Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 1, 2020

मुंबई - पुणे महामार्गावरील अपघातात पाच जण जागीच ठार
उद्धव ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही - महंत राजू दास : #5मोठ्याबातम्या
व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल बंद झालं तर काय होईल?
गैरव्यवहारातील ‘छुपे रुस्तुम’ कोण?

उमरगा (जि. उस्मानाबाद) : पालिकेतील गैरव्यवहाराचे एक-एक प्रकरण बाहेर येत आहे. बनावट बँक खाते, पालिकेच्या धनादेशाचा वापर करून गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून, संगनमताने इंटरनेट बँकिंगचा अवलंब करून चाणाक्ष पद्धतीने अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. एकूण एक कोटी ६१ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. यात बड्या व्यक्तींचे अप्रत्यक्ष पाठबळ असल्याची चर्चा आहे. प्रकरण उघडकीस आल्याने मी तो नव्हेच, अशा आविर्भावात काही जण फिरत आहेत. याचा अर्थ या प्रकरणात ‘तडजोडी’चा मार्ग अवलंबिल्याचीही जोरदार चर्चा आहे. 

उमरगा पालिकेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा हा पहिलाच प्रकार आहे. पहिल्यांदा ३१ ऑगस्ट २०१९ रोजी ४९ लाखांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर शहरातील महाराष्ट्र बँकेत ठेवण्यात आलेल्या दलित वस्ती सुधार योजनेच्या एक कोटी रकमेवरील ३६ लाख व्याजाची रक्कम हडपण्याचा प्रकार उघडकीस आला. तिसऱ्या टप्प्यात लेखा विभागाच्या तपासणीत आठ लाख ६४ हजार ८०२ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आता नव्याने ६६ लाख ४० हजार ४९६ रुपयांचा गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला आहे.

बँक स्टेटमेंटच्या व्यवहार नोंदीवरून तसेच बँकेच्या पत्रव्यवहारावरून चौकशी समितीतील मुख्याधिकारी प्रकाश पाटील, लेखापाल अंकुश माने, नगर अभियंता रवींद्र सोनवणे, हरीशकुमार दाडगे यांनी उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दिलेल्या पुरवणी चौकशी अहवालानुसार तत्कालीन लेखापाल विनायक वडमारे, नंदेशकुमार झांबरे, धम्मपाल ढवळे यांच्यासह श्री. महाशुभप्रदा प्रा.लि. व नोव्हा कोअर टेंडरिंग प्रा.लि. यांनी संगनमत करून इंटरनेट बँकिंगचे युजर आयडी व पासवर्डचा परस्पर गैरवापर करणे, खासगी ई-मेल आयडी पालिकेच्या बँक खात्याला संलग्न करणे, वैयक्तिक खरेदी व देणे अदा करण्यासाठी शासकीय रक्कम इतरत्र वळवून ६६ लाख ४० हजार ४९६ रुपयांचा गैरव्यवहार केल्याची पुरवणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
उस्मानाबादच्या एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी
छुपे रुस्तुम शोधण्याचे व्हावे धाडस 
विविध विकासकामांचा निधी, ठेवीवरील व्याज हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला. आता तर इन्कमटॅक्स, टीडीएस, जीएसटीची रक्कम जमा असलेल्या चीफ ऑफिसर, म्युनिसिपल कौन्सिल (प्रोफेशनल टॅक्स) या खात्यावरून इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे.

चौकशी समितीने प्रथमदर्शनी निदर्शनास आलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या नोंदीचे विवरणही पोलिसांकडे दिले आहे. त्यात ३४ ट्रँझेक्शनद्वारे ६६ लाख ४० हजार ४९६ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे दिसते. त्यात एका ठेकेदाराकडे सहा वेळा रक्कम ट्रँझेक्शन झाल्याचे दिसते. दरम्यान, पहिल्या तीन गैरव्यवहारांच्या प्रकरणात एकच आरोपी अटकेत होता. तो सध्या कारागृहात आहे. चार आरोपींचा तपास सहा महिन्यांपासून लागत नाही.

लातूरला कधी होणार चिकन महोत्सव

यावरून पोलिस यंत्रणेच्या तपास कामाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या गैरव्यवहाराची शहरातील नागरिकांत नकारात्मक चर्चा होत आहे. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांत समन्वय नाही, नेहमी आरोप-प्रत्यारोप होत आहेत. गैरव्यवहार प्रकरणाबाबत मात्र छडा लावण्याची मागणी होत नाही. पोलिस यंत्रणेने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपास कामातून छुपे रुस्तुमचे चेहरे नागरिकांसमोर आणण्याचे काम करण्याची मागणी होत आहे. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गैरव्यवहारातील ‘छुपे रुस्तुम’ कोण? उमरगा (जि. उस्मानाबाद) : पालिकेतील गैरव्यवहाराचे एक-एक प्रकरण बाहेर येत आहे. बनावट बँक खाते, पालिकेच्या धनादेशाचा वापर करून गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून, संगनमताने इंटरनेट बँकिंगचा अवलंब करून चाणाक्ष पद्धतीने अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. एकूण एक कोटी ६१ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. यात बड्या व्यक्तींचे अप्रत्यक्ष पाठबळ असल्याची चर्चा आहे. प्रकरण उघडकीस आल्याने मी तो नव्हेच, अशा आविर्भावात काही जण फिरत आहेत. याचा अर्थ या प्रकरणात ‘तडजोडी’चा मार्ग अवलंबिल्याचीही जोरदार चर्चा आहे.  उमरगा पालिकेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा हा पहिलाच प्रकार आहे. पहिल्यांदा ३१ ऑगस्ट २०१९ रोजी ४९ लाखांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर शहरातील महाराष्ट्र बँकेत ठेवण्यात आलेल्या दलित वस्ती सुधार योजनेच्या एक कोटी रकमेवरील ३६ लाख व्याजाची रक्कम हडपण्याचा प्रकार उघडकीस आला. तिसऱ्या टप्प्यात लेखा विभागाच्या तपासणीत आठ लाख ६४ हजार ८०२ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आता नव्याने ६६ लाख ४० हजार ४९६ रुपयांचा गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. बँक स्टेटमेंटच्या व्यवहार नोंदीवरून तसेच बँकेच्या पत्रव्यवहारावरून चौकशी समितीतील मुख्याधिकारी प्रकाश पाटील, लेखापाल अंकुश माने, नगर अभियंता रवींद्र सोनवणे, हरीशकुमार दाडगे यांनी उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दिलेल्या पुरवणी चौकशी अहवालानुसार तत्कालीन लेखापाल विनायक वडमारे, नंदेशकुमार झांबरे, धम्मपाल ढवळे यांच्यासह श्री. महाशुभप्रदा प्रा.लि. व नोव्हा कोअर टेंडरिंग प्रा.लि. यांनी संगनमत करून इंटरनेट बँकिंगचे युजर आयडी व पासवर्डचा परस्पर गैरवापर करणे, खासगी ई-मेल आयडी पालिकेच्या बँक खात्याला संलग्न करणे, वैयक्तिक खरेदी व देणे अदा करण्यासाठी शासकीय रक्कम इतरत्र वळवून ६६ लाख ४० हजार ४९६ रुपयांचा गैरव्यवहार केल्याची पुरवणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.  उस्मानाबादच्या एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी छुपे रुस्तुम शोधण्याचे व्हावे धाडस  विविध विकासकामांचा निधी, ठेवीवरील व्याज हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला. आता तर इन्कमटॅक्स, टीडीएस, जीएसटीची रक्कम जमा असलेल्या चीफ ऑफिसर, म्युनिसिपल कौन्सिल (प्रोफेशनल टॅक्स) या खात्यावरून इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. चौकशी समितीने प्रथमदर्शनी निदर्शनास आलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या नोंदीचे विवरणही पोलिसांकडे दिले आहे. त्यात ३४ ट्रँझेक्शनद्वारे ६६ लाख ४० हजार ४९६ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे दिसते. त्यात एका ठेकेदाराकडे सहा वेळा रक्कम ट्रँझेक्शन झाल्याचे दिसते. दरम्यान, पहिल्या तीन गैरव्यवहारांच्या प्रकरणात एकच आरोपी अटकेत होता. तो सध्या कारागृहात आहे. चार आरोपींचा तपास सहा महिन्यांपासून लागत नाही. लातूरला कधी होणार चिकन महोत्सव यावरून पोलिस यंत्रणेच्या तपास कामाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या गैरव्यवहाराची शहरातील नागरिकांत नकारात्मक चर्चा होत आहे. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांत समन्वय नाही, नेहमी आरोप-प्रत्यारोप होत आहेत. गैरव्यवहार प्रकरणाबाबत मात्र छडा लावण्याची मागणी होत नाही. पोलिस यंत्रणेने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपास कामातून छुपे रुस्तुमचे चेहरे नागरिकांसमोर आणण्याचे काम करण्याची मागणी होत आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VBujBJ
Read More
धक्कादायक! एसटीच्या तोट्यात आणखी 802 कोटींची वाढ होणार

मुंबई : "एसटी' महामंडळाचा 2019-20 या आर्थिक वर्षांत 5000 कोटींचा संचित तोटा होता. त्यानंतर आता 2020-21 या आर्थिक वर्षात यात 802 कोटींची वाढ होऊन तो 6,155 कोटींवर जाणार असल्याचा अंदाज अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आला. त्यामुळे "एसटी'चे चाक आणखी खोलात जाण्याची शक्‍यता आहे. 

तो पर्यंत शांत बसणार नाही; देवेंद्र फडणवीस गरजले!

महामंडळाचे गेल्या वर्षात सुमारे 8,745 कोटींचे महसुली उत्पन्न झाले. त्या तुलनेत सुमारे 9,548 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात सुमारे 802 कोटींचा तोटा पुन्हा वाढणार आहे. गेल्या वर्षात राज्य सरकारच्या अनुदानातून 700 नवीन बस खरेदी करण्यात आल्या; तर 1,814 जुन्या बस गाड्यांची पुनर्बांधणी आणि 600 नवीन चॅसिस खरेदी करण्यात आल्या. तसेच राज्यातील 14 बस स्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार होते; मात्र त्यापैकी पाच बस स्थानकांचे कंत्राट मंजूर झाले असताना सध्या तरी तीनच ठिकाणी काम सुरू आहे. बसच्या फेरीचा वक्तशीरपणा तपासण्यासाठी "व्हीटीएस प्रणाली'चा वापर करण्यात आला आहे; मात्र यातून कोणताही आर्थिक फायदा "एसटी'ला झाला नसल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा - ससून डॉकचा मत्स्यव्यवसाय संकटात 

"एसटी'च्या प्रवासी संख्येत सुमारे 5.5 टक्‍यांनी घट झाली आहे. "एसटी' कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचे कंत्राट, ब्रिस्क कंपनीला दिलेले स्वच्छतेचे कंत्राट, रोल्टा कंपनीला दिलेले ई-आरपीचे कंत्राट, व्हीटीएस प्रणाली अशा कामांवर नाहक महामंडळाचा खर्च झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षातसुद्धा एसटीवर 802 कोटींचा भार पडून सुमारे 6,000 कोटींपेक्षा जास्त संचित तोटा एसटीचा वाढणार आहे. 
---- 
वर्ष - संचित तोटा - वार्षिक तोटा 
2014-15 - 1685 - 391 
2015-16 - 1807 - 121 
2016-17 -2330 - 522 
2017-18 - 3663 - 1578 
2018-19 - 4549 - 886 
2019-20 - 5353 - 803 
2020-21 - 6155 - 802 

एसटी तोट्यात आहेच. त्यासाठी नवीन उपाययोजना केल्या जाणार आहेत. ज्या ज्या गोष्टींमध्ये एसटीचे नुकसान झाले आहे, त्या सर्व गोष्टी बदलणार आहे. त्यासह ज्या मार्गांवरील गाड्या रिकाम्या धावतात, अशा ठिकाणी नवे मार्ग शोधले जाणार आहेत. प्रवासी संख्या कशी वाढवता येणार त्यावर भर दिला जाणार असून, काटकसरीचे धोरण अवलंबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
- ऍड. अनिल परब, परिवहन मंत्री  
 

The deficeite of ST will increase by 802 crore 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

धक्कादायक! एसटीच्या तोट्यात आणखी 802 कोटींची वाढ होणार मुंबई : "एसटी' महामंडळाचा 2019-20 या आर्थिक वर्षांत 5000 कोटींचा संचित तोटा होता. त्यानंतर आता 2020-21 या आर्थिक वर्षात यात 802 कोटींची वाढ होऊन तो 6,155 कोटींवर जाणार असल्याचा अंदाज अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आला. त्यामुळे "एसटी'चे चाक आणखी खोलात जाण्याची शक्‍यता आहे.  तो पर्यंत शांत बसणार नाही; देवेंद्र फडणवीस गरजले! महामंडळाचे गेल्या वर्षात सुमारे 8,745 कोटींचे महसुली उत्पन्न झाले. त्या तुलनेत सुमारे 9,548 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात सुमारे 802 कोटींचा तोटा पुन्हा वाढणार आहे. गेल्या वर्षात राज्य सरकारच्या अनुदानातून 700 नवीन बस खरेदी करण्यात आल्या; तर 1,814 जुन्या बस गाड्यांची पुनर्बांधणी आणि 600 नवीन चॅसिस खरेदी करण्यात आल्या. तसेच राज्यातील 14 बस स्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार होते; मात्र त्यापैकी पाच बस स्थानकांचे कंत्राट मंजूर झाले असताना सध्या तरी तीनच ठिकाणी काम सुरू आहे. बसच्या फेरीचा वक्तशीरपणा तपासण्यासाठी "व्हीटीएस प्रणाली'चा वापर करण्यात आला आहे; मात्र यातून कोणताही आर्थिक फायदा "एसटी'ला झाला नसल्याचे दिसून येत आहे.  हेही वाचा - ससून डॉकचा मत्स्यव्यवसाय संकटात  "एसटी'च्या प्रवासी संख्येत सुमारे 5.5 टक्‍यांनी घट झाली आहे. "एसटी' कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचे कंत्राट, ब्रिस्क कंपनीला दिलेले स्वच्छतेचे कंत्राट, रोल्टा कंपनीला दिलेले ई-आरपीचे कंत्राट, व्हीटीएस प्रणाली अशा कामांवर नाहक महामंडळाचा खर्च झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षातसुद्धा एसटीवर 802 कोटींचा भार पडून सुमारे 6,000 कोटींपेक्षा जास्त संचित तोटा एसटीचा वाढणार आहे.  ----  वर्ष - संचित तोटा - वार्षिक तोटा  2014-15 - 1685 - 391  2015-16 - 1807 - 121  2016-17 -2330 - 522  2017-18 - 3663 - 1578  2018-19 - 4549 - 886  2019-20 - 5353 - 803  2020-21 - 6155 - 802  एसटी तोट्यात आहेच. त्यासाठी नवीन उपाययोजना केल्या जाणार आहेत. ज्या ज्या गोष्टींमध्ये एसटीचे नुकसान झाले आहे, त्या सर्व गोष्टी बदलणार आहे. त्यासह ज्या मार्गांवरील गाड्या रिकाम्या धावतात, अशा ठिकाणी नवे मार्ग शोधले जाणार आहेत. प्रवासी संख्या कशी वाढवता येणार त्यावर भर दिला जाणार असून, काटकसरीचे धोरण अवलंबण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  - ऍड. अनिल परब, परिवहन मंत्री     The deficeite of ST will increase by 802 crore  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2wmU0LO
Read More
इव्हान्का ट्रम्प पडली मीम्सच्या प्रेमात; भारतीयांच्या कल्पकतेला दिली दाद!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या आठवड्यात दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, मुलगी इव्हान्का ट्रम्प आणि अमेरिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीदेखील आले होते.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

ट्रम्प यांची मुलगी इव्हान्काला जगातील सात प्रमुख आश्चर्यांपैकी एक असलेला आणि भारताच्या जिरेटोपातील मानाचा तुरा असलेला ताजमहाल खूप आवडला. तेथे तिने भरपूर फोटोही काढून घेतले. त्यावर खूप मिम्स व्हायरल झाले असून त्या मीम्सच्या प्रेमात इव्हान्काही पडल्याचे दिसून आले. स्वत: इव्हान्कानेच आपल्या ट्विटर अकाउंटवरून हे मीम्स शेअर केले आहेत. 

The grandeur and beauty of the Taj Mahal is awe inspiring!  pic.twitter.com/jcYwXHxf4c

— Ivanka Trump (@IvankaTrump) February 24, 2020

- ब्रिटनचे पंतप्रधान तिसऱ्यांदा बोहल्यावर; नवरी आहे प्रेग्नंट!

फोटोशॉपच्या आधारे तयार केलेले मीम्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नुकत्याच आलेल्या गुड न्यूज या चित्रपटात अक्षय कुमारसोबत झळकलेला पंजाबी अभिनेता दलजीत दोसांझनेही इव्हान्कासोबतचा एक फोटो ट्विट केला होता. तो इतका व्हायरल झाला की स्वत: इव्हान्कानेही दलजीत सोबतचा हा फोटो रिट्विट केला. आणि दलजीतला त्याच्याच भाषेत उत्तर दिले. 

Thank you for taking me to the spectacular Taj Mahal, @diljitdosanjh! 

It was an experience I will never forget! https://t.co/VgqFuYBRIg

— Ivanka Trump (@IvankaTrump) March 1, 2020

दलजीतने फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे की, ''मी आणि इव्हान्का, ताजमहाल दाखव म्हणून इव्हान्का मागेच लागली होती. मग तिला घेऊन आलो आणि दाखवला ताजमहाल.'' 

- ट्रम्प भाषण देताना नेहमी अडखळतात; नेमकं काय आहे कारण?

याला उत्तर देत इव्हान्कानेही म्हटले आहे की, ''इतका सुंदर ताजमहाल दाखवल्याबद्दल दलजीत तुझे खूप धन्यवाद. मी कधीही विसरू शकणार नाही, असाच हा अनुभव होता.''

I appreciate the warmth of the Indian people.

...I made many new friends!!! https://t.co/MXz5PkapBg

— Ivanka Trump (@IvankaTrump) March 1, 2020

दुसऱ्या एका ट्विटला उत्तर देताना इव्हान्का म्हणाली की, ''भारतीयांच्या कल्पनाशक्तीला मी सलाम करते. मी भारतात खूप नवीन मित्र जोडले.'' 

- अमेरिकेचा तालिबानशी काय झाला ऐतिहासिक करार

२०१७ मध्ये इव्हान्का हैदराबाद येथे झालेल्या विश्व शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी पहिल्यांदा भारतात आली होती. त्यानंतर ती आता दुसऱ्यांदा भारतात आली होती. 

Thank you India! 
 @al_drago @Reuters pic.twitter.com/zdDugTOYqb

— Ivanka Trump (@IvankaTrump) February 26, 2020

 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

इव्हान्का ट्रम्प पडली मीम्सच्या प्रेमात; भारतीयांच्या कल्पकतेला दिली दाद! वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या आठवड्यात दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, मुलगी इव्हान्का ट्रम्प आणि अमेरिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीदेखील आले होते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   ट्रम्प यांची मुलगी इव्हान्काला जगातील सात प्रमुख आश्चर्यांपैकी एक असलेला आणि भारताच्या जिरेटोपातील मानाचा तुरा असलेला ताजमहाल खूप आवडला. तेथे तिने भरपूर फोटोही काढून घेतले. त्यावर खूप मिम्स व्हायरल झाले असून त्या मीम्सच्या प्रेमात इव्हान्काही पडल्याचे दिसून आले. स्वत: इव्हान्कानेच आपल्या ट्विटर अकाउंटवरून हे मीम्स शेअर केले आहेत.  The grandeur and beauty of the Taj Mahal is awe inspiring!  pic.twitter.com/jcYwXHxf4c — Ivanka Trump (@IvankaTrump) February 24, 2020 - ब्रिटनचे पंतप्रधान तिसऱ्यांदा बोहल्यावर; नवरी आहे प्रेग्नंट! फोटोशॉपच्या आधारे तयार केलेले मीम्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नुकत्याच आलेल्या गुड न्यूज या चित्रपटात अक्षय कुमारसोबत झळकलेला पंजाबी अभिनेता दलजीत दोसांझनेही इव्हान्कासोबतचा एक फोटो ट्विट केला होता. तो इतका व्हायरल झाला की स्वत: इव्हान्कानेही दलजीत सोबतचा हा फोटो रिट्विट केला. आणि दलजीतला त्याच्याच भाषेत उत्तर दिले.  Thank you for taking me to the spectacular Taj Mahal, @diljitdosanjh!  It was an experience I will never forget! https://t.co/VgqFuYBRIg — Ivanka Trump (@IvankaTrump) March 1, 2020 दलजीतने फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे की, ''मी आणि इव्हान्का, ताजमहाल दाखव म्हणून इव्हान्का मागेच लागली होती. मग तिला घेऊन आलो आणि दाखवला ताजमहाल.''  - ट्रम्प भाषण देताना नेहमी अडखळतात; नेमकं काय आहे कारण? याला उत्तर देत इव्हान्कानेही म्हटले आहे की, ''इतका सुंदर ताजमहाल दाखवल्याबद्दल दलजीत तुझे खूप धन्यवाद. मी कधीही विसरू शकणार नाही, असाच हा अनुभव होता.'' I appreciate the warmth of the Indian people. ...I made many new friends!!! https://t.co/MXz5PkapBg — Ivanka Trump (@IvankaTrump) March 1, 2020 दुसऱ्या एका ट्विटला उत्तर देताना इव्हान्का म्हणाली की, ''भारतीयांच्या कल्पनाशक्तीला मी सलाम करते. मी भारतात खूप नवीन मित्र जोडले.''  - अमेरिकेचा तालिबानशी काय झाला ऐतिहासिक करार २०१७ मध्ये इव्हान्का हैदराबाद येथे झालेल्या विश्व शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी पहिल्यांदा भारतात आली होती. त्यानंतर ती आता दुसऱ्यांदा भारतात आली होती.  Thank you India!   @al_drago @Reuters pic.twitter.com/zdDugTOYqb — Ivanka Trump (@IvankaTrump) February 26, 2020 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TfL9V3
Read More
पोलिस पत्नीचीच 95 हजारांची फसवणूक 

मिरज : शहरातील वखारभाग परिसरात राहणाऱ्या साधना गजानन घुमे या पोलिस पत्नीची तब्बल 95 हजारांची फसवणूक झाली. ""ऍक्‍सिस बॅंकेतून बोलतो आहे,'' असे सांगत भामट्याने साधना घुमे यांच्याकडून क्रेडिट कार्डचे सर्व तपशील घेऊन या क्रेडिट कार्डवर तब्बल 95 हजारांची खरेदी केली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे साधना घुमे यांच्या लक्षात आले. 

या प्रकरणाबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की साधना गजानन घुमे यांचे पती गजानन घुमे हे 29 वर्षांपासून सांगली जिल्हा पोलिस दलात सेवेत आहेत. साधना या त्यांच्या सासुबाईंना डायलिसिस उपचारासाठी आज सकाळी वॉनलेस रुग्णालयात घेऊन गेल्या. यावेळी त्यांना रुग्णालयातच ऍक्‍सिस बॅंकेतून बोलतो आहे, असे सांगत बॅंकेच्या नवीन आलेल्या क्रेडिट कार्डविषयी चौकशी केली. यावेळी त्यांनी हे कार्ड पतींच्या नावे असल्याचे आणि ते घरी असल्याचे सांगितले. दुपारी तीन वाजता फोन करा, असेही त्या म्हणाल्याने भामट्याने दुपारी तीन वाजता अचूकपणे फोन करून कार्डाचा सर्व तपशील घेतला आणि ओटीपी नंबर मिळताच काही क्षणात तब्बल 95 हजारांची खरेदी या कार्डवरून केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घुमे यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली. 
 
भामट्याचा मोबाईल क्रमांक 
एटीएम, क्रेडिट कार्ड विषयी कोणत्याच बॅंकेतून ग्राहकास दूरध्वनी केला जात नाही. आज 95 हजारांची फसवणूक झालेल्या प्रकरणातील मोबाईल क्रमांक 9540117643 असा आहे. पोलिसांनी आता या नंबररून चौकशी सुरू केली असली तरी अशा घटनांपासून सावध रहावे. असे आवाहन सायबर सेलच्या आधिकाऱ्यांनी केले आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पोलिस पत्नीचीच 95 हजारांची फसवणूक  मिरज : शहरातील वखारभाग परिसरात राहणाऱ्या साधना गजानन घुमे या पोलिस पत्नीची तब्बल 95 हजारांची फसवणूक झाली. ""ऍक्‍सिस बॅंकेतून बोलतो आहे,'' असे सांगत भामट्याने साधना घुमे यांच्याकडून क्रेडिट कार्डचे सर्व तपशील घेऊन या क्रेडिट कार्डवर तब्बल 95 हजारांची खरेदी केली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे साधना घुमे यांच्या लक्षात आले.  या प्रकरणाबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की साधना गजानन घुमे यांचे पती गजानन घुमे हे 29 वर्षांपासून सांगली जिल्हा पोलिस दलात सेवेत आहेत. साधना या त्यांच्या सासुबाईंना डायलिसिस उपचारासाठी आज सकाळी वॉनलेस रुग्णालयात घेऊन गेल्या. यावेळी त्यांना रुग्णालयातच ऍक्‍सिस बॅंकेतून बोलतो आहे, असे सांगत बॅंकेच्या नवीन आलेल्या क्रेडिट कार्डविषयी चौकशी केली. यावेळी त्यांनी हे कार्ड पतींच्या नावे असल्याचे आणि ते घरी असल्याचे सांगितले. दुपारी तीन वाजता फोन करा, असेही त्या म्हणाल्याने भामट्याने दुपारी तीन वाजता अचूकपणे फोन करून कार्डाचा सर्व तपशील घेतला आणि ओटीपी नंबर मिळताच काही क्षणात तब्बल 95 हजारांची खरेदी या कार्डवरून केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घुमे यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली.    भामट्याचा मोबाईल क्रमांक  एटीएम, क्रेडिट कार्ड विषयी कोणत्याच बॅंकेतून ग्राहकास दूरध्वनी केला जात नाही. आज 95 हजारांची फसवणूक झालेल्या प्रकरणातील मोबाईल क्रमांक 9540117643 असा आहे. पोलिसांनी आता या नंबररून चौकशी सुरू केली असली तरी अशा घटनांपासून सावध रहावे. असे आवाहन सायबर सेलच्या आधिकाऱ्यांनी केले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38ektYQ
Read More
शौचालय दुरुस्तीसाठी 265 कोटींचा चुराडा! बेजबाबदार कारभाराचा फटका!

मुंबई : मुंबईतील शौचालयांच्या दुरुस्तीवर गेल्या पाच वर्षांत तब्बल 265 कोटी रुपये एवढी अवाढव्य रक्कम खर्च झाल्याची माहिती हाती आली आहे; मात्र मुंबईतील बहुतांश सार्वजनिक शौचालयांची स्थिती आजही दयनीय आहे. त्यामुळे शौचालयांच्या बांधकामाच्या दर्जावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. शौचालय दुरुस्ती आणि बांधकाम हे भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचा आरोप यानिमित्ताने करण्यात येत आहे. 

तो पर्यंत शांत बसणार नाही; देवेंद्र फडणवीस गरजले!

निकृष्ट बांधकामामुळे नवे शौचालय बांधले की ते वर्षभरात दुरुस्तीला येते. बांधकामावर प्रशासनाचे नियंत्रण नसते. कंत्राटदाराच्या मर्जीनुसार शौचालयबांधणीची आणि दुरुस्तीची कामे होत असल्याचे आरोप यापूर्वीही झाले आहेत. शौचालयांच्या दुरुस्तीवर गेल्या पाच वर्षांत 265 कोटी खर्च होऊनही लोकसंख्येच्या प्रमाणात शौचालय बांधण्याचे उद्दिष्टही असफल ठरले आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये बांधली जाणारी शौचालये अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. पालिका प्रशासनाचे शौचालयांच्या बांधकामावर कोणतेही नियंत्रण नसल्याने कंत्राटदारांना मोकळे रान मिळत आहे. 2014 मध्ये 24 विभाग कार्यालयांतर्गत शौचालये बांधण्याची कामे कंत्राटदारांना देण्यात आली. या शौचालयांमध्ये पाणी, विजेची सुविधा नाही. तसेच स्वच्छतेअभावी शौचालयांची दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीसाठी मानखुर्द, चेंबूरमधील पाडण्यात आलेली शौचालये अद्यापही बांधण्यात आलेली नाहीत, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शौचालये कोसळून तसेच शौचालयांच्या टाक्‍यांचा स्फोट होऊन पूर्व आणि पश्‍चिम उपनगरात जीवित हानी झाल्याच्या घटना सतत घडत आहेत. आता विभाग स्तरावर कंत्रादारांना शौचालय दुरुस्तीची कामे देण्यात येत आहेत. त्यामुळे त्यावर प्रशासनाचे नियंत्रण नाही. कंत्राटदारांनी केलेल्या कामाचे ऑडिट होत नाही, त्यामुळे कंत्राटदारांना शौचालय दुरुस्ती आणि बांधणी हे भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचा आरोप होत आहे. वर्षभरात पालिकेचे 22 हजार 774 शौचकूप बांधण्याचे लक्ष्य आहे. त्यापैकी केवळ 5500 सीट्‌स बांधण्यात आले आहेत. 
--- 
एक भांडे बसवण्यासाठी दीड लाख रुपये 
शौचालयात एक भांडे बसवण्यासाठी दीड लाख रुपये खर्च येत असल्याची माहिती मलनिःसारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्या दराने कंत्राटदारांना शौचालय बांधणीची कामे दिली जात आहेत. 
---- 
चौकशीची मागणी बेदखल 
शौचालय बांधणी आणि दुरुस्तीच्या कामाची चौकशी करा, अशी मागणी तत्कालिन पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे या विभागातील अधिकाऱ्यांनीच केली होती; मात्र त्या मागणीची दखल प्रशासनाने घेतली नाही. 

शौचालय बांधणी आणि दुरुस्ती हे भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे ही वस्तुस्थिती आहे. विभाग स्तरावर ही कामे करण्यासाठी नेमलेले कंत्राटदार योग्य काम करत नाहीत. पालिकेचा पैसा वाया जात आहे. पाच वर्षांत अडीच हजार कोटींहून अधिक पैसा वाया गेला आहे. शौचालयांच्या दुरुस्तीवर खर्च केलेल्या पैशांतून नवी शौचालये उभारता आली असती. दुरुस्ती ही केवळ धूळफेक आहे, त्यामुळे सीडब्ल्यूसी पद्धत आणावी आणि प्रशासनाने याप्रकरणी चौकशी करावी. 
- रवी राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई महानगरपालिका 
 

 265 crore stolen for toilet repair

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शौचालय दुरुस्तीसाठी 265 कोटींचा चुराडा! बेजबाबदार कारभाराचा फटका! मुंबई : मुंबईतील शौचालयांच्या दुरुस्तीवर गेल्या पाच वर्षांत तब्बल 265 कोटी रुपये एवढी अवाढव्य रक्कम खर्च झाल्याची माहिती हाती आली आहे; मात्र मुंबईतील बहुतांश सार्वजनिक शौचालयांची स्थिती आजही दयनीय आहे. त्यामुळे शौचालयांच्या बांधकामाच्या दर्जावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. शौचालय दुरुस्ती आणि बांधकाम हे भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचा आरोप यानिमित्ताने करण्यात येत आहे.  तो पर्यंत शांत बसणार नाही; देवेंद्र फडणवीस गरजले! निकृष्ट बांधकामामुळे नवे शौचालय बांधले की ते वर्षभरात दुरुस्तीला येते. बांधकामावर प्रशासनाचे नियंत्रण नसते. कंत्राटदाराच्या मर्जीनुसार शौचालयबांधणीची आणि दुरुस्तीची कामे होत असल्याचे आरोप यापूर्वीही झाले आहेत. शौचालयांच्या दुरुस्तीवर गेल्या पाच वर्षांत 265 कोटी खर्च होऊनही लोकसंख्येच्या प्रमाणात शौचालय बांधण्याचे उद्दिष्टही असफल ठरले आहे.  मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये बांधली जाणारी शौचालये अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. पालिका प्रशासनाचे शौचालयांच्या बांधकामावर कोणतेही नियंत्रण नसल्याने कंत्राटदारांना मोकळे रान मिळत आहे. 2014 मध्ये 24 विभाग कार्यालयांतर्गत शौचालये बांधण्याची कामे कंत्राटदारांना देण्यात आली. या शौचालयांमध्ये पाणी, विजेची सुविधा नाही. तसेच स्वच्छतेअभावी शौचालयांची दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीसाठी मानखुर्द, चेंबूरमधील पाडण्यात आलेली शौचालये अद्यापही बांधण्यात आलेली नाहीत, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शौचालये कोसळून तसेच शौचालयांच्या टाक्‍यांचा स्फोट होऊन पूर्व आणि पश्‍चिम उपनगरात जीवित हानी झाल्याच्या घटना सतत घडत आहेत. आता विभाग स्तरावर कंत्रादारांना शौचालय दुरुस्तीची कामे देण्यात येत आहेत. त्यामुळे त्यावर प्रशासनाचे नियंत्रण नाही. कंत्राटदारांनी केलेल्या कामाचे ऑडिट होत नाही, त्यामुळे कंत्राटदारांना शौचालय दुरुस्ती आणि बांधणी हे भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचा आरोप होत आहे. वर्षभरात पालिकेचे 22 हजार 774 शौचकूप बांधण्याचे लक्ष्य आहे. त्यापैकी केवळ 5500 सीट्‌स बांधण्यात आले आहेत.  ---  एक भांडे बसवण्यासाठी दीड लाख रुपये  शौचालयात एक भांडे बसवण्यासाठी दीड लाख रुपये खर्च येत असल्याची माहिती मलनिःसारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्या दराने कंत्राटदारांना शौचालय बांधणीची कामे दिली जात आहेत.  ----  चौकशीची मागणी बेदखल  शौचालय बांधणी आणि दुरुस्तीच्या कामाची चौकशी करा, अशी मागणी तत्कालिन पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे या विभागातील अधिकाऱ्यांनीच केली होती; मात्र त्या मागणीची दखल प्रशासनाने घेतली नाही.  शौचालय बांधणी आणि दुरुस्ती हे भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे ही वस्तुस्थिती आहे. विभाग स्तरावर ही कामे करण्यासाठी नेमलेले कंत्राटदार योग्य काम करत नाहीत. पालिकेचा पैसा वाया जात आहे. पाच वर्षांत अडीच हजार कोटींहून अधिक पैसा वाया गेला आहे. शौचालयांच्या दुरुस्तीवर खर्च केलेल्या पैशांतून नवी शौचालये उभारता आली असती. दुरुस्ती ही केवळ धूळफेक आहे, त्यामुळे सीडब्ल्यूसी पद्धत आणावी आणि प्रशासनाने याप्रकरणी चौकशी करावी.  - रवी राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई महानगरपालिका     265 crore stolen for toilet repair News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cnwZJ2
Read More
राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन अजिंक्यराणा दिसले थेट शेतात ट्रॅक्टर चालवताना

सोलापूर : गेल्या आठवड्यात मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ‘पुढील काळात नव्या व्यक्तीला संधी देण्यात यावी, म्हणून आपण राजीनामा दिला’ असल्याचे ते म्हणत आहेत. त्यांच्या या राजीनाम्यावरुन मात्र त्यांच्याकडे कोणती नवीन जबाबदारी मिळणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे. राजीनामा दिल्यानंतर ते थेट शेतात कामगारांना मदत करताना दिसले आहेत. त्याचे फोटो त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर टाकले आहेत. 
अजिंक्यराणा यांनी फेसबुक वॉलवर द्राक्ष बागेत ट्रॅक्टर चालव असल्याचे फोटो टाकले आहेत. याबरोबर ते बागेत पाहणी करत आहेत. याबाबत पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ‘राजकीय कामातून वेळ मिळाल्यानंतर मी आवर्जून शेतात काही वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातून एक प्रसन्नता मिळते. मन प्रफुल्लित होण्यास मदत मिळते. सध्या शेतात द्राक्ष काढणी सुरु आहे. त्यामुळे रिकाम्या वेळात कामगारांना छोटीशी मदत करत त्यांच्या कामाबद्दल जाणून घेण्याचा लहानसा प्रयत्न केला.’ अजिंक्यराणा पाटील हे मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणूकीदरम्यान सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नेत्यांचे मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु होते. अशा पडत्या काळातही माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ सोडली नाही. लोकसभा निवडणूकीत त्यांनी सुशिलकुमार शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळवून दिले. विधानसभा निवडणूकीतही आमदार यशवंत माने यांना विजयी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जिल्ह्यात ते राष्ट्रवादीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. अशा स्थितीत त्यांचे चिरंजिव अजिंक्यराणा यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा दिला आहे. ‘पुढील काळात पक्ष देईल, ती जबाबदारी स्वीकारत राष्ट्रवादीचा प्रमाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत राहील’, असं त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर म्हटलं आहे. 
त्यांनी केलेल्या पोस्टवर त्यांच्या समर्थकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. त्यात सुरज इजागर यांनी म्हटले की, ‘येणाऱ्या काळात तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्त्व करणार हे नक्की...!

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन अजिंक्यराणा दिसले थेट शेतात ट्रॅक्टर चालवताना सोलापूर : गेल्या आठवड्यात मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ‘पुढील काळात नव्या व्यक्तीला संधी देण्यात यावी, म्हणून आपण राजीनामा दिला’ असल्याचे ते म्हणत आहेत. त्यांच्या या राजीनाम्यावरुन मात्र त्यांच्याकडे कोणती नवीन जबाबदारी मिळणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे. राजीनामा दिल्यानंतर ते थेट शेतात कामगारांना मदत करताना दिसले आहेत. त्याचे फोटो त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर टाकले आहेत.  अजिंक्यराणा यांनी फेसबुक वॉलवर द्राक्ष बागेत ट्रॅक्टर चालव असल्याचे फोटो टाकले आहेत. याबरोबर ते बागेत पाहणी करत आहेत. याबाबत पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ‘राजकीय कामातून वेळ मिळाल्यानंतर मी आवर्जून शेतात काही वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातून एक प्रसन्नता मिळते. मन प्रफुल्लित होण्यास मदत मिळते. सध्या शेतात द्राक्ष काढणी सुरु आहे. त्यामुळे रिकाम्या वेळात कामगारांना छोटीशी मदत करत त्यांच्या कामाबद्दल जाणून घेण्याचा लहानसा प्रयत्न केला.’ अजिंक्यराणा पाटील हे मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणूकीदरम्यान सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नेत्यांचे मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु होते. अशा पडत्या काळातही माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ सोडली नाही. लोकसभा निवडणूकीत त्यांनी सुशिलकुमार शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळवून दिले. विधानसभा निवडणूकीतही आमदार यशवंत माने यांना विजयी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जिल्ह्यात ते राष्ट्रवादीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. अशा स्थितीत त्यांचे चिरंजिव अजिंक्यराणा यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा दिला आहे. ‘पुढील काळात पक्ष देईल, ती जबाबदारी स्वीकारत राष्ट्रवादीचा प्रमाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत राहील’, असं त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर म्हटलं आहे.  त्यांनी केलेल्या पोस्टवर त्यांच्या समर्थकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. त्यात सुरज इजागर यांनी म्हटले की, ‘येणाऱ्या काळात तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्त्व करणार हे नक्की...! News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TbuqSP
Read More
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 मार्च

दिनमान 2 मार्च 2020 

मेष : दैनंदिन तसेच इतर महत्त्वाच्या कामांमध्ये सुयश लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. 

वृषभ : चिकाटीने कार्यरत रहावे लागेल. अडचणींवर मात करू शकाल. प्रवासात काळजी हवी. 

मिथुन : आर्थिक लाभास दिवस अनुकूल आहे. नवीन परिचय होतील. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव असणार आहे. 

कर्क : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. अस्वस्थता कमी होईल. तुमचे मन आनंदी व आशावादी राहील. 

सिंह : नातेवाइकांचे सहकार्य लाभणार आहे. कामामध्ये जाणवत असणाऱ्या अडचणी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. 

कन्या : एखाद्या मनाविरुद्ध घटनेला सामोरे जावे लागेल. मनोबल कमी राहील. चिकाटीने कार्यरत रहावे लागेल. 

तूळ : सौख्य व समाधान लाभेल. खर्चाचे प्रमाण कमी होईल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. 

वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मनोबल कमी राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी जाणवतील. 

धनू : प्रवास होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. 

मकर : आर्थिक लाभ होणार आहेत. महत्त्वाच्या आर्थिक कामात सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. 

कुंभ : चिकाटी वाढणार आहे. प्रवासाचे योग येतील. मनोबल उत्तम राहणार आहे. 

मीन : काहींना गुप्त वार्ता समजतील. प्रवासाचे योग येतील. उधारी वसूल होईल. 

पंचांग 2 मार्च 2020 
सोमवार : फाल्गुन शुद्ध 7, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.55, सूर्यास्त 6.41, चंद्रोदय सकाळी 11.40, चंद्रास्त रात्री 12.14, भारतीय सौर फाल्गुन 12, शके 1941. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 मार्च दिनमान 2 मार्च 2020  मेष : दैनंदिन तसेच इतर महत्त्वाच्या कामांमध्ये सुयश लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील.  वृषभ : चिकाटीने कार्यरत रहावे लागेल. अडचणींवर मात करू शकाल. प्रवासात काळजी हवी.  मिथुन : आर्थिक लाभास दिवस अनुकूल आहे. नवीन परिचय होतील. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव असणार आहे.  कर्क : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. अस्वस्थता कमी होईल. तुमचे मन आनंदी व आशावादी राहील.  सिंह : नातेवाइकांचे सहकार्य लाभणार आहे. कामामध्ये जाणवत असणाऱ्या अडचणी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.  कन्या : एखाद्या मनाविरुद्ध घटनेला सामोरे जावे लागेल. मनोबल कमी राहील. चिकाटीने कार्यरत रहावे लागेल.  तूळ : सौख्य व समाधान लाभेल. खर्चाचे प्रमाण कमी होईल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.  वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मनोबल कमी राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी जाणवतील.  धनू : प्रवास होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.  मकर : आर्थिक लाभ होणार आहेत. महत्त्वाच्या आर्थिक कामात सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील.  कुंभ : चिकाटी वाढणार आहे. प्रवासाचे योग येतील. मनोबल उत्तम राहणार आहे.  मीन : काहींना गुप्त वार्ता समजतील. प्रवासाचे योग येतील. उधारी वसूल होईल.  पंचांग 2 मार्च 2020  सोमवार : फाल्गुन शुद्ध 7, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.55, सूर्यास्त 6.41, चंद्रोदय सकाळी 11.40, चंद्रास्त रात्री 12.14, भारतीय सौर फाल्गुन 12, शके 1941.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2I6uFIB
Read More
शिक्षणाधिकाऱ्यास १ लाखांची काॅस्ट, उच्च न्यायालयाने दिला आदेश

औरंगाबाद : नगर जिल्ह्यातील रुईछत्रपती (ता. पारनेर) येथील खासगी शिक्षण संस्थेत अनुकंपा तत्त्वावर लागलेल्या महिलेच्या शिपाई पदाची मान्यता नाकारणाऱ्या शिक्षणाधिकारी लक्ष्मण शेषराव कोल्हे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांनी एक लाख रुपये शास्ती (कॉस्ट) लावली आहे.

बरोबरच संबंधित रक्कम ३१ मार्चपर्यंत महिलेस डीडीद्वारे द्यावी. यासंबंधीचा अहवाल १० एप्रिलपर्यंत औरंगाबाद खंडपीठात कळविण्याचेही आदेशात म्हटले आहे. शिवाय महिलेच्या शिपाई पदास २९ फेब्रुवारी २००८ पासून मान्यता प्रदान करून आजपर्यंतचे थकीच वेतन अदा करण्याचे आदेश दिले आहेत. वेतन अदा न केल्यास त्यावर नऊ टक्के दराने व्याज देण्याचे आदेशही खंडपीठाने दिले. पारनेर तालुक्यातील रुईछत्रपती (जि. नगर) येथील ज्ञानेश्वर विद्यालयात मंदाकिनी श्रीकृष्ण साबळे या शिपाई म्हणून अनुकंपा तत्त्वावर कार्यरत आहेत.

हेही वाचा- सव्वा दोन महिने घरातच पुरून ठेवला बापाचा मृतदेह, औरंगाबाद...

त्यांचे पती शिक्षण सेवक होते. संबंधित संस्थेने त्यांना कामावरून कमी केले होते. याविरोधात त्याचे पती श्रीकृष्ण यांनी शाळा न्यायाधीकरणाकडे धाव घेतली असता त्यांना कमी केल्याचे आदेश रद्द करण्यात आले. शासन उच्च न्यायालयात गेले असता उच्च न्यायालयाने शासनाची याचिका पेटाळली. सर्वोच्च न्यायालयाने अंशत: शासनाची याचिका मान्य केली. संबंधित शिक्षकास पुन्हा शाळा न्यायाधीकरणात दाद मागण्याचा सल्ला दिला.

शाळा न्यायाधिकरणाकडे पुन्हा गेले असता प्रकरणावर निर्णय प्रलंबित असताना त्यांचे निधन झाले. न्यायाधिकरणाने शिक्षण सेवकाच्या पत्नी मंदाकिनी यांना अनुकंपा तत्त्वावर त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शिपाई पदावर घेण्याचे आदेश दिले.

क्लिक करा -  सत्तेत असताना चंद्रकांत पाटलांनी म्हशी भादरल्या का... 

 

 

काय आहे प्रकरण?
संस्थेने मंदाकिनी यांना २००८ मध्ये शिपाई पदावर सेवेत सामावून घेतले. या पदास मान्यता प्रदान करण्यासाठी जिल्हा परिषद नगर यांच्याकडे संस्थेने प्रस्ताव २०११ मध्ये पाठविला. माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी प्रस्ताव फेटाळल्यामुळे मंदाकिनी यांनी खंडपीठात धाव घेतली. त्यांची याचिका अंशत: मंजूर केली. संबंधित शाळेत शिपाई हे पद रिक्त नसल्याचे कारण सांगण्यात आले. संबंधित संस्थेच्या तीन शाळा असताना तेथेही पद रिक्त नसल्याचे शपथपत्र शिक्षणाधिकारी यांनी दाखल केले. खंडपीठाने २८ सप्टेंबर २०१६ ला याचिका अंशत: मंजूर करीत रिक्त जागा असताना जागा नसल्याचे निरीक्षण नोंदवून यावर फेरविचार करावा असे निर्देश दिले. शिक्षणाधिकारी कोल्हे यांनी १३ डिसेंबर २०१६ ला शिपाई पदाच्या मान्यतेचा प्रस्ताव फेटाळला. याविरोधात मंदाकीनी साबळे यांनी अ‍ॅड. संतोष जाधवर यांच्यावतीने खंडपीठात २०१७ मध्ये शिक्षणाधिकारी यांच्या प्रस्ताव फेटाळण्यास आव्हान दिले. सुनावणीदरम्यान खंडपीठाने वरील आदेश दिला. शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील एस. डी. घायाळ यांनी काम पाहिले

हे वाचलंत का?. का? सुखावले शेतकरी : वाचा

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शिक्षणाधिकाऱ्यास १ लाखांची काॅस्ट, उच्च न्यायालयाने दिला आदेश औरंगाबाद : नगर जिल्ह्यातील रुईछत्रपती (ता. पारनेर) येथील खासगी शिक्षण संस्थेत अनुकंपा तत्त्वावर लागलेल्या महिलेच्या शिपाई पदाची मान्यता नाकारणाऱ्या शिक्षणाधिकारी लक्ष्मण शेषराव कोल्हे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांनी एक लाख रुपये शास्ती (कॉस्ट) लावली आहे. बरोबरच संबंधित रक्कम ३१ मार्चपर्यंत महिलेस डीडीद्वारे द्यावी. यासंबंधीचा अहवाल १० एप्रिलपर्यंत औरंगाबाद खंडपीठात कळविण्याचेही आदेशात म्हटले आहे. शिवाय महिलेच्या शिपाई पदास २९ फेब्रुवारी २००८ पासून मान्यता प्रदान करून आजपर्यंतचे थकीच वेतन अदा करण्याचे आदेश दिले आहेत. वेतन अदा न केल्यास त्यावर नऊ टक्के दराने व्याज देण्याचे आदेशही खंडपीठाने दिले. पारनेर तालुक्यातील रुईछत्रपती (जि. नगर) येथील ज्ञानेश्वर विद्यालयात मंदाकिनी श्रीकृष्ण साबळे या शिपाई म्हणून अनुकंपा तत्त्वावर कार्यरत आहेत. हेही वाचा- सव्वा दोन महिने घरातच पुरून ठेवला बापाचा मृतदेह, औरंगाबाद... त्यांचे पती शिक्षण सेवक होते. संबंधित संस्थेने त्यांना कामावरून कमी केले होते. याविरोधात त्याचे पती श्रीकृष्ण यांनी शाळा न्यायाधीकरणाकडे धाव घेतली असता त्यांना कमी केल्याचे आदेश रद्द करण्यात आले. शासन उच्च न्यायालयात गेले असता उच्च न्यायालयाने शासनाची याचिका पेटाळली. सर्वोच्च न्यायालयाने अंशत: शासनाची याचिका मान्य केली. संबंधित शिक्षकास पुन्हा शाळा न्यायाधीकरणात दाद मागण्याचा सल्ला दिला. शाळा न्यायाधिकरणाकडे पुन्हा गेले असता प्रकरणावर निर्णय प्रलंबित असताना त्यांचे निधन झाले. न्यायाधिकरणाने शिक्षण सेवकाच्या पत्नी मंदाकिनी यांना अनुकंपा तत्त्वावर त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शिपाई पदावर घेण्याचे आदेश दिले. क्लिक करा -  सत्तेत असताना चंद्रकांत पाटलांनी म्हशी भादरल्या का...      काय आहे प्रकरण? संस्थेने मंदाकिनी यांना २००८ मध्ये शिपाई पदावर सेवेत सामावून घेतले. या पदास मान्यता प्रदान करण्यासाठी जिल्हा परिषद नगर यांच्याकडे संस्थेने प्रस्ताव २०११ मध्ये पाठविला. माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी प्रस्ताव फेटाळल्यामुळे मंदाकिनी यांनी खंडपीठात धाव घेतली. त्यांची याचिका अंशत: मंजूर केली. संबंधित शाळेत शिपाई हे पद रिक्त नसल्याचे कारण सांगण्यात आले. संबंधित संस्थेच्या तीन शाळा असताना तेथेही पद रिक्त नसल्याचे शपथपत्र शिक्षणाधिकारी यांनी दाखल केले. खंडपीठाने २८ सप्टेंबर २०१६ ला याचिका अंशत: मंजूर करीत रिक्त जागा असताना जागा नसल्याचे निरीक्षण नोंदवून यावर फेरविचार करावा असे निर्देश दिले. शिक्षणाधिकारी कोल्हे यांनी १३ डिसेंबर २०१६ ला शिपाई पदाच्या मान्यतेचा प्रस्ताव फेटाळला. याविरोधात मंदाकीनी साबळे यांनी अ‍ॅड. संतोष जाधवर यांच्यावतीने खंडपीठात २०१७ मध्ये शिक्षणाधिकारी यांच्या प्रस्ताव फेटाळण्यास आव्हान दिले. सुनावणीदरम्यान खंडपीठाने वरील आदेश दिला. शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील एस. डी. घायाळ यांनी काम पाहिले हे वाचलंत का?. का? सुखावले शेतकरी : वाचा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39iZHZC
Read More
प्रवासी वाढवा अभियानाचा श्रीगणेशा 

अमरावती :  गेल्या दोन वर्षांपासून एसटीच्या प्रवासी भारमानात घट झाल्याने एसटी महामंडळाने आता "प्रवासी वाढवा' अभियान हाती घेतले आहे. 1 मार्चपासून या अभियानाचा श्रीगणेशा झाला. "प्रवाशांच्या सेवेसाठी', असे घोषवाक्‍य घेऊन राज्यभर नेटवर्क असलेल्या राज्य मार्ग एसटी महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी विशेष उत्पन्न वाढवा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक उत्पन्न आणणाऱ्या आगारांना दरमहा 2 लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. हे अभियान 1 मार्च ते 30 एप्रिल 2020 या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. एसटीच्या 250 आगारांची (डेपो) प्रदेशनिहाय विभागणी करण्यात येईल. प्रत्येक प्रदेशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करून उत्पन्नामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न आणणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या आगारात दरमहा 2 लाख, द्वितीय आगारास दीड लाख आणि तिसऱ्या क्रमांकाच्या आगारास 1 लाख रुपये पारितोषिक देण्यात येईल. याबरोबरच महामंडळाच्या 31 विभागांपैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांनादेखील आगाराप्रमाणे प्रथम, द्वितीय व तृतीय असे 1 लाख, दीड लाख व 1 लाख 25 हजार अनुक्रमे बक्षीस देण्यात येणार आहे. 

हे वाचा— बैलासाठी चारा आणायला गेला शेतकरी...नंतर घडली ही घटना, गावात हळहळ

अधिकारी राहतील जबाबदार 
दोन महिन्यांच्या कालावधीत किमान दोन टक्‍के भारमान वाढवण्याचे उद्दिष्ट आगार पातळीवर देण्यात आलेले आहे. या अभियानांतर्गत दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही महामंडळाने अधिकारी आणि चालक-वाहकांना दिला आहे. एसटीच्या प्रवासी भारमानात गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने घसरण होत आहे. उद्दिष्टापेक्षा सर्वांत जास्त व सर्वांत कमी उत्पन्न आणणाऱ्या तीन चालक आणि वाहकांची नावे आगारातील फलकावर जाहीर केली जाणार आहेत. प्रवासी व उत्पन्न वाढवण्यात अपयशी ठरल्यास संबंधित अधिकारी, पर्यवेक्षकांची गैरसोयीच्या ठिकाणी बदली करण्याचा इशाराही परिपत्रकातून देण्यात आला आहे. 

हे वाचा—आता जन्मभर सडावे लागेल तुरूंगात... केले होते हे भयानक कृत्य

दोन तास प्रवाशांच्या सेवेत 
गर्दीच्या ठिकाणी दिवसांतून दोन तास पर्यवेक्षक व कर्मचारी प्रवाशांच्या सोयीसाठी मदत करणार. प्रवासी उपलब्ध असल्यास थांबे नसतानाही प्रवाशांना सेवा देणे. विभागातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आगारात भेट देऊन पाहणी करण्याचे सूचित केले आहे. यासह पथके स्थापन करून प्रवाशांच्या सेवासुविधांची तपासणी करून ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले. 
 

 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

प्रवासी वाढवा अभियानाचा श्रीगणेशा  अमरावती :  गेल्या दोन वर्षांपासून एसटीच्या प्रवासी भारमानात घट झाल्याने एसटी महामंडळाने आता "प्रवासी वाढवा' अभियान हाती घेतले आहे. 1 मार्चपासून या अभियानाचा श्रीगणेशा झाला. "प्रवाशांच्या सेवेसाठी', असे घोषवाक्‍य घेऊन राज्यभर नेटवर्क असलेल्या राज्य मार्ग एसटी महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी विशेष उत्पन्न वाढवा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक उत्पन्न आणणाऱ्या आगारांना दरमहा 2 लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. हे अभियान 1 मार्च ते 30 एप्रिल 2020 या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. एसटीच्या 250 आगारांची (डेपो) प्रदेशनिहाय विभागणी करण्यात येईल. प्रत्येक प्रदेशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करून उत्पन्नामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न आणणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या आगारात दरमहा 2 लाख, द्वितीय आगारास दीड लाख आणि तिसऱ्या क्रमांकाच्या आगारास 1 लाख रुपये पारितोषिक देण्यात येईल. याबरोबरच महामंडळाच्या 31 विभागांपैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांनादेखील आगाराप्रमाणे प्रथम, द्वितीय व तृतीय असे 1 लाख, दीड लाख व 1 लाख 25 हजार अनुक्रमे बक्षीस देण्यात येणार आहे.  हे वाचा— बैलासाठी चारा आणायला गेला शेतकरी...नंतर घडली ही घटना, गावात हळहळ अधिकारी राहतील जबाबदार  दोन महिन्यांच्या कालावधीत किमान दोन टक्‍के भारमान वाढवण्याचे उद्दिष्ट आगार पातळीवर देण्यात आलेले आहे. या अभियानांतर्गत दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही महामंडळाने अधिकारी आणि चालक-वाहकांना दिला आहे. एसटीच्या प्रवासी भारमानात गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने घसरण होत आहे. उद्दिष्टापेक्षा सर्वांत जास्त व सर्वांत कमी उत्पन्न आणणाऱ्या तीन चालक आणि वाहकांची नावे आगारातील फलकावर जाहीर केली जाणार आहेत. प्रवासी व उत्पन्न वाढवण्यात अपयशी ठरल्यास संबंधित अधिकारी, पर्यवेक्षकांची गैरसोयीच्या ठिकाणी बदली करण्याचा इशाराही परिपत्रकातून देण्यात आला आहे.  हे वाचा—आता जन्मभर सडावे लागेल तुरूंगात... केले होते हे भयानक कृत्य दोन तास प्रवाशांच्या सेवेत  गर्दीच्या ठिकाणी दिवसांतून दोन तास पर्यवेक्षक व कर्मचारी प्रवाशांच्या सोयीसाठी मदत करणार. प्रवासी उपलब्ध असल्यास थांबे नसतानाही प्रवाशांना सेवा देणे. विभागातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आगारात भेट देऊन पाहणी करण्याचे सूचित केले आहे. यासह पथके स्थापन करून प्रवाशांच्या सेवासुविधांची तपासणी करून ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले.        News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cgYJix
Read More
CoronaVirus : भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार कशाची वाट पहातेय?

पुणे : कोरोना विषाणूंच्या उद्रेकामुळे तेहरानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सोडविण्यासाठी केंद्र सरकार का तातडीने पावले उचलत नाही? कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग होण्याची टांगती तलवार तेथील नागरिकांवर आहे. त्यातून त्यांच्या जिवाला धोका असतानाही केंद्र सरकार विमान पाठवून नागरिकांना भारतात का आणत नाही, असा सवाल तेथे अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांनी केला.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

इराणमध्ये कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग झाला आहे. इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्येही शेकडो भारतीय अडकले आहेत. त्यात कंपनीच्या कामासाठी तेहरान येथे गेलेले दोन तरुणांचाही समावेश आहे. त्यात मुंबई येथील वेदांत कदम (वय 24, वरळी) आणि अरविंद जाधव (वय 50 मुलुंड) हे देखिल तेथे अडकले आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

याबद्दल बोलताना अरविंद यांच्या पत्नी सुषमा जाधव म्हणाल्या, "तेहरान येथून उड्डाण केलेल्या विमानांना भारतातील विमानतळांवर उतरू दिले जात नाही, अशी माहिती मिळत आहे. तेहरान येथून 28 तारखेला उड्डाण करून जाधव भारतात परत येणार होते. पण, ते विमान रद्द केले. आता 16 तारीख दिल्याचे समजते. म्हणजे पंधरा दिवस या भारतीय नागरिकांनी तेथे राहावे लागणार आहे. या दरम्यान, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला तर, याची जबाबदारी केंद्र सरकार घेणार आहे आहे का?'' इराणमधील नागरिकांना परत भारतात आणण्याचा निर्णय घ्यायला केंद्र सरकार इतकी वाट का पहातंय, अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

CoronaVirus : भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार कशाची वाट पहातेय? पुणे : कोरोना विषाणूंच्या उद्रेकामुळे तेहरानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सोडविण्यासाठी केंद्र सरकार का तातडीने पावले उचलत नाही? कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग होण्याची टांगती तलवार तेथील नागरिकांवर आहे. त्यातून त्यांच्या जिवाला धोका असतानाही केंद्र सरकार विमान पाठवून नागरिकांना भारतात का आणत नाही, असा सवाल तेथे अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांनी केला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  इराणमध्ये कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग झाला आहे. इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्येही शेकडो भारतीय अडकले आहेत. त्यात कंपनीच्या कामासाठी तेहरान येथे गेलेले दोन तरुणांचाही समावेश आहे. त्यात मुंबई येथील वेदांत कदम (वय 24, वरळी) आणि अरविंद जाधव (वय 50 मुलुंड) हे देखिल तेथे अडकले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  याबद्दल बोलताना अरविंद यांच्या पत्नी सुषमा जाधव म्हणाल्या, "तेहरान येथून उड्डाण केलेल्या विमानांना भारतातील विमानतळांवर उतरू दिले जात नाही, अशी माहिती मिळत आहे. तेहरान येथून 28 तारखेला उड्डाण करून जाधव भारतात परत येणार होते. पण, ते विमान रद्द केले. आता 16 तारीख दिल्याचे समजते. म्हणजे पंधरा दिवस या भारतीय नागरिकांनी तेथे राहावे लागणार आहे. या दरम्यान, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला तर, याची जबाबदारी केंद्र सरकार घेणार आहे आहे का?'' इराणमधील नागरिकांना परत भारतात आणण्याचा निर्णय घ्यायला केंद्र सरकार इतकी वाट का पहातंय, अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PEApgD
Read More