Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 2, 2020

कोरोना व्हायरस : फैलाव रोखण्यासाठी सर्वांनीच चेहऱ्यावर मास्क बांधावेत?
राजस्थान सरकार का फैसला, दो महीने के लिए टाले बिजली-पानी के बिल https://ift.tt/39DKv8P
विक्रीसाठी आली ताजी मासोळी अन् अवघ्या तासाभरात झाली फुर्रर्र...

गोंडपिंपरी (जि. चंद्रपूर)  : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गावातील किराणा दुकान, भाजीपाला दैनंदिन बाजार सुरू आहेत. मटण, चिकन सेंटर बंद असल्याने खवय्यांची घालमेल सुरू आहे. अशात गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे तलावातील मासोळी विक्रीसाठी आली. अवघ्या तासाभरात दोन क्लिंटल मासोळी संपली. विशेष म्हणजे मासोळी खरेदी करताना सोशल डिस्टंन्स ग्राहक पाळत होते.

कोरोनाने देशाला टाळेबंद केले. जिल्ह्याचा सीमा बंद आहेत. घराबाहेर न पडण्याचा सूचना प्रशासन करीत आहे. किराणा,भाजीपाला, मेडिकल दुकाने वगळता बाकी दुकाने बंद आहेत. गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धाबा येथील चिकन सेंटर बंद आहेत. तर मटणाची खरेदी करण्यासाठी तालुका गाठावे लागते. बाहेर निघाले की पोलिस दादा प्रसाद द्यायला टपून बसलेले. अशात मांसाहार करणाऱ्यांची चांगलीच घालमेल होताना दिसते आहे.

दुपारी डोंगरगाव तलावातील जवळपास अडीच क्लिंटल मासोळी गावात विक्रीसाठी आली. ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी सात-ते आठ जण वेगवेगळ्या वाँर्डात मासोळी विक्रीसाठी गेले. मासोळी आली याची माहिती मिळताच खवय्यांनी गर्दी केली. अवघ्या एका तासात मासोळी संपली. सोशल डिस्टन्स पाळत मासोळी खरेदी सुरू होती. त्यामुळे अनेकांचे हात रितेच राहिले.

- सोशल मीडियावर आठवले स्टाईलची धूम, हे आहे कारण...

तलावातच दुकान थाटले
चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, अशा अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे चिकनकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. मासोळ्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली. गोंडपिपरी तालुक्यातील कुडेनांदगाव तलावात मच्छीपालन सुरू आहे. ग्राहकांची वाढती मागणी बघता तलावात ठाण मांडून विक्री सुरूआहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विक्रीसाठी आली ताजी मासोळी अन् अवघ्या तासाभरात झाली फुर्रर्र... गोंडपिंपरी (जि. चंद्रपूर)  : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गावातील किराणा दुकान, भाजीपाला दैनंदिन बाजार सुरू आहेत. मटण, चिकन सेंटर बंद असल्याने खवय्यांची घालमेल सुरू आहे. अशात गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे तलावातील मासोळी विक्रीसाठी आली. अवघ्या तासाभरात दोन क्लिंटल मासोळी संपली. विशेष म्हणजे मासोळी खरेदी करताना सोशल डिस्टंन्स ग्राहक पाळत होते. कोरोनाने देशाला टाळेबंद केले. जिल्ह्याचा सीमा बंद आहेत. घराबाहेर न पडण्याचा सूचना प्रशासन करीत आहे. किराणा,भाजीपाला, मेडिकल दुकाने वगळता बाकी दुकाने बंद आहेत. गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धाबा येथील चिकन सेंटर बंद आहेत. तर मटणाची खरेदी करण्यासाठी तालुका गाठावे लागते. बाहेर निघाले की पोलिस दादा प्रसाद द्यायला टपून बसलेले. अशात मांसाहार करणाऱ्यांची चांगलीच घालमेल होताना दिसते आहे. दुपारी डोंगरगाव तलावातील जवळपास अडीच क्लिंटल मासोळी गावात विक्रीसाठी आली. ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी सात-ते आठ जण वेगवेगळ्या वाँर्डात मासोळी विक्रीसाठी गेले. मासोळी आली याची माहिती मिळताच खवय्यांनी गर्दी केली. अवघ्या एका तासात मासोळी संपली. सोशल डिस्टन्स पाळत मासोळी खरेदी सुरू होती. त्यामुळे अनेकांचे हात रितेच राहिले. - सोशल मीडियावर आठवले स्टाईलची धूम, हे आहे कारण... तलावातच दुकान थाटले चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, अशा अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे चिकनकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. मासोळ्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली. गोंडपिपरी तालुक्यातील कुडेनांदगाव तलावात मच्छीपालन सुरू आहे. ग्राहकांची वाढती मागणी बघता तलावात ठाण मांडून विक्री सुरूआहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UEhllz
Read More
सावधान...क्वारंटाईन आहात? मग तुम्ही हे वाचाच...

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील क्वारंटाईन व्यक्तींवर आता पोलिस हायटेक नजर ठेवत आहेत. अशा व्यक्ती घराबाहेर पडल्यास नियंत्रण कक्षाला तातडीने माहिती कळेल, अशी यंत्रणा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी कार्यान्वित केली आहे. 

कोरोनाचा प्रसार समाजातील अन्य व्यक्तींना होऊ नये, यासाठी कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचे घरातच अलगीकरण करण्यात येते व त्यांच्या शरीरावर तसा शिक्का उमटवण्यात येतो; परंतु घरीच अलगीकरण करण्यात आलेले काही लोक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करता समाजात फिरताना आढळतात व सामाजिक स्वास्थ धोक्‍यात आणतात.

अशा व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली कोवीड-19 क्वारंटाईन मॅनेजमेंट सिस्टिम नावाचे ऍप कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या ऍपमुळे घरीच अलगीकरण करण्यात आलेली व्यक्ती घराबाहेर पडल्यास तिचे लोकेशन तत्काळ जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षास कळणार आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या घरी तत्काळ पोलिस पथक पाठवून त्याला योग्य समज देण्यात येईल. 

घरीच अलगीकरण करण्यात आलेली व्यक्ती वारंवार घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आल्यास, जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागास माहिती देऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे घरीच अलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींनी घराबाहेर न पडता सामाजिक स्वास्थ्य टिकवून ठेवावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक गेडाम यांनी केले आहे. 

आणखी चार कॅम्प वाढविले 
परराज्यांतील मजूर, बेघर तसेच कामगार यांच्यासाठी जिल्ह्यात एकूण 14 कॅम्प उभारण्यात आले असून, त्यात आजमितीस 527 एवढे लोक राहत आहेत. या सर्वांच्या जेवणाची सोय शिवभोजनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या मजूर व बेघर कॅम्पसाठी कोणास वस्तू स्वरूपात मदत करावयाची असल्यास त्यांनी विक्रम बहुरे- 9518950903 किंवा अशोक पोळ- 9766144041 या क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश भंग केल्याबद्दल 35 जणांवर कारवाई करण्यात आली असून, एकूण 31 दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केलेली आहेत. 

ज्येष्ठांसाठी हेल्पलाईन 
ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना शिधा, औषध, आरोग्य या संबंधी काही समस्या असल्यास तसेच काही आवश्‍यकता असल्यास त्यांनी 02362-228869 या हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. हा हेल्पलाईन क्रमांक 24 तास कार्यरत असणार आहे. 

समुपदेशनाची व्यवस्था 
जिल्ह्यात अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या व्यक्तींचे समुपदेशन करण्यात येत आहे. मजूर व बेघर कॅम्पमध्ये अडकलेल्या लोकांचेही समुपदेशन करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत सहा समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. समुपदेशनासाठी नमिता परब (7887366603), अर्पिता वाटके (7385250501, दोन्ही सावंतवाडी), समृद्धी मळेकर (9326298748), नम्रता नेवगी (9527911350, दोन्ही कुडाळ); तर रिया सांगेलकर (9420969702), रोजा खडपकर (9765321297, दोन्ही कणकवली) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सावधान...क्वारंटाईन आहात? मग तुम्ही हे वाचाच... ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील क्वारंटाईन व्यक्तींवर आता पोलिस हायटेक नजर ठेवत आहेत. अशा व्यक्ती घराबाहेर पडल्यास नियंत्रण कक्षाला तातडीने माहिती कळेल, अशी यंत्रणा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी कार्यान्वित केली आहे.  कोरोनाचा प्रसार समाजातील अन्य व्यक्तींना होऊ नये, यासाठी कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचे घरातच अलगीकरण करण्यात येते व त्यांच्या शरीरावर तसा शिक्का उमटवण्यात येतो; परंतु घरीच अलगीकरण करण्यात आलेले काही लोक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करता समाजात फिरताना आढळतात व सामाजिक स्वास्थ धोक्‍यात आणतात. अशा व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली कोवीड-19 क्वारंटाईन मॅनेजमेंट सिस्टिम नावाचे ऍप कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या ऍपमुळे घरीच अलगीकरण करण्यात आलेली व्यक्ती घराबाहेर पडल्यास तिचे लोकेशन तत्काळ जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षास कळणार आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या घरी तत्काळ पोलिस पथक पाठवून त्याला योग्य समज देण्यात येईल.  घरीच अलगीकरण करण्यात आलेली व्यक्ती वारंवार घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आल्यास, जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागास माहिती देऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे घरीच अलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींनी घराबाहेर न पडता सामाजिक स्वास्थ्य टिकवून ठेवावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक गेडाम यांनी केले आहे.  आणखी चार कॅम्प वाढविले  परराज्यांतील मजूर, बेघर तसेच कामगार यांच्यासाठी जिल्ह्यात एकूण 14 कॅम्प उभारण्यात आले असून, त्यात आजमितीस 527 एवढे लोक राहत आहेत. या सर्वांच्या जेवणाची सोय शिवभोजनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या मजूर व बेघर कॅम्पसाठी कोणास वस्तू स्वरूपात मदत करावयाची असल्यास त्यांनी विक्रम बहुरे- 9518950903 किंवा अशोक पोळ- 9766144041 या क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश भंग केल्याबद्दल 35 जणांवर कारवाई करण्यात आली असून, एकूण 31 दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केलेली आहेत.  ज्येष्ठांसाठी हेल्पलाईन  ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना शिधा, औषध, आरोग्य या संबंधी काही समस्या असल्यास तसेच काही आवश्‍यकता असल्यास त्यांनी 02362-228869 या हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. हा हेल्पलाईन क्रमांक 24 तास कार्यरत असणार आहे.  समुपदेशनाची व्यवस्था  जिल्ह्यात अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या व्यक्तींचे समुपदेशन करण्यात येत आहे. मजूर व बेघर कॅम्पमध्ये अडकलेल्या लोकांचेही समुपदेशन करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत सहा समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. समुपदेशनासाठी नमिता परब (7887366603), अर्पिता वाटके (7385250501, दोन्ही सावंतवाडी), समृद्धी मळेकर (9326298748), नम्रता नेवगी (9527911350, दोन्ही कुडाळ); तर रिया सांगेलकर (9420969702), रोजा खडपकर (9765321297, दोन्ही कणकवली) यांची नेमणूक करण्यात आली आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dMHFlj
Read More
श्रेय कोणाला : जिल्ह्यातील १०८ कोटींचा निधी पश्चिम महाराष्ट्राला

बीड : कुठलाही निधी वा शासन योजना आली की मी आणि माझ्यामुळेच असाच प्रघात जिल्ह्यात पडला आहे. अगदी पीकविमा शेतकऱ्यांनी भरलेला असतो आणि भेटला तरी आम्हीच म्हणणारे न भेटणाऱ्यांची जबाबदारी घेत नाहीत; पण आता जिल्ह्यातील १०८ कोटी रुपयांचा निधी पश्चिम महाराष्ट्राच्या घशात जाणार आहे. याचे श्रेय कोण घेणार? असा प्रश्न आहे. 

मागच्या महायुती सरकारच्या काळात मंजूर झालेले मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील तब्बल १७० किालोमीटर लांबीची ३४ रस्ताकामे रद्द करण्याचा नवीन शासनादेश नुकताच ग्रामविकास खात्याने काढला आहे. ही कामे आता कोल्हापूर, बारामती आदी भागांत होणार आहेत. रद्द झालेल्या कामांत सर्वाधिक केज व अंबाजोगाई तालुक्यातील आहेत. 

नव्या सरकारमध्ये जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने अद्याप भेटले तर काही नाही; पण पहिल्या टप्प्यात २५/१५ शीर्षाची कामे रद्द झाल्यानंतर आता धडकन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामेही रद्द झाली आहेत. आता याचे श्रेय कोणी घेणार का, असा प्रश्न रस्ताकामे रद्द झालेल्या गावांतील नागरिक उपस्थित करीत आहेत. या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली आहे. 

कार्यारंभ आदेश देण्याच्या टप्प्यावरच रद्दचा निर्णय 

दरम्यान, तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जिल्ह्यातील रस्ताकामे मंजूर केली होती. यात बीड तालुक्यात १४ कोटी ३५ लाख, अंबाजोगाई तालुक्यासाठी ३३ कोटी ८४ लाख, केज तालुक्यासाठी ४८ कोटी ८४, गेवराई तालुक्यासाठी आठ कोटी ४३ लाख, तर माजलगाव तालुक्यासाठी दोन कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. 

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

ही रस्ताकामे झाली रद्द 

अंबाजोगाई तालुका - जिल्हा मार्ग ते माकेगाव ते पाटोदा, राज्यमार्ग ते पाटोदा ते अंजनपूर, जिल्हामार्ग ते भावठाणा-राक्षसवाडी-चिंचखंडी, राज्यमार्ग ते मगरवाडी-अंबाजोगाई, जिल्हा मार्ग ते बीडगर वस्ती, राज्यमार्ग ते मालदरावस्ती, भावठाणा ते परवारवस्ती, राज्यमार्ग ते राजेवाडी, जिल्हा मार्ग ते चव्हाणवाडी, राज्यमार्ग ते सनगाव, राज्यमार्ग ते उमराई रस्ता, जिल्हा मार्ग ते सोनवळा ते भावठाणा, राज्यमार्ग ते गुंडरे वस्ती.

केज तालुका - तांबवा ते गांजपूर, राज्यमार्ग ते विडा-आंधळेवाडी रस्ता, राज्यमार्ग ते गप्पेवाडी, जोला ते पिंपळगाव, आडस ते कळंबअंबा, चंदनसावरगाव, सांगवी ते बेलगाव-आरणगाव, राज्यमार्ग ते चंदनसावरगाव ते जवळबन बनसारोळा रस्ता, राज्यमार्ग ते लांबतुरे वस्ती, राज्यमार्ग ते पिसेगाव, जानेगाव, उंद्री ते गांजपूर ते आडस-पवार वस्ती, येडके वस्ती ते रानोबाचीवाडी ते जिल्हा मार्ग ते जिवाचीवाडी ते तुकुचीवाडी. 

गेवराई तालुका - राज्यमार्ग ते चोपड्याचीवाडी ते वहान रस्ता, मादळमोही ते मुळुकवाडी, जिल्हा मार्ग ते कटचिंचोली. 

माजलगाव तालुका - जिल्हा मार्ग ते खुळखुळी तांडा, जिल्हा मार्ग ते चोपानवाडी, राज्य मार्ग ते धर्मेवाडी. 

बीड तालुका - राज्य मार्ग ते बोरदेवी रोड, जिल्हा मार्ग ते किन्हीपाई, राज्य मार्ग ते सांडरवण ते पिंपळादेवी रस्ता, जिल्हा मार्ग ते सुर्डीथोट ते नवाबपूर केसापुरी रस्ता. 

पालकमंत्र्यांचे सुडाचे राजकारण : मुंदडा 

पालकमंत्री म्हणून काही देण्याऐवजी उलट मागच्या काळात नेत्या पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यासाठी मंजूर केलेली कामेही रद्द केली जात आहेत. सध्या सर्वजण कोरोनाशी लढत असताना अशा काळातही विद्यमान पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे कुरघोडीचे राजकारण केल्याचा आरोप आमदार नमिता मुंदडा यांनी केला.

उस्मानाबादच्या एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी

रद्द झालेल्यांत सर्वाधिक २४ कामे माझ्या केज मतदारसंघातील आहेत. यासाठी ८१ कोटी रुपये खर्च होणार होता. या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला नवे काही आणले तर नाही उलट पंकजा मुंडे यांनी आणलेला निधीही हे परत पाठवीत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

आम्ही जरी विरोधी पक्षातील आमदार असलो तरी तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. जर पूर्वीचा निधीच तुम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या घशात घालणार असाल तर तुमच्याकडून भविष्यात जिल्ह्याच्या विकासाची अपेक्षा काय करावी, असेही नमिता मुंदडा म्हणाल्या. याप्रकरणी आपण राज्यपाल आणि उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही नमिता मुंदडा म्हणाल्या.

जिल्ह्याला कर्तव्यशून्य पालकमंत्री : मस्के 

सत्ता आल्यापासून एखादी नवी योजना किंवा निधी तर सोडाच; परंतु पंकजा मुंडे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली कामे व निधी रद्द करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. जिल्ह्याविषयी आताच्या पालकमंत्र्यांना अजिबात कळवळा वाटत नाही, कोट्यवधी रुपयांचा निधी देखील वाचवू शकले नाहीत, हे तर त्यांचे सपशेल अपयश आहे, अशा शब्दांत मस्के यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

श्रेय कोणाला : जिल्ह्यातील १०८ कोटींचा निधी पश्चिम महाराष्ट्राला बीड : कुठलाही निधी वा शासन योजना आली की मी आणि माझ्यामुळेच असाच प्रघात जिल्ह्यात पडला आहे. अगदी पीकविमा शेतकऱ्यांनी भरलेला असतो आणि भेटला तरी आम्हीच म्हणणारे न भेटणाऱ्यांची जबाबदारी घेत नाहीत; पण आता जिल्ह्यातील १०८ कोटी रुपयांचा निधी पश्चिम महाराष्ट्राच्या घशात जाणार आहे. याचे श्रेय कोण घेणार? असा प्रश्न आहे.  मागच्या महायुती सरकारच्या काळात मंजूर झालेले मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील तब्बल १७० किालोमीटर लांबीची ३४ रस्ताकामे रद्द करण्याचा नवीन शासनादेश नुकताच ग्रामविकास खात्याने काढला आहे. ही कामे आता कोल्हापूर, बारामती आदी भागांत होणार आहेत. रद्द झालेल्या कामांत सर्वाधिक केज व अंबाजोगाई तालुक्यातील आहेत.  नव्या सरकारमध्ये जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने अद्याप भेटले तर काही नाही; पण पहिल्या टप्प्यात २५/१५ शीर्षाची कामे रद्द झाल्यानंतर आता धडकन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामेही रद्द झाली आहेत. आता याचे श्रेय कोणी घेणार का, असा प्रश्न रस्ताकामे रद्द झालेल्या गावांतील नागरिक उपस्थित करीत आहेत. या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली आहे.  कार्यारंभ आदेश देण्याच्या टप्प्यावरच रद्दचा निर्णय  दरम्यान, तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जिल्ह्यातील रस्ताकामे मंजूर केली होती. यात बीड तालुक्यात १४ कोटी ३५ लाख, अंबाजोगाई तालुक्यासाठी ३३ कोटी ८४ लाख, केज तालुक्यासाठी ४८ कोटी ८४, गेवराई तालुक्यासाठी आठ कोटी ४३ लाख, तर माजलगाव तालुक्यासाठी दोन कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता.  मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच ही रस्ताकामे झाली रद्द  अंबाजोगाई तालुका - जिल्हा मार्ग ते माकेगाव ते पाटोदा, राज्यमार्ग ते पाटोदा ते अंजनपूर, जिल्हामार्ग ते भावठाणा-राक्षसवाडी-चिंचखंडी, राज्यमार्ग ते मगरवाडी-अंबाजोगाई, जिल्हा मार्ग ते बीडगर वस्ती, राज्यमार्ग ते मालदरावस्ती, भावठाणा ते परवारवस्ती, राज्यमार्ग ते राजेवाडी, जिल्हा मार्ग ते चव्हाणवाडी, राज्यमार्ग ते सनगाव, राज्यमार्ग ते उमराई रस्ता, जिल्हा मार्ग ते सोनवळा ते भावठाणा, राज्यमार्ग ते गुंडरे वस्ती. केज तालुका - तांबवा ते गांजपूर, राज्यमार्ग ते विडा-आंधळेवाडी रस्ता, राज्यमार्ग ते गप्पेवाडी, जोला ते पिंपळगाव, आडस ते कळंबअंबा, चंदनसावरगाव, सांगवी ते बेलगाव-आरणगाव, राज्यमार्ग ते चंदनसावरगाव ते जवळबन बनसारोळा रस्ता, राज्यमार्ग ते लांबतुरे वस्ती, राज्यमार्ग ते पिसेगाव, जानेगाव, उंद्री ते गांजपूर ते आडस-पवार वस्ती, येडके वस्ती ते रानोबाचीवाडी ते जिल्हा मार्ग ते जिवाचीवाडी ते तुकुचीवाडी.  गेवराई तालुका - राज्यमार्ग ते चोपड्याचीवाडी ते वहान रस्ता, मादळमोही ते मुळुकवाडी, जिल्हा मार्ग ते कटचिंचोली.  माजलगाव तालुका - जिल्हा मार्ग ते खुळखुळी तांडा, जिल्हा मार्ग ते चोपानवाडी, राज्य मार्ग ते धर्मेवाडी.  बीड तालुका - राज्य मार्ग ते बोरदेवी रोड, जिल्हा मार्ग ते किन्हीपाई, राज्य मार्ग ते सांडरवण ते पिंपळादेवी रस्ता, जिल्हा मार्ग ते सुर्डीथोट ते नवाबपूर केसापुरी रस्ता.  पालकमंत्र्यांचे सुडाचे राजकारण : मुंदडा  पालकमंत्री म्हणून काही देण्याऐवजी उलट मागच्या काळात नेत्या पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यासाठी मंजूर केलेली कामेही रद्द केली जात आहेत. सध्या सर्वजण कोरोनाशी लढत असताना अशा काळातही विद्यमान पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे कुरघोडीचे राजकारण केल्याचा आरोप आमदार नमिता मुंदडा यांनी केला. उस्मानाबादच्या एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी रद्द झालेल्यांत सर्वाधिक २४ कामे माझ्या केज मतदारसंघातील आहेत. यासाठी ८१ कोटी रुपये खर्च होणार होता. या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला नवे काही आणले तर नाही उलट पंकजा मुंडे यांनी आणलेला निधीही हे परत पाठवीत असल्याचा आरोप त्यांनी केला.  आम्ही जरी विरोधी पक्षातील आमदार असलो तरी तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. जर पूर्वीचा निधीच तुम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या घशात घालणार असाल तर तुमच्याकडून भविष्यात जिल्ह्याच्या विकासाची अपेक्षा काय करावी, असेही नमिता मुंदडा म्हणाल्या. याप्रकरणी आपण राज्यपाल आणि उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही नमिता मुंदडा म्हणाल्या. जिल्ह्याला कर्तव्यशून्य पालकमंत्री : मस्के  सत्ता आल्यापासून एखादी नवी योजना किंवा निधी तर सोडाच; परंतु पंकजा मुंडे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली कामे व निधी रद्द करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. जिल्ह्याविषयी आताच्या पालकमंत्र्यांना अजिबात कळवळा वाटत नाही, कोट्यवधी रुपयांचा निधी देखील वाचवू शकले नाहीत, हे तर त्यांचे सपशेल अपयश आहे, अशा शब्दांत मस्के यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dT9w31
Read More
होडी मालक, खलाशी अडचणीत

मालवण (सिंधुदुर्ग) - कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्ग किल्ला होडी वाहतूक सेवेत असलेला खलाशी व मालक वर्ग अडचणीत सापडला असून लॉक डाऊन मे अखेर पर्यंत चालला तर हे तीन महिने आणि पुढे येणाऱ्या पावसाळ्यातील तीन महिने मिळून सहा महिने होडी व्यवसायिकांचा व्यवसाय बंद राहणार असल्याने यावर अवलंबून असणाऱ्या 150 कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवणार आहे. त्यामुळे शासनाने याचा विचार करून प्रवासी होडी व्यवसायिकांना मदत करावी, अशी मागणी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी केली आहे. 

लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक सेवेतील सर्व बोटी सध्या नांगरलेल्या असून त्यांना चोपडान कलर करणेही मुश्‍कील बनले आहे. त्यांना दर महिन्याला चोपडान कलर करणे महत्त्वाचे आहे. बोटी लाकडी असलेल्या मुळे बोटीला समुद्र कीटक लागून बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्यामुळे शासनाने बोटीला चोपडान कलर करण्यासाठी परवानगी द्यावी, असेही मंगेश सावंत यांनी म्हटले आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

होडी मालक, खलाशी अडचणीत मालवण (सिंधुदुर्ग) - कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्ग किल्ला होडी वाहतूक सेवेत असलेला खलाशी व मालक वर्ग अडचणीत सापडला असून लॉक डाऊन मे अखेर पर्यंत चालला तर हे तीन महिने आणि पुढे येणाऱ्या पावसाळ्यातील तीन महिने मिळून सहा महिने होडी व्यवसायिकांचा व्यवसाय बंद राहणार असल्याने यावर अवलंबून असणाऱ्या 150 कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवणार आहे. त्यामुळे शासनाने याचा विचार करून प्रवासी होडी व्यवसायिकांना मदत करावी, अशी मागणी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी केली आहे.  लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक सेवेतील सर्व बोटी सध्या नांगरलेल्या असून त्यांना चोपडान कलर करणेही मुश्‍कील बनले आहे. त्यांना दर महिन्याला चोपडान कलर करणे महत्त्वाचे आहे. बोटी लाकडी असलेल्या मुळे बोटीला समुद्र कीटक लागून बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्यामुळे शासनाने बोटीला चोपडान कलर करण्यासाठी परवानगी द्यावी, असेही मंगेश सावंत यांनी म्हटले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aDW3KF
Read More
Coronavirus : क्वारंटाइनमध्ये घ्या पौष्टिक आहार

जागितक आरोग्य संघटनेने जारी केल्या सूचना
नवी दिल्ली - कोरोनाव्हायरसची भीती सर्व जगात पसरली आहे. अनेक देशात या विषाणूंनी हातपाय पसरले आहे. आत्तापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. या आजाराच्या साथीवर मात करायची असेल तर घरातच थांबणे, अत्यावश्‍यक कामाशिवाय बाहेर न पडणे आणि मुख्य म्हणजे प्रतिकारशक्ती वाढविणे हाच उपाय सध्या आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घरात एकांतवासात असताना काय आहार घ्यावा, याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने जारी केल्या आहेत.

हे खावे 

घरात तयार केलेले ताजे अन्न 

असे अन्न आरोग्यदायी व पौष्टिक असावे

फायबरयुक्त भाज्या, फळे, डाळी

पचनास हलके असलेले ओट्स, ब्राउन पास्ता, ब्राउन राईस, गव्हाचा ब्रेड 

जेवणानंतर गूळ किंवा बडीशेप खावी. यामुळे अन्न पचविणे सोपे होईल

पेय

शरीरात पाण्याची प्रमाण कायम ठेवण्यासाठी दिवसभरात कमीतकमी ८-९ ग्लास पाणी प्यावे

एक ग्लास लिंबूपाणी, एक ग्लास ज्यूस किंवा एक ग्लास दूध प्यावे

काकडी, गाजर आदी भाज्यांचा समावेश आहारात करावा

‘क’ आणि ‘ड’ जीवनसत्त्वयुक्त फळे खावीत

हे खाणे टाळावे

रिफाईंड धान्ये जसे मैदा, पांढरा पास्ता, पांढरा तांदूळ आणि पांढरा ब्रेड

पॅकबंद, हवाबंद पदार्थ, मीठ आणि साखरेचे पदार्थ कमी प्रमाणात खावेत

लाल आणि चरबीयुक्त मांस

लोणी, फॅटने परिपूर्ण दूध किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ

चहा आणि कॉफीचे सेवन जास्त करू नये 

पाम तेल, नारळाच्या तेलाचे सेवन कमी करावे

अल्कोहोलमुळे कोरोनाचा धोका वाढतो. त्यामुळे दारूचे सेवन करू नये

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : क्वारंटाइनमध्ये घ्या पौष्टिक आहार जागितक आरोग्य संघटनेने जारी केल्या सूचना नवी दिल्ली - कोरोनाव्हायरसची भीती सर्व जगात पसरली आहे. अनेक देशात या विषाणूंनी हातपाय पसरले आहे. आत्तापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. या आजाराच्या साथीवर मात करायची असेल तर घरातच थांबणे, अत्यावश्‍यक कामाशिवाय बाहेर न पडणे आणि मुख्य म्हणजे प्रतिकारशक्ती वाढविणे हाच उपाय सध्या आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घरात एकांतवासात असताना काय आहार घ्यावा, याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने जारी केल्या आहेत. हे खावे  घरात तयार केलेले ताजे अन्न  असे अन्न आरोग्यदायी व पौष्टिक असावे फायबरयुक्त भाज्या, फळे, डाळी पचनास हलके असलेले ओट्स, ब्राउन पास्ता, ब्राउन राईस, गव्हाचा ब्रेड  जेवणानंतर गूळ किंवा बडीशेप खावी. यामुळे अन्न पचविणे सोपे होईल पेय शरीरात पाण्याची प्रमाण कायम ठेवण्यासाठी दिवसभरात कमीतकमी ८-९ ग्लास पाणी प्यावे एक ग्लास लिंबूपाणी, एक ग्लास ज्यूस किंवा एक ग्लास दूध प्यावे काकडी, गाजर आदी भाज्यांचा समावेश आहारात करावा ‘क’ आणि ‘ड’ जीवनसत्त्वयुक्त फळे खावीत हे खाणे टाळावे रिफाईंड धान्ये जसे मैदा, पांढरा पास्ता, पांढरा तांदूळ आणि पांढरा ब्रेड पॅकबंद, हवाबंद पदार्थ, मीठ आणि साखरेचे पदार्थ कमी प्रमाणात खावेत लाल आणि चरबीयुक्त मांस लोणी, फॅटने परिपूर्ण दूध किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ चहा आणि कॉफीचे सेवन जास्त करू नये  पाम तेल, नारळाच्या तेलाचे सेवन कमी करावे अल्कोहोलमुळे कोरोनाचा धोका वाढतो. त्यामुळे दारूचे सेवन करू नये News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2R6zk1P
Read More
दुर्दैव...फळांचा राजा यंदा प्रथमच बाजारात; पण...

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - आंबा वाहतुकीचे पास शासनाने तहसिल कार्यालयात उपलब्ध करून दिले ही वस्तुस्थिती असली तरी प्रत्यक्षात बाजारपेठेत नेलेला आंबा खरेदीसाठी ग्राहकच येत नसल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. दरवर्षी आंबा खरेदीसाठी चढाओढ करणारे व्यापारी आता मागे लागुन सुध्दा खरेदीस तयार नाहीत.या सर्व परिस्थितीमुळे आंबा बागायतदार संकटात सापडला आहे. 

यावर्षी क्‍यार वादळ आणि लांबलेला पाऊस यामुळे हापुस हंगाम महिना-दीड महिना लांबणीवर पडला आहे.वातावरणातील बदलाचा फटका देखील आंबा बागांना बसला आहे.दरवर्षीच्या तुलनेत ते टक्केच उत्पादन येईल असे आंबा बागायतदारांकडुन सांगीतले जात आहे. आंबा उत्पादन कमी असल्यामुळे यावर्षी चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा आंबा बागायतदारांना होती.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात जिल्हयातील किनारपट्टी भागातील आंबा हंगामाला सुरूवात झाली.आंब्याला दरही चांगला मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आणि कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या बातम्या पुढे येऊ लागल्या.त्यानतंर दोन तीन दिवसांत संपुर्ण चित्रच बदलुन गेले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. 

लॉकडाऊन अनेक बागायतदारांच्या बागेतील आंबा बागेतच सडु लागला.त्यामुळे आंबा बागायतदारांनी शासनाने भाजीपाल्याप्रमाणे आंबा वाहतुकीसाठी पास मिळावेत अशी मागणी केली.सरकारने देखील सकारात्मक प्रतिसाद देत तहसिल कार्यालयांमध्ये आंबा वाहतुकीचे पास उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली.त्यानुसार अनेक बागायतदारांनी वाशी मार्केटमध्ये आंबा पाठविला परंतु तेथील स्थिती फार गंभीर आहे.

एरवी आंबा खरेदी गर्दी करणारे व्यापारी आता आंब्यापासुन दुर होऊ लागले आहेत.वाशीमार्केट गेलेला माल उतरण्यासाठी हमाल उपलब्ध होत नाहीत अशी माहीती शेतकऱ्यांकडुन दिली जात आहे.पुर्वी शेकडो हमाल या मार्केटमध्ये होते परंतु कोरोनामुळे फक्त ते हमाल असल्याचे सांगीतले जात आहे. 

शासनाने पास दिला हे वास्तव आहे.त्या पासवर वाहतुकही केली जातेय परंतु नेलेला आंबा खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकच उपलब्ध नसल्यामुळे आंबा खरेदी करणार कोण असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.पुर्वी खरेदी केलेल्या मालाला उठाव नसल्यामुळे पुन्हा आंबा खरेदीचे धाडस व्यापारी करीत नाही.ही सर्व परिस्थिती आंबा बागायतदारांच्या मुळावर येऊन ठेपली आहे.एकतर आंबा कमी आणि तो देखील खपत नाही त्यामुळे आंबा बागायतदारांवरील संकट अधिक गडद होताना दिसत आहे.जिल्हयातील हजारो शेतकऱ्यांचे आंबा हेच प्रमुख पीक आहे.वर्षभराचे अर्थकारण याच फळपीकावर अवलंबुन असते.तेच पीक वाया जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्‍याचे वातावरण आहे. 

निसर्गाच्या बदलेल्या चक्रामुळे यावर्षी टक्केच आंबा उत्पादन होणार आहे.त्यामुळे यावर्षी आंब्याला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती.परंतु कोरोनाने हातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेतला आहे.शासनाने आंबा वाहतुकीला पास दिले परंतु आंबा खरेदीकरीता गिऱ्हाईकच नाही अशी स्थिती आहे.त्यामुळे आता करायचे काय हा आमच्यासमोरचा प्रश्‍न आहे. 
- सुशांत नाईक, आंबा बागायतदार, वेतोर (ता.वेंगुर्ला) 

आंबा खरेदीसाठी आता व्यापारी येण्याची वाट बघण्यात आता अर्थ नाही.त्यामुळे आपण आता मुंबईत थेट विक्री करण्याचा प्रयत्न करणार आहे.त्यादृष्टीने आपली तयारी झाली असुन एक दोन दिवसांत मुंबईतील ग्राहकांच्या मागणीनुसार आंबा घरपोच दिला जाईल. 
- प्रताप गावसकर, आंबा बागायतदार, वेंगुर्ला 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दुर्दैव...फळांचा राजा यंदा प्रथमच बाजारात; पण... वैभववाडी (सिंधुदुर्ग) - आंबा वाहतुकीचे पास शासनाने तहसिल कार्यालयात उपलब्ध करून दिले ही वस्तुस्थिती असली तरी प्रत्यक्षात बाजारपेठेत नेलेला आंबा खरेदीसाठी ग्राहकच येत नसल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. दरवर्षी आंबा खरेदीसाठी चढाओढ करणारे व्यापारी आता मागे लागुन सुध्दा खरेदीस तयार नाहीत.या सर्व परिस्थितीमुळे आंबा बागायतदार संकटात सापडला आहे.  यावर्षी क्‍यार वादळ आणि लांबलेला पाऊस यामुळे हापुस हंगाम महिना-दीड महिना लांबणीवर पडला आहे.वातावरणातील बदलाचा फटका देखील आंबा बागांना बसला आहे.दरवर्षीच्या तुलनेत ते टक्केच उत्पादन येईल असे आंबा बागायतदारांकडुन सांगीतले जात आहे. आंबा उत्पादन कमी असल्यामुळे यावर्षी चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा आंबा बागायतदारांना होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात जिल्हयातील किनारपट्टी भागातील आंबा हंगामाला सुरूवात झाली.आंब्याला दरही चांगला मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आणि कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या बातम्या पुढे येऊ लागल्या.त्यानतंर दोन तीन दिवसांत संपुर्ण चित्रच बदलुन गेले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले.  लॉकडाऊन अनेक बागायतदारांच्या बागेतील आंबा बागेतच सडु लागला.त्यामुळे आंबा बागायतदारांनी शासनाने भाजीपाल्याप्रमाणे आंबा वाहतुकीसाठी पास मिळावेत अशी मागणी केली.सरकारने देखील सकारात्मक प्रतिसाद देत तहसिल कार्यालयांमध्ये आंबा वाहतुकीचे पास उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली.त्यानुसार अनेक बागायतदारांनी वाशी मार्केटमध्ये आंबा पाठविला परंतु तेथील स्थिती फार गंभीर आहे. एरवी आंबा खरेदी गर्दी करणारे व्यापारी आता आंब्यापासुन दुर होऊ लागले आहेत.वाशीमार्केट गेलेला माल उतरण्यासाठी हमाल उपलब्ध होत नाहीत अशी माहीती शेतकऱ्यांकडुन दिली जात आहे.पुर्वी शेकडो हमाल या मार्केटमध्ये होते परंतु कोरोनामुळे फक्त ते हमाल असल्याचे सांगीतले जात आहे.  शासनाने पास दिला हे वास्तव आहे.त्या पासवर वाहतुकही केली जातेय परंतु नेलेला आंबा खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकच उपलब्ध नसल्यामुळे आंबा खरेदी करणार कोण असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.पुर्वी खरेदी केलेल्या मालाला उठाव नसल्यामुळे पुन्हा आंबा खरेदीचे धाडस व्यापारी करीत नाही.ही सर्व परिस्थिती आंबा बागायतदारांच्या मुळावर येऊन ठेपली आहे.एकतर आंबा कमी आणि तो देखील खपत नाही त्यामुळे आंबा बागायतदारांवरील संकट अधिक गडद होताना दिसत आहे.जिल्हयातील हजारो शेतकऱ्यांचे आंबा हेच प्रमुख पीक आहे.वर्षभराचे अर्थकारण याच फळपीकावर अवलंबुन असते.तेच पीक वाया जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्‍याचे वातावरण आहे.  निसर्गाच्या बदलेल्या चक्रामुळे यावर्षी टक्केच आंबा उत्पादन होणार आहे.त्यामुळे यावर्षी आंब्याला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती.परंतु कोरोनाने हातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेतला आहे.शासनाने आंबा वाहतुकीला पास दिले परंतु आंबा खरेदीकरीता गिऱ्हाईकच नाही अशी स्थिती आहे.त्यामुळे आता करायचे काय हा आमच्यासमोरचा प्रश्‍न आहे.  - सुशांत नाईक, आंबा बागायतदार, वेतोर (ता.वेंगुर्ला)  आंबा खरेदीसाठी आता व्यापारी येण्याची वाट बघण्यात आता अर्थ नाही.त्यामुळे आपण आता मुंबईत थेट विक्री करण्याचा प्रयत्न करणार आहे.त्यादृष्टीने आपली तयारी झाली असुन एक दोन दिवसांत मुंबईतील ग्राहकांच्या मागणीनुसार आंबा घरपोच दिला जाईल.  - प्रताप गावसकर, आंबा बागायतदार, वेंगुर्ला  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2wXNBHp
Read More
गंभीर बाब...काजू उत्पादकांवर मोठ संकट

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे जारी झालेल्या संचारबंदीने सिंधुदुर्गातील रोज शेकडो टन काजू बोंडू वाया जात आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. जिल्हा प्रशासन याच्या वाहतुकीला परवानगी देण्यास अनुकूल असले तरी प्रक्रिया उद्योग गोव्याच्या हद्दीत असल्याने केंद्राने यातून मार्ग काढण्याची गरज आहे. 

सध्या जिल्ह्यात काजूचा हंगाम ऐनभरात आहे. शेतकऱ्यांना काजू बीबरोबरच बोंडू विक्रीतूनही पैसे मिळतात. यंदा काजू बीचा दर अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशात काजू बोंडूला दर मिळाला तर शेतकरी थोडाफार सावरेल, अशी स्थिती आहे. जिल्ह्यात सर्वाधिक काजू लागवड असलेल्या सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्‍यातून बोंडू प्रक्रियेसाठी गोव्यात नेला जातो. गोव्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात बोंडूपासून फेणी बनवण्याचे उद्योग आहेत; मात्र ऐन हंगामात संचारबंदीमुळे दोन्ही राज्यांच्या सीमा सील झाल्या आहेत.

यामुळे जिल्ह्यात रोज शेकडो टन विक्रीयोग्य बोंडू कुजून जात आहे. यामुळे बागायतदार हवालदिल आहेत. या प्रश्‍नांबाबत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी आज आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधले. यावेळी आंबा, द्राक्षासह इतर फळांना वाहतूक परवाना मिळाल्याचा मुद्दा मांडण्यात आला; मात्र ही थेट खाण्यायोग्य फळे असून, बोंडू प्रक्रियेसाठी नेला जात असल्याचा तांत्रिक मुद्दा आला तरीही आमदार नाईक यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला.

प्रशासनाने बोंडूच्या वाहतुकीला परवानगी देण्याची तयारी दाखवली; मात्र यासाठी महाराष्ट्र पासिंगचे वाहन आवश्‍यक आहे. शिवाय हा बोंडू गोव्याच्या हद्दीत जाणार असल्याने यात केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गोव्यातील प्रक्रिया उद्योजक हा बोंडू घ्यायला तयार आहेत; मात्र परवानगीच्या तांत्रिक मुद्द्यामुळे रोज मोठ्या प्रमाणात बोंडू कुजून जात आहे. यात शेतकऱ्यांची हानी होत आहे. 

आंबा वाहतुकीसाठी माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रयत्न केले. त्यातून आंब्याच्या वाहतुकीचा प्रश्‍न बऱ्यापैकी मार्गी लागला. काजूचा हंगाम अल्पकाळाचा असतो. यामुळे वाहतुकीबाबत लवकर निर्णय गरजेचा आहे. श्री. प्रभू यांनी काजू बोंडूच्या वाहतुकीबाबतही केंद्र स्तरावरून संबंधित विभागांमार्फत तोडगा काढावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
- गणेशप्रसाद गवस, जिल्हा उपप्रमुख शिवसेना. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गंभीर बाब...काजू उत्पादकांवर मोठ संकट सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे जारी झालेल्या संचारबंदीने सिंधुदुर्गातील रोज शेकडो टन काजू बोंडू वाया जात आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. जिल्हा प्रशासन याच्या वाहतुकीला परवानगी देण्यास अनुकूल असले तरी प्रक्रिया उद्योग गोव्याच्या हद्दीत असल्याने केंद्राने यातून मार्ग काढण्याची गरज आहे.  सध्या जिल्ह्यात काजूचा हंगाम ऐनभरात आहे. शेतकऱ्यांना काजू बीबरोबरच बोंडू विक्रीतूनही पैसे मिळतात. यंदा काजू बीचा दर अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशात काजू बोंडूला दर मिळाला तर शेतकरी थोडाफार सावरेल, अशी स्थिती आहे. जिल्ह्यात सर्वाधिक काजू लागवड असलेल्या सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्‍यातून बोंडू प्रक्रियेसाठी गोव्यात नेला जातो. गोव्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात बोंडूपासून फेणी बनवण्याचे उद्योग आहेत; मात्र ऐन हंगामात संचारबंदीमुळे दोन्ही राज्यांच्या सीमा सील झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात रोज शेकडो टन विक्रीयोग्य बोंडू कुजून जात आहे. यामुळे बागायतदार हवालदिल आहेत. या प्रश्‍नांबाबत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी आज आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधले. यावेळी आंबा, द्राक्षासह इतर फळांना वाहतूक परवाना मिळाल्याचा मुद्दा मांडण्यात आला; मात्र ही थेट खाण्यायोग्य फळे असून, बोंडू प्रक्रियेसाठी नेला जात असल्याचा तांत्रिक मुद्दा आला तरीही आमदार नाईक यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. प्रशासनाने बोंडूच्या वाहतुकीला परवानगी देण्याची तयारी दाखवली; मात्र यासाठी महाराष्ट्र पासिंगचे वाहन आवश्‍यक आहे. शिवाय हा बोंडू गोव्याच्या हद्दीत जाणार असल्याने यात केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गोव्यातील प्रक्रिया उद्योजक हा बोंडू घ्यायला तयार आहेत; मात्र परवानगीच्या तांत्रिक मुद्द्यामुळे रोज मोठ्या प्रमाणात बोंडू कुजून जात आहे. यात शेतकऱ्यांची हानी होत आहे.  आंबा वाहतुकीसाठी माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रयत्न केले. त्यातून आंब्याच्या वाहतुकीचा प्रश्‍न बऱ्यापैकी मार्गी लागला. काजूचा हंगाम अल्पकाळाचा असतो. यामुळे वाहतुकीबाबत लवकर निर्णय गरजेचा आहे. श्री. प्रभू यांनी काजू बोंडूच्या वाहतुकीबाबतही केंद्र स्तरावरून संबंधित विभागांमार्फत तोडगा काढावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. - गणेशप्रसाद गवस, जिल्हा उपप्रमुख शिवसेना.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2X5Oeti
Read More
सतर्कता! "तबलिगीत' सहभाग, दोघांना उचलले

सावंतवाडी/मालवण (सिंधुदुर्ग) - दिल्लीतील निजामुद्दीन भागातील "तबलिगी जमात' या धार्मिक कार्यक्रमासाठी सिंधुदुर्गातून गेलेल्या दोघांनाही सावंतवाडी आणि मालवण येथून जिल्हा प्रशासनाने ओरोस येथील आयसोलेशन कक्षात हलविले आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया काल (ता.1) रात्री उशिरा करण्यात आली. 
दिल्ली येथे झालेल्या तबलिगी कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोघेजण गेले होते. दिल्लीत या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची यादी बनवण्यात आली. केंद्रशासनाने ती संबंधित भागामधील प्रशासनाला कळवली.

कोरोनाचा धोका ओळखून संबंधितांना तातडीने शोधून काढत आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. यात सावंतवाडी व मालवण तालुक्‍यातील एकूण दोघांचा समावेश होता. सावंतवाडी येथील संबंधित मुस्लिम बांधवांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत ओरोस येथील आयसोलेशन कक्षात हलविले. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना होम क्वांरटाईन करण्यात आले असुन त्याच्यावर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली. हे दोघेही 5 मार्चला दिल्ली येथे गेले होते.

12 मार्चला ते मंगला एक्‍सप्रेसने पुन्हा जिल्ह्यात आले होते. यानंतरच्या काळात त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर सर्वांची माहिती गोळा करण्याचे काम आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या संबंधित दोघेही तंदुरूस्त असून त्यांच्यात कोरोनाची कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नाहीत; मात्र असे असले तरी आरोग्य विभागाकडून आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेण्यात येणार आहे. संबंधिताच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून सद्यस्थितीत त्यांना होम क्वांरटाईन करून ठेवण्यात आले आहे, अशी माहिती श्री. म्हात्रे यांनी दिली. 

प्रकृती चांगली 
दरम्यान मालवण शहरातील मेढा येथील त्या मुस्लिम बांधवास तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्याला येथे येऊन वीस दिवसांचा कालावधी उलटला. यात त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे केवळ तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविले असल्याची माहिती मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली. त्याची प्रकृती चांगली असल्याचे दिसून आले. तरीही तपासणीसाठी त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याचे तहसीलदार श्री. पाटणे यांनी स्पष्ट केले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सतर्कता! "तबलिगीत' सहभाग, दोघांना उचलले सावंतवाडी/मालवण (सिंधुदुर्ग) - दिल्लीतील निजामुद्दीन भागातील "तबलिगी जमात' या धार्मिक कार्यक्रमासाठी सिंधुदुर्गातून गेलेल्या दोघांनाही सावंतवाडी आणि मालवण येथून जिल्हा प्रशासनाने ओरोस येथील आयसोलेशन कक्षात हलविले आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया काल (ता.1) रात्री उशिरा करण्यात आली.  दिल्ली येथे झालेल्या तबलिगी कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोघेजण गेले होते. दिल्लीत या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची यादी बनवण्यात आली. केंद्रशासनाने ती संबंधित भागामधील प्रशासनाला कळवली. कोरोनाचा धोका ओळखून संबंधितांना तातडीने शोधून काढत आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. यात सावंतवाडी व मालवण तालुक्‍यातील एकूण दोघांचा समावेश होता. सावंतवाडी येथील संबंधित मुस्लिम बांधवांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत ओरोस येथील आयसोलेशन कक्षात हलविले. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना होम क्वांरटाईन करण्यात आले असुन त्याच्यावर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली. हे दोघेही 5 मार्चला दिल्ली येथे गेले होते. 12 मार्चला ते मंगला एक्‍सप्रेसने पुन्हा जिल्ह्यात आले होते. यानंतरच्या काळात त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर सर्वांची माहिती गोळा करण्याचे काम आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या संबंधित दोघेही तंदुरूस्त असून त्यांच्यात कोरोनाची कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नाहीत; मात्र असे असले तरी आरोग्य विभागाकडून आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेण्यात येणार आहे. संबंधिताच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून सद्यस्थितीत त्यांना होम क्वांरटाईन करून ठेवण्यात आले आहे, अशी माहिती श्री. म्हात्रे यांनी दिली.  प्रकृती चांगली  दरम्यान मालवण शहरातील मेढा येथील त्या मुस्लिम बांधवास तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्याला येथे येऊन वीस दिवसांचा कालावधी उलटला. यात त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे केवळ तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविले असल्याची माहिती मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली. त्याची प्रकृती चांगली असल्याचे दिसून आले. तरीही तपासणीसाठी त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याचे तहसीलदार श्री. पाटणे यांनी स्पष्ट केले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UG4zTU
Read More
Video : घरच झालंय हवीहवीशी ‘आनंदशाळा’

बाजारात मिळणाऱ्या काही वस्तू आपण स्वतः घरी तयार करून पाहण्यातली मौज शार्दूल आणि शर्वरी सतत आईच्या माध्यमातून अनुभवतात. त्यात नवनवीन कल्पना लढवून बाजारापेक्षा वेगळी वस्तू निर्माण केल्याचं समाधान त्यांना मिळतं. आत्मविश्वास वाढण्याबरोबरच स्वावलंबनाची एक एक पायरी ते चढत जातात. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रज्ञा देवधर ही तरुणी तशी म्हणायला साधी गृहिणी. पण या गृहिणीपणाची समृद्धी नित्य जपण्याचा मंत्र जणू तिला गवसला आहे. घरातली सर्व कामं नियोजनबद्ध रीतीने संपवत ती ताज्या दमाने नवनवीन काही करू पाहत असते. ती म्हणाली, ‘‘माझी मुलं शार्दूल आणि शर्वरी माझ्या सर्व प्रयोगांमध्ये उत्साहाने सहभागी असतात. बाजारात विकत मिळणाऱ्या किती तरी वस्तू मी त्यांच्या सोबतीनं घरी करून पाहते. त्यात आम्ही निरनिराळ्या गमती शोधत असतो.’’

नुकत्याच झालेल्या गुढीपाडव्याच्या सणाला आम्ही सर्वांनी मिळून साखर गाठ्यांचा सुबक हार बनवला.’’ शर्वरीने सांगितलं की, आईने खास गाठ्यांसाठी साखरेचा पाक कसा तयार करायचा हे कृतीसह सांगितलं. मग ताटलीत ठेवलेल्या दोऱ्यावर पाकाचे ठिपके टाकले. ते पटापट घट्ट झाले. त्याआधी आम्ही त्यांच्यावर रंगीत गोळ्या चिकटवल्या. हा हार फार भारी झाला होता.’’

शार्दूल म्हणाला, ‘‘परवा आम्ही साबण बनवला. त्याचे मजेशीर गोल, चपटे मस्त आकार आम्ही तयार केले. आईने कलिंगडाच्या फोडींच्या आकार आणि अगदी तशाच रंगाचा साबण आमच्यासाठी केला तेव्हा मला ते ‘स्पेशल गिफ्ट’ वाटलं.’’

प्रज्ञा यांच्या सासूबाई (अंजली) छंद म्हणून शाडूच्या मातीच्या मूर्ती तयार करतात. त्यांचं पाहून या मायलेकांनी नवं काही करून पाहण्याच्या ओढीने भातुकलीची भांडी बनवली. कोथरूडमधील आपल्या घरी एखादा खाऊ किंवा कलाकृती करून पाहण्यात ही मंडळी सतत दंग असते. हे घर म्हणजे या तिघांची आनंदशाळाच आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : घरच झालंय हवीहवीशी ‘आनंदशाळा’ बाजारात मिळणाऱ्या काही वस्तू आपण स्वतः घरी तयार करून पाहण्यातली मौज शार्दूल आणि शर्वरी सतत आईच्या माध्यमातून अनुभवतात. त्यात नवनवीन कल्पना लढवून बाजारापेक्षा वेगळी वस्तू निर्माण केल्याचं समाधान त्यांना मिळतं. आत्मविश्वास वाढण्याबरोबरच स्वावलंबनाची एक एक पायरी ते चढत जातात.  बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप प्रज्ञा देवधर ही तरुणी तशी म्हणायला साधी गृहिणी. पण या गृहिणीपणाची समृद्धी नित्य जपण्याचा मंत्र जणू तिला गवसला आहे. घरातली सर्व कामं नियोजनबद्ध रीतीने संपवत ती ताज्या दमाने नवनवीन काही करू पाहत असते. ती म्हणाली, ‘‘माझी मुलं शार्दूल आणि शर्वरी माझ्या सर्व प्रयोगांमध्ये उत्साहाने सहभागी असतात. बाजारात विकत मिळणाऱ्या किती तरी वस्तू मी त्यांच्या सोबतीनं घरी करून पाहते. त्यात आम्ही निरनिराळ्या गमती शोधत असतो.’’ नुकत्याच झालेल्या गुढीपाडव्याच्या सणाला आम्ही सर्वांनी मिळून साखर गाठ्यांचा सुबक हार बनवला.’’ शर्वरीने सांगितलं की, आईने खास गाठ्यांसाठी साखरेचा पाक कसा तयार करायचा हे कृतीसह सांगितलं. मग ताटलीत ठेवलेल्या दोऱ्यावर पाकाचे ठिपके टाकले. ते पटापट घट्ट झाले. त्याआधी आम्ही त्यांच्यावर रंगीत गोळ्या चिकटवल्या. हा हार फार भारी झाला होता.’’ शार्दूल म्हणाला, ‘‘परवा आम्ही साबण बनवला. त्याचे मजेशीर गोल, चपटे मस्त आकार आम्ही तयार केले. आईने कलिंगडाच्या फोडींच्या आकार आणि अगदी तशाच रंगाचा साबण आमच्यासाठी केला तेव्हा मला ते ‘स्पेशल गिफ्ट’ वाटलं.’’ प्रज्ञा यांच्या सासूबाई (अंजली) छंद म्हणून शाडूच्या मातीच्या मूर्ती तयार करतात. त्यांचं पाहून या मायलेकांनी नवं काही करून पाहण्याच्या ओढीने भातुकलीची भांडी बनवली. कोथरूडमधील आपल्या घरी एखादा खाऊ किंवा कलाकृती करून पाहण्यात ही मंडळी सतत दंग असते. हे घर म्हणजे या तिघांची आनंदशाळाच आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bK1rfh
Read More
‘हॅकेथॉन’ला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे - नवनिर्मितीला चालना देण्यासाठी ‘सकाळ’ने घेतलेल्या हॅकेथॉनला मोठा प्रतिसाद मिळाला. यात तीनशेहून अधिक नवकल्पना सादर करण्यात आल्या. यातील सर्वांत चांगल्या दहा कल्पना आतापर्यंत निवडल्या आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चांगल्या कल्पनांमध्ये पुण्यातील ‘मायलॅब’ची अनोखी कल्पनाही आहे. ही कल्पना समोर आल्यानंतर तातडीने हालचाली करत त्यांना सरकारी पातळीवर तसेच, जागतिक भागीदारीच्या (समूह म्हणून ९० देशांमध्ये अस्तित्व) दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी पावले उचलली. या स्पर्धेत कोल्हापुरातील अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने ‘थर्मल स्कॅनर’ विकसित केला. सध्याच्या वापरात असलेल्या ‘थर्मल स्कॅनर’पेक्षा याची अचूकता अधिक असून, तो बनवण्याचा खर्च एक चतुर्थांश आहे. 

याचबरोबर आणखी एक अनोखा प्रकल्प डॉ. नीता यांच्या बारामतीतील ‘आर्टआयन रेन अँड क्‍लीन एन्व्हायरो. टेक्‍नॉलॉजी प्रा. लि.’ने पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहकार्याने केला अाहे. 

निगेटिव्ह आयन्सच्या माध्यमातून कोविड-१९ चा विषाणू नष्ट करण्याचा हा प्रकल्प आहे. निगेटिव्ह आयन्स हा सिंथेसिस ऑफ रिऍक्‍टिव्ह ऍक्‍शन स्पिसीजच्या (आरओएस) प्रक्रियेतून विषाणू नष्ट करतो. कोविड- १९ च्या पृष्ठभागावरील बाष्पाचे रूपांतर ‘आरओएस’मध्ये केल्यानंतर तो निगेटिव्ह आयन्सच्या संपर्कात येतो. नंतर त्याचे रूपांतर .०२- (सुपरऑक्‍साईड) ऍनायनमध्ये होऊन त्यातून फेंटॉन रिऍक्‍शनद्वार ओएच (हायड्रोसिल/रॅडिकल) एच२ओ२ तयार होतो. यामुळे कोविड-१९चे हवा आणि पृष्ठभागावरील विषाणू (मानवी शरीराबाहेरील) नष्ट होतात.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘हॅकेथॉन’ला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे - नवनिर्मितीला चालना देण्यासाठी ‘सकाळ’ने घेतलेल्या हॅकेथॉनला मोठा प्रतिसाद मिळाला. यात तीनशेहून अधिक नवकल्पना सादर करण्यात आल्या. यातील सर्वांत चांगल्या दहा कल्पना आतापर्यंत निवडल्या आहेत. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चांगल्या कल्पनांमध्ये पुण्यातील ‘मायलॅब’ची अनोखी कल्पनाही आहे. ही कल्पना समोर आल्यानंतर तातडीने हालचाली करत त्यांना सरकारी पातळीवर तसेच, जागतिक भागीदारीच्या (समूह म्हणून ९० देशांमध्ये अस्तित्व) दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी पावले उचलली. या स्पर्धेत कोल्हापुरातील अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने ‘थर्मल स्कॅनर’ विकसित केला. सध्याच्या वापरात असलेल्या ‘थर्मल स्कॅनर’पेक्षा याची अचूकता अधिक असून, तो बनवण्याचा खर्च एक चतुर्थांश आहे.  याचबरोबर आणखी एक अनोखा प्रकल्प डॉ. नीता यांच्या बारामतीतील ‘आर्टआयन रेन अँड क्‍लीन एन्व्हायरो. टेक्‍नॉलॉजी प्रा. लि.’ने पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहकार्याने केला अाहे.  निगेटिव्ह आयन्सच्या माध्यमातून कोविड-१९ चा विषाणू नष्ट करण्याचा हा प्रकल्प आहे. निगेटिव्ह आयन्स हा सिंथेसिस ऑफ रिऍक्‍टिव्ह ऍक्‍शन स्पिसीजच्या (आरओएस) प्रक्रियेतून विषाणू नष्ट करतो. कोविड- १९ च्या पृष्ठभागावरील बाष्पाचे रूपांतर ‘आरओएस’मध्ये केल्यानंतर तो निगेटिव्ह आयन्सच्या संपर्कात येतो. नंतर त्याचे रूपांतर .०२- (सुपरऑक्‍साईड) ऍनायनमध्ये होऊन त्यातून फेंटॉन रिऍक्‍शनद्वार ओएच (हायड्रोसिल/रॅडिकल) एच२ओ२ तयार होतो. यामुळे कोविड-१९चे हवा आणि पृष्ठभागावरील विषाणू (मानवी शरीराबाहेरील) नष्ट होतात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bO5siU
Read More
कोरोनासाठी राज्यात तीस विशेष रुग्णालये घोषित - राजेश टोपे

मुंबई - कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून २३०५ खाटा कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना  शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे. राज्यात चाचण्यांची सुविधा वाढवितानाच आवश्यकता भासल्यास रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषित करण्यात आली आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनासाठी राज्यात तीस विशेष रुग्णालये घोषित - राजेश टोपे मुंबई - कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून २३०५ खाटा कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.  बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना  शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे. राज्यात चाचण्यांची सुविधा वाढवितानाच आवश्यकता भासल्यास रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषित करण्यात आली आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39CI1HJ
Read More