गैरव्यवहारातील ‘छुपे रुस्तुम’ कोण? उमरगा (जि. उस्मानाबाद) : पालिकेतील गैरव्यवहाराचे एक-एक प्रकरण बाहेर येत आहे. बनावट बँक खाते, पालिकेच्या धनादेशाचा वापर करून गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून, संगनमताने इंटरनेट बँकिंगचा अवलंब करून चाणाक्ष पद्धतीने अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. एकूण एक कोटी ६१ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. यात बड्या व्यक्तींचे अप्रत्यक्ष पाठबळ असल्याची चर्चा आहे. प्रकरण उघडकीस आल्याने मी तो नव्हेच, अशा आविर्भावात काही जण फिरत आहेत. याचा अर्थ या प्रकरणात ‘तडजोडी’चा मार्ग अवलंबिल्याचीही जोरदार चर्चा आहे.  उमरगा पालिकेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा हा पहिलाच प्रकार आहे. पहिल्यांदा ३१ ऑगस्ट २०१९ रोजी ४९ लाखांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर शहरातील महाराष्ट्र बँकेत ठेवण्यात आलेल्या दलित वस्ती सुधार योजनेच्या एक कोटी रकमेवरील ३६ लाख व्याजाची रक्कम हडपण्याचा प्रकार उघडकीस आला. तिसऱ्या टप्प्यात लेखा विभागाच्या तपासणीत आठ लाख ६४ हजार ८०२ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आता नव्याने ६६ लाख ४० हजार ४९६ रुपयांचा गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. बँक स्टेटमेंटच्या व्यवहार नोंदीवरून तसेच बँकेच्या पत्रव्यवहारावरून चौकशी समितीतील मुख्याधिकारी प्रकाश पाटील, लेखापाल अंकुश माने, नगर अभियंता रवींद्र सोनवणे, हरीशकुमार दाडगे यांनी उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दिलेल्या पुरवणी चौकशी अहवालानुसार तत्कालीन लेखापाल विनायक वडमारे, नंदेशकुमार झांबरे, धम्मपाल ढवळे यांच्यासह श्री. महाशुभप्रदा प्रा.लि. व नोव्हा कोअर टेंडरिंग प्रा.लि. यांनी संगनमत करून इंटरनेट बँकिंगचे युजर आयडी व पासवर्डचा परस्पर गैरवापर करणे, खासगी ई-मेल आयडी पालिकेच्या बँक खात्याला संलग्न करणे, वैयक्तिक खरेदी व देणे अदा करण्यासाठी शासकीय रक्कम इतरत्र वळवून ६६ लाख ४० हजार ४९६ रुपयांचा गैरव्यवहार केल्याची पुरवणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.  उस्मानाबादच्या एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी छुपे रुस्तुम शोधण्याचे व्हावे धाडस  विविध विकासकामांचा निधी, ठेवीवरील व्याज हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला. आता तर इन्कमटॅक्स, टीडीएस, जीएसटीची रक्कम जमा असलेल्या चीफ ऑफिसर, म्युनिसिपल कौन्सिल (प्रोफेशनल टॅक्स) या खात्यावरून इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. चौकशी समितीने प्रथमदर्शनी निदर्शनास आलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या नोंदीचे विवरणही पोलिसांकडे दिले आहे. त्यात ३४ ट्रँझेक्शनद्वारे ६६ लाख ४० हजार ४९६ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे दिसते. त्यात एका ठेकेदाराकडे सहा वेळा रक्कम ट्रँझेक्शन झाल्याचे दिसते. दरम्यान, पहिल्या तीन गैरव्यवहारांच्या प्रकरणात एकच आरोपी अटकेत होता. तो सध्या कारागृहात आहे. चार आरोपींचा तपास सहा महिन्यांपासून लागत नाही. लातूरला कधी होणार चिकन महोत्सव यावरून पोलिस यंत्रणेच्या तपास कामाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या गैरव्यवहाराची शहरातील नागरिकांत नकारात्मक चर्चा होत आहे. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांत समन्वय नाही, नेहमी आरोप-प्रत्यारोप होत आहेत. गैरव्यवहार प्रकरणाबाबत मात्र छडा लावण्याची मागणी होत नाही. पोलिस यंत्रणेने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपास कामातून छुपे रुस्तुमचे चेहरे नागरिकांसमोर आणण्याचे काम करण्याची मागणी होत आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 1, 2020

गैरव्यवहारातील ‘छुपे रुस्तुम’ कोण? उमरगा (जि. उस्मानाबाद) : पालिकेतील गैरव्यवहाराचे एक-एक प्रकरण बाहेर येत आहे. बनावट बँक खाते, पालिकेच्या धनादेशाचा वापर करून गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून, संगनमताने इंटरनेट बँकिंगचा अवलंब करून चाणाक्ष पद्धतीने अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. एकूण एक कोटी ६१ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. यात बड्या व्यक्तींचे अप्रत्यक्ष पाठबळ असल्याची चर्चा आहे. प्रकरण उघडकीस आल्याने मी तो नव्हेच, अशा आविर्भावात काही जण फिरत आहेत. याचा अर्थ या प्रकरणात ‘तडजोडी’चा मार्ग अवलंबिल्याचीही जोरदार चर्चा आहे.  उमरगा पालिकेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा हा पहिलाच प्रकार आहे. पहिल्यांदा ३१ ऑगस्ट २०१९ रोजी ४९ लाखांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर शहरातील महाराष्ट्र बँकेत ठेवण्यात आलेल्या दलित वस्ती सुधार योजनेच्या एक कोटी रकमेवरील ३६ लाख व्याजाची रक्कम हडपण्याचा प्रकार उघडकीस आला. तिसऱ्या टप्प्यात लेखा विभागाच्या तपासणीत आठ लाख ६४ हजार ८०२ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आता नव्याने ६६ लाख ४० हजार ४९६ रुपयांचा गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. बँक स्टेटमेंटच्या व्यवहार नोंदीवरून तसेच बँकेच्या पत्रव्यवहारावरून चौकशी समितीतील मुख्याधिकारी प्रकाश पाटील, लेखापाल अंकुश माने, नगर अभियंता रवींद्र सोनवणे, हरीशकुमार दाडगे यांनी उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दिलेल्या पुरवणी चौकशी अहवालानुसार तत्कालीन लेखापाल विनायक वडमारे, नंदेशकुमार झांबरे, धम्मपाल ढवळे यांच्यासह श्री. महाशुभप्रदा प्रा.लि. व नोव्हा कोअर टेंडरिंग प्रा.लि. यांनी संगनमत करून इंटरनेट बँकिंगचे युजर आयडी व पासवर्डचा परस्पर गैरवापर करणे, खासगी ई-मेल आयडी पालिकेच्या बँक खात्याला संलग्न करणे, वैयक्तिक खरेदी व देणे अदा करण्यासाठी शासकीय रक्कम इतरत्र वळवून ६६ लाख ४० हजार ४९६ रुपयांचा गैरव्यवहार केल्याची पुरवणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.  उस्मानाबादच्या एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी छुपे रुस्तुम शोधण्याचे व्हावे धाडस  विविध विकासकामांचा निधी, ठेवीवरील व्याज हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला. आता तर इन्कमटॅक्स, टीडीएस, जीएसटीची रक्कम जमा असलेल्या चीफ ऑफिसर, म्युनिसिपल कौन्सिल (प्रोफेशनल टॅक्स) या खात्यावरून इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. चौकशी समितीने प्रथमदर्शनी निदर्शनास आलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या नोंदीचे विवरणही पोलिसांकडे दिले आहे. त्यात ३४ ट्रँझेक्शनद्वारे ६६ लाख ४० हजार ४९६ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे दिसते. त्यात एका ठेकेदाराकडे सहा वेळा रक्कम ट्रँझेक्शन झाल्याचे दिसते. दरम्यान, पहिल्या तीन गैरव्यवहारांच्या प्रकरणात एकच आरोपी अटकेत होता. तो सध्या कारागृहात आहे. चार आरोपींचा तपास सहा महिन्यांपासून लागत नाही. लातूरला कधी होणार चिकन महोत्सव यावरून पोलिस यंत्रणेच्या तपास कामाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या गैरव्यवहाराची शहरातील नागरिकांत नकारात्मक चर्चा होत आहे. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांत समन्वय नाही, नेहमी आरोप-प्रत्यारोप होत आहेत. गैरव्यवहार प्रकरणाबाबत मात्र छडा लावण्याची मागणी होत नाही. पोलिस यंत्रणेने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपास कामातून छुपे रुस्तुमचे चेहरे नागरिकांसमोर आणण्याचे काम करण्याची मागणी होत आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2VBujBJ

No comments:

Post a Comment