कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारात वापरलेले साहित्य उघड्यावर; वाढला धोका  नागपूर : महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. यावेळी सुरक्षिततेसाठी वापरलेले पीपीई किट, मास्क, हातमोजे यांची योग्य विल्हेवाट करण्याची गरज आहे. मात्र, गांधीबाग झोनअंतर्गत गंगाबाई घाट परिसरात कोरोनाबाधितांवरील अंत्यसंस्कारानंतर मृतदेह उचलताना वापरलेले पीपीई किट, हातमोजे व इतर साहित्य उघड्यावर फेकण्यात येत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिग गतीने पसरण्याची भीती व्यक्त केली गेली. विशेष असे की, या परिसरातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.  येथील गंगाबाई घाट परिसरात तसेच घाटावर अंत्यसंस्कारासाठी दर दिवसाला नागरिक येतात. या परिसरात कोरोना मेडिकल वेस्ट अशाप्रकारे फेकलेला आढळल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. यासंदर्भात माजी नगरसेवक तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पूर्व नागपूरचे अध्यक्ष नाना झोडे यांनी महानगरपालिका गांधीबाग झोन आरोग्य विभागाला सूचना दिली आहे. मात्र, या तक्रारीची दखलच घेण्यात येत नसल्याचे ते म्हणाले. मृतदेह आणणारे कर्मचारी सामान्य लोकांच्या संपर्कात येतात. याशिवाय येथे कचरा टाकण्यात आल्यामुळे या परिसरात कोरोनाचे विषाणू पसरण्याची भीती आहे. स्वतः हे कर्मचारी काळजी घेत नाही. यामुळे इतरांना धोका निर्माण झाला आहे. गंगाबाई घाट परिसरात असा हा कोरोनाचा जैविक कचरा अस्ताव्यस्त आढळून येतो. झोनमध्ये कार्यरत अधिकारी योग्य जबाबदारीतून काम करीत नसल्याचे यावरून दिसून येते. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.  हेही वाचा : खेळांमध्येही सवतासुभा? बुद्धिबळ ठरतोय उपेक्षेचा बळी! कसा तो वाचाच १२०० डिग्री तापमानात व्हावी विल्हेवाट  मेयो, मेडिकलसह शहरातील सर्वच कोविड केअर सेंटरमधील कचरा सुपर हायजेनिक डिस्पोजल कंपनीच्या माध्यमातून उचलण्यात येतो. भांडेवाडी डम्पिंग स्टेशन येथे विल्हेवाट करण्याचे केंद्र आहे. येथे हॉस्पिटलमधून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या कचऱ्याचे संकलन केले जाते. विशिष्ट यंत्राच्या माध्यमातून १२०० डिग्री तापमानात या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. दर तासाला १०० किलो कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. मात्र, अशाप्रकारे गंगाबाई घाट परिसरात कचरा फेकण्यात आल्याने महापालिकेच्या कार्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संपादन : मेघराज मेश्राम   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, September 2, 2020

कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारात वापरलेले साहित्य उघड्यावर; वाढला धोका  नागपूर : महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. यावेळी सुरक्षिततेसाठी वापरलेले पीपीई किट, मास्क, हातमोजे यांची योग्य विल्हेवाट करण्याची गरज आहे. मात्र, गांधीबाग झोनअंतर्गत गंगाबाई घाट परिसरात कोरोनाबाधितांवरील अंत्यसंस्कारानंतर मृतदेह उचलताना वापरलेले पीपीई किट, हातमोजे व इतर साहित्य उघड्यावर फेकण्यात येत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिग गतीने पसरण्याची भीती व्यक्त केली गेली. विशेष असे की, या परिसरातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.  येथील गंगाबाई घाट परिसरात तसेच घाटावर अंत्यसंस्कारासाठी दर दिवसाला नागरिक येतात. या परिसरात कोरोना मेडिकल वेस्ट अशाप्रकारे फेकलेला आढळल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. यासंदर्भात माजी नगरसेवक तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पूर्व नागपूरचे अध्यक्ष नाना झोडे यांनी महानगरपालिका गांधीबाग झोन आरोग्य विभागाला सूचना दिली आहे. मात्र, या तक्रारीची दखलच घेण्यात येत नसल्याचे ते म्हणाले. मृतदेह आणणारे कर्मचारी सामान्य लोकांच्या संपर्कात येतात. याशिवाय येथे कचरा टाकण्यात आल्यामुळे या परिसरात कोरोनाचे विषाणू पसरण्याची भीती आहे. स्वतः हे कर्मचारी काळजी घेत नाही. यामुळे इतरांना धोका निर्माण झाला आहे. गंगाबाई घाट परिसरात असा हा कोरोनाचा जैविक कचरा अस्ताव्यस्त आढळून येतो. झोनमध्ये कार्यरत अधिकारी योग्य जबाबदारीतून काम करीत नसल्याचे यावरून दिसून येते. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.  हेही वाचा : खेळांमध्येही सवतासुभा? बुद्धिबळ ठरतोय उपेक्षेचा बळी! कसा तो वाचाच १२०० डिग्री तापमानात व्हावी विल्हेवाट  मेयो, मेडिकलसह शहरातील सर्वच कोविड केअर सेंटरमधील कचरा सुपर हायजेनिक डिस्पोजल कंपनीच्या माध्यमातून उचलण्यात येतो. भांडेवाडी डम्पिंग स्टेशन येथे विल्हेवाट करण्याचे केंद्र आहे. येथे हॉस्पिटलमधून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या कचऱ्याचे संकलन केले जाते. विशिष्ट यंत्राच्या माध्यमातून १२०० डिग्री तापमानात या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. दर तासाला १०० किलो कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. मात्र, अशाप्रकारे गंगाबाई घाट परिसरात कचरा फेकण्यात आल्याने महापालिकेच्या कार्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संपादन : मेघराज मेश्राम   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3510Rts

No comments:

Post a Comment