Success Story : BSFचा जवान पाचव्या प्रयत्नात बनला IAS UPSC Success Story : नवी दिल्ली : ही संघर्षमय कथा आहे भारत-बांगलादेश बॉर्डरवर ड्युटी करणाऱ्या हरप्रीत सिंगची. सातत्य, चिकाटी आणि कठीण परिश्रम याच्या जोरावर काहीही अशक्य नाही असंच हरप्रीतच्या प्रवासातून दिसून येतं. ड्युटीहून माघारी परतल्यानंतर जो काही वेळ मिळायचा त्या वेळात यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला आणि देशात १९ व्या रँकने तो IAS अधिकारी बनला.  पण हे यश त्याला सहज मिळालेलं नाही. त्यासाठी हरप्रीतनं खूप मोठा संघर्ष केला आहे. त्याचा हा प्रवास अनेकांना प्रेरणा देईल. यूपीएससीच्या तयारीला २०१३मध्ये सुरवात झाली. काही दिवस हरप्रीतने आयबीएममध्येही काम केलं, पण आयएएस अधिकारी होणं हेच त्याचं अंतिम ध्येय होतं.  - UPSC Mains Result 2020: मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, येथे पाहा निकाल​ पंजाबच्या लुधियाना इथं जन्मलेला हरप्रीत सिंग २०१६मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून बीएसएफमध्ये रुजू झाला. सैन्यात सामील झाल्यानंतर त्याची पोस्टिंग भारत-बांगलादेशच्या सीमेवर झाली होती. कठीण आणि आव्हानात्मक काम करणं हरप्रीतला आवडत असल्यानं हे काम त्याला आवडू लागलं होतं, पण आयएएस अधिकारी होणंही त्याचं स्वप्न होतं. त्यामुळं ड्युटीनंतर मिळेल तो वेळ तो यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी वापरायचा. अखेर पाचव्या प्रयत्नात त्याला यशाची चव चाखता आली.  हरप्रीतसिंगचे पाच मंत्र   - सनदी सेवेची तयारी करत असताना सर्व विषयांना समान महत्त्व द्या. - दृढनिश्चयासह कठोर परिश्रम करत राहा. - आपले ध्येय कायम डोळ्यासमोर ठेवा. इतर गोष्टींमुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका. - यूपीएससीची तयारी करताना आत्मविश्वास बाळगा. - आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनातून आव्हानांकडे पाहा. - एसबीआय भरणार आठ हजार क्‍लार्क पदे ! परीक्षेची पहिली प्रतीक्षा यादी जाहीर; असे करा रिझल्ट थेट डाउनलोड​ आयएएस व्हायचं होतं हरप्रीत म्हणतो की, आयएएस होण्याचं लक्ष्य त्याच्या मनात अगदी स्पष्ट होतं. त्यामुळं इतर कोणतीही गोष्ट त्याला विचलित करू शकली नाही. ड्युटीनंतरचा संपूर्ण वेळ त्याने यूपीएससीच्या तयारीसाठी वापरला. हरप्रीत दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम या दोन गोष्टींना त्याच्या यशाचा गाभा मानतो. हरप्रीत म्हणाला, आपल्या स्वप्नांचा पाठलाग कधीच सोडू नका. २०१७मध्ये चौथ्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली त्यावेळी ४५४वी रँकसह इंडियन ट्रेड सर्व्हिस मिळाली होती. त्यामुळे बीएसएफ सोडून त्यानं आयटीएस जॉईन केलं. २०१९मध्ये पुन्हा यूपीएससी दिली आणि १९व्या रँकसह घवघवीत यश मिळवलं. - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 24, 2021

Success Story : BSFचा जवान पाचव्या प्रयत्नात बनला IAS UPSC Success Story : नवी दिल्ली : ही संघर्षमय कथा आहे भारत-बांगलादेश बॉर्डरवर ड्युटी करणाऱ्या हरप्रीत सिंगची. सातत्य, चिकाटी आणि कठीण परिश्रम याच्या जोरावर काहीही अशक्य नाही असंच हरप्रीतच्या प्रवासातून दिसून येतं. ड्युटीहून माघारी परतल्यानंतर जो काही वेळ मिळायचा त्या वेळात यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला आणि देशात १९ व्या रँकने तो IAS अधिकारी बनला.  पण हे यश त्याला सहज मिळालेलं नाही. त्यासाठी हरप्रीतनं खूप मोठा संघर्ष केला आहे. त्याचा हा प्रवास अनेकांना प्रेरणा देईल. यूपीएससीच्या तयारीला २०१३मध्ये सुरवात झाली. काही दिवस हरप्रीतने आयबीएममध्येही काम केलं, पण आयएएस अधिकारी होणं हेच त्याचं अंतिम ध्येय होतं.  - UPSC Mains Result 2020: मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, येथे पाहा निकाल​ पंजाबच्या लुधियाना इथं जन्मलेला हरप्रीत सिंग २०१६मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून बीएसएफमध्ये रुजू झाला. सैन्यात सामील झाल्यानंतर त्याची पोस्टिंग भारत-बांगलादेशच्या सीमेवर झाली होती. कठीण आणि आव्हानात्मक काम करणं हरप्रीतला आवडत असल्यानं हे काम त्याला आवडू लागलं होतं, पण आयएएस अधिकारी होणंही त्याचं स्वप्न होतं. त्यामुळं ड्युटीनंतर मिळेल तो वेळ तो यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी वापरायचा. अखेर पाचव्या प्रयत्नात त्याला यशाची चव चाखता आली.  हरप्रीतसिंगचे पाच मंत्र   - सनदी सेवेची तयारी करत असताना सर्व विषयांना समान महत्त्व द्या. - दृढनिश्चयासह कठोर परिश्रम करत राहा. - आपले ध्येय कायम डोळ्यासमोर ठेवा. इतर गोष्टींमुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका. - यूपीएससीची तयारी करताना आत्मविश्वास बाळगा. - आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनातून आव्हानांकडे पाहा. - एसबीआय भरणार आठ हजार क्‍लार्क पदे ! परीक्षेची पहिली प्रतीक्षा यादी जाहीर; असे करा रिझल्ट थेट डाउनलोड​ आयएएस व्हायचं होतं हरप्रीत म्हणतो की, आयएएस होण्याचं लक्ष्य त्याच्या मनात अगदी स्पष्ट होतं. त्यामुळं इतर कोणतीही गोष्ट त्याला विचलित करू शकली नाही. ड्युटीनंतरचा संपूर्ण वेळ त्याने यूपीएससीच्या तयारीसाठी वापरला. हरप्रीत दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम या दोन गोष्टींना त्याच्या यशाचा गाभा मानतो. हरप्रीत म्हणाला, आपल्या स्वप्नांचा पाठलाग कधीच सोडू नका. २०१७मध्ये चौथ्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली त्यावेळी ४५४वी रँकसह इंडियन ट्रेड सर्व्हिस मिळाली होती. त्यामुळे बीएसएफ सोडून त्यानं आयटीएस जॉईन केलं. २०१९मध्ये पुन्हा यूपीएससी दिली आणि १९व्या रँकसह घवघवीत यश मिळवलं. - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2P2FDWo

No comments:

Post a Comment