागूनच असलेल्या तलावाच्या पाळीवर असलेल्या छोट्याखानी मंदिर परिसरात अनेक दर्जेदार देखणे शिल्प ठेवले आहेत. शेतात नांगरताना, घरकामात येथे टेराकोटाचा भांड्यांचे शिल्प, खेळणी सापडतात. बहामणी सुल्तानाची तांब्याची नाणी अनेकांना सापडली आहेत. येथे सापडलेल्या शिल्पाच्या बनावटीवरून ते चालुक्य, परमार, नाग, गोंड आणि भोसले राजवटीचे असावेत असा अभ्यासकांचा अंदाज आहे. असे असले तरी या गावावर नेमके कुणाचे राज्य होते, हे ठामपणे सांगता येईल असे पुरावे अद्याप गवसले नाहीत.

मार्कंडेश्वर ऋषीची दंतकथा...!

गावात प्रचलित असलेल्या दंतकथेनुसार मार्कंडेश्वर ऋषी गावात तपस्या करण्यासाठी आले होते. त्यांच्यासाठी कुण्या राजाने मंदिर बांधकामास सुरूवात केली. मात्र, काही आपत्ती आली अन् ऋषींनी गाव सोडले. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा मंदिरासाठी येथील शिल्प बैलबंडीने नेण्यात आले. ही दंथकथा खरी होती याबाबत मात्र ठोस पुरावे अद्याप सापडले नाहीत.

आता भिवकुंड झाली गावाची ओळख...

कुडे नांदगावापासून अवघ्या तीन किमी अंतरावर भिवकुंड आहे. सभोवताल घनदाट वनराई असलेल्या या स्थळाला भेट देण्यासाठी भाविक दूरवरून येतात. भिवकुंडला जाण्यासाठी कुडे नांदगाव येथून मार्ग आहे. भिवकुंड सध्या कुडे नांदगावाची ओळख ठरत आहे.

संपादन : अतुल मांगे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

(Video) ऐकावे ते नवल... ‘या’ गावाच्या भूगर्भात दफन आहेत 24 मंदिरे!, वाचा सविस्तर धाबा (जि. चंद्रपूर) : कधीकाळी वैभवाच्या शिखरावर असलेलं गाव आज भकास अन् मागासलेलं आहे. गावाच्या वैभवाच्या खुणाही भूगर्भात दफन झाल्या आहेत. एक नव्हे दोन नव्हे तब्बल चोवीस मंदिरांवर काळाने माती टाकली. ही मंदिरे भूगर्भात निपचित पडली आहेत. अनेक राजवटींनी या गावावर सत्ता गाजविली. मात्र, हे गाव कुणी बसविलं याचे ठोस पुरावे अद्यापही गवसलेले नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या कुडे नांदगावच्या उदरात अनेक रहस्य दडली आहेत. इतिहासाच्या अनेक रंजक कथा भूगर्भात दफन आहेत. भूगर्भात दडलेल्या काही कथा उत्खननातून बाहेर येतात तर काही योगायोगाने गवसतात. अशीच एक कथा कुडे नांदगाव या लहानशा गावाची आहे. आज मागासलेलं आणि समस्यांचे माहेरघर वाटणारे हे गाव कधी काळी भरभराटीस आलेलं मोठं शहर अन् बाजारपेठ होतं. त्याच्या खाणाखुणा गावभर विखुरल्या आहेत. या गावाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गावाच्या भूगर्भात तब्बल 24 मंदिरे दफन आहेत. गावाला लागूनच असलेल्या तलावाच्या पाळीवर असलेल्या छोट्याखानी मंदिर परिसरात अनेक दर्जेदार देखणे शिल्प ठेवले आहेत. शेतात नांगरताना, घरकामात येथे टेराकोटाचा भांड्यांचे शिल्प, खेळणी सापडतात. बहामणी सुल्तानाची तांब्याची नाणी अनेकांना सापडली आहेत. येथे सापडलेल्या शिल्पाच्या बनावटीवरून ते चालुक्य, परमार, नाग, गोंड आणि भोसले राजवटीचे असावेत असा अभ्यासकांचा अंदाज आहे. असे असले तरी या गावावर नेमके कुणाचे राज्य होते, हे ठामपणे सांगता येईल असे पुरावे अद्याप गवसले नाहीत. मार्कंडेश्वर ऋषीची दंतकथा...! गावात प्रचलित असलेल्या दंतकथेनुसार मार्कंडेश्वर ऋषी गावात तपस्या करण्यासाठी आले होते. त्यांच्यासाठी कुण्या राजाने मंदिर बांधकामास सुरूवात केली. मात्र, काही आपत्ती आली अन् ऋषींनी गाव सोडले. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा मंदिरासाठी येथील शिल्प बैलबंडीने नेण्यात आले. ही दंथकथा खरी होती याबाबत मात्र ठोस पुरावे अद्याप सापडले नाहीत. आता भिवकुंड झाली गावाची ओळख... कुडे नांदगावापासून अवघ्या तीन किमी अंतरावर भिवकुंड आहे. सभोवताल घनदाट वनराई असलेल्या या स्थळाला भेट देण्यासाठी भाविक दूरवरून येतात. भिवकुंडला जाण्यासाठी कुडे नांदगाव येथून मार्ग आहे. भिवकुंड सध्या कुडे नांदगावाची ओळख ठरत आहे. संपादन : अतुल मांगे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Z2jLMF
Read More
कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारात वापरलेले साहित्य उघड्यावर; वाढला धोका 

नागपूर : महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. यावेळी सुरक्षिततेसाठी वापरलेले पीपीई किट, मास्क, हातमोजे यांची योग्य विल्हेवाट करण्याची गरज आहे. मात्र, गांधीबाग झोनअंतर्गत गंगाबाई घाट परिसरात कोरोनाबाधितांवरील अंत्यसंस्कारानंतर मृतदेह उचलताना वापरलेले पीपीई किट, हातमोजे व इतर साहित्य उघड्यावर फेकण्यात येत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिग गतीने पसरण्याची भीती व्यक्त केली गेली. विशेष असे की, या परिसरातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. 

येथील गंगाबाई घाट परिसरात तसेच घाटावर अंत्यसंस्कारासाठी दर दिवसाला नागरिक येतात. या परिसरात कोरोना मेडिकल वेस्ट अशाप्रकारे फेकलेला आढळल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. यासंदर्भात माजी नगरसेवक तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पूर्व नागपूरचे अध्यक्ष नाना झोडे यांनी महानगरपालिका गांधीबाग झोन आरोग्य विभागाला सूचना दिली आहे. मात्र, या तक्रारीची दखलच घेण्यात येत नसल्याचे ते म्हणाले. मृतदेह आणणारे कर्मचारी सामान्य लोकांच्या संपर्कात येतात.

याशिवाय येथे कचरा टाकण्यात आल्यामुळे या परिसरात कोरोनाचे विषाणू पसरण्याची भीती आहे. स्वतः हे कर्मचारी काळजी घेत नाही. यामुळे इतरांना धोका निर्माण झाला आहे. गंगाबाई घाट परिसरात असा हा कोरोनाचा जैविक कचरा अस्ताव्यस्त आढळून येतो. झोनमध्ये कार्यरत अधिकारी योग्य जबाबदारीतून काम करीत नसल्याचे यावरून दिसून येते. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. 

हेही वाचा : खेळांमध्येही सवतासुभा? बुद्धिबळ ठरतोय उपेक्षेचा बळी! कसा तो वाचाच

१२०० डिग्री तापमानात व्हावी विल्हेवाट 
मेयो, मेडिकलसह शहरातील सर्वच कोविड केअर सेंटरमधील कचरा सुपर हायजेनिक डिस्पोजल कंपनीच्या माध्यमातून उचलण्यात येतो. भांडेवाडी डम्पिंग स्टेशन येथे विल्हेवाट करण्याचे केंद्र आहे. येथे हॉस्पिटलमधून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या कचऱ्याचे संकलन केले जाते. विशिष्ट यंत्राच्या माध्यमातून १२०० डिग्री तापमानात या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. दर तासाला १०० किलो कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. मात्र, अशाप्रकारे गंगाबाई घाट परिसरात कचरा फेकण्यात आल्याने महापालिकेच्या कार्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संपादन : मेघराज मेश्राम
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारात वापरलेले साहित्य उघड्यावर; वाढला धोका  नागपूर : महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. यावेळी सुरक्षिततेसाठी वापरलेले पीपीई किट, मास्क, हातमोजे यांची योग्य विल्हेवाट करण्याची गरज आहे. मात्र, गांधीबाग झोनअंतर्गत गंगाबाई घाट परिसरात कोरोनाबाधितांवरील अंत्यसंस्कारानंतर मृतदेह उचलताना वापरलेले पीपीई किट, हातमोजे व इतर साहित्य उघड्यावर फेकण्यात येत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिग गतीने पसरण्याची भीती व्यक्त केली गेली. विशेष असे की, या परिसरातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.  येथील गंगाबाई घाट परिसरात तसेच घाटावर अंत्यसंस्कारासाठी दर दिवसाला नागरिक येतात. या परिसरात कोरोना मेडिकल वेस्ट अशाप्रकारे फेकलेला आढळल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. यासंदर्भात माजी नगरसेवक तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पूर्व नागपूरचे अध्यक्ष नाना झोडे यांनी महानगरपालिका गांधीबाग झोन आरोग्य विभागाला सूचना दिली आहे. मात्र, या तक्रारीची दखलच घेण्यात येत नसल्याचे ते म्हणाले. मृतदेह आणणारे कर्मचारी सामान्य लोकांच्या संपर्कात येतात. याशिवाय येथे कचरा टाकण्यात आल्यामुळे या परिसरात कोरोनाचे विषाणू पसरण्याची भीती आहे. स्वतः हे कर्मचारी काळजी घेत नाही. यामुळे इतरांना धोका निर्माण झाला आहे. गंगाबाई घाट परिसरात असा हा कोरोनाचा जैविक कचरा अस्ताव्यस्त आढळून येतो. झोनमध्ये कार्यरत अधिकारी योग्य जबाबदारीतून काम करीत नसल्याचे यावरून दिसून येते. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.  हेही वाचा : खेळांमध्येही सवतासुभा? बुद्धिबळ ठरतोय उपेक्षेचा बळी! कसा तो वाचाच १२०० डिग्री तापमानात व्हावी विल्हेवाट  मेयो, मेडिकलसह शहरातील सर्वच कोविड केअर सेंटरमधील कचरा सुपर हायजेनिक डिस्पोजल कंपनीच्या माध्यमातून उचलण्यात येतो. भांडेवाडी डम्पिंग स्टेशन येथे विल्हेवाट करण्याचे केंद्र आहे. येथे हॉस्पिटलमधून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या कचऱ्याचे संकलन केले जाते. विशिष्ट यंत्राच्या माध्यमातून १२०० डिग्री तापमानात या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. दर तासाला १०० किलो कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. मात्र, अशाप्रकारे गंगाबाई घाट परिसरात कचरा फेकण्यात आल्याने महापालिकेच्या कार्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संपादन : मेघराज मेश्राम   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3510Rts
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 03 सप्टेंबर

पंचांग -
गुरुवार - भाद्रपद कृ.1, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.47, चंद्रोदय सायं. 7.44, चंद्रास्त स. 7.08, भारतीय सौर 12, शके 1942.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९१६ - श्रीमती ॲनी बेझंट यांनी होमरूल लीगची स्थापना केली. 
१९५३ - प्रख्यात तबलावादक लक्ष्मणराव ऊर्फ खाप्रूमामा पर्वतकर यांचे निधन. गोव्यातील ‘घुमट’ हे तालवाद्य ते अत्यंत कौशल्याने वाजवीत. त्यांनी लयकारीमध्ये विविध नावीन्यपूर्ण प्रयोग केले आणि लौकिक मिळविला.
१९९७ - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार अंजान यांचे निधन. बनारसमध्ये जन्मलेल्या अंजान यांचे मूळ नाव लालजी पांडे असे होते. 
१९९७ - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि कम्युनिस्ट नेते एम. फारुकी यांचे निधन.
२००० - गोवा विधानसभेचे पहिले सभापती व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर यांचे निधन.
२००० - पै-पै जमवून शैक्षणिक संस्थांना लाखो रुपयांच्या देणग्या देणारे सामाजिक कार्यकर्ते स्टुअर्ट अंकल यांचे निधन. बॉनपेच पीटर स्टुअर्ट हे मूळचे ओरिसामधील कटक जिल्ह्यातील डगराशी या गावचे राहणारे, मात्र रेल्वेत नोकरी लागल्याने ते १९५६ मध्ये महाराष्ट्रात आले.
२००० - भारताचे आंतरराष्ट्रीय थाळीफेकपटू अजित भादुरिया यांचे निधन.
२००३ - टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. रा. न. अरळीकट्टी यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित पुरस्कार जाहीर. संस्कृत भाषेचा त्यांचा खास अभ्यास आहे. 
२००३ -  प्रख्यात काश्‍मिरी कवी रहमान राही यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘कबीर सन्मान’ जाहीर.

दिनमान -
मेष  : आपल्या कार्यक्षेत्रात अधिकारपद लाभेल. आत्मविश्‍वास, मनोबल वाढेल. 
वृषभ : आत्मविश्‍वास वाढेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : मानसन्मान, कीर्ती लाभेल. हाती घेतलेले काम पूर्णत्वास न्याल.
कर्क  : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. चिडचिडेपणा, मानसिक अस्वस्थता जाणवेल.
सिंह : व्यवसायात यश लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वैवाहिक सौख्य लाभेल. व्यवसायात यश लाभेल.
तुळ : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
वृश्‍चिक  : सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुमचे मते इतरांना पटवून द्याल. 
धनु : वादविवादात टाळावेत. आपली मते इतरांना पटवून द्याल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मकर  : अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
कुंभ : आजचा दिवस आनंदात जाईल. खर्चाचे नियोजन कराल. कुटुंबासाठी खर्च कराल.
मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 03 सप्टेंबर पंचांग - गुरुवार - भाद्रपद कृ.1, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.47, चंद्रोदय सायं. 7.44, चंद्रास्त स. 7.08, भारतीय सौर 12, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९१६ - श्रीमती ॲनी बेझंट यांनी होमरूल लीगची स्थापना केली.  १९५३ - प्रख्यात तबलावादक लक्ष्मणराव ऊर्फ खाप्रूमामा पर्वतकर यांचे निधन. गोव्यातील ‘घुमट’ हे तालवाद्य ते अत्यंत कौशल्याने वाजवीत. त्यांनी लयकारीमध्ये विविध नावीन्यपूर्ण प्रयोग केले आणि लौकिक मिळविला. १९९७ - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार अंजान यांचे निधन. बनारसमध्ये जन्मलेल्या अंजान यांचे मूळ नाव लालजी पांडे असे होते.  १९९७ - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि कम्युनिस्ट नेते एम. फारुकी यांचे निधन. २००० - गोवा विधानसभेचे पहिले सभापती व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर यांचे निधन. २००० - पै-पै जमवून शैक्षणिक संस्थांना लाखो रुपयांच्या देणग्या देणारे सामाजिक कार्यकर्ते स्टुअर्ट अंकल यांचे निधन. बॉनपेच पीटर स्टुअर्ट हे मूळचे ओरिसामधील कटक जिल्ह्यातील डगराशी या गावचे राहणारे, मात्र रेल्वेत नोकरी लागल्याने ते १९५६ मध्ये महाराष्ट्रात आले. २००० - भारताचे आंतरराष्ट्रीय थाळीफेकपटू अजित भादुरिया यांचे निधन. २००३ - टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. रा. न. अरळीकट्टी यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित पुरस्कार जाहीर. संस्कृत भाषेचा त्यांचा खास अभ्यास आहे.  २००३ -  प्रख्यात काश्‍मिरी कवी रहमान राही यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘कबीर सन्मान’ जाहीर. दिनमान - मेष  : आपल्या कार्यक्षेत्रात अधिकारपद लाभेल. आत्मविश्‍वास, मनोबल वाढेल.  वृषभ : आत्मविश्‍वास वाढेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. मिथुन : मानसन्मान, कीर्ती लाभेल. हाती घेतलेले काम पूर्णत्वास न्याल. कर्क  : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. चिडचिडेपणा, मानसिक अस्वस्थता जाणवेल. सिंह : व्यवसायात यश लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वैवाहिक सौख्य लाभेल. व्यवसायात यश लाभेल. तुळ : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. वृश्‍चिक  : सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुमचे मते इतरांना पटवून द्याल.  धनु : वादविवादात टाळावेत. आपली मते इतरांना पटवून द्याल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मकर  : अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. कुंभ : आजचा दिवस आनंदात जाईल. खर्चाचे नियोजन कराल. कुटुंबासाठी खर्च कराल. मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. आपली मते इतरांना पटवून द्याल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32Qh2Hs
Read More