(Video) ऐकावे ते नवल... ‘या’ गावाच्या भूगर्भात दफन आहेत 24 मंदिरे!, वाचा सविस्तर धाबा (जि. चंद्रपूर) : कधीकाळी वैभवाच्या शिखरावर असलेलं गाव आज भकास अन् मागासलेलं आहे. गावाच्या वैभवाच्या खुणाही भूगर्भात दफन झाल्या आहेत. एक नव्हे दोन नव्हे तब्बल चोवीस मंदिरांवर काळाने माती टाकली. ही मंदिरे भूगर्भात निपचित पडली आहेत. अनेक राजवटींनी या गावावर सत्ता गाजविली. मात्र, हे गाव कुणी बसविलं याचे ठोस पुरावे अद्यापही गवसलेले नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या कुडे नांदगावच्या उदरात अनेक रहस्य दडली आहेत. इतिहासाच्या अनेक रंजक कथा भूगर्भात दफन आहेत. भूगर्भात दडलेल्या काही कथा उत्खननातून बाहेर येतात तर काही योगायोगाने गवसतात. अशीच एक कथा कुडे नांदगाव या लहानशा गावाची आहे. आज मागासलेलं आणि समस्यांचे माहेरघर वाटणारे हे गाव कधी काळी भरभराटीस आलेलं मोठं शहर अन् बाजारपेठ होतं. त्याच्या खाणाखुणा गावभर विखुरल्या आहेत. या गावाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गावाच्या भूगर्भात तब्बल 24 मंदिरे दफन आहेत. गावाला लागूनच असलेल्या तलावाच्या पाळीवर असलेल्या छोट्याखानी मंदिर परिसरात अनेक दर्जेदार देखणे शिल्प ठेवले आहेत. शेतात नांगरताना, घरकामात येथे टेराकोटाचा भांड्यांचे शिल्प, खेळणी सापडतात. बहामणी सुल्तानाची तांब्याची नाणी अनेकांना सापडली आहेत. येथे सापडलेल्या शिल्पाच्या बनावटीवरून ते चालुक्य, परमार, नाग, गोंड आणि भोसले राजवटीचे असावेत असा अभ्यासकांचा अंदाज आहे. असे असले तरी या गावावर नेमके कुणाचे राज्य होते, हे ठामपणे सांगता येईल असे पुरावे अद्याप गवसले नाहीत. मार्कंडेश्वर ऋषीची दंतकथा...! गावात प्रचलित असलेल्या दंतकथेनुसार मार्कंडेश्वर ऋषी गावात तपस्या करण्यासाठी आले होते. त्यांच्यासाठी कुण्या राजाने मंदिर बांधकामास सुरूवात केली. मात्र, काही आपत्ती आली अन् ऋषींनी गाव सोडले. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा मंदिरासाठी येथील शिल्प बैलबंडीने नेण्यात आले. ही दंथकथा खरी होती याबाबत मात्र ठोस पुरावे अद्याप सापडले नाहीत. आता भिवकुंड झाली गावाची ओळख... कुडे नांदगावापासून अवघ्या तीन किमी अंतरावर भिवकुंड आहे. सभोवताल घनदाट वनराई असलेल्या या स्थळाला भेट देण्यासाठी भाविक दूरवरून येतात. भिवकुंडला जाण्यासाठी कुडे नांदगाव येथून मार्ग आहे. भिवकुंड सध्या कुडे नांदगावाची ओळख ठरत आहे. संपादन : अतुल मांगे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, September 2, 2020

(Video) ऐकावे ते नवल... ‘या’ गावाच्या भूगर्भात दफन आहेत 24 मंदिरे!, वाचा सविस्तर धाबा (जि. चंद्रपूर) : कधीकाळी वैभवाच्या शिखरावर असलेलं गाव आज भकास अन् मागासलेलं आहे. गावाच्या वैभवाच्या खुणाही भूगर्भात दफन झाल्या आहेत. एक नव्हे दोन नव्हे तब्बल चोवीस मंदिरांवर काळाने माती टाकली. ही मंदिरे भूगर्भात निपचित पडली आहेत. अनेक राजवटींनी या गावावर सत्ता गाजविली. मात्र, हे गाव कुणी बसविलं याचे ठोस पुरावे अद्यापही गवसलेले नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या कुडे नांदगावच्या उदरात अनेक रहस्य दडली आहेत. इतिहासाच्या अनेक रंजक कथा भूगर्भात दफन आहेत. भूगर्भात दडलेल्या काही कथा उत्खननातून बाहेर येतात तर काही योगायोगाने गवसतात. अशीच एक कथा कुडे नांदगाव या लहानशा गावाची आहे. आज मागासलेलं आणि समस्यांचे माहेरघर वाटणारे हे गाव कधी काळी भरभराटीस आलेलं मोठं शहर अन् बाजारपेठ होतं. त्याच्या खाणाखुणा गावभर विखुरल्या आहेत. या गावाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गावाच्या भूगर्भात तब्बल 24 मंदिरे दफन आहेत. गावाला लागूनच असलेल्या तलावाच्या पाळीवर असलेल्या छोट्याखानी मंदिर परिसरात अनेक दर्जेदार देखणे शिल्प ठेवले आहेत. शेतात नांगरताना, घरकामात येथे टेराकोटाचा भांड्यांचे शिल्प, खेळणी सापडतात. बहामणी सुल्तानाची तांब्याची नाणी अनेकांना सापडली आहेत. येथे सापडलेल्या शिल्पाच्या बनावटीवरून ते चालुक्य, परमार, नाग, गोंड आणि भोसले राजवटीचे असावेत असा अभ्यासकांचा अंदाज आहे. असे असले तरी या गावावर नेमके कुणाचे राज्य होते, हे ठामपणे सांगता येईल असे पुरावे अद्याप गवसले नाहीत. मार्कंडेश्वर ऋषीची दंतकथा...! गावात प्रचलित असलेल्या दंतकथेनुसार मार्कंडेश्वर ऋषी गावात तपस्या करण्यासाठी आले होते. त्यांच्यासाठी कुण्या राजाने मंदिर बांधकामास सुरूवात केली. मात्र, काही आपत्ती आली अन् ऋषींनी गाव सोडले. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा मंदिरासाठी येथील शिल्प बैलबंडीने नेण्यात आले. ही दंथकथा खरी होती याबाबत मात्र ठोस पुरावे अद्याप सापडले नाहीत. आता भिवकुंड झाली गावाची ओळख... कुडे नांदगावापासून अवघ्या तीन किमी अंतरावर भिवकुंड आहे. सभोवताल घनदाट वनराई असलेल्या या स्थळाला भेट देण्यासाठी भाविक दूरवरून येतात. भिवकुंडला जाण्यासाठी कुडे नांदगाव येथून मार्ग आहे. भिवकुंड सध्या कुडे नांदगावाची ओळख ठरत आहे. संपादन : अतुल मांगे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Z2jLMF

No comments:

Post a Comment