फेसबुक मैसेंजर में बड़ा बदलाव, अब पहले से डबल फास्ट, स्पेस भी लेगा कम https://ift.tt/2TeSfZY Latest news updates March 02, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’ जुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्या निधीतून परिसरातील वनाचा व गावाचा विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून जाहीर झाला आहे. नाणेघाटातील मुक्त पर्यटनाला आळा घालण्याचे काम स्थानिक ग्रामस्थ संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करत आहे. वनविभागाच्या विविध उपक्रमांना स्थानिक ग्रामस्थांनी साथ दिली. त्यातून नाणेघाटाची जबाबदार पर्यटनाकडे वाटचाल सुरू आहे. अक्षय कुमार वसवणार ट्रान्सजेंडर्ससाठी घरं! या उपक्रमाचा एक भाग म्हणून पुणे वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांचे संकल्पनेतून व संयुक्त वन व्यवस्थापन समिती घाटघरच्या माध्यमातून नाणेघाट येथे वन विभागाने जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथील तंबू व अन्य सुविधांसाठी सुमारे तीस लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नात येथील पाच ते सहा युवकांच्या रोजगाराचा खर्च वजा जाता उर्वरित रकमेतून देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहे. या परिसरातील तांदूळ, रानभाज्या, फळे आदी विक्रीतून आणि खाद्यपदार्थ व अन्य सेवामधून स्थानिकांना आर्थिक लाभ होणार आहे. पुणे : एकतर्फी प्रेमातून त्याने तिच्यासमोरच झाडली गोळी... नाणेघाट परिसरात पावसाळ्याच्या चार महिन्यांत पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. परिसरातील जीवधन, हडसर, चावंड येथे गिर्यारोहणासाठी वर्षभर गिर्यारोहक येत असतात. नाणेघाटातील शिलालेख, दगडी रांजण, नानाचा अंगठा, उफराटा धबधबा, पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य, उन्हाळ्यातील गारवा पर्यटकांना आकर्षित करतो. मात्र, प्रत्यक्ष नाणेघाटात कोठेच मुक्कामी राहता येत नाही. मात्र, आता जंगल कॅम्प हाउसच्या माध्यमातून त्यांच्या निवासाची हक्काची सोय झाली आहे. तसेच, यातून परिसरातील रोजगाराच्या संधीत वाढ होणार आहे. परिसरातील हॉटेल व्यवसायात वृद्धी होण्यास मदत होणार आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 02, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/38gBy4w Read More Read more No comments:
धनगर आरक्षणासाठी कटिबद्ध - उद्धव ठाकरे मुंबई - धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक ती सगळी पावले उचलली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. धनगर आंदोलनातील गंभीर गुन्हे वगळता सर्व गुन्हे मागे घेतले जातील, असे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी या वेळी सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, धनगर समाजाप्रमाणेच अन्य घटकांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आपले सरकार कटिबद्ध असून, आपण सर्वजण एकत्र मिळून केंद्र सरकारकडे भूमिका मांडू. पक्षाची आणि जातीची लेबले बाजूला सारून हा प्रश्न सोडविण्यासाठी काम करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले. आदित्य ठाकरेंसाठी पवार मैदानात; चंद्रकांत पाटलांना म्हणाले.... धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून गदारोळ झाल्यामुळे विधानपरिषदेचे कामकाज आज दोन वेळा तहकूब करण्यात आले. अखेरीस या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर सभागृह शांततेत सुरू झाले. रश्मी ठाकरे संपादक झाल्या अन् पहिल्याच अग्रलेखात भाजपला... धनगर समाज आरक्षणासंदर्भात टाटा सामाजिक संस्थेच्या अहवालासंदर्भात येत्या शुक्रवारी (ता. ६) महाधिवक्त्यांशी बैठक घेण्यात येईल. या बैठकीला मुख्यमंत्री आणि संबंधित विधिमंडळ सदस्यांनी बोलविण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी दिले. यासंदर्भात काँग्रेसचे आ. रामहरी रुपनवर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या अहवालावर महाधिवक्त्यांचा अभिप्राय आल्यानंतर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी दिली. परंतु, विरोधकांचे समाधान झाले नाही. धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, ही मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यामुळे कामकाज पहिल्यांदा पाच मिनिटांसाठी आणि नंतर दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले होते. या वेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 02, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/32IXdRP Read More Read more No comments:
Video : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’! हडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन व जिद्द अनेकांना प्रेरणा देत आहे. नागेश १९९७ ला सोलापूरहून पुण्याला नोकरीच्या शोधात आला होता. सुरुवातीला एका बांधकाम व्यावसायिकाकडे बिगारी काम करून तो पोट भरत होता. एक दिवस तो काम करीत असताना त्याला विजेचा धक्का बसला. या अपघातात त्याचे दोन्ही हात निकामी झाले. बांधकाम व्यावसायिकाकडून त्याला कोणतीही मदत मिळाली नाही. तब्बल तीन वर्षे नागेशचे रुग्णालयात उपचार सुरू होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नुकतेच लग्न झालेल्या नागेशला समोर अंधार दिसत होता. पण, त्याही स्थितीत त्याने लढाई सुरूच ठेवली. हाताचे दोन्ही पंजे नसल्यामुळे त्याला कोणी काम देत नव्हते. कुटुंब कसे चालवायचे, याची त्याला चिंता लागून राहिली होती. ती त्याला शांत बसू देत नव्हती. अखेर त्याने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. नातेवाईक व मित्रांकडून आर्थिक मदत घेतली. १० वर्षांपासून तो भाजीविक्रीचा व्यवसाय करीत आहे. सुरुवातीला त्याने सुखसागरनगर येथे हा व्यवसाय सुरू केला. सध्या तो हडपसर येथील गाडीतळ येथे उड्डाण पुलाखाली भाजीविक्रीचा व्यवसाय करीत आहे. त्याची पत्नी सुवर्णा ही त्याला व्यवसायामध्ये मदत करते. त्यामुळे नागेश रोजच्या लढाईत नियतीवर मात करतोय. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 02, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3anv6do Read More Read more No comments:
विमानतळांवर थर्मल डिटेक्टर - टोपे मुंबई - थेट विमानसेवा असलेल्या विविध देशांतून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी विमानतळांवर थर्मल डिटेक्टर आणि इतर यंत्रणाही बसविली असून, बोटीतून येणाऱ्या प्रवाशांची काळजी घेत आहोत, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनासंदर्भातील उपाययोजना सांगितल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नाही; मात्र, उपाय म्हणून ‘एन ९५’ मास्क उपलब्ध आहेत, त्याचा साठाही करण्याचे नियोजन आहे, असेही त्यांनी सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोना रोखण्यासाठी जवळपास दीड वर्षे लागेल; पण या परिस्थितीत नेमके काय आणि कसे प्रतिबंधात्मक उपाय करायचे, याचे प्रशिक्षण चार तज्ज्ञ डॉक्टर घेत आहेत, ते आता इतरांनाही देणार आहेत. ज्यामुळे जागृती निर्माण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळात चर्चा झाली तेव्हा आमदार रोहित पवार यांनी आरोग्य खात्याच्या उपायांबाबतची विचारणा केली. अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई कोरोना विषाणू आणि त्यांच्या संसर्गाबाबत सोशल मीडियावरील अफवा पसरविण्यात येत आहेत. मात्र, या आजारासंदर्भातील चिंता करण्याची स्थिती नाही. मात्र, जे लोक अफवा पसरवीत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही टोपे यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 02, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2wpyZQk Read More Read more No comments:
`या`शहरातील पाच रुग्णालयांना 25 हजारांचा दंड, कारण.... सोलापूर : बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर केल्याप्रकरणी शहरातील पाच रुग्णालयांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला. विशेष मोहिमेच्या पहिल्या दिवशी राबविण्यात आलेल्या तपासणीत विविध ठिकाणांहून 120 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. एकूण नऊ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन 45 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. दंडात्मक कारवाई याप्रमाणे ः निर्मल हॉस्पिटल, दीप हॉस्पिटल, यशोधरा हॉस्पिटल, कोठाडिया हॉस्पिटल व सिटी हॉस्पिटल, आडकी ट्रेडर्स, सारिका ट्रेडर्स, भास्कर ट्रेडर्स आणि कुमार भिंग्रे यांच्याकडून 120 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. हा पहिला गुन्हा असल्याने प्रत्येकी पाच हजार रुपये दंड करण्यात आला. यापुढे प्लास्टिक आढळल्यास प्रत्येकी 10 हजार रुपये दंड आणि तिसऱ्यांदा प्लास्टिक आढळले तर 25 हजार रुपये दंड आणि तीन महिने शिक्षा अशी तरतूद असल्याची कल्पना संबंधितांना देण्यात आली. 2 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत विशेष मोहीम प्लास्टिकमुक्तीसाठी राज्य शासनाने 2 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार महापालिकेने कृती आराखडा केला आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी महापालिकेचे आठही विभागीय कार्यालय आणि अन्न व परवाना विभागामार्फत ही मोहीम राबविण्यात आली. त्यात एकूण 64 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 59 ठिकाणची तपासणी केली. त्यापैकी नऊ ठिकाणी प्लास्टिक आढळून आले. विशेष नियोजनांतर्गत 2 ते 4 मार्च या कालावधीत शहरातील सर्व रुग्णालयांची तपासणी केली जाणार आहे. . News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 02, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2IfvOxi Read More Read more No comments:
राज्यात उन्हाचा ताप वाढणार पुणे - मार्च महिना सुरू होताच राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. उन्हाळा सुरू झाल्याने पुढील काळात उन्हाचा ताप वाढत जाणार आहे. यातच पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ३) राज्यात आकाश ढगाळ राहून, उष्ण व दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मध्य प्रदेश आणि कर्नाटक किनारपट्टीलगत दोन चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. पूर्व आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे या दोन्ही स्थिती दरम्यान, महाराष्ट्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. अनेक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे. कमाल तापमानात वाढ होत असली तरी किमान तापमानात मात्र चढ-उतार सुरूच आहे. सोमवारी (ता. २) उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात घट झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी १०.५ अंश सेल्सिअस, अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याचे कमाल तापमान, उकाड्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 02, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3anRl36 Read More Read more No comments:
गुंतवणुकीसाठी पुण्यापासून सुरुवात योग्य - आदित्य ठाकरे पुणे - ‘शिक्षण, उद्योग, कृषी, संशोधनासह राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. रस्त्यापासून इंटरनेटचे जाळे राज्यभर पसरले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या सर्वांचे स्वागतच आहे. राज्यात गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी पुणे अत्यंत योग्य ठिकाण आहे,’’ असे मत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी व्यक्त केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्यातील गुंतवणूक वाढावी या उद्देशाने ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि ॲग्रिकल्चर’ (एमसीसीआयए) यांच्या वतीने दोनदिवसीय ‘इंटरनॅशनल बिझनेस समीट’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ते बोलत होते. ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष प्रदीप भार्गव, महासंचालक प्रशांत गिरबने या वेळी उपस्थित होते. इटली, फ्रान्स, साउथ आफ्रिका, मलेशिया, जर्मनीसह सुमारे २० देशांचे कौन्सिलर जनरल आणि व्यापार आयुक्त तसेच शहरातील उद्योगपतींनी समीटमध्ये सहभाग घेतला. हेही वाचा : ससूनमध्ये गरीब रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया ठाकरे म्हणाले, ‘‘कोणालाही उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठी महाराष्ट्र चालना देणारे राज्य ठरले आहे. शाश्वत शेतीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर औद्योगिक क्षेत्राने भर द्यावा. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत विधानसभेत चर्चा झाल्यानंतर योग्य तो निर्णय होईल. एशिया इकनॉमिक डायलॉग आणि इंटरनॅशनल बिझनेस समीट या दोन्ही परिषदा राज्यासाठी महत्त्वाच्या आहेत.’’ लघुशंकेसाठी थांबले अन् 5 जणांसाठी टेम्पो ठरला कर्दनकाळ भार्गव म्हणाले, ‘‘उद्योग-व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी पुण्यात उपलब्ध आहेत. शिक्षण, संशोधन, आरोग्य आणि सेवा क्षेत्रात पुणे आघाडीवर आहे.’’ गिरबने यांनी आभार व्यक्त करीत समीटचे महत्त्व सांगितले. तसेच देशातील गुंतवणुकीत शहराचे योगदान नमूद केले. ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लि.’चे अध्यक्ष पी. सी. नांबियार, ‘विकफील्ड प्रॉडक्ट एलएलपी’चे व्यवस्थापकीय संचालक मुकेश मल्होत्रा, ‘प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड’चे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, ‘पर्सिस्टंट सिस्टिम लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे आणि ‘प्रवीण मसालेवाले’चे संचालक आनंद चोरडिया यांनी त्यांच्या उद्योगाचा प्रवास उलगडत अनुभव सांगितले. शहरातील काही उद्योगाचे स्टॉल या वेळी मांडण्यात आले होते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 02, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/39hGwQ3 Read More Read more No comments:
गुंतवणूकदारांचे किती लाख कोटी गेले पाण्यात पहा मुंबई - मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये सलग सात सत्रांत झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी १३ लाख कोटी रुपये गमावले आहेत. सेन्सेक्स आज १५३ अंशांच्या घसरणीसह ३८ हजार १४४ अंशांवर बंद झाला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात अस्थिरतेचे वारे पाहायला मिळाले. देशात कोरोना विषाणूचे नव्याने दोन रुग्ण आढळल्याने गुंतवणूकदार धास्तावले. त्यांनी विक्रीचा मारा सुरू केला. यामुळे सेन्सेक्समध्ये घसरण झाली. सेन्सेक्समध्ये सलग सात सत्रांत एकूण ३ हजार २५ अंशांची घसरण झाली असून, मे २०१९ नंतर सर्वाधिक काळ झालेली ही घसरण ठरली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज ६९ अंशांची घसरण होऊन ११ हजार १३२ अंशांवर बंद झाला. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 02, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2uJpHhE Read More Read more No comments:
पस्तीस टक्के कैद्यांना त्वचेचे आजार मुंबई - पुण्यातील येरवडा कारागृहाच्या क्षमतेपेक्षा जवळपास अडीच पट अधिक म्हणजे, पावणेसहा हजार कैद्यांना कोंबल्याने त्यातील ३५ टक्के कैदी त्वचेच्या आजाराच्या जाळ्यात अडकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कारागृहातील सुमारे ५ हजार ८०० कैद्यांपैकी २ हजार १९३ जणांना त्वचेचा आजार झाल्याची वस्तुस्थिती राज्याच्या गृहखात्याने सोमवारी मांडली आहे. या कारागृहाची क्षमता २ हजार ४४९ इतकी असून, त्यातील बराकीत प्रत्येकी १२० कैद्यांना राहण्याची सोय आहे. प्रत्यक्षात मात्र त्याठिकाणी ३८३ कैद्यांना ठेवले आहे. कैद्यांना साथीच्या आजाराची लागण झाल्याचे राज्याच्या गृहमंत्र्यांनी मान्य केले आहे. आमदार भीमराव तापकीर, राहुल कूल, सुनील प्रभू यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली. कारागृहांची क्षमता वाढविण्याच्या योजनांना वेग दिला जाईल. कैद्यांच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत. आढावा घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही करू. - अनिल देशमुख, गृहमंत्री News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 02, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2TgVv7b Read More Read more No comments:
बळिराजाला मदतीसाठी कटिबद्ध - उपमुख्यमंत्री मुंबई - राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून मदतीचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता.२) दिली. अडचणीत असलेल्या शेतकर्यांना कशी मदत करता येईल याबाबत सभागृहात आणि मंत्रिमंडळात चर्चा झाल्यानंतर निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय : धनंजय मुंडे पिकांच्या ऐन मोसमात अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. रविवारी सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे ज्वारीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर नाशिकच्या नांदगावमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीटही झाली आहे. त्यामुळे उघड्यावर असलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला आहे. तर, आज सकाळी पुन्हा लातूर, परभणीत पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याचे पडसाद विधानसभेत पाहायला मिळाले. आदित्य ठाकरेंसाठी पवार मैदानात; चंद्रकांत पाटलांना म्हणाले.... विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 02, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3axVMZl Read More Read more No comments:
पाशा पटेल, चरेगावकर यांच्या नियुक्त्या रद्द मुंबई - फडणवीस सरकारने राज्य कृषिमूल्य आयोग, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, तसेच राज्यस्तरीय लेखा समितीवरील अशासकीय पदांवरील नियुक्त्या सोमवारी रद्द केल्या. नियुक्त्या रद्द केलेल्यांमध्ये राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले पाशा पटेल, शेखर चरेगावकर, अॅड. सचिन पटवर्धन यांच्यासह इतर सदस्यांचा समावेश आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भाजप सरकारने केलेल्या सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करून तातडीने नव्या नियुक्त्या करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचा आदेश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिला होता, त्याची अंमलबजावणी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर (राज्यमंत्री दर्जा) यांच्यासह सहकार परिषदेवरील इतर सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. अन्य सदस्य ः दत्तात्रेय कुलकर्णी (उस्मानाबाद), सीताराम राणे (ठाणे), रामदास देवरे (नाशिक), शिवाजी पाटील (सांगली), संजय भेंडे (नागपूर), दिलीप पतंगे (सोलापूर), नामदेवराव घाडगे (पुणे), महेंद्र हिरे (नाशिक). आदित्य ठाकरेंसाठी पवार मैदानात; चंद्रकांत पाटलांना म्हणाले.... राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल यांच्यासह शेतकरी प्रतिनिधींची नियुक्ती राज्य सरकारने रद्द केली. अन्य सदस्य ः प्रा. सुहास पाटील (सोलापूर), अनिल पाटील (पालघर), प्रशांत इंगळे (वर्धा), किशोर देशपांडे (औरंगाबाद), अच्युत गंगणे (बीड), संपतराव पाटील (कोल्हापूर), विनायक जाधव (सांगली), शिवनाथ जाधव (नाशिक). राज्य मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलेल्या राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांच्यासह राज्यस्तरीय लेखा समितीच्या सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या. अन्य सदस्य ः जयंत कावळे (वर्धा), सुभाष आकरे (गोंदिया), जिजाबा पवार (मुंबई), गजानन पाथोडे (चंद्रपूर), तुषारकांती डबले (नागपूर). News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 02, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2VGs2Fc Read More Read more No comments:
पिंपरी : मेट्रोचा मुहूर्त ठरणार कि एप्रिल फुल होणार पिंपरी - वल्लभनगर ते फुगेवाडी दरम्यान सुरू असणाऱ्या मेट्रो मार्गावरील अनेक कामे अद्याप पूर्ण झालेली नसल्याने मेट्रो धावण्याचा एप्रिल महिन्याचा मुहूर्त बहुतेक चुकणार, असे सध्याचे चित्र आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप डिसेंबरअखेरीस पिंपरीत मेट्रोचे डबे दाखल झाले. त्या वेळी तीन महिन्यांत आवश्यक त्या चाचण्या पूर्ण करून एप्रिलमध्ये या मार्गावर मेट्रो धावेल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात वल्लभनगर, कासारवाडी, फुगेवाडी स्थानकांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे मेट्रो कधी धावणार, याचे उत्तर तूर्तास तरी कोणाकडेच नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वेग थंडावला वल्लभनगर मेट्रो स्थानकाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. कासारवाडी आणि फुगेवाडी परिसरातील स्थानकाचे कामही धीम्या गतीने सुरू आहे. कासारवाडी परिसरात काही ठिकाणी व्हायडक्टचे काम झालेले नाही. मेट्रोवरील खांबांची उभारणी आणि इलेक्ट्रिफिकेशनची कामेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत. दापोडी भागात कामाचा वेग थंडावला असून, हॅरिस पुलालगत खांब उभारण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पुण्यात वर्दीची कॉलर पकडून पोलिसास मारहाण खडकी भागातील मेट्रोच्या कामाला जानेवारीत सुरुवात होणार होती. मात्र, ते कामदेखील अद्याप सुरू झालेले नाही. मेट्रोच्या कामाचा वेग थंडावला असल्याने शहरवासीयांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. पुणे : पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या, अमुल्याचे वादग्रस्त पोस्टर उतरवले दरम्यान, महापालिकेसमोर सुरू असणाऱ्या कामामुळे मोरवाडी चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये सातत्याने भर पडत आहे. दिवसा रहदारी सुरू असतानाच्या वेळी याठिकाणी कामे करण्यात येत असल्याने त्रासात भरच पडते. वाहनचालकांना आणि नागरिकांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी या भागातील कामे रात्री करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 02, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/38dAVZH Read More Read more No comments: