प्रवासी वाढवा अभियानाचा श्रीगणेशा  अमरावती :  गेल्या दोन वर्षांपासून एसटीच्या प्रवासी भारमानात घट झाल्याने एसटी महामंडळाने आता "प्रवासी वाढवा' अभियान हाती घेतले आहे. 1 मार्चपासून या अभियानाचा श्रीगणेशा झाला. "प्रवाशांच्या सेवेसाठी', असे घोषवाक्‍य घेऊन राज्यभर नेटवर्क असलेल्या राज्य मार्ग एसटी महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी विशेष उत्पन्न वाढवा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक उत्पन्न आणणाऱ्या आगारांना दरमहा 2 लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. हे अभियान 1 मार्च ते 30 एप्रिल 2020 या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. एसटीच्या 250 आगारांची (डेपो) प्रदेशनिहाय विभागणी करण्यात येईल. प्रत्येक प्रदेशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करून उत्पन्नामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न आणणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या आगारात दरमहा 2 लाख, द्वितीय आगारास दीड लाख आणि तिसऱ्या क्रमांकाच्या आगारास 1 लाख रुपये पारितोषिक देण्यात येईल. याबरोबरच महामंडळाच्या 31 विभागांपैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांनादेखील आगाराप्रमाणे प्रथम, द्वितीय व तृतीय असे 1 लाख, दीड लाख व 1 लाख 25 हजार अनुक्रमे बक्षीस देण्यात येणार आहे.  हे वाचा— बैलासाठी चारा आणायला गेला शेतकरी...नंतर घडली ही घटना, गावात हळहळ अधिकारी राहतील जबाबदार  दोन महिन्यांच्या कालावधीत किमान दोन टक्‍के भारमान वाढवण्याचे उद्दिष्ट आगार पातळीवर देण्यात आलेले आहे. या अभियानांतर्गत दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही महामंडळाने अधिकारी आणि चालक-वाहकांना दिला आहे. एसटीच्या प्रवासी भारमानात गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने घसरण होत आहे. उद्दिष्टापेक्षा सर्वांत जास्त व सर्वांत कमी उत्पन्न आणणाऱ्या तीन चालक आणि वाहकांची नावे आगारातील फलकावर जाहीर केली जाणार आहेत. प्रवासी व उत्पन्न वाढवण्यात अपयशी ठरल्यास संबंधित अधिकारी, पर्यवेक्षकांची गैरसोयीच्या ठिकाणी बदली करण्याचा इशाराही परिपत्रकातून देण्यात आला आहे.  हे वाचा—आता जन्मभर सडावे लागेल तुरूंगात... केले होते हे भयानक कृत्य दोन तास प्रवाशांच्या सेवेत  गर्दीच्या ठिकाणी दिवसांतून दोन तास पर्यवेक्षक व कर्मचारी प्रवाशांच्या सोयीसाठी मदत करणार. प्रवासी उपलब्ध असल्यास थांबे नसतानाही प्रवाशांना सेवा देणे. विभागातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आगारात भेट देऊन पाहणी करण्याचे सूचित केले आहे. यासह पथके स्थापन करून प्रवाशांच्या सेवासुविधांची तपासणी करून ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले.        News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 1, 2020

प्रवासी वाढवा अभियानाचा श्रीगणेशा  अमरावती :  गेल्या दोन वर्षांपासून एसटीच्या प्रवासी भारमानात घट झाल्याने एसटी महामंडळाने आता "प्रवासी वाढवा' अभियान हाती घेतले आहे. 1 मार्चपासून या अभियानाचा श्रीगणेशा झाला. "प्रवाशांच्या सेवेसाठी', असे घोषवाक्‍य घेऊन राज्यभर नेटवर्क असलेल्या राज्य मार्ग एसटी महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी विशेष उत्पन्न वाढवा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक उत्पन्न आणणाऱ्या आगारांना दरमहा 2 लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. हे अभियान 1 मार्च ते 30 एप्रिल 2020 या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. एसटीच्या 250 आगारांची (डेपो) प्रदेशनिहाय विभागणी करण्यात येईल. प्रत्येक प्रदेशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करून उत्पन्नामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न आणणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या आगारात दरमहा 2 लाख, द्वितीय आगारास दीड लाख आणि तिसऱ्या क्रमांकाच्या आगारास 1 लाख रुपये पारितोषिक देण्यात येईल. याबरोबरच महामंडळाच्या 31 विभागांपैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांनादेखील आगाराप्रमाणे प्रथम, द्वितीय व तृतीय असे 1 लाख, दीड लाख व 1 लाख 25 हजार अनुक्रमे बक्षीस देण्यात येणार आहे.  हे वाचा— बैलासाठी चारा आणायला गेला शेतकरी...नंतर घडली ही घटना, गावात हळहळ अधिकारी राहतील जबाबदार  दोन महिन्यांच्या कालावधीत किमान दोन टक्‍के भारमान वाढवण्याचे उद्दिष्ट आगार पातळीवर देण्यात आलेले आहे. या अभियानांतर्गत दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही महामंडळाने अधिकारी आणि चालक-वाहकांना दिला आहे. एसटीच्या प्रवासी भारमानात गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने घसरण होत आहे. उद्दिष्टापेक्षा सर्वांत जास्त व सर्वांत कमी उत्पन्न आणणाऱ्या तीन चालक आणि वाहकांची नावे आगारातील फलकावर जाहीर केली जाणार आहेत. प्रवासी व उत्पन्न वाढवण्यात अपयशी ठरल्यास संबंधित अधिकारी, पर्यवेक्षकांची गैरसोयीच्या ठिकाणी बदली करण्याचा इशाराही परिपत्रकातून देण्यात आला आहे.  हे वाचा—आता जन्मभर सडावे लागेल तुरूंगात... केले होते हे भयानक कृत्य दोन तास प्रवाशांच्या सेवेत  गर्दीच्या ठिकाणी दिवसांतून दोन तास पर्यवेक्षक व कर्मचारी प्रवाशांच्या सोयीसाठी मदत करणार. प्रवासी उपलब्ध असल्यास थांबे नसतानाही प्रवाशांना सेवा देणे. विभागातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आगारात भेट देऊन पाहणी करण्याचे सूचित केले आहे. यासह पथके स्थापन करून प्रवाशांच्या सेवासुविधांची तपासणी करून ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले.        News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3cgYJix

No comments:

Post a Comment