पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण पुणे - दुबईतून प्रवास करुन आलेल्या पुण्यातील पती-पत्नीला कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निदान ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था’ने (एनआयव्ही) केले. त्यांच्या पाठोपाठ त्यांची मुलगी, मुंबई ते पुणे दरम्यान त्यांनी प्रवास केलेल्या कॅबचा चालक आणि विमानातील सहप्रवासी, अशा तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल ‘एनआयव्ही’ने मंगळवारी दिला. त्यामुळे पुण्यात कोरोना ‘पॉझिटिव्ह’ची संख्या पाच झाली आहे. या घटनेनंतर पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यातील रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येताच राज्य सरकारने तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना सर्व विभागांना दिल्या. पुण्यातील कोरोनाच्या प्रसाराबाबत पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, ‘‘पुण्यातील तीन जण सहलीसाठी दुबई येथे गेल्या महिन्याच्या शेवटी गेले होते. त्यापैकी एकाला ताप, सर्दी, खोकला अशी कोरोनाच्या संसर्गाची सौम्य लक्षणे दिसली. त्या आधारावर त्यांना डॉ. नायडू रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी एनआयव्हीला पाठविले. त्यात त्यांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निदान झाले.’’ या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते. असा झाला संसर्ग  सिंहगड रस्त्यावरील एका सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबातील तीन जण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सहलीसाठी दुबईला गेले होते. ही ४० जणांची ‘ग्रुप ट्रीप’ होती. पुण्याबरोबरच मुंबईसह वेगवेगळ्या राज्यांतील ही सगळी लोकं त्यांच्याबरोबर होती. ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १ मार्चला उतरले. तेथून कॅब करून ते पुण्यात सिंहगड रस्त्यावरील त्यांच्या सोसायटीत आले. त्यानंतर त्यांच्यातील एकाला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी खासगी डॉक्‍टरांकडून उपचार घेतला. नंतर त्यांचा त्रास वाढल्याने रविवारी (ता. ८) रात्री दोघे डॉ. नायडू संसर्ग रुग्णालयात आले. त्यांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी एनआयव्हीला पाठविले. तेथे ते नमुने ‘पॉझिटिव्ह’ आले. दुबई हे ठिकाण केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बाधित ठिकाणांच्या यादीमध्ये नसल्यामुळे संशयित रुग्ण एक मार्चला भारतात परत आल्यानंतर त्यांचे विलगीकरण केले नाही.   त्यानंतर त्यांच्या पत्नीची तपासणी करण्यात आली. तिलाही संसर्ग झाल्याचे आढळून आले. या दोघांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या मुलांचीही तपासणी केली गेली. त्यात मुलीला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. ते ज्या कॅबमधून मुंबईहून पुण्याला आले होते, त्या कॅब चालकाला आणि विमानात त्यांच्याशेजारी बसलेल्या सहप्रवाशालाही कोरोनाची बाधा झाली आहे. आता काय करणार ?  या दोन्ही व्यक्ती भारतात परत आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेण्यात आली आहे. या दोन्ही रुग्णांचे कुटुंबीय, मित्र परिवार तसेच त्यांच्या कार्यालयीन ठिकाणी असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही तपासणी करणार आहे. आतापर्यंत रुग्णांच्या कुटुंबातील तीन व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. पती-पत्नी आणि मुलगा-मुलगी यांना डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. या दोन्ही व्यक्तींसोबत दुबई येथे गेलेल्या ४० व्यक्तींची नावे आणि संपर्क क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध असून ते विविध जिल्ह्यांतील नागरिक असल्याने संबंधित जिल्हा प्रशासन त्यांना संपर्क करून त्यांची तपासणी करण्याबाबत कार्यवाही करत आहे. या दोन्ही व्यक्तींनी ज्या व्यक्तीच्या कॅबने मुंबईवरून पुण्याला प्रवास केला, अशा व्यक्तीची माहिती घेण्यात आली असून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले आहे. पुढे काय होणार ? सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर सर्दी, ताप, खोकल्याची औषधे आणि चौरस आहार दिला जात आहे. पुढील तीन दिवसांनंतर ‘पॉझिटिव्ह’ आलेल्या रुग्णांचे नमुने परत तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविण्यात येतील.  त्याच्या अहवालावर पुढील निर्णय घेतला जाईल. एनआयव्हीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यास त्यांना रुग्णालयातच विलगीकरण कक्षात पुढील तीन दिवस ठेवण्यात येईल. तो ‘निगेटिव्ह’ आल्यास त्यांना घरी सोडण्याची शक्‍यता आहे.  राज्यभर दक्षता सर्व जिल्हा रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत विलगीकरण कक्ष आतापर्यंत भरती झालेल्या ३०४ पैकी २८९ जणांना रुग्णालयातून घरी सोडले पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे उपाययोजना ठरविण्यासाठी राज्य सरकारची आज (बुधवारी) बैठक १२ जणांवर पुण्यात, तर ३ जणांवर मुंबईत उपचार सुरू News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 10, 2020

पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण पुणे - दुबईतून प्रवास करुन आलेल्या पुण्यातील पती-पत्नीला कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निदान ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था’ने (एनआयव्ही) केले. त्यांच्या पाठोपाठ त्यांची मुलगी, मुंबई ते पुणे दरम्यान त्यांनी प्रवास केलेल्या कॅबचा चालक आणि विमानातील सहप्रवासी, अशा तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल ‘एनआयव्ही’ने मंगळवारी दिला. त्यामुळे पुण्यात कोरोना ‘पॉझिटिव्ह’ची संख्या पाच झाली आहे. या घटनेनंतर पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यातील रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येताच राज्य सरकारने तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना सर्व विभागांना दिल्या. पुण्यातील कोरोनाच्या प्रसाराबाबत पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, ‘‘पुण्यातील तीन जण सहलीसाठी दुबई येथे गेल्या महिन्याच्या शेवटी गेले होते. त्यापैकी एकाला ताप, सर्दी, खोकला अशी कोरोनाच्या संसर्गाची सौम्य लक्षणे दिसली. त्या आधारावर त्यांना डॉ. नायडू रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी एनआयव्हीला पाठविले. त्यात त्यांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निदान झाले.’’ या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते. असा झाला संसर्ग  सिंहगड रस्त्यावरील एका सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबातील तीन जण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सहलीसाठी दुबईला गेले होते. ही ४० जणांची ‘ग्रुप ट्रीप’ होती. पुण्याबरोबरच मुंबईसह वेगवेगळ्या राज्यांतील ही सगळी लोकं त्यांच्याबरोबर होती. ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १ मार्चला उतरले. तेथून कॅब करून ते पुण्यात सिंहगड रस्त्यावरील त्यांच्या सोसायटीत आले. त्यानंतर त्यांच्यातील एकाला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी खासगी डॉक्‍टरांकडून उपचार घेतला. नंतर त्यांचा त्रास वाढल्याने रविवारी (ता. ८) रात्री दोघे डॉ. नायडू संसर्ग रुग्णालयात आले. त्यांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी एनआयव्हीला पाठविले. तेथे ते नमुने ‘पॉझिटिव्ह’ आले. दुबई हे ठिकाण केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बाधित ठिकाणांच्या यादीमध्ये नसल्यामुळे संशयित रुग्ण एक मार्चला भारतात परत आल्यानंतर त्यांचे विलगीकरण केले नाही.   त्यानंतर त्यांच्या पत्नीची तपासणी करण्यात आली. तिलाही संसर्ग झाल्याचे आढळून आले. या दोघांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या मुलांचीही तपासणी केली गेली. त्यात मुलीला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. ते ज्या कॅबमधून मुंबईहून पुण्याला आले होते, त्या कॅब चालकाला आणि विमानात त्यांच्याशेजारी बसलेल्या सहप्रवाशालाही कोरोनाची बाधा झाली आहे. आता काय करणार ?  या दोन्ही व्यक्ती भारतात परत आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेण्यात आली आहे. या दोन्ही रुग्णांचे कुटुंबीय, मित्र परिवार तसेच त्यांच्या कार्यालयीन ठिकाणी असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही तपासणी करणार आहे. आतापर्यंत रुग्णांच्या कुटुंबातील तीन व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. पती-पत्नी आणि मुलगा-मुलगी यांना डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. या दोन्ही व्यक्तींसोबत दुबई येथे गेलेल्या ४० व्यक्तींची नावे आणि संपर्क क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध असून ते विविध जिल्ह्यांतील नागरिक असल्याने संबंधित जिल्हा प्रशासन त्यांना संपर्क करून त्यांची तपासणी करण्याबाबत कार्यवाही करत आहे. या दोन्ही व्यक्तींनी ज्या व्यक्तीच्या कॅबने मुंबईवरून पुण्याला प्रवास केला, अशा व्यक्तीची माहिती घेण्यात आली असून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले आहे. पुढे काय होणार ? सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर सर्दी, ताप, खोकल्याची औषधे आणि चौरस आहार दिला जात आहे. पुढील तीन दिवसांनंतर ‘पॉझिटिव्ह’ आलेल्या रुग्णांचे नमुने परत तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविण्यात येतील.  त्याच्या अहवालावर पुढील निर्णय घेतला जाईल. एनआयव्हीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यास त्यांना रुग्णालयातच विलगीकरण कक्षात पुढील तीन दिवस ठेवण्यात येईल. तो ‘निगेटिव्ह’ आल्यास त्यांना घरी सोडण्याची शक्‍यता आहे.  राज्यभर दक्षता सर्व जिल्हा रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत विलगीकरण कक्ष आतापर्यंत भरती झालेल्या ३०४ पैकी २८९ जणांना रुग्णालयातून घरी सोडले पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे उपाययोजना ठरविण्यासाठी राज्य सरकारची आज (बुधवारी) बैठक १२ जणांवर पुण्यात, तर ३ जणांवर मुंबईत उपचार सुरू News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2IybeZg

No comments:

Post a Comment