Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 27, 2021

पहिली पायरी...

हिंसाचाराला आणि अश्लीलतेला उत्तेजन देणाऱ्या घृणास्पद ऑनलाइन आशयाचं नियमन करणं हा केंद्र सरकारनं नवमाध्यमांच्या समस्या सोडवण्यासाठी जाहीर केलेल्या नव्या नियमांचा गाभा आहे. या मुख्य उद्देशाबरोबरच आपली घटनात्मक मूलभूत मूल्ये आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य जतन करण्यात संतुलन साधणं हाही नव्या नियमांचा उद्देश आहे. मुद्रितमाध्यमे, टीव्हीमाध्यमे यांची ऑनलाईन बातम्यांचे मंचाशी असलेली स्पर्धा समतल पातळीवर आणण्याचा प्रयत्न नव्या नियमांमध्ये आहे. त्याचवेळी ऑनलाईन बातम्यांना प्रेस कौन्सिल आणि ‘केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) नियम, १९९४,’ च्या पत्रकारितेच्या मार्गदर्शकतत्त्वांमध्ये बसवण्याचाही प्रयत्न आहे. यातील काही मंचांवर बेफामपणा आणि बेजबाबदारपणा दिसून येत असल्यानं नियमनाची मागणी दीर्घ काळ होत होती. 

चित्रपट-उद्योगातील आशयावर देखरेख-जबाबदारी निश्चितीसाठी ‘चित्रपट प्रमाणन (सर्टिफिकेशन) संस्था’ आहे. ओटीटी मंचाबाबत तसं काहीही नाही. तथापि, कलात्मक स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सरकारनं स्वनियमन प्रस्तावित केलं आहे. ‘ओटीटी संस्थांनी एकत्रित येऊन आशय वर्गीकरणासह संहिता विकसित करावी; जेणेकरून ‘प्रौढ आशय’ पाहण्यापासून अल्पवयीनांना रोखता येईल. ही तक्रारनिवारण यंत्रणा त्रिस्तरीय आहे, जीमध्ये पहिल्या दोन स्तरांत प्रकाशक आणि स्वयंनियंत्रित संस्था आहेत. तिसरा स्तर म्हणजे, केंद्र सरकारची ‘देखरेख समिती’. प्रस्तावित धोरणांत प्रकाशकांनी तक्रारनिवारण अधिकारी नेमले पाहिजेत आणि निर्धारित काळात तक्रारींचं निवारण केलं पाहिजे. मग, तिथं निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वयंनियमन संस्था असू शकते. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऑनलाईन मंच हे खातीपडताळणी, नियंत्रणप्रवेश इत्यादींच्या नियमांबाबत कमालीचे सावध असतात; परंतु या प्रश्नांवर भारतीय कायद्याच्या चौकटीत काम करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ : मुख्य प्रवाहातील माध्यमे हिंसाचार, समुदायांमधील शत्रुत्व, मानहानी इत्यादींच्या उदात्तीकरणाबाबत भारतीय दंडसंहितेमधील (आयपीसी) तरतुदींविषयी जागरूक आहेत. ऑनलाइन मंचावरील आशय/सादरीकरण यांत या सर्व गोष्टींचा पूर्णपणे अभाव दिसतो. माध्यमांमधील महिला किंवा इतर क्षेत्रांतील महिला-व्यावसायिकांबद्दलच्या समाजमाध्यमांवरची असभ्य शेरेबाजी आणि अशा प्रकारचं वर्तन रोखण्यात भारताची असमर्थता लक्षात घेता सायबरक्षेत्रात भारतीय दंडसंहिता लागू होऊ शकत नाही का, असा प्रश्न निर्माण होतो. 
ऑस्ट्रेलियातील डिजिटल कंपन्यांनी एकत्र येऊन बनावट बातम्या आणि अपप्रचाराला पायबंद घालण्यासाठी संहिता तयार केली आहे. भारतीय डिजिटल आणि ओटीटी कंपन्या यातून काही शिकू शकतात. ‘अपमाहितीबाबत आणि गैरमाहितीबाबतची ऑस्ट्रेलियन सरावसंहिता’ असं तिला म्हटलं जातं. डिजिटल उद्योगसमूहानं ती नुकतीच प्रसिद्ध केली आहे. 

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

ऑस्ट्रेलियाच्या ‘संवाद आणि माध्यम प्राधिकरणा’नं या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. हे स्वागत करताना प्राधिकरणानं म्हटलं आहे : ‘ऑस्ट्रेलियामधील दोन तृतीयांश जनतेला इंटरनेटवरील काय खरं आणि काय खोटं याची जाणीव आहे. अपप्रचार आणि गैरसमज पसरवणाऱ्या बातम्यांमुळे उद्भवणारे गंभीर धोके लक्षात घेऊन त्याविरोधात सुरक्षिततेचा उपाय म्हणून डिजिटल मंचांनी स्वयंनियमनसंहिता स्वीकारण्याचं मान्य केलं आहे.’’ समाजमाध्यमांवरील खाती निष्क्रिय करणं आणि वादग्रस्त मजकूर काढून टाकण्यासारख्या काही कारवाया करण्याचं आश्वासन डिजिटल मंचांनी दिलं आहे. 

हानिकारक आशयाबद्दल ऑनलाइन कंपन्यांना जबाबदार धरण्यासाठी कायदा आणण्यास ब्रिटनमधील सरकार तयार आहे. अशा प्रकारचा आशय काढून टाकण्यात अयशस्वी ठरलेल्या कंपन्यांना शिक्षा देण्याचीही त्या सरकारची तयारी आहे. प्रस्तावित ‘ऑनलाईन सुरक्षा विधेयका’चं उद्दिष्ट म्हणजे, इंटरनेट वापरकर्त्यांचं संरक्षण करणं आणि हिंसाचार, दहशतवादी मजकूर, बाल-अत्याचार, सायबर गुंडगिरी इत्यादींचा प्रसार करणाऱ्या मंचांवर कडक कारवाई करणं. त्या देशाचे ‘डिजिटल सचिव’ ऑलिव्हर डोव्हन यांनी म्हटलं आहे,‘ मी तंत्रज्ञानसमर्थक आहे हे मी निर्भयपणे सांगतो. मात्र, तंत्रज्ञान-स्वातंत्र्य हे बेछूट, अमर्याद आहे असा याचा अर्थ नाही.’’ लोकशाहीप्रणीत देशांची सध्याची मनःस्थिती कशी आहे याचंच हे द्योतक होय. 
ब्रिटनमध्ये स्वनियमयाद्वारे मुद्रितमाध्यमांचं नियमन होतं आणि खासगी दूरचित्रवाणी आणि रेडिओचं नियमन कायद्याद्वारे प्रदान केला गेलेला स्वतंत्र दूरचित्रवाणी आयोग आणि रेडिओ प्राधिकरणा यांच्याद्वारे केलं जातं. 

रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर या मंत्रिद्वयीनं सरकारच्या मार्गदर्शक सूचना गेल्या आठवड्यात जाहीर केल्या आहेत. हे दोघंही आता वेगळ्या अर्थानं ‘दुसऱ्या स्वातंत्रयुद्धा’चे प्रणेते आहेत हे विसरता कामा नये. कारण, या दोघांनी सत्तरच्या दशकात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीच्या विरोधात लढताना दीड वर्ष तुरुंगवास भोगला होता. परिणामी, लोकांना त्यांची राज्यघटना व लोकशाही पुन्हा प्राप्त झाली होती. म्हणूनच, मूलभूत लोकशाहीमूल्यांबद्दलची त्यांची वचनबद्धता माध्यमनियमन आणि त्याच्या धोरणांच्या आखणीवर प्रभाव पाडत राहील. शेवटी, कंपन्यांनी भारतात कोणत्या चौकटीत काम केलं पाहिजे याविषयी भाष्य करताना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘‘या कंपन्यांनी भारतीय कायद्यानुसार काम केलं पाहिजे, त्याबाबत कुठलीही तडजोड अमान्य आहे.’’ 

(लेखक ए. सूर्य प्रकाश हे राज्यघटना आणि संसदीय प्रणालीचे अभ्यासक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पहिली पायरी... हिंसाचाराला आणि अश्लीलतेला उत्तेजन देणाऱ्या घृणास्पद ऑनलाइन आशयाचं नियमन करणं हा केंद्र सरकारनं नवमाध्यमांच्या समस्या सोडवण्यासाठी जाहीर केलेल्या नव्या नियमांचा गाभा आहे. या मुख्य उद्देशाबरोबरच आपली घटनात्मक मूलभूत मूल्ये आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य जतन करण्यात संतुलन साधणं हाही नव्या नियमांचा उद्देश आहे. मुद्रितमाध्यमे, टीव्हीमाध्यमे यांची ऑनलाईन बातम्यांचे मंचाशी असलेली स्पर्धा समतल पातळीवर आणण्याचा प्रयत्न नव्या नियमांमध्ये आहे. त्याचवेळी ऑनलाईन बातम्यांना प्रेस कौन्सिल आणि ‘केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) नियम, १९९४,’ च्या पत्रकारितेच्या मार्गदर्शकतत्त्वांमध्ये बसवण्याचाही प्रयत्न आहे. यातील काही मंचांवर बेफामपणा आणि बेजबाबदारपणा दिसून येत असल्यानं नियमनाची मागणी दीर्घ काळ होत होती.  चित्रपट-उद्योगातील आशयावर देखरेख-जबाबदारी निश्चितीसाठी ‘चित्रपट प्रमाणन (सर्टिफिकेशन) संस्था’ आहे. ओटीटी मंचाबाबत तसं काहीही नाही. तथापि, कलात्मक स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सरकारनं स्वनियमन प्रस्तावित केलं आहे. ‘ओटीटी संस्थांनी एकत्रित येऊन आशय वर्गीकरणासह संहिता विकसित करावी; जेणेकरून ‘प्रौढ आशय’ पाहण्यापासून अल्पवयीनांना रोखता येईल. ही तक्रारनिवारण यंत्रणा त्रिस्तरीय आहे, जीमध्ये पहिल्या दोन स्तरांत प्रकाशक आणि स्वयंनियंत्रित संस्था आहेत. तिसरा स्तर म्हणजे, केंद्र सरकारची ‘देखरेख समिती’. प्रस्तावित धोरणांत प्रकाशकांनी तक्रारनिवारण अधिकारी नेमले पाहिजेत आणि निर्धारित काळात तक्रारींचं निवारण केलं पाहिजे. मग, तिथं निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वयंनियमन संस्था असू शकते.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ऑनलाईन मंच हे खातीपडताळणी, नियंत्रणप्रवेश इत्यादींच्या नियमांबाबत कमालीचे सावध असतात; परंतु या प्रश्नांवर भारतीय कायद्याच्या चौकटीत काम करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ : मुख्य प्रवाहातील माध्यमे हिंसाचार, समुदायांमधील शत्रुत्व, मानहानी इत्यादींच्या उदात्तीकरणाबाबत भारतीय दंडसंहितेमधील (आयपीसी) तरतुदींविषयी जागरूक आहेत. ऑनलाइन मंचावरील आशय/सादरीकरण यांत या सर्व गोष्टींचा पूर्णपणे अभाव दिसतो. माध्यमांमधील महिला किंवा इतर क्षेत्रांतील महिला-व्यावसायिकांबद्दलच्या समाजमाध्यमांवरची असभ्य शेरेबाजी आणि अशा प्रकारचं वर्तन रोखण्यात भारताची असमर्थता लक्षात घेता सायबरक्षेत्रात भारतीय दंडसंहिता लागू होऊ शकत नाही का, असा प्रश्न निर्माण होतो.  ऑस्ट्रेलियातील डिजिटल कंपन्यांनी एकत्र येऊन बनावट बातम्या आणि अपप्रचाराला पायबंद घालण्यासाठी संहिता तयार केली आहे. भारतीय डिजिटल आणि ओटीटी कंपन्या यातून काही शिकू शकतात. ‘अपमाहितीबाबत आणि गैरमाहितीबाबतची ऑस्ट्रेलियन सरावसंहिता’ असं तिला म्हटलं जातं. डिजिटल उद्योगसमूहानं ती नुकतीच प्रसिद्ध केली आहे.  सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  ऑस्ट्रेलियाच्या ‘संवाद आणि माध्यम प्राधिकरणा’नं या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. हे स्वागत करताना प्राधिकरणानं म्हटलं आहे : ‘ऑस्ट्रेलियामधील दोन तृतीयांश जनतेला इंटरनेटवरील काय खरं आणि काय खोटं याची जाणीव आहे. अपप्रचार आणि गैरसमज पसरवणाऱ्या बातम्यांमुळे उद्भवणारे गंभीर धोके लक्षात घेऊन त्याविरोधात सुरक्षिततेचा उपाय म्हणून डिजिटल मंचांनी स्वयंनियमनसंहिता स्वीकारण्याचं मान्य केलं आहे.’’ समाजमाध्यमांवरील खाती निष्क्रिय करणं आणि वादग्रस्त मजकूर काढून टाकण्यासारख्या काही कारवाया करण्याचं आश्वासन डिजिटल मंचांनी दिलं आहे.  हानिकारक आशयाबद्दल ऑनलाइन कंपन्यांना जबाबदार धरण्यासाठी कायदा आणण्यास ब्रिटनमधील सरकार तयार आहे. अशा प्रकारचा आशय काढून टाकण्यात अयशस्वी ठरलेल्या कंपन्यांना शिक्षा देण्याचीही त्या सरकारची तयारी आहे. प्रस्तावित ‘ऑनलाईन सुरक्षा विधेयका’चं उद्दिष्ट म्हणजे, इंटरनेट वापरकर्त्यांचं संरक्षण करणं आणि हिंसाचार, दहशतवादी मजकूर, बाल-अत्याचार, सायबर गुंडगिरी इत्यादींचा प्रसार करणाऱ्या मंचांवर कडक कारवाई करणं. त्या देशाचे ‘डिजिटल सचिव’ ऑलिव्हर डोव्हन यांनी म्हटलं आहे,‘ मी तंत्रज्ञानसमर्थक आहे हे मी निर्भयपणे सांगतो. मात्र, तंत्रज्ञान-स्वातंत्र्य हे बेछूट, अमर्याद आहे असा याचा अर्थ नाही.’’ लोकशाहीप्रणीत देशांची सध्याची मनःस्थिती कशी आहे याचंच हे द्योतक होय.  ब्रिटनमध्ये स्वनियमयाद्वारे मुद्रितमाध्यमांचं नियमन होतं आणि खासगी दूरचित्रवाणी आणि रेडिओचं नियमन कायद्याद्वारे प्रदान केला गेलेला स्वतंत्र दूरचित्रवाणी आयोग आणि रेडिओ प्राधिकरणा यांच्याद्वारे केलं जातं.  रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर या मंत्रिद्वयीनं सरकारच्या मार्गदर्शक सूचना गेल्या आठवड्यात जाहीर केल्या आहेत. हे दोघंही आता वेगळ्या अर्थानं ‘दुसऱ्या स्वातंत्रयुद्धा’चे प्रणेते आहेत हे विसरता कामा नये. कारण, या दोघांनी सत्तरच्या दशकात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीच्या विरोधात लढताना दीड वर्ष तुरुंगवास भोगला होता. परिणामी, लोकांना त्यांची राज्यघटना व लोकशाही पुन्हा प्राप्त झाली होती. म्हणूनच, मूलभूत लोकशाहीमूल्यांबद्दलची त्यांची वचनबद्धता माध्यमनियमन आणि त्याच्या धोरणांच्या आखणीवर प्रभाव पाडत राहील. शेवटी, कंपन्यांनी भारतात कोणत्या चौकटीत काम केलं पाहिजे याविषयी भाष्य करताना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘‘या कंपन्यांनी भारतीय कायद्यानुसार काम केलं पाहिजे, त्याबाबत कुठलीही तडजोड अमान्य आहे.’’  (लेखक ए. सूर्य प्रकाश हे राज्यघटना आणि संसदीय प्रणालीचे अभ्यासक आहेत.) Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 27, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/37STHYV
Read More
चुकीच्या दराचा महावितरणालाच ‘शॉक’

पिंपरी - रावेत येथील सेलेस्टीअल सिटी सोसायटी हे रहिवासी सहा वर्षांपासून वीजबिल वेळेवर भरत होते; पण लॉकडाउन काळात ‘महावितरण’ने त्यांना जोराचा धक्का दिला. १२४ सदनिकाधारकांना तब्बल सहा वर्षांनी सिंगल फेज आणि थ्री फेजच्या जोडणीचे निश्‍चित दर (फिक्स्ड चार्जेस) यामधील फरक आकारत तब्बल आठ लाखाचे बिल पाठविले. शेवटी संघटीतपणे महावितरणच्या विरोधात ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली आणि महावितरणालाच ‘शॉक’ देत आठ लाख रुपये वाचविले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बिल आकारताना सिंगल फेज आणि थ्री फेजच्या जोडणीच्या आधारावर फिक्स्ड चार्जेस ठरविले जातात. त्यासाठी नागरिकांना मीटर दिल्यानंतर त्याची महावितरणकडे नोंद केली जाते; पण नियोजनशून्य कारभारामुळे सहा वर्षांपासून या सोसायटीकडून सिंगल फेजनुसार बिल आकारले जात होते. मीटर रीडिंग घेण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील ही बाब निदर्शनास आली नव्हती. यात ग्राहकांची कोणतीही चूक नसताना अचानक महावितरणने मोठा धक्का दिला. 

पिंपरीत दुचाकी चोरट्याला अटक; चोरीच्या 4 टू व्हीलर जप्त

स्वतःच्या चुकीमुळे सहा वर्षांनी असे सामाईक दर आकारण्याचा महावितरणला अधिकार आहे का? त्यांच्या चुकीमुळे ग्राहकांना हा भुर्दंड का? असा दावा करीत सदनिकाधारक राहुल रुद्रवार व प्राजक्ता रुद्रवार या दाम्पत्याने याविषयी महावितरणमध्ये तक्रार दिली. परंतु जून २०२० मध्ये लावण्यात आलेली ही रक्कम अनेक पाठपुरावा करूनही कमी केली नाही. उलट जुने बिल दाखवत त्या रकमेवर व्याज आकारण्यात येत होते. म्हणून रुद्रवार यांनी १० नोव्हेंबर २०२० रोजी ग्राहक तक्रार निवारण मंच, पुणे यांच्याकडे याचिका दाखल केली. याचिकेच्या आधारावर मंचाने दोन्ही पक्षास सुनावणीस बोलावून बाजू समजून घेतल्या आणि निर्णय दिला.

दीड महिन्यानंतर ‘पंतप्रधान आवास’ची सोडत

दिलेला आदेश
सहा वर्षांपासून राहिलेला फरक आता ग्राहकांना लावता येणार नाही. कायद्यानुसार बिल लावलेल्या महिन्याच्या दोन वर्षे आधीपर्यंतच बिल आकारता येईल. त्यावर कुठलेही व्याज आकारता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांना आधी लावलेली रक्कम व व्याज कमी करून केवळ मागील दोन वर्षांचे बिल लावण्यात यावे. ग्राहकाला तीन हप्त्यात हे बिल भरण्याची परवानगी देण्यात यावी.

या निर्णयाबद्दल रहिवाशांनीश्यांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे १२४ ग्राहकांचे मिळून तब्बल साधारण ८ लाख वाचले आहेत.
- प्राजक्ता रुद्रवार, अध्यक्ष सेलेस्टीअल सिटी फेज १ फेडरेशन

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

चुकीच्या दराचा महावितरणालाच ‘शॉक’ पिंपरी - रावेत येथील सेलेस्टीअल सिटी सोसायटी हे रहिवासी सहा वर्षांपासून वीजबिल वेळेवर भरत होते; पण लॉकडाउन काळात ‘महावितरण’ने त्यांना जोराचा धक्का दिला. १२४ सदनिकाधारकांना तब्बल सहा वर्षांनी सिंगल फेज आणि थ्री फेजच्या जोडणीचे निश्‍चित दर (फिक्स्ड चार्जेस) यामधील फरक आकारत तब्बल आठ लाखाचे बिल पाठविले. शेवटी संघटीतपणे महावितरणच्या विरोधात ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली आणि महावितरणालाच ‘शॉक’ देत आठ लाख रुपये वाचविले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बिल आकारताना सिंगल फेज आणि थ्री फेजच्या जोडणीच्या आधारावर फिक्स्ड चार्जेस ठरविले जातात. त्यासाठी नागरिकांना मीटर दिल्यानंतर त्याची महावितरणकडे नोंद केली जाते; पण नियोजनशून्य कारभारामुळे सहा वर्षांपासून या सोसायटीकडून सिंगल फेजनुसार बिल आकारले जात होते. मीटर रीडिंग घेण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील ही बाब निदर्शनास आली नव्हती. यात ग्राहकांची कोणतीही चूक नसताना अचानक महावितरणने मोठा धक्का दिला.  पिंपरीत दुचाकी चोरट्याला अटक; चोरीच्या 4 टू व्हीलर जप्त स्वतःच्या चुकीमुळे सहा वर्षांनी असे सामाईक दर आकारण्याचा महावितरणला अधिकार आहे का? त्यांच्या चुकीमुळे ग्राहकांना हा भुर्दंड का? असा दावा करीत सदनिकाधारक राहुल रुद्रवार व प्राजक्ता रुद्रवार या दाम्पत्याने याविषयी महावितरणमध्ये तक्रार दिली. परंतु जून २०२० मध्ये लावण्यात आलेली ही रक्कम अनेक पाठपुरावा करूनही कमी केली नाही. उलट जुने बिल दाखवत त्या रकमेवर व्याज आकारण्यात येत होते. म्हणून रुद्रवार यांनी १० नोव्हेंबर २०२० रोजी ग्राहक तक्रार निवारण मंच, पुणे यांच्याकडे याचिका दाखल केली. याचिकेच्या आधारावर मंचाने दोन्ही पक्षास सुनावणीस बोलावून बाजू समजून घेतल्या आणि निर्णय दिला. दीड महिन्यानंतर ‘पंतप्रधान आवास’ची सोडत दिलेला आदेश सहा वर्षांपासून राहिलेला फरक आता ग्राहकांना लावता येणार नाही. कायद्यानुसार बिल लावलेल्या महिन्याच्या दोन वर्षे आधीपर्यंतच बिल आकारता येईल. त्यावर कुठलेही व्याज आकारता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांना आधी लावलेली रक्कम व व्याज कमी करून केवळ मागील दोन वर्षांचे बिल लावण्यात यावे. ग्राहकाला तीन हप्त्यात हे बिल भरण्याची परवानगी देण्यात यावी. या निर्णयाबद्दल रहिवाशांनीश्यांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे १२४ ग्राहकांचे मिळून तब्बल साधारण ८ लाख वाचले आहेत. - प्राजक्ता रुद्रवार, अध्यक्ष सेलेस्टीअल सिटी फेज १ फेडरेशन Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 27, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3r3lQ71
Read More
पंचतारांकित!

फॉर सम अनॲव्हॉयडेबल रीझन्स, वुई हॅव डिसायडेड नॉट टू काँटेस्ट इलेक्शन्स धिस टाइम...
प्रेस कॉन्फरन्सची सुरुवातच या वाक्यानं झाली आणि एक मोठ्ठाच फुगा फुटला!
त्या काळात प्रेस कॉन्फरन्सना, म्हणजेच पत्रकार परिषदांना, बातमीदारीच्या व्यवसायात कमालीचं महत्त्व होतं. राजकीय पक्ष असोत की कामगार संघटना असोत की सेलिब्रिटी असोत...आपला कोणताही निर्णय जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद हाच एकमेव मार्ग तेव्हा उपलब्ध असायचा. अशा त्या काळात या पत्रकार परिषदेकडे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. वर्ष होतं १९८०. काही सिनेकलावंत आणि हाय प्रोफाइल विचारवंत यांनी एकत्र येऊन ‘नॅशनॅलिस्ट पार्टी’ या नावानं एक नवा पक्ष स्थापन केल्याची घोषणा त्यापूर्वीच झाली होती. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ झालेलं जनता पक्षाचं सरकार कोसळल्यानंतर आलेलं चरणसिंग यांचं सरकारही पडलं होतं आणि मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या होत्या.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यामुळेच या नव्या पक्षाविषयी कमालीचं औत्सुक्य निर्माण झालं होतं. उमेदवारांच्या नावाची चर्चाही जोरात होती. दक्षिण मुंबईतून नानी पालखीवाला उभे राहणार, तर वांद्रे-कार्टर रोड या सिनेकलावंतांचं माहेरघर असलेल्या परिसरातून साक्षात देव आनंद उभा राहणार अशा वावड्या उठत होत्या. या पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार या अपेक्षेनं तिथं जमलेल्या असंख्य पत्रकारांचा, देव आनंद यांनी उच्चारलेल्या या वाक्यानं, कमालीचा अपेक्षाभंग झाला आणि साऱ्यांचंच लक्ष, देवसाब पुढं काय बोलतात यावरून उडून, शेजारच्याच ‘बुफे’कडे गेलं!

या बुफेकडे लक्ष जाण्याचं एकमेव कारण म्हणजे, ही प्रेस कॉन्फरन्स चर्चगेट रेल्वेस्थानकाजवळच्या बहुचर्चित अशा ‘ॲम्बॅसेडर’ या तारांकित हॉटेलमध्ये सुरू होती. ‘ॲम्बॅसेडर’मध्ये जाण्याचा योगही तेव्हा पत्रकारांच्या नशिबी क्वचितच यायचा. मग ‘गेट वे’समोरच्या ‘ताजमहाल’मध्ये जायला मिळणं हा तर कपिलाशष्टीचाच योग. ‘ॲम्बॅसेडर’ हॉटेलात पत्रकार परिषदा व्हायच्या त्या प्रामुख्यानं राम जेठमलानी यांच्याच. ‘ते हॉटेल मनू नारंग या कुख्यात तस्कराचं आहे आणि जेठमलानींनी त्याचं वकीलपत्र घेतलेलं असल्यानंच त्यांना त्या तिथं घेता येतात,’ असंही तेव्हा कानावर आलं होतं.

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

अन्यथा, मुंबईत पत्रकार परिषदा आयोजित करण्याच्या दोनच हक्काच्या जागा होत्या. एक म्हणजे, बोरीबंदर रेल्वे स्थानकासमोर आझाद मैदानाला लागून असलेलं मुंबई मराठी पत्रकार संघाचं छोटेखानी सभागृह, आणि दुसरी जागा होती, ‘बॉम्बे युनियन ऑफ जर्नालिस्ट्‍स’ - बीयूजे - या संघटनेचा ‘प्रॉस्पेक्ट चेंबर’ या ब्रिटिशकालीन जुनाट, अंधाऱ्या वास्तूत  असलेला लांबलचक हॉल. ही जागाही बोरीबंदरपासून, म्हणजेच आजच्या भाषेतील ‘सीएसएमटी’ स्थानकापासून,  आठ-दहा मिनिटं चालून गाठता येत असे. ‘खादी भांडार’च्या डायगोनली ऑपोझिट असलेल्या हॉलमध्ये पत्रकार परिषदा घेणारे बहुतेक हे डाव्या विचारांचे आणि प्रस्थापितविरोधी गटातील लोक असत, तर पत्रकार संघात मात्र सर्वधर्मसमभाव या न्यायानं कुणीही येऊन वार्ताहरबैठक घेत असे आणि अजूनही घेतात. त्याचं एक कारण म्हणजे, या सभागृहाचं भाडं अत्यल्प होतं आणि मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोरच ही वास्तू असल्यानं पालिकेतील बातमीदार तिथं सहजगत्या येऊ शकत. ‘बीयूजे’ असो की पत्रकार संघ, तिथल्या खाद्यपदार्थांचा मेनूही बहुधा सारखाच असे आणि एका पेपर डिशमध्ये एक वडा वा सामोसा, चार-सहा वेफर्स आणि एखादा बर्फीचा तुकडा एवढ्यापुरताच तो मर्यादित असे!

त्यामुळे मग देव आनंद यांनी ‘फॉर सम अनॲव्हॉयडेबल रीझन्स वुई हॅव डिसायडेड नॉट टू काँटेस्ट इलेक्शन्स धिस टाइम...’ अशी पहिल्याच वाक्यात आपल्या पत्रकार परिषदेची ‘सांगता’ केल्यानंतर वार्ताहरांचं लक्ष हे बाजूलाच लावलेल्या तारांकित बुफेकडे जाणं अपरिहार्यच म्हणावं लागतं!

बातमीदारांना त्या काळात पत्रकार संघ असो की ‘बीयूजे’ इथं नियमित जावं लागायचंच. मात्र, कधी तरी ‘ब्रिस्टोल ग्रील’ असं मॉडर्न वाटणारं नाव धारण करणाऱ्या एका छोटेखानी उपाहारगृहात जायचा योग यायचा. हे रेस्टॉरंटही खादी भांडाराला आडव्या जाणाऱ्या फिरोजशहा मेहता पथावर ‘एचएमव्ही’च्या कार्यालयासमोर होतं. नाव इंग्लिश वळणाचं असलं तरी बाज हा दाक्षिणात्यच होता आणि तेथील वेटर्सही मोठ्या अदबीनं येऊन सांबार तसंच चटणी वाढत राहायचे. तिथली दक्षिणी कॉफी हे खास आकर्षण होतं. मात्र, पुढं लक्षात आलं की बरेच पत्रकार हे त्या कॉफीऐवजी उंचाड्या ग्लासातून काहीतरी थंड पेयाचे घुटके घेत आहेत. चौकशीअंती कळलं की ती तर कोल्ड कॉफी. ‘सीसीडी’ वा ‘स्टारबक्स’ यांच्या उदयाच्या आधी कोल्ड कॉफीची चटक लावणारं ‘ब्रिस्टोल ग्रील’ पुढं काळाच्या उदरात केव्हा नाहीसं झालं ते कळलंही नाही.

मात्र, याचा अर्थ या साऱ्या पत्रकार परिषदांचं बातमीदारांना असलेलं आकर्षण निव्वळ खान-पानसेवेपोटीच असायचं असं बिलकूलच नाही. उलट सगळे पत्रकार खाण्या-पिण्यात दंग असताना, आयोजकांशी खासगी बोलून वेगळीच माहिती पदरात पाडून घेता यायची. दरवेळी त्यातून बातमी निघायचीच असं नाही; पण त्यानिमित्तानं त्या संयोजकांशी दोस्ताना निर्माण होणं आणि त्यातूनच पुढं ‘सोर्स’ तयार होणं यासाठी या वार्ताहरबैठकांचं महत्त्व फार म्हणजे फारच मोठं असायचं. मनात कायम घर करून राहिलेल्या एका पत्रकार परिषदेची कहाणी अगदीच वेगळी आहे. 

एकदा कार्यालयात गेल्यावर विचारणा झाली : ‘काय, ‘ताजमहाल’ला जायचंय का?’ एकदमच हुरळून जायला झालं. ते वर्ष होतं १९७९. ताजमहाल हॉटेल त्यापूर्वी ‘मुंबईदर्शन’साठी झालेल्या फेऱ्यात बाहेरून अनेकदा बघितलं होतं आणि त्याच्या आत काय असेल याविषयी कमालीचं कुतूहल निर्माण झालं होतं. मुख्य वार्ताहरांनी हातात एक छोटेखानी आमंत्रण ठेवलं. त्या आवतणाच्या खाली लफ्फेदार सही होती : लता मंगेशकर! लंडनच्या सुविख्यात रॉयल आल्बर्ट हॉलमध्ये कार्यक्रम होता आणि त्याची माहिती साक्षात् गानसम्राज्ञी देणार होती! हा तर दुग्ध-शर्करा की काय म्हणतात, तसलाच योग होता...

आणखी एक योग म्हणजे, ‘ताज’च्या ‘प्रिन्सेस रूम’मध्येच ही वार्ताहरबैठक होती! एकाच फटक्यात ‘ताजमहाल’ आणि लताबाई असं दोहोंचं दर्शन होऊ घातलं होतं. पत्रकार परिषद झाली. बातमीही दिली...पण लक्षात आलं ते एवढंच, की ताजमहाल हॉटेलपेक्षाही लताबाईंची ऐट अगदीच आगळीवेगळी आहे...

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

पंचतारांकित! फॉर सम अनॲव्हॉयडेबल रीझन्स, वुई हॅव डिसायडेड नॉट टू काँटेस्ट इलेक्शन्स धिस टाइम... प्रेस कॉन्फरन्सची सुरुवातच या वाक्यानं झाली आणि एक मोठ्ठाच फुगा फुटला! त्या काळात प्रेस कॉन्फरन्सना, म्हणजेच पत्रकार परिषदांना, बातमीदारीच्या व्यवसायात कमालीचं महत्त्व होतं. राजकीय पक्ष असोत की कामगार संघटना असोत की सेलिब्रिटी असोत...आपला कोणताही निर्णय जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद हाच एकमेव मार्ग तेव्हा उपलब्ध असायचा. अशा त्या काळात या पत्रकार परिषदेकडे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. वर्ष होतं १९८०. काही सिनेकलावंत आणि हाय प्रोफाइल विचारवंत यांनी एकत्र येऊन ‘नॅशनॅलिस्ट पार्टी’ या नावानं एक नवा पक्ष स्थापन केल्याची घोषणा त्यापूर्वीच झाली होती. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ झालेलं जनता पक्षाचं सरकार कोसळल्यानंतर आलेलं चरणसिंग यांचं सरकारही पडलं होतं आणि मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्यामुळेच या नव्या पक्षाविषयी कमालीचं औत्सुक्य निर्माण झालं होतं. उमेदवारांच्या नावाची चर्चाही जोरात होती. दक्षिण मुंबईतून नानी पालखीवाला उभे राहणार, तर वांद्रे-कार्टर रोड या सिनेकलावंतांचं माहेरघर असलेल्या परिसरातून साक्षात देव आनंद उभा राहणार अशा वावड्या उठत होत्या. या पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार या अपेक्षेनं तिथं जमलेल्या असंख्य पत्रकारांचा, देव आनंद यांनी उच्चारलेल्या या वाक्यानं, कमालीचा अपेक्षाभंग झाला आणि साऱ्यांचंच लक्ष, देवसाब पुढं काय बोलतात यावरून उडून, शेजारच्याच ‘बुफे’कडे गेलं! या बुफेकडे लक्ष जाण्याचं एकमेव कारण म्हणजे, ही प्रेस कॉन्फरन्स चर्चगेट रेल्वेस्थानकाजवळच्या बहुचर्चित अशा ‘ॲम्बॅसेडर’ या तारांकित हॉटेलमध्ये सुरू होती. ‘ॲम्बॅसेडर’मध्ये जाण्याचा योगही तेव्हा पत्रकारांच्या नशिबी क्वचितच यायचा. मग ‘गेट वे’समोरच्या ‘ताजमहाल’मध्ये जायला मिळणं हा तर कपिलाशष्टीचाच योग. ‘ॲम्बॅसेडर’ हॉटेलात पत्रकार परिषदा व्हायच्या त्या प्रामुख्यानं राम जेठमलानी यांच्याच. ‘ते हॉटेल मनू नारंग या कुख्यात तस्कराचं आहे आणि जेठमलानींनी त्याचं वकीलपत्र घेतलेलं असल्यानंच त्यांना त्या तिथं घेता येतात,’ असंही तेव्हा कानावर आलं होतं. सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  अन्यथा, मुंबईत पत्रकार परिषदा आयोजित करण्याच्या दोनच हक्काच्या जागा होत्या. एक म्हणजे, बोरीबंदर रेल्वे स्थानकासमोर आझाद मैदानाला लागून असलेलं मुंबई मराठी पत्रकार संघाचं छोटेखानी सभागृह, आणि दुसरी जागा होती, ‘बॉम्बे युनियन ऑफ जर्नालिस्ट्‍स’ - बीयूजे - या संघटनेचा ‘प्रॉस्पेक्ट चेंबर’ या ब्रिटिशकालीन जुनाट, अंधाऱ्या वास्तूत  असलेला लांबलचक हॉल. ही जागाही बोरीबंदरपासून, म्हणजेच आजच्या भाषेतील ‘सीएसएमटी’ स्थानकापासून,  आठ-दहा मिनिटं चालून गाठता येत असे. ‘खादी भांडार’च्या डायगोनली ऑपोझिट असलेल्या हॉलमध्ये पत्रकार परिषदा घेणारे बहुतेक हे डाव्या विचारांचे आणि प्रस्थापितविरोधी गटातील लोक असत, तर पत्रकार संघात मात्र सर्वधर्मसमभाव या न्यायानं कुणीही येऊन वार्ताहरबैठक घेत असे आणि अजूनही घेतात. त्याचं एक कारण म्हणजे, या सभागृहाचं भाडं अत्यल्प होतं आणि मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोरच ही वास्तू असल्यानं पालिकेतील बातमीदार तिथं सहजगत्या येऊ शकत. ‘बीयूजे’ असो की पत्रकार संघ, तिथल्या खाद्यपदार्थांचा मेनूही बहुधा सारखाच असे आणि एका पेपर डिशमध्ये एक वडा वा सामोसा, चार-सहा वेफर्स आणि एखादा बर्फीचा तुकडा एवढ्यापुरताच तो मर्यादित असे! त्यामुळे मग देव आनंद यांनी ‘फॉर सम अनॲव्हॉयडेबल रीझन्स वुई हॅव डिसायडेड नॉट टू काँटेस्ट इलेक्शन्स धिस टाइम...’ अशी पहिल्याच वाक्यात आपल्या पत्रकार परिषदेची ‘सांगता’ केल्यानंतर वार्ताहरांचं लक्ष हे बाजूलाच लावलेल्या तारांकित बुफेकडे जाणं अपरिहार्यच म्हणावं लागतं! बातमीदारांना त्या काळात पत्रकार संघ असो की ‘बीयूजे’ इथं नियमित जावं लागायचंच. मात्र, कधी तरी ‘ब्रिस्टोल ग्रील’ असं मॉडर्न वाटणारं नाव धारण करणाऱ्या एका छोटेखानी उपाहारगृहात जायचा योग यायचा. हे रेस्टॉरंटही खादी भांडाराला आडव्या जाणाऱ्या फिरोजशहा मेहता पथावर ‘एचएमव्ही’च्या कार्यालयासमोर होतं. नाव इंग्लिश वळणाचं असलं तरी बाज हा दाक्षिणात्यच होता आणि तेथील वेटर्सही मोठ्या अदबीनं येऊन सांबार तसंच चटणी वाढत राहायचे. तिथली दक्षिणी कॉफी हे खास आकर्षण होतं. मात्र, पुढं लक्षात आलं की बरेच पत्रकार हे त्या कॉफीऐवजी उंचाड्या ग्लासातून काहीतरी थंड पेयाचे घुटके घेत आहेत. चौकशीअंती कळलं की ती तर कोल्ड कॉफी. ‘सीसीडी’ वा ‘स्टारबक्स’ यांच्या उदयाच्या आधी कोल्ड कॉफीची चटक लावणारं ‘ब्रिस्टोल ग्रील’ पुढं काळाच्या उदरात केव्हा नाहीसं झालं ते कळलंही नाही. मात्र, याचा अर्थ या साऱ्या पत्रकार परिषदांचं बातमीदारांना असलेलं आकर्षण निव्वळ खान-पानसेवेपोटीच असायचं असं बिलकूलच नाही. उलट सगळे पत्रकार खाण्या-पिण्यात दंग असताना, आयोजकांशी खासगी बोलून वेगळीच माहिती पदरात पाडून घेता यायची. दरवेळी त्यातून बातमी निघायचीच असं नाही; पण त्यानिमित्तानं त्या संयोजकांशी दोस्ताना निर्माण होणं आणि त्यातूनच पुढं ‘सोर्स’ तयार होणं यासाठी या वार्ताहरबैठकांचं महत्त्व फार म्हणजे फारच मोठं असायचं. मनात कायम घर करून राहिलेल्या एका पत्रकार परिषदेची कहाणी अगदीच वेगळी आहे.  एकदा कार्यालयात गेल्यावर विचारणा झाली : ‘काय, ‘ताजमहाल’ला जायचंय का?’ एकदमच हुरळून जायला झालं. ते वर्ष होतं १९७९. ताजमहाल हॉटेल त्यापूर्वी ‘मुंबईदर्शन’साठी झालेल्या फेऱ्यात बाहेरून अनेकदा बघितलं होतं आणि त्याच्या आत काय असेल याविषयी कमालीचं कुतूहल निर्माण झालं होतं. मुख्य वार्ताहरांनी हातात एक छोटेखानी आमंत्रण ठेवलं. त्या आवतणाच्या खाली लफ्फेदार सही होती : लता मंगेशकर! लंडनच्या सुविख्यात रॉयल आल्बर्ट हॉलमध्ये कार्यक्रम होता आणि त्याची माहिती साक्षात् गानसम्राज्ञी देणार होती! हा तर दुग्ध-शर्करा की काय म्हणतात, तसलाच योग होता... आणखी एक योग म्हणजे, ‘ताज’च्या ‘प्रिन्सेस रूम’मध्येच ही वार्ताहरबैठक होती! एकाच फटक्यात ‘ताजमहाल’ आणि लताबाई असं दोहोंचं दर्शन होऊ घातलं होतं. पत्रकार परिषद झाली. बातमीही दिली...पण लक्षात आलं ते एवढंच, की ताजमहाल हॉटेलपेक्षाही लताबाईंची ऐट अगदीच आगळीवेगळी आहे... Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 27, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3r88MgY
Read More
बापरे! पिंपरी-चिंचवडमधील बारा पोलिस ठाण्यांमध्ये तब्बल एवढ्या कोटींचा मुद्देमाल पडून

पिंपरी - जप्त केलेला मुद्देमाल तक्रारदाराला लवकर परत मिळणे म्हणजे कठीणच. वाहन अथवा इतर वस्तुसारखा मुद्देमाल पोलिस ठाण्यातच अक्षरशः सडून जातो. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे संबंधित व्यक्तीच्या हाती पडत नाही. अशाच प्रकारे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील १२ पोलिस ठाण्यात सध्या तब्बल २४ कोटी ६१ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल पडून आहे. 

वाहनांचा ढीग 
पोलिस ठाणे म्हटले की गंजलेली, धूळखात पडलेली वाहने दृष्टीस पडतात. गुन्ह्यांमध्ये पोलिस शेकडो वाहने जप्त करतात. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे व बेवारस वाहनाचे मालक मिळत नसल्याने ही वाहने वर्षानुवर्षे पोलिस ठाण्याच्या आवारात धूळखात पडून असतात. त्यामुळे तेथे  बकालपणा येतो. सुशोभीकरणालाही बाधा येते. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एक कोटीचा मुद्देमाल दिला परत
वाकड पोलिस विभागाने एक कोटींचा मुद्देमाल मूळ मालकाला परत दिला. वाकड, हिंजवडी, सांगवी हद्दीतील चोरीला गेलेले सोन्याचे दागिने, मोबाईल, वाहने व रोकड यांचा शोध पोलिसांनी घेतला. यामध्ये मागील वीस वर्षांपासून दाखल असलेल्या गुन्ह्यातील ऐवजाचा समावेश होता. या उपक्रमांतर्गत ४९ गुन्ह्यांतील एक कोटी ४८ हजार ५९६ रुपयांचा ऐवज परत देण्यात आला. 

पिंपरीत दुचाकी चोरट्याला अटक; चोरीच्या 4 टू व्हीलर जप्त

आगीच्या घटना 
पोलिस ठाण्याच्या आवारातील वाहनांना आग लागल्याच्या दोन घटना मागील महिनाभरात घडल्या आहेत. यामुळे ठाण्याच्या आवारात धोकादायक परिस्थिती निर्माण होते.

दीड महिन्यानंतर ‘पंतप्रधान आवास’ची सोडत

या कायद्याचा घेऊ शकतात आधार
गुन्ह्यातील सापडलेला फिर्यादीचा मुद्देमाल सुरक्षित ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्यास सीआरपीसी १०२ (३) अंर्तगत तो मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ मालकाला परत देण्याचा अधिकार पोलिसांना आहे. या कायद्याचा आधार घेत पोलिस तो मुद्देमाल परत करू शकतात. मात्र, पोलिसांच्या उदासीनतेमुळे मुद्देमाल परत देण्यास मुहूर्त लागत नाही.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

बापरे! पिंपरी-चिंचवडमधील बारा पोलिस ठाण्यांमध्ये तब्बल एवढ्या कोटींचा मुद्देमाल पडून पिंपरी - जप्त केलेला मुद्देमाल तक्रारदाराला लवकर परत मिळणे म्हणजे कठीणच. वाहन अथवा इतर वस्तुसारखा मुद्देमाल पोलिस ठाण्यातच अक्षरशः सडून जातो. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे संबंधित व्यक्तीच्या हाती पडत नाही. अशाच प्रकारे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील १२ पोलिस ठाण्यात सध्या तब्बल २४ कोटी ६१ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल पडून आहे.  वाहनांचा ढीग  पोलिस ठाणे म्हटले की गंजलेली, धूळखात पडलेली वाहने दृष्टीस पडतात. गुन्ह्यांमध्ये पोलिस शेकडो वाहने जप्त करतात. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे व बेवारस वाहनाचे मालक मिळत नसल्याने ही वाहने वर्षानुवर्षे पोलिस ठाण्याच्या आवारात धूळखात पडून असतात. त्यामुळे तेथे  बकालपणा येतो. सुशोभीकरणालाही बाधा येते.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा एक कोटीचा मुद्देमाल दिला परत वाकड पोलिस विभागाने एक कोटींचा मुद्देमाल मूळ मालकाला परत दिला. वाकड, हिंजवडी, सांगवी हद्दीतील चोरीला गेलेले सोन्याचे दागिने, मोबाईल, वाहने व रोकड यांचा शोध पोलिसांनी घेतला. यामध्ये मागील वीस वर्षांपासून दाखल असलेल्या गुन्ह्यातील ऐवजाचा समावेश होता. या उपक्रमांतर्गत ४९ गुन्ह्यांतील एक कोटी ४८ हजार ५९६ रुपयांचा ऐवज परत देण्यात आला.  पिंपरीत दुचाकी चोरट्याला अटक; चोरीच्या 4 टू व्हीलर जप्त आगीच्या घटना  पोलिस ठाण्याच्या आवारातील वाहनांना आग लागल्याच्या दोन घटना मागील महिनाभरात घडल्या आहेत. यामुळे ठाण्याच्या आवारात धोकादायक परिस्थिती निर्माण होते. दीड महिन्यानंतर ‘पंतप्रधान आवास’ची सोडत या कायद्याचा घेऊ शकतात आधार गुन्ह्यातील सापडलेला फिर्यादीचा मुद्देमाल सुरक्षित ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्यास सीआरपीसी १०२ (३) अंर्तगत तो मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ मालकाला परत देण्याचा अधिकार पोलिसांना आहे. या कायद्याचा आधार घेत पोलिस तो मुद्देमाल परत करू शकतात. मात्र, पोलिसांच्या उदासीनतेमुळे मुद्देमाल परत देण्यास मुहूर्त लागत नाही. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 27, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2MuYR5O
Read More
सागरी सुरक्षेबरोबरच विकासावर भर हवा - डॉ. अशोक खोसला

पुणे - ‘समुद्र संपूर्ण जगाला एकमेकांशी जोडतो. जगभरातील व्यापार आणि वाहतूक ही प्रामुख्याने सागरी मार्गावरून होते. इतकेच नाही तर सागरी जैवविविधता, संसाधने ही देखील मनुष्यासाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे सागरी सुरक्षेबरोबरच सागरी शाश्वत विकासावर देखील भर द्यायला हवा,’ असे प्रतिपादन इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (IUCN) संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक खोसला यांनी केले. अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस या विषयात काम करणाऱ्या पुण्यातील मेरिटाईम रिसर्च सेंटर (एमआरसी) व नीरध्वनी टेक्नॉलॉजी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मेरिटाईम रिसर्च सेंटरच्या वतीने ‘इंडो पॅसिफीक स्ट्रॅटेजिक स्पेस ॲण्ड सस्टेनेबल ब्लू फ्रँटियर्स-अ न्यू परस्पेक्टिव्ह बेस्ड ऑन दी युडीए’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतीय तटरक्षक दलाचे माजी महासंचालक व्हाइस ॲडमिरल (निवृत्त) अनुराग थापलीया, जपानच्या टोकियो विद्यापीठाचे प्रो. तामाकी उरा, मेरिटाईम रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. (कमांडर) अर्नब दास, सल्लागार प्रफुल्ल तलेरा आदी उपस्थित होते.

मोफत ऑनलाइन सैन्य, पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण; अर्जाची प्रक्रिया सुरु

डॉ. खोसला म्हणाले, ‘‘सागराचा विचार केल्यास आपल्यासमोर प्रामुख्याने सामरिक, आर्थिक, पर्यावरण व संसाधनांशी संबंधित आव्हाने आहेत. मात्र सागराचा आपल्याला होणारा उपयोग पाहता त्याच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने आपण काहीच करीत नाही ही चिंतेची बाब आहे. समुद्राचे वाढते आम्लीकरण, वितळणारे हिमनग, वाढती सागरी पातळी, प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण यावर उपाय शोधणे महत्त्वाचे आहे. समुद्र ही पृथ्वीची फुफ्फुसे आहेत, त्यांद्वारे वातावरणातील ऑक्सिजन, कार्बनडाय ऑक्साईड संतुलन राहतो, फ्रेशवॉटर सायकलमध्ये ते महत्त्वाचा भाग पार पाडतात हे लक्षात घेत सागराचा नैसर्गिक व शाश्वत विकास करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.’

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

सागरी सुरक्षेबरोबरच विकासावर भर हवा - डॉ. अशोक खोसला पुणे - ‘समुद्र संपूर्ण जगाला एकमेकांशी जोडतो. जगभरातील व्यापार आणि वाहतूक ही प्रामुख्याने सागरी मार्गावरून होते. इतकेच नाही तर सागरी जैवविविधता, संसाधने ही देखील मनुष्यासाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे सागरी सुरक्षेबरोबरच सागरी शाश्वत विकासावर देखील भर द्यायला हवा,’ असे प्रतिपादन इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (IUCN) संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक खोसला यांनी केले. अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस या विषयात काम करणाऱ्या पुण्यातील मेरिटाईम रिसर्च सेंटर (एमआरसी) व नीरध्वनी टेक्नॉलॉजी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मेरिटाईम रिसर्च सेंटरच्या वतीने ‘इंडो पॅसिफीक स्ट्रॅटेजिक स्पेस ॲण्ड सस्टेनेबल ब्लू फ्रँटियर्स-अ न्यू परस्पेक्टिव्ह बेस्ड ऑन दी युडीए’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतीय तटरक्षक दलाचे माजी महासंचालक व्हाइस ॲडमिरल (निवृत्त) अनुराग थापलीया, जपानच्या टोकियो विद्यापीठाचे प्रो. तामाकी उरा, मेरिटाईम रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. (कमांडर) अर्नब दास, सल्लागार प्रफुल्ल तलेरा आदी उपस्थित होते. मोफत ऑनलाइन सैन्य, पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण; अर्जाची प्रक्रिया सुरु डॉ. खोसला म्हणाले, ‘‘सागराचा विचार केल्यास आपल्यासमोर प्रामुख्याने सामरिक, आर्थिक, पर्यावरण व संसाधनांशी संबंधित आव्हाने आहेत. मात्र सागराचा आपल्याला होणारा उपयोग पाहता त्याच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने आपण काहीच करीत नाही ही चिंतेची बाब आहे. समुद्राचे वाढते आम्लीकरण, वितळणारे हिमनग, वाढती सागरी पातळी, प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण यावर उपाय शोधणे महत्त्वाचे आहे. समुद्र ही पृथ्वीची फुफ्फुसे आहेत, त्यांद्वारे वातावरणातील ऑक्सिजन, कार्बनडाय ऑक्साईड संतुलन राहतो, फ्रेशवॉटर सायकलमध्ये ते महत्त्वाचा भाग पार पाडतात हे लक्षात घेत सागराचा नैसर्गिक व शाश्वत विकास करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.’ Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 27, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2O2bd5T
Read More
चौसठी योगिनी : स्त्रीशक्तीचं प्रतीक

नजर जाईल तिथवर हिरवीगार भातशेती पसरलेली. एका बाजूला पाण्यानं काठोकाठ भरलेलं तळं, तळ्याच्या मधोमध एक मंदिर. तळ्याच्या काठावर सतत सळसळणारा एक पुरातन पिंपळ. एका बाजूला दहा-बारा घरं, काही कौलारू, तर काही गवतानं शाकारलेली. घरांच्या भिंती शेणानं सारवलेल्या आणि त्यांवर तांदळाच्या पिठानं अंगठ्यांचे ठसे वापरून चित्रं रंगवलेली. अगदी जुन्या गोष्टींच्या पुस्तकातल्या चित्रात असावा तसा देखणा गाव...हिरापूर. निसर्गसौंदर्यानं नटलेल्या ओडिशा राज्यातल्या अनेक खेड्यांपैकी एक छोटंसं खेडं. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून हिरापूर जेमतेम २५ किलोमीटरवर आहे. गाडीनं एका तासात पोचता येतं. मी हिरापूरला जायचं मुख्य कारण म्हणजे तिथलं योगिनीमंदिर. ‘चौसठी जोगिनीमंदिर’ म्हणून ओळखलं जाणारं हे मंदिर अगदी आगळंवेगळं आहे.

भारतात चौसष्ट योगिनीमंदिरं खूप कमी अढळतात. मध्य प्रदेशात खजुराहो आणि जबलपूर इथली योगिनीमंदिरं आणि ओडिशामधली हिरापूर आणि बोलांगीरजवळच्या राणीपूर इथं अशी मंदिरं आहेत. साधारणतः आठव्या त्या दहाव्या शतकाच्या दरम्यान मध्य आणि उत्तर भारतात शाक्त पंथ खूप लोकप्रिय होता. त्या काळात बांधलेली ही मंदिरं आहेत. योगिनीमंदिरांचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, ही मंदिरं वर्तुळाकार असतात आणि त्यांना छप्पर नसतं. आपल्याकडे स्थापत्यशास्त्राच्या प्राचीन ग्रंथामधून मंदिरांची वर्तुळाकार रचना नोंदली गेली आहे; पण प्रत्यक्षात मात्र ‘योगिनी’मंदिरं वगळली तर वर्तुळाकार मंदिरं फारशी कुठं दिसत नाहीत. मग योगिनीमंदिरांसाठीच हा आकार का वापरला गेला?

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तज्ज्ञांचं असं मत आहे की, वर्तुळ हे अव्यक्त अशा पूर्ण शक्तीचं प्रतीक आहे. स्त्रीच्या गर्भाशयाचं प्रतीक, सृजनाचं प्रतीक आणि सर्व लयाला गेल्यानंतर उरणाऱ्या शून्याचंही प्रतीक. वर्तुळ कुठून सुरू होतं आणि कुठं संपतं ते सांगता येत नाही, म्हणूनच योगिनींची म्हणजे स्त्रीशक्तीची उपासना करण्यासाठी वर्तुळाहून चांगली रचना कुठली असेल? 

हिरापूर इथलं चौसष्ट योगिनीमंदिर हेही वर्तुळाकार आहे आणि तिथल्याच वालुकाश्माच्या शिळा एकावर एक रचून ते घडवलेलं आहे. मंदिरात प्रवेश करायला वर्तुळातून बाहेर आलेलं चिंचोळं प्रवेशद्वार आहे आणि मंदिरावर छप्पर नसलं तरी प्रवेशद्वार मात्र वरून बंदिस्त आहे. मंदिराच्या मधोमध एक चौकोनी चंडीमंडप आहे आणि त्याची उंची मंदिराच्या भिंतींपेक्षा जास्त आहे. उंचावरून छायाचित्र घेतलं तर पूर्ण मंदिर एखाद्या शिवलिंगासारखं दिसेल. मंदिराच्या दर्शनी भागावर आठ स्त्रीमूर्ती कोरलेल्या आहेत. 

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

मुख्य मंदिराची घडण वालुकाश्मात असली तरी हिरापूरच्या मंदिरातल्या सर्व योगिनीमूर्ती मात्र काळ्या गंडकी पाषाणात घडवलेल्या आहेत. मंदिराच्या गोलाकार भिंतीवर जमिनीपासून तीन फुटांवर सुबक कोनाडे केलेले आहेत आणि प्रत्येक कोनाड्यात एक अशा योगिनींच्या मूर्ती आहेत. मधोमध चामुंडेश्वरीची मोठी आराध्यमूर्ती आहे; पण सध्या ती मूर्ती पूजेत असल्यामुळे, भरजरी वस्त्रांनी झाकून टाकलेली आहे. 

योगिनींच्या मूर्ती अत्यंत सुरेख आणि सालंकृत आहेत. पायात पैंजण, गळ्यात कंठा आणि इतर आभूषणं, हातात कंकणं, कंबरपट्टा, कानातली इत्यादी अनेक अलंकार योगिनींच्या मूर्तींवर आहेत. प्रत्येकीचा केशकलाप वेगळ्या पद्धतीचा आहे आणि केसात अनेक आभूषणं आहेत. प्रत्येक योगिनीच्या पायाखाली तिचं वाहन आहे. काही योगिनींनी अलंकार म्हणून सर्प किंवा मानवी मुंडकीदेखील परिधान केलेली आहेत. काही योगिनी द्विभुज आहेत, तर काही चतुर्भुज आणि अष्टभुजदेखील आहेत. मूर्ती छोट्याशाच आहेत; पण अतिशय नाजूक आणि प्रमाणबद्ध आहेत. त्यांचे विविध विभ्रम शिल्पकारांनी खूप सुंदररीत्या पाषाणात कोरून ठेवलेले आहेत. एक योगिनी एक पाय वर उचलून स्वतःचे पैंजण बसवत आहे, तर एक योगिनी हातातील धनुष्यबाण ताणून शिकारीच्या पवित्र्यात उभी आहे. एक आहे ती वैनायकी, म्हणजे श्रीगणेशाची शक्ती, तर एक आहे चामुंडेच्या स्वरूपातली, भयावह, अत्यंत कृश देह, गाल बसलेले, बरगड्यांच्या फासळ्या बाहेर आलेल्या, बटबटीत मोठे डोळे आणि चेहऱ्यावर हास्य अशी आहे.  रौद्र, बीभत्सपासून ते लावण्यवती अशा सर्व रूपांमधल्या योगिनींची शिल्पं हिरापूरच्या मंदिरात आहेत. 

हे मंदिर नवव्या शतकात भौम वंशाच्या हिरा नावाच्या राणीनं बांधून घेतलं. हे गावही तिनंच वसवलं म्हणून त्याला हिरापूर असं नाव दिलं गेलं आहे. पढं ‘काळा पहाड’ नावाच्या बंगालमधल्या मुसलमान सेनापतीनं ओडिशावर स्वारी करून इथली बरीच मंदिरं, शिल्पं उद्ध्वस्त केली. त्याच्या सैनिकांची वक्रदृष्टी या मंदिरावरही पडली. आज हिरापूरच्या मंदिरातल्या एकूण एक योगिनीमूर्ती उद्ध्वस्तावस्थेत आहेत. काहींचे हात-पाय तुटलेले, काहींचे चेहरे विद्रूप केले गेलेले, काहींच्या छातीवर घाव घातलेले; पण तरीही मूळच्या मूर्तींचं सौंदर्य आणि शक्ती लपत नाही. 

या चौसष्ट योगिनी या शाक्त संप्रदायाच्या देवता. रक्तबीज या दैत्याच्या निर्दालनासाठी देवीनं युद्ध केलं; पण त्या दैत्याला असा वर होता की, त्याच्या रक्ताचा एक थेंबही जमिनीवर सांडला तर त्यातून नवीन दैत्य निर्माण होईल. तेव्हा त्याचं रक्त पिण्यासाठी म्हणून देवीनं चौसष्ट शक्ती निर्माण केल्या व त्यांच्या मदतीनं रक्तबीजाचा वध केला अशी पुराणकथा आहे. 

पण योगिनी म्हणजे स्त्रीशक्ती. सृजनाची शक्ती निसर्गानं स्त्रीला बहाल केलेली आहे, त्यामुळेच अगदी आदिम काळापासून आपल्याकडे मातृशक्तीची उपासना केली गेली, अगदी सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या काळापासून भारतात याबाबतचे पुरावे सापडतात. अनादी कालापासून आपल्याकडे ‘स्त्री म्हणजे शक्ती आणि शक्ती म्हणजे स्त्री’ असं समीकरण चालत आलं आहे, म्हणूनच मूर्तिशास्त्रानुसार कोणत्याही देवाची शक्ती दाखवताना ती स्त्रीमूर्तीच्याच स्वरूपात दाखवली जाते. 

विद्या दहेजिया यांनी आपल्या पुस्तकात, योगिनीमंदिरं बिनछपराची का असतात याचा उलगडा करताना लिहिलं आहे, की शक्ती ही अमर्याद असते, तिला आपण बांधून ठेवू शकत नाही आणि योगिनी या आभाळात मुक्त संचार करू शकणाऱ्या देवता असतात म्हणून त्यांची मंदिरं वरून उघडी असतात, त्यांच्यावर छप्पर नसतं. 

एक गूढ, वेगळा अनुभव घेण्यासाठी आणि स्त्रीशक्तीला वंदन करण्यासाठी तरी ओडिशामधल्या या सुंदर मंदिरात जायलाच हवं. 
(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

चौसठी योगिनी : स्त्रीशक्तीचं प्रतीक नजर जाईल तिथवर हिरवीगार भातशेती पसरलेली. एका बाजूला पाण्यानं काठोकाठ भरलेलं तळं, तळ्याच्या मधोमध एक मंदिर. तळ्याच्या काठावर सतत सळसळणारा एक पुरातन पिंपळ. एका बाजूला दहा-बारा घरं, काही कौलारू, तर काही गवतानं शाकारलेली. घरांच्या भिंती शेणानं सारवलेल्या आणि त्यांवर तांदळाच्या पिठानं अंगठ्यांचे ठसे वापरून चित्रं रंगवलेली. अगदी जुन्या गोष्टींच्या पुस्तकातल्या चित्रात असावा तसा देखणा गाव...हिरापूर. निसर्गसौंदर्यानं नटलेल्या ओडिशा राज्यातल्या अनेक खेड्यांपैकी एक छोटंसं खेडं. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून हिरापूर जेमतेम २५ किलोमीटरवर आहे. गाडीनं एका तासात पोचता येतं. मी हिरापूरला जायचं मुख्य कारण म्हणजे तिथलं योगिनीमंदिर. ‘चौसठी जोगिनीमंदिर’ म्हणून ओळखलं जाणारं हे मंदिर अगदी आगळंवेगळं आहे. भारतात चौसष्ट योगिनीमंदिरं खूप कमी अढळतात. मध्य प्रदेशात खजुराहो आणि जबलपूर इथली योगिनीमंदिरं आणि ओडिशामधली हिरापूर आणि बोलांगीरजवळच्या राणीपूर इथं अशी मंदिरं आहेत. साधारणतः आठव्या त्या दहाव्या शतकाच्या दरम्यान मध्य आणि उत्तर भारतात शाक्त पंथ खूप लोकप्रिय होता. त्या काळात बांधलेली ही मंदिरं आहेत. योगिनीमंदिरांचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, ही मंदिरं वर्तुळाकार असतात आणि त्यांना छप्पर नसतं. आपल्याकडे स्थापत्यशास्त्राच्या प्राचीन ग्रंथामधून मंदिरांची वर्तुळाकार रचना नोंदली गेली आहे; पण प्रत्यक्षात मात्र ‘योगिनी’मंदिरं वगळली तर वर्तुळाकार मंदिरं फारशी कुठं दिसत नाहीत. मग योगिनीमंदिरांसाठीच हा आकार का वापरला गेला? - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप तज्ज्ञांचं असं मत आहे की, वर्तुळ हे अव्यक्त अशा पूर्ण शक्तीचं प्रतीक आहे. स्त्रीच्या गर्भाशयाचं प्रतीक, सृजनाचं प्रतीक आणि सर्व लयाला गेल्यानंतर उरणाऱ्या शून्याचंही प्रतीक. वर्तुळ कुठून सुरू होतं आणि कुठं संपतं ते सांगता येत नाही, म्हणूनच योगिनींची म्हणजे स्त्रीशक्तीची उपासना करण्यासाठी वर्तुळाहून चांगली रचना कुठली असेल?  हिरापूर इथलं चौसष्ट योगिनीमंदिर हेही वर्तुळाकार आहे आणि तिथल्याच वालुकाश्माच्या शिळा एकावर एक रचून ते घडवलेलं आहे. मंदिरात प्रवेश करायला वर्तुळातून बाहेर आलेलं चिंचोळं प्रवेशद्वार आहे आणि मंदिरावर छप्पर नसलं तरी प्रवेशद्वार मात्र वरून बंदिस्त आहे. मंदिराच्या मधोमध एक चौकोनी चंडीमंडप आहे आणि त्याची उंची मंदिराच्या भिंतींपेक्षा जास्त आहे. उंचावरून छायाचित्र घेतलं तर पूर्ण मंदिर एखाद्या शिवलिंगासारखं दिसेल. मंदिराच्या दर्शनी भागावर आठ स्त्रीमूर्ती कोरलेल्या आहेत.  सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  मुख्य मंदिराची घडण वालुकाश्मात असली तरी हिरापूरच्या मंदिरातल्या सर्व योगिनीमूर्ती मात्र काळ्या गंडकी पाषाणात घडवलेल्या आहेत. मंदिराच्या गोलाकार भिंतीवर जमिनीपासून तीन फुटांवर सुबक कोनाडे केलेले आहेत आणि प्रत्येक कोनाड्यात एक अशा योगिनींच्या मूर्ती आहेत. मधोमध चामुंडेश्वरीची मोठी आराध्यमूर्ती आहे; पण सध्या ती मूर्ती पूजेत असल्यामुळे, भरजरी वस्त्रांनी झाकून टाकलेली आहे.  योगिनींच्या मूर्ती अत्यंत सुरेख आणि सालंकृत आहेत. पायात पैंजण, गळ्यात कंठा आणि इतर आभूषणं, हातात कंकणं, कंबरपट्टा, कानातली इत्यादी अनेक अलंकार योगिनींच्या मूर्तींवर आहेत. प्रत्येकीचा केशकलाप वेगळ्या पद्धतीचा आहे आणि केसात अनेक आभूषणं आहेत. प्रत्येक योगिनीच्या पायाखाली तिचं वाहन आहे. काही योगिनींनी अलंकार म्हणून सर्प किंवा मानवी मुंडकीदेखील परिधान केलेली आहेत. काही योगिनी द्विभुज आहेत, तर काही चतुर्भुज आणि अष्टभुजदेखील आहेत. मूर्ती छोट्याशाच आहेत; पण अतिशय नाजूक आणि प्रमाणबद्ध आहेत. त्यांचे विविध विभ्रम शिल्पकारांनी खूप सुंदररीत्या पाषाणात कोरून ठेवलेले आहेत. एक योगिनी एक पाय वर उचलून स्वतःचे पैंजण बसवत आहे, तर एक योगिनी हातातील धनुष्यबाण ताणून शिकारीच्या पवित्र्यात उभी आहे. एक आहे ती वैनायकी, म्हणजे श्रीगणेशाची शक्ती, तर एक आहे चामुंडेच्या स्वरूपातली, भयावह, अत्यंत कृश देह, गाल बसलेले, बरगड्यांच्या फासळ्या बाहेर आलेल्या, बटबटीत मोठे डोळे आणि चेहऱ्यावर हास्य अशी आहे.  रौद्र, बीभत्सपासून ते लावण्यवती अशा सर्व रूपांमधल्या योगिनींची शिल्पं हिरापूरच्या मंदिरात आहेत.  हे मंदिर नवव्या शतकात भौम वंशाच्या हिरा नावाच्या राणीनं बांधून घेतलं. हे गावही तिनंच वसवलं म्हणून त्याला हिरापूर असं नाव दिलं गेलं आहे. पढं ‘काळा पहाड’ नावाच्या बंगालमधल्या मुसलमान सेनापतीनं ओडिशावर स्वारी करून इथली बरीच मंदिरं, शिल्पं उद्ध्वस्त केली. त्याच्या सैनिकांची वक्रदृष्टी या मंदिरावरही पडली. आज हिरापूरच्या मंदिरातल्या एकूण एक योगिनीमूर्ती उद्ध्वस्तावस्थेत आहेत. काहींचे हात-पाय तुटलेले, काहींचे चेहरे विद्रूप केले गेलेले, काहींच्या छातीवर घाव घातलेले; पण तरीही मूळच्या मूर्तींचं सौंदर्य आणि शक्ती लपत नाही.  या चौसष्ट योगिनी या शाक्त संप्रदायाच्या देवता. रक्तबीज या दैत्याच्या निर्दालनासाठी देवीनं युद्ध केलं; पण त्या दैत्याला असा वर होता की, त्याच्या रक्ताचा एक थेंबही जमिनीवर सांडला तर त्यातून नवीन दैत्य निर्माण होईल. तेव्हा त्याचं रक्त पिण्यासाठी म्हणून देवीनं चौसष्ट शक्ती निर्माण केल्या व त्यांच्या मदतीनं रक्तबीजाचा वध केला अशी पुराणकथा आहे.  पण योगिनी म्हणजे स्त्रीशक्ती. सृजनाची शक्ती निसर्गानं स्त्रीला बहाल केलेली आहे, त्यामुळेच अगदी आदिम काळापासून आपल्याकडे मातृशक्तीची उपासना केली गेली, अगदी सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या काळापासून भारतात याबाबतचे पुरावे सापडतात. अनादी कालापासून आपल्याकडे ‘स्त्री म्हणजे शक्ती आणि शक्ती म्हणजे स्त्री’ असं समीकरण चालत आलं आहे, म्हणूनच मूर्तिशास्त्रानुसार कोणत्याही देवाची शक्ती दाखवताना ती स्त्रीमूर्तीच्याच स्वरूपात दाखवली जाते.  विद्या दहेजिया यांनी आपल्या पुस्तकात, योगिनीमंदिरं बिनछपराची का असतात याचा उलगडा करताना लिहिलं आहे, की शक्ती ही अमर्याद असते, तिला आपण बांधून ठेवू शकत नाही आणि योगिनी या आभाळात मुक्त संचार करू शकणाऱ्या देवता असतात म्हणून त्यांची मंदिरं वरून उघडी असतात, त्यांच्यावर छप्पर नसतं.  एक गूढ, वेगळा अनुभव घेण्यासाठी आणि स्त्रीशक्तीला वंदन करण्यासाठी तरी ओडिशामधल्या या सुंदर मंदिरात जायलाच हवं.  (सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.) Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 27, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3uMpPYb
Read More
प्रयोग करा-उत्तरे द्या स्पर्धेचा निकाल जाहीर

पुणे - राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने ‘सकाळ’ व ‘संडे सायन्स स्कूल’च्या वतीने स्वतः प्रयोग करून उत्तरे देण्याची अत्यंत अनोखी ‘एक्सप्लोर अँड एक्सप्लेन’ या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना प्रयोगाचे साहित्य घरपोच पाठविले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग करून प्रश्नांची उत्तरे शोधली. या प्रक्रियेत त्यांचे  प्रयोग कौशल्य, सर्वांगीण आकलनशक्ती, निरीक्षण क्षमता या सर्व बाबींचा कस लागला. इ. १ ली  ते ३ री, इ. ४ थी ते ६ वी आणि इ. ७ वी ते ९ वी या ३ गटांसाठी घेतल्या गेलेल्या स्पर्धेत पुण्यासह सुमारे २० शहरातून व ४ राज्यातून ६०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्यांना ‘सायन्स विझार्ड’ किताब व ट्रॉफी दिली जाणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडल व सर्टिफिकेट दिले जाणार आहे. मागील ११ वर्षांपासून ‘सकाळ’ व ‘संडे सायन्स स्कूल’च्या वतीने अनेक वैज्ञानिक उपक्रम राबविले जातात. आगामी उपक्रमांची माहिती मिळविण्यासाठी ९८५००४७९३३ या क्रमांकावर विद्यार्थ्यांचे नाव व इयत्ता असा व्हाट्सअप मेसेज करावा.

मोफत ऑनलाइन सैन्य, पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण; अर्जाची प्रक्रिया सुरु

विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे
इ. १ ली  ते ३ री - सायन्स विझार्ड विजेता (विभागून) अनुलेखा नंबियार व शौनक ओखडे, द्वितीय क्र.अक्ष बंका,  तृतीय क्र- ओम पाटील
इ. ४ थी ते ६ वी - सायन्स विझार्ड विजेता अथर्व कोकाटे, द्वितीय क्र. आकाश येरागी, तृतीय क्र (विभागून) - साक्षी शिंदे आणि स्वामिनी धुळे  
इ. ७ वी ते ९ वी - सायन्स विझार्ड विजेती वैष्णवी जाधव, द्वितीय क्र. अवनी पांढारकर, तृतीय क्र (विभागून) वेद घरडे आणि श्रेया मुनोत,

भोरमध्ये शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप; एजंटांचे फोन करतायत हैराण

स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे
इ. १ ली  ते ३ री - दर्श मंगल, रोहिणी बडोलिया, आरंभ साबळे, श्रेयस डोळस, श्रीयोग भावसार, सौम्या भोपे, सुश्रुत बुटाला, अर्णव पाटील, त्रिशा चौहान, अनुश्री लोखंडे, विहान आंबोळे, सनाया संसारे
इ. ४ थी ते ६ वी - नैतिक चव्हाण, अर्णव मिश्रा, आदिती लांडगे, अनुश्री फरांदे, राजवी शिंदे, मिताली निक्षे, आर्यन घोडके, कृष्णा दुधानकर, आदित्य वडके, अवधूत हजारे, शाश्वत जैन, अमीर्थवर्षीनी
इ. ७ वी ते ९ वी - अनुश्री पोतनीस, चिन्मय लोणकर, सोहम पुराणिक, पार्थ पुराणिक, तेजस आडगावकर, आर्यन मोकल, सान्वी नाईक, सिद्धी टिंबे.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

प्रयोग करा-उत्तरे द्या स्पर्धेचा निकाल जाहीर पुणे - राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने ‘सकाळ’ व ‘संडे सायन्स स्कूल’च्या वतीने स्वतः प्रयोग करून उत्तरे देण्याची अत्यंत अनोखी ‘एक्सप्लोर अँड एक्सप्लेन’ या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना प्रयोगाचे साहित्य घरपोच पाठविले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग करून प्रश्नांची उत्तरे शोधली. या प्रक्रियेत त्यांचे  प्रयोग कौशल्य, सर्वांगीण आकलनशक्ती, निरीक्षण क्षमता या सर्व बाबींचा कस लागला. इ. १ ली  ते ३ री, इ. ४ थी ते ६ वी आणि इ. ७ वी ते ९ वी या ३ गटांसाठी घेतल्या गेलेल्या स्पर्धेत पुण्यासह सुमारे २० शहरातून व ४ राज्यातून ६०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्यांना ‘सायन्स विझार्ड’ किताब व ट्रॉफी दिली जाणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा तसेच विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडल व सर्टिफिकेट दिले जाणार आहे. मागील ११ वर्षांपासून ‘सकाळ’ व ‘संडे सायन्स स्कूल’च्या वतीने अनेक वैज्ञानिक उपक्रम राबविले जातात. आगामी उपक्रमांची माहिती मिळविण्यासाठी ९८५००४७९३३ या क्रमांकावर विद्यार्थ्यांचे नाव व इयत्ता असा व्हाट्सअप मेसेज करावा. मोफत ऑनलाइन सैन्य, पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण; अर्जाची प्रक्रिया सुरु विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे इ. १ ली  ते ३ री - सायन्स विझार्ड विजेता (विभागून) अनुलेखा नंबियार व शौनक ओखडे, द्वितीय क्र.अक्ष बंका,  तृतीय क्र- ओम पाटील इ. ४ थी ते ६ वी - सायन्स विझार्ड विजेता अथर्व कोकाटे, द्वितीय क्र. आकाश येरागी, तृतीय क्र (विभागून) - साक्षी शिंदे आणि स्वामिनी धुळे   इ. ७ वी ते ९ वी - सायन्स विझार्ड विजेती वैष्णवी जाधव, द्वितीय क्र. अवनी पांढारकर, तृतीय क्र (विभागून) वेद घरडे आणि श्रेया मुनोत, भोरमध्ये शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप; एजंटांचे फोन करतायत हैराण स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे इ. १ ली  ते ३ री - दर्श मंगल, रोहिणी बडोलिया, आरंभ साबळे, श्रेयस डोळस, श्रीयोग भावसार, सौम्या भोपे, सुश्रुत बुटाला, अर्णव पाटील, त्रिशा चौहान, अनुश्री लोखंडे, विहान आंबोळे, सनाया संसारे इ. ४ थी ते ६ वी - नैतिक चव्हाण, अर्णव मिश्रा, आदिती लांडगे, अनुश्री फरांदे, राजवी शिंदे, मिताली निक्षे, आर्यन घोडके, कृष्णा दुधानकर, आदित्य वडके, अवधूत हजारे, शाश्वत जैन, अमीर्थवर्षीनी इ. ७ वी ते ९ वी - अनुश्री पोतनीस, चिन्मय लोणकर, सोहम पुराणिक, पार्थ पुराणिक, तेजस आडगावकर, आर्यन मोकल, सान्वी नाईक, सिद्धी टिंबे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 27, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2ZX4BIK
Read More
अलौकिक निसर्गसौंदर्याचं ‘भद्रा’

पश्चिम घाटात निसर्गाच्या प्रत्येक बाबीत विविधता आढळते. गुजरात राज्यात सुरू होऊन केरळ राज्यापर्यंत विस्तार असणाऱ्या या पश्चिम घाटाच्या जंगलांच्या प्रकारातही वैविध्य दिसतं. या पश्चिम घाटाचा बराचसा भाग कर्नाटक या राज्यात येतो, त्यामुळे कर्नाटकाला जैवविविधतेचा वरदहस्त लाभलेला आहे. इथं सापडणाऱ्या काही प्रजाती जगात केवळ पश्चिम घाटातच आढळतात. भद्रा नदीच्या खोऱ्यात असंच एक अप्रतिम जंगल आहे व ते म्हणजे ‘भद्रा व्याघ्र प्रकल्प’. मध्यभागी भद्रा नदीचं खोरं आणि आजूबाजूनं मुळ्ळयनगिरी, गंगेगिरी, बाबा बुदनगिरी आणि हेब्बेगिरी या डोंगररांगांमध्ये पसरलेल्या या जंगलाला पूर्वी वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला होता.  शिवमोगा आणि चिकमगळूर या जिल्ह्यांत असलेल्या या जंगलाला सन १९५१ मध्ये अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली. 

‘जगारा व्हॅली वन्यजीव अभयारण्य’ म्हणून सुरुवातीला नाव मिळालेल्या या सुमारे ७७.४५ चौरस किलोमीटर जंगलाला म्हैसूर प्रशासनानं अभयारण्य म्हणून मान्यता दिली होती. हे नाव इथं असणाऱ्या ‘जगारा जायंट’ या कर्नाटक राज्यातल्या सर्वात मोठ्या सागाच्या झाडावरून पडलं आहे. या झाडाचा घेर सुमारे ५.१ मीटर असून उंची सुमारे ३२ मीटर आहे. हे झाड ४०० वर्षं जुनं आहे असं सांगितलं जातं. या अभयारण्याच्या निर्मितीनंतर, इथं असणाऱ्या जैवविविधतेचं शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आलं. इथल्या जैवविविधतेचं संरक्षण नजरेसमोर ठेवून सन १९७४ मध्ये या अभयारण्यात आणखी भाग वाढवण्यात आला आणि सुमारे ४९२.४६ चौरस किलोमीटर क्षेत्राच्या भद्रा वन्यजीव अभयारण्याची निर्मिती करण्यात आली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या अभयारण्याचं पहिलं पर्यावरणीय सर्वेक्षण प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक डॉ. उल्लास कारंथ यांनी सन १९८० मध्ये केलं. ‘‘वैध शिकारीला आळा घालणं आणि तर्कसंगतपणे केलेलं वनीकरण यातून अगदी कमीत कमी व्यवस्थापनातही वन्यजीवनासाठी या अभयारण्याचं रूपांतर स्वर्ग म्हणून करता येईल,’’  अशा शब्दांत त्यांनी या अभयारण्याचं महत्त्व अहवालात नोंदवलं आहे. पुढं त्यांच्या या सर्वेक्षणावर आधारित वनविभागानं केलेल्या प्रयत्नांमुळे या अभयारण्याला सन १९९८ मध्ये व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळाला. आज सुमारे ४९२.४६ चौरस किलोमीटरचा कोअर भाग आणि सुमारे ५७१.८३ चौरस किलोमीटरचा बफर भाग मिळून सुमारे १०६४.२९ चौरस किलोमीटर भागात पसरलेला हा व्याघ्रप्रकल्प वन्यजीवनसंवर्धनाच्या बाबतीत अनन्यसाधारण महत्त्व टिकवून आहे.

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

हा व्याघ्रप्रकल्प असला तरी हे जंगल हत्तींसाठीही प्रसिद्ध आहे. सुमारे एक हजार ८७५ मीटर उंचीचं हेब्बेगिरी हे या जंगलातील सर्वात उंच शिखर. डोंगररांगांचा शेजार लाभल्यामुळे या जंगलात काही भागात ‘शोला वन’ही आढळतं. एके काळी दक्षिण भारतात मोठ्या संख्येनं असणाऱ्या डोंगर-दऱ्यांत अडकलेल्या या सदाहरित वर्षावनांचा प्रकार आज अगदी कमी प्रमाणात टिकून राहिला आहे. भद्रा व्याघ्रप्रकल्पाचा हा भाग त्यापैकीच एक. 

‘पाणी’ हा या पृथ्वीतलावर आढळणारी सर्वात मौल्यवान घटक. पाणी धरून ठेवण्याची आणि वर्षभर त्या पाण्याचं व्यवस्थापन करण्याची अद्भुत क्षमता असणारी ही ‘शोला वने’ हे आपल्याला मिळालेलं वरदान आहे. या ‘शोला वनां’मुळे पश्चिम घाट अधिक समृद्ध झाला आहे. मिश्र वनप्रकारांमुळे भद्रा व्याघ्रप्रकल्प अनेक प्रजातींच्या जिवांचं आश्रयस्थान झाला आहे. भद्रा नदीच्या सुमारे २००० चौरस किलोमीटर जलसंधारणाच्या क्षेत्रफळापैकी एक चतुर्थांश क्षेत्र भद्रा व्याघ्रप्रकल्पाचं आहे. कर्नाटकातील लाखो लोकांची तहान व शेती या परिसरात पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळे आणि इथल्या जैवविविधतेमुळे भद्रा व्याघ्रप्रकल्प ‘बायोडायव्हर्सिटी हॉट स्पॉट’मध्ये गणला जातो.

व्याघ्रप्रकल्प घोषित झाल्यानंतर त्या जंगलात असणाऱ्या वाघांना आणि इतर जिवांना कोणत्याही अडथळ्याशिवाय संचार करता यावा यासाठी जंगलात असणाऱ्या गावांचं पुनर्वसन जंगलाबाहेर होणं अत्यावश्यक असतं. भद्रा व्याघ्रप्रकल्पातही वनविभागाचे आणि काही संस्थांचे अथक् प्रयत्न यांमुळे सन २००१ मध्ये जंगलाच्या आत रहिवासाला असणाऱ्या लोकांचं पुनर्वसन सुरू झालं. जंगलाच्या आत राहणाऱ्या सर्व गावांचं जंगलाबाहेर यशस्वीरीत्या पुनर्वसन झालेला भद्रा हा भारतातील पहिला व्याघ्रप्रकल्प आहे. मात्र, असं असलं तरी आज या व्याघ्रप्रकल्पाला काही धोके भेडसावत आहेत. 

जंगलाला लागून असणाऱ्या गावांमध्ये वाढणारी लोकसंख्या आणि त्यातून जंगलभागावर होणारं अतिक्रमण हा व्याघ्रप्रकल्पासमोरचा मोठा धोका आहे. या लोकांकडे असणारी हजारो गुरं चरण्यासाठी जंगलभागात सोडली जात आहेत. लोक आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जंगलावर अवलंबून आहेत. निरनिराळ्या कारणांसाठी जंगलातील अमूल्य अशा लाकडाची तोड होत आहे. अवैध मासेमारी आणि अवैध शिकार हाही या जंगलासमोरचा आणखी एक मोठा धोका. यातून सुरू झाला आहे. मानव-वन्यप्राणी संघर्ष. याची किंमत निसर्गाला, पर्यायानं वन्यजीवांना चुकवावी लागत आहे.

अलौकिक निसर्गसौंदर्यामुळे या जंगलात फिरताना वेगळीच मजा येते. मार्च ते मे या कालावधीत जंगल बंद असतं. जून ते सप्टेंबर या कालावधीत भरपूर पाऊस पडतो. या कालावधीतही इच्छुकांना जंगलात जाता येऊ शकतं; पण तुफान पाऊस आणि ठिकठिकाणी शरीराला चिकटणाऱ्या जळवा याची सवय मात्र करून घ्यावी लागते. एकदा का आपण सरावलो की भद्रामधली अप्रतिम विविधता अनुभवता येते. या अशा जंगलाचं संवर्धन करण्याची, निसर्गाचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. माणूस निसर्गाच्या आधारानं पुढं गेला तरच आपल्याला अपेक्षित असणारी शाश्वत प्रगती आपण साधू शकू. निसर्गाचा आनंद घेण्यासारखं दुसरं सुख नाही हे मी स्वानुभवानं सांगतो. 

कसे जाल? : पुणे-मंगळुरू-भद्रा /पुणे-बंगळुरु-भद्रा.
भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते मार्च.

काय पाहू शकाल?
सस्तन प्राणी : सुमारे ४० प्रजाती : वाघ, बिबट्या, गवे, रानकुत्रे, सांबर, चितळ, कोल्हा, भेकर, पिसोरी, लाजवंती (स्लेंडर लॉरिस), रानमांजर, लेपर्ड कॅट, अस्वल, हत्ती, मलबार शेकरू. (दुर्मिळ काळ्या बिबट्याचा वावरही इथं नोंदवला गेला आहे.)

पक्षी : सुमारे २५० हून अधिक प्रजातींचे पक्षी Grey Junglefowl, Red Spurfowl, Painted Bush Quail, Emerald Dove, Southern Green Imperial Pigeon, Great Black Woodpecker, Malabar Parakeet, Hill Myna, Ruby-throated Bulbul, Shama, Malabar Trogon, Malabar Whistling Thrush, Malabar Pied Hornbill, Racket-tailed Drongo.

सरपटणारे प्राणी : King Cobra, Common Cobra, Russell''s Viper, Bamboo Pit Viper, Rat Snake, Keelback, Common Wolf Snake, Common Indian Monitor, Draco or Gliding Lizards.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

अलौकिक निसर्गसौंदर्याचं ‘भद्रा’ पश्चिम घाटात निसर्गाच्या प्रत्येक बाबीत विविधता आढळते. गुजरात राज्यात सुरू होऊन केरळ राज्यापर्यंत विस्तार असणाऱ्या या पश्चिम घाटाच्या जंगलांच्या प्रकारातही वैविध्य दिसतं. या पश्चिम घाटाचा बराचसा भाग कर्नाटक या राज्यात येतो, त्यामुळे कर्नाटकाला जैवविविधतेचा वरदहस्त लाभलेला आहे. इथं सापडणाऱ्या काही प्रजाती जगात केवळ पश्चिम घाटातच आढळतात. भद्रा नदीच्या खोऱ्यात असंच एक अप्रतिम जंगल आहे व ते म्हणजे ‘भद्रा व्याघ्र प्रकल्प’. मध्यभागी भद्रा नदीचं खोरं आणि आजूबाजूनं मुळ्ळयनगिरी, गंगेगिरी, बाबा बुदनगिरी आणि हेब्बेगिरी या डोंगररांगांमध्ये पसरलेल्या या जंगलाला पूर्वी वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला होता.  शिवमोगा आणि चिकमगळूर या जिल्ह्यांत असलेल्या या जंगलाला सन १९५१ मध्ये अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली.  ‘जगारा व्हॅली वन्यजीव अभयारण्य’ म्हणून सुरुवातीला नाव मिळालेल्या या सुमारे ७७.४५ चौरस किलोमीटर जंगलाला म्हैसूर प्रशासनानं अभयारण्य म्हणून मान्यता दिली होती. हे नाव इथं असणाऱ्या ‘जगारा जायंट’ या कर्नाटक राज्यातल्या सर्वात मोठ्या सागाच्या झाडावरून पडलं आहे. या झाडाचा घेर सुमारे ५.१ मीटर असून उंची सुमारे ३२ मीटर आहे. हे झाड ४०० वर्षं जुनं आहे असं सांगितलं जातं. या अभयारण्याच्या निर्मितीनंतर, इथं असणाऱ्या जैवविविधतेचं शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आलं. इथल्या जैवविविधतेचं संरक्षण नजरेसमोर ठेवून सन १९७४ मध्ये या अभयारण्यात आणखी भाग वाढवण्यात आला आणि सुमारे ४९२.४६ चौरस किलोमीटर क्षेत्राच्या भद्रा वन्यजीव अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या अभयारण्याचं पहिलं पर्यावरणीय सर्वेक्षण प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक डॉ. उल्लास कारंथ यांनी सन १९८० मध्ये केलं. ‘‘वैध शिकारीला आळा घालणं आणि तर्कसंगतपणे केलेलं वनीकरण यातून अगदी कमीत कमी व्यवस्थापनातही वन्यजीवनासाठी या अभयारण्याचं रूपांतर स्वर्ग म्हणून करता येईल,’’  अशा शब्दांत त्यांनी या अभयारण्याचं महत्त्व अहवालात नोंदवलं आहे. पुढं त्यांच्या या सर्वेक्षणावर आधारित वनविभागानं केलेल्या प्रयत्नांमुळे या अभयारण्याला सन १९९८ मध्ये व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळाला. आज सुमारे ४९२.४६ चौरस किलोमीटरचा कोअर भाग आणि सुमारे ५७१.८३ चौरस किलोमीटरचा बफर भाग मिळून सुमारे १०६४.२९ चौरस किलोमीटर भागात पसरलेला हा व्याघ्रप्रकल्प वन्यजीवनसंवर्धनाच्या बाबतीत अनन्यसाधारण महत्त्व टिकवून आहे. सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  हा व्याघ्रप्रकल्प असला तरी हे जंगल हत्तींसाठीही प्रसिद्ध आहे. सुमारे एक हजार ८७५ मीटर उंचीचं हेब्बेगिरी हे या जंगलातील सर्वात उंच शिखर. डोंगररांगांचा शेजार लाभल्यामुळे या जंगलात काही भागात ‘शोला वन’ही आढळतं. एके काळी दक्षिण भारतात मोठ्या संख्येनं असणाऱ्या डोंगर-दऱ्यांत अडकलेल्या या सदाहरित वर्षावनांचा प्रकार आज अगदी कमी प्रमाणात टिकून राहिला आहे. भद्रा व्याघ्रप्रकल्पाचा हा भाग त्यापैकीच एक.  ‘पाणी’ हा या पृथ्वीतलावर आढळणारी सर्वात मौल्यवान घटक. पाणी धरून ठेवण्याची आणि वर्षभर त्या पाण्याचं व्यवस्थापन करण्याची अद्भुत क्षमता असणारी ही ‘शोला वने’ हे आपल्याला मिळालेलं वरदान आहे. या ‘शोला वनां’मुळे पश्चिम घाट अधिक समृद्ध झाला आहे. मिश्र वनप्रकारांमुळे भद्रा व्याघ्रप्रकल्प अनेक प्रजातींच्या जिवांचं आश्रयस्थान झाला आहे. भद्रा नदीच्या सुमारे २००० चौरस किलोमीटर जलसंधारणाच्या क्षेत्रफळापैकी एक चतुर्थांश क्षेत्र भद्रा व्याघ्रप्रकल्पाचं आहे. कर्नाटकातील लाखो लोकांची तहान व शेती या परिसरात पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळे आणि इथल्या जैवविविधतेमुळे भद्रा व्याघ्रप्रकल्प ‘बायोडायव्हर्सिटी हॉट स्पॉट’मध्ये गणला जातो. व्याघ्रप्रकल्प घोषित झाल्यानंतर त्या जंगलात असणाऱ्या वाघांना आणि इतर जिवांना कोणत्याही अडथळ्याशिवाय संचार करता यावा यासाठी जंगलात असणाऱ्या गावांचं पुनर्वसन जंगलाबाहेर होणं अत्यावश्यक असतं. भद्रा व्याघ्रप्रकल्पातही वनविभागाचे आणि काही संस्थांचे अथक् प्रयत्न यांमुळे सन २००१ मध्ये जंगलाच्या आत रहिवासाला असणाऱ्या लोकांचं पुनर्वसन सुरू झालं. जंगलाच्या आत राहणाऱ्या सर्व गावांचं जंगलाबाहेर यशस्वीरीत्या पुनर्वसन झालेला भद्रा हा भारतातील पहिला व्याघ्रप्रकल्प आहे. मात्र, असं असलं तरी आज या व्याघ्रप्रकल्पाला काही धोके भेडसावत आहेत.  जंगलाला लागून असणाऱ्या गावांमध्ये वाढणारी लोकसंख्या आणि त्यातून जंगलभागावर होणारं अतिक्रमण हा व्याघ्रप्रकल्पासमोरचा मोठा धोका आहे. या लोकांकडे असणारी हजारो गुरं चरण्यासाठी जंगलभागात सोडली जात आहेत. लोक आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जंगलावर अवलंबून आहेत. निरनिराळ्या कारणांसाठी जंगलातील अमूल्य अशा लाकडाची तोड होत आहे. अवैध मासेमारी आणि अवैध शिकार हाही या जंगलासमोरचा आणखी एक मोठा धोका. यातून सुरू झाला आहे. मानव-वन्यप्राणी संघर्ष. याची किंमत निसर्गाला, पर्यायानं वन्यजीवांना चुकवावी लागत आहे. अलौकिक निसर्गसौंदर्यामुळे या जंगलात फिरताना वेगळीच मजा येते. मार्च ते मे या कालावधीत जंगल बंद असतं. जून ते सप्टेंबर या कालावधीत भरपूर पाऊस पडतो. या कालावधीतही इच्छुकांना जंगलात जाता येऊ शकतं; पण तुफान पाऊस आणि ठिकठिकाणी शरीराला चिकटणाऱ्या जळवा याची सवय मात्र करून घ्यावी लागते. एकदा का आपण सरावलो की भद्रामधली अप्रतिम विविधता अनुभवता येते. या अशा जंगलाचं संवर्धन करण्याची, निसर्गाचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. माणूस निसर्गाच्या आधारानं पुढं गेला तरच आपल्याला अपेक्षित असणारी शाश्वत प्रगती आपण साधू शकू. निसर्गाचा आनंद घेण्यासारखं दुसरं सुख नाही हे मी स्वानुभवानं सांगतो.  कसे जाल? : पुणे-मंगळुरू-भद्रा /पुणे-बंगळुरु-भद्रा. भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते मार्च. काय पाहू शकाल? सस्तन प्राणी : सुमारे ४० प्रजाती : वाघ, बिबट्या, गवे, रानकुत्रे, सांबर, चितळ, कोल्हा, भेकर, पिसोरी, लाजवंती (स्लेंडर लॉरिस), रानमांजर, लेपर्ड कॅट, अस्वल, हत्ती, मलबार शेकरू. (दुर्मिळ काळ्या बिबट्याचा वावरही इथं नोंदवला गेला आहे.) पक्षी : सुमारे २५० हून अधिक प्रजातींचे पक्षी Grey Junglefowl, Red Spurfowl, Painted Bush Quail, Emerald Dove, Southern Green Imperial Pigeon, Great Black Woodpecker, Malabar Parakeet, Hill Myna, Ruby-throated Bulbul, Shama, Malabar Trogon, Malabar Whistling Thrush, Malabar Pied Hornbill, Racket-tailed Drongo. सरपटणारे प्राणी : King Cobra, Common Cobra, Russell''s Viper, Bamboo Pit Viper, Rat Snake, Keelback, Common Wolf Snake, Common Indian Monitor, Draco or Gliding Lizards. (सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.) (शब्दांकन : ओंकार बापट) Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 27, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2NK6CFH
Read More

Friday, February 26, 2021

गावठाणांचे ड्रोन भूमापन दृष्टीक्षेपात 

ओरोस (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गातील 32 गावठाणांच्या ठिकाणी शासनाच्या स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनद्वारे भूमापन केले जाणार आहे. तेथील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीचे नियोजन सुरू झाले आहे. याचाच भाग म्हणून गावठाण भूमापन यशस्वी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ड्रोनद्वारे गावठाण भूमापन सनियंत्रण जिल्हास्तरीय समितीच्या सभेत केले. 

ड्रोनद्वारे गावठाण भूमापन सनियंत्रण जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्षा सौ. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी सभागृहात घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, समिती सचिव तथा जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षक डॉ. विजय वीर, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील, भूमि अभिलेख कणकवली उप अधीक्षक डॉ. सौरभ तुपकर, प्रियदा साकोरे गटविकास अधिकारी उपस्थित होते. यावेळी अधीक्षक डॉ. वीर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक डॉ. तुपकर व श्रीमती साकोरे यांनी पीपीटी सादर केली. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांनी ड्रोनद्वारे गावठाण भूमापन करताना तेथील ग्रामस्थांना विश्‍वासात घेण्याचे आवाहन केले. अधीक्षक डॉ. वीर यांनी भारतीय सर्व्हेक्षण विभाग, भूमि अभिलेख व ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यात ग्रामसेवक व तलाठी यांची भूमिका महत्वाची आहे. यासाठी शासनाने गावस्तरावर मंडल अधिकारी, तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. ही समिती या कामावर नियंत्रण ठेवणार आहे, असे सांगितले. 

योजनेचे फायदे 
सध्या गावठणात राहणाऱ्या रहिवाशांकडे मालमत्तांबाबत कोणतेच कागदपत्र नाहीत. त्या जमिनी शासनाच्या नावे आहेत. या प्रक्रियेमुळे शासनाच्या मिळकतींचे संरक्षण होईल. मिळकतींचा नकाशा तयार होईल व सीमा निश्‍चित होतील. रहिवाशांच्या मालकी हक्काचे अभिलेख व मिळकत पत्रिका तयार होणार आहेत. सीमा निश्‍चिती झाल्याने सरकारी मिळकतींवरचे अतिक्रमण रोखता येणार आहे. मिळकतींना बाजारपेठेत तरलता येऊन गावाची आर्थिक पत उंचावणार आहे. ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलन यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होणार. पारंपरिक मोजणी पद्धतीपेक्षा कमी वेळेत, कमी श्रमात कमी मनुष्यबळाचा वापर करून मोजणी. कामात पारदर्शकता व अचूकता. थ्री डी इमेज प्राप्त होत असल्याने विविध विकास यंत्रणा व विभागाना नियोजन करताना सुलभता येणार आहे. 

...ही आहेत गावठाणे 
कुडाळ तालुक्‍यातील पाट, अणाव, सावंतवाडी तालुक्‍यात चौकुळ, मासुरे, नेने, गाळे, केगद, फणसवडे, कलंबिस्त. दोडामार्ग तालुक्‍यात मोर्ले, घोटगेवाडी, वझरे. कणकवली तालुक्‍यात पियाळी, माईन, नागवे, लोरे, करंजे, दिगवळे, हुमरठ. देवगड तालुक्‍यात रेंबवली, लिंगडाळ, वरेरी, तोरसोळे, किंजवडे, धालावली. मालवण तालुक्‍यात त्रिंबक, सडेवाडी, पिरावाडी, कट्टा, बगाडवाडी, धामापुर, अपराधवाडी या 32 गावांत गावठाण आहे. वैभववाडी व वेंगुर्ले तालुक्‍यात एकही गावठाण क्षेत्र नाही. 

काय साध्य होणार ? 
गावठाणातील मालमत्ताचे जीआयएस आधारित रेखांकन व मूल्यांकन करणे. गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार करणे. गावठाणातील प्रत्येक खुल्या जागेचा, रस्त्याचा नकाशा करणे. गावठाणातील प्रत्येक घर, खुली जागा, रस्ता, गल्ली, नाला यांना भूमापन क्रमांक देणे. प्रत्येक मिळकतीची महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 च्या तरतूदीनुसार मिळकत पत्रिका तयार करणे व त्याचे वाटप करणे. गावातील मालमत्ता कर (नमूना क्रमांक 8) अद्यावत व ते जीआयएस लिंक करणे. गावातील ग्राम पंचायतींचे व शासनाचे असेट रजिस्टर तयार करणे, ही ड्रोन भूमापनचे उद्देश आहे. 

जिल्ह्यात 32 गावांत गावठाण क्षेत्र आहे. त्याची माहिती घेतली आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात अन्य गावठाण क्षेत्र असल्यास उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्ह्यात अजुन गावे किंवा क्षेत्र मिळाल्यास त्याचाही समावेश यात करता येईल. 
- डॉ. विजय वीर, जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षक. 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

गावठाणांचे ड्रोन भूमापन दृष्टीक्षेपात  ओरोस (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गातील 32 गावठाणांच्या ठिकाणी शासनाच्या स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनद्वारे भूमापन केले जाणार आहे. तेथील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीचे नियोजन सुरू झाले आहे. याचाच भाग म्हणून गावठाण भूमापन यशस्वी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ड्रोनद्वारे गावठाण भूमापन सनियंत्रण जिल्हास्तरीय समितीच्या सभेत केले.  ड्रोनद्वारे गावठाण भूमापन सनियंत्रण जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्षा सौ. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी सभागृहात घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, समिती सचिव तथा जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षक डॉ. विजय वीर, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील, भूमि अभिलेख कणकवली उप अधीक्षक डॉ. सौरभ तुपकर, प्रियदा साकोरे गटविकास अधिकारी उपस्थित होते. यावेळी अधीक्षक डॉ. वीर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक डॉ. तुपकर व श्रीमती साकोरे यांनी पीपीटी सादर केली.  यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांनी ड्रोनद्वारे गावठाण भूमापन करताना तेथील ग्रामस्थांना विश्‍वासात घेण्याचे आवाहन केले. अधीक्षक डॉ. वीर यांनी भारतीय सर्व्हेक्षण विभाग, भूमि अभिलेख व ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यात ग्रामसेवक व तलाठी यांची भूमिका महत्वाची आहे. यासाठी शासनाने गावस्तरावर मंडल अधिकारी, तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. ही समिती या कामावर नियंत्रण ठेवणार आहे, असे सांगितले.  योजनेचे फायदे  सध्या गावठणात राहणाऱ्या रहिवाशांकडे मालमत्तांबाबत कोणतेच कागदपत्र नाहीत. त्या जमिनी शासनाच्या नावे आहेत. या प्रक्रियेमुळे शासनाच्या मिळकतींचे संरक्षण होईल. मिळकतींचा नकाशा तयार होईल व सीमा निश्‍चित होतील. रहिवाशांच्या मालकी हक्काचे अभिलेख व मिळकत पत्रिका तयार होणार आहेत. सीमा निश्‍चिती झाल्याने सरकारी मिळकतींवरचे अतिक्रमण रोखता येणार आहे. मिळकतींना बाजारपेठेत तरलता येऊन गावाची आर्थिक पत उंचावणार आहे. ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलन यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होणार. पारंपरिक मोजणी पद्धतीपेक्षा कमी वेळेत, कमी श्रमात कमी मनुष्यबळाचा वापर करून मोजणी. कामात पारदर्शकता व अचूकता. थ्री डी इमेज प्राप्त होत असल्याने विविध विकास यंत्रणा व विभागाना नियोजन करताना सुलभता येणार आहे.  ...ही आहेत गावठाणे  कुडाळ तालुक्‍यातील पाट, अणाव, सावंतवाडी तालुक्‍यात चौकुळ, मासुरे, नेने, गाळे, केगद, फणसवडे, कलंबिस्त. दोडामार्ग तालुक्‍यात मोर्ले, घोटगेवाडी, वझरे. कणकवली तालुक्‍यात पियाळी, माईन, नागवे, लोरे, करंजे, दिगवळे, हुमरठ. देवगड तालुक्‍यात रेंबवली, लिंगडाळ, वरेरी, तोरसोळे, किंजवडे, धालावली. मालवण तालुक्‍यात त्रिंबक, सडेवाडी, पिरावाडी, कट्टा, बगाडवाडी, धामापुर, अपराधवाडी या 32 गावांत गावठाण आहे. वैभववाडी व वेंगुर्ले तालुक्‍यात एकही गावठाण क्षेत्र नाही.  काय साध्य होणार ?  गावठाणातील मालमत्ताचे जीआयएस आधारित रेखांकन व मूल्यांकन करणे. गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार करणे. गावठाणातील प्रत्येक खुल्या जागेचा, रस्त्याचा नकाशा करणे. गावठाणातील प्रत्येक घर, खुली जागा, रस्ता, गल्ली, नाला यांना भूमापन क्रमांक देणे. प्रत्येक मिळकतीची महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 च्या तरतूदीनुसार मिळकत पत्रिका तयार करणे व त्याचे वाटप करणे. गावातील मालमत्ता कर (नमूना क्रमांक 8) अद्यावत व ते जीआयएस लिंक करणे. गावातील ग्राम पंचायतींचे व शासनाचे असेट रजिस्टर तयार करणे, ही ड्रोन भूमापनचे उद्देश आहे.  जिल्ह्यात 32 गावांत गावठाण क्षेत्र आहे. त्याची माहिती घेतली आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात अन्य गावठाण क्षेत्र असल्यास उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्ह्यात अजुन गावे किंवा क्षेत्र मिळाल्यास त्याचाही समावेश यात करता येईल.  - डॉ. विजय वीर, जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षक.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3bGwOJj
Read More
कृषी यांत्रिकीमध्ये यंदाही वेटिंग? 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - उन्नत शेती समृद्ध शेती अंतर्गत किती कृषी यांत्रिकीकरण अभियान शेतकऱ्यांना गेल्यावर्षी कोरोना कालावधीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ घेता आला नाही. यंदा 10 जानेवारी पर्यंत तब्बल 7 हजार 778 शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. तर पहिल्या टप्प्यातील 315 जणांची यादीही प्रसिद्ध झाली आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी 1 कोटी 33 लाखाचे अनुदानही मंजूर झाले असले तरी मार्च पर्यंत आर्थिक वर्ष संपत असल्याने एकच महिना शेतकऱ्यांना कृषी अवजारांना अनुदान वितरणासाठी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव वेटींगवरच राहणार आहे. 

जिल्ह्यात 80 हजार हेक्‍टरच्यावर भात शेती व इतर पिकांची शेती करण्यात येते मोठ्या प्रमाणावर भात शेती असल्याने अनेक शेतकऱ्यांना यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्‍यक असते. पारंपारिक पद्धतीने शेती केल्यास मजुरी, कामगार याची नितांत आवश्‍यकता भासते ;मात्र अलिकडच्या काळात ही गरज यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने पूर्ण करण्यात येते. यांत्रिकीकरणामुळे कमी वेळेत कमी खर्चात मजूरा अभावी काम पूर्ण होते.

शेतीमध्ये एमआरजीएस, श्री पद्धत आणि यांत्रिकीकरणाचा मोठा फायदा शेतकऱ्याला होतो ; मात्र सर्वच शेतकऱ्यांना आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे यंत्राचा उपयोग शेतीसाठी करता येत नाही. यासाठी केंद्र व राज्य सरकारने तसेच सेस अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी यंत्राच्या सहाय्याने शेती करण्यासाठी उन्नत शेती समृद्ध शेती अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अभियान राबवले आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती सह अपंग घटकांनाही कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ मिळतो. 2016 ते 19 पर्यंत जवळपास 12 कोटी रुपये अनुदान तत्वावर शेती अवजारासाठी वितरित करण्यात आलेले आहे. 2016 पासून कृषी अवजारासाठी अनुदान मिळावे यासाठी प्रस्ताव करणाऱ्यांच्या संख्येत दीड ते दोन पटीने वाढ पाहावयास मिळत आहे. शेतकरी महाडीबीटीवरून आपली सर्व माहिती योजनेसह संकेत स्थळावर भरतो, यातील सर्वात आधी माहिती सादर करणारे लाभार्थी विचारात घेऊन त्यांच्या अर्जाची छाननी मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात येते.

यानंतर टप्प्याटप्प्याने काही शेतकऱ्यांची निवड करून शासनाकडून संकेत स्थळावर ही यादी प्रसिद्ध करण्यात येते. यानंतर शेतकऱ्यांनी आपले नाव यादीत आहे की नाही हे पाहून संबंधित तालुक्‍याच्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडून पूर्वसंमती घेऊन आपले नाव यादीत आल्याची कल्पना देऊन अवजारे वितरकाकडून विकत घ्यावी. विकत घेतलेल्या अवजाराची पावती संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांना सादर करावी संबंधित शेतकऱ्याचा कोणताही कागद अपूर्ण असल्यास त्याची माहिती तालुका कृषी अधिकारी त्या शेतकऱ्याला देतो यानंतर सर्व कागदपत्रे पूर्ण झाल्यावर 

जिल्हास्तरावर पाठविण्यात येते या माहितीची पाहणी करून अंतिम मंजुरी देण्यात येते आणि रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वितरित करण्यात येते. यावर्षी कोरनामुळे हा कालावधी पुढे गेला आता अवघा एकच महिना अनुदान वितरण करण्यासाठी शिल्लक आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नाव यादी प्रसिद्ध झाले आहे त्यांनी लवकरात लवकर यादी पाहून अवजारे खरेदी करून त्याची पावती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जवळ सादर करावी असे आवाहन करण्यात येत आहे. केंद्र शासनाचे 60 आणि राज्य शासनाचे 40 टक्के अनुदान तत्वावर शेतकऱ्यांना अवजाराची रक्कम प्राप्त होते आठ ते दहा दिवसात ही रक्कम खात्यावर जमा करण्यात येते 

गेल्या वर्षी 4 हजार 500 अर्ज प्राप्त झालेल्या आणि वेटिंग वर असलेल्या अर्जांची संख्या होती. त्यातील काही जणांना लाभ घेता आला ;मात्र तरीही अनेक प्रस्ताव वेटिंगवर राहिले आहेत. यंदा एकूण सुमारे 7 हजार 778 प्रस्ताव वेटिंग वर आहेत. गेल्या वर्षी वेटिंग व राहिलेले यांचा यात समावेश आहे. गतवर्षीच्या 30 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याची डेडलाईन देण्यात आली होती. नंतर ती वाढवून 10 जानेवारी पर्यंत देण्यात आली होती. यंदा जवळपास 7 हजार 778 जणांची नोंद संबंधित करण्यात आली आहे.

त्यातील यादी त्यांची नावे आली आहेत व जे लवकरात लवकर पावती सादर करणार आहेत अशांना कृषी अवजारांचा फायदा मिळणार आहे; मात्र यासाठी अवघा एकच महिना शिल्लक राहिला आहे. यानंतर ज्या लाभार्थ्यांना पुढील आर्थिक वर्षात लाभ मिळणार आहे. 
गतवर्षी तीन योजनेचे पैसे प्राप्त झाल्याने या जवळपास 7 कोटी रुपयांचे मंजुरीसाठी तरतूद करण्यात आली होती. या वर्षी एकाच योजनेचे पैसे आल्याने 1 कोटी 33 लाख अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. 

*वर्ष*अर्ज*अनुदान (लक्षांक) 
*2016-17*850*3 कोटी 45 लाख 
*2017-18*2590*6 कोटी17 लाख 
*2018-19*4396*1 कोटी 90 लाख 
*2019-20*3000*7 कोटी 
*2020-21*7778*1 कोटी 33 लाख 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

कृषी यांत्रिकीमध्ये यंदाही वेटिंग?  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - उन्नत शेती समृद्ध शेती अंतर्गत किती कृषी यांत्रिकीकरण अभियान शेतकऱ्यांना गेल्यावर्षी कोरोना कालावधीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ घेता आला नाही. यंदा 10 जानेवारी पर्यंत तब्बल 7 हजार 778 शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. तर पहिल्या टप्प्यातील 315 जणांची यादीही प्रसिद्ध झाली आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी 1 कोटी 33 लाखाचे अनुदानही मंजूर झाले असले तरी मार्च पर्यंत आर्थिक वर्ष संपत असल्याने एकच महिना शेतकऱ्यांना कृषी अवजारांना अनुदान वितरणासाठी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव वेटींगवरच राहणार आहे.  जिल्ह्यात 80 हजार हेक्‍टरच्यावर भात शेती व इतर पिकांची शेती करण्यात येते मोठ्या प्रमाणावर भात शेती असल्याने अनेक शेतकऱ्यांना यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्‍यक असते. पारंपारिक पद्धतीने शेती केल्यास मजुरी, कामगार याची नितांत आवश्‍यकता भासते ;मात्र अलिकडच्या काळात ही गरज यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने पूर्ण करण्यात येते. यांत्रिकीकरणामुळे कमी वेळेत कमी खर्चात मजूरा अभावी काम पूर्ण होते. शेतीमध्ये एमआरजीएस, श्री पद्धत आणि यांत्रिकीकरणाचा मोठा फायदा शेतकऱ्याला होतो ; मात्र सर्वच शेतकऱ्यांना आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे यंत्राचा उपयोग शेतीसाठी करता येत नाही. यासाठी केंद्र व राज्य सरकारने तसेच सेस अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी यंत्राच्या सहाय्याने शेती करण्यासाठी उन्नत शेती समृद्ध शेती अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अभियान राबवले आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती सह अपंग घटकांनाही कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ मिळतो. 2016 ते 19 पर्यंत जवळपास 12 कोटी रुपये अनुदान तत्वावर शेती अवजारासाठी वितरित करण्यात आलेले आहे. 2016 पासून कृषी अवजारासाठी अनुदान मिळावे यासाठी प्रस्ताव करणाऱ्यांच्या संख्येत दीड ते दोन पटीने वाढ पाहावयास मिळत आहे. शेतकरी महाडीबीटीवरून आपली सर्व माहिती योजनेसह संकेत स्थळावर भरतो, यातील सर्वात आधी माहिती सादर करणारे लाभार्थी विचारात घेऊन त्यांच्या अर्जाची छाननी मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात येते. यानंतर टप्प्याटप्प्याने काही शेतकऱ्यांची निवड करून शासनाकडून संकेत स्थळावर ही यादी प्रसिद्ध करण्यात येते. यानंतर शेतकऱ्यांनी आपले नाव यादीत आहे की नाही हे पाहून संबंधित तालुक्‍याच्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडून पूर्वसंमती घेऊन आपले नाव यादीत आल्याची कल्पना देऊन अवजारे वितरकाकडून विकत घ्यावी. विकत घेतलेल्या अवजाराची पावती संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांना सादर करावी संबंधित शेतकऱ्याचा कोणताही कागद अपूर्ण असल्यास त्याची माहिती तालुका कृषी अधिकारी त्या शेतकऱ्याला देतो यानंतर सर्व कागदपत्रे पूर्ण झाल्यावर  जिल्हास्तरावर पाठविण्यात येते या माहितीची पाहणी करून अंतिम मंजुरी देण्यात येते आणि रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वितरित करण्यात येते. यावर्षी कोरनामुळे हा कालावधी पुढे गेला आता अवघा एकच महिना अनुदान वितरण करण्यासाठी शिल्लक आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नाव यादी प्रसिद्ध झाले आहे त्यांनी लवकरात लवकर यादी पाहून अवजारे खरेदी करून त्याची पावती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जवळ सादर करावी असे आवाहन करण्यात येत आहे. केंद्र शासनाचे 60 आणि राज्य शासनाचे 40 टक्के अनुदान तत्वावर शेतकऱ्यांना अवजाराची रक्कम प्राप्त होते आठ ते दहा दिवसात ही रक्कम खात्यावर जमा करण्यात येते  गेल्या वर्षी 4 हजार 500 अर्ज प्राप्त झालेल्या आणि वेटिंग वर असलेल्या अर्जांची संख्या होती. त्यातील काही जणांना लाभ घेता आला ;मात्र तरीही अनेक प्रस्ताव वेटिंगवर राहिले आहेत. यंदा एकूण सुमारे 7 हजार 778 प्रस्ताव वेटिंग वर आहेत. गेल्या वर्षी वेटिंग व राहिलेले यांचा यात समावेश आहे. गतवर्षीच्या 30 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याची डेडलाईन देण्यात आली होती. नंतर ती वाढवून 10 जानेवारी पर्यंत देण्यात आली होती. यंदा जवळपास 7 हजार 778 जणांची नोंद संबंधित करण्यात आली आहे. त्यातील यादी त्यांची नावे आली आहेत व जे लवकरात लवकर पावती सादर करणार आहेत अशांना कृषी अवजारांचा फायदा मिळणार आहे; मात्र यासाठी अवघा एकच महिना शिल्लक राहिला आहे. यानंतर ज्या लाभार्थ्यांना पुढील आर्थिक वर्षात लाभ मिळणार आहे.  गतवर्षी तीन योजनेचे पैसे प्राप्त झाल्याने या जवळपास 7 कोटी रुपयांचे मंजुरीसाठी तरतूद करण्यात आली होती. या वर्षी एकाच योजनेचे पैसे आल्याने 1 कोटी 33 लाख अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.  *वर्ष*अर्ज*अनुदान (लक्षांक)  *2016-17*850*3 कोटी 45 लाख  *2017-18*2590*6 कोटी17 लाख  *2018-19*4396*1 कोटी 90 लाख  *2019-20*3000*7 कोटी  *2020-21*7778*1 कोटी 33 लाख  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3dS8Bma
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २७ फेब्रुवारी २०२१

पंचांग -
शनिवार : माघ शुद्ध १५, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय सायंकाळी ६.४९, चंद्रास्त सकाळी ७.३०, सूर्योदय ६.५६ सूर्यास्त ६.३८, माघस्नान समाप्ती, पौर्णिमा समाप्ती दुपारी १.४७, भारतीय सौर फाल्गुन ८ शके १९४२. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९१२ : श्रेष्ठ कवी आणि नाटककार कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म. ‘ज्ञानपीठ’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरविलेले ते मराठीतील दुसरे साहित्यिक. 
१९३१ : सशस्त्र क्रांतीच्या लढ्यातील काकोरी कट व लाहोर कट यातील नेते चंद्रशेखर आझाद यांचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू.
१९९९ : पंधरा वर्ष सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक.
२००२ : फैजाबाद-अहमदाबाद एक्‍स्प्रेसचा एक डबा गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ समाजकंटकांनी पेटवून दिल्यामुळे ५७ प्रवासी मृत्युमुखी व ४३ जखमी.
२००३ : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील जैवरसायनशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ.मोहंमद इस्लाम खान यांना केंद्राच्या जैवतंत्रज्ञान विभागाचा राष्ट्रीय जैवविज्ञान पुरस्कार जाहीर. ‘ग्लायकोबॉयॉलॉजी’ आणि ‘बायोनॅनोटेक्‍नॉलॉजी’ या विषयात त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल हा सन्मान मिळाला आहे.

दिनमान -
मेष : तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.
वृषभ : सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत रहाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.
कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. संततिसौख्य लाभेल.
वृश्‍चिक : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
धनु : प्रवास सुखकर होतील. मानसिक अस्वस्थता कमी होईल.
मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने चालवताना दक्षता हवी.
कुंभ : वैवाहिक सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
मीन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Edited By - Prashant Patil

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २७ फेब्रुवारी २०२१ पंचांग - शनिवार : माघ शुद्ध १५, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय सायंकाळी ६.४९, चंद्रास्त सकाळी ७.३०, सूर्योदय ६.५६ सूर्यास्त ६.३८, माघस्नान समाप्ती, पौर्णिमा समाप्ती दुपारी १.४७, भारतीय सौर फाल्गुन ८ शके १९४२.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९१२ : श्रेष्ठ कवी आणि नाटककार कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म. ‘ज्ञानपीठ’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरविलेले ते मराठीतील दुसरे साहित्यिक.  १९३१ : सशस्त्र क्रांतीच्या लढ्यातील काकोरी कट व लाहोर कट यातील नेते चंद्रशेखर आझाद यांचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू. १९९९ : पंधरा वर्ष सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक. २००२ : फैजाबाद-अहमदाबाद एक्‍स्प्रेसचा एक डबा गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ समाजकंटकांनी पेटवून दिल्यामुळे ५७ प्रवासी मृत्युमुखी व ४३ जखमी. २००३ : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील जैवरसायनशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ.मोहंमद इस्लाम खान यांना केंद्राच्या जैवतंत्रज्ञान विभागाचा राष्ट्रीय जैवविज्ञान पुरस्कार जाहीर. ‘ग्लायकोबॉयॉलॉजी’ आणि ‘बायोनॅनोटेक्‍नॉलॉजी’ या विषयात त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल हा सन्मान मिळाला आहे. दिनमान - मेष : तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. वृषभ : सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत रहाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्क : व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. संततिसौख्य लाभेल. वृश्‍चिक : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. धनु : प्रवास सुखकर होतील. मानसिक अस्वस्थता कमी होईल. मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने चालवताना दक्षता हवी. कुंभ : वैवाहिक सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. मीन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3r0ZwuX
Read More
अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणार "मृत्युंजय दूत'

ओरोस (सिंधुदुर्ग) - राष्ट्रीय आणि राज्य मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून त्यामध्ये मृत्यू तसेच जखमी होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. त्यावर उपाय म्हणून अपघातातील मृत्यू तसेच जखमींना तत्काळ मदत मिळावी म्हणून सोमवार (ता. 1) पासून "हायवे मृत्युंजय दूत' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. अपर महा पोलिस संचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ही संकल्पना अस्तित्वात आणली आहे, अशी माहिती वाहतूक मदत पोलिस केंद्राचे सहायक निरीक्षक अरुण जाधव यांनी आज दिली. 

अपघाताचे प्रमाण वाढत आहे. देशात दरवर्षी दीड लाख लोक रस्ते अपघातात जीव गमावतात. अनेकजण कायमस्वरूपी अपंग होतात. अपघातग्रस्तांना योग्य आणि वेळेवर उपचार होण्यासाठी डॉ. उपाध्याय यांनी जखमींना मदत मिळावी म्हणून हायवे मृत्युंजय दूत ही योजना आणली आहे. महामार्ग पोलिसांकडे याची जबाबदारी आहे. 
राज्याच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहिती त्यांच्याकडे असणार आहे. हायवे मृत्युंजय दूताकडे ओळखपत्र असेल. त्यांच्या कामावरून प्रमाणपत्रसुद्धा दिले जाणार आहे. केंद्राच्या रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडे चांगले काम करणाऱ्या दूतांची नावे कळविण्यात येऊन त्यांना पुरस्काराची शिफारस करण्यात येणार आहे. 

काय आहे संकल्पना? 
राज्य महामार्गावर राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील मॉल, पेट्रोल पंप, ढाबा, हॉटेलमधील कर्मचारी व जवळच्या गावातील नागरिकांच्या ग्रुपमधून हायवे मृत्युंजय दूत तयार केले जाणार आहेत. खासगी, सरकारी, निमसरकारी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांना प्रथमोपचाराचे व अपघातग्रस्तांना कशा प्रकारे हाताळायचे, याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हायवे मृत्युंजय दूताकडे स्ट्रेचर आणि प्राथमिक उपचारांचे साहित्य असणार आहे. हायवेवरील सर्व प्रकारच्या हॉस्पिटल, दवाखाने यांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवण्यात येणार आहे. रुग्णवाहिका कोठे असतात आणि 108 क्रमांक रुग्णवाहिकेसाठी असतो, त्याची सर्व माहिती दूताकडे असणार आहे. अपघातानंतर गोल्डन अवरमध्ये कार्य केले पाहिजे, याचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

""राज्यात अपघातात वाढ होत आहे. त्यातील मृत्यूचे प्रमाण कसे कमी करता येतील, याकडे लक्ष देऊन ही नवी योजना सुरू केली आहे. जखमींना वेळेवर योग्य उपचार मिळाला तर प्राणहानी कमी होईल. त्यामुळेच हायवे मृत्युंजय दूत योजना संपूर्ण राज्यात सुरू होत आहे. संपूर्ण राज्यात दूतांचे एक हजार ग्रुप करण्यात येणार आहेत. एका ग्रुपमध्ये चार ते पाच सदस्य असतील. योजनेमुळे जवळपास अपघातातील 60 ते 70 टक्के मृत्यू रोखता येतील.'' 
- अरुण जाधव, सहायक पोलिस निरीक्षक 
 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणार "मृत्युंजय दूत' ओरोस (सिंधुदुर्ग) - राष्ट्रीय आणि राज्य मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून त्यामध्ये मृत्यू तसेच जखमी होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. त्यावर उपाय म्हणून अपघातातील मृत्यू तसेच जखमींना तत्काळ मदत मिळावी म्हणून सोमवार (ता. 1) पासून "हायवे मृत्युंजय दूत' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. अपर महा पोलिस संचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ही संकल्पना अस्तित्वात आणली आहे, अशी माहिती वाहतूक मदत पोलिस केंद्राचे सहायक निरीक्षक अरुण जाधव यांनी आज दिली.  अपघाताचे प्रमाण वाढत आहे. देशात दरवर्षी दीड लाख लोक रस्ते अपघातात जीव गमावतात. अनेकजण कायमस्वरूपी अपंग होतात. अपघातग्रस्तांना योग्य आणि वेळेवर उपचार होण्यासाठी डॉ. उपाध्याय यांनी जखमींना मदत मिळावी म्हणून हायवे मृत्युंजय दूत ही योजना आणली आहे. महामार्ग पोलिसांकडे याची जबाबदारी आहे.  राज्याच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहिती त्यांच्याकडे असणार आहे. हायवे मृत्युंजय दूताकडे ओळखपत्र असेल. त्यांच्या कामावरून प्रमाणपत्रसुद्धा दिले जाणार आहे. केंद्राच्या रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडे चांगले काम करणाऱ्या दूतांची नावे कळविण्यात येऊन त्यांना पुरस्काराची शिफारस करण्यात येणार आहे.  काय आहे संकल्पना?  राज्य महामार्गावर राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील मॉल, पेट्रोल पंप, ढाबा, हॉटेलमधील कर्मचारी व जवळच्या गावातील नागरिकांच्या ग्रुपमधून हायवे मृत्युंजय दूत तयार केले जाणार आहेत. खासगी, सरकारी, निमसरकारी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांना प्रथमोपचाराचे व अपघातग्रस्तांना कशा प्रकारे हाताळायचे, याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हायवे मृत्युंजय दूताकडे स्ट्रेचर आणि प्राथमिक उपचारांचे साहित्य असणार आहे. हायवेवरील सर्व प्रकारच्या हॉस्पिटल, दवाखाने यांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवण्यात येणार आहे. रुग्णवाहिका कोठे असतात आणि 108 क्रमांक रुग्णवाहिकेसाठी असतो, त्याची सर्व माहिती दूताकडे असणार आहे. अपघातानंतर गोल्डन अवरमध्ये कार्य केले पाहिजे, याचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  ""राज्यात अपघातात वाढ होत आहे. त्यातील मृत्यूचे प्रमाण कसे कमी करता येतील, याकडे लक्ष देऊन ही नवी योजना सुरू केली आहे. जखमींना वेळेवर योग्य उपचार मिळाला तर प्राणहानी कमी होईल. त्यामुळेच हायवे मृत्युंजय दूत योजना संपूर्ण राज्यात सुरू होत आहे. संपूर्ण राज्यात दूतांचे एक हजार ग्रुप करण्यात येणार आहेत. एका ग्रुपमध्ये चार ते पाच सदस्य असतील. योजनेमुळे जवळपास अपघातातील 60 ते 70 टक्के मृत्यू रोखता येतील.''  - अरुण जाधव, सहायक पोलिस निरीक्षक    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3pWr1nX
Read More
चव्हाण प्रकरणात संवेदनशीलता दाखवा ः तावडे

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीवर आरोप होतात. त्यावेळी राजकीय नेतृत्वाने संवेदनशीलता दाखवित निर्णय घेणे आवश्‍यक असतो. त्यामुळे पुजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कारवाई करीत राजकीय संवेदनशीलता दाखवावी, असे मत भाजप नेते विनोद तावडे यांनी येथे व्यक्त केले. 

जिल्हा दौऱ्यावर आलेले श्री. तावडे यांचे येथील भाजप कार्यालयात तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते अतुल काळसेकर, सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, राजा राणे, बाळा हरयाण, सुधीर नकाशे आदी उपस्थित होते. 

तावडे म्हणाले, ""पुजा चव्हाण प्रकरणात कारवाई व्हावी, अशी अपेक्षा राज्यातील जनतेला आहे. राजकीय नेतृत्व संवेदनशील असेल तर नक्कीच कारवाई होईल. पेट्रोल, डिझेलचे दर जगात वाढत आहे. त्यामुळे आपल्या देशात देखील वाढले आहेत; परंतु जे विरोधक राज्यात पेट्रोल डिझेलचा कांगावा करीत आहेत. त्यांनी आजुबाजुच्या राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर कमी आहेत हे पाहावे. त्या राज्यांतील सरकारांना जमते ते महाराष्ट्रातील सरकारला काम जमत नाही याचे आत्मपरीक्षण करावे त्यांनतरच टीका करावी.'' 

1 मार्चपासुन सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे कोरोनाची संख्या वाढवुन सांगितली जात आहे. हा राजकीय कोरोना आहे, अशी टीका भाजपच्या नेत्यांकडुन केली जात आहे. यासंदर्भात श्री. तावडेंना विचारले असता ते म्हणाले, ""समाजातील सर्व व्यवस्था आता सुरू झाली आहे. कोरोनामुळे आता काहीही थांबलेले नाही. त्यामुळे केवळ अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर गुंडाळण्यासाठी कोरोनाचा वापर होऊ नये, असे आमचे मत आहे. राज्यातील अनेक प्रश्नावर या अधिवेशनात चर्चा व्हायला हवी. अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या सर्व आमदारांना कोरोना टेस्ट करून प्रवेश दिला जातो. आवश्‍यक ती खबरदारी घेवुन राज्य सरकारने पूर्ण वेळ अर्थसंकल्पशीय अधिवेशन घ्यावे. कोणतीही पळवाट काढु नये हीच आमची मागणी आहे.'' 

मुंबईत एका ठिकाणी सापडलेल्या स्फोटकाविषयी ते म्हणाले, ""या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे त्यावर काही भाष्य करता येणार नाही; परंतु दहशतवादाशी कुणीही एक सरकार लढत नाही तर आपण सर्वांनी एकत्रित लढायचे असते. त्यामुळे या विषयात राजकीय टीका होता कामा नये.'' 

पैकीच्या पैकी पाहिजेत 
वाभवे वैभववाडी नगरपंचायतीतील नगरसेवकांनी जरी अन्य पक्षात प्रवेश केला असला तरी आपल्याला या नगरपंचायतीत पैकीच्या पैकी नगरसेवक पाहिजेत. त्यासाठी जोरदार प्रयत्न करा, बुथनिहाय काम करा, अशी सूचना त्यांनी उपस्थित भाजपच्या कार्यकर्त्यांना केली. 

संपादन - राहुल पाटील

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

चव्हाण प्रकरणात संवेदनशीलता दाखवा ः तावडे वैभववाडी (सिंधुदुर्ग) - राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीवर आरोप होतात. त्यावेळी राजकीय नेतृत्वाने संवेदनशीलता दाखवित निर्णय घेणे आवश्‍यक असतो. त्यामुळे पुजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कारवाई करीत राजकीय संवेदनशीलता दाखवावी, असे मत भाजप नेते विनोद तावडे यांनी येथे व्यक्त केले.  जिल्हा दौऱ्यावर आलेले श्री. तावडे यांचे येथील भाजप कार्यालयात तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते अतुल काळसेकर, सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, राजा राणे, बाळा हरयाण, सुधीर नकाशे आदी उपस्थित होते.  तावडे म्हणाले, ""पुजा चव्हाण प्रकरणात कारवाई व्हावी, अशी अपेक्षा राज्यातील जनतेला आहे. राजकीय नेतृत्व संवेदनशील असेल तर नक्कीच कारवाई होईल. पेट्रोल, डिझेलचे दर जगात वाढत आहे. त्यामुळे आपल्या देशात देखील वाढले आहेत; परंतु जे विरोधक राज्यात पेट्रोल डिझेलचा कांगावा करीत आहेत. त्यांनी आजुबाजुच्या राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर कमी आहेत हे पाहावे. त्या राज्यांतील सरकारांना जमते ते महाराष्ट्रातील सरकारला काम जमत नाही याचे आत्मपरीक्षण करावे त्यांनतरच टीका करावी.''  1 मार्चपासुन सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे कोरोनाची संख्या वाढवुन सांगितली जात आहे. हा राजकीय कोरोना आहे, अशी टीका भाजपच्या नेत्यांकडुन केली जात आहे. यासंदर्भात श्री. तावडेंना विचारले असता ते म्हणाले, ""समाजातील सर्व व्यवस्था आता सुरू झाली आहे. कोरोनामुळे आता काहीही थांबलेले नाही. त्यामुळे केवळ अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर गुंडाळण्यासाठी कोरोनाचा वापर होऊ नये, असे आमचे मत आहे. राज्यातील अनेक प्रश्नावर या अधिवेशनात चर्चा व्हायला हवी. अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या सर्व आमदारांना कोरोना टेस्ट करून प्रवेश दिला जातो. आवश्‍यक ती खबरदारी घेवुन राज्य सरकारने पूर्ण वेळ अर्थसंकल्पशीय अधिवेशन घ्यावे. कोणतीही पळवाट काढु नये हीच आमची मागणी आहे.''  मुंबईत एका ठिकाणी सापडलेल्या स्फोटकाविषयी ते म्हणाले, ""या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे त्यावर काही भाष्य करता येणार नाही; परंतु दहशतवादाशी कुणीही एक सरकार लढत नाही तर आपण सर्वांनी एकत्रित लढायचे असते. त्यामुळे या विषयात राजकीय टीका होता कामा नये.''  पैकीच्या पैकी पाहिजेत  वाभवे वैभववाडी नगरपंचायतीतील नगरसेवकांनी जरी अन्य पक्षात प्रवेश केला असला तरी आपल्याला या नगरपंचायतीत पैकीच्या पैकी नगरसेवक पाहिजेत. त्यासाठी जोरदार प्रयत्न करा, बुथनिहाय काम करा, अशी सूचना त्यांनी उपस्थित भाजपच्या कार्यकर्त्यांना केली.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

February 26, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3pWPQAk
Read More