धाकधूक लॉकडाउनची; नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पिंपरी - कोरोनाचे आज किती रुग्ण झाले? लॉकडाउन होईल का? झाल्यास किती दिवसांचा असेल? काय बंद राहील, काय सुरू राहील? असे अनेक प्रश्न नागरिकांना व व्यावसायिकांना सध्या सतावत आहेत. लॉकडाउनची धाकधूक अनेकांना असल्याचे दिसून येत आहे.  मागील वर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्वत्र लॉकडाउन जाहीर करण्यात आले. सर्व व्यवसाय बंद झाले. नागरिकांनाही घराबाहेर पडण्यास मनाई होती. यामध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले. अनेकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. तर नोकऱ्या गेल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले. ऑगस्ट, सप्टेंबरच्या सुमारास रुग्ण आढळण्याचे प्रमाण काहीसे कमी झाल्याने अटी व नियमांचे पालन करून काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येतेय असे वाटत असतानाच चालू वर्षात फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळू लागले. त्यामुळे प्रशासनाने काही निर्बंध घालण्यास सुरुवात केली. शहरातील उद्याने ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली. तसेच नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यासह वारंवार सूचना देऊनही न ऐकणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने, कार्यालये सील केली जाणार आहेत. महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आठ भरारी पथके नियुक्त केली जाणार असून त्यांच्यामार्फत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. अशातच दिवसेंदिवस रुग्णसंख्येचा आलेख वाढत असल्याने पुन्हा लॉकडाउन लागू होते की काय, याची अनेकांना भीती आहे. लॉकडाउन झाल्यास आर्थिक संकट कोसळेल, सर्व नियमांचे पालन करून व्यवसाय सुरू ठेवावेत, अशीही मागणी होत आहे.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान, लॉकडाउनबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाउन होते की काय, अशी धाकधूक अनेकांच्या मनात आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमुळे अनेक व्यावसायिक अडचणीत आले. आर्थिक गणित बिघडल्याने व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. त्या काळात माझेही हॉटेल बंद असल्याने तीन महिन्यांचे भाडे खिशातून भरावे लागले. या परिस्थितीतून व्यावसायिक अद्यापही सावरलेले नाहीत. अशातच पुन्हा लॉकडाऊन झाल्यास व्यावसायिकांसह सामान्य नागरिकांनाही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. - प्रताप दहितुले, व्यावसायिक उद्योगधंद्यांची सध्या वाईट परिस्थिती आहे. अनेक उद्योजक स्वतःच्या पैशांतून कामगारांचे पगार करीत आहेत. त्यातच वीजजोड कारवाईमुळे उद्योजक अडचणीत आहे. आता पुन्हा लॉकडाऊन झाल्यास उद्योग मरणप्राय अवस्थेला येईल. उद्योगधंद्यांना चालना द्यायची असेल तर लॉकडाउन टाळावे. - संजय भालेकर, उद्योजक आम्ही व्यवसायात पाच वर्षे मागे गेलो आहोत. लाखो रुपयांचा माल पडून आहे. दुकानभाडे, वीज बिल, बँकेचे हप्ते, विविध कर भरणे चुकत नाही. सर्व परिस्थिती सुरळीत होईपर्यंत आमच्या व्यवसायाला उभारी मिळणे कठीण आहे. अशातच पुन्हा लॉकडाउन झाल्यास सर्वच आर्थिक घडी विस्कटेल. - नीलेश शिंदे, प्रिंटिंग प्रेस व्यावसायिक Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 25, 2021

धाकधूक लॉकडाउनची; नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पिंपरी - कोरोनाचे आज किती रुग्ण झाले? लॉकडाउन होईल का? झाल्यास किती दिवसांचा असेल? काय बंद राहील, काय सुरू राहील? असे अनेक प्रश्न नागरिकांना व व्यावसायिकांना सध्या सतावत आहेत. लॉकडाउनची धाकधूक अनेकांना असल्याचे दिसून येत आहे.  मागील वर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्वत्र लॉकडाउन जाहीर करण्यात आले. सर्व व्यवसाय बंद झाले. नागरिकांनाही घराबाहेर पडण्यास मनाई होती. यामध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले. अनेकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. तर नोकऱ्या गेल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले. ऑगस्ट, सप्टेंबरच्या सुमारास रुग्ण आढळण्याचे प्रमाण काहीसे कमी झाल्याने अटी व नियमांचे पालन करून काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येतेय असे वाटत असतानाच चालू वर्षात फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळू लागले. त्यामुळे प्रशासनाने काही निर्बंध घालण्यास सुरुवात केली. शहरातील उद्याने ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली. तसेच नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यासह वारंवार सूचना देऊनही न ऐकणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने, कार्यालये सील केली जाणार आहेत. महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आठ भरारी पथके नियुक्त केली जाणार असून त्यांच्यामार्फत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. अशातच दिवसेंदिवस रुग्णसंख्येचा आलेख वाढत असल्याने पुन्हा लॉकडाउन लागू होते की काय, याची अनेकांना भीती आहे. लॉकडाउन झाल्यास आर्थिक संकट कोसळेल, सर्व नियमांचे पालन करून व्यवसाय सुरू ठेवावेत, अशीही मागणी होत आहे.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान, लॉकडाउनबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाउन होते की काय, अशी धाकधूक अनेकांच्या मनात आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमुळे अनेक व्यावसायिक अडचणीत आले. आर्थिक गणित बिघडल्याने व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. त्या काळात माझेही हॉटेल बंद असल्याने तीन महिन्यांचे भाडे खिशातून भरावे लागले. या परिस्थितीतून व्यावसायिक अद्यापही सावरलेले नाहीत. अशातच पुन्हा लॉकडाऊन झाल्यास व्यावसायिकांसह सामान्य नागरिकांनाही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. - प्रताप दहितुले, व्यावसायिक उद्योगधंद्यांची सध्या वाईट परिस्थिती आहे. अनेक उद्योजक स्वतःच्या पैशांतून कामगारांचे पगार करीत आहेत. त्यातच वीजजोड कारवाईमुळे उद्योजक अडचणीत आहे. आता पुन्हा लॉकडाऊन झाल्यास उद्योग मरणप्राय अवस्थेला येईल. उद्योगधंद्यांना चालना द्यायची असेल तर लॉकडाउन टाळावे. - संजय भालेकर, उद्योजक आम्ही व्यवसायात पाच वर्षे मागे गेलो आहोत. लाखो रुपयांचा माल पडून आहे. दुकानभाडे, वीज बिल, बँकेचे हप्ते, विविध कर भरणे चुकत नाही. सर्व परिस्थिती सुरळीत होईपर्यंत आमच्या व्यवसायाला उभारी मिळणे कठीण आहे. अशातच पुन्हा लॉकडाउन झाल्यास सर्वच आर्थिक घडी विस्कटेल. - नीलेश शिंदे, प्रिंटिंग प्रेस व्यावसायिक Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3sj4B2h

No comments:

Post a Comment