पुणेकरांनो, घरबसल्या करा बॅंकिंग व्यवहार पुणे - आपापल्या ग्राहकांना किरकोळ कामांसाठी बॅंकेच्या शाखेत यावे लागू नये, या उद्देशाने शहरातील विविध बॅंकांनी ऑनलाइन बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग, मोबाईल ॲप्स यासारखे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या साधनांच्या माध्यमातून पुणेकरांना सर्व बॅंकिंग व्यवहार घरबसल्या करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना बॅंकेत जाण्याची गरज नसल्याचे मत महाराष्ट्र बॅंक आणि लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सध्या पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे शहरात लॉकडाउन सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर स्वत:ला आणि पर्यायाने समाजाचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे आवश्यक आहे. त्यामुळे पुणेकरांनी घरबसल्या डिजिटल बॅंकिंगचा वापर करावा, असे आवाहनही या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळणे अनिवार्य आहे. त्यामुळे नागरिकांनी महाराष्ट्र बॅंकेच्या बॅंकिंग व्यवहारासाठी विविध डिजिटल माध्यमांचा वापर करावा. यासाठी महाबॅंक ॲप, एटीएम कार्ड, इंटरनेट बॅंकिंगचा अवलंब करता येईल. - महेश महाबळेश्वरकर, महाव्यवस्थापक (नियोजन), बॅंक ऑफ महाराष्ट्र पुणे शहरातील विविध सहकारी सोसायट्या आणि बॅंकांनी आपापल्या ग्राहकांसाठी अनेक डिजिटल बॅंकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांचा घरात बसून वापर करता येतो. - सुशील जाधव, क्षेत्रिय अधिकारी, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/2B1zClS Latest news updates July 15, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3ewOM0h Read More Read more No comments:
ऑडिओ बुकद्वारे घ्या मराठी साहित्याचा आनंद पुणे - अभिजात साहित्याने परिपूर्ण असणाऱ्या भारतातील लोकप्रिय ऑडिओ बुक ॲप ‘स्टोरीटेल इंडिया’ने खास मराठी श्रोत्यांसाठी ‘सिलेक्ट मराठी’ ही नवीन सेवा १५ जुलैपासून उपलब्ध केली आहे. या सेवेद्वारे श्रोत्यांना फक्त मराठी पुस्तकांचा आनंद घेता येईल. विशेष करून मराठी भाषेतील रसिक श्रोते स्टोरीटेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असल्याने जगात पहिल्यांदाच ही सोय या ॲपने उपलब्ध करून दिली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा स्टोरीटेल ॲप डाऊनलोड केले की आता ‘स्टोरीटेल अनलिमिटेड’ व ‘स्टोरीटेल सिलेक्ट मराठी’ असे दोन पर्याय उपलब्ध होतील. यातील ‘स्टोरीटेल अनलिमिटेड’मध्ये आठ भाषांतील पुस्तके दरमहा केवळ २९९ रुपयांत उपलब्ध असतील. तर, स्टोरीटेल ‘सिलेक्ट मराठी’ फक्त ९९ रुपये प्रति महिना उपलब्ध असेल. यातील ‘सिलेक्ट मराठी’ पर्याय निवडल्यास श्रोत्यांना फक्त मराठी भाषेतील पुस्तके ऐकावयास मिळतील. नाट्य निर्माता संघाने शरद पवारांना पाठवलं पत्र; काय आहे कारण? ‘सिलेक्ट मराठी’बाबत स्टोरीटेल इंडियाचे मुख्य व्यवस्थापक योगेश दशरथ म्हणाले, ‘‘मला अनेक कार्यक्रमांमध्ये प्रश्न विचारला जायचा की ऑडिओ बुक केवळ श्रोत्यांच्या मातृभाषेत का उपलब्ध होत नाहीत. हाच विचार डोक्यात ठेवून, आम्ही ‘सिलेक्ट मराठी’ हे नवीन फिचर फक्त मराठी श्रोत्यांसाठी उपलब्ध करून दिले. यामुळे स्टोरीटेल ॲपमध्ये सिलेक्ट मराठी पर्याय निवडल्यास श्रोते फक्त मराठी पुस्तकं ऐकू शकतात. याद्वारे मराठी पुस्तकं अनेक लोकांपर्यंत पोचविण्याचे आमचे आमचे ध्येय आहे. नव्या पिढीतील लेखकांची स्टोरीटेल ओरिजनल ऑडिओबुक्सही सर्वांना ऐकता येतील.’’ - पुणे : अखेर लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी दूध पुरवठा सुरळीत; मात्र... स्टोरीटेल येत्या काही महिन्यांत २०० हून अधिक ऑडिओ बुक्स प्रकाशित करणार आहे व दरमहा उत्तमोत्तम साहित्याची भर स्टोरीटेल ‘सिलेक्ट मराठी’त होत राहणार आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 15, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3j6RWvc Read More Read more No comments:
कोरोना वायरसः दिल्ली सरकार ने अस्पतालों के लिए जारी की एडवाइजरी https://ift.tt/32mHI3Z Latest news updates July 15, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
...तर राजीनामे! सिंधुदुर्गातील सरपंच का झालेत आक्रमक? कणकवली (सिंधुदुर्ग) - गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमांन्यासाठी 14 दिवसांचा कालावधी क्वारंटाईनसाठी असावा तसेच सरपंचांना त्यांच्या मागणीनुसार संरक्षण मिळावे; मात्र सात दिवसांचे क्वारंटाईन केल्यास सरपंच सनियंत्रण समितीचा राजीनामा देतील, असा इशारा जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष संतोष राणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. कणकवली पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस कणकवली तालुका सरपंच भाजप संघटनेचे तालुका अध्यक्ष पिसेकामते सरपंच सुहास राणे, ओटव सरपंच हेमंत परुळेकर, करंजे सरपंच मंगेश तळगांवकर, आशिये सरपंच रश्मी बाणे आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन एकच नियम करावा. जेणेकरून सरपंचांना त्रास होणार नाही. तसेच जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक चाकरमाण्याची स्वॅबटेस्ट प्रवेशद्वारावरच घेऊन तो निगेटिव्ह असल्याची खात्री करण्यास कोणतीही हरकत राहणार नाही. चाकरमान्यांचा संस्थात्मक किंवा गृहविलगीकरणबाबत जो निर्णय झाला आहे. त्याला बहुतांशी लोकप्रतिनिधींनी विरोध करत 7 दिवस क्वारंटाईन करावे असे म्हटले आहे; मात्र याबाबत सरपंचांचा तीव्र विरोध आहे. आतापर्यत जे चाकरमानी गावात आले ते 14 दिवस क्वारंटाईन राहिले. त्यामुळे याही वेळेला गावात येणाऱ्या व्यक्तींबाबत 14 दिवसांपेक्षा कमी दिवसाचा निर्णय घेतल्यास कोरोना फैलावू शकतो. राज्य शासनाने किंवा केंद्र शासने परप्रांतीय लोकांसाठी मोफत प्रवासाची सेवा केली. तशीच सेवा कोकणातील चाकरमान्यांसाठी करावी अशी आमची मागणी आहे. पालकमंत्र्यांनी सुद्धा सरपंचाचा विमा उतरविण्याची घोषणा केली होती; परंतु ती झाली नाही. अनेक अडचणी आहेत. प्रत्येक पंचक्रोशीत बाजारपेठ आहे. तिथे एकत्रित सगळा व्यापार होतो; मात्र गणेशोत्सवाच्या हंगामात मोकळ्या जागेमध्ये स्वतंत्र भाजीपाला, फळांचा व्यापार करावा, अशी मागणी सरपंच संघटनेने केली आहे. सरपंचांना शासनाकडून किंवा पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. कणकवली तालुक्यातील शेर्पे सरपंचांबाबत जी घटना घडली. त्याबाबत काहीच कारवाई झाली नसल्याची खंत व्यक्त झाली. कोरोना टेस्ट महत्त्वाची तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा, आरोग्य यंत्रणेचे चांगले सहकार्य मिळाले. गाव समितीनेही योग्य नियोजन केले; मात्र गणेशोत्सवास येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता आणि गावातील सुविधा लक्षात घेता या गोष्टी अशक्य आहेत. त्यामुळे शासनाने सरसकटपणे पास देताना विचार करण्याची गरज आहे. पास दिले नाही तरी चालतील; परंतु येणाऱ्या व्यक्ती कोरोना टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी सरपंच संघटनेने केली आहे. गणेशोत्सव कालावधीत काही नियम करावेत, अशी मागणीही करण्यात आली. संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 14, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3fuikgr Read More Read more No comments:
आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १५ जुलै पंचांग - बुधवार - आषाढ कृ. १०, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय रा. १.३०, चंद्रास्त दु. २.३६, भारतीय सौर २४, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९६२ - शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणाऱ्या ‘ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेचा पुणे येथे प्रारंभ. १९९८ - ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते व स्वातंत्र्यसैनिक ताराचंद परमार यांचे निधन. १९९९ - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या इंदूताई टिळक यांचे निधन. १९९९ - प्रसिद्ध पर्यावरणवादी लेखक, सामाजिक कार्यकर्ते जगदीश गोडबोले यांचे निधन. २००० - निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा शिधापत्रिका मिळविल्याने कोणतीही परदेशी व्यक्ती भारतीय नागरिक बनू शकत नाही, असा दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल. २००४ - ज्येष्ठ स्त्री रोगतज्ज्ञ, समाजसेविका, तसेच केईएम रुग्णालय आणि ‘सकाळ’च्या संचालिका डॉ. बानू कोयाजी यांचे निधन. प्रसूतिशास्त्र, बालआरोग्य, ग्रामीण व नागरी आरोग्य आणि कुटुंबनियोजन या क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली होती. भारत सरकारचा ‘पद्मभूषण’, तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या रॅमन मॅगेसेसे पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. २००४ - टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा टिळक सन्मान पुरस्कार इन्फोसिस कंपनीचे अध्यक्ष एन.आर.नारायणमूर्ती यांना जाहीर. दिनमान - मेष : आरोग्याकडे लक्ष द्यावयास हवे. नवीन जनसंपर्क वाढेल. वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वैवाहिक सौख्य लाभेल. मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. फार मोठे धाडस टाळावे. कर्क : आत्मविश्वास वाढेल. प्रगतीच्या दृष्टीने काही चांगल्या गोष्टी घडतील. सिंह : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. कन्या : भागीदारी व्यवसायात मतभेद वाढतील. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. तुळ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृश्चिक : शासकीय कामे पुढे ढकलावीत. सहकार्यावर अवलंबून राहू नका. धनु : मित्रांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. मकर : विरोधकावर मात कराल. कलेच्या क्षेत्रात यश लाभेल. कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 14, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3fHILzn Read More Read more No comments:
त्यांना मुली आहेत ना... लग्नाची चिंता आतपासून सतावते... म्हणून लावले हे झाड वर्धा : प्रत्येकाला मुलांच्या शिक्षणाची, पुढे मुलीच्या विवाहाची चिंता असते. नोकरदारवर्ग मुलांच्या भविष्यासाठी फिक्स डिपॉझिट, एलआयसी आदी गुंतवणूक करून ठेवतात. मात्र, ग्रामीण भागातील पालक शेती व्यवसायातून मुलांच्या भवितव्यासाठी चार पैसे शिल्लक ठेवू शकत नाही. वेळप्रसंगी अनेकांना मुलीच्या लग्नासाठी एक-दोन एकर शेती विकावी लागते. कर्जही काढावे लागते. हीच बाब लक्षात घेऊन रसुलाबाद ग्रामपंचायतीने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे वृक्षसंवर्धनासोबतच अर्थार्जनही होणार आहे. पर्यावरणाचे संतुलन ढासळल्याने आज आपल्याला वृक्षलागवडीची गरज जाणवू लागली आहे. शासनस्तरावरही वृक्षलागवड मोहीम राबविली जात आहे. अनेक जण शेतात सागाची झाडे लावतात. कालांतराने यातून मोठी रक्कम मिळते. परंतु आता जमिनीचे तुकडे पडल्याने प्रत्येक जण सागाची झाडे लावू शकत नाही. म्हणून ग्रामपंचायतीने माझे घर माझे गाव समृद्ध योजनेअंतर्गत घरोघरी चंदनाचे झाड लावण्याचा संकल्प केला आहे. हेही वाचा - या कॉंग्रेस नेत्यांची नवी पिढी राजकारणात सक्रिय बाजारात चंदनाला सोन्याचा भाव आहे. या झाडाचे व्यवस्थित संगोपन केल्यास दहा ते पंधरा वर्षांनंतर एका झाडापासून 10 लाख रुपये मिळू शकतात, ही बाब लक्षात घेऊन रसुलाबाद ग्रामपंचायतीने घरोघरी चंदनाचे झाड लावण्याचा संकल्प केला आहे. नागरिकांना 50 टक्के अनुदानावर चंदनाचे झाड दिले जात आहे. दिवसेंदिवस शेतीचा व्यवसाय तोट्याचा ठरत आहे. परिणामी, शेतकरी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी चार पैसे शिल्लक ठेवू शकत नाही. मुलांचे शिक्षण आणि मुलीच्या विवाहासाठी त्यांना कर्ज काढावे लागते. गावातील नागरिकांना पुढे मुलांचे शिक्षण व विवाहासाठी मदत व्हावी, यासाठी घरोघरी चंदनाचे झाड लावण्याचा संकल्प ग्रा.पं.ने केला आहे. घरोघरी चंदनाचे झाड लावणारी जिल्ह्यातील ही पहिला ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना 50 टक्के अनुदानावर चंदनाचे रोपटे दिले आहे. आतापर्यंत गावात 400 झाडे लावण्यात आली आहेत. गावात 1123 घरे आहेत. चंदनाच्या झाडापासून 10 ते 15 वर्षानंतर लाखो रुपये मिळतील. ही योजना राबविण्याकरिता ग्रामविकास अधिकारी अशोक बोबडे, सरपंच राजेश सावरकर, माजी सरपंच सदस्य शफीकुर रहेमान, उपसरपंच शीला कणेरी व ग्रामपंचायतीचे सदस्य सहकार्य करीत आहेत. कुटुंबीयांना मिळणार बक्षीस घरोघरी लागवड केलेल्या चंदनाच्या झाडाची ग्रामपंचायत आणि बाहेरून येणारे पर्यवेक्षक पाहणी करणार आहे. ज्या कुटुंबाने झाडाचे संगोपन व्यवस्थित केले. झाडाची उंची, फांद्या आणि खोडाचा आकार आदींचे परीक्षण करून पारितोषित दिले जाणार आहे. पाचव्या वर्षी चंदनाच्या झाडांना स्पर्धेत उतरविणार आहे. कुटुंबीतील सदस्यांना बक्षीस दिले जाईल. चंदनाचे झाड देईल आर्थिक बळ मुलांना शिक्षणासाठी, पुढे लग्नासाठी लाखो रुपये लागतात. शेतीच्या व्यवसायातून शेतकऱ्यांना बचत करणे शक्य होत नाही. वेळप्रसंगी मुलीच्या लग्नाला शेतीसुद्धा विकावी लागते. ग्रा.पं.ने घरोघरी चंदनाचे झाड लावण्याचा संकल्प केला आहे. या झाडाचे चांगल्या प्रकारे संगोपन केल्यास हे झाड 10 ते 15 वर्षांनंतर 10 ते 15 लाख रुपये देईल. आर्थिक मदत होईल. राजेश सावरकर, सरपंच रसुलाबाद संपादन : अतुल मांगे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 14, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2CzHEmA Read More Read more No comments:
काय म्हणाले आयुक्त मुंढे लॉकडाउनसंदर्भात? वाचा नागपूर : लॉकडाउनचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचे नमूद करीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात गेल्या दोन दिवसांपासून लॉकडाउन होणार असल्याच्या अफवांना पूर्णविराम दिला. मात्र, लॉकडाउन शिथिल केल्यानंतरही कोरोनावर नियंत्रणासाठी दिलेल्या सूचना, निर्देशाचे पालन होत नाही. लॉकडाउन टाळण्यासाठी नागरिकांनी नियम पाळावे, असे आवाहन त्यांनी "सकाळ'सोबत बोलताना पुन्हा एकदा केले. लॉकडाउन होणार असल्याची काल, सोमवारपासून अफवा पसरली आहे. या अफवेमुळे नागरिकच नव्हे तर व्यापारीही धास्तावले आहे. केवळ काही दिवसांमध्येच पुन्हा लॉकडाउनच्या संकटाने अनेकजण हादरले. व्यापारी, उद्योजक, कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांमध्येही लॉकडाउनबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. अनेकांनी आज संपर्कातील अधिकारी किंवा नातेसंबंधातील अधिकारी, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना फोन करून लॉकडाउनबाबत विचारणा केली. अनेकांच्या चर्चेतून पुन्हा लॉकडाउन परवडणारे नसल्याचा सूर निघाला. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनीही या अफवांवर विश्वास ठेवून लॉकडाउनपूर्वीच घरात किराणा आदी भरून ठेवण्यास प्रारंभ केला. याबाबत आयुक्त मुंढे यांना विचारणा केली असता त्यांनी लॉकडाउनचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, "मिशन बिगीन अगेन'अंतर्गत नागरिकांना दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची सूट देण्यात आली. परंतु, नागरिकांकडून लॉकडाउनसंदर्भातील निर्देश, सूचनांचे पालन होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. लॉकडाउन टाळायचा असेल तर नियमाचे पालन करा, असे आवाहन त्यांनी नागरिक, दुकानदार, संस्था, कार्यालय प्रमुखांना केले. दोन दिवसांपूर्वीच आयुक्तांनी एक व्हिडिओ प्रसारित करून नागरिकांना लॉकडाउनचा इशारा दिला होता. दुकाने सुरू करण्यासंदर्भातील तसेच मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे कुठलेही नियम पाळले जात नाही. वाचा, महापालिकेला किती कर्मचाऱ्यांनी खेचले कोर्टात? अनेक जण विनाकारण शहरात बिनधास्त फिरत आहे. दुचाकींवर दोन व्यक्ती तर चारचाकी वाहनांत पाच-पाच व्यक्ती फिरत आहे, असे निरीक्षण नोंदवित त्यांनी कठोर निर्णयाचे संकेत दिले होते. नागरिकांवर "वॉच' लॉकडाउनचा निर्णय घेण्याअगोदर मनपा आणि पोलिस प्रशासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर "वॉच' ठेवणार असल्याचे आयुक्तांनी नुकताच प्रसारित केलेल्या व्हिडिओतून सांगितले होते. त्यामुळे काल, सोमवारपासून नागरिकांवर लक्ष ठेवण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे नागरिकांनी नियमाचे पालन केल्यास लॉकडाउनचे संकट टाळणे शक्य आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 14, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3j6I7gA Read More Read more No comments:
कणकवलीकर पुन्हा संतप्त, काय आहे मागणी? कणकवली (सिंधुदुर्ग) - उड्डाणपूल जोड रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे महामार्ग ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कणकवलीकरांनी केली आहे. त्याबाबतची तक्रार देखील कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, कोसळलेल्या भिंतीची पाहणी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली. शहरातील उड्डाणपूल जोड रस्त्याची भिंत काल दुपारी कोसळली होती. त्यानंतर संतप्त कणकवलीकरांनी रास्ता रोको केला. रात्री पोलिस ठाण्यात धाव घेऊन ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची तक्रारही दिली; मात्र प्रांताधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच ठेकेदारावर गुन्हा दाखल करू, अशी भूमिका पोलिस प्रशासनाने घेतली. त्यामुळे आज सकाळी कणकवलीकर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची भेट घेतली. त्यावेळी राजमाने यांनी याबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रीय महामार्गावर एस. एम. हायस्कूल नजीक जेथे उड्डाणपूल जोड रस्त्याची भिंत कोसळली, तेथे आता 24 तास बंदोबस्त असून या सेवा रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे. शिवाय जानवली पूल ते पटवर्धन चौक या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. उड्डाणपूल जोड रस्त्याच्या परिसरात कुठलेही वाहन थांबू नये यासाठीही पोलिस प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. उड्डाणपूल भिंत तातडीने हटवावी पावसाची संततधार सुरू असल्याने शहरातील उड्डाणपूल जोडणाऱ्या भिंतीला सतत तडे जात आहेत. यात भिंतीचा आणखी काही भाग कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्ग ठेकेदाराने जानवली नदी पूल ते एस. एम. हायस्कूल पर्यंतची संपूर्ण भिंत तातडीने हटवावी, अशी मागणी "आम्ही कणकवलीकर' संस्थेचे अध्यक्ष अशोक करंबेळकर यांनी केली आहे. संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 14, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3gUSEtm Read More Read more No comments:
धोंडवाडीतील स्थिती किती भयानक! माळीण दुर्घटनेसारखी पुनरावृत्ती अटळ सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शिरशिंगे गोठवेवाडी पाठोपाठ तेथील धोंडवाडीतील पाच-सहा घरांवर लगतच्या डोंगराचा भाग कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत नुकतीच सरपंच रेखा घावरे व भिकाजी धोंड यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांना याबाबतची कल्पना दिली. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीत शिंरशिंगे येथील गोठवेवाडीच्या वस्तीला लगतच्या डोंगराला भेगा गेल्या होत्या. त्यामुळे तेथील काही घरांना धोका निर्माण झाला होता. हा धोका टाळण्यासाठी डोंगराच्या खालच्या बाजुने शासनाच्या माध्यमातून संरक्षण भिंत बांधली आहे. सद्यस्थित अद्यापही तेथील धोका म्हणावा तसा टळलेला नाही. आता गोठवेवाडी पाठोपाठ लगतच्या धोंडवाडीतील काही घरांना असाच धोका निर्माण झाला असून घराला लागुनच असलेल्या डोंगराचा भाग खाली येण्याची दाट शक्यता आहे. धोंडवाडीतील पाच ते सहा घरे सध्या भीतीच्या छायेत असून गतवर्षी तेथील मुकुंद धोंड यांच्या घराच्या पडवीवर काही डोंगराचा काही भाग आल्याने पडवीचे नुकसान झाले होते. माळीणमध्ये झालेली घटना लक्षात घेता त्यावेळी प्रशासनाने खबरदारी म्हणुन येथील काही घरांना नोटीसा बजावल्या होत्या. सद्यस्थितीत पडणारा मुसळधार पाऊस पाहता डोंगरातून मोठ्या प्रमाणात झरे वाहू लागले असून अधुन-मधुन मातीचा काही भाग पाण्याबरोबर खाली येत आहे. त्यामुळे मोठी अतिवृष्टी झाल्यास याठिकाणी माळीणची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. शासनाने पावले उचलावीत गोठवेवाडी येथील घरांना असलेला धोका लक्षात घेता प्रशासनाने घेतलेली भूमिका व उपाययोजनांच्या दृष्टीने त्याठिकाणी उभारलेली संरक्षण भिंत पाहता धोंडवाडीतील घरांना असलेला धोका व पावसाबरोबर खाली येणारा डांगराचा भाग लक्षात घेऊन प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. सरपंच घावरे यांनी तहसीलदारांच्या भेटीत घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्याबरोबरच तेथे उपाययोजना आखण्याची विनंती केली. तेथील अंकुश धोंड, मुकुंद धोंड, तुकाराम धोंड,विठ्ठल मोरजकर, सुहास धोंड, राजेंद्र सावरवाडकर आदी घराला लागूनच हा डोंगर असून शासनाने वेळीच पावले टाकण्याची गरज व्यक्त होत आहे. संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 14, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2CC0Pfg Read More Read more No comments:
चाकरमान्यांबाबत खल, काय आहे संभ्रम? वाचा... सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात चाकरमान्यांना कसा प्रवेश द्यायचा यावरून खल सुरू आहे. प्रशासन आणि सत्ताधारी निर्णय घेण्यात चालढकल तर करत नाहीत ना? अशी शंका घ्यायला वाव निर्माण झाला आहे. विरोधकही मागे नाहीत. तेही आरोप-प्रत्यारोपात गुंतले आहेत; पण या प्रश्नावर लवकर ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. याबाबत निर्माण झालेल्या दोन्ही प्रकारच्या मत प्रवाहांबाबत सुवर्णमध्य साधला गेला पाहिजे. गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना सिंधुदुर्गात प्रवेश कसा दिला जाणार याची चर्चा पंधरावडाभर सुरू आहे. याचे नियोजन करण्याचे आदेशही निघाले. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची सभासुद्धा झाली; पण त्याचे इतिवृत्त व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा प्रश्न संदिग्धतेच्या गर्तेत आणखी खोल रुतला आहे. या इतिवृत्तात चाकरमान्यांना प्रवेशासाठी 7 ऑगस्टची डेडलाईन दिली होती. शिवाय क्वारंटाईनबाबत विविध निकष चर्चेला आणले होते. गणेशोत्सव 22 ऑगस्टला आहे. इतके दिवस आधी चाकरमानी येऊ शकतील का? या प्रश्नावर इतिवृत्तामुळे तोंड फुटले. सोशल मीडियावर हा विषय ट्रोल झाला. यानंतर झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी हे इतिवृत्त रद्दबातल ठरवण्याची सूचना केली. त्यांनी 7 दिवसांचे क्वारंटाईन करता येईल का, याची चाचपणी होत असल्याचे संकेत दिले. यामुळे गणेशोत्सवाचे नियोजन पुन्हा आहे त्या संभ्रमाच्या अवस्थेत पोहोचले. या प्रश्नाला दोन बाजू आहेत. चाकरमान्यांच्या बाजूने विचार करता अनेकांची घरे कायम बंद असतात. मुंबई-पुणेकर चाकरमानी गणेशोत्सवाला येऊन हा सण साजरा करतात. या सणाशी त्यांचे कित्येक पिढ्यांचे धार्मिक आणि भावनिक नाते आहे. या उत्सवात खंड पाडणे म्हणजे या धार्मिक भावनेला ठेच पोहोचवण्यासारखे आहे. त्यामुळे अशा कुटुंबांना काहीही करून उत्सवासाठी गावी यावेच लागणार. त्यांना 7 ऑगस्टपर्यंतची सिंधुदुर्ग प्रवेशाला डेडलाईन दिल्यास क्वारंनटाईनचे 14 आणि उत्सवाचे जवळपास तितके मिळून महिनाभर जिल्ह्यात राहावे लागणार आहे. त्यांच्या नोकऱ्या, रोजगार आणि महत्त्वाचे म्हणजे इतक्या कालावधीसाठी बंद घरात राहायच्या दृष्टीने असणाऱ्या अपुऱ्या सुविधा याचा विचार करता त्यांना हे फार कठीण आहे. शिवाय उत्सवाला यायचे झाल्यास पूर्ण कुटुंब सोबत आणावे लागणार. त्यांची व्यवस्था करणेही आव्हान आहे. प्रवेशाबाबत निकष लवकर न ठरल्यास त्यांच्यासमोरच्या अडचणी वाढणार आहेत. स्थानिक पातळवीर विचार करता येथे क्वारंनटाईनच्या अपुऱ्या सुविधा आहेत. अनेक शाळांनी आता क्वारंटाईनसाठी इमारत उपलब्ध न करण्याबाबत ठराव दिले आहेत. प्रशासन क्वारंटाईनची जबाबदारी स्थानिक ग्रामकमिटीवर सोपवत आहे; मात्र त्यांना दोन्ही बाजूंनी रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासकीय स्तरावरून फारशी दखल घेतली जात नसल्याचे त्यांचे दुःख आहे. एकाचवेळी हजारोंच्या संख्येने चाकरमानी आल्यास त्यांची व्यवस्था करणे फार कठीण होणार आहे. याआधी साधारण लाखभर चाकरमानी जिल्ह्यात आले. त्या काळात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढले. आताही कमी कालावधीत जास्त लोक आल्यास अशी स्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चतुर्थीच्या काळात आणीबाणीची स्थिती हाताळण्याची क्षमता जिल्ह्याच्या आरोग्ययंत्रणेत आहे का? याचाही विचार करावा लागणार आहे. गोव्यानेही पर्याय योजला, पण... पालकमंत्री सामंत यांनी 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी करता येईल का? याचा विचार करण्याची सूतोवाच केले आहेत. प्रत्यक्षात हा निर्णय घेणे फार कठीण आहे. कारण क्वारंटाईन ही सरकारी फॉर्म्यालीटी नसून कोरोना रुग्ण वाढू नये यासाठीचा उपाय आहे. 14 दिवसांपर्यंत लक्षणे दिसू शकत असल्याने आतापर्यंत हा कालावधी ठरला होता. अचानक हा कालावधी कमी करायचा झाल्यास त्याला वरिष्ठ स्तरावरून तसेच आरोग्य यंत्रणेकडून हिरवा कंदील आवश्यक आहे. तसे झाल्यास गावोगाव कोरोना पसरण्याची भीतीही आहे. 48 तासांत कोरोना चाचणी करणाऱ्यांना प्रवेशाचा पर्याय विचाराधीन आहे; पण इतक्या मोठ्या प्रमाणात चाचणीची व्यवस्था आहे का? हा प्रश्न आहे. हाच पर्याय गोव्यानेही योजला होता; पण त्यांना याचा अंमल करणे फारसे जमले नाही. ठोस निकष गरजेचे एकूणच ही स्थिती अस्वस्थता निर्माण करणारी आहे. गणेशोत्सवाची तारीख जवळ येत आहे. अशावेळी दोन्ही बाजूंचा विचार करून तातडीने सुवर्णमध्य असलेले ठोस निकष जारी करणे आवश्यक आहे. अन्यथा गणेशमूर्तीच्या उंचीबाबत घेतलेल्या उशिराच्या निर्णयासारखी स्थिती होऊ शकेल. दोनच दिवसांपूर्वी घरगुती आणि सार्वजनिक उत्सवातील मूर्तीच्या उंचीबाबत निकष जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी गणेश मूर्ती बनवण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. त्यामुळे हा निर्णय जसा "वरातीमागून घोडे' ठरला तसा चाकरमान्यांबाबतचा होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. चाकरमान्यांसमोरचे प्रश्न * कित्येक बंद घरांमध्ये उत्सव काळात येऊन गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांसमोर अधिक गंभीर प्रश्न * दीर्घकाळ क्वारंटाईन राहण्यात गैरसोयीची शक्यता * आधिच लाखभर चाकरमानी आल्याने क्वारंटाईनसाठी बंद घरे मिळणे कठीण * उत्सवासाठी महिनाभर वेळ खर्च करावा लागण्याची शक्यता * प्रवासासाठीचे पास, प्रवास व्यवस्था खर्चिक आणि किचकट स्थानिक स्तरावरचे प्रश्न * क्वारंटाईन कालावधी घटवल्यास प्रादुर्भावाची भीती * जबाबदारी असलेल्या ग्रामकमिट्यांना अधिकाराच्या मर्यादा * गावस्तरावर अपुऱ्या सुविधा * स्थिती गंभीर बनल्यास आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 14, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3fwXxIV Read More Read more No comments:
गणेश मूर्तिकारांची वाढली धाकधुक, कारणेही तशीच.... सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - चारही बाजूंनी मूर्तिकारांवर आर्थिक चिंता सतावत असताना यंदाही जिल्ह्यातील गणेशोत्सवावर पीओपीचे सावट असल्याने मूर्तिकारांची चिंता कायम आहे. काहीजण आकर्षक व सुबक मूर्ती मिळविण्यासाठी पीओपीच्या मूर्तींकडे आकर्षित झाले आहेत. यंदा जिल्ह्यात पीओपीच्या चार ते पाच हजार मूर्ती आल्याचा अंदाज मूर्तिकारांकडून वर्तविण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये पर्यावरणपूरक गणेश चतुर्थी व्हावी, यासाठी पीओपीच्या मूर्तींना बंदी घालावी अशी मागणी होती; मात्र यंदाही मागणी फेल ठरली आहे. काही नागरिकांनी आकर्षक व सुबक मूर्तींसाठी पीओपीच्या मूर्तींना पसंती दिल्याचे दिसते. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल- मेपासूनच पीओपीच्या मूर्तींचे काम सुरू होत असते. पीओपीच्या साच्यात तयार करून आणलेल्या या मूर्ती आकर्षक व सुबक तयार होऊनच जिल्ह्यात येतात. यंदा कोल्हापूर व पेण येथून मूर्ती दाखल झाल्या आहेत. मातीच्या मूर्तींएवढीच या मूर्तींची किंमत जवळपास निश्चित केलेली असते. मातीच्या मूर्तींमध्ये आवश्यकतेनुसार मूर्ती काम सुरू असताना बदल करता येतो; मात्र पीओपीच्या मूर्तीत तसा बदल करता येत नाही. त्यामुळे या मूर्तींच्या सुबकतेवर मूर्तिकार जीव ओतून काम करतात. पीओपीच्या मूर्तीची किंमत आकारणी त्या मूर्तीच्या आकर्षकता तसेच रेखीव सुबक कामावरून ठरवली जाते. जिल्ह्यात मातीच्या मूर्तींच्या मागणीची संख्या पीओपीपेक्षाही जास्त आहे. विसर्जनानंतरही मूर्ती पाण्यावर तशाच अर्धवट अवस्थेत दिसून आल्याने धार्मिक भावना दुखावत असल्याने आज या पीओपीला मूर्तिकारांसह सर्वसामान्य लोक विरोध करत आहेत. पीओपीचा फटका असा ः जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेश चतुर्थी होण्यासाठी अनेक वर्षे मागणी होत आहे. तसे प्रयत्नही होत होते; मात्र तरीही यंदा कोरोनाचे सावट असतानाही जिल्ह्यात पीओपीच्या मूर्ती दाखल झाल्या आहेत. त्यामुळे काही अंशी का होईना मूर्तिकारांसाठी आर्थिक समस्या आहे. पीओपीच्या मूर्तीमध्ये प्लास्टिक सोनेरी, चंदेरी मणी तसेच इतर अविघटनशील घटक असतात. हे पाण्यात जशास तसे कित्येक वर्षे राहतात. जिल्ह्यातील नद्या या पश्चिम वाहिनी असल्याने अरबी समुद्रात जाऊन मिळतात. त्यामुळे खाडी तसेच समुद्रात असलेली मत्स्य संपदा पीओपीच्या मूर्तींमुळे धोक्यात आली आहे. मातीच्या मूर्तीलाच महत्त्व पर्यावरण खात्याने कुठल्याही प्रकारच्या पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन पाण्यात करू नये, असे आदेश काढले होते; मात्र आदित्य ठाकरे यांनी यंदा वार्षिक सण असल्याने त्याला निर्बंध घालू नयेत, अशी मागणी केल्याने यंदा पीओपीच्या मूर्तींचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती मूर्तिकार संघाचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी "सकाळ'ला दिली. ते म्हणाले, ""धार्मिक मान्यतेनुसार गणेशमूर्ती ही मातीची असावी; पण मातीच्या मूर्तीपेक्षा बरेच जण पीओपीच्या मूर्तींना प्राधान्य देतात. मातीच्या मूर्ती जेवढ्या आकाराने मोठ्या तेवढ्या वजनानेही जड असतात, हे त्या मागचे कारण समजले जाते. पीओपीच्या संदर्भात पुढच्या वर्षी नक्की चांगला निर्णय होईल. पर्यावरणपूरक असा संपूर्ण ठिकाणी गणेशोत्सव होईल, अशी आशा असून धार्मिक भावनेतून पुढच्या वर्षीपासून मातीपासून बनवलेली गणेशाची मूर्ती घरोघरी विराजित होईल. - नारायण सावंत, अध्यक्ष, मूर्तिकार संघ. संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 14, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/391a2Kj Read More Read more No comments:
भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येबद्दल ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या शास्त्रज्ञांनी केला दावा; काय ते वाचा सविस्तर पुणे - देशात अजूनही कोरोना बाधितांच्या संख्येने उच्चांक पातळी गाठलेली नाही. त्यासाठी वेळ तर लागेल, पण जेंव्हा ही पातळी गाठली जाईल तेंव्हा रूग्णसंख्या वाढीची तीव्रताही गंभीर असेल, असा दावा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठाचे डॉ. इयान कुपर आणि इंग्लंडच्या एसेक्स विद्यापीठाच्या डॉ. अर्घा मोंडल व डॉ. चेरीस आँटोनोपोलस यांनी भारतासह इटली, दक्षिण कोरिया आणि इराण मधील जून पर्यंतच्या कोरोना प्रसारावर संशोधन केले आहे. ‘आर्काईव्ह’ या प्रिप्रिंट शोधपत्रिकेत नुकताच हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. कोरोना संशयित, बाधित आणि बरे होणारे रुग्ण यांच्या संख्येवर आधारित ‘एसआयआर’ सिम्यिुलेशनचा वापर शास्त्रज्ञांनी केला आहे. आजवरचे सर्वांत विश्वासार्ह गणिती मॉडेल म्हणून याकडे बघितले जाते. उच्चांक गरजेचा का? संसर्गजन्य आजारांचा प्रसार आणि उपचार घेणारी रूग्णसंख्या टेकडीसारखा आलेख दर्शवते. म्हणजे एकदा ही रुग्णसंख्या उच्च पातळीवर पोचली की ती कमी व्हायला सुरवात होते. अशा वेळीच संसर्गजन्य आजार किती दिवस राहणार याचे पुढचे अनुमान बांधता येते. परंतु निष्काळजीपणा केला तर आजाराची दुसरी लाट येऊ शकते. असे झाले संशोधन ३० जून पर्यंतची कोरोना संबंधीची आकडेवारीचे संकलन. संभाव्य, बाधित आणि बरे होणारे रुग्ण यांच्या संख्येवर गणिती प्रक्रिया. त्याआधारावर सप्टेंबर २०२० पर्यंतचे भाकीत करण्यात आले. निष्कर्ष देशात अजूनही कोरोनाच्या उपचार घेणाऱ्या रूग्णसंख्येने उच्चांक नाही. नवीन बाधितांमुळे संशयित रूग्णसंख्येत वाढ. ॲक्टीव रूग्णसंख्येची उच्चांक गाठल्यानंतर ५ महिन्यांनी देशातील रूग्णसंख्येचा दर ५०० च्या खाली येईल. संशोधनाच्या मर्यादा जून पर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे मांडलेले गणितीय मॉडेल. फक्त सप्टेंबर पर्यंतच्या प्रसाराचे अनुमान. भारतात रुग्ण संख्येचा उच्चांक केंव्हा असेल आणि संख्या किती असेल याबद्दल अध्ययन नाही. संशयित, बाधित, मृत्यू आणि बरे होणारे कोरोना रूग्ण यांच्या वाढीचा कल मांडण्यात आला आहे. उपाययोजना कोरोनाचा प्रसार कमी झाला तरी तो गेला असे समजू नये. काँटेक्ट ट्रेसिंग, चाचण्यांचा वेग, रुग्णांचे विलगीकरण आणि आरोग्यव्यवस्थेची सज्जता आवश्यक. लस येईपर्यंत नागरिकांनी सर्व सूचनांच पालन करणे आवश्यक. बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा देणे बंधनकारक करा देशासह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे; मात्र यावरील उपचारांसाठी औषधांचा कमालीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने रुग्णांसाठी प्लाझ्मा उपचाराचा वापर वाढवावा, तसेच कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा देणे बंधनकारक करावे, अशी मागणी भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) केली आहे. प्लाझ्मा थेरपीच्या उपयुक्ततेबाबत महाराष्ट्रातील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत चाचण्या करण्यात आल्या. गंभीर कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी प्रभावी उपचार ठरली आहे. तरीही महाराष्ट्रातील विविध रुग्णालयांमध्ये याचा पुरेसा वापर केला जात नाही. प्लाझ्मादाते पुरेशा संख्येत उपलब्ध नसल्यामुळे असे घडत असल्याने कोरोनामधून बरे झालेल्यांना प्लाझ्मा देणे बंधनकारक करावे, असे ‘आयएमए’ने म्हटले आहे प्लाझ्मा दानात नियमांचे अडथळे कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरत असलेल्या प्लाझ्मा थेरपीसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) काही नियम घातले आहेत; मात्र हे नियमच प्लाझ्मा दानात अडथळे ठरत असल्याचे समोर येत आहे. शिवाय कोरोनामुक्त झालेले रुग्ण कोरोनाच्या भीतीने पुन्हा रुग्णालयात जाण्यास घाबरतात. या सर्व बाबींमुळे प्लाझ्मादानास अद्यापही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. प्लाझा थेरपीच्या दराबाबत नियमावली केल्यास राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना तसे दर आकारणे बंधनकारक असेल. रुग्णांनाही अधिक किंमत मोजावी लागणार नाही, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक डॉ. अरुण थोरात म्हणाले. राज्यात ९७ टक्के मृत्यू कोरोनामुळे कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांत राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. राज्यात गेल्या चार महिन्यांत एकूण दहा हजार ७८० मृत्यूंची नोंद करण्यात आली. त्यातील दहा हजार ४८२ म्हणजे ९७ टक्के मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाले आहेत. केवळ २९८ म्हणजे २.८ टक्के मृत्यू हे कोरोनाशिवाय इतर कारणांमुळे झाले आहेत. राज्यात सध्या कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या ११ हजाराच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण ८ मार्च रोजी पुण्यात आढळला; तर १७ मार्चला मुंबईत पहिला कोरोनाबळी गेला. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/2AXn6no Latest news updates July 14, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3h11R3G Read More Read more No comments:
रामाचा जन्म नेपाळमधला! - के. पी. ओली काठमांडू - खरी अयोध्या नेपाळमध्ये असून प्रभू श्रीरामाचा जन्मही नेपाळमधील थोरी या गावात झाला होता, असा दावा करत नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्यावर भाजपने जोरदार टीका केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा नेपाळी कवी भानुभक्त यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना ओली म्हणाले की, ''नेपाळ जा सांस्कृतिक अतिक्रमणाला बळी पडलेला देश आहे. या देशाचा इतिहास बदलून टाकला आहे. देवी सीतेचा विवाह अयोध्येचा राजकुमार श्रीरामबरोबर झाल्याचे आपण मानतो. ही अयोध्या म्हणजे नेपाळमधील वीरगंज गाव असून येथील थोरी येथे रामजन्म झाला होता. अयोध्या येथून दूर असल्याने संपर्क यंत्रणा नसताना पूर्वीच्या काळी असा विवाह शक्य नाही. वाल्मिकी आश्रमही नेपाळमध्येच आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्रपतीपदापासून दूर ठेवणार ही पुस्तके! ‘राजा दशरथ नेपाळचा सत्ताधीश होता, त्यामुळे भगवान श्रीरामही नेपाळीच असणार, असा तर्क ओली यांनी लावला. अठराव्या शतकातील कवी भानुभक्त यांनी वाल्मिकी रामायण नेपाळी भाषेत आणले होते. ...म्हणून भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भाजपने ओली यांच्यावर टीका केली. जनतेच्या भावनांशी खेळल्यास भारतात ज्याप्रमाणे डाव्यांची अवस्था झाली, तशीच नेपाळमध्येही होईल, असे भाजप प्रवक्ते विजय सोनकर शास्त्री यांनी म्हटले. प्रभू रामचंद्र हा श्रद्धेचा विषय असून नेपाळच्या पंतप्रधानासह कोणालाही त्याच्याशी खेळण्याचा अधिकार नाही. ओली यांच्या भारतविरोधी धोरणांमुळे आणि मतांमध्ये त्यांच्याच पक्षात फूट पडण्याची चिन्हे असून त्यांचे पदही धोक्यात आले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates July 14, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3gYYie7 Read More Read more No comments: