Click Live News Short news on Mobile 2019.....: Tajya news Feeds

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......
Showing posts with label Tajya news Feeds. Show all posts
Showing posts with label Tajya news Feeds. Show all posts

Tuesday, April 13, 2021

डॉ. बाबासाहेबांनी आजवर केलेली 'ही' मंदिर सत्याग्रहे! काळाराम मंदिर प्रवेश भारतीय इतिहासातील मोठा लढा

नाशिक : काळाराम मंदिराचा सत्याग्रह आपणाला माहीतच आहे.
माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळण्याकरिता बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. "देव्हाऱ्यात जनावरांना जायला परवानगी आहे परंतु दलितांना का नाही. आम्हीही माणसेच आहोत." हा संदेश देण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक मंदिर सत्याग्रह केलेली आहेत. त्याबद्दल जाणून घेऊ.

काळाराम मंदिर सत्याग्रह

काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २ मार्च इ.स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता. हा लढा २ मार्च १९३० ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. बाबासाहेबांचे जवळचे सहकारी असलेले नाशिकचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी हा सत्याग्रह सातत्याने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे. हा मंदिर प्रवेश लढा भारतीय इतिहासातील मोठा लढा समजला जातो.

समानतेचा अधिकारासाठी संघर्ष

 काळाराम मंदिर सत्याग्रह हा देव दर्शनासाठीचा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी मंदिर प्रवेशाचा तो संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मूर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू बाबासाहेबांच्या चळवळीमागे होता.

 

पर्वती मंदिर सत्याग्रह

हा पुण्यातील पर्वती मंदिर प्रवेशासाठी इ.स. १९२९ मध्ये केला गेलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रह होता. पुण्यातील 'पर्वती टेकडीवरील मंदिर' हे अस्पृश्यांना खुले नव्हते. हा बाबासाहेबांचा अमरावती नंतरचा दुसरा मंदिर सत्याग्रह आहे. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील आंबेडकरांच्या वतीने एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला त्यांचा अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून ट्रर्टने अर्ज फेटाळला. यानंतर मंदिर प्रवेशासाठी एक सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. या सर्वांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पुणे पर्वती सत्याग्रह सुरू केला. यात शिवराम कांबळे, एम.एम.जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित हजारों स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता.

 

अंबादेवी मंदिर सत्याग्रह

अमरावती येथील प्राचीन 'अंबादेवी मंदिरात' प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा सत्याग्रह पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २६ जून इ.स. १९२७ रोजी सुरू झाला होता. या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिले.

 

हिंदू मंदिरांतील प्रवेशासाठी सत्याग्रह
हिंदू धर्मातील ईश्वरांची पूजा करण्यासाठी बहुसंख्य दलितांचा अधिकार नाकारला जाई. कारण अस्पृश्यांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिरे बाटतील, सामाजिक अनर्थ घडेल अशी समजूत होती. ही गोष्ट बाबासाहेबांना मान्य नव्हती. मानवी समानतेसाठी ज्याप्रमाणे चवदार तळ्याचा सत्याग्रह करावा लागला. त्याचप्रमाणे हिंदू मंदिरांतील प्रवेशासाठीही करावा लागेल याची जाणीव बाबासाहेबांना झाली. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला.

 

 हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन झालेली भारतातील काही मंदिर प्रवेश सत्याग्रहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काळाराम मंदिर सत्याग्रह

इ.स. १९३१ - ३५

एम.एम. जोशी यांचा पर्वती मंदिर सत्याग्रह

इ.स. १९२९

डॉ. पंजाबराव देशमुख यांचा अमरावती अंबादेवी मंदिर सत्याग्रह

इ.स. १९२८

साने गुरुजी यांचा पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सत्याग्रह

इ.स. १९४७

भंगीकाम करणाऱ्या २०० दलित महिलांचा काशी विश्वनाथ मंदिरात (पहिल्यांदाच) प्रवेश आणि पूजा 

२० जून २०११

अस्पृश्य महिलांचा राजस्थानच्या नाथद्वारा मंदिरात प्रवेश

इ.स. १९८८

अस्पृश्य महिलांचा ओरिसामधील जगन्नाथ मंदिरात प्रवेश

२००६

गढवालमधल्या जौनसर बावर तालुक्यातील परशुराम राम मंदिरात महिलांना व अस्पृश्यांना प्रवेश; (४०० वर्षे असा प्रवेश नव्हता)

१६ जानेवारी २०१६

Tajya news Feeds https://ift.tt/3dgwkLP

डॉ. बाबासाहेबांनी आजवर केलेली 'ही' मंदिर सत्याग्रहे! काळाराम मंदिर प्रवेश भारतीय इतिहासातील मोठा लढा नाशिक : काळाराम मंदिराचा सत्याग्रह आपणाला माहीतच आहे. माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळण्याकरिता बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. "देव्हाऱ्यात जनावरांना जायला परवानगी आहे परंतु दलितांना का नाही. आम्हीही माणसेच आहोत." हा संदेश देण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक मंदिर सत्याग्रह केलेली आहेत. त्याबद्दल जाणून घेऊ. काळाराम मंदिर सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २ मार्च इ.स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता. हा लढा २ मार्च १९३० ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. बाबासाहेबांचे जवळचे सहकारी असलेले नाशिकचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी हा सत्याग्रह सातत्याने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे. हा मंदिर प्रवेश लढा भारतीय इतिहासातील मोठा लढा समजला जातो. समानतेचा अधिकारासाठी संघर्ष  काळाराम मंदिर सत्याग्रह हा देव दर्शनासाठीचा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी मंदिर प्रवेशाचा तो संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मूर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू बाबासाहेबांच्या चळवळीमागे होता.   पर्वती मंदिर सत्याग्रह हा पुण्यातील पर्वती मंदिर प्रवेशासाठी इ.स. १९२९ मध्ये केला गेलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रह होता. पुण्यातील 'पर्वती टेकडीवरील मंदिर' हे अस्पृश्यांना खुले नव्हते. हा बाबासाहेबांचा अमरावती नंतरचा दुसरा मंदिर सत्याग्रह आहे. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील आंबेडकरांच्या वतीने एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला त्यांचा अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून ट्रर्टने अर्ज फेटाळला. यानंतर मंदिर प्रवेशासाठी एक सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. या सर्वांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पुणे पर्वती सत्याग्रह सुरू केला. यात शिवराम कांबळे, एम.एम.जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित हजारों स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता.   अंबादेवी मंदिर सत्याग्रह अमरावती येथील प्राचीन 'अंबादेवी मंदिरात' प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा सत्याग्रह पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २६ जून इ.स. १९२७ रोजी सुरू झाला होता. या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिले.   हिंदू मंदिरांतील प्रवेशासाठी सत्याग्रह हिंदू धर्मातील ईश्वरांची पूजा करण्यासाठी बहुसंख्य दलितांचा अधिकार नाकारला जाई. कारण अस्पृश्यांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिरे बाटतील, सामाजिक अनर्थ घडेल अशी समजूत होती. ही गोष्ट बाबासाहेबांना मान्य नव्हती. मानवी समानतेसाठी ज्याप्रमाणे चवदार तळ्याचा सत्याग्रह करावा लागला. त्याचप्रमाणे हिंदू मंदिरांतील प्रवेशासाठीही करावा लागेल याची जाणीव बाबासाहेबांना झाली. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला.    हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन झालेली भारतातील काही मंदिर प्रवेश सत्याग्रहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काळाराम मंदिर सत्याग्रह इ.स. १९३१ - ३५ एम.एम. जोशी यांचा पर्वती मंदिर सत्याग्रह इ.स. १९२९ डॉ. पंजाबराव देशमुख यांचा अमरावती अंबादेवी मंदिर सत्याग्रह इ.स. १९२८ साने गुरुजी यांचा पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सत्याग्रह इ.स. १९४७ भंगीकाम करणाऱ्या २०० दलित महिलांचा काशी विश्वनाथ मंदिरात (पहिल्यांदाच) प्रवेश आणि पूजा  २० जून २०११ अस्पृश्य महिलांचा राजस्थानच्या नाथद्वारा मंदिरात प्रवेश इ.स. १९८८ अस्पृश्य महिलांचा ओरिसामधील जगन्नाथ मंदिरात प्रवेश २००६ गढवालमधल्या जौनसर बावर तालुक्यातील परशुराम राम मंदिरात महिलांना व अस्पृश्यांना प्रवेश; (४०० वर्षे असा प्रवेश नव्हता) १६ जानेवारी २०१६ Tajya news Feeds https://ift.tt/3dgwkLP

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3mKiuoc
Read More
तरुणाईचे बाबासाहेबांना अनोखे अभिवादन; "एक मूठ धान्य कलाकारांसाठी' 

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यंदा तरुणाईकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी आंबेडकर जयंतीनिमित्त होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे "एक मूठ धान्य कलाकारांसाठी' ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यातून जमणारी मदत आजही चळवळ नेटाने पुढे नेणाऱ्या कलाकारांना दिली जाणार आहे. 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून 26 जून राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत हा अनोखा उपक्रम होणार आहे. दरम्यान, राज्यभरातील शाहिरांनी यंदा "आम्ही आंबेडकरवादी' हे अभिमानगीत साकारले असून, ते यूट्यूब चॅनेलवर आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित झाले आहे. 

"माझ्या दहा भाषणांची ताकद शाहिराच्या एका गाण्यात आहे,' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत. मात्र, कोरोनाच्या काळात चळवळीतील हीच शाहीर आणि कलाकार मंडळी जगण्यासाठी धडपडत आहेत. गेल्या वर्षीपासून एकही कार्यक्रम झाला नाही आणि आता आंबेडकर जयंतीच्या अगोदरच कोरोनाचा पुन्हा कहर झाला असल्याने यंदाही कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे आर्थिक विवंचनेत असणाऱ्या या शाहीर व कलाकारांना धान्याबरोबरच जीवनावश्‍यक साहित्यासाठी समाजातील दातृत्वाला साद घातली आहे.

धान्य, कडधान्य, साखर, खाद्यतेल, शैक्षणिक साहित्य व आर्थिक स्वरूपात ही मदत बिंदू चौकातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात स्वीकारली जाणार आहे. ऑल इंडिया स्टुडंटस्‌ फेडरेशन आणि अश्‍वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनचे कबीर नाईकनवरे, हरीश कांबळे, धीरज कठारे, रविराज सदाजय, हर्षवर्धन कांबळे, नितीन कांबळे, आरती रेडेकर, योगेश कसबे आदींनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

असाही विचारांचा जागर 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीला माहिती व्हावेत, या उद्देशाने "आम्ही आंबेडकरवादी' या गाण्याची निर्मिती झाली आहे. सांगलीच्या शाहीर दीपक गोठणेकर यांनी हे गीत लिहिले असून शिरीष पवार, प्रवीण डोणे (मुंबई), कबीर नाईकनवरे, स्नेहलता सातपुते (कोल्हापूर), चरण जाधव (औरंगाबाद) या शाहिरांनी ते गायिले आहे. बाबासाहेबांच्या भूमिकेत विजयकुमार नागदिवे असून दुष्यंत इनामदार यांचे नृत्य दिग्दर्शन आहे. नीलेश जाधव यांचे छायाचित्रण तर अभिजीत सुतार यांचे ध्वनी संकलन व आकाश मोरे यांनी व्हिडिओ संकलन केले आहे.

 
 संपादन- अर्चना बनगे

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

तरुणाईचे बाबासाहेबांना अनोखे अभिवादन; "एक मूठ धान्य कलाकारांसाठी'  कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यंदा तरुणाईकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी आंबेडकर जयंतीनिमित्त होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे "एक मूठ धान्य कलाकारांसाठी' ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यातून जमणारी मदत आजही चळवळ नेटाने पुढे नेणाऱ्या कलाकारांना दिली जाणार आहे. 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून 26 जून राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत हा अनोखा उपक्रम होणार आहे. दरम्यान, राज्यभरातील शाहिरांनी यंदा "आम्ही आंबेडकरवादी' हे अभिमानगीत साकारले असून, ते यूट्यूब चॅनेलवर आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित झाले आहे.  "माझ्या दहा भाषणांची ताकद शाहिराच्या एका गाण्यात आहे,' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत. मात्र, कोरोनाच्या काळात चळवळीतील हीच शाहीर आणि कलाकार मंडळी जगण्यासाठी धडपडत आहेत. गेल्या वर्षीपासून एकही कार्यक्रम झाला नाही आणि आता आंबेडकर जयंतीच्या अगोदरच कोरोनाचा पुन्हा कहर झाला असल्याने यंदाही कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे आर्थिक विवंचनेत असणाऱ्या या शाहीर व कलाकारांना धान्याबरोबरच जीवनावश्‍यक साहित्यासाठी समाजातील दातृत्वाला साद घातली आहे. धान्य, कडधान्य, साखर, खाद्यतेल, शैक्षणिक साहित्य व आर्थिक स्वरूपात ही मदत बिंदू चौकातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात स्वीकारली जाणार आहे. ऑल इंडिया स्टुडंटस्‌ फेडरेशन आणि अश्‍वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनचे कबीर नाईकनवरे, हरीश कांबळे, धीरज कठारे, रविराज सदाजय, हर्षवर्धन कांबळे, नितीन कांबळे, आरती रेडेकर, योगेश कसबे आदींनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.  असाही विचारांचा जागर  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीला माहिती व्हावेत, या उद्देशाने "आम्ही आंबेडकरवादी' या गाण्याची निर्मिती झाली आहे. सांगलीच्या शाहीर दीपक गोठणेकर यांनी हे गीत लिहिले असून शिरीष पवार, प्रवीण डोणे (मुंबई), कबीर नाईकनवरे, स्नेहलता सातपुते (कोल्हापूर), चरण जाधव (औरंगाबाद) या शाहिरांनी ते गायिले आहे. बाबासाहेबांच्या भूमिकेत विजयकुमार नागदिवे असून दुष्यंत इनामदार यांचे नृत्य दिग्दर्शन आहे. नीलेश जाधव यांचे छायाचित्रण तर अभिजीत सुतार यांचे ध्वनी संकलन व आकाश मोरे यांनी व्हिडिओ संकलन केले आहे.    संपादन- अर्चना बनगे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/32dYOje
Read More
'आई ऽऽऽ'च्या हंबरड्यानं गहिवरले ग्रामस्थ, जगात येण्यापूर्वीच हरवलं बापाचं छत्र

टेकाडी (जि. नागपूर) : पारशिवनी तालुक्यातील टेकाडी गावात कोरोनाने थैमान घातले असून गावात एकाच दिवशी तिघांचा बळी गेल्याने गाव हादरून सुटले आहे. एकाच दिवशी मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरवल्याने 'आई ऽऽऽ....या हंबरड्याने ग्रामस्थ गहिवरले, तर ३१ वर्षीय युवकाच्या जाण्याने पाच महिन्याच्या गर्भवती पत्नीपुढे जगण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कधी न शांत राहणारं गाव मात्र आज अंतर्मनात रडताना अनेकांनी अनुभवले आहे. 

हेही वाचा - मराठी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार, तर २० बाधितांचा मृत्यू

शासनाने अनेक निर्बध लावून कोरोनाची परिस्थितीत प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याचे संकेत देत स्वतःची काळजी स्वतः घेण्याचे आवाहन केले आहे. अशात आठ दहा दिवस अंगावर रोग काढून रुग्णालय गाठणे आता नागरिकांच्या अंगलट येताना दिसून येत आहे. गावात दिवसागणिक मृत्यूचे तांडव सुरूच आहे. अशात काही दिवस मृतांच्या बातम्या ऐकायला मिळत आहे. मंगळवारचा दिवस गावासाठी वाईट बातमी घेऊन उगवला. रात्रीला रुग्णालयात भरती केलेली आई सकाळी परतलीच नसल्याने गावात दिवस निघताच 'आईऽऽऽ...असा हंबरडा ग्रामस्थांच्या कानी पडला आणि गावात सकाळच्या चुली पेटल्याच नाही. जवाहरलाल रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन अपघातात मृत कल्पना अनिल कडू (वय४०), किरण राधेश्याम बोराडे (वय४५) या दोघीही गेल्या काही दिवसांपासून आजाराने ग्रस्त होत्या. किरण बोराडे यांची कोविड चाचणी बाधित आली होती. ऑक्सिजन पातळी कमी असल्याने त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कल्पना कडू यांची देखील गेल्या आठ दिवसापासून प्रकृती खालावलेली होती.

हेही वाचा - स्वीट मार्टमधून मिठाईऐवजी चक्क तंबाखूजन्य पदार्थांची...

ऑक्सिजन पातळी कमी असल्याने कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत त्यांना जे. एन.रुग्णालयात सोमवारीच दाखल करण्यात आले होते. त्यांची कोविड चाचणी मंगळवारी घेण्यात येणार होती. परंतु, त्या आधीच पर्याप्त ऑक्सिजन मिळाले नसल्याने दोघीही दगावल्याचे वृत्त गावात धडकले. या दोघांच्या मृत्यूची बातमी नंतर लगेच गावातील हरहुन्नरी ३१ वर्षीय युवक सुहास रामकृष्ण मोहूर्ले हा काही दिवसाआधी कोरोना बाधित आला होता. नागपूर स्थित खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, मंगळवारला त्याच्या मृत्यूच्या बातमीने गावात स्मशान शांतताच निर्माण झाली. सुहास याचे वडील देखील नागपूर स्थित खासगी रुग्णालयात कोरोनाशी दोन दोन हात करीत आहेत, तर घरी सुहासची ५ महिन्याची गर्भवती पत्नी पती जाण्याची कुठलीच चाहूल न लागता त्याच्या सुदृढ आयुष्याची प्रार्थना करत बाळासोबत आयुष्यचे स्वप्न रंगवत होती. नातेवाईकांनी हिमतीने तिला घाटावर नेऊन दुःखद बातमी दिली. त्यानंतर तिच्या पुढे जगण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कधी न शांत राहणारे गाव मात्र आज अंतर्मनात रडताना अनेकांनी पाहिलं आहे. बऱ्याच घरी चुलीही पेटल्याच नाहीत. 

हेही वाचा - नागपुरात ऑक्सिजन प्लांट स्थापनेला राज्य सरकारची मंजुरी...

रुग्ण दाखल झाले तेव्हाच त्यांची प्रकृती गंभीर होती. नागपूरला उपचारासाठी जागा मिळत नसल्याने त्यांनी प्राथमिकता जवाहरला नेहरू रुग्णालयाला दिली होती. पूर्ण रुग्णांचे ऑक्सिजन लेव्हल अगोदरच कमी होते. प्रत्येकाला व्हेंटिलेटरची गरज होती. नागपूर शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर व बेडस वारंवार संपर्क करून देखील उपलब्ध होत नव्हते. त्याची ताकीद देखील नातेवाइकांना आधीच देण्यात आली होती. 
-डॉ.गजानन धुर्वे, कोविड केंद्राचे निरीक्षक 
 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

'आई ऽऽऽ'च्या हंबरड्यानं गहिवरले ग्रामस्थ, जगात येण्यापूर्वीच हरवलं बापाचं छत्र टेकाडी (जि. नागपूर) : पारशिवनी तालुक्यातील टेकाडी गावात कोरोनाने थैमान घातले असून गावात एकाच दिवशी तिघांचा बळी गेल्याने गाव हादरून सुटले आहे. एकाच दिवशी मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरवल्याने 'आई ऽऽऽ....या हंबरड्याने ग्रामस्थ गहिवरले, तर ३१ वर्षीय युवकाच्या जाण्याने पाच महिन्याच्या गर्भवती पत्नीपुढे जगण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कधी न शांत राहणारं गाव मात्र आज अंतर्मनात रडताना अनेकांनी अनुभवले आहे.  हेही वाचा - मराठी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार, तर २० बाधितांचा मृत्यू शासनाने अनेक निर्बध लावून कोरोनाची परिस्थितीत प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याचे संकेत देत स्वतःची काळजी स्वतः घेण्याचे आवाहन केले आहे. अशात आठ दहा दिवस अंगावर रोग काढून रुग्णालय गाठणे आता नागरिकांच्या अंगलट येताना दिसून येत आहे. गावात दिवसागणिक मृत्यूचे तांडव सुरूच आहे. अशात काही दिवस मृतांच्या बातम्या ऐकायला मिळत आहे. मंगळवारचा दिवस गावासाठी वाईट बातमी घेऊन उगवला. रात्रीला रुग्णालयात भरती केलेली आई सकाळी परतलीच नसल्याने गावात दिवस निघताच 'आईऽऽऽ...असा हंबरडा ग्रामस्थांच्या कानी पडला आणि गावात सकाळच्या चुली पेटल्याच नाही. जवाहरलाल रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन अपघातात मृत कल्पना अनिल कडू (वय४०), किरण राधेश्याम बोराडे (वय४५) या दोघीही गेल्या काही दिवसांपासून आजाराने ग्रस्त होत्या. किरण बोराडे यांची कोविड चाचणी बाधित आली होती. ऑक्सिजन पातळी कमी असल्याने त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कल्पना कडू यांची देखील गेल्या आठ दिवसापासून प्रकृती खालावलेली होती. हेही वाचा - स्वीट मार्टमधून मिठाईऐवजी चक्क तंबाखूजन्य पदार्थांची... ऑक्सिजन पातळी कमी असल्याने कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत त्यांना जे. एन.रुग्णालयात सोमवारीच दाखल करण्यात आले होते. त्यांची कोविड चाचणी मंगळवारी घेण्यात येणार होती. परंतु, त्या आधीच पर्याप्त ऑक्सिजन मिळाले नसल्याने दोघीही दगावल्याचे वृत्त गावात धडकले. या दोघांच्या मृत्यूची बातमी नंतर लगेच गावातील हरहुन्नरी ३१ वर्षीय युवक सुहास रामकृष्ण मोहूर्ले हा काही दिवसाआधी कोरोना बाधित आला होता. नागपूर स्थित खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, मंगळवारला त्याच्या मृत्यूच्या बातमीने गावात स्मशान शांतताच निर्माण झाली. सुहास याचे वडील देखील नागपूर स्थित खासगी रुग्णालयात कोरोनाशी दोन दोन हात करीत आहेत, तर घरी सुहासची ५ महिन्याची गर्भवती पत्नी पती जाण्याची कुठलीच चाहूल न लागता त्याच्या सुदृढ आयुष्याची प्रार्थना करत बाळासोबत आयुष्यचे स्वप्न रंगवत होती. नातेवाईकांनी हिमतीने तिला घाटावर नेऊन दुःखद बातमी दिली. त्यानंतर तिच्या पुढे जगण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कधी न शांत राहणारे गाव मात्र आज अंतर्मनात रडताना अनेकांनी पाहिलं आहे. बऱ्याच घरी चुलीही पेटल्याच नाहीत.  हेही वाचा - नागपुरात ऑक्सिजन प्लांट स्थापनेला राज्य सरकारची मंजुरी... रुग्ण दाखल झाले तेव्हाच त्यांची प्रकृती गंभीर होती. नागपूरला उपचारासाठी जागा मिळत नसल्याने त्यांनी प्राथमिकता जवाहरला नेहरू रुग्णालयाला दिली होती. पूर्ण रुग्णांचे ऑक्सिजन लेव्हल अगोदरच कमी होते. प्रत्येकाला व्हेंटिलेटरची गरज होती. नागपूर शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर व बेडस वारंवार संपर्क करून देखील उपलब्ध होत नव्हते. त्याची ताकीद देखील नातेवाइकांना आधीच देण्यात आली होती.  -डॉ.गजानन धुर्वे, कोविड केंद्राचे निरीक्षक    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3di6S8Z
Read More
चार वर्षे भांडणात, एक वर्ष विकासात! विरोधी पक्षाची तलवार म्यान

मुरगूड (कोल्हापूर)  : शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्षपद भूषवणारे राजेखान जमादार विरुद्ध मंडलिक गटाचे, पर्यायाने शिवसेनेचे नगरसेवक - नगरसेविका यांच्यातील कधी होणारे शीतयुद्ध तर कधी झालेली हमरीतुमरी यामुळे पालिकेतील सत्ताधारी मंडळींची पंचवार्षिक कारकीर्द चार वर्षे भांडणात आणि एक वर्ष विकासात, अशीच राहिली आहे. तर अल्प संख्याबळामुळे विरोधी पक्षाने बघ्याची भूमिका घेतली आहे. 

फ्लॅशबॅक 
मंडलिक गटाने गेल्या निवडणुकीपूर्वी माहितीच्या अधिकाराचे भांडवल हाताशी धरुन सत्ताधारी पाटील-मुश्रीफ गटाला सळो की पळो करुन सोडले होते. भ्रष्टाचाराचे आरोप करत पाटील गटातील अंतर्गत फुटीचा फायदा उठवला आणि संजय घाटगे गटाच्या साथीने पाटील-मुश्रीफ गटाचा पराभव केला. राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील, टोकाच्या संघर्षातील पालिकेवर (कै.) विश्वनाथराव पाटील यांच्या पाटील गटाने सर्वाधिक काळ तर त्या पाठोपाठ खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या गटाने सत्ता गाजवली आहे. 

सध्याचे चित्र 
सध्या "गोकुळ'चे रणांगण तापले आहे. मुरगूडमधून सत्ताधारी पॅनेलमधून संचालक रणजितसिंह पाटील तर विरोधी राजर्षी शाहू आघाडीतून खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक व बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील इच्छुक आहेत. पालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे, तर राष्ट्रवादी विरोधी बाकावर आहे. पण राज्यातील आघाडीची सत्ता व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार मंडलिक यांच्यातील सलोख्याचे संबंध, मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत असणारे व नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले प्रवीणसिंह पाटील यांची समझोता एक्‍स्प्रेस लक्षात घेता पालिकेत विरोधी पक्ष अस्तित्वात आहे का? असा प्रश्न पडतो.

राज्यातील सत्तासूत्रे पाहता खासदार मंडलिक, मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून सहा महिन्यात विविध विकासकामांना निधी आणण्यात नगराध्यक्ष जमादार यांनी यश मिळविले आहे. सुधारित नळ-पाणी योजना, बाजारपेठेतील फूटपाथ, गटर्स, हायमास्क दिवे, हुतात्मा तुकाराम चौक सुशोभीकरण अशा जवळपास 15 कोटींच्या विविध विकासकामांची धांदल सुरू आहे. नळ-पाणी पुरवठा योजनेमुळे रस्ते खोदाई केली आहे. शहरात एकही रस्ता सुस्थितीत नाही. मेच्या अखेरीपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे पालिका प्रशासनाचे धोरण आहे. 

घडलंय बिघडलंय - 
पालिका निवडणुकीत नेहमी होणारा मंडलिक विरुद्ध पाटील गटाचा सामना लक्षवेधी ठरत होता; पण आता पाटील गटाच्या फुटीमुळे तशा निवडणुका होणे कठीण आहे. पालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी कोणत्याही गटाला घाटगे गटाची साथ घेतल्याशिवाय यश मिळालेले नाही. मंडलिक गटाने सत्ता मिळवली खरी; पण या यशाचा निवडून देणाऱ्या जनतेला चार वर्षे फारसा उपयोग झालेला दिसत नाही. अपवाद वगळता सत्ताधारी नगरसेवक - नगरसेविका आहेत. यांना त्यांच्या सत्तेचा फारसा उपयोग झाला नाही. सहा महिन्यांपासून नगराध्यक्ष जमादार व नगरसेवकातील चार वर्षे सुरु असलेला संघर्ष बऱ्यापैकी थोपवण्यात नेत्यांना यश आले आहे. 

पुढे काय? 
निवडणूक तोंडावर असताना विरोधी गटाकडून जे रान उठवले जाते, त्याचा लवलेशही आज पाहावयास मिळत नाही. 
"गोकुळ'चे संचालक पाटील यांनी वर्षभरापासून मुरगुडात तळ ठोकला आहे. तर भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी वारंवार कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहत निवडणुकीच्या जोडण्या सुरू ठेवल्या आहेत. प्रवीणसिंह पाटील यांना ताकद देत मंत्री मुश्रीफ पुढील रणनीती आखताना दिसत आहेत. आगामी निवडणुकीत सत्ताधारी मंडलिक गटाच्या विरोधात नेमकी कशी आघाडी होणार? की मंडलिक, मुश्रीफ व प्रवीणसिंह पाटील एकत्रित राहणार, हे लवकरच कळेल. 

पक्षीय बलाबल - 
शिवसेना - 17 
राष्ट्रवादी - 3 

घडलंय-बिघडलंय 
* वेदगंगेत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न कायम 
* शहर स्वच्छता शासनाच्या बक्षिसापुरतीच 
* औद्योगिकीकरणाकडे सर्व नेत्यांचा कानाडोळा 
* शहरातील तरुणांसाठी खेळाच्या मैदानाची वानवा 
* बागबगीचा, ज्येष्ठांसाठी विरंगुळा पार्कचे काय? 
* शासकीय कार्यालयांची कमतरता 

संपादन- अर्चना बनगे

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

चार वर्षे भांडणात, एक वर्ष विकासात! विरोधी पक्षाची तलवार म्यान मुरगूड (कोल्हापूर)  : शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्षपद भूषवणारे राजेखान जमादार विरुद्ध मंडलिक गटाचे, पर्यायाने शिवसेनेचे नगरसेवक - नगरसेविका यांच्यातील कधी होणारे शीतयुद्ध तर कधी झालेली हमरीतुमरी यामुळे पालिकेतील सत्ताधारी मंडळींची पंचवार्षिक कारकीर्द चार वर्षे भांडणात आणि एक वर्ष विकासात, अशीच राहिली आहे. तर अल्प संख्याबळामुळे विरोधी पक्षाने बघ्याची भूमिका घेतली आहे.  फ्लॅशबॅक  मंडलिक गटाने गेल्या निवडणुकीपूर्वी माहितीच्या अधिकाराचे भांडवल हाताशी धरुन सत्ताधारी पाटील-मुश्रीफ गटाला सळो की पळो करुन सोडले होते. भ्रष्टाचाराचे आरोप करत पाटील गटातील अंतर्गत फुटीचा फायदा उठवला आणि संजय घाटगे गटाच्या साथीने पाटील-मुश्रीफ गटाचा पराभव केला. राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील, टोकाच्या संघर्षातील पालिकेवर (कै.) विश्वनाथराव पाटील यांच्या पाटील गटाने सर्वाधिक काळ तर त्या पाठोपाठ खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या गटाने सत्ता गाजवली आहे.  सध्याचे चित्र  सध्या "गोकुळ'चे रणांगण तापले आहे. मुरगूडमधून सत्ताधारी पॅनेलमधून संचालक रणजितसिंह पाटील तर विरोधी राजर्षी शाहू आघाडीतून खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक व बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील इच्छुक आहेत. पालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे, तर राष्ट्रवादी विरोधी बाकावर आहे. पण राज्यातील आघाडीची सत्ता व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार मंडलिक यांच्यातील सलोख्याचे संबंध, मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत असणारे व नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले प्रवीणसिंह पाटील यांची समझोता एक्‍स्प्रेस लक्षात घेता पालिकेत विरोधी पक्ष अस्तित्वात आहे का? असा प्रश्न पडतो. राज्यातील सत्तासूत्रे पाहता खासदार मंडलिक, मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून सहा महिन्यात विविध विकासकामांना निधी आणण्यात नगराध्यक्ष जमादार यांनी यश मिळविले आहे. सुधारित नळ-पाणी योजना, बाजारपेठेतील फूटपाथ, गटर्स, हायमास्क दिवे, हुतात्मा तुकाराम चौक सुशोभीकरण अशा जवळपास 15 कोटींच्या विविध विकासकामांची धांदल सुरू आहे. नळ-पाणी पुरवठा योजनेमुळे रस्ते खोदाई केली आहे. शहरात एकही रस्ता सुस्थितीत नाही. मेच्या अखेरीपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे पालिका प्रशासनाचे धोरण आहे.  घडलंय बिघडलंय -  पालिका निवडणुकीत नेहमी होणारा मंडलिक विरुद्ध पाटील गटाचा सामना लक्षवेधी ठरत होता; पण आता पाटील गटाच्या फुटीमुळे तशा निवडणुका होणे कठीण आहे. पालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी कोणत्याही गटाला घाटगे गटाची साथ घेतल्याशिवाय यश मिळालेले नाही. मंडलिक गटाने सत्ता मिळवली खरी; पण या यशाचा निवडून देणाऱ्या जनतेला चार वर्षे फारसा उपयोग झालेला दिसत नाही. अपवाद वगळता सत्ताधारी नगरसेवक - नगरसेविका आहेत. यांना त्यांच्या सत्तेचा फारसा उपयोग झाला नाही. सहा महिन्यांपासून नगराध्यक्ष जमादार व नगरसेवकातील चार वर्षे सुरु असलेला संघर्ष बऱ्यापैकी थोपवण्यात नेत्यांना यश आले आहे.  पुढे काय?  निवडणूक तोंडावर असताना विरोधी गटाकडून जे रान उठवले जाते, त्याचा लवलेशही आज पाहावयास मिळत नाही.  "गोकुळ'चे संचालक पाटील यांनी वर्षभरापासून मुरगुडात तळ ठोकला आहे. तर भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी वारंवार कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहत निवडणुकीच्या जोडण्या सुरू ठेवल्या आहेत. प्रवीणसिंह पाटील यांना ताकद देत मंत्री मुश्रीफ पुढील रणनीती आखताना दिसत आहेत. आगामी निवडणुकीत सत्ताधारी मंडलिक गटाच्या विरोधात नेमकी कशी आघाडी होणार? की मंडलिक, मुश्रीफ व प्रवीणसिंह पाटील एकत्रित राहणार, हे लवकरच कळेल.  पक्षीय बलाबल -  शिवसेना - 17  राष्ट्रवादी - 3  घडलंय-बिघडलंय  * वेदगंगेत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न कायम  * शहर स्वच्छता शासनाच्या बक्षिसापुरतीच  * औद्योगिकीकरणाकडे सर्व नेत्यांचा कानाडोळा  * शहरातील तरुणांसाठी खेळाच्या मैदानाची वानवा  * बागबगीचा, ज्येष्ठांसाठी विरंगुळा पार्कचे काय?  * शासकीय कार्यालयांची कमतरता  संपादन- अर्चना बनगे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2QkCUIq
Read More
भरधाव कारने पोलिस कर्मचाऱ्याला चिरडले; मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

ओझर (जि.नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी रात्री साडेअकराला सहाय्यक उपनिरीक्षक गोंदकर मोटारसायकलवरून घरी परतत होते. त्यावेळी हा दुर्दैवी घटना घडली. 

मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

सोमवारी रात्री  ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रकांत गोंदकर (वय ५८, रा. ओझर) मोटारसायकलवरून घरी परतत होते. आडगाव शिवारातील शेरे पंजाब ढाब्याजवळ रस्ता मोकळा असताना भरधाव मर्सिडीजने गोंदकर यांना धडक दिली. कारने मोटारसायकलला फरफटत नेल्याने गोंदकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर फरारी झालेल्या बबलू कुरेशीने कार बदलण्याचाही प्रयत्न केल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  

बबलू कुरेशीला अटक

आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांनी बबलू कुरेशीला अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. बबलू कुरेशीविरुद्ध जनावरांची अवैध कत्तल केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत तीन, भद्रकाली पोलिसांत दोन, मुंबई नाका पोलिसांत व कळवा (ठाणे) पोलिसांत प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. अपघातास जबाबदार मर्सिडीज कार कोणाची आहे याचा आडगाव पोलिस शोध घेत आहेत.  

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

अपघातास जबाबदार मर्सिडीज कार कोणाची?

भरधाव मर्सिडीज कारने चिरडल्याने ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रकांत गोंदकर (वय ५८, रा. ओझर) यांचा मृत्यू झाला. कारचालक सद्दाम कयूम ऊर्फ बबलू कुरेशी (वय ३२, रा. कुरेशीनगर, वडाळा नाका) यास आडगाव पोलिसांनी अटक केली. त्यास दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

भरधाव कारने पोलिस कर्मचाऱ्याला चिरडले; मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना ओझर (जि.नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी रात्री साडेअकराला सहाय्यक उपनिरीक्षक गोंदकर मोटारसायकलवरून घरी परतत होते. त्यावेळी हा दुर्दैवी घटना घडली.  मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना सोमवारी रात्री  ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रकांत गोंदकर (वय ५८, रा. ओझर) मोटारसायकलवरून घरी परतत होते. आडगाव शिवारातील शेरे पंजाब ढाब्याजवळ रस्ता मोकळा असताना भरधाव मर्सिडीजने गोंदकर यांना धडक दिली. कारने मोटारसायकलला फरफटत नेल्याने गोंदकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर फरारी झालेल्या बबलू कुरेशीने कार बदलण्याचाही प्रयत्न केल्याची चर्चा आहे.  हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू   बबलू कुरेशीला अटक आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांनी बबलू कुरेशीला अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. बबलू कुरेशीविरुद्ध जनावरांची अवैध कत्तल केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत तीन, भद्रकाली पोलिसांत दोन, मुंबई नाका पोलिसांत व कळवा (ठाणे) पोलिसांत प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. अपघातास जबाबदार मर्सिडीज कार कोणाची आहे याचा आडगाव पोलिस शोध घेत आहेत.   हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात अपघातास जबाबदार मर्सिडीज कार कोणाची? भरधाव मर्सिडीज कारने चिरडल्याने ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रकांत गोंदकर (वय ५८, रा. ओझर) यांचा मृत्यू झाला. कारचालक सद्दाम कयूम ऊर्फ बबलू कुरेशी (वय ३२, रा. कुरेशीनगर, वडाळा नाका) यास आडगाव पोलिसांनी अटक केली. त्यास दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3sdB1KF
Read More
काल गावात एकही गुढी उभारली नाही; ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच भाक्षी गावात स्मशान शांतता

सटाणा (जि.नाशिक) : गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात...नवचैतन्याचा दिवस...पण त्याच दिवशी गावात अचानक एक काळजाचा ठोका चुकविणारी बातमी येऊन ठेपली. आणि मग गावात भयाण स्मशानशांतता पसरली. 

ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी स्मशानशांतता

ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांच्या निधनामुळे भाक्षी गावात ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. १३) एकही गुढी उभारली नाही. सैन्यदलात देशसेवेचे कर्तव्य बजावत असलेले तालुक्याचे भूमिपुत्र व जवान स्वप्नील अमोलक रौंदळ (वय २५) हे भाक्षी (ता. बागलाण) येथील रहिवासी असून यांना जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथे वीरमरण आले. त्यांच्या दुर्दैवी निधनाचे वृत्त समजताच सटाणा शहर व बागलाण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

पार्थिव अंतिम संस्कारासाठी कधी येईल, याबाबत अद्याप निर्णय नाही

बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी सांगितले, की चार वर्षांपासून सैन्यदलात असलेले बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र जवान स्वप्नील रौंदळ यांचे सध्या जम्मू-काश्मीर येथील सैन्यदलाच्या उधमपूर सेक्टर येथे ट्रेनिंग सुरू होते. ट्रेनिंगदरम्यान ते ज्या रूममध्ये वास्तव्यास होते, त्या रूमला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या भीषण आगीत जवान स्वप्नील रौंदळ यांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समजले आहे. जवान स्वप्नील रौंदळ यांचे पार्थिव भाक्षी येथे अंतिम संस्कारासाठी कधी येईल, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे तहसीलदार इंगळे-पाटील यांनी सांगितले. गृहरक्षक दलाचे जवान अमोलक रौंदळ यांचे ते पुत्र होत. 

मंगळवारी एकही गुढी उभारली नाही.
शहीद जवान स्वप्नील रौंदळ यांचे प्राथमिक शिक्षण भाक्षी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण सटाणा येथील लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये झाले होते. २०१६ मध्ये खडतर प्रशिक्षणानंतर स्वप्नील देशसेवेसाठी सैन्यदलात भरती झाले होते. पहिले पोस्टिंग राजस्थानमध्ये झाल्यानंतर नुकतीच दुसरे पोस्टिंग जम्मू-काश्मीरच्या सीबीएस सेक्टर येथे झाले होते. स्वप्नील अविवाहित असून, त्यांच्या मागे आई, वडील, एक बहीण आणि एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त शहर व तालुक्यात येऊन धडकताच शोककळा पसरली. जवान रौंदळ यांच्या निधनानंतर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, तालुक्याने भारतमातेचा सुपुत्र गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामुळे भाक्षी गावात मंगळवारी एकही गुढी उभारली नाही. 

 

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

काल गावात एकही गुढी उभारली नाही; ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच भाक्षी गावात स्मशान शांतता सटाणा (जि.नाशिक) : गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात...नवचैतन्याचा दिवस...पण त्याच दिवशी गावात अचानक एक काळजाचा ठोका चुकविणारी बातमी येऊन ठेपली. आणि मग गावात भयाण स्मशानशांतता पसरली.  ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी स्मशानशांतता ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांच्या निधनामुळे भाक्षी गावात ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. १३) एकही गुढी उभारली नाही. सैन्यदलात देशसेवेचे कर्तव्य बजावत असलेले तालुक्याचे भूमिपुत्र व जवान स्वप्नील अमोलक रौंदळ (वय २५) हे भाक्षी (ता. बागलाण) येथील रहिवासी असून यांना जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथे वीरमरण आले. त्यांच्या दुर्दैवी निधनाचे वृत्त समजताच सटाणा शहर व बागलाण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पार्थिव अंतिम संस्कारासाठी कधी येईल, याबाबत अद्याप निर्णय नाही बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी सांगितले, की चार वर्षांपासून सैन्यदलात असलेले बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र जवान स्वप्नील रौंदळ यांचे सध्या जम्मू-काश्मीर येथील सैन्यदलाच्या उधमपूर सेक्टर येथे ट्रेनिंग सुरू होते. ट्रेनिंगदरम्यान ते ज्या रूममध्ये वास्तव्यास होते, त्या रूमला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या भीषण आगीत जवान स्वप्नील रौंदळ यांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समजले आहे. जवान स्वप्नील रौंदळ यांचे पार्थिव भाक्षी येथे अंतिम संस्कारासाठी कधी येईल, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे तहसीलदार इंगळे-पाटील यांनी सांगितले. गृहरक्षक दलाचे जवान अमोलक रौंदळ यांचे ते पुत्र होत.  मंगळवारी एकही गुढी उभारली नाही. शहीद जवान स्वप्नील रौंदळ यांचे प्राथमिक शिक्षण भाक्षी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण सटाणा येथील लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये झाले होते. २०१६ मध्ये खडतर प्रशिक्षणानंतर स्वप्नील देशसेवेसाठी सैन्यदलात भरती झाले होते. पहिले पोस्टिंग राजस्थानमध्ये झाल्यानंतर नुकतीच दुसरे पोस्टिंग जम्मू-काश्मीरच्या सीबीएस सेक्टर येथे झाले होते. स्वप्नील अविवाहित असून, त्यांच्या मागे आई, वडील, एक बहीण आणि एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त शहर व तालुक्यात येऊन धडकताच शोककळा पसरली. जवान रौंदळ यांच्या निधनानंतर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, तालुक्याने भारतमातेचा सुपुत्र गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामुळे भाक्षी गावात मंगळवारी एकही गुढी उभारली नाही.    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3thJoGx
Read More
गुढ्यातील हाणामारीप्रकरणी दोघांना अटक; गावठी पिस्तूल जप्त

ढेबेवाडी (जि. सातारा) : ढेबेवाडी- कऱ्हाड रस्त्यावरील गुढे गावाजवळ नुकत्याच झालेल्या जोरदार हाणामारीप्रकरणी येथील पोलिसांनी साेमवारी रात्री उशिरा दोन युवकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पाटण न्यायालयाने मंगळवारी त्या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, भांडणाऱ्या युवकांवर झडप टाकून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व लोखंडी पाइप ताब्यात घेतलेल्या सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे नागरिकांतून आज दिवसभर कौतुक सुरू होते.
 
साेमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी- कऱ्हाड मार्गावरील गुढे बस थांब्याजवळ ही घटना घडली होती. दोन युवकांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू असतानाच तेथून मोटारीने ढेबेवाडीकडे निघालेले येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांचे सहकारी नवनाथ कुंभार, संदेश लादे यांनी भांडणात घुसून दोन्ही युवकांवर झडप घालत गावठी पिस्तूल व लोखंडी पाइपसह त्यांना ताब्यात घेतले. सचिन जनार्दन सुतार (रा. मानेगाव, ता. पाटण) व रोहित सुनील माने (रा. गुढे, ता. पाटण) अशी संबंधित युवकांची नावे आहेत. रात्री उशिरा दोघांवर विविध कलमांन्वये पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पाटण न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
 
गाडी आडवी मारल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. तुंबळ हाणामारी सुरू असतानाच भांडणात घुसून पिस्तूल ताब्यात घेतल्याने दिवसभर सहायक पोलिस निरीक्षक पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे नागरिकांतून कौतुक सुरू होते. सहायक फौजदार आर. एल. अंकुशी तपास करत आहेत. 

पोलिस हवालदाराचा असाही प्रामाणिकपणा! उंब्रज-मसूर मार्गावर सापडलेले पैसे केले रिक्षाचालकाला परत

शाब्बास! Indian Engineering Services परीक्षेत चारुदत्तने उभारली यशाची गुढी; युपीएससीत देशात ठरला अव्वल

गुढीपाडवा : कडुलिंब खाण्याच्या परंपरेला सलग दुसऱ्या वर्षी ब्रेक; गावागावांत शुकशुकाट

विशेष मुलांसाठी इनरव्हीलतर्फे 18 बूट; पालकांत समाधान

Edited By : Siddharth Latkar

Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

गुढ्यातील हाणामारीप्रकरणी दोघांना अटक; गावठी पिस्तूल जप्त ढेबेवाडी (जि. सातारा) : ढेबेवाडी- कऱ्हाड रस्त्यावरील गुढे गावाजवळ नुकत्याच झालेल्या जोरदार हाणामारीप्रकरणी येथील पोलिसांनी साेमवारी रात्री उशिरा दोन युवकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पाटण न्यायालयाने मंगळवारी त्या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, भांडणाऱ्या युवकांवर झडप टाकून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व लोखंडी पाइप ताब्यात घेतलेल्या सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे नागरिकांतून आज दिवसभर कौतुक सुरू होते.   साेमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी- कऱ्हाड मार्गावरील गुढे बस थांब्याजवळ ही घटना घडली होती. दोन युवकांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू असतानाच तेथून मोटारीने ढेबेवाडीकडे निघालेले येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांचे सहकारी नवनाथ कुंभार, संदेश लादे यांनी भांडणात घुसून दोन्ही युवकांवर झडप घालत गावठी पिस्तूल व लोखंडी पाइपसह त्यांना ताब्यात घेतले. सचिन जनार्दन सुतार (रा. मानेगाव, ता. पाटण) व रोहित सुनील माने (रा. गुढे, ता. पाटण) अशी संबंधित युवकांची नावे आहेत. रात्री उशिरा दोघांवर विविध कलमांन्वये पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पाटण न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.   गाडी आडवी मारल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. तुंबळ हाणामारी सुरू असतानाच भांडणात घुसून पिस्तूल ताब्यात घेतल्याने दिवसभर सहायक पोलिस निरीक्षक पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे नागरिकांतून कौतुक सुरू होते. सहायक फौजदार आर. एल. अंकुशी तपास करत आहेत.  पोलिस हवालदाराचा असाही प्रामाणिकपणा! उंब्रज-मसूर मार्गावर सापडलेले पैसे केले रिक्षाचालकाला परत शाब्बास! Indian Engineering Services परीक्षेत चारुदत्तने उभारली यशाची गुढी; युपीएससीत देशात ठरला अव्वल गुढीपाडवा : कडुलिंब खाण्याच्या परंपरेला सलग दुसऱ्या वर्षी ब्रेक; गावागावांत शुकशुकाट विशेष मुलांसाठी इनरव्हीलतर्फे 18 बूट; पालकांत समाधान Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J

April 13, 2021 0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/3mOJ4wn
Read More