तरुणाईचे बाबासाहेबांना अनोखे अभिवादन; "एक मूठ धान्य कलाकारांसाठी'  कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यंदा तरुणाईकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी आंबेडकर जयंतीनिमित्त होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे "एक मूठ धान्य कलाकारांसाठी' ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यातून जमणारी मदत आजही चळवळ नेटाने पुढे नेणाऱ्या कलाकारांना दिली जाणार आहे. 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून 26 जून राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत हा अनोखा उपक्रम होणार आहे. दरम्यान, राज्यभरातील शाहिरांनी यंदा "आम्ही आंबेडकरवादी' हे अभिमानगीत साकारले असून, ते यूट्यूब चॅनेलवर आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित झाले आहे.  "माझ्या दहा भाषणांची ताकद शाहिराच्या एका गाण्यात आहे,' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत. मात्र, कोरोनाच्या काळात चळवळीतील हीच शाहीर आणि कलाकार मंडळी जगण्यासाठी धडपडत आहेत. गेल्या वर्षीपासून एकही कार्यक्रम झाला नाही आणि आता आंबेडकर जयंतीच्या अगोदरच कोरोनाचा पुन्हा कहर झाला असल्याने यंदाही कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे आर्थिक विवंचनेत असणाऱ्या या शाहीर व कलाकारांना धान्याबरोबरच जीवनावश्‍यक साहित्यासाठी समाजातील दातृत्वाला साद घातली आहे. धान्य, कडधान्य, साखर, खाद्यतेल, शैक्षणिक साहित्य व आर्थिक स्वरूपात ही मदत बिंदू चौकातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात स्वीकारली जाणार आहे. ऑल इंडिया स्टुडंटस्‌ फेडरेशन आणि अश्‍वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनचे कबीर नाईकनवरे, हरीश कांबळे, धीरज कठारे, रविराज सदाजय, हर्षवर्धन कांबळे, नितीन कांबळे, आरती रेडेकर, योगेश कसबे आदींनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.  असाही विचारांचा जागर  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीला माहिती व्हावेत, या उद्देशाने "आम्ही आंबेडकरवादी' या गाण्याची निर्मिती झाली आहे. सांगलीच्या शाहीर दीपक गोठणेकर यांनी हे गीत लिहिले असून शिरीष पवार, प्रवीण डोणे (मुंबई), कबीर नाईकनवरे, स्नेहलता सातपुते (कोल्हापूर), चरण जाधव (औरंगाबाद) या शाहिरांनी ते गायिले आहे. बाबासाहेबांच्या भूमिकेत विजयकुमार नागदिवे असून दुष्यंत इनामदार यांचे नृत्य दिग्दर्शन आहे. नीलेश जाधव यांचे छायाचित्रण तर अभिजीत सुतार यांचे ध्वनी संकलन व आकाश मोरे यांनी व्हिडिओ संकलन केले आहे.    संपादन- अर्चना बनगे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, April 13, 2021

तरुणाईचे बाबासाहेबांना अनोखे अभिवादन; "एक मूठ धान्य कलाकारांसाठी'  कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यंदा तरुणाईकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी आंबेडकर जयंतीनिमित्त होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे "एक मूठ धान्य कलाकारांसाठी' ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यातून जमणारी मदत आजही चळवळ नेटाने पुढे नेणाऱ्या कलाकारांना दिली जाणार आहे. 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून 26 जून राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत हा अनोखा उपक्रम होणार आहे. दरम्यान, राज्यभरातील शाहिरांनी यंदा "आम्ही आंबेडकरवादी' हे अभिमानगीत साकारले असून, ते यूट्यूब चॅनेलवर आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित झाले आहे.  "माझ्या दहा भाषणांची ताकद शाहिराच्या एका गाण्यात आहे,' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत. मात्र, कोरोनाच्या काळात चळवळीतील हीच शाहीर आणि कलाकार मंडळी जगण्यासाठी धडपडत आहेत. गेल्या वर्षीपासून एकही कार्यक्रम झाला नाही आणि आता आंबेडकर जयंतीच्या अगोदरच कोरोनाचा पुन्हा कहर झाला असल्याने यंदाही कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे आर्थिक विवंचनेत असणाऱ्या या शाहीर व कलाकारांना धान्याबरोबरच जीवनावश्‍यक साहित्यासाठी समाजातील दातृत्वाला साद घातली आहे. धान्य, कडधान्य, साखर, खाद्यतेल, शैक्षणिक साहित्य व आर्थिक स्वरूपात ही मदत बिंदू चौकातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात स्वीकारली जाणार आहे. ऑल इंडिया स्टुडंटस्‌ फेडरेशन आणि अश्‍वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनचे कबीर नाईकनवरे, हरीश कांबळे, धीरज कठारे, रविराज सदाजय, हर्षवर्धन कांबळे, नितीन कांबळे, आरती रेडेकर, योगेश कसबे आदींनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.  असाही विचारांचा जागर  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीला माहिती व्हावेत, या उद्देशाने "आम्ही आंबेडकरवादी' या गाण्याची निर्मिती झाली आहे. सांगलीच्या शाहीर दीपक गोठणेकर यांनी हे गीत लिहिले असून शिरीष पवार, प्रवीण डोणे (मुंबई), कबीर नाईकनवरे, स्नेहलता सातपुते (कोल्हापूर), चरण जाधव (औरंगाबाद) या शाहिरांनी ते गायिले आहे. बाबासाहेबांच्या भूमिकेत विजयकुमार नागदिवे असून दुष्यंत इनामदार यांचे नृत्य दिग्दर्शन आहे. नीलेश जाधव यांचे छायाचित्रण तर अभिजीत सुतार यांचे ध्वनी संकलन व आकाश मोरे यांनी व्हिडिओ संकलन केले आहे.    संपादन- अर्चना बनगे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/32dYOje

No comments:

Post a Comment