मिसकॉलची आयडिया हल्ली आम्ही कानाला खडाच काय पण दगडही लावलाय. बायकोने काहीही म्हटलं तरी ‘हूं’. ‘हा’. ‘तुझंच बरोबर आहे.’ ‘तुझ्या हाताची चव कोण्णाऽऽ कोण्णालाऽऽऽ नाही’ एवढंच म्हणतो. ‘एकतर ती काहीही बोलत असताना आपण शांत राहायचे आणि ती शांत असेल तर आपण अजिबात बोलायचं नाही,’ एवढं सूत्र पाळायचं, आम्ही ठरवलं आहे. असं वागण्यामागे आज सकाळचा प्रसंग कारणीभूत ठरला. बायकोने पावभाजी बनवली होती व ती कशी झालीय, यासाठी चव घेण्यासाठी तिने एका वाटीत आम्हाला भाजी दिली. आम्हीही उत्साहाने भाजीचा एक चमचा जिभेवर ठेवला व जोरात ओरडलो, ‘ओऽऽय, ओऽऽय’. बायकोही कावरीबावरी झाली ‘काय झालं’? असं घाबरत तिने विचारले. ‘‘अगं भाजी किती तिखट झाली आहे. शिवाय तिला चव ना ढव. गेल्या रविवारी सुमनवहिनींनी केलेल्या पावभाजीची चव अजून जिभेवर आहे. तशी कर ना. वाटल्यास त्यांना रेसिपी विचार.’’ आम्ही निरागसपणे म्हटले. त्यावर तिने रुद्रावतार धारण केला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘तुम्हाला दुसऱ्या बायकांच्या हाताचीच चव लागणार. संसारासाठी एकटी मी दिवस- रात्र राब राबते आणि या बाबाला दुसऱ्यांच्या बायकांचे कौतुक वाटते. दररोज जात जा ना तिकडेच जेवायला.........’ बायकोचा तोंडाचा पट्टा सुरू झाला. प्रतिमिनिट पाचशे शब्द या वेगमर्यादेने तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडू लागले आणि तिचा हा हल्ला परतवून लावण्यासाठी आम्ही धडपडू लागलो. ‘सॉरी..सॉरी..’ असे शंभरवेळा म्हटले पण उपयोग काही झाला नाही. त्यानंतर कानात कापसाचे बोळे घातले पण शब्दांचा मारा इतक्या वेगात होता, की ते शब्द आमच्या कानावर आदळून, परत भिंतीला धडकत होते व तिथून प्रतिध्वनी येत होता. मग आम्ही भेदरून एका कोपऱ्यात बसलो. तिथे तिचा मोबाईल होता. मग आम्ही हळूच तिच्या आईला मिसकॉल दिला व शांत बसलो. कायद्याच बोला; दंड भरल्यावर पुणे पोलिसांनी काढला 'अ‍ॅम्बुलन्स'चा जॅमर दुसऱ्याच मिनिटाला तिच्या आईचा फोन आला. आईचा फोन बघितल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलले. चेहऱ्यावरील रागाची जागा आता प्रेमाने घेतली होती. ‘काय म्हणतेस आई? सकाळपासून एकदाही फोन केला नाहीस?’ इथपासून सुरू झालेला प्रवास दोन तास झाला तरी सुरू होता. ‘अगं या कामाच्या गडबडीत, मला कोणाला फोनच करता येत नाही. या घरकामामुळे माझं कंबरडं अगदी मोडून गेलंय. बरं जाऊ दे. मला आता खूप कामे आहेत, राहिलेले नंतर बोलू,’ असं बायको अधून- मधून म्हणत होती. मात्र, त्यानंतरही त्यांचे अर्धा तास बोलणे चालूच होते. ‘बरं ठेवते आता..’ असे दोघींकडून म्हटले जात होते पण कोणीच फोन ठेवायला तयार नव्हते. शेवटी तिने एकदाचा फोन ठेवून दिला. बायको भांडण विसरून, फोनवर बोलण्यात गुंतल्याचे पाहून आमच्या मनाला फार समाधान वाटले. आपली मिसकॉलची आयडिया एवढी यशस्वी होईल, याची आम्हाला कल्पना नव्हती. ‘‘अहो एकलंत का?’’ मधाळ स्वर लावत बायको म्हणाली.  त्यावर आम्ही तत्परतेने म्हणालो, ‘अगं तुझ्या हाताची चव कोण्णाऽऽ कोण्णालाऽऽऽ नाही. अगदी खरं. तुझ्या गळ्याशपथ !’ ‘ते जाऊ द्या. माझी आई उद्या सकाळी महिनाभरासाठी आपल्याकडे राहायला येणार आहे. तेव्हा तुम्ही तिला आणण्यासाठी स्वारगेटला जा बरं का! आणि येताना तिला आवडतात म्हणून एक किलो कारलीही आणा.’ प्रेमळ सूर लावत बायकोने म्हटले. मात्र, तिचे बोलणे ऐकून आमच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 25, 2021

मिसकॉलची आयडिया हल्ली आम्ही कानाला खडाच काय पण दगडही लावलाय. बायकोने काहीही म्हटलं तरी ‘हूं’. ‘हा’. ‘तुझंच बरोबर आहे.’ ‘तुझ्या हाताची चव कोण्णाऽऽ कोण्णालाऽऽऽ नाही’ एवढंच म्हणतो. ‘एकतर ती काहीही बोलत असताना आपण शांत राहायचे आणि ती शांत असेल तर आपण अजिबात बोलायचं नाही,’ एवढं सूत्र पाळायचं, आम्ही ठरवलं आहे. असं वागण्यामागे आज सकाळचा प्रसंग कारणीभूत ठरला. बायकोने पावभाजी बनवली होती व ती कशी झालीय, यासाठी चव घेण्यासाठी तिने एका वाटीत आम्हाला भाजी दिली. आम्हीही उत्साहाने भाजीचा एक चमचा जिभेवर ठेवला व जोरात ओरडलो, ‘ओऽऽय, ओऽऽय’. बायकोही कावरीबावरी झाली ‘काय झालं’? असं घाबरत तिने विचारले. ‘‘अगं भाजी किती तिखट झाली आहे. शिवाय तिला चव ना ढव. गेल्या रविवारी सुमनवहिनींनी केलेल्या पावभाजीची चव अजून जिभेवर आहे. तशी कर ना. वाटल्यास त्यांना रेसिपी विचार.’’ आम्ही निरागसपणे म्हटले. त्यावर तिने रुद्रावतार धारण केला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘तुम्हाला दुसऱ्या बायकांच्या हाताचीच चव लागणार. संसारासाठी एकटी मी दिवस- रात्र राब राबते आणि या बाबाला दुसऱ्यांच्या बायकांचे कौतुक वाटते. दररोज जात जा ना तिकडेच जेवायला.........’ बायकोचा तोंडाचा पट्टा सुरू झाला. प्रतिमिनिट पाचशे शब्द या वेगमर्यादेने तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडू लागले आणि तिचा हा हल्ला परतवून लावण्यासाठी आम्ही धडपडू लागलो. ‘सॉरी..सॉरी..’ असे शंभरवेळा म्हटले पण उपयोग काही झाला नाही. त्यानंतर कानात कापसाचे बोळे घातले पण शब्दांचा मारा इतक्या वेगात होता, की ते शब्द आमच्या कानावर आदळून, परत भिंतीला धडकत होते व तिथून प्रतिध्वनी येत होता. मग आम्ही भेदरून एका कोपऱ्यात बसलो. तिथे तिचा मोबाईल होता. मग आम्ही हळूच तिच्या आईला मिसकॉल दिला व शांत बसलो. कायद्याच बोला; दंड भरल्यावर पुणे पोलिसांनी काढला 'अ‍ॅम्बुलन्स'चा जॅमर दुसऱ्याच मिनिटाला तिच्या आईचा फोन आला. आईचा फोन बघितल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलले. चेहऱ्यावरील रागाची जागा आता प्रेमाने घेतली होती. ‘काय म्हणतेस आई? सकाळपासून एकदाही फोन केला नाहीस?’ इथपासून सुरू झालेला प्रवास दोन तास झाला तरी सुरू होता. ‘अगं या कामाच्या गडबडीत, मला कोणाला फोनच करता येत नाही. या घरकामामुळे माझं कंबरडं अगदी मोडून गेलंय. बरं जाऊ दे. मला आता खूप कामे आहेत, राहिलेले नंतर बोलू,’ असं बायको अधून- मधून म्हणत होती. मात्र, त्यानंतरही त्यांचे अर्धा तास बोलणे चालूच होते. ‘बरं ठेवते आता..’ असे दोघींकडून म्हटले जात होते पण कोणीच फोन ठेवायला तयार नव्हते. शेवटी तिने एकदाचा फोन ठेवून दिला. बायको भांडण विसरून, फोनवर बोलण्यात गुंतल्याचे पाहून आमच्या मनाला फार समाधान वाटले. आपली मिसकॉलची आयडिया एवढी यशस्वी होईल, याची आम्हाला कल्पना नव्हती. ‘‘अहो एकलंत का?’’ मधाळ स्वर लावत बायको म्हणाली.  त्यावर आम्ही तत्परतेने म्हणालो, ‘अगं तुझ्या हाताची चव कोण्णाऽऽ कोण्णालाऽऽऽ नाही. अगदी खरं. तुझ्या गळ्याशपथ !’ ‘ते जाऊ द्या. माझी आई उद्या सकाळी महिनाभरासाठी आपल्याकडे राहायला येणार आहे. तेव्हा तुम्ही तिला आणण्यासाठी स्वारगेटला जा बरं का! आणि येताना तिला आवडतात म्हणून एक किलो कारलीही आणा.’ प्रेमळ सूर लावत बायकोने म्हटले. मात्र, तिचे बोलणे ऐकून आमच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3dbj5uP

No comments:

Post a Comment