...तर शिवसेनेसाठी "ते' दिवास्वप्नच ः भाजप सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याचे दिवास्वप्न शिवसेनेने पाहू नये. भाजपचे सर्व सदस्य एकसंघ आहेत. त्यामुळे त्यांना नजरकैदेत ठेवण्याची गरज नाही. उलट शिवसेनेच्या गोटात अस्थिरता असल्याने भाजपच्या सदस्य संख्येत वाढ झाली तर आश्‍चर्य वाटू नये, असा सूचक इशारा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिला.  जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्‍वभूमीवर येत असलेल्या सदस्य फोडाफोडीच्या वृत्ताबाबत आज पत्रकार परीषद घेऊन शिवसेनेवर त्यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, ""जिल्हा परिषदेमध्ये नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सदस्य एकसंघ आहेत. सर्व सदस्य आजही एकत्र आहेत, उद्याही राहणार. उलट काही सदस्य वाढले तर आश्‍चर्य वाटू नये. शिवसेनेच्या गोटात सध्या अस्थिरता चालली आहे. त्यामुळे अनेक शिवसेनेचे सदस्य आमच्या संपर्कात आहेत.''  ते म्हणाले, ""सचिन वाझे प्रकरणातले पैसे जिल्ह्यात आल्याने ते पैसे घेऊन काही शिवसेनेचे पदाधिकारी फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. या त्यांच्या आमिषाला भाजप सदस्य बळी पडलेले नाहीत. काही भाजप सदस्यांनी पैसे नाकारले. आम्ही नारायण राणे यांच्यामुळे निवडून आलो, अशी भूमिका घेतली. शिवसेना पदाधिकारी पैसे घेऊन जिल्ह्यात खेळत आहेत. याची चौकशी करा, अशी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागणी करणार आहे.''  शिवसेनेत चलबिचलता  तेली म्हणाले, ""आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेमध्ये काम सुरू असून ग्रामपंचायतीचा निकाल पाहता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये भाजपला निश्‍चित यश मिळेल. त्यामुळे शिवसेनेत चलबिचल झाली आहे.'' यावेळी प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, गटनेते रणजित देसाई आदी उपस्थित होते.  एकतर्फी भाजपचीच सत्ता  तेली म्हणाले, जिल्हा परिषदेवर एकतर्फी भाजपची सत्ता येईल हे ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही. भाजपच्या चिन्हावर लोकसभा व काही विधानसभा लढवल्या असत्या तर या जिल्ह्यात भाजपचे आमदार, खासदार निवडून आले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावून शिवसेनेने विजय संपादन केला आहे. शिवसेनेचे काही सदस्य भाजप सदस्यांना फोडण्यासाठी पैसे घेऊन फिरत होते.  पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप  पालकमंत्र्यांचाही हस्तक्षेप जिल्हा परिषदेत वाढला असून अधिकाऱ्यांची घुसमट होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पालकमंत्र्यांची हुकुमशाही आपण खपवून घेणार नाही. त्यांना भविष्यात जशास तसे उत्तर देऊ. शिवसेनेने जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्याचे स्वप्न पाहू नये. जिल्ह्यातील जनता भाजपच्या पाठीशी खंबीर आहे, असे तेली म्हणाले.    जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे सदस्य फोडण्यासाठी शिवसेना नेत्यांनी भाजपच्या तीन जिल्हा परिषद सदस्यांना प्रत्येकी दोन लाखांची ऑफर दिली होती. शिवसेनेने पैशाचे आमिष दाखवून सदस्य विकत घेण्याचा केलेला प्रयत्न आमच्या सदस्यांनी झुगारून लावला. त्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला आहे.  - राजन तेली, जिल्हाध्यक्ष, भाजप    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 23, 2021

...तर शिवसेनेसाठी "ते' दिवास्वप्नच ः भाजप सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याचे दिवास्वप्न शिवसेनेने पाहू नये. भाजपचे सर्व सदस्य एकसंघ आहेत. त्यामुळे त्यांना नजरकैदेत ठेवण्याची गरज नाही. उलट शिवसेनेच्या गोटात अस्थिरता असल्याने भाजपच्या सदस्य संख्येत वाढ झाली तर आश्‍चर्य वाटू नये, असा सूचक इशारा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिला.  जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्‍वभूमीवर येत असलेल्या सदस्य फोडाफोडीच्या वृत्ताबाबत आज पत्रकार परीषद घेऊन शिवसेनेवर त्यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, ""जिल्हा परिषदेमध्ये नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सदस्य एकसंघ आहेत. सर्व सदस्य आजही एकत्र आहेत, उद्याही राहणार. उलट काही सदस्य वाढले तर आश्‍चर्य वाटू नये. शिवसेनेच्या गोटात सध्या अस्थिरता चालली आहे. त्यामुळे अनेक शिवसेनेचे सदस्य आमच्या संपर्कात आहेत.''  ते म्हणाले, ""सचिन वाझे प्रकरणातले पैसे जिल्ह्यात आल्याने ते पैसे घेऊन काही शिवसेनेचे पदाधिकारी फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. या त्यांच्या आमिषाला भाजप सदस्य बळी पडलेले नाहीत. काही भाजप सदस्यांनी पैसे नाकारले. आम्ही नारायण राणे यांच्यामुळे निवडून आलो, अशी भूमिका घेतली. शिवसेना पदाधिकारी पैसे घेऊन जिल्ह्यात खेळत आहेत. याची चौकशी करा, अशी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागणी करणार आहे.''  शिवसेनेत चलबिचलता  तेली म्हणाले, ""आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेमध्ये काम सुरू असून ग्रामपंचायतीचा निकाल पाहता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये भाजपला निश्‍चित यश मिळेल. त्यामुळे शिवसेनेत चलबिचल झाली आहे.'' यावेळी प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, गटनेते रणजित देसाई आदी उपस्थित होते.  एकतर्फी भाजपचीच सत्ता  तेली म्हणाले, जिल्हा परिषदेवर एकतर्फी भाजपची सत्ता येईल हे ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही. भाजपच्या चिन्हावर लोकसभा व काही विधानसभा लढवल्या असत्या तर या जिल्ह्यात भाजपचे आमदार, खासदार निवडून आले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावून शिवसेनेने विजय संपादन केला आहे. शिवसेनेचे काही सदस्य भाजप सदस्यांना फोडण्यासाठी पैसे घेऊन फिरत होते.  पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप  पालकमंत्र्यांचाही हस्तक्षेप जिल्हा परिषदेत वाढला असून अधिकाऱ्यांची घुसमट होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पालकमंत्र्यांची हुकुमशाही आपण खपवून घेणार नाही. त्यांना भविष्यात जशास तसे उत्तर देऊ. शिवसेनेने जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्याचे स्वप्न पाहू नये. जिल्ह्यातील जनता भाजपच्या पाठीशी खंबीर आहे, असे तेली म्हणाले.    जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे सदस्य फोडण्यासाठी शिवसेना नेत्यांनी भाजपच्या तीन जिल्हा परिषद सदस्यांना प्रत्येकी दोन लाखांची ऑफर दिली होती. शिवसेनेने पैशाचे आमिष दाखवून सदस्य विकत घेण्याचा केलेला प्रयत्न आमच्या सदस्यांनी झुगारून लावला. त्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला आहे.  - राजन तेली, जिल्हाध्यक्ष, भाजप    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3sbtYTD

No comments:

Post a Comment