राज्यातील शिक्षकांसाठी उद्या वेबिनार; रणजितसिंह डिसले यांचे मार्गदर्शन पुणे - सकाळ सोशल फाउंडेशन, सकाळ एनआयई (न्यूज पेपर इन एज्युकेशन) यांच्यावतीने राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी व विद्यार्थी शिक्षकांसाठी शनिवारी (ता. २७) सायंकाळी पाचला ‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे प्रभावी अध्यापन’ या विषयावर सोलापूर जिल्ह्यातील तंत्रस्नेही, प्रयोगशील व ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा मोफत वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. डिसले यांनी ‘क्युआर कोड’ च्या माध्यमातून केलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन, १४० देशांतील १२ हजार शिक्षकांमधून युनेस्को आणि लंडन येथील वार्की फाऊंडेशन यांच्यावतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. सात कोटी रुपये ही पुरस्काराप्रती मिळालेल्या रक्कमेच्या पन्नास टक्के रक्कम अंतिम फेरीतील नऊ स्पर्धक शिक्षकांना त्यांच्या देशातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच उर्वरित रक्कम टीचर इनोव्हेशन फंडासाठी त्यांनी दिलेली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी या ग्रामीण भागात, जिल्हा परिषदेच्या शाळेत अध्यापनाचे कार्य करत असताना डिसले यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विविध प्रयोगशील उपक्रम राबवत प्रभावी अध्यापन करता येते, हे त्यांनी  दाखवून दिले.  आज सहजासहजी वापरल्या जाणाऱ्या (क्यूआर) कोडचा शालेय शिक्षणासाठी वापर करण्याचा प्रयोग काही वर्षांपूर्वी त्यांनी प्रत्यक्षात राबवून उपक्रमाची सुरवात केली होती. ‘बालभारती’ ने ही त्यांच्या शालेय शिक्षणासाठी क्यूआर कोड या संकल्पनेचा स्वीकार केला. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा यावर होणार मार्गदर्शन शिक्षणात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिक्षक ते ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेता प्रवास जे विद्यार्थी शिक्षक आहेत आणि ते शिक्षक होणार आहेत. त्यांची भूमिका कशी असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात गोडी निर्माण होण्यासाठी आपले ई - अध्यापन कसे प्रभावी करू शकाल. तसेच शैक्षणिक बाजूने इतर बाबींवर मार्गदर्शन करण्यात येईल. वरील वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेली लिंक ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या ईमेलवर वेबिनार संबंधी माहिती मिळेल. लिंक : https://tinyurl.com/6nx5ty7v अधिक माहितीसाठी संपर्क - ९९६०५००१४३ Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 25, 2021

राज्यातील शिक्षकांसाठी उद्या वेबिनार; रणजितसिंह डिसले यांचे मार्गदर्शन पुणे - सकाळ सोशल फाउंडेशन, सकाळ एनआयई (न्यूज पेपर इन एज्युकेशन) यांच्यावतीने राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी व विद्यार्थी शिक्षकांसाठी शनिवारी (ता. २७) सायंकाळी पाचला ‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे प्रभावी अध्यापन’ या विषयावर सोलापूर जिल्ह्यातील तंत्रस्नेही, प्रयोगशील व ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा मोफत वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. डिसले यांनी ‘क्युआर कोड’ च्या माध्यमातून केलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन, १४० देशांतील १२ हजार शिक्षकांमधून युनेस्को आणि लंडन येथील वार्की फाऊंडेशन यांच्यावतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. सात कोटी रुपये ही पुरस्काराप्रती मिळालेल्या रक्कमेच्या पन्नास टक्के रक्कम अंतिम फेरीतील नऊ स्पर्धक शिक्षकांना त्यांच्या देशातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच उर्वरित रक्कम टीचर इनोव्हेशन फंडासाठी त्यांनी दिलेली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी या ग्रामीण भागात, जिल्हा परिषदेच्या शाळेत अध्यापनाचे कार्य करत असताना डिसले यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विविध प्रयोगशील उपक्रम राबवत प्रभावी अध्यापन करता येते, हे त्यांनी  दाखवून दिले.  आज सहजासहजी वापरल्या जाणाऱ्या (क्यूआर) कोडचा शालेय शिक्षणासाठी वापर करण्याचा प्रयोग काही वर्षांपूर्वी त्यांनी प्रत्यक्षात राबवून उपक्रमाची सुरवात केली होती. ‘बालभारती’ ने ही त्यांच्या शालेय शिक्षणासाठी क्यूआर कोड या संकल्पनेचा स्वीकार केला. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा यावर होणार मार्गदर्शन शिक्षणात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिक्षक ते ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेता प्रवास जे विद्यार्थी शिक्षक आहेत आणि ते शिक्षक होणार आहेत. त्यांची भूमिका कशी असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात गोडी निर्माण होण्यासाठी आपले ई - अध्यापन कसे प्रभावी करू शकाल. तसेच शैक्षणिक बाजूने इतर बाबींवर मार्गदर्शन करण्यात येईल. वरील वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेली लिंक ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या ईमेलवर वेबिनार संबंधी माहिती मिळेल. लिंक : https://tinyurl.com/6nx5ty7v अधिक माहितीसाठी संपर्क - ९९६०५००१४३ Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3d252HS

No comments:

Post a Comment