दुर्दैव...फळांचा राजा यंदा प्रथमच बाजारात; पण... वैभववाडी (सिंधुदुर्ग) - आंबा वाहतुकीचे पास शासनाने तहसिल कार्यालयात उपलब्ध करून दिले ही वस्तुस्थिती असली तरी प्रत्यक्षात बाजारपेठेत नेलेला आंबा खरेदीसाठी ग्राहकच येत नसल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. दरवर्षी आंबा खरेदीसाठी चढाओढ करणारे व्यापारी आता मागे लागुन सुध्दा खरेदीस तयार नाहीत.या सर्व परिस्थितीमुळे आंबा बागायतदार संकटात सापडला आहे.  यावर्षी क्‍यार वादळ आणि लांबलेला पाऊस यामुळे हापुस हंगाम महिना-दीड महिना लांबणीवर पडला आहे.वातावरणातील बदलाचा फटका देखील आंबा बागांना बसला आहे.दरवर्षीच्या तुलनेत ते टक्केच उत्पादन येईल असे आंबा बागायतदारांकडुन सांगीतले जात आहे. आंबा उत्पादन कमी असल्यामुळे यावर्षी चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा आंबा बागायतदारांना होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात जिल्हयातील किनारपट्टी भागातील आंबा हंगामाला सुरूवात झाली.आंब्याला दरही चांगला मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आणि कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या बातम्या पुढे येऊ लागल्या.त्यानतंर दोन तीन दिवसांत संपुर्ण चित्रच बदलुन गेले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले.  लॉकडाऊन अनेक बागायतदारांच्या बागेतील आंबा बागेतच सडु लागला.त्यामुळे आंबा बागायतदारांनी शासनाने भाजीपाल्याप्रमाणे आंबा वाहतुकीसाठी पास मिळावेत अशी मागणी केली.सरकारने देखील सकारात्मक प्रतिसाद देत तहसिल कार्यालयांमध्ये आंबा वाहतुकीचे पास उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली.त्यानुसार अनेक बागायतदारांनी वाशी मार्केटमध्ये आंबा पाठविला परंतु तेथील स्थिती फार गंभीर आहे. एरवी आंबा खरेदी गर्दी करणारे व्यापारी आता आंब्यापासुन दुर होऊ लागले आहेत.वाशीमार्केट गेलेला माल उतरण्यासाठी हमाल उपलब्ध होत नाहीत अशी माहीती शेतकऱ्यांकडुन दिली जात आहे.पुर्वी शेकडो हमाल या मार्केटमध्ये होते परंतु कोरोनामुळे फक्त ते हमाल असल्याचे सांगीतले जात आहे.  शासनाने पास दिला हे वास्तव आहे.त्या पासवर वाहतुकही केली जातेय परंतु नेलेला आंबा खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकच उपलब्ध नसल्यामुळे आंबा खरेदी करणार कोण असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.पुर्वी खरेदी केलेल्या मालाला उठाव नसल्यामुळे पुन्हा आंबा खरेदीचे धाडस व्यापारी करीत नाही.ही सर्व परिस्थिती आंबा बागायतदारांच्या मुळावर येऊन ठेपली आहे.एकतर आंबा कमी आणि तो देखील खपत नाही त्यामुळे आंबा बागायतदारांवरील संकट अधिक गडद होताना दिसत आहे.जिल्हयातील हजारो शेतकऱ्यांचे आंबा हेच प्रमुख पीक आहे.वर्षभराचे अर्थकारण याच फळपीकावर अवलंबुन असते.तेच पीक वाया जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्‍याचे वातावरण आहे.  निसर्गाच्या बदलेल्या चक्रामुळे यावर्षी टक्केच आंबा उत्पादन होणार आहे.त्यामुळे यावर्षी आंब्याला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती.परंतु कोरोनाने हातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेतला आहे.शासनाने आंबा वाहतुकीला पास दिले परंतु आंबा खरेदीकरीता गिऱ्हाईकच नाही अशी स्थिती आहे.त्यामुळे आता करायचे काय हा आमच्यासमोरचा प्रश्‍न आहे.  - सुशांत नाईक, आंबा बागायतदार, वेतोर (ता.वेंगुर्ला)  आंबा खरेदीसाठी आता व्यापारी येण्याची वाट बघण्यात आता अर्थ नाही.त्यामुळे आपण आता मुंबईत थेट विक्री करण्याचा प्रयत्न करणार आहे.त्यादृष्टीने आपली तयारी झाली असुन एक दोन दिवसांत मुंबईतील ग्राहकांच्या मागणीनुसार आंबा घरपोच दिला जाईल.  - प्रताप गावसकर, आंबा बागायतदार, वेंगुर्ला  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 2, 2020

दुर्दैव...फळांचा राजा यंदा प्रथमच बाजारात; पण... वैभववाडी (सिंधुदुर्ग) - आंबा वाहतुकीचे पास शासनाने तहसिल कार्यालयात उपलब्ध करून दिले ही वस्तुस्थिती असली तरी प्रत्यक्षात बाजारपेठेत नेलेला आंबा खरेदीसाठी ग्राहकच येत नसल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. दरवर्षी आंबा खरेदीसाठी चढाओढ करणारे व्यापारी आता मागे लागुन सुध्दा खरेदीस तयार नाहीत.या सर्व परिस्थितीमुळे आंबा बागायतदार संकटात सापडला आहे.  यावर्षी क्‍यार वादळ आणि लांबलेला पाऊस यामुळे हापुस हंगाम महिना-दीड महिना लांबणीवर पडला आहे.वातावरणातील बदलाचा फटका देखील आंबा बागांना बसला आहे.दरवर्षीच्या तुलनेत ते टक्केच उत्पादन येईल असे आंबा बागायतदारांकडुन सांगीतले जात आहे. आंबा उत्पादन कमी असल्यामुळे यावर्षी चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा आंबा बागायतदारांना होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात जिल्हयातील किनारपट्टी भागातील आंबा हंगामाला सुरूवात झाली.आंब्याला दरही चांगला मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आणि कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या बातम्या पुढे येऊ लागल्या.त्यानतंर दोन तीन दिवसांत संपुर्ण चित्रच बदलुन गेले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले.  लॉकडाऊन अनेक बागायतदारांच्या बागेतील आंबा बागेतच सडु लागला.त्यामुळे आंबा बागायतदारांनी शासनाने भाजीपाल्याप्रमाणे आंबा वाहतुकीसाठी पास मिळावेत अशी मागणी केली.सरकारने देखील सकारात्मक प्रतिसाद देत तहसिल कार्यालयांमध्ये आंबा वाहतुकीचे पास उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली.त्यानुसार अनेक बागायतदारांनी वाशी मार्केटमध्ये आंबा पाठविला परंतु तेथील स्थिती फार गंभीर आहे. एरवी आंबा खरेदी गर्दी करणारे व्यापारी आता आंब्यापासुन दुर होऊ लागले आहेत.वाशीमार्केट गेलेला माल उतरण्यासाठी हमाल उपलब्ध होत नाहीत अशी माहीती शेतकऱ्यांकडुन दिली जात आहे.पुर्वी शेकडो हमाल या मार्केटमध्ये होते परंतु कोरोनामुळे फक्त ते हमाल असल्याचे सांगीतले जात आहे.  शासनाने पास दिला हे वास्तव आहे.त्या पासवर वाहतुकही केली जातेय परंतु नेलेला आंबा खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकच उपलब्ध नसल्यामुळे आंबा खरेदी करणार कोण असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.पुर्वी खरेदी केलेल्या मालाला उठाव नसल्यामुळे पुन्हा आंबा खरेदीचे धाडस व्यापारी करीत नाही.ही सर्व परिस्थिती आंबा बागायतदारांच्या मुळावर येऊन ठेपली आहे.एकतर आंबा कमी आणि तो देखील खपत नाही त्यामुळे आंबा बागायतदारांवरील संकट अधिक गडद होताना दिसत आहे.जिल्हयातील हजारो शेतकऱ्यांचे आंबा हेच प्रमुख पीक आहे.वर्षभराचे अर्थकारण याच फळपीकावर अवलंबुन असते.तेच पीक वाया जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्‍याचे वातावरण आहे.  निसर्गाच्या बदलेल्या चक्रामुळे यावर्षी टक्केच आंबा उत्पादन होणार आहे.त्यामुळे यावर्षी आंब्याला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती.परंतु कोरोनाने हातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेतला आहे.शासनाने आंबा वाहतुकीला पास दिले परंतु आंबा खरेदीकरीता गिऱ्हाईकच नाही अशी स्थिती आहे.त्यामुळे आता करायचे काय हा आमच्यासमोरचा प्रश्‍न आहे.  - सुशांत नाईक, आंबा बागायतदार, वेतोर (ता.वेंगुर्ला)  आंबा खरेदीसाठी आता व्यापारी येण्याची वाट बघण्यात आता अर्थ नाही.त्यामुळे आपण आता मुंबईत थेट विक्री करण्याचा प्रयत्न करणार आहे.त्यादृष्टीने आपली तयारी झाली असुन एक दोन दिवसांत मुंबईतील ग्राहकांच्या मागणीनुसार आंबा घरपोच दिला जाईल.  - प्रताप गावसकर, आंबा बागायतदार, वेंगुर्ला  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2wXNBHp

No comments:

Post a Comment