Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 10, 2020

ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबद्दलच्या 'या' 9 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत?
पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण

पुणे - दुबईतून प्रवास करुन आलेल्या पुण्यातील पती-पत्नीला कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निदान ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था’ने (एनआयव्ही) केले. त्यांच्या पाठोपाठ त्यांची मुलगी, मुंबई ते पुणे दरम्यान त्यांनी प्रवास केलेल्या कॅबचा चालक आणि विमानातील सहप्रवासी, अशा तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल ‘एनआयव्ही’ने मंगळवारी दिला. त्यामुळे पुण्यात कोरोना ‘पॉझिटिव्ह’ची संख्या पाच झाली आहे. या घटनेनंतर पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येताच राज्य सरकारने तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना सर्व विभागांना दिल्या.

पुण्यातील कोरोनाच्या प्रसाराबाबत पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, ‘‘पुण्यातील तीन जण सहलीसाठी दुबई येथे गेल्या महिन्याच्या शेवटी गेले होते. त्यापैकी एकाला ताप, सर्दी, खोकला अशी कोरोनाच्या संसर्गाची सौम्य लक्षणे दिसली. त्या आधारावर त्यांना डॉ. नायडू रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी एनआयव्हीला पाठविले. त्यात त्यांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निदान झाले.’’ या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.

असा झाला संसर्ग 
सिंहगड रस्त्यावरील एका सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबातील तीन जण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सहलीसाठी दुबईला गेले होते. ही ४० जणांची ‘ग्रुप ट्रीप’ होती. पुण्याबरोबरच मुंबईसह वेगवेगळ्या राज्यांतील ही सगळी लोकं त्यांच्याबरोबर होती. ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १ मार्चला उतरले. तेथून कॅब करून ते पुण्यात सिंहगड रस्त्यावरील त्यांच्या सोसायटीत आले. त्यानंतर त्यांच्यातील एकाला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी खासगी डॉक्‍टरांकडून उपचार घेतला. नंतर त्यांचा त्रास वाढल्याने रविवारी (ता. ८) रात्री दोघे डॉ. नायडू संसर्ग रुग्णालयात आले. त्यांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी एनआयव्हीला पाठविले. तेथे ते नमुने ‘पॉझिटिव्ह’ आले. दुबई हे ठिकाण केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बाधित ठिकाणांच्या यादीमध्ये नसल्यामुळे संशयित रुग्ण एक मार्चला भारतात परत आल्यानंतर त्यांचे विलगीकरण केले नाही.  

त्यानंतर त्यांच्या पत्नीची तपासणी करण्यात आली. तिलाही संसर्ग झाल्याचे आढळून आले. या दोघांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या मुलांचीही तपासणी केली गेली. त्यात मुलीला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. ते ज्या कॅबमधून मुंबईहून पुण्याला आले होते, त्या कॅब चालकाला आणि विमानात त्यांच्याशेजारी बसलेल्या सहप्रवाशालाही कोरोनाची बाधा झाली आहे.

आता काय करणार ? 
या दोन्ही व्यक्ती भारतात परत आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेण्यात आली आहे. या दोन्ही रुग्णांचे कुटुंबीय, मित्र परिवार तसेच त्यांच्या कार्यालयीन ठिकाणी असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही तपासणी करणार आहे. आतापर्यंत रुग्णांच्या कुटुंबातील तीन व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. पती-पत्नी आणि मुलगा-मुलगी यांना डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. या दोन्ही व्यक्तींसोबत दुबई येथे गेलेल्या ४० व्यक्तींची नावे आणि संपर्क क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध असून ते विविध जिल्ह्यांतील नागरिक असल्याने संबंधित जिल्हा प्रशासन त्यांना संपर्क करून त्यांची तपासणी करण्याबाबत कार्यवाही करत आहे. या दोन्ही व्यक्तींनी ज्या व्यक्तीच्या कॅबने मुंबईवरून पुण्याला प्रवास केला, अशा व्यक्तीची माहिती घेण्यात आली असून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले आहे.

पुढे काय होणार ?
सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर सर्दी, ताप, खोकल्याची औषधे आणि चौरस आहार दिला जात आहे. पुढील तीन दिवसांनंतर ‘पॉझिटिव्ह’ आलेल्या रुग्णांचे नमुने परत तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविण्यात येतील.  त्याच्या अहवालावर पुढील निर्णय घेतला जाईल. एनआयव्हीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यास त्यांना रुग्णालयातच विलगीकरण कक्षात पुढील तीन दिवस ठेवण्यात येईल. तो ‘निगेटिव्ह’ आल्यास त्यांना घरी सोडण्याची शक्‍यता आहे. 

राज्यभर दक्षता

सर्व जिल्हा रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत विलगीकरण कक्ष

आतापर्यंत भरती झालेल्या ३०४ पैकी २८९ जणांना रुग्णालयातून घरी सोडले

पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे

उपाययोजना ठरविण्यासाठी राज्य सरकारची आज (बुधवारी) बैठक

१२ जणांवर पुण्यात, तर ३ जणांवर मुंबईत उपचार सुरू

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण पुणे - दुबईतून प्रवास करुन आलेल्या पुण्यातील पती-पत्नीला कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निदान ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था’ने (एनआयव्ही) केले. त्यांच्या पाठोपाठ त्यांची मुलगी, मुंबई ते पुणे दरम्यान त्यांनी प्रवास केलेल्या कॅबचा चालक आणि विमानातील सहप्रवासी, अशा तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल ‘एनआयव्ही’ने मंगळवारी दिला. त्यामुळे पुण्यात कोरोना ‘पॉझिटिव्ह’ची संख्या पाच झाली आहे. या घटनेनंतर पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यातील रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येताच राज्य सरकारने तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना सर्व विभागांना दिल्या. पुण्यातील कोरोनाच्या प्रसाराबाबत पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, ‘‘पुण्यातील तीन जण सहलीसाठी दुबई येथे गेल्या महिन्याच्या शेवटी गेले होते. त्यापैकी एकाला ताप, सर्दी, खोकला अशी कोरोनाच्या संसर्गाची सौम्य लक्षणे दिसली. त्या आधारावर त्यांना डॉ. नायडू रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी एनआयव्हीला पाठविले. त्यात त्यांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निदान झाले.’’ या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते. असा झाला संसर्ग  सिंहगड रस्त्यावरील एका सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबातील तीन जण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सहलीसाठी दुबईला गेले होते. ही ४० जणांची ‘ग्रुप ट्रीप’ होती. पुण्याबरोबरच मुंबईसह वेगवेगळ्या राज्यांतील ही सगळी लोकं त्यांच्याबरोबर होती. ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १ मार्चला उतरले. तेथून कॅब करून ते पुण्यात सिंहगड रस्त्यावरील त्यांच्या सोसायटीत आले. त्यानंतर त्यांच्यातील एकाला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी खासगी डॉक्‍टरांकडून उपचार घेतला. नंतर त्यांचा त्रास वाढल्याने रविवारी (ता. ८) रात्री दोघे डॉ. नायडू संसर्ग रुग्णालयात आले. त्यांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी एनआयव्हीला पाठविले. तेथे ते नमुने ‘पॉझिटिव्ह’ आले. दुबई हे ठिकाण केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बाधित ठिकाणांच्या यादीमध्ये नसल्यामुळे संशयित रुग्ण एक मार्चला भारतात परत आल्यानंतर त्यांचे विलगीकरण केले नाही.   त्यानंतर त्यांच्या पत्नीची तपासणी करण्यात आली. तिलाही संसर्ग झाल्याचे आढळून आले. या दोघांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या मुलांचीही तपासणी केली गेली. त्यात मुलीला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. ते ज्या कॅबमधून मुंबईहून पुण्याला आले होते, त्या कॅब चालकाला आणि विमानात त्यांच्याशेजारी बसलेल्या सहप्रवाशालाही कोरोनाची बाधा झाली आहे. आता काय करणार ?  या दोन्ही व्यक्ती भारतात परत आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेण्यात आली आहे. या दोन्ही रुग्णांचे कुटुंबीय, मित्र परिवार तसेच त्यांच्या कार्यालयीन ठिकाणी असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही तपासणी करणार आहे. आतापर्यंत रुग्णांच्या कुटुंबातील तीन व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. पती-पत्नी आणि मुलगा-मुलगी यांना डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. या दोन्ही व्यक्तींसोबत दुबई येथे गेलेल्या ४० व्यक्तींची नावे आणि संपर्क क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध असून ते विविध जिल्ह्यांतील नागरिक असल्याने संबंधित जिल्हा प्रशासन त्यांना संपर्क करून त्यांची तपासणी करण्याबाबत कार्यवाही करत आहे. या दोन्ही व्यक्तींनी ज्या व्यक्तीच्या कॅबने मुंबईवरून पुण्याला प्रवास केला, अशा व्यक्तीची माहिती घेण्यात आली असून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले आहे. पुढे काय होणार ? सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर सर्दी, ताप, खोकल्याची औषधे आणि चौरस आहार दिला जात आहे. पुढील तीन दिवसांनंतर ‘पॉझिटिव्ह’ आलेल्या रुग्णांचे नमुने परत तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविण्यात येतील.  त्याच्या अहवालावर पुढील निर्णय घेतला जाईल. एनआयव्हीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यास त्यांना रुग्णालयातच विलगीकरण कक्षात पुढील तीन दिवस ठेवण्यात येईल. तो ‘निगेटिव्ह’ आल्यास त्यांना घरी सोडण्याची शक्‍यता आहे.  राज्यभर दक्षता सर्व जिल्हा रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत विलगीकरण कक्ष आतापर्यंत भरती झालेल्या ३०४ पैकी २८९ जणांना रुग्णालयातून घरी सोडले पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे उपाययोजना ठरविण्यासाठी राज्य सरकारची आज (बुधवारी) बैठक १२ जणांवर पुण्यात, तर ३ जणांवर मुंबईत उपचार सुरू News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2IybeZg
Read More
...अन्‌ कडब्यासह ट्रक जळून खाक 

सांगोला (सोलापूर) : ट्रकच्या बॅटरीला स्पार्किंग होऊन लागलेल्या आगीत चार पोती ज्वारी, शंभर पेंडी कडब्यासह ट्रक जळून खाक झाला. या आगीत सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले असून ही घटना रात्री अडीचच्या सुमारास हातीद (ता. सांगोला) येथे घडली. 
महादेव बापू मस्के (रा. सांगली) यांचा मेव्हणा मल्हारी कृष्णा बंडगर (रा. सांगली) यांची शेतजमीन हातीद (ता. सांगोला) येथे आहे. 8 मार्चला सायंकाळी सहाच्या सुमारास ट्रक घेऊन महादेव मस्के कडबा, ज्वारी घेऊन जाण्यासाठी आले होते. ट्रकमध्ये शंभर पेंडी कडबा व चार पोती ज्वारी भरून रात्री अकराच्या सुमारास खरात वस्ती हातीद येथे ट्रक उभा केला. रात्री दोनच्या सुमारास ज्वारी व कडबा भरलेला ट्रक घेऊन मस्के सांगलीला निघाले. वाटेत माळी वस्तीजवळ ट्रकमधून जळाल्याचा वास येऊ लागल्याने ट्रक उभा करून पाहिला असता बॅटरीचे खुंट पागळलेले दिसले. बॅटरीचे खुंट दुरुस्त करून ट्रक घेऊन जात असताना जास्तच जळालेला वास आला. ट्रकमधून जास्तच धूर येऊन लागल्याने मस्के यांनी ट्रक थांबवला. त्या वेळी ट्रकमधील कडब्याला आग लागलेली दिसली. काही वेळातच संपूर्ण ट्रकलाच आग लागली. त्या वेळी माळी वस्तीवरील अशोक माळी, मारुती माळी, नाना माळी यांच्यासह ट्रक मालक महादेव मस्के यांनी ट्रकला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्‍यात न आल्याने ट्रकसह शंभर पेंडी कडबा, चार पोती ज्वारी आगीत जळून भस्मसात झाली. या आगीत सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी ट्रक चालक आनंद खरात यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

...अन्‌ कडब्यासह ट्रक जळून खाक  सांगोला (सोलापूर) : ट्रकच्या बॅटरीला स्पार्किंग होऊन लागलेल्या आगीत चार पोती ज्वारी, शंभर पेंडी कडब्यासह ट्रक जळून खाक झाला. या आगीत सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले असून ही घटना रात्री अडीचच्या सुमारास हातीद (ता. सांगोला) येथे घडली.  महादेव बापू मस्के (रा. सांगली) यांचा मेव्हणा मल्हारी कृष्णा बंडगर (रा. सांगली) यांची शेतजमीन हातीद (ता. सांगोला) येथे आहे. 8 मार्चला सायंकाळी सहाच्या सुमारास ट्रक घेऊन महादेव मस्के कडबा, ज्वारी घेऊन जाण्यासाठी आले होते. ट्रकमध्ये शंभर पेंडी कडबा व चार पोती ज्वारी भरून रात्री अकराच्या सुमारास खरात वस्ती हातीद येथे ट्रक उभा केला. रात्री दोनच्या सुमारास ज्वारी व कडबा भरलेला ट्रक घेऊन मस्के सांगलीला निघाले. वाटेत माळी वस्तीजवळ ट्रकमधून जळाल्याचा वास येऊ लागल्याने ट्रक उभा करून पाहिला असता बॅटरीचे खुंट पागळलेले दिसले. बॅटरीचे खुंट दुरुस्त करून ट्रक घेऊन जात असताना जास्तच जळालेला वास आला. ट्रकमधून जास्तच धूर येऊन लागल्याने मस्के यांनी ट्रक थांबवला. त्या वेळी ट्रकमधील कडब्याला आग लागलेली दिसली. काही वेळातच संपूर्ण ट्रकलाच आग लागली. त्या वेळी माळी वस्तीवरील अशोक माळी, मारुती माळी, नाना माळी यांच्यासह ट्रक मालक महादेव मस्के यांनी ट्रकला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्‍यात न आल्याने ट्रकसह शंभर पेंडी कडबा, चार पोती ज्वारी आगीत जळून भस्मसात झाली. या आगीत सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी ट्रक चालक आनंद खरात यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cNqBuG
Read More
पुण्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या पाचवर
ज्योतिरादित्य शिंदे : जेव्हा विजयाराजे शिंदेंनी काँग्रेसमधून फुटून मध्य प्रदेशमधलं सरकार पाडलं
हिंदुंना ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम बनविण्याचे षडयंत्र- नितीन राऊत : #5मोठ्याबातम्या
सावधान ! आजच सोडा धूम्रपान, नाहीतर भोगा 'हे' गंभीर परिणाम

मुंबई : जगात धूम्रपान करणाऱ्या लोकांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. धूम्रपान करणं आरोग्यासाठी वाईट असतं हे माहित असूनही लोकं सर्रास धूम्रपान करताना दिसतात. या धूम्रपानाचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. 

जगात एकूण धूम्रपान करणाऱ्या लोकांपैकी तब्बल १२ टक्के लोकं भारतात राहतात. धुम्रपानामुळे अतिशय गंभीर प्रकारचे रोग होतात. भारतात दरवर्षी तब्बल १ कोटीपेक्षा जास्त लोकं धुम्रपानामुळे मृत्युमुखी पडतात. धूम्रपान म्हणजेच सिगारेट ओढणे आणि तंबाखू असलेल्या पदार्थांचं सेवन करणे. तंबाखूयुक्त पदार्थांचं सेवन केल्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे गंभीर आजार होण्याची भीती असते. तसंच  धूम्रपान केल्यामुळे पुरुषांचं आयुष्य तब्बल १२ वर्षांनी तर महिलांचं आयुष्य तब्बल ११ वर्षांनी कमी होतं.  

हेही वाचा: कोरोनामुळे आपल्या फुप्फुसांना नक्की 'काय' होतं,वाचा अत्यंत महत्वाची माहिती.. 

तंबाखूमध्ये दोन अतिशय घातक पदार्थ असतात. कार्बन मोनॉक्साईड आणि टार (डांबर). कार्बन मोनॉक्साईड शरीरात असणाऱ्या ऑक्सिजनला शरीरात योग्य रित्या पसरू देत नाही. तसंच ऑक्सिजनचं प्रमाणही कमी करतो. टार म्हणजेच डांबर शरीराच्या आतमध्ये जाऊन तुमच्या फुप्फुसांवर थेट वार करतं आणि यामुळे तुमची श्वसनप्रक्रिया सुरळीत होऊ शकत नाही.

धूम्रपान केल्यामुळे तुम्हाला कोणते गंभीर आजार होऊ शकतात वाचा

(१) कॅन्सर:

भारतात एकूण कॅन्सरग्रस्त लोकांपैकी ८० टक्के लोकं कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात. यात ५० टक्के लोकं धूम्रपान केल्यामुळे होणाऱ्या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात. तंबाखूयुक्त धूम्रपानात तब्बल ७००० प्रकारचे रसायनं असतात ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. धुम्रपानामुळे तोंडाचा, पोटाचा, किडनीचा, यकृताचा, फुप्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो. 

(२) हृदयविकार:

तंबाखूयुक्त पदार्थांचं सेवन केल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची भीती असते. धूम्रपान केल्यामुळे शरीरात रक्ताभिसरण प्रक्रिया कमी होत जाते.  तुमच्या हृदयापर्यंत रक्ताचा पुरवठा कमी प्रमाणात होतो. यामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका येण्याची चिन्हं असतात. शिवाय छाती दुखणे, हृदयाचे ठोके कमी होणे असेही त्रास धुम्रपानामुळे होतात.

हेही वाचा: राज Vs उद्धव यांच्यानंतर आता आदित्य ठाकरे Vs अमित ठाकरे,कारण आहे... 

(३) प्रजनन क्षमता:

मोठ्या प्रमाणावर धूम्रपान केल्यामुळे पुरुष आणि महिला दोघांमध्येही प्रजनन क्षमता कमी होत जाते. धूम्रपान करणाऱ्या बहुतांश  महिला आई होऊ शकत नाहीत. शिवाय त्यांना गरोदर राहण्यातही बराच त्रास सहन करावा लागतो. धूम्रपान करणाऱ्या महिलांचा गर्भपात होण्याचीही शक्यता असते.तसंच त्यांचं बाळ कमी वजनाचं आणि अशक्त जन्माला येण्याची भीती असते.

(४) त्वचेचे आजार:

धुम्रपान केल्यामुळे जास्त प्रमाणात ऑक्सिजन आपल्या शरीराला मिळत नाही. त्यामुळे त्वचेचे आजार होण्याची भीती असते. त्वचा कोरडी व्हायला सुरुवात होते आणि तुम्ही तुमच्या वयापेक्षा १०-२० वर्ष मोठे दिसु लागता. त्वचा पांढरी पडू लागते आणि त्वचेवर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. 

हेही वाचा: मुख्याध्यापाकच विद्यार्थिनीशी असा वागला... 

 काय आहेत धूम्रपान सोडण्याचे फायदे: 

धूम्रपान करणं बंद केल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. तसंच तोंडाचाआणि पोटाचा कॅन्सर होत नाही. धूम्रपान सोडून लोकं सामान्य आणि निरोगी जीवन जगू शकतात. त्यामुळे तुम्हीही धूम्रपान करत असाल तर लवकरात लवकर ते सोडा आणि तुमचं आयुष्य वाढवा. 

Quit Smoking otherwise be ready to face these health problems read full story  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सावधान ! आजच सोडा धूम्रपान, नाहीतर भोगा 'हे' गंभीर परिणाम मुंबई : जगात धूम्रपान करणाऱ्या लोकांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. धूम्रपान करणं आरोग्यासाठी वाईट असतं हे माहित असूनही लोकं सर्रास धूम्रपान करताना दिसतात. या धूम्रपानाचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात.  जगात एकूण धूम्रपान करणाऱ्या लोकांपैकी तब्बल १२ टक्के लोकं भारतात राहतात. धुम्रपानामुळे अतिशय गंभीर प्रकारचे रोग होतात. भारतात दरवर्षी तब्बल १ कोटीपेक्षा जास्त लोकं धुम्रपानामुळे मृत्युमुखी पडतात. धूम्रपान म्हणजेच सिगारेट ओढणे आणि तंबाखू असलेल्या पदार्थांचं सेवन करणे. तंबाखूयुक्त पदार्थांचं सेवन केल्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे गंभीर आजार होण्याची भीती असते. तसंच  धूम्रपान केल्यामुळे पुरुषांचं आयुष्य तब्बल १२ वर्षांनी तर महिलांचं आयुष्य तब्बल ११ वर्षांनी कमी होतं.   हेही वाचा: कोरोनामुळे आपल्या फुप्फुसांना नक्की 'काय' होतं,वाचा अत्यंत महत्वाची माहिती..  तंबाखूमध्ये दोन अतिशय घातक पदार्थ असतात. कार्बन मोनॉक्साईड आणि टार (डांबर). कार्बन मोनॉक्साईड शरीरात असणाऱ्या ऑक्सिजनला शरीरात योग्य रित्या पसरू देत नाही. तसंच ऑक्सिजनचं प्रमाणही कमी करतो. टार म्हणजेच डांबर शरीराच्या आतमध्ये जाऊन तुमच्या फुप्फुसांवर थेट वार करतं आणि यामुळे तुमची श्वसनप्रक्रिया सुरळीत होऊ शकत नाही. धूम्रपान केल्यामुळे तुम्हाला कोणते गंभीर आजार होऊ शकतात वाचा (१) कॅन्सर: भारतात एकूण कॅन्सरग्रस्त लोकांपैकी ८० टक्के लोकं कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात. यात ५० टक्के लोकं धूम्रपान केल्यामुळे होणाऱ्या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात. तंबाखूयुक्त धूम्रपानात तब्बल ७००० प्रकारचे रसायनं असतात ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. धुम्रपानामुळे तोंडाचा, पोटाचा, किडनीचा, यकृताचा, फुप्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो.  (२) हृदयविकार: तंबाखूयुक्त पदार्थांचं सेवन केल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची भीती असते. धूम्रपान केल्यामुळे शरीरात रक्ताभिसरण प्रक्रिया कमी होत जाते.  तुमच्या हृदयापर्यंत रक्ताचा पुरवठा कमी प्रमाणात होतो. यामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका येण्याची चिन्हं असतात. शिवाय छाती दुखणे, हृदयाचे ठोके कमी होणे असेही त्रास धुम्रपानामुळे होतात. हेही वाचा: राज Vs उद्धव यांच्यानंतर आता आदित्य ठाकरे Vs अमित ठाकरे,कारण आहे...  (३) प्रजनन क्षमता: मोठ्या प्रमाणावर धूम्रपान केल्यामुळे पुरुष आणि महिला दोघांमध्येही प्रजनन क्षमता कमी होत जाते. धूम्रपान करणाऱ्या बहुतांश  महिला आई होऊ शकत नाहीत. शिवाय त्यांना गरोदर राहण्यातही बराच त्रास सहन करावा लागतो. धूम्रपान करणाऱ्या महिलांचा गर्भपात होण्याचीही शक्यता असते.तसंच त्यांचं बाळ कमी वजनाचं आणि अशक्त जन्माला येण्याची भीती असते. (४) त्वचेचे आजार: धुम्रपान केल्यामुळे जास्त प्रमाणात ऑक्सिजन आपल्या शरीराला मिळत नाही. त्यामुळे त्वचेचे आजार होण्याची भीती असते. त्वचा कोरडी व्हायला सुरुवात होते आणि तुम्ही तुमच्या वयापेक्षा १०-२० वर्ष मोठे दिसु लागता. त्वचा पांढरी पडू लागते आणि त्वचेवर सुरकुत्या पडायला सुरुवात होते.  हेही वाचा: मुख्याध्यापाकच विद्यार्थिनीशी असा वागला...   काय आहेत धूम्रपान सोडण्याचे फायदे:  धूम्रपान करणं बंद केल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. तसंच तोंडाचाआणि पोटाचा कॅन्सर होत नाही. धूम्रपान सोडून लोकं सामान्य आणि निरोगी जीवन जगू शकतात. त्यामुळे तुम्हीही धूम्रपान करत असाल तर लवकरात लवकर ते सोडा आणि तुमचं आयुष्य वाढवा.  Quit Smoking otherwise be ready to face these health problems read full story   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2vZcCBB
Read More
भारतात कोरोना बाधितांची संख्या ५९ वर

नवी दिल्ली - चीनच्या वुहान शहरातील कोरोनाने शंभर देशात पाय पसरले आहेत. भारतही त्यास अपवाद राहिला नसून काश्‍मीरपासून केरळपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. भारतात गेल्या चोवीस तासांत नव्याने सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्याची एकूण संख्या ५९ वर पोचली आहे. दुबईहून पुण्यात परतलेल्या दोघांसह  ५ जणांना बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. 

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकलच्या माहितीनुसार, एक रुग्ण केरळमध्ये, दोन पुण्यात, तीन बंगळूर येथील रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. देशभरातून १, ५४४ जणांचे नमुने गोळा करण्यात आले होते. त्यांच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. राजधानी दिल्लीत संसद भवन परिसरातही कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. संसद परिसरात नागरिकांना मोठ्या गटाने येण्यास मनाई केली आहे. 

श्रीनगर : इराण आणि चीनहून परतलेले बडगाम जिल्ह्यातील ४१ नागरिकांना नऊ विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी ७१ खाटांची सोय करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. जिल्हा विकास आयुक्त परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. यापैकी ३१ नागरिक इराणहून तर दहा जण चीनहून आले आहेत. याशिवाय कोरिया आणि मलेशियाहून आलेले दोघांना बाधा झाली असून त्यांना एसकेआयएमएसमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

बंगळूर : कर्नाटकमध्ये नव्याने तीन रुग्ण आढळून आले असून बाधित रुग्णांची संख्या चारवर पोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री बी. श्रीरामलू यांनी दिली. चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालात म्हटले आहे. त्यांच्या कुटुंबीयाला विलगीकरण कक्षात ठेवल्याचेही सांगण्यात आले. कर्नाटक सरकारकडून प्रयोगशाळेत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी योजना आणली जात असून त्यात अतिरिक्त आरोग्य विमा दिला जाणार आहे.  

तिरुअनंतपूरम : केरळमध्ये कोरोना व्हायरसचे नव्याने सहा रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत १२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यापैकी तीन जण इटलीहून आले होते आणि उर्वरित ८ जण त्यांच्या संपर्कात आले होते. कोची येथे युरोपाहून परतलेल्या एका तीन वर्षांच्या मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, ३१ मार्चपर्यंत शाळा, कॉलेज, टॉकिज बंद राहणार.

कर्नाटकातील कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सरकारकडून अतिरिक्त आरोग्य विमा दिला जाणार आहे.
- डॉ. के. सुधाकर, कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण मंत्री

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भारतात कोरोना बाधितांची संख्या ५९ वर नवी दिल्ली - चीनच्या वुहान शहरातील कोरोनाने शंभर देशात पाय पसरले आहेत. भारतही त्यास अपवाद राहिला नसून काश्‍मीरपासून केरळपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. भारतात गेल्या चोवीस तासांत नव्याने सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्याची एकूण संख्या ५९ वर पोचली आहे. दुबईहून पुण्यात परतलेल्या दोघांसह  ५ जणांना बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे.  ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकलच्या माहितीनुसार, एक रुग्ण केरळमध्ये, दोन पुण्यात, तीन बंगळूर येथील रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. देशभरातून १, ५४४ जणांचे नमुने गोळा करण्यात आले होते. त्यांच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. राजधानी दिल्लीत संसद भवन परिसरातही कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. संसद परिसरात नागरिकांना मोठ्या गटाने येण्यास मनाई केली आहे.  श्रीनगर : इराण आणि चीनहून परतलेले बडगाम जिल्ह्यातील ४१ नागरिकांना नऊ विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी ७१ खाटांची सोय करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. जिल्हा विकास आयुक्त परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. यापैकी ३१ नागरिक इराणहून तर दहा जण चीनहून आले आहेत. याशिवाय कोरिया आणि मलेशियाहून आलेले दोघांना बाधा झाली असून त्यांना एसकेआयएमएसमध्ये दाखल करण्यात आले आहे.  बंगळूर : कर्नाटकमध्ये नव्याने तीन रुग्ण आढळून आले असून बाधित रुग्णांची संख्या चारवर पोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री बी. श्रीरामलू यांनी दिली. चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालात म्हटले आहे. त्यांच्या कुटुंबीयाला विलगीकरण कक्षात ठेवल्याचेही सांगण्यात आले. कर्नाटक सरकारकडून प्रयोगशाळेत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी योजना आणली जात असून त्यात अतिरिक्त आरोग्य विमा दिला जाणार आहे.   तिरुअनंतपूरम : केरळमध्ये कोरोना व्हायरसचे नव्याने सहा रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत १२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यापैकी तीन जण इटलीहून आले होते आणि उर्वरित ८ जण त्यांच्या संपर्कात आले होते. कोची येथे युरोपाहून परतलेल्या एका तीन वर्षांच्या मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, ३१ मार्चपर्यंत शाळा, कॉलेज, टॉकिज बंद राहणार. कर्नाटकातील कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सरकारकडून अतिरिक्त आरोग्य विमा दिला जाणार आहे. - डॉ. के. सुधाकर, कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण मंत्री News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aNJaxk
Read More
राज्यातील ३०४ पैकी २८९ रुग्ण निगेटिव्ह

पुणे - ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील विलगीकरण कक्षांत आतापर्यंत ३०४ जणांना दाखल करण्यात आले. त्यापैकी २८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने ‘कोरोना’करिता निगेटिव्ह आले असून, त्यांना विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आले; तर पाच जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या १२ जणांना पुण्यात; तर तिघांना मुंबईतील रुग्णालयात भरती केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत एक हजार १०१ विमानांमधील एक लाख २९ हजार ४४८ प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महापालिकांनी आवश्‍यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्यूरो ऑफ इमिग्रेशनद्वारे इराण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशांत सध्या कोरोना विषाणूंचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने २१ फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. 

नवीन ‘कोरोना’ विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून सर्व जिल्हा रुग्णालये; तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन केले आहेत. विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ खाटा उपलब्ध आहेत. 

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा उद्रेक झालेल्या १२ देशांमधून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी आरोग्य विभागास दैनंदिन स्वरूपात देण्यात येते.

बाधित भागातून राज्यात आलेल्या ५९१ प्रवाशांपैकी ३५३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला. मुंबई, पुणे, ठाणे यासह गडचिरोली, नांदेड, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, वर्धा, सांगली, नगर, अमरावती, पालघर, जळगाव, चंद्रपूर, सातारा या जिल्ह्यांतूनही बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

काही शाळांना सुटी जाहीर
कोरोनाच्या धास्तीने पालकांची चिंता वाढविली असून, कात्रजमधील एका खासगी व्यवस्थापनाच्या संस्थेने उद्यापासून त्यांच्या शाळेला सुटी दिली आहे. दरम्यान, शाळांना सुटी देण्याचा कोणताही आदेश दिला नसून केवळ खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कात्रज भागातील सीबीएसईशी संलग्न असलेल्या सरहद शाळेने उद्यापासून सुटी जाहीर केली आहे. शाळा सुरू करण्याची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असे नोटिसीत नमूद केले आहे. आणखी दोन शाळांनी सुटी जाहीर केली असून, त्यांची नावे समजू शकलेली नाहीत. धायरी आणि नांदेडसिटी परिसरातील या शाळा असल्याचे समजते. 

राज्य बोर्डाच्या शाळांबाबत उद्या बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे, असे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यातील ३०४ पैकी २८९ रुग्ण निगेटिव्ह पुणे - ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील विलगीकरण कक्षांत आतापर्यंत ३०४ जणांना दाखल करण्यात आले. त्यापैकी २८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने ‘कोरोना’करिता निगेटिव्ह आले असून, त्यांना विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आले; तर पाच जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या १२ जणांना पुण्यात; तर तिघांना मुंबईतील रुग्णालयात भरती केले आहे. ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत एक हजार १०१ विमानांमधील एक लाख २९ हजार ४४८ प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महापालिकांनी आवश्‍यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्यूरो ऑफ इमिग्रेशनद्वारे इराण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशांत सध्या कोरोना विषाणूंचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने २१ फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.  नवीन ‘कोरोना’ विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून सर्व जिल्हा रुग्णालये; तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन केले आहेत. विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ खाटा उपलब्ध आहेत.  केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा उद्रेक झालेल्या १२ देशांमधून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी आरोग्य विभागास दैनंदिन स्वरूपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या ५९१ प्रवाशांपैकी ३५३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला. मुंबई, पुणे, ठाणे यासह गडचिरोली, नांदेड, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, वर्धा, सांगली, नगर, अमरावती, पालघर, जळगाव, चंद्रपूर, सातारा या जिल्ह्यांतूनही बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. काही शाळांना सुटी जाहीर कोरोनाच्या धास्तीने पालकांची चिंता वाढविली असून, कात्रजमधील एका खासगी व्यवस्थापनाच्या संस्थेने उद्यापासून त्यांच्या शाळेला सुटी दिली आहे. दरम्यान, शाळांना सुटी देण्याचा कोणताही आदेश दिला नसून केवळ खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कात्रज भागातील सीबीएसईशी संलग्न असलेल्या सरहद शाळेने उद्यापासून सुटी जाहीर केली आहे. शाळा सुरू करण्याची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असे नोटिसीत नमूद केले आहे. आणखी दोन शाळांनी सुटी जाहीर केली असून, त्यांची नावे समजू शकलेली नाहीत. धायरी आणि नांदेडसिटी परिसरातील या शाळा असल्याचे समजते.  राज्य बोर्डाच्या शाळांबाबत उद्या बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे, असे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TWSnfI
Read More
वुहानमध्ये कोरोनावर मात - जिनपिंग

बीजिंग/वुहान - जगभरात कोरोना व्हायरसचे संशयित वाढत असताना चीनमध्ये कोरोनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या वुहानमध्ये संसर्गावर मात केल्याचा दावा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज केला. कोरोना व्हायरसने चीनमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून थैमान घातले आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर अध्यक्ष शी जिनपिंग हे प्रथमच वुहानच्या भेटीवर आज इथे आले होते. शहरातील स्थिती नियंत्रणाखाली असल्याचेही ते म्हणाले. 

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शी जिनपिंग यांनी आज मास्क घालूनच वुहानमधील आरोग्य आणि सैनिकी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गेल्या डिसेंबरमध्ये करोना संसर्गाचे लक्षण दिसत होती, तेव्हा अध्यक्ष शी जिनपिंग कोणतीच हालचाल करत नसल्याची टीका चीनमधून केली जात होती. मात्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली वुहान आणि अन्य ठिकाणी पसरणाऱ्या कोरोनाच्या उद्रेकाला पायबंद घालण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. उपचाराचा आणि सुविधांचा त्यांनी वारंवार आढावा घेत परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अधिकाऱ्यांना कामाला लावले.

आजच्या भेटीत त्यांनी येथे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे आणि त्यांची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची भेट घेतली; तसेच रुग्णालयाची आणि स्वयंसेवी संस्थेची पाहणी केली. पाहणी दौऱ्यादरम्यान कोरोना व्हायरसचा सामना करत निर्णायक विजय मिळवल्याचे मत शी जिनपिंग यांनी नोंदविल्याचे झिनुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हुबेई प्रांताची राजधानी वुहान येथे ५ कोटी नागरिकांचे वास्तव्य असणाऱ्या हुबेई प्रांताची राजधानी वुहान येथील व्यवहार २३ जानेवारीपासून ठप्प पडलेले असताना तेथे आता कोरोनाच्या प्रसारावर अंकुश बसला आहे, असे शी जिनिपिंग यांनी दावा केला आहे. 

News Story Feeds https://ift.tt/2W1sWwc

वुहानमध्ये कोरोनावर मात - जिनपिंग बीजिंग/वुहान - जगभरात कोरोना व्हायरसचे संशयित वाढत असताना चीनमध्ये कोरोनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या वुहानमध्ये संसर्गावर मात केल्याचा दावा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज केला. कोरोना व्हायरसने चीनमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून थैमान घातले आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर अध्यक्ष शी जिनपिंग हे प्रथमच वुहानच्या भेटीवर आज इथे आले होते. शहरातील स्थिती नियंत्रणाखाली असल्याचेही ते म्हणाले.  ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शी जिनपिंग यांनी आज मास्क घालूनच वुहानमधील आरोग्य आणि सैनिकी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गेल्या डिसेंबरमध्ये करोना संसर्गाचे लक्षण दिसत होती, तेव्हा अध्यक्ष शी जिनपिंग कोणतीच हालचाल करत नसल्याची टीका चीनमधून केली जात होती. मात्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली वुहान आणि अन्य ठिकाणी पसरणाऱ्या कोरोनाच्या उद्रेकाला पायबंद घालण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. उपचाराचा आणि सुविधांचा त्यांनी वारंवार आढावा घेत परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अधिकाऱ्यांना कामाला लावले. आजच्या भेटीत त्यांनी येथे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे आणि त्यांची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची भेट घेतली; तसेच रुग्णालयाची आणि स्वयंसेवी संस्थेची पाहणी केली. पाहणी दौऱ्यादरम्यान कोरोना व्हायरसचा सामना करत निर्णायक विजय मिळवल्याचे मत शी जिनपिंग यांनी नोंदविल्याचे झिनुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हुबेई प्रांताची राजधानी वुहान येथे ५ कोटी नागरिकांचे वास्तव्य असणाऱ्या हुबेई प्रांताची राजधानी वुहान येथील व्यवहार २३ जानेवारीपासून ठप्प पडलेले असताना तेथे आता कोरोनाच्या प्रसारावर अंकुश बसला आहे, असे शी जिनिपिंग यांनी दावा केला आहे.  News Story Feeds https://ift.tt/2W1sWwc

March 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ID1oFu
Read More
PHOTOS : सोलापुरात धुळवडीचा सण उत्साहात साजरा....

सोलापूर - सोलापूर शहर व परिसरात उत्साही वातावरणात धुळवडीचा सण साजरा करण्यात आला. काल शहरभरात उत्साही वातारणात होळी पेटविण्यात आली. 

मंगळवारी धुळवडीच्या दिवशी चाैपाड येथून रंगगाड्याची मिरवणूक काढण्यात आली. तर बंजारा समाजाच्या वतीने होळीला फेर धरण्यात आला. त्यानंतर परंपरेने बंजारा समाजातील महिलांनी पुरुषांना लाकडाने मारले. त्यानंतर एकमेकाला रंग लावत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.

 

चला पाहुयात सोलापुरातील धुळवडीची श्रीनिवास सादूल यांनी टिपलेली छायाचित्रे....

 

 

News Story Feeds https://ift.tt/38LvEc9

PHOTOS : सोलापुरात धुळवडीचा सण उत्साहात साजरा.... सोलापूर - सोलापूर शहर व परिसरात उत्साही वातावरणात धुळवडीचा सण साजरा करण्यात आला. काल शहरभरात उत्साही वातारणात होळी पेटविण्यात आली.  मंगळवारी धुळवडीच्या दिवशी चाैपाड येथून रंगगाड्याची मिरवणूक काढण्यात आली. तर बंजारा समाजाच्या वतीने होळीला फेर धरण्यात आला. त्यानंतर परंपरेने बंजारा समाजातील महिलांनी पुरुषांना लाकडाने मारले. त्यानंतर एकमेकाला रंग लावत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.   चला पाहुयात सोलापुरातील धुळवडीची श्रीनिवास सादूल यांनी टिपलेली छायाचित्रे....     News Story Feeds https://ift.tt/38LvEc9

March 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2IFI4Y4
Read More
`या` महापालिकेच्या प्रत्येक शाळेसाठी स्वतंत्र ड्रेसकोड 

 
सोलापूर : महापालिकेच्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आता वेगवेगळे ड्रेसकोड असणार आहेत. हा ड्रेसकोड कोणत्या रंगाचा असावा, याचा निर्णय संबंधित शाळेतील पालक व्यवस्थापन समिती घेणार आहे. समग्र शिक्षण योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुले आणि सर्व प्रवर्गातील मुलांना मोफत गणवेश उपलब्ध केला जाणार आहे. 

हेही वाचा - कोरोना यांच्यासाठी लाभदायक 

मध्यंतरीच्या काळात गणवेश खरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जात होती. मात्र, अनेक लाभार्थी विद्यार्थ्यांचे खाते न उघडणे किंवा तांत्रिक कारणामुळे लाभार्थींना गणवेश मिळाले नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे आता शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीमार्फतच गणवेश दिले जाणार असून, ड्रेसकोडचा रंगही तेच निश्‍चित करणार आहेत. पूर्वी महापालिका शाळेसाठी एकच ड्रेसकोड होता. त्यामुळे एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमास या शाळेतील विद्यार्थी एकत्रित आले तर लगेच त्यांची ओळख पटत असे. मात्र, आता वेगवेगळ्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रंगांचे गणवेश असतील. त्यामुळे कोणता विद्यार्थी महापालिका शाळेचा आणि कोणता विद्यार्थी खासगी शाळेचा, हे ओळखण्यात अडचण येणार आहे. ड्रेसकोडचा रंग निश्‍चित केल्यानंतर एकसारखे ड्रेस कोठे मिळतील, याचा शोध घ्यावा लागणार आहे. 

हेही वाचा - शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू 

नवीन शालेय वर्ष सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना गणवेश मिळावेत यासाठी सध्या सुरू असलेले वर्ष संपण्याअगोदरच सर्वांची मापे घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. समग्र शिक्षण अभियानांतर्गत गणवेश योजना आणि इतर गणवेश योजना याच्या स्वतंत्रपणे नोंदणी करणे आवश्‍यक आहे. मुलींसाठी स्कर्ट, ब्लाऊज, पिनो, सलवार, कमीज, ओढणी, मुलांसाठी शर्ट, हाफ, फुल पॅन्ट आदी गणवेशाचे स्वरूप असणार आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

`या` महापालिकेच्या प्रत्येक शाळेसाठी स्वतंत्र ड्रेसकोड    सोलापूर : महापालिकेच्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आता वेगवेगळे ड्रेसकोड असणार आहेत. हा ड्रेसकोड कोणत्या रंगाचा असावा, याचा निर्णय संबंधित शाळेतील पालक व्यवस्थापन समिती घेणार आहे. समग्र शिक्षण योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुले आणि सर्व प्रवर्गातील मुलांना मोफत गणवेश उपलब्ध केला जाणार आहे.  हेही वाचा - कोरोना यांच्यासाठी लाभदायक  मध्यंतरीच्या काळात गणवेश खरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जात होती. मात्र, अनेक लाभार्थी विद्यार्थ्यांचे खाते न उघडणे किंवा तांत्रिक कारणामुळे लाभार्थींना गणवेश मिळाले नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे आता शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीमार्फतच गणवेश दिले जाणार असून, ड्रेसकोडचा रंगही तेच निश्‍चित करणार आहेत. पूर्वी महापालिका शाळेसाठी एकच ड्रेसकोड होता. त्यामुळे एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमास या शाळेतील विद्यार्थी एकत्रित आले तर लगेच त्यांची ओळख पटत असे. मात्र, आता वेगवेगळ्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रंगांचे गणवेश असतील. त्यामुळे कोणता विद्यार्थी महापालिका शाळेचा आणि कोणता विद्यार्थी खासगी शाळेचा, हे ओळखण्यात अडचण येणार आहे. ड्रेसकोडचा रंग निश्‍चित केल्यानंतर एकसारखे ड्रेस कोठे मिळतील, याचा शोध घ्यावा लागणार आहे.  हेही वाचा - शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू  नवीन शालेय वर्ष सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना गणवेश मिळावेत यासाठी सध्या सुरू असलेले वर्ष संपण्याअगोदरच सर्वांची मापे घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. समग्र शिक्षण अभियानांतर्गत गणवेश योजना आणि इतर गणवेश योजना याच्या स्वतंत्रपणे नोंदणी करणे आवश्‍यक आहे. मुलींसाठी स्कर्ट, ब्लाऊज, पिनो, सलवार, कमीज, ओढणी, मुलांसाठी शर्ट, हाफ, फुल पॅन्ट आदी गणवेशाचे स्वरूप असणार आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TG1rH6
Read More
#WednesdayMotivation : निवासी शाळेतील लेकरांना लाभली ‘स्नेह’ अन्‌ छाया

दिघीतील सारिका यांची ‘प्राध्यापक पती परमेश्‍वर’ला सक्रिय साथ
पिंपरी - स्वतःचे स्वप्न, आवडी-निवडी, इतकेच नव्हे तर क्षणभर आराम अशा साऱ्या गोष्टी बाजूला ठेवत कला शाखेच्या पदवीधर दिघीतील सारिका इंगळे यांनी वेगळी वाट धरलेल्या पतीला सक्रिय साथ देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी फासेपारधी, भिल्ल, ऊसतोडणी कामगार, नंदीवाले, आत्महत्याग्रस्त शेतकरी अशा कुटुंबांतील मुलांसाठी निवासी शाळेत स्वत:ला झोकून दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्या स्नेहछाया परिवारातील १५ मुलांची पोटच्या लेकरांपेक्षा अधिक काळजी घेणारी आणि मायेची ऊब देणारी ‘माई’ बनल्या आहेत. सारिकामाईंची जन्मभूमी बीड जिल्हा, मात्र कर्मभूमी पिंपरी चिंचवड शहर ठरली. पती प्रा. दत्तात्रेय इंगळे यांनी सामाजिक कार्याच्या ध्यासापोटी चांगल्या पगाराची शिक्षकाची नोकरी सोडली आणि आठ वर्षापूर्वी स्थलांतरित व वंचितांची लेकरं शिकावीत यासाठी पालावरची अक्षरशाळा सुरू केली.
सध्या पालावरच्या शाळेत १२७ मुले शिकत आहेत. या दांपत्याने मराठवाडा, विदर्भ, रायगड येथे सर्वेक्षण केला. त्यात अतिवंचित असलेली व ज्यांनी शिक्षणाचा श्रीगणेशादेखील केला नाही अशा ऊसतोडणी कामगार, नंदीवाले, फासेपारधी, भिल्ल यांच्या मुलांसाठी एका मित्राच्या मोकळ्या जागेत पत्राच्या शेडमध्ये ‘स्नेहछाया परिवार’ नावाने निवासी शाळा सुरू केली. सध्या लोकसहभागातून हे कार्य सुरू आहे. या १५ लेकरांच्या परिवाराची जबाबदारी माईंनी स्वीकारली आहे.

आयटीयन्ससाठी आता ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधा

माई २४ तास व्यस्त असतात. इथे त्यांना ना मैत्रिणींचा मेळा न तासन्‌तास गप्पा, ना ‘इडियट बॉक्‍स’ व मनोरंजन, ना शेजारीण, ना सहकर्मचारी महिला...तर इथे आहेत फक्त १५ लेकरं, त्या अन्‌ पती असा १७ जणांचा परिवार आहे. सकाळी पाचपासून रात्री झोपेपर्यंत फक्त कामच करतात. सकाळी सर्वांना गरमागरम नास्ता, दोन वेळच्या जेवणाची तयारी, भांडी, भाजीपाला खरेदी, आलेल्या पाहुण्यांना स्वागत, जेवण, प्रकल्प संबंधित माहिती, लेकरांना शाळेत सोडायला व घ्यायला जाणे, आजारी पडल्यावर दवापाणी देणे, अभ्यासात मदत अशी कामे त्या करतात.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

#WednesdayMotivation : निवासी शाळेतील लेकरांना लाभली ‘स्नेह’ अन्‌ छाया दिघीतील सारिका यांची ‘प्राध्यापक पती परमेश्‍वर’ला सक्रिय साथ पिंपरी - स्वतःचे स्वप्न, आवडी-निवडी, इतकेच नव्हे तर क्षणभर आराम अशा साऱ्या गोष्टी बाजूला ठेवत कला शाखेच्या पदवीधर दिघीतील सारिका इंगळे यांनी वेगळी वाट धरलेल्या पतीला सक्रिय साथ देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी फासेपारधी, भिल्ल, ऊसतोडणी कामगार, नंदीवाले, आत्महत्याग्रस्त शेतकरी अशा कुटुंबांतील मुलांसाठी निवासी शाळेत स्वत:ला झोकून दिले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्या स्नेहछाया परिवारातील १५ मुलांची पोटच्या लेकरांपेक्षा अधिक काळजी घेणारी आणि मायेची ऊब देणारी ‘माई’ बनल्या आहेत. सारिकामाईंची जन्मभूमी बीड जिल्हा, मात्र कर्मभूमी पिंपरी चिंचवड शहर ठरली. पती प्रा. दत्तात्रेय इंगळे यांनी सामाजिक कार्याच्या ध्यासापोटी चांगल्या पगाराची शिक्षकाची नोकरी सोडली आणि आठ वर्षापूर्वी स्थलांतरित व वंचितांची लेकरं शिकावीत यासाठी पालावरची अक्षरशाळा सुरू केली. सध्या पालावरच्या शाळेत १२७ मुले शिकत आहेत. या दांपत्याने मराठवाडा, विदर्भ, रायगड येथे सर्वेक्षण केला. त्यात अतिवंचित असलेली व ज्यांनी शिक्षणाचा श्रीगणेशादेखील केला नाही अशा ऊसतोडणी कामगार, नंदीवाले, फासेपारधी, भिल्ल यांच्या मुलांसाठी एका मित्राच्या मोकळ्या जागेत पत्राच्या शेडमध्ये ‘स्नेहछाया परिवार’ नावाने निवासी शाळा सुरू केली. सध्या लोकसहभागातून हे कार्य सुरू आहे. या १५ लेकरांच्या परिवाराची जबाबदारी माईंनी स्वीकारली आहे. आयटीयन्ससाठी आता ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधा माई २४ तास व्यस्त असतात. इथे त्यांना ना मैत्रिणींचा मेळा न तासन्‌तास गप्पा, ना ‘इडियट बॉक्‍स’ व मनोरंजन, ना शेजारीण, ना सहकर्मचारी महिला...तर इथे आहेत फक्त १५ लेकरं, त्या अन्‌ पती असा १७ जणांचा परिवार आहे. सकाळी पाचपासून रात्री झोपेपर्यंत फक्त कामच करतात. सकाळी सर्वांना गरमागरम नास्ता, दोन वेळच्या जेवणाची तयारी, भांडी, भाजीपाला खरेदी, आलेल्या पाहुण्यांना स्वागत, जेवण, प्रकल्प संबंधित माहिती, लेकरांना शाळेत सोडायला व घ्यायला जाणे, आजारी पडल्यावर दवापाणी देणे, अभ्यासात मदत अशी कामे त्या करतात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cNLoP2
Read More