BHU का दावा- 4 से 6 घंटे में हो सकेगी कोरोना की सटीक और सस्ती जांच https://ift.tt/2wS2BX8 Latest news updates March 30, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
मरकज के कार्यक्रम को रद्द करने के लिए पुलिस ने 2 दो बार दिया था नोटिस https://ift.tt/2Jqo8sH Latest news updates March 30, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
घर में पोछा लगाते हुए छलका भारती का दर्द, कहा- अब नहीं चाहिए बड़ा घर https://ift.tt/39q4Y0I Latest news updates March 30, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
गुरु का राशि परिवर्तन: कर्क राशि वालों की चमकेगी किस्मत, जानें अपना हाल https://ift.tt/2UsH5kX Latest news updates March 30, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
रामायण-महाभारत के बाद टेलिकास्ट होगा बच्चों का चहेता शो शक्तिमान https://ift.tt/2wHevTY Latest news updates March 30, 2020 0 Comments via आज तक Read More Read more No comments:
Coronavirus : सातारा जिल्ह्यातील १४ संशीयत रुग्ण दाखल; दाेन इस्लामपूर रुग्णांच्या संपर्कातील सातारा : सातारा जिल्ह्यात ता. 15 मार्च नंतर परदेश प्रवास करुन आलेले सात प्रवासी कोरोना अनुमानित म्हणुन रुग्ण दाखल झाले आहेत. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात येत आहेत.तसेच सातारा जिल्हयातील एक पुरुष व एक महिला हे दाेन रहिवाशी इस्लामपुर येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना देखील अनुमानित रुग्ण म्हणुन साेमवारी (ता.३०) दाखल करून घेण्यात आले आहे. त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात येत आहेत. याबराेबरच सातारा जिल्ह्यातील एक 38 वर्षीय पुरुषाला कोरडा खोकला व श्वसनाचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करुन त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील कष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील विलगीकरण कक्षात 28 मार्च रोजी 48 वर्षीय पुरुषास ताप व श्वसनास त्रास होत असल्याने, ता. .29 मार्च रोजी 80 वर्षीय पुरुष व चार वर्षीय मुलास श्वसनास त्रास व खोकला असल्याने आणि ता. 30 मार्च रोजी एका वर्षाच्या मुलीस ताप व खोकला आल्याने दाखल केले आहे. या सर्व चार रुग्णांना कोरोनाचे अनुमानित रुग्ण म्हणून दाखल केले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. प्राथमिक तपासण्यानंतर त्याची प्रकृती स्थिर असून उपचार चालु आहेत. हे रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढील उपचार ठरवण्यात येतील. सातारा जिल्ह्यातील वय 57 वर्षीय एका महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आणि पॅरिस येथून प्रवास करुन आलेल्या 35 वर्षीय पुरुषाला कोरडा खोकला असल्याने जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या दोन अनुदमानित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही.कडे पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट मिळाले असून त्यांना कोविड 19 चा बाधा नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. Video : कोरोनाच्या टेस्ट कृष्णात शक्य; सरकारच्या परवानगीची आवश्यकता : डॉ. सुरेश भोसले News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 30, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2Jpwb9d Read More Read more No comments:
पुणे विभागात सध्या किती आहेत कोरोनाबाधित? वाचा पुणे ४३, सातारा २, सांगली २५, कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांना संसर्ग पुणे - पुणे विभागात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रूग्णांच्या संख्येत आठने वाढ झाली आहे. आज (ता. ३०) एकूण रुग्ण संख्या ७२ झाली आहे. त्यात पुणे ४३, सातारा २, सांगली २५ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आली. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाच्या संशयित एक हजार ३६५ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी एक हजार २८२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, ८३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्राप्त अहवालापैकी एक हजार १९३ नमुने निगेटिव्ह आहेत. तर, ६७ नमुने पॉझिटिव्ह आहेत. तसेच २२ जणांच्या नमुन्यांचा अद्याप निष्कर्ष काढता आलेला नाही. आत्तापर्यंत १५ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. पुणे विभागात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सात हजार ३९७ प्रवाशांपैकी चार हजार ३८१ प्रवाशांबाबत पाठपुरावा सुरू आहे. त्यापैकी ३ हजार १६ प्रवाशांचा पाठपुरावा पूर्ण झालेला आहे. म्हणजेच ३ हजार १६ व्यक्तींचा 'होम कॉरंनटाइन' कालावधी पूर्ण झाला असून, चार हजार ३८२ व्यक्ती अजूनही कॉरंनटाइनमध्ये आहेत. पुणे विभागातील स्थिती -अन्न व औषध प्रशासनाकडून 'एन ९५' मास्क : २८ हजार ५८९ -'२ प्लाय' आणि '३प्लाय' मास्क उपलब्ध : २ लाख ९ हजार २४ -भाजीपाला आवक : १२ हजार ९८४ क्विंटल -दूध संकलन : ८९ लाख ८८ हजार लिटर 'पीएमपी'ची सेवा अत्यावश्यक सेवेसाठीच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) रविवारी (ता. २९) एकूण २१ हजार ६०३ फेऱ्यांपैकी १९ हजार ९९३ फेऱ्या रद्द केल्या होत्या. १ हजार ६१० फेऱ्यांमध्ये एकूण ५ हजार १६१ प्रवाशांनी प्रवास केला. सद्यस्थितीत अत्यावश्यक बाबींसाठी फेर्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 30, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2JqOXNx Read More Read more No comments:
एकीकडे कोरोनाची धास्ती, दुसरीकडे जीवाची घालमेल वैभववाडी (सिधुदुर्ग) - चिरेखाणीपासून वाळूच्या खाणीपर्यंत आणि रस्ते खडीकरण, डांबरीकरणापासून ते बांधकामाची विविध कामे करणारे कर्नाटकमधील दहा हजारहून अधिक कामगार संचारबंदीमुळे जिल्ह्यात अडकले आहेत. ते करीत असलेले कामच सध्या बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच कुटुंबीयाकडून सतत फोन येत असल्यामुळे या कामगारांच्या जीवाची घालमेल देखील वाढली आहे. काहींनी परतण्याचा प्रयत्न केला; परंतु कडक पोलिस बंदोबस्तांमुळे त्यांना जिल्ह्याची सीमा ओलांडता आलेली नाही. जिल्ह्यातील शेकडो चिरेखाणी, वाळूच्या खाणी, रस्ते खडीकरण-डांबरीकरण करणे, क्रशर, सेट्रिंग, स्लॅब घालणे, विहिरी खोदणे, बांधकाम करणे ही कामे कर्नाटकमधील विजापूर, हुबळी, बेळगाव या भागातील मजूर करतात. जिल्ह्यात मजुरांची वाणवा असल्यामुळे ठेकेदार किंवा बांधकाम व्यवसायात काम करणारे शेकडो व्यावसायिक या मजुरांना आगाऊ रक्कम देऊन कामासाठी जिल्ह्यात आणतात. जिल्ह्यातील बहुतांशी चिरेखाणीवर या भागातील मजूर आहेत. याशिवाय वाळूच्या खाणीवर देखील अधिकतर याच भागातील कामगार पाहायला मिळतात. जिल्ह्यात सुमारे दहा हजारपेक्षा अधिक मजूर कर्नाटकमधील आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशात संचारबंदी करण्यात आली. त्यामुळे हे कामगार काम करीत असलेल्या चिरेखाणी, वाळूच्या खाणी बंद झाल्या आहेत. बांधकामांच्या कामांना देखील पूर्णविराम मिळाला आहे. रस्ते खडीकरण, डांबरीकरणाची कामे देखील बंदच आहेत. सर्व कामे बंद झाल्यामुळे कामगारांमध्ये बेचैनी पसरली आहे. कर्नाटकमधील कामगार नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात येतात. डिसेंबर ते मे या कालावधीत त्यांच्या हाताला सतत काम लागते. सहा महिने गावाकडची शेती आणि सहा महिने मजुरी करण्यावरच त्यांचा भर असतो. त्यामुळे सहा महिन्यात अधिकाधिक पैसे मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो; परंतु आता सर्व कामच बंद असल्यामुळे हे मजूर हवालदिल झाले आहेत. काम नसल्यामुळे बसून किती दिवस खायचे? म्हणून काही मजुरांनी गावी जाण्याचा प्रयत्न केला; परंतु कडक पोलिस बंदोबस्तांमुळे त्यांना माघारी परतावे लागले. राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याची माहिती विविध वाहिन्यांवरून कर्नाटकमधील या कामगारांच्या कुटुंबीयांना मिळत आहे. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. कुटुंबीयांकडून सतत फोन करून गावी येण्यासाठी तगादा लावला जात आहे. येथे काम नाही आणि गावाकडे जाता येत नाही, त्यामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. नेमके काय करावे? ते या मजुरांना सूचत नाही. त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. अनेक खाणीवरील कामगार टेम्पो किवा अन्य वाहनाने जिल्ह्याच्या सीमेवर जाऊन पोलिसांना आणाभाका घेऊन सोडण्यासाठी आग्रह करीत आहेत; परंतु जिल्हा आणि राज्यबंदीचा निर्णय असल्यामुळे पोलिस कुणालाही जिल्ह्याबाहेर सोडत नाहीत. त्यामुळे कधी आंबोली तर कधी फोंडा, करूळ घाटातील तपासणी नाक्यावरून जाता येते का? याची सतत हे कामगार चाचपणी करीत आहेत. अनामिक भीती सध्या 21 दिवसांची संचारबंदी असली तरी त्यामध्ये वाढ होईल, अशी अनामिक भीती या मजुरांमध्ये आहे. संचारबंदी वाढली तर येथे बसून करायचे काय? आणि खायचे काय? हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. दीड-दोन महिन्यात मिळविलेले पैसे येथेच खर्च केले तर गावी काय न्यायचे? शेतीसाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आम्हाला आमच्या कुटुंबीयांकडे जायचं आहे. तेथे जाण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी त्यांची मागणी आहे. जिल्ह्यातील बेघर तसेच परराज्यातील मजुर यांच्यासाठी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक तालुकास्तरावर ही व्यवस्था करण्यात आली आहे. गरीब लोकांना वैद्यकीय सेवा घरपोच देण्याची व्यवस्था देखील करण्यात आली असून ही सेवा ग्रामपंचायत व नगरपंचायत कर्मचारी किंवा स्वयंसेवकांमार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. - के. मंजूलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 30, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3bvqHpw Read More Read more No comments:
Video : कोरोनाच्या टेस्ट "कृष्णा'त शक्य; सरकारच्या परवानगीची आवश्यकता : डॉ. सुरेश भोसले कऱ्हाड ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका विचारात घेऊन कृष्णा हॉस्पिटलमध्ये 60 बेडचे दोन क्वारंटाइन व दोन आयसोलेशन वॉर्ड तयार केले आहेत. तेथे तज्ज्ञ डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी तैनात केल्याची माहिती कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृष्णा हॉस्पिलमध्ये करण्यात आलेल्या तयारीची माहिती देताना ते बोलत होते. डॉ. भोसले म्हणाले,"" कृष्णा हॉस्पिटलमध्ये साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांतून उपचारासाठी रुग्ण येतात. भविष्यातील कोरोनाचा धोका विचारात घेऊन रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने कृष्णा हॉस्पिटलमध्ये 60 बेडचे 4 स्वतंत्र वॉर्ड तयार केले आहेत. ज्यामध्ये 25 बेड पुरुषांसाठी, 25 बेड महिलांसाठी आणि 10 बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तेथे स्वतंत्र 'आयसीयु' आणि व्हेंटिलेटरचीही सोय करण्यात आली आहे. हॉस्पिटलमध्ये 40 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटर असणारे हे जिल्ह्यातील हे एकमेव हॉस्पिटल आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कोरोनाच्या टेस्ट "कृष्णा'त शक्य पुणे, मुंबई आणि नागपूर इथेच सध्या कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. कृष्णा हॉस्पिटलमध्ये "एनएबीएल' मानांकित दोन रोगनिदान प्रयोगशाळा असून, सरकारने परवानगी दिल्यास इथेच संशयित रुग्णांच्या कोरोनाविषयक टेस्ट करणे शक्य होणार आहे, अशी माहिती डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. गावातील माणुसकी आटली : २२ तासानंतरही मृतदेह जागेवरच; अखेर ग्रामसेवकांनी दिला भडाग्नी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 30, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2QYGyFg Read More Read more No comments:
पेट्रोल पंप चालकांची अशीही मनमानी कोल्हापूर - संचारबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेत असलेल्या वाहनांनाच पेट्रोल-डिझेलची विक्री केली जात आहे. तरीही बॅंक कर्मचाऱ्यांना पेट्रोल देण्यास पंपावरील कर्मचाऱ्यांकडून नकार दिला जात आहे. ओळखपत्र दाखविल्यानंतर केवळ नॅशनल बॅंकातील कर्मचाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देतो, असे सांगितले जाते. अत्यावश्यक सेवेची यादी शासनाकडून जाहीर केली आहे. त्यात बॅंकेचे अधिकारी-कर्मचारी यांचाही समावेश आहे. अशा कर्मचाऱ्यांना बॅंकेत ये-जा करण्यासाठी पेट्रोल देणे आवश्यक आहे. तरीही फुलेवाडी येथील एका पंपावर बॅंक कर्मचाऱ्यांने पेट्रोल देण्यास नकार दिला. यावेळी त्यांनी मी काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथून आलो आहे. स्वतःचे ओळखपत्र दाखवले, ओळख सांगितली. तरीही त्यांना कर्मचाऱ्यांनी येथे थांबायचे नाही, असे सुनावले. यावेळी बॅंक कर्मचाऱ्यांनी आम्ही अत्यावश्यक सेवेत आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी बेँकेत आहे. असे ही सांगितले. मात्र त्या कर्मचाऱ्याने उद्धट वर्तन करीत केवळ अत्यावश्यक सेवेतील नॅशनल बॅंकांतील कर्मचारी-अधिकाऱ्यांनाच पेट्रोल देण्याचे आदेश आहेत. "आम्ही तुम्हाला पेट्रोल देणार नाही, असे सांगून त्या कर्मचाऱ्याला हाकलून दिले. संबंधित कर्मचाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले, की बॅंकेतील कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी स्वतःची दुचाकी वापरावी लागते. बॅंक सुरू असते. तर को-ऑपरेटिव्ह बॅंकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, असे का सांगितले जाते. पेट्रोल मिळाले नाही तर बॅंकेपर्यंत यायचे कसे ? केवळ नॅशनल बॅकांनाच पेट्रोल देण्याचा कोणता आदेश असल्यास जिल्हाधिकाऱ्यांना तो जाहीर करावा, व को-ऑपरेटिव्ह बॅंका बंद कराव्यात. अन्यथा आम्हाला पेट्रोल देण्याच्या सूचना पंप चालकांना कराव्यात. पेट्रोल पंपावर सर्व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना पेट्रोल दिले पाहिजे. केवळ नॅशनल बॅंकांच्या कर्मचाऱ्यांना पेट्रोल देणे चुकीचे आहे. सर्वच बॅंक कर्मचाऱ्यांना-अधिकाऱ्यांना पेट्रोल देणे आवश्यक आहे. ज्यांनी सहकारी बॅंक कर्मचाऱ्यांना पेट्रोल देण्यास नकार दिला आहे. त्यांच्यावर जिल्हा पुरवठा विभागाकडून योग्य ती कारवाई करू. - वैभव नावडकर, करवीर, प्रांताधिकारी. कोणतीही बॅंक, पतसंस्था असली तरीही कर्मचारी-अधिकाऱ्यांना पंपावर पेट्रोल दिले जाईल. संबंधित पेट्रोल पंप चालकांना याबाबत योग्य त्या सुचना दिल्या आहेत. संबंधितांनीही एकाच वेळी जादा रक्कमेचे पेट्रोल घ्यावे. ज्यामुळे वारंवार पेट्रोल पंपावर यावे लागू नये. - गजकुमार मानगावे, अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशन. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 30, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/2URWpGE Read More Read more No comments:
व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिन आहात ? काळजी घ्या, अन्यथा सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक एप्रिलला "जमावबंदी उठली' किंवा "रस्त्यावर एकत्र या' यासारखे फसवे मेसेज व्हायरल करून "एप्रिल फुल' करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंनी दिला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या दोन संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले. एका संशयित युवकाला कोरोनासदृश लक्षणे असल्यामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. एक एप्रिल हा "एप्रिल फुल' म्हणून साजरा केला जातो. या वेळी नागरिकांकडून एकमेकांना चुकीचे संदेश देऊन गंमत म्हणून फसवण्याचे प्रकार होतात. त्यातून दिवसभरात अनेक अफवांचे पेव फुटतात. सोशल मीडियाच्या काळात त्यामध्ये आणखी भर पडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी "एप्रिल फुल'च्या दिवशी (बुधवारी) काळजी घेण्याचे आवाहन सातपुते यांनी केले आहे. एक एप्रिलला "जमावबंदी उठली आहे, सर्वांनी रस्त्यावर एकत्र जामायचे आहे,' अशा प्रकारचे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर पसरवले जाऊ शकतात. नागरिकांनी अशा कोणत्याही मेसेजला बळी पडून रस्त्यावर येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. अशा प्रकारचे मेसेज पसरविणाऱ्यांवर सायबर विभागाकडून कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कोणीही असे मसेज तयार करू नयेत, तसेच आले तर ते फॉरवर्ड करू नयेत. ग्रुप ऍडमिननीही आपल्या ग्रुपवर याबाबत काळजी घेण्याचा मेसेज सर्व सदस्यांना द्यावा. एक एप्रिलला "ओन्ली ऍडमिन कॅन सेंड मेसेज' असे सेटिंग व्हॉट्सऍप ग्रुपवर करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. दरम्यान, कोरोनासदृश लक्षणे असलेल्या दोन संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले. आज एका 38 वर्षांच्या युवकाला कोरडा खोकला व श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. गावातील माणुसकी आटली : २२ तासानंतरही मृतदेह जागेवरच; अखेर ग्रामसेवकांनी दिला भडाग्नी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 30, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3axi3GL Read More Read more No comments:
चिंताजनक! शेकडो टन कलिंगडांचे करायचे काय? वैभववाडी (सिंधुदुर्ग) - "कोरोना'मुळे शेतात परिपक्व झालेले जिल्ह्यातील विविध गावातील शेकडो टन कलिंगड पीक संकटात सापडले आहे. शेतातच माल सडत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने शेतमाल विक्रीसाठी पास देण्यास सुरूवात केली असली तरी व्यापारी माल उचलण्यास तयार नाहीत. बाजारपेठांमध्ये लोकच नसतील तर माल घेऊन करायचे काय? असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे. त्यामुळे कलिंगड पिकावर अर्थकारण चालणाऱ्या गावांचे अर्थकारण कोलमडणार आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षात कलिंगड पिकाने अनेक शेतकऱ्यांना आधार दिला. जिल्ह्यानजीक असलेल्या गोव्यातील पर्यटनामुळे तेथे जिल्ह्यातील कलिंगडला मोठी मागणी आहे. पावसाळा संपला की नोव्हेंबरपासून कलिंगड लागवडीला जिल्ह्यात सुरू होते. साधारणपणे जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्हयातून कलिंगड उत्पादन सुरू होते. जिल्ह्यातील माल स्थानिक पातळीवर विक्री केला जातोच; परंतु त्याहीपेक्षा गोव्यात कलिंगडला मोठी मागणी असते. गोवा, बांदा येथील अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कलिंगड खरेदी करतात. जिल्ह्यात हजारो एकरवर कलिंगड लागवड केली जाते. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार टप्प्पा-टप्प्याने ही लागवड शेतकरी करीत असतो. या वर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यांपासून मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कलिंगडला साधारणपणे 9 ते 10 रुपये होलसेलचा दर होता; परंतु मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढला. त्यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. त्याचा मोठी किंमत इतर क्षेत्राप्रमाणे शेतीक्षेत्राला देखील मोजावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शेकडो टन माल परिपक्व झाला आहे. काहींचा संपूर्ण माल सडला आहे तर काही शेतकऱ्यांनी सुरूवातीला फक्त 20 ते 25 टन माल विकला उर्वरित दीडशे ते दोनशे टन माल अजूनही शेतातच आहे. शेतमाल विक्रीसाठी महसूल, कृषी विभागाकडून पास मिळतात; परंतु बाजारपेठेत ग्राहक नसल्यामुळे व्यापारी कलिंगड घेण्यासाठी पुढे येत नाहीत. अनेकांनी कर्जे काढून शेती केली आहे. त्यांच्या कर्ज परतफेडीचा प्रश्न निर्माण होणार आहे. कलिंगड, आंबा किंवा अन्य फळांच्या विक्री करण्यासाठी शासनाने पासची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कलिंगड तयार असून त्याची नासाडी होत आहे हे वास्तव आहे; परंतु ही समस्या सर्वच ठिकाणच्या विविध फळांच्या बाबतीत घडत आहे. जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात येईल. - एस. जी. बागल, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंधुदुर्ग आठ एकरात कलिंगड शेती असून दीड एकरातील काढणी पूर्ण झाली आहे. सरासरी एकरी 25 ते 30 टन उत्पादन मिळाले; परंतु अजुन साधारणपणे 140 ते 150 टन उत्पादन मिळेल. आता 30 टन मालाची नासाडी झाली आहे. चार दिवसात 50 टन माल परिपक्व होईल. संचारबंदीमुळे माल खरेदी होणार नाही. त्यामुळे कलिंगडचे करायचे काय? - दीपक कासोटे, शेतकरी, गडमठ, वैभववाडी तीन एकरात कलिंगड शेती होती. मल्चिंग, ठिबक सिंचनचा वापर करून लागवड केली होती; परंतु उत्पादनाला सुरूवात होताच "कोरोना'चा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे एक दोन टन मालाचीच विक्री झाली. सध्या शेतात 60 टन माल आहे. साधारणपणे सहा ते सात लाखांचे नुकसान होणार आहे. - किरण रावराणे, आर्चिणे, वैभववाडी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 30, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/3bDPtni Read More Read more No comments:
कामासाठी आले नी गावातच अडकले, भटक्यांना गावकऱ्यांनी दिला मदतीचा हात गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : गावात लोहाराचे काम करणारी मध्यप्रदेशातील भटक्या समुदायातली नऊ कुटुंब गेल्या महिनाभरापासून वास्तव्यास होती. कोरोनाने काम थांबले. या कुटुंबातील जवळपास 40 सदस्यांचे अक्षरश: खाण्यापिण्याचे वांधे झाले. मग काय गावकरी मंडळींनी निर्णय घेतला. अशा संकटसमयीदेखील लोकवर्गणी करून 9000 रुपये जमा केले. या पैशातून त्या सगळ्यांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. सोबतच प्रत्येक महिलेला तीनशे रुपये देण्यात आले. विठ्ठलवाडावासीयांच्या या संवेदनशीलतेने मध्यप्रदेशातील लोहार कुटुंबियांचे डोळे पाणावले. उन्हाळ्याच्या दिवसांत रोजगाराची संधी नसल्याने आपले कुटुंब घेऊन मध्यप्रदेशातील नऊ कुटुंब गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाड्यात आली. लोहार समाजातील ही मंडळी शेतीउपयोगी साहित्य तयार करून त्यातून मिळालेल्या कमाईतून आपल्या 40 सदस्यांचे कसेबसे पोट भरीत होती. गेल्या महिनाभरापासून ते इथेच आहेत. देशात अचानक कोरोनाने दस्तक दिली. अन् होत्याचे नव्हते झाले. लॉकडाऊनने गेल्या दहा दिवसांपासून ते बेरोजगार झाले. भलेमोठे कुटुंब, उरलेसुरले सगळे साहित्यही संपलेले. अशात पोटाचे काय होणार ही चिंता सताऊ लागली. गावखेड्यातील दिलदार लोकांना या भटक्या कुटुंबाची अवस्था बघविल्या गेली नाही. प्रशासन त्यांना मदत करेल याची वाट न बघता गावकऱ्यांनी एक निर्णय घेतला. त्यांना मदत करण्याचा. - या शहरातील चक्क नऊ डॉक्टरांना केले क्वारंटाईन, हे कारण ठरले कारणीभूत.. अन् मग काय अनेक हात समोर आले. यातून 9000 रुपये जमा झाले. या पैशातून त्यांनी लोहाराच्या 9 कुटुंबातील सदस्यांना पंधरा दिवस पुरेल एवढे साहित्य खरेदी करून दिले. एवढेच नाही तर प्रत्येक महिलेला तीनशे रुपये दिले. विठ्ठलवाडावासीयांची ही सह्रदयता बघून अख्ख्या बिऱ्हाडाचे डोळे पाणावले. खरं तर विठ्ठलवाडा हे लहानसे गाव राजकीयदृष्टीने प्रेरीत असणारे. राजकारणातून अनेकदा तंटेही झालेत. पण या संकटकाळात गावाने आपले वेगळेपण दाखविले. माणुसकी हीच तर असते याचा परियचदेखील दिला. गुराढोरांचीही काळजी लोहारांच्या कुटुंबासोबत असलेल्या त्यांच्या गुराढोरांच्याही चार्यांचा प्रश्न सोडवीत गावकऱ्यांनी संपूर्ण बिऱ्हाडाची काळजी घेतली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J Latest news updates March 30, 2020 0 Comments via News Story Feeds https://ift.tt/39u8pn2 Read More Read more No comments: