गणेश मूर्तिकारांची वाढली धाकधुक, कारणेही तशीच.... सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - चारही बाजूंनी मूर्तिकारांवर आर्थिक चिंता सतावत असताना यंदाही जिल्ह्यातील गणेशोत्सवावर पीओपीचे सावट असल्याने मूर्तिकारांची चिंता कायम आहे. काहीजण आकर्षक व सुबक मूर्ती मिळविण्यासाठी पीओपीच्या मूर्तींकडे आकर्षित झाले आहेत. यंदा जिल्ह्यात पीओपीच्या चार ते पाच हजार मूर्ती आल्याचा अंदाज मूर्तिकारांकडून वर्तविण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये पर्यावरणपूरक गणेश चतुर्थी व्हावी, यासाठी पीओपीच्या मूर्तींना बंदी घालावी अशी मागणी होती; मात्र यंदाही मागणी फेल ठरली आहे. काही नागरिकांनी आकर्षक व सुबक मूर्तींसाठी पीओपीच्या मूर्तींना पसंती दिल्याचे दिसते. गणेश चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर एप्रिल- मेपासूनच पीओपीच्या मूर्तींचे काम सुरू होत असते. पीओपीच्या साच्यात तयार करून आणलेल्या या मूर्ती आकर्षक व सुबक तयार होऊनच जिल्ह्यात येतात. यंदा कोल्हापूर व पेण येथून मूर्ती दाखल झाल्या आहेत.  मातीच्या मूर्तींएवढीच या मूर्तींची किंमत जवळपास निश्‍चित केलेली असते. मातीच्या मूर्तींमध्ये आवश्‍यकतेनुसार मूर्ती काम सुरू असताना बदल करता येतो; मात्र पीओपीच्या मूर्तीत तसा बदल करता येत नाही. त्यामुळे या मूर्तींच्या सुबकतेवर मूर्तिकार जीव ओतून काम करतात. पीओपीच्या मूर्तीची किंमत आकारणी त्या मूर्तीच्या आकर्षकता तसेच रेखीव सुबक कामावरून ठरवली जाते. जिल्ह्यात मातीच्या मूर्तींच्या मागणीची संख्या पीओपीपेक्षाही जास्त आहे. विसर्जनानंतरही मूर्ती पाण्यावर तशाच अर्धवट अवस्थेत दिसून आल्याने धार्मिक भावना दुखावत असल्याने आज या पीओपीला मूर्तिकारांसह सर्वसामान्य लोक विरोध करत आहेत.  पीओपीचा फटका असा ः  जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेश चतुर्थी होण्यासाठी अनेक वर्षे मागणी होत आहे. तसे प्रयत्नही होत होते; मात्र तरीही यंदा कोरोनाचे सावट असतानाही जिल्ह्यात पीओपीच्या मूर्ती दाखल झाल्या आहेत. त्यामुळे काही अंशी का होईना मूर्तिकारांसाठी आर्थिक समस्या आहे. पीओपीच्या मूर्तीमध्ये प्लास्टिक सोनेरी, चंदेरी मणी तसेच इतर अविघटनशील घटक असतात. हे पाण्यात जशास तसे कित्येक वर्षे राहतात. जिल्ह्यातील नद्या या पश्‍चिम वाहिनी असल्याने अरबी समुद्रात जाऊन मिळतात. त्यामुळे खाडी तसेच समुद्रात असलेली मत्स्य संपदा पीओपीच्या मूर्तींमुळे धोक्‍यात आली आहे.  मातीच्या मूर्तीलाच महत्त्व  पर्यावरण खात्याने कुठल्याही प्रकारच्या पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन पाण्यात करू नये, असे आदेश काढले होते; मात्र आदित्य ठाकरे यांनी यंदा वार्षिक सण असल्याने त्याला निर्बंध घालू नयेत, अशी मागणी केल्याने यंदा पीओपीच्या मूर्तींचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती मूर्तिकार संघाचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी "सकाळ'ला दिली.  ते म्हणाले, ""धार्मिक मान्यतेनुसार गणेशमूर्ती ही मातीची असावी; पण मातीच्या मूर्तीपेक्षा बरेच जण पीओपीच्या मूर्तींना प्राधान्य देतात. मातीच्या मूर्ती जेवढ्या आकाराने मोठ्या तेवढ्या वजनानेही जड असतात, हे त्या मागचे कारण समजले जाते.  पीओपीच्या संदर्भात पुढच्या वर्षी नक्की चांगला निर्णय होईल. पर्यावरणपूरक असा संपूर्ण ठिकाणी गणेशोत्सव होईल, अशी आशा असून धार्मिक भावनेतून पुढच्या वर्षीपासून मातीपासून बनवलेली गणेशाची मूर्ती घरोघरी विराजित होईल.  - नारायण सावंत, अध्यक्ष, मूर्तिकार संघ.  संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, July 14, 2020

गणेश मूर्तिकारांची वाढली धाकधुक, कारणेही तशीच.... सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - चारही बाजूंनी मूर्तिकारांवर आर्थिक चिंता सतावत असताना यंदाही जिल्ह्यातील गणेशोत्सवावर पीओपीचे सावट असल्याने मूर्तिकारांची चिंता कायम आहे. काहीजण आकर्षक व सुबक मूर्ती मिळविण्यासाठी पीओपीच्या मूर्तींकडे आकर्षित झाले आहेत. यंदा जिल्ह्यात पीओपीच्या चार ते पाच हजार मूर्ती आल्याचा अंदाज मूर्तिकारांकडून वर्तविण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये पर्यावरणपूरक गणेश चतुर्थी व्हावी, यासाठी पीओपीच्या मूर्तींना बंदी घालावी अशी मागणी होती; मात्र यंदाही मागणी फेल ठरली आहे. काही नागरिकांनी आकर्षक व सुबक मूर्तींसाठी पीओपीच्या मूर्तींना पसंती दिल्याचे दिसते. गणेश चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर एप्रिल- मेपासूनच पीओपीच्या मूर्तींचे काम सुरू होत असते. पीओपीच्या साच्यात तयार करून आणलेल्या या मूर्ती आकर्षक व सुबक तयार होऊनच जिल्ह्यात येतात. यंदा कोल्हापूर व पेण येथून मूर्ती दाखल झाल्या आहेत.  मातीच्या मूर्तींएवढीच या मूर्तींची किंमत जवळपास निश्‍चित केलेली असते. मातीच्या मूर्तींमध्ये आवश्‍यकतेनुसार मूर्ती काम सुरू असताना बदल करता येतो; मात्र पीओपीच्या मूर्तीत तसा बदल करता येत नाही. त्यामुळे या मूर्तींच्या सुबकतेवर मूर्तिकार जीव ओतून काम करतात. पीओपीच्या मूर्तीची किंमत आकारणी त्या मूर्तीच्या आकर्षकता तसेच रेखीव सुबक कामावरून ठरवली जाते. जिल्ह्यात मातीच्या मूर्तींच्या मागणीची संख्या पीओपीपेक्षाही जास्त आहे. विसर्जनानंतरही मूर्ती पाण्यावर तशाच अर्धवट अवस्थेत दिसून आल्याने धार्मिक भावना दुखावत असल्याने आज या पीओपीला मूर्तिकारांसह सर्वसामान्य लोक विरोध करत आहेत.  पीओपीचा फटका असा ः  जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेश चतुर्थी होण्यासाठी अनेक वर्षे मागणी होत आहे. तसे प्रयत्नही होत होते; मात्र तरीही यंदा कोरोनाचे सावट असतानाही जिल्ह्यात पीओपीच्या मूर्ती दाखल झाल्या आहेत. त्यामुळे काही अंशी का होईना मूर्तिकारांसाठी आर्थिक समस्या आहे. पीओपीच्या मूर्तीमध्ये प्लास्टिक सोनेरी, चंदेरी मणी तसेच इतर अविघटनशील घटक असतात. हे पाण्यात जशास तसे कित्येक वर्षे राहतात. जिल्ह्यातील नद्या या पश्‍चिम वाहिनी असल्याने अरबी समुद्रात जाऊन मिळतात. त्यामुळे खाडी तसेच समुद्रात असलेली मत्स्य संपदा पीओपीच्या मूर्तींमुळे धोक्‍यात आली आहे.  मातीच्या मूर्तीलाच महत्त्व  पर्यावरण खात्याने कुठल्याही प्रकारच्या पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन पाण्यात करू नये, असे आदेश काढले होते; मात्र आदित्य ठाकरे यांनी यंदा वार्षिक सण असल्याने त्याला निर्बंध घालू नयेत, अशी मागणी केल्याने यंदा पीओपीच्या मूर्तींचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती मूर्तिकार संघाचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी "सकाळ'ला दिली.  ते म्हणाले, ""धार्मिक मान्यतेनुसार गणेशमूर्ती ही मातीची असावी; पण मातीच्या मूर्तीपेक्षा बरेच जण पीओपीच्या मूर्तींना प्राधान्य देतात. मातीच्या मूर्ती जेवढ्या आकाराने मोठ्या तेवढ्या वजनानेही जड असतात, हे त्या मागचे कारण समजले जाते.  पीओपीच्या संदर्भात पुढच्या वर्षी नक्की चांगला निर्णय होईल. पर्यावरणपूरक असा संपूर्ण ठिकाणी गणेशोत्सव होईल, अशी आशा असून धार्मिक भावनेतून पुढच्या वर्षीपासून मातीपासून बनवलेली गणेशाची मूर्ती घरोघरी विराजित होईल.  - नारायण सावंत, अध्यक्ष, मूर्तिकार संघ.  संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/391a2Kj

No comments:

Post a Comment