...अन्‌ कडब्यासह ट्रक जळून खाक  सांगोला (सोलापूर) : ट्रकच्या बॅटरीला स्पार्किंग होऊन लागलेल्या आगीत चार पोती ज्वारी, शंभर पेंडी कडब्यासह ट्रक जळून खाक झाला. या आगीत सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले असून ही घटना रात्री अडीचच्या सुमारास हातीद (ता. सांगोला) येथे घडली.  महादेव बापू मस्के (रा. सांगली) यांचा मेव्हणा मल्हारी कृष्णा बंडगर (रा. सांगली) यांची शेतजमीन हातीद (ता. सांगोला) येथे आहे. 8 मार्चला सायंकाळी सहाच्या सुमारास ट्रक घेऊन महादेव मस्के कडबा, ज्वारी घेऊन जाण्यासाठी आले होते. ट्रकमध्ये शंभर पेंडी कडबा व चार पोती ज्वारी भरून रात्री अकराच्या सुमारास खरात वस्ती हातीद येथे ट्रक उभा केला. रात्री दोनच्या सुमारास ज्वारी व कडबा भरलेला ट्रक घेऊन मस्के सांगलीला निघाले. वाटेत माळी वस्तीजवळ ट्रकमधून जळाल्याचा वास येऊ लागल्याने ट्रक उभा करून पाहिला असता बॅटरीचे खुंट पागळलेले दिसले. बॅटरीचे खुंट दुरुस्त करून ट्रक घेऊन जात असताना जास्तच जळालेला वास आला. ट्रकमधून जास्तच धूर येऊन लागल्याने मस्के यांनी ट्रक थांबवला. त्या वेळी ट्रकमधील कडब्याला आग लागलेली दिसली. काही वेळातच संपूर्ण ट्रकलाच आग लागली. त्या वेळी माळी वस्तीवरील अशोक माळी, मारुती माळी, नाना माळी यांच्यासह ट्रक मालक महादेव मस्के यांनी ट्रकला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्‍यात न आल्याने ट्रकसह शंभर पेंडी कडबा, चार पोती ज्वारी आगीत जळून भस्मसात झाली. या आगीत सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी ट्रक चालक आनंद खरात यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 10, 2020

...अन्‌ कडब्यासह ट्रक जळून खाक  सांगोला (सोलापूर) : ट्रकच्या बॅटरीला स्पार्किंग होऊन लागलेल्या आगीत चार पोती ज्वारी, शंभर पेंडी कडब्यासह ट्रक जळून खाक झाला. या आगीत सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले असून ही घटना रात्री अडीचच्या सुमारास हातीद (ता. सांगोला) येथे घडली.  महादेव बापू मस्के (रा. सांगली) यांचा मेव्हणा मल्हारी कृष्णा बंडगर (रा. सांगली) यांची शेतजमीन हातीद (ता. सांगोला) येथे आहे. 8 मार्चला सायंकाळी सहाच्या सुमारास ट्रक घेऊन महादेव मस्के कडबा, ज्वारी घेऊन जाण्यासाठी आले होते. ट्रकमध्ये शंभर पेंडी कडबा व चार पोती ज्वारी भरून रात्री अकराच्या सुमारास खरात वस्ती हातीद येथे ट्रक उभा केला. रात्री दोनच्या सुमारास ज्वारी व कडबा भरलेला ट्रक घेऊन मस्के सांगलीला निघाले. वाटेत माळी वस्तीजवळ ट्रकमधून जळाल्याचा वास येऊ लागल्याने ट्रक उभा करून पाहिला असता बॅटरीचे खुंट पागळलेले दिसले. बॅटरीचे खुंट दुरुस्त करून ट्रक घेऊन जात असताना जास्तच जळालेला वास आला. ट्रकमधून जास्तच धूर येऊन लागल्याने मस्के यांनी ट्रक थांबवला. त्या वेळी ट्रकमधील कडब्याला आग लागलेली दिसली. काही वेळातच संपूर्ण ट्रकलाच आग लागली. त्या वेळी माळी वस्तीवरील अशोक माळी, मारुती माळी, नाना माळी यांच्यासह ट्रक मालक महादेव मस्के यांनी ट्रकला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्‍यात न आल्याने ट्रकसह शंभर पेंडी कडबा, चार पोती ज्वारी आगीत जळून भस्मसात झाली. या आगीत सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी ट्रक चालक आनंद खरात यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3cNqBuG

No comments:

Post a Comment