गुढ्यातील हाणामारीप्रकरणी दोघांना अटक; गावठी पिस्तूल जप्त ढेबेवाडी (जि. सातारा) : ढेबेवाडी- कऱ्हाड रस्त्यावरील गुढे गावाजवळ नुकत्याच झालेल्या जोरदार हाणामारीप्रकरणी येथील पोलिसांनी साेमवारी रात्री उशिरा दोन युवकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पाटण न्यायालयाने मंगळवारी त्या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, भांडणाऱ्या युवकांवर झडप टाकून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व लोखंडी पाइप ताब्यात घेतलेल्या सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे नागरिकांतून आज दिवसभर कौतुक सुरू होते.   साेमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी- कऱ्हाड मार्गावरील गुढे बस थांब्याजवळ ही घटना घडली होती. दोन युवकांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू असतानाच तेथून मोटारीने ढेबेवाडीकडे निघालेले येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांचे सहकारी नवनाथ कुंभार, संदेश लादे यांनी भांडणात घुसून दोन्ही युवकांवर झडप घालत गावठी पिस्तूल व लोखंडी पाइपसह त्यांना ताब्यात घेतले. सचिन जनार्दन सुतार (रा. मानेगाव, ता. पाटण) व रोहित सुनील माने (रा. गुढे, ता. पाटण) अशी संबंधित युवकांची नावे आहेत. रात्री उशिरा दोघांवर विविध कलमांन्वये पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पाटण न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.   गाडी आडवी मारल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. तुंबळ हाणामारी सुरू असतानाच भांडणात घुसून पिस्तूल ताब्यात घेतल्याने दिवसभर सहायक पोलिस निरीक्षक पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे नागरिकांतून कौतुक सुरू होते. सहायक फौजदार आर. एल. अंकुशी तपास करत आहेत.  पोलिस हवालदाराचा असाही प्रामाणिकपणा! उंब्रज-मसूर मार्गावर सापडलेले पैसे केले रिक्षाचालकाला परत शाब्बास! Indian Engineering Services परीक्षेत चारुदत्तने उभारली यशाची गुढी; युपीएससीत देशात ठरला अव्वल गुढीपाडवा : कडुलिंब खाण्याच्या परंपरेला सलग दुसऱ्या वर्षी ब्रेक; गावागावांत शुकशुकाट विशेष मुलांसाठी इनरव्हीलतर्फे 18 बूट; पालकांत समाधान Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, April 13, 2021

गुढ्यातील हाणामारीप्रकरणी दोघांना अटक; गावठी पिस्तूल जप्त ढेबेवाडी (जि. सातारा) : ढेबेवाडी- कऱ्हाड रस्त्यावरील गुढे गावाजवळ नुकत्याच झालेल्या जोरदार हाणामारीप्रकरणी येथील पोलिसांनी साेमवारी रात्री उशिरा दोन युवकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पाटण न्यायालयाने मंगळवारी त्या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, भांडणाऱ्या युवकांवर झडप टाकून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व लोखंडी पाइप ताब्यात घेतलेल्या सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे नागरिकांतून आज दिवसभर कौतुक सुरू होते.   साेमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी- कऱ्हाड मार्गावरील गुढे बस थांब्याजवळ ही घटना घडली होती. दोन युवकांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू असतानाच तेथून मोटारीने ढेबेवाडीकडे निघालेले येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांचे सहकारी नवनाथ कुंभार, संदेश लादे यांनी भांडणात घुसून दोन्ही युवकांवर झडप घालत गावठी पिस्तूल व लोखंडी पाइपसह त्यांना ताब्यात घेतले. सचिन जनार्दन सुतार (रा. मानेगाव, ता. पाटण) व रोहित सुनील माने (रा. गुढे, ता. पाटण) अशी संबंधित युवकांची नावे आहेत. रात्री उशिरा दोघांवर विविध कलमांन्वये पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पाटण न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.   गाडी आडवी मारल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. तुंबळ हाणामारी सुरू असतानाच भांडणात घुसून पिस्तूल ताब्यात घेतल्याने दिवसभर सहायक पोलिस निरीक्षक पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे नागरिकांतून कौतुक सुरू होते. सहायक फौजदार आर. एल. अंकुशी तपास करत आहेत.  पोलिस हवालदाराचा असाही प्रामाणिकपणा! उंब्रज-मसूर मार्गावर सापडलेले पैसे केले रिक्षाचालकाला परत शाब्बास! Indian Engineering Services परीक्षेत चारुदत्तने उभारली यशाची गुढी; युपीएससीत देशात ठरला अव्वल गुढीपाडवा : कडुलिंब खाण्याच्या परंपरेला सलग दुसऱ्या वर्षी ब्रेक; गावागावांत शुकशुकाट विशेष मुलांसाठी इनरव्हीलतर्फे 18 बूट; पालकांत समाधान Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3mOJ4wn

No comments:

Post a Comment