धोंडवाडीतील स्थिती किती भयानक! माळीण दुर्घटनेसारखी पुनरावृत्ती अटळ सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शिरशिंगे गोठवेवाडी पाठोपाठ तेथील धोंडवाडीतील पाच-सहा घरांवर लगतच्या डोंगराचा भाग कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत नुकतीच सरपंच रेखा घावरे व भिकाजी धोंड यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांना याबाबतची कल्पना दिली.  गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीत शिंरशिंगे येथील गोठवेवाडीच्या वस्तीला लगतच्या डोंगराला भेगा गेल्या होत्या. त्यामुळे तेथील काही घरांना धोका निर्माण झाला होता. हा धोका टाळण्यासाठी डोंगराच्या खालच्या बाजुने शासनाच्या माध्यमातून संरक्षण भिंत बांधली आहे. सद्यस्थित अद्यापही तेथील धोका म्हणावा तसा टळलेला नाही. आता गोठवेवाडी पाठोपाठ लगतच्या धोंडवाडीतील काही घरांना असाच धोका निर्माण झाला असून घराला लागुनच असलेल्या डोंगराचा भाग खाली येण्याची दाट शक्‍यता आहे. धोंडवाडीतील पाच ते सहा घरे सध्या भीतीच्या छायेत असून गतवर्षी तेथील मुकुंद धोंड यांच्या घराच्या पडवीवर काही डोंगराचा काही भाग आल्याने पडवीचे नुकसान झाले होते.  माळीणमध्ये झालेली घटना लक्षात घेता त्यावेळी प्रशासनाने खबरदारी म्हणुन येथील काही घरांना नोटीसा बजावल्या होत्या. सद्यस्थितीत पडणारा मुसळधार पाऊस पाहता डोंगरातून मोठ्या प्रमाणात झरे वाहू लागले असून अधुन-मधुन मातीचा काही भाग पाण्याबरोबर खाली येत आहे. त्यामुळे मोठी अतिवृष्टी झाल्यास याठिकाणी माळीणची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.  शासनाने पावले उचलावीत  गोठवेवाडी येथील घरांना असलेला धोका लक्षात घेता प्रशासनाने घेतलेली भूमिका व उपाययोजनांच्या दृष्टीने त्याठिकाणी उभारलेली संरक्षण भिंत पाहता धोंडवाडीतील घरांना असलेला धोका व पावसाबरोबर खाली येणारा डांगराचा भाग लक्षात घेऊन प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. सरपंच घावरे यांनी तहसीलदारांच्या भेटीत घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्याबरोबरच तेथे उपाययोजना आखण्याची विनंती केली. तेथील अंकुश धोंड, मुकुंद धोंड, तुकाराम धोंड,विठ्ठल मोरजकर, सुहास धोंड, राजेंद्र सावरवाडकर आदी घराला लागूनच हा डोंगर असून शासनाने वेळीच पावले टाकण्याची गरज व्यक्त होत आहे. संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, July 14, 2020

धोंडवाडीतील स्थिती किती भयानक! माळीण दुर्घटनेसारखी पुनरावृत्ती अटळ सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शिरशिंगे गोठवेवाडी पाठोपाठ तेथील धोंडवाडीतील पाच-सहा घरांवर लगतच्या डोंगराचा भाग कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत नुकतीच सरपंच रेखा घावरे व भिकाजी धोंड यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांना याबाबतची कल्पना दिली.  गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीत शिंरशिंगे येथील गोठवेवाडीच्या वस्तीला लगतच्या डोंगराला भेगा गेल्या होत्या. त्यामुळे तेथील काही घरांना धोका निर्माण झाला होता. हा धोका टाळण्यासाठी डोंगराच्या खालच्या बाजुने शासनाच्या माध्यमातून संरक्षण भिंत बांधली आहे. सद्यस्थित अद्यापही तेथील धोका म्हणावा तसा टळलेला नाही. आता गोठवेवाडी पाठोपाठ लगतच्या धोंडवाडीतील काही घरांना असाच धोका निर्माण झाला असून घराला लागुनच असलेल्या डोंगराचा भाग खाली येण्याची दाट शक्‍यता आहे. धोंडवाडीतील पाच ते सहा घरे सध्या भीतीच्या छायेत असून गतवर्षी तेथील मुकुंद धोंड यांच्या घराच्या पडवीवर काही डोंगराचा काही भाग आल्याने पडवीचे नुकसान झाले होते.  माळीणमध्ये झालेली घटना लक्षात घेता त्यावेळी प्रशासनाने खबरदारी म्हणुन येथील काही घरांना नोटीसा बजावल्या होत्या. सद्यस्थितीत पडणारा मुसळधार पाऊस पाहता डोंगरातून मोठ्या प्रमाणात झरे वाहू लागले असून अधुन-मधुन मातीचा काही भाग पाण्याबरोबर खाली येत आहे. त्यामुळे मोठी अतिवृष्टी झाल्यास याठिकाणी माळीणची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.  शासनाने पावले उचलावीत  गोठवेवाडी येथील घरांना असलेला धोका लक्षात घेता प्रशासनाने घेतलेली भूमिका व उपाययोजनांच्या दृष्टीने त्याठिकाणी उभारलेली संरक्षण भिंत पाहता धोंडवाडीतील घरांना असलेला धोका व पावसाबरोबर खाली येणारा डांगराचा भाग लक्षात घेऊन प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. सरपंच घावरे यांनी तहसीलदारांच्या भेटीत घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्याबरोबरच तेथे उपाययोजना आखण्याची विनंती केली. तेथील अंकुश धोंड, मुकुंद धोंड, तुकाराम धोंड,विठ्ठल मोरजकर, सुहास धोंड, राजेंद्र सावरवाडकर आदी घराला लागूनच हा डोंगर असून शासनाने वेळीच पावले टाकण्याची गरज व्यक्त होत आहे. संपादन ः राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2CC0Pfg

No comments:

Post a Comment