चार वर्षे भांडणात, एक वर्ष विकासात! विरोधी पक्षाची तलवार म्यान मुरगूड (कोल्हापूर)  : शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्षपद भूषवणारे राजेखान जमादार विरुद्ध मंडलिक गटाचे, पर्यायाने शिवसेनेचे नगरसेवक - नगरसेविका यांच्यातील कधी होणारे शीतयुद्ध तर कधी झालेली हमरीतुमरी यामुळे पालिकेतील सत्ताधारी मंडळींची पंचवार्षिक कारकीर्द चार वर्षे भांडणात आणि एक वर्ष विकासात, अशीच राहिली आहे. तर अल्प संख्याबळामुळे विरोधी पक्षाने बघ्याची भूमिका घेतली आहे.  फ्लॅशबॅक  मंडलिक गटाने गेल्या निवडणुकीपूर्वी माहितीच्या अधिकाराचे भांडवल हाताशी धरुन सत्ताधारी पाटील-मुश्रीफ गटाला सळो की पळो करुन सोडले होते. भ्रष्टाचाराचे आरोप करत पाटील गटातील अंतर्गत फुटीचा फायदा उठवला आणि संजय घाटगे गटाच्या साथीने पाटील-मुश्रीफ गटाचा पराभव केला. राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील, टोकाच्या संघर्षातील पालिकेवर (कै.) विश्वनाथराव पाटील यांच्या पाटील गटाने सर्वाधिक काळ तर त्या पाठोपाठ खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या गटाने सत्ता गाजवली आहे.  सध्याचे चित्र  सध्या "गोकुळ'चे रणांगण तापले आहे. मुरगूडमधून सत्ताधारी पॅनेलमधून संचालक रणजितसिंह पाटील तर विरोधी राजर्षी शाहू आघाडीतून खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक व बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील इच्छुक आहेत. पालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे, तर राष्ट्रवादी विरोधी बाकावर आहे. पण राज्यातील आघाडीची सत्ता व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार मंडलिक यांच्यातील सलोख्याचे संबंध, मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत असणारे व नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले प्रवीणसिंह पाटील यांची समझोता एक्‍स्प्रेस लक्षात घेता पालिकेत विरोधी पक्ष अस्तित्वात आहे का? असा प्रश्न पडतो. राज्यातील सत्तासूत्रे पाहता खासदार मंडलिक, मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून सहा महिन्यात विविध विकासकामांना निधी आणण्यात नगराध्यक्ष जमादार यांनी यश मिळविले आहे. सुधारित नळ-पाणी योजना, बाजारपेठेतील फूटपाथ, गटर्स, हायमास्क दिवे, हुतात्मा तुकाराम चौक सुशोभीकरण अशा जवळपास 15 कोटींच्या विविध विकासकामांची धांदल सुरू आहे. नळ-पाणी पुरवठा योजनेमुळे रस्ते खोदाई केली आहे. शहरात एकही रस्ता सुस्थितीत नाही. मेच्या अखेरीपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे पालिका प्रशासनाचे धोरण आहे.  घडलंय बिघडलंय -  पालिका निवडणुकीत नेहमी होणारा मंडलिक विरुद्ध पाटील गटाचा सामना लक्षवेधी ठरत होता; पण आता पाटील गटाच्या फुटीमुळे तशा निवडणुका होणे कठीण आहे. पालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी कोणत्याही गटाला घाटगे गटाची साथ घेतल्याशिवाय यश मिळालेले नाही. मंडलिक गटाने सत्ता मिळवली खरी; पण या यशाचा निवडून देणाऱ्या जनतेला चार वर्षे फारसा उपयोग झालेला दिसत नाही. अपवाद वगळता सत्ताधारी नगरसेवक - नगरसेविका आहेत. यांना त्यांच्या सत्तेचा फारसा उपयोग झाला नाही. सहा महिन्यांपासून नगराध्यक्ष जमादार व नगरसेवकातील चार वर्षे सुरु असलेला संघर्ष बऱ्यापैकी थोपवण्यात नेत्यांना यश आले आहे.  पुढे काय?  निवडणूक तोंडावर असताना विरोधी गटाकडून जे रान उठवले जाते, त्याचा लवलेशही आज पाहावयास मिळत नाही.  "गोकुळ'चे संचालक पाटील यांनी वर्षभरापासून मुरगुडात तळ ठोकला आहे. तर भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी वारंवार कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहत निवडणुकीच्या जोडण्या सुरू ठेवल्या आहेत. प्रवीणसिंह पाटील यांना ताकद देत मंत्री मुश्रीफ पुढील रणनीती आखताना दिसत आहेत. आगामी निवडणुकीत सत्ताधारी मंडलिक गटाच्या विरोधात नेमकी कशी आघाडी होणार? की मंडलिक, मुश्रीफ व प्रवीणसिंह पाटील एकत्रित राहणार, हे लवकरच कळेल.  पक्षीय बलाबल -  शिवसेना - 17  राष्ट्रवादी - 3  घडलंय-बिघडलंय  * वेदगंगेत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न कायम  * शहर स्वच्छता शासनाच्या बक्षिसापुरतीच  * औद्योगिकीकरणाकडे सर्व नेत्यांचा कानाडोळा  * शहरातील तरुणांसाठी खेळाच्या मैदानाची वानवा  * बागबगीचा, ज्येष्ठांसाठी विरंगुळा पार्कचे काय?  * शासकीय कार्यालयांची कमतरता  संपादन- अर्चना बनगे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, April 13, 2021

चार वर्षे भांडणात, एक वर्ष विकासात! विरोधी पक्षाची तलवार म्यान मुरगूड (कोल्हापूर)  : शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्षपद भूषवणारे राजेखान जमादार विरुद्ध मंडलिक गटाचे, पर्यायाने शिवसेनेचे नगरसेवक - नगरसेविका यांच्यातील कधी होणारे शीतयुद्ध तर कधी झालेली हमरीतुमरी यामुळे पालिकेतील सत्ताधारी मंडळींची पंचवार्षिक कारकीर्द चार वर्षे भांडणात आणि एक वर्ष विकासात, अशीच राहिली आहे. तर अल्प संख्याबळामुळे विरोधी पक्षाने बघ्याची भूमिका घेतली आहे.  फ्लॅशबॅक  मंडलिक गटाने गेल्या निवडणुकीपूर्वी माहितीच्या अधिकाराचे भांडवल हाताशी धरुन सत्ताधारी पाटील-मुश्रीफ गटाला सळो की पळो करुन सोडले होते. भ्रष्टाचाराचे आरोप करत पाटील गटातील अंतर्गत फुटीचा फायदा उठवला आणि संजय घाटगे गटाच्या साथीने पाटील-मुश्रीफ गटाचा पराभव केला. राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील, टोकाच्या संघर्षातील पालिकेवर (कै.) विश्वनाथराव पाटील यांच्या पाटील गटाने सर्वाधिक काळ तर त्या पाठोपाठ खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या गटाने सत्ता गाजवली आहे.  सध्याचे चित्र  सध्या "गोकुळ'चे रणांगण तापले आहे. मुरगूडमधून सत्ताधारी पॅनेलमधून संचालक रणजितसिंह पाटील तर विरोधी राजर्षी शाहू आघाडीतून खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक व बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील इच्छुक आहेत. पालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे, तर राष्ट्रवादी विरोधी बाकावर आहे. पण राज्यातील आघाडीची सत्ता व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार मंडलिक यांच्यातील सलोख्याचे संबंध, मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत असणारे व नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले प्रवीणसिंह पाटील यांची समझोता एक्‍स्प्रेस लक्षात घेता पालिकेत विरोधी पक्ष अस्तित्वात आहे का? असा प्रश्न पडतो. राज्यातील सत्तासूत्रे पाहता खासदार मंडलिक, मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून सहा महिन्यात विविध विकासकामांना निधी आणण्यात नगराध्यक्ष जमादार यांनी यश मिळविले आहे. सुधारित नळ-पाणी योजना, बाजारपेठेतील फूटपाथ, गटर्स, हायमास्क दिवे, हुतात्मा तुकाराम चौक सुशोभीकरण अशा जवळपास 15 कोटींच्या विविध विकासकामांची धांदल सुरू आहे. नळ-पाणी पुरवठा योजनेमुळे रस्ते खोदाई केली आहे. शहरात एकही रस्ता सुस्थितीत नाही. मेच्या अखेरीपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे पालिका प्रशासनाचे धोरण आहे.  घडलंय बिघडलंय -  पालिका निवडणुकीत नेहमी होणारा मंडलिक विरुद्ध पाटील गटाचा सामना लक्षवेधी ठरत होता; पण आता पाटील गटाच्या फुटीमुळे तशा निवडणुका होणे कठीण आहे. पालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी कोणत्याही गटाला घाटगे गटाची साथ घेतल्याशिवाय यश मिळालेले नाही. मंडलिक गटाने सत्ता मिळवली खरी; पण या यशाचा निवडून देणाऱ्या जनतेला चार वर्षे फारसा उपयोग झालेला दिसत नाही. अपवाद वगळता सत्ताधारी नगरसेवक - नगरसेविका आहेत. यांना त्यांच्या सत्तेचा फारसा उपयोग झाला नाही. सहा महिन्यांपासून नगराध्यक्ष जमादार व नगरसेवकातील चार वर्षे सुरु असलेला संघर्ष बऱ्यापैकी थोपवण्यात नेत्यांना यश आले आहे.  पुढे काय?  निवडणूक तोंडावर असताना विरोधी गटाकडून जे रान उठवले जाते, त्याचा लवलेशही आज पाहावयास मिळत नाही.  "गोकुळ'चे संचालक पाटील यांनी वर्षभरापासून मुरगुडात तळ ठोकला आहे. तर भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी वारंवार कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहत निवडणुकीच्या जोडण्या सुरू ठेवल्या आहेत. प्रवीणसिंह पाटील यांना ताकद देत मंत्री मुश्रीफ पुढील रणनीती आखताना दिसत आहेत. आगामी निवडणुकीत सत्ताधारी मंडलिक गटाच्या विरोधात नेमकी कशी आघाडी होणार? की मंडलिक, मुश्रीफ व प्रवीणसिंह पाटील एकत्रित राहणार, हे लवकरच कळेल.  पक्षीय बलाबल -  शिवसेना - 17  राष्ट्रवादी - 3  घडलंय-बिघडलंय  * वेदगंगेत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न कायम  * शहर स्वच्छता शासनाच्या बक्षिसापुरतीच  * औद्योगिकीकरणाकडे सर्व नेत्यांचा कानाडोळा  * शहरातील तरुणांसाठी खेळाच्या मैदानाची वानवा  * बागबगीचा, ज्येष्ठांसाठी विरंगुळा पार्कचे काय?  * शासकीय कार्यालयांची कमतरता  संपादन- अर्चना बनगे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2QkCUIq

No comments:

Post a Comment