बसस्थानक प्रश्‍नावर राष्ट्रवादी आक्रमक  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील बसस्थानकामधील समस्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापक वैभव पडोळे यांना दिलेल्या डेटलाइनमध्ये न सोडविल्याने आज पुन्हा एकदा तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी स्थानकामध्ये धडक दिली. त्यांनी वरिष्ठांचे लक्ष वेधताच कनिष्ठ अभियंता गिरिजा पाटील यांनी सावंतवाडीत येऊन परिस्थितीची पाहणी केली. बसस्थानकाची पाहणी केल्यानंतर संपूर्ण परिस्थिती सुधारेल, अशी ग्वाही कनिष्ठ अभियंता पाटील यांनी दिली.  आगार प्रमुख, स्थानक प्रमुखांच्या कामाचा रिपोर्ट वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी परिस्थिती बदलली नाही तर उद्या जे काही होईल, त्याला एसटी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिला. येथील एसटी बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे काम सुरू असल्याने जुन्या बसस्थानकामध्ये तसेच परिसरात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. बसस्थानक संपूर्ण धुळीने माखलेले असून प्रवासांना या ठिकाणी बसताही येत नाही. त्यामुळे संपूर्ण बसस्थानकाची स्वच्छता करण्याबरोबरच परिसरातील पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ तसेच कोरोना पार्श्‍वभूमीवर स्थानकामध्ये उपाय योजना आखा, अशा विविध सूचना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आठ दिवसापूर्वी आगार व्यवस्थापक श्री. पडोळे यांना केल्या होत्या. श्री. पडोळे यांनी आठ दिवसात सर्व समस्या मार्गी लागतील, असे आश्‍वासन दिले होते; मात्र समस्या मार्गी न लागल्यास तुम्हाला बसस्थानकामध्ये बसायला देणार नाही, असा इशाराही राष्ट्रवादीकडून देण्यात आला होता; मात्र समस्या न सोडवतात श्री. पडोळे हे सुट्टीवर गेल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी पुन्हा आक्रमक झाले.  तालुकाध्यक्ष दळवींच्या नेतृत्वाखाली त्यांनी पुन्हा बसस्थानकाला धडक देऊन वस्तुस्थिती बाबत वरिष्ठांचे लक्ष वेधले. त्यानंतर एसटीच्या कनिष्ठ अभियंता पाटील या परिस्थितीची पहाणी करण्यासाठी आज सावंतवाडीत आल्या. आगार प्रमुखांना सांगुन देखील काम न झाल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना संपूर्ण बसस्थानकाची दुर्दशा दाखवली. प्रवाशांच्या बसण्याच्या जागेवरील धुळीच साम्राज्य, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, हिरकणी केंद्राची दुरावस्था, पोलीस चौकी दुरावस्था आदींवरून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानक प्रमुख विशाल शेवाळे यांना कनिष्ठ अभियंतांसमोरच सुनावले. यावेळी शहराध्यक्ष देवा टेंमकर, आसिफ शेख, इफ्तिकार राजगुरू, राजू धारपवार आदी उपस्थित होते.  आगारातील वातावरण तापले  यावेळी कंट्रोल रूममधून गाड्यांची पुकारणी होत नसल्याची तक्रार प्रवाशांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडे केली. याची शहानिशा करण्यासाठी कंट्रोल रूमकडे राष्ट्रवादीचे पदाधिकारी गेले असता एसटी कर्मचाऱ्यांसोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये "तू तू, मै मै' झाली. त्यामुळे पदाधिकारी आणखीनच संतापले. या प्रकारामुळे आगारातील वातावरण काही काळ तापले. बसस्थानकाची पहाणी केल्यानंतर आजच्या आज संपूर्ण परिस्थिती सुधारेल, अशी ग्वाही कनिष्ठ अभियंता पाटील यांनी दिली.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 24, 2021

बसस्थानक प्रश्‍नावर राष्ट्रवादी आक्रमक  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील बसस्थानकामधील समस्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापक वैभव पडोळे यांना दिलेल्या डेटलाइनमध्ये न सोडविल्याने आज पुन्हा एकदा तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी स्थानकामध्ये धडक दिली. त्यांनी वरिष्ठांचे लक्ष वेधताच कनिष्ठ अभियंता गिरिजा पाटील यांनी सावंतवाडीत येऊन परिस्थितीची पाहणी केली. बसस्थानकाची पाहणी केल्यानंतर संपूर्ण परिस्थिती सुधारेल, अशी ग्वाही कनिष्ठ अभियंता पाटील यांनी दिली.  आगार प्रमुख, स्थानक प्रमुखांच्या कामाचा रिपोर्ट वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी परिस्थिती बदलली नाही तर उद्या जे काही होईल, त्याला एसटी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिला. येथील एसटी बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे काम सुरू असल्याने जुन्या बसस्थानकामध्ये तसेच परिसरात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. बसस्थानक संपूर्ण धुळीने माखलेले असून प्रवासांना या ठिकाणी बसताही येत नाही. त्यामुळे संपूर्ण बसस्थानकाची स्वच्छता करण्याबरोबरच परिसरातील पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ तसेच कोरोना पार्श्‍वभूमीवर स्थानकामध्ये उपाय योजना आखा, अशा विविध सूचना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आठ दिवसापूर्वी आगार व्यवस्थापक श्री. पडोळे यांना केल्या होत्या. श्री. पडोळे यांनी आठ दिवसात सर्व समस्या मार्गी लागतील, असे आश्‍वासन दिले होते; मात्र समस्या मार्गी न लागल्यास तुम्हाला बसस्थानकामध्ये बसायला देणार नाही, असा इशाराही राष्ट्रवादीकडून देण्यात आला होता; मात्र समस्या न सोडवतात श्री. पडोळे हे सुट्टीवर गेल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी पुन्हा आक्रमक झाले.  तालुकाध्यक्ष दळवींच्या नेतृत्वाखाली त्यांनी पुन्हा बसस्थानकाला धडक देऊन वस्तुस्थिती बाबत वरिष्ठांचे लक्ष वेधले. त्यानंतर एसटीच्या कनिष्ठ अभियंता पाटील या परिस्थितीची पहाणी करण्यासाठी आज सावंतवाडीत आल्या. आगार प्रमुखांना सांगुन देखील काम न झाल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना संपूर्ण बसस्थानकाची दुर्दशा दाखवली. प्रवाशांच्या बसण्याच्या जागेवरील धुळीच साम्राज्य, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, हिरकणी केंद्राची दुरावस्था, पोलीस चौकी दुरावस्था आदींवरून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानक प्रमुख विशाल शेवाळे यांना कनिष्ठ अभियंतांसमोरच सुनावले. यावेळी शहराध्यक्ष देवा टेंमकर, आसिफ शेख, इफ्तिकार राजगुरू, राजू धारपवार आदी उपस्थित होते.  आगारातील वातावरण तापले  यावेळी कंट्रोल रूममधून गाड्यांची पुकारणी होत नसल्याची तक्रार प्रवाशांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडे केली. याची शहानिशा करण्यासाठी कंट्रोल रूमकडे राष्ट्रवादीचे पदाधिकारी गेले असता एसटी कर्मचाऱ्यांसोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये "तू तू, मै मै' झाली. त्यामुळे पदाधिकारी आणखीनच संतापले. या प्रकारामुळे आगारातील वातावरण काही काळ तापले. बसस्थानकाची पहाणी केल्यानंतर आजच्या आज संपूर्ण परिस्थिती सुधारेल, अशी ग्वाही कनिष्ठ अभियंता पाटील यांनी दिली.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3tUtaDg

No comments:

Post a Comment