सतर्कता! "तबलिगीत' सहभाग, दोघांना उचलले सावंतवाडी/मालवण (सिंधुदुर्ग) - दिल्लीतील निजामुद्दीन भागातील "तबलिगी जमात' या धार्मिक कार्यक्रमासाठी सिंधुदुर्गातून गेलेल्या दोघांनाही सावंतवाडी आणि मालवण येथून जिल्हा प्रशासनाने ओरोस येथील आयसोलेशन कक्षात हलविले आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया काल (ता.1) रात्री उशिरा करण्यात आली.  दिल्ली येथे झालेल्या तबलिगी कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोघेजण गेले होते. दिल्लीत या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची यादी बनवण्यात आली. केंद्रशासनाने ती संबंधित भागामधील प्रशासनाला कळवली. कोरोनाचा धोका ओळखून संबंधितांना तातडीने शोधून काढत आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. यात सावंतवाडी व मालवण तालुक्‍यातील एकूण दोघांचा समावेश होता. सावंतवाडी येथील संबंधित मुस्लिम बांधवांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत ओरोस येथील आयसोलेशन कक्षात हलविले. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना होम क्वांरटाईन करण्यात आले असुन त्याच्यावर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली. हे दोघेही 5 मार्चला दिल्ली येथे गेले होते. 12 मार्चला ते मंगला एक्‍सप्रेसने पुन्हा जिल्ह्यात आले होते. यानंतरच्या काळात त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर सर्वांची माहिती गोळा करण्याचे काम आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या संबंधित दोघेही तंदुरूस्त असून त्यांच्यात कोरोनाची कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नाहीत; मात्र असे असले तरी आरोग्य विभागाकडून आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेण्यात येणार आहे. संबंधिताच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून सद्यस्थितीत त्यांना होम क्वांरटाईन करून ठेवण्यात आले आहे, अशी माहिती श्री. म्हात्रे यांनी दिली.  प्रकृती चांगली  दरम्यान मालवण शहरातील मेढा येथील त्या मुस्लिम बांधवास तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्याला येथे येऊन वीस दिवसांचा कालावधी उलटला. यात त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे केवळ तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविले असल्याची माहिती मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली. त्याची प्रकृती चांगली असल्याचे दिसून आले. तरीही तपासणीसाठी त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याचे तहसीलदार श्री. पाटणे यांनी स्पष्ट केले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 2, 2020

सतर्कता! "तबलिगीत' सहभाग, दोघांना उचलले सावंतवाडी/मालवण (सिंधुदुर्ग) - दिल्लीतील निजामुद्दीन भागातील "तबलिगी जमात' या धार्मिक कार्यक्रमासाठी सिंधुदुर्गातून गेलेल्या दोघांनाही सावंतवाडी आणि मालवण येथून जिल्हा प्रशासनाने ओरोस येथील आयसोलेशन कक्षात हलविले आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया काल (ता.1) रात्री उशिरा करण्यात आली.  दिल्ली येथे झालेल्या तबलिगी कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोघेजण गेले होते. दिल्लीत या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची यादी बनवण्यात आली. केंद्रशासनाने ती संबंधित भागामधील प्रशासनाला कळवली. कोरोनाचा धोका ओळखून संबंधितांना तातडीने शोधून काढत आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. यात सावंतवाडी व मालवण तालुक्‍यातील एकूण दोघांचा समावेश होता. सावंतवाडी येथील संबंधित मुस्लिम बांधवांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत ओरोस येथील आयसोलेशन कक्षात हलविले. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना होम क्वांरटाईन करण्यात आले असुन त्याच्यावर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली. हे दोघेही 5 मार्चला दिल्ली येथे गेले होते. 12 मार्चला ते मंगला एक्‍सप्रेसने पुन्हा जिल्ह्यात आले होते. यानंतरच्या काळात त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर सर्वांची माहिती गोळा करण्याचे काम आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या संबंधित दोघेही तंदुरूस्त असून त्यांच्यात कोरोनाची कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नाहीत; मात्र असे असले तरी आरोग्य विभागाकडून आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेण्यात येणार आहे. संबंधिताच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून सद्यस्थितीत त्यांना होम क्वांरटाईन करून ठेवण्यात आले आहे, अशी माहिती श्री. म्हात्रे यांनी दिली.  प्रकृती चांगली  दरम्यान मालवण शहरातील मेढा येथील त्या मुस्लिम बांधवास तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्याला येथे येऊन वीस दिवसांचा कालावधी उलटला. यात त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे केवळ तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविले असल्याची माहिती मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली. त्याची प्रकृती चांगली असल्याचे दिसून आले. तरीही तपासणीसाठी त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याचे तहसीलदार श्री. पाटणे यांनी स्पष्ट केले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2UG4zTU

No comments:

Post a Comment